Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सैराट प्रियकरा’ला चौकात ’प्रिन्स’ने बदडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक प्रेमी जोडपे शहरात फिरताना भावाच्या नजरेस पडले. त्याच्या तळपायाची आग मस्तकात पोचली व त्याने भरचौकात तरुणाला झोडपून काढण्यास सुरुवात केली. सिल्लेखाना चौकातील हा प्रकार पाहण्यासाठी शेकडो जण जमले होते. पण, सिटी चौक ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून
दोघांना प्रियकराची सुटका केली. त्यांना क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेऊन समुपदेशन करण्यात आले.
सिल्लेखाना चौकातून बुधवारी सायंकाळी एक तरूण व तरुणी पायी बोलत जात होते. ही तरुणी गावाकडून शहरात बहिणीकडे ‌शिक्षणासाठी आली आहे, तर तरूण तिला भेटण्यासाठी आला होता. त्यांना तरुणीच्या भावाने पाहिले. त्याने या तरुणाला सिल्लेखाना चौकातच बदडण्यास सुरुवात केली. एक तरुणी व दोन तरूण एकमेकांशी भांडत असल्याचे पाहून तेथे काही क्षणात शेकडो लोक जमले. पण, भांडण सोडवण्यासाठी कोणीच जात नव्हते. गर्दी जमल्याने सिटी चौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी संजय नंद व संदीप तायडे हे तेथे गेले, त्यांनी भांडण सोडवून माहिती घेतली असता हा वेगळाच प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यांनी तिघांना क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणले. या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी तिघांची वेगवेगळी चौकशी केली. त्यानंतर जोडप्याचे समुपदेशन व तरुणीच्या भावाला समजावण्यात आले. तरुणीने भावाची माफी मागितली. पुन्हा एकमेकांना भेटणार नाही अशी कबुली दिल्यानंतर तिघांना घरी पाठवण्यात आले.

पोलिस असल्याची जाणीव
सिटी चौक पोलिस ठाण्यात कार्यरत कॉन्सटेबल संजय नंद व संदीप तायडे हे कार्यालयीन रबरी स्टँप तयार करण्यासाठी सिल्लेखाना चