Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जिल्ह्यातील २५० शिक्षक कार्यमुक्त

$
0
0

औरंगाबाद ः जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांच्या ऑनलाइन प्रक्रियेत बाहेरच्या जिल्ह्यात जाणारे २९०पैकी २६० शिक्षक नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले. त्यांच्या ठिकाणी तेवढेच शिक्षक येणे अपेक्षित असून, प्रत्यक्षात १५० शिक्षक येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण कायम राहणार आहे.

आंतरजिल्हा प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी प्रशासनाने यंदा ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबविली. १४ मार्च रोजी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्यासोबत याबाबत मुंबईत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आदींची बैठक झाली. त्यानंतर आंतर जिल्हा बदलीसंदर्भात २७ जानेवारी रोजी शासन निर्णय काढण्यात आला. निर्णयानंतर कक्ष अधिकारी ग्राम विकास व जलसंधारण यांनी १७ जिल्ह्यांमधील ऑनलाईन बदल्यांसदर्भाचे वेळा पत्रक जाहीर केले, त्यानुसार १५ मेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यानुसार जिल्ह्यातून २९० शिक्षक इतर जिल्ह्यात बदलीस पात्र ठरले. शिक्षण विभागाने यातील २५९ शिक्षकांना टप्याटप्यांने कार्यमुक्त केले आहे.

जागा वर्षभर रिक्त!
बाहेरच्या जिल्ह्यासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांएवढीच संख्या जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांची हवी, असे अपेक्षित आहे, परंतु त्यांची संख्या केवळ दीडशेपर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कमी शिक्षक असल्याचा फटका पुन्हा विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. या जागा वर्षभर रिक्त राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फळांचे दर वाढले

$
0
0

फळांचे दर वाढले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद उच्चतम कृषीउत्पन्न बाजार समितीत सध्या फळांची आवक घटली आहे. पावसाने मारलेली दडी, रमजानचा संपलेला महिना आणि एकंदरीत घटलेली आवक ही तीन कारणे प्रामुख्याने फळांच्या भाववाढीस कारणीभूत असल्याचे फळ विक्रेते सांगत आहेत.

औरंगाबादेत फळं जळगाव, नाशिक, हैदराबाद, नांदेड या मुख्य बाजारातून येतात. याशिवाय ‌सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर या तालुक्यातून चिकू, जांभूळ, मोसंबी यांची आवक होत असते. अननस, चिकू, जांभूळ, लिंबू, मोसंबी, शहाळे, आले केळी, ओले खजूर, संत्री, सफरचंद, डाळिंब आदींचे भाव सध्या वाढले आहे. ही सर्व फळे सरासरी २० ते २५ रुपयांनी महाग झाली आहेत.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत अननस ९ हजार नग आले, याला १५५० चा भाव मिळाला. चिकू २३ क्विंटल आले याला १२०० चा भाव मिळाला. जांभूळ ३ ते ४ क्विंटल आले त्याला ३५०० प्रति क्विंटल भाव मिळाला. लिंबू ३६ क्विंटल आले याला प्रति क्विंटल ६०० ते ७०० रुपये भाव मिळाला. मोसंबी १२ ते १४ क्विंटल आली, मोसंबीला बाजार समितीत २२५० ते ३ हजारचा भाव मिळाला. शहाळे १८ हजार नग आले याला १५०० ते २५०० प्रति शेकडा भाव आला. गेल्या दिवसांपासून बाजार समितीत सफरचंद आणि डाळ‌िंब येत नाहीत, परंतु सिटी चौक आणि औरंगपुरा या परिसरातील फळ मार्केटला २ ट्रक सफरचंद आणि डाळ‌िंब आले आहेत. याला ६ हजार ते ७००० चा भाव आला आहे.

किरकोळ बाजारातील फळांचे दर

सफरचंद- १०० ते १२० रुपये किलो

डाळ‌िंब - ८० ते १००

अननस- ६० ते ८० रुपये नग

ओले खजूर- ५० ते ६०

शहाळे- २५ ते ३० रुपये नग

फणसं-३० ते ४०रुपये पाव

मोसंबी- ५० ते ६०रुपये किलो

संत्र-४० ते ५०रुपये किलो


फळांचे दर रमजान महिना संपला की थोडे वाढत च असतात. थोडी आवकही घटते यंदा पावसानेही दडी मारलीच आहे फळ थोडी यामुळे महाग झाली आहेत.
- युसूफ बागवान,फळ विक्रेते, शहानूर मियाँ दर्गा परिसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’विरुद्ध आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुका निहाय वेगवेगळे दर जाहीर करून शासन दुजाभाव करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकल्पाला एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी शनिवारी गोकुळवाडी शिवारात फडणवीस सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

यावेळी गंगापूर तालुक्यातील गोकुळवाडी, फतियाबाद, पेकळवाडी, टाकळी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी भाकपचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो व जिल्हा सचिव प्रा. राम बाहेती यांची उपस्थिती होती. डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले की, फडणवीस सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. वेगवेगळे दर जाहीर करून शेतकऱ्यांत दुफळी निर्माण करत आहे. त्यांच्या सरकारमधील मंत्री मुठभर शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत आहेत. मूठभर शेतकऱ्यांची संमती मिळाली म्हणजे सर्व शेतकऱ्यांची संमती दिली, असे सरकारने समजू नये. सरकारच्या भुलथापांना बळी न पडता शेतकऱ्यांनी लढा तीव्र करावा, असे आवाहन डॉ. कानगो यांनी केले.

यावेळी शेतकरी कृती समितीचे बाळू हेकडे, सुभाष बर्डे, नामदेव देवतकर, सूर्यभान पल्हाळ, नारायण मुळे, रावसाहेब शेरकर, उत्तम पल्हाळ, मारुती फटांगडे, कचरू जारवाल, धोंडिराम जगधने, नंदू मुळे, जनार्धन जगधने, संतोष जगधने, चत्तरसिंग सुंदर्डे, राजू जारवाल, फुलसिंग जारवाल, उदलसिंग जारवाल, कचरूसिंग जारवाल, किशोर जाधव, गुलाब कांडेकर, अनिल भगत, बाळू भवर, रुपचंद साठे, चैनसिंग सुंदर्डे, फुलसिंग सुंदर्डे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन तलाव जोडणीचे भूमिपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
सातारा तांडा येथील दोन तलाव पाइपलाइनद्वारे जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आमदार सुभाष झांबड यांच्या निधीतून १० लाख रुपये देण्यात आले आहेत.

सातारा तांडा येथे दोन तलाव आहेत. एक तलाव लहान असून तो पावसाळ्यात भरल्यानंतर पाणी वाहून जाते. या तलावाचे पाणी पाइपलाइनद्वारे दुसऱ्यात तलावात आणण्यात येणार आहे. या दोन्ही तलावाची क्षमता ५ एमएलडी आहे. तलावाच्या २ फूट खाली खोदून २ मीटर स्लोप करण्यात येणार आहे. त्यासाठी ९०० मि.मी. व्यासाचे १९० मीटर पाइप वापरून पाणी मोठ्या तलावात आणले जाणार आहे. तेथे पाणी साचल्यावर ते सातारा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत पाइपलाइनद्वारेच आणण्यात येणार आहे. यामुळे गावाला दोन ते तीन दिवसाआड पाणी मिळेल. यासंबंधीचे साडेतेरा लाख रुपयांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले असून, त्याला मंजुरी मिळाल्यावर त्या कामालाही सुरूवात करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठ्याचे उपअभियंता आय. बी. ख्वाजा यांनी सांगितले.

यावेळी नगरसेविका सायली जमादार, माजी सरपंच फिरोज पटेल, यशवंत कदम, राजू नरवडे, सोमिनाथ शिराणे, रोहन पवार, पाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल, वार्ड अधिकारी शैला डाके आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’चे काम ऑक्टोबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वांकांक्षी नागपूर - मुंबई समृद्धी ७१० किलोमीटरच्या महामार्गाचे काम मुदतीच्या आत व्हावे, यासाठी रस्त्याचे १६ पॅकेजेस केले आहेत. प्रकल्पात चार कंपन्या आमच्यासोबत सहभागी झाल्या आहेत. उर्वरित पाच कंपन्याही लवकरच सहभागी होतील. या रस्त्याचे काम ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी येथे दिली.

मोपलवार म्हणाले,‘विदर्भ, मराठवाड्याचा मुंबईशी असलेला कनेक्ट अधिक बळकट व्हावा, यासाठी राज्य सरकारने नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. एमएसआरडीसी हा रस्ता ईपीसी (इंजिनीअरिंग प्रोक्युअरमेंट कॉन्ट्रॅक्ट) पद्धतीने पूर्ण करणार आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर मुदतीच्या आता व्हावे, यासाठी कामाचे १६ पॅकेजेस तयार केले. या पॅकेजअंतर्गत रस्त्याचे काम स्वतंत्र निविदाद्वारे दिले जाईल.’

रस्त्यासाठी जो निधी लागणार आहे. त्यासाठी देशातील अनेक उद्योग, कंपन्यांनी सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. त्यापैकी एनसीसी, एल अँड टी आणि अन्य एका कंपनीचा सहभाग निश्चित झाला आहे. दिलीप बिल्डकॉन, एलएफएस आणि पीएनसी या कंपन्यांनीही संपर्क केला आहे. जुलै महिन्यात रस्त्याच्या कामाच्या निविदा निश्चित होतील. ऑक्टोबरपासून रस्त्याचे काम सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदनामीची धमकी; दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुनेचे आक्षेपार्ह फोटो सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करून शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती माहिती पोलिस उपनिरीक्षक सुधीर घुले यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांतननगर परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या व्यक्तिला त्याच्या सुनेची बदनामी करण्याची धमकी देत १५ लाखांची खंडणी मागण्यात आली होती. हा प्रकार ऑगस्ट २०१६ पासून सुरू होता. विजेंदर उर्फ नयन आणि पृथ्वीराज उर्फ प्रिती (रा. नांदेड), अशी संशयित आरोपींचा नावे आहेत. त्यांना या कुटुंबाने प्रतिसाद न दिल्याने सुनेचे छायाचित्र सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे या कुटुंबाने क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोघे या महिलेच्या सासऱ्या फोन करून खंडणी मागत होते. त्यामुळे पोलिसांनी कुटुंबामार्फत त्यांना पैसे देण्याच्या बहाण्याने शहरात बोलावून अटक केली.

तरुणीचे शोषण

सोशल मिडियावर फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक शोषण केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, २३ फेब्रुवारी ते ५ जुलै या काळात यासीन इब्राहीम शेख (रा. खैसर कली, चंपा चौक) याने तिचे अर्धनग्न फोटो नकळत काढले. हे फोटो इंटरनेटवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. तिच्या बहिणीचे लग्न मोडीन, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर बळजबरीने घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवसांपासून निर्जळी, पाण्यासाठी दाहीदिशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणच्या शटडाउनमुळे शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा पुरता विस्कळीत झाला आहे. अनेक भागात चार दिवसांपासून पाणीपुरवठाच झालेला नाही. त्यामुळे पाणी मिळ‍ण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागली.
जायकवाडी, बिडकीन भागात महावितरणकडून शुक्रवारी शटडाउन घेण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. हे काम चार तास लांबल्याने शनिवारी निर्धारित वेळी शहरात पाणी येऊ शकले नाही. महावितरणकडून हे काम पूर्ण करण्यास १६ तासांचा अवधी लागला. शटडाउन असल्याने शहरातील जलकुंभांमध्ये आवश्यक पाणी पातळी नाही. जलकुंभांमध्ये पुरेसा पाणी पुरवठा नसल्याने सिडको-हडकोतील अनेक भागांमध्ये निर्जळी आहे. शटडाउनमुळे तीनऐवजी चार दिवसानंतर शहरातील बहुतांश भागाला पाणी मिळणार आहे. परंतु, अद्यापही शहरातील सिडको एन-४, हडकोतील काही भागांसह अनेक वसाहतींना रविवारही पाणीपुरवठा होऊ शकला नाही. शहरातील क्रांती चौक, सिडको एन-५ जलकुंभांना दोन दिवसापासून पाणी पातळी कमी आहे. त्यामुळे या जलकुंभावर अवलंबून असणाऱ्या वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काम पूर्ण झाल्यानंतरही अनेक पाणीपुरवठा सुरळीत होण्यास काही तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत उपअभियंता आय. बी. खाजा यांनी सांगितले की, जलकुंभांची पाणीपातळी पुरेशी नसल्याने अनेक भागाला पाणीपुरवठा करणे शक्य झालेले नाही. ही प्रक्रिया रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरळीत होईल, त्यामुळे सोमवारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी सांगितले.

पाण्यासाठी भटकंती

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने उस्मानुपरा, कैलासनगर, रोकडिया हनुमाननगर, भावसिंगपुरा आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास दोन-तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीचे आमिष; दोघांची दोन लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोकरीचे आमिष दाखवून दोघांना एकूण दोन लाख ११ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रवी गौतम बडे (रा. हर्सूल, बौद्धनगर) यांच्या तक्रारीनुसार, कैलास पाजगे, गणेश बोरसे यांनी ४ व ५ डिसेंबर २०१५ रोजी ड्रायव्हरची नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी मागणीनुसार बडे यांनी दोन लाख रुपये दिले. पण, त्यांना नोकरी मिळाली नसल्याने पैशांची मागणी केली. त्यावेळी पैसे ठेण्यास टाळाटाळ करून शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोघांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत बनावट बेवसाइटवरून नोकरीनचे आमिष दाखवून ११ हजार ७०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. आशहदउल बदरउल इस्लाम (रा. औरंगाबाद टाइम्स कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, ५ ते २८ जून २०१७ या कालावधीत हेड हुमन रिसोर्स (रा. ऑस्ट्रेलिया), प्रीतसिंग (रा. अलाहाबाद) यांनी बनावट वेबसाईट बनवून नोकरीचे आमिष दाखविले. नोकरीसाठी व्हिसा काढण्यासाठी ११ हजार ७०० रुपये घेऊन व्हिसा मिळवून दिला नाही व नोकरीही दिली नाही. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक पगारे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पेट’चा निकाल केवळ ३.२ टक्के

$
0
0

औरंगाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेत (पेट) ९ हजार ५१९ विद्यार्थ्यांपैकी ३२४ विद्यार्थी (३.२ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यापीठातर्फे १४ व १५ जुलै रोजी पेट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल रविवारी सायंकाळी विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला. उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्याला किमान ५० टक्के, तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी ४५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या पेट-४च्या निकालात उत्तीर्णतेची टक्केवारी केवळ ३.२ आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ३२४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. त्यात खुल्या प्रवर्गातील १३२ आणि राखीव प्रवर्गातील १९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांत नाराजी
निकालात झालेली घसरण नकारात्मक गुणपद्धतीमुळे (निगेटिव्ह मार्किंग) झाल्याची चर्चा आहे. या परीक्षेत ५९ विषयांपैकी काही विषयांत एकही विद्यार्थी उत्तीर्ण नाही. काही विषयात केवळ बोटावर मोजण्याऐवढेच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नकारात्मक गुणपद्धतीबाबत विद्यापीठ प्रशासनाने ऐनवेळी निर्णय घेतल्याचेही विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीकडे पाण्याचा ओघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणात गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात जवळपास तीन टक्क्यांची वाढ झाली असून, दुसऱ्या दिवशी धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग मंदावला असल्याची माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात आलेले पाणी सुमारे ४८ तासांचा प्रवास करून हे जायकवाडी धरणात पोचत असून, शनिवारपासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या, धरणात १८ हजार ९८ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात दोन दिवसांत सुमारे तीन टक्क्यांची भर पडली आहे.

जायकवाडीची स्थिती
पाणी पातळी ः १५०२.६८ फूट (४५८.०१७ मीटर)
आवक ः १८०९८ क्युसेक
एकूण साठा ः ११७६.३०६ दशलक्ष घनमीटर
उपयुक्त साठा ः ४३८.२ दशलक्ष घनमीटर
टक्केवारी ः २०.१८ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निखळलेल्या चौकटीचे काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जडवाहनांना उड्डाणपुलाखालून जाण्यास बंदी घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी चौकटीचा एक भाग गुरुवारी रात्री निखळला होता. त्यामुळे उस्मानपुरा ते पैठण गेट रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी महापालिकेने या चौकटीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.

क्रांतिचौक उड्डाणपुलाखालून जडवाहतूक जाऊ नये, यासाठी चारही बाजूंनी ठराविक उंचीची लोखंडी चौकट बसविली होती. गुरुवारी रात्री उस्मानपुऱ्याकडील चौकटीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे पूर्वेकडील भाग निखळला. वाहतूक पोलिसांना शुक्रवारी सकाळी ही बाब निदर्शनास आली. यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. लोखंडी चौकट दुरुस्त होईपर्यंत वाहतूक वळविण्यात आली होती. मोंढा नाकाकडून येणाऱ्या वाहनांना उस्मानपुरा मार्गे वळसा घालून यावे लागत होते. नागरिकांचा त्रास कधी दूर होणार, असा प्रश्न होता, मात्र रविवारी सकाळी महापालिका प्रशासनाने लोखंडी चौकटीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. क्रेनच्या सहाय्याने लोखंडी पोल हटविण्याचे काम सुरू झाले होते.

दोन कार्यालयांत विसंवाद
लोखंडी चौकटीखालून वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्यामुळे या रस्त्याची वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारला. महापालिका कार्यक्षेत्रात हा पूल येतो. दोष निवारण कालावधीपर्यंत पुलाची जबाबदारी एमएसआरडीसीकडे होती. तो कालावधी मागच्या महिन्यात संपला. त्यानुसार एमएसआरडीसीने महापालिकेकडे पूल आणि खालील रस्ता हस्तांतरित केला, पण दोन्ही कार्यालयांमध्ये संवादाचा अभाव होता. त्याचा फटका नागरिकांना बसत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’ महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य सरकारने जाहीर केलेला नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला व वाहतूक दळण-वळणासह उद्योग, व्यापाराला चालना देणार आहे. यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. समृद्धीबाबत आमची भूमिका सकारात्मक असून, या महामार्गाला कुठलाही अडथळा येऊ देणार नाही, अशी ग्वाही मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी रविवारी येथे दिली.

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने समृद्धी महामार्गाबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.मोपलवार यांनी समृद्धी महामार्ग प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. जिल्हाध्यक्ष गोपीनाथ वाघ, विजय गव्हाणे, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, जे. के. जाधव, प्राचार्य अशोक नाईकवाडे, विक्रम जाधव, ज्ञानोबा मुंडे, प्राचार्य जीवन देसाई, मिलिंद पाटील, पंजाबराव वडजे, अॅड. वसंत देशमुख, सारंग टाकळकर आदी उपस्थित होते. गोपीनाथ वाघ यांनी प्रास्ताविक केले. भरत राठोड यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. विनायक चिटणीस यांनी आभार मानले.

योग्य मोबदला मिळावा
अॅड. देशमुख म्हणाले की, समृद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला योग्य प्रमाणात मिळावा, यासाठी शेतकऱ्यांच्यावतीने शासनदरबारी मी एक कॅव्हेट दाखल करणार आहे. हा मार्ग झाल्यास मराठवाड्याचा व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासात भर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच वर्षांच्या मुलाचा आईनेच घेतला जीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला आईनेच विहिरीत टाकून जीव घेतल्याचा प्रकार तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या महिलेला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील लामणगाव शिवारातील गट नंबर १७२ मधील विहिरीत ८ जुलै रोजी गौरव उर्फ कान्हा किशोर पवार या मुलाचा मृतदेह सापडला होता. याची नोंद देवगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. सहायक पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करताना मुलाच्या आईवर संशय बळावला. पोलिसांनी मुलाची आई सोनाली किशोर पवार (रा. लामणगाव) हिला ताब्यात घेऊन या घटनेचा उलगडा केला. अनैतिक संबधात मुलगा अडसर ठरत असल्याने त्याला ८ जुलै रोजी पहाटे चार वाजेपूर्वी विहिरी फेकल्यात आले होते. हेडकॉन्स्टेबल भास्कर खुळे यांच्या फिर्यादीवरून सोनाली पवार हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेला कन्नड कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्याग्रस्तांच्या पाल्यांना आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे लोण मोठ्या प्रमाणात पोचलेले आहे. शेतकरी आत्महत्या सरकारी निकषांत बसल्यानंतर मदत मिळते. मात्र, घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर मुलांचे शिक्षण, मुलींचे विवाह, वृद्धांचे आजारपण हे प्रश्न शिल्लक राहतात. अंबाजोगाई तालुक्यात शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था पुढे आली आहे. संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेचे संतोष पवार यांनी ‘आधार माणुसकीचा’ या उपक्रमाअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत आहेत.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयातील विद्यार्थी हे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून दूर होता कामा नये यासाठी सर्वप्रथम अंबाजोगाई तालुक्यात आजवर झालेल्या शेतकरी आत्महत्याची यादी महसूल प्रशासनाकडून मिळवली. अंबाजोगाई तालुक्यात २०१० सालापासून आजपर्यंत सात वर्षात ५५ शेतकरी आत्महत्या झाल्याचे समोर आले. या ५५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना संस्थेच्यावतीने संतोष पवार यांनी समक्ष जाऊन भेटी दिल्या आहेत. त्या कुटुंबातील शेतकऱ्यांची पत्नी, माता व मुलांची भेट घेऊन त्याच्या समस्या समजावून घेतल्या. या भेटीत लक्षात आले की, या कुटुंबातील मुले परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर होत आहेत. त्यामुळे या कुटुंबातील पहिली ते बारावी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १२० मुले-मुलींच्या शैक्षणिक अडचणी आणि गरजा नोंदवण्यात आल्या. सर्व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलांची शिक्षणाची जवाबदारी संस्थेने घेतली. या मुलांना पुस्तके, वह्या शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे.
नुकतेच अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. ५५ आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप करण्यात आले आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी यापूर्वी अनेक हात पुढे आले. अगदी प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षय कुमार यांनी या कुटुंबाना मदतीचा हात दिला. कुणी मुलींचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. अनेक संस्था व्यक्तींनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करीत आम्ही तुमच्या सोबत असल्याचा विश्वास या कुटुंबाना दिला. मात्र, अंबाजोगाई तालुक्यातील आधार माणुसकीचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण अखंडितपणे चालू रहावे यासाठी महत्वाचा आहे.
या उपक्रमाचे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासोबतच एक वृक्ष देखील देण्यात आले आणि हे वृक्ष पुढल्या वर्षांपर्यंत जपले आणि जोपासले पाहिजे, अशी शपथ देण्यात आली.

‘आधार माणुसकीचा’ या संकल्पनेतून अंबाजोगाई तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठीचा सर्वे प्रत्येक गावी जाऊन केला. यामध्ये मुले परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलांची जबाबदारी घेणे आवश्यक वाटयाने ही जबाबदारी कर्तव्य म्हणून उचलली आहे.
संतोष पवार, अंबाजोगाई.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’च्या कामांचा निधी कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला अर्थमंत्र्यांनी कात्री लावली आहे. राज्यातील जलसंधारणाची कामे रखडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फटका जलसंधारणाच्या निधीला बसला आहे. कर्जमाफीच्या रक्कमेचा ताळमेळ घालण्यासाठी शासकीय खर्चात सुमारे २० ते ३० टक्के कपात करण्याचा निर्णय राज्याच्या अर्थ विभागाने घेतला आहे. याचा फटका जलयुक्त शिवारसाठीच्या निधीला बसणार असून, यामुळे प्रस्तावित गावातील कामे वेळेत पूर्ण होतील किंवा नाहीत याबद्धल साशंकता व्यक्तविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना याचा परिणाम जलयुक्त शिवारसह, शेतकऱ्यांच्या हिताच्या कोणत्याही योजनेसाठी होवू दिला जाणार नाही, शिवाय निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असताना शासकीय खर्चातील कपातीचे आदेश अर्थ विभागाने दिल्यामुळे सर्वत्र शासन निधींबाबत साशंकतेचे वातावरण आहे. २०१७-१८ च्या ५ हजार
गावामध्ये जलयुक्त शिवारची कामे कशी करायची हा प्रश्न जलसंधारण विभागाला भेडसावत आहे. त्यामुळे या योजनेसाठी कपात लागू करू नये,
अशी विनंती जलसंधारण विभागाने अर्थमंत्री यांच्याकडे केली असल्याचे वृत्त आहे.
राज्यातील दुष्काळ व पाणीटंचाई यावर मात करून शेतकऱ्यांना शासवत सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतेत येताच जलयुक्त शिवार योजना सुरू केली. पहिल्या वर्षी म्हणजेच २०१५-१६ मध्ये ६२०० गावांमध्ये नदी व नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण ,जुन्या योजनांचे
दुरुस्तीकरण, जलस्रोतांची साफ-सफाई यासह अनेक कामे या उपक्रमात घेण्यात आली. यावर सुमारे २ हजार कोटी इतका खर्च करण्यात आला. त्यानंतर २०१६-१७ साठी ५ हजार २०० गावांची निवड करण्यात आली. त्यासाठी २२५० कोटींची तरतूद असून, ही कामे पूर्ण करण्यासाठी ३० जून २०१७
ही मुदत होती. मात्र,अजूनही ही कामे पूर्ण झालेली नाहीत. २०१७-१८ साठीही ५ हजार गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी आधीच अपुरी म्हणजे
केवळ १२०० कोटींची तरतूद राज्य सरकारने केली आहे.
राज्य सरकारच्या नवीन विचारधारानुसार जर २० टक्के निधीत कपात केली तर, २०१७-१८ साठी तो निधी ९६० कोटी इतका होणार असून, निधींबाबतच्या या
कंजुशीपणामुळे मुख्यमंत्र्यांचे दुष्काळमुक्त व टँकरमुक्त महाराष्ट्र हे स्वप्न पूर्ण होण्यास विलंब होणार आहे. निधीसाठीच्या आकडेवारीच्या खेळात प्रशासनाला सुद्धा काम करणे अवघड होईल. त्याशिवाय निधींनुसार कामाला प्राधान्य देताना जिल्हा प्रशासनाची डोकेदु:खी वाढेल.
उस्मानाबादेत २०१५-१६ मध्ये जलसंधारणाच्या कामासाठी ९२ कोटी ४४ लाखाची तरतूद होती. हीच तरतूद २०१६-१७ साठी ८४ कोटी ६०, लाख करण्यात
आली. २०१७-१८ साठी यापेक्षा ही कमी तरतूद आहे. एकीकडे जलसंधारणाची कामे मुदतीत पार पाडावीत यासाठी मंत्री महोदयांपासून ते वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण प्रशासनातील अधिकाऱ्यांना तंबी देतात. मात्र,ही तत्परता ते निधी उपलब्धतेच्या बाबतीत दाखवीत नसल्याबद्दल नाराजीचा सूर आहे.

लोकप्रतिनिधी मौन बाळगून
जलयुक्त शिवारच्या निधीत शासनाकडून कपात होत असताना लोकप्रतिनिधी मात्र, याबाबतीत मौन बाळगून आहेत, याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांना
आश्चर्य वाटते. किंबहुना या निधीच्या कंजूषपणाची माहितीच लोकप्रतिनिधीना नसावी, असेही काही अधिकारी खासगीत बोलत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद
गेल्या २० दिवसांपासूनच्या उघडीपीनंतर रविवारी दुपारनंतर मराठवाड्यातील उस्मानाबाद, नांदेड, लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या पुनरागमनामुळे सुकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळणार असल्याने बळीराजात आनंदाचे वातावरण आहे. पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

नांदेडमध्ये मुसळधार
नांदेड - नांदेडमध्ये रविवार दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचनंतर शहर व परिसरात तासभर मुसळधार पावसाने हजेरल लावली. हा पाऊस नांदेड शहरासह जिल्ह्यात दूरवर पडत असल्याचे वृत्त आहे.
नांदेडच्या विष्णुपुरी धरणातील पाणी साठा अठरा टक्क्यांवरून सोळा टक्क्यांवर गेला होता. त्यामुळे पावसाची आवश्यकता होती. रविवारी झालेल्या पावसाने शहरात दाणादाण उडवून दिली. गटारी तुंबल्याने अनेक भागात रस्त्यावर गटाराचे पाणी वाहत होते. या पावसाने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या असून पावसाअभावी वाळू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

उस्मानाबादमध्ये दमदार
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. जिल्ह्यात मागील तीन आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके वाया जाऊन शेतकयावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार होते. मात्र, रविवारी उस्मानाबाद शहरासह, जिल्ह्यातील कळंब, भूम, वाशी, परंडा, लोहारा व तुळजापूर तालुक्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले असून पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे.

लातूरमध्ये हजेरी
लातूर - गेल्या १५ दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात रविवारी दुपारनंतर हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजाच्या आशा पनल्लवीत झाल्या आहेत. पावसाअभावी सुकू लागलेल्या खरीप पिकांना या पावसामुळे जीवदान मिळणार आहे. लातूर शहरासह, जिल्ह्यातील औसा, रेणापूर, शिरुर ताजबंद परिसरात पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या मीटरचे रिडिंग चक्क शून्य!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिमोटचा वापर करून वीज चोरी करणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. चौकशीमध्ये मीटर रिडिंग शून्य असलेले तब्बल ८०० ग्राहक आढळले आहेत. यापैकी ५० ग्राहकांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी नोटीस बजावल्या आहेत. वीज चोरी केल्याचे आढळल्यास यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.

रिमोटच्या मदतीने मीटर हँग करून किंवा बंद करून वीज चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. शहरात ३०० ग्राहकांच्या घरी हे रिमोट बसवले असल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिस आयुक्त यादव यांनी सांगितले. पोलिसांनी महावितरणकडून औद्योगिक, व्यवसायिक व घरगुती वीज ग्राहकांचा डेटा मागितला आहे. पोलिसांनी मागवलेल्या डेटामध्ये शून्य रिडिंग, शून्य ते ३० युनीट व ३० ते १०० युनीट रिडिंग असलेल्या ग्राहकांचा समावेश आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून ८०० ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग शून्य असल्याचे आढळून आले आहे. या ८००पैकी ५० ग्राहकांना गुन्हे शाखेने नोटीस बजावल्या आहेत. त्यांचे जणांचे जबाब घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड तालुक्यात पाऊस; पिकांना जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे ९७ हजार हेक्टरवरील पिके दुबार पेरणीच्या संकटातून वाचली आहेत. दरम्यान, शेतांमध्ये कामांना जोर आला आहे. दरम्यान, शेतकरी मजुराच्या शोधात दारोदार भटकत आहेत.
पाऊस पडल्यामुळे मशागत, निंदणी, कोळपणीची कामे सुरू आहेत. कापूस, मका, उंडीद, तूर, मूग, सोयाबीन आदी पिकांना खत देण्यासाठी लगबग सुरू आहे. पाऊस पडल्यामुळे खत देण्यासाठी सर्वानाच मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी जादा मजुरी किंवा ठराविक रक्कम देऊन काम करून घेत आहेत. काही शेतकरी दुसऱ्या गावातून मजूर आणत आहेत. मजुरांच्या कामाच्या वेळा शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे ठरल्या आहेत.

मिरची तोडणी सुरू

तालुक्यात सध्या मिरची तोडणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. एक बाई दिवसाला ८० ते ९० किलो मिरची तोडते. तोडणीला पाच रुपये किलो असा दर आहे. त्यामुळे एका बाईला दिवसाला ४०० ते ४५० रुपये मजुरी मिळत आहे. मिरची तोडणीमुळे इतर कामाला मजूर मिळत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पोलिसांकडून दामिनी पथक स्थापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले ग्रामीण पोलिसांचे दामिनी पथकाची आता पुन्हा नव्याने निर्माण करण्यात आले आहे. हे पथक रोडरोमियोंवर अंकुश ठेवण्याचे काम हे पथक करणार आहे. तसेच महिला व तरुणींसाठी स्वतंत्र मोबाइल अॅप तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावापासून दूर असलेल्या शाळा-कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी जातात. यावेळी अनेकदा मुली, तरुणी व महिलांना रोडरोमियोंच्या छेडछाडीला बळी पडावे लागते. शहर पोलिस दलाप्रमाणे पूर्वी ग्रामीण पोलिसांनी महिला पोलिसांचे दामिनी पथक कार्यरत केले होते. पण, हे पथक अचानक बरखास्त करण्यात आले. त्यामुळे सध्या रोडरोमिओंवर वचक राहिलेला नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर याचा आढावा घेतला. दामिनी पथकाची निर्मिती करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हे पथक स्थापन केले आह. हे साध्या वेशातील पथक शाळा, कॉलेज सुटण्याच्या वेळी भेट देणार आहे. यामध्ये छेडछाड करणारे रोडरोमिओ आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

अॅपची निर्मिती

ग्रामीण पोलिस दलातर्फे मुली व तरुणीसाठी अँड्रॉइड मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. हे अॅप तरुणींनी आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून घेतल्यास त्यामध्ये इमर्जन्सी संपर्क क्रमांक राहणार आहे. काही संकट आल्यास या तरुणींनी या क्रमांकावर कॉल केल्यास जवळच्या पोलिस ठाण्याला या तरुणीचे लोकेशन तत्काळ समजणार आहे. त्यामुळे पोलिस त्या तरुणीच्या मदतीला घटनास्थळी धाऊन जावू शकतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली.

वैजापुरात समज

वैजापूरः ग्रामीण पोलिसांच्या दामिनी पथकाने सोमवारी वैजापूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून रोडरोमिओंना ताब्यात घेतले. शहरात विनायकराव पाटील महाविद्यालय व बसस्थानक परिसरात शाळा व महाविद्यालयिन विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक मनीषा लटपटे, अनिता बांगर, हिवाळे, दीपक झिंझुर्ड व वैभव नांगरे यांच्या पथकाने विनायकराव पाटील महाविद्यावय व बसस्थानक परिसरात छापा मारला. त्यावेळी अनेक युवक मुलींची छेडछाड करताना आढळले. त्यांना पोलिसांच्या वाहनातून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे कडक समज देऊन सोडून देण्यात आले. या कारवाईमुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पोलिसांनी दर आठवड्याला ही मोहीम राबवावी, अशी मागणी मुलींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलआराखड्याला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत आहे. सरकारकडून मराठवाड्याचे हक्काचे पाणी देताना योग्य त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. जलसंपदा विभागाने गोदावरी खोरे एकात्मिक जलआराखडा कुठल्याही चर्चेविना, हरकतींविना मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर करू नये, प्रस्ताव पुन्हा बोलावून त्यातील चुका दुरुस्त कराव्यात आणि मगच मंजूर करावा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. सभेच्या सुरवातीलाच रिपाइंचे सदस्य रमेश गायकवाड यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करत जलआराखड्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले,‘जलसंपदा विभागाने सेवानिवृत्त अभियंत्यांकडून जलआराखडा तयार करून घेतला. हा आराखडा मुळातच चुकीचा आहे. कायद्यानुसार आराखडा आधी जलमंडळाला सादर करावा लागतो. तेथून तो जलसंपदा विभागाच्या सचिवांकडे जातो आणि तेथून मुख्यमंत्र्यांना पाठविला जातो. दीर्घ प्रतीक्षेनंतर मांडलेला जलविकास आराखडा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठविला गेला.’

आराखडा तयार केल्यानंतर तो सादर करण्यापूर्वी हरकती, आक्षेप नोंदविणे अपेक्षित असते. त्या प्रक्रियेलाही फाटा दिला गेला आहे. आराखडा परत बोलवावा, त्यातील आवश्यक त्या दुरुस्ती कराव्यात, मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची योग्य नोंद व्हावी आणि नंतरच मंजूर करण्यात यावा, असा ठराव गायकवाड यांनी सभागृहात मांडला. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सर्वपक्षीय सदस्यांनी त्यास संमती दर्शविली. एल. जी. गायकवाड, किशोर बलांडे, प्रा. रमेश बोरनारे यांनी त्यास अनुमोदन दिले.

मुळा, प्रवरा स्वतंत्र खोरी!
गोदावरी खोरे एकात्मिक जलआराखडा मांडताना त्यात गोदावरी, मुळा आणि प्रवरा अशी तीन खोरी नमूद करण्यात आली आहेत. मुळातच मुळा आणि प्रवरा गोदावरी खोऱ्यांतर्गत येतात. स्वतंत्र खोरी दाखवून मराठवाड्याचे हक्काचे पाणी कमी करण्याचा हा डाव आहे. यामुळे मराठवाड्यावर अन्याय होणार आहे. समन्यायी पाणीवाटपाच्या मुद्याला हरताळ फासला जाणार आहे. मराठवाड्यातील आवश्यक प्रकल्पांना मंजुरी मिळालेली नाही. त्याचा फटका शेतीला बसला आहे. या गोष्टी ध्यानात घेऊन मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेला जलविकास आराखडा मंजूर करण्यात येऊ नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images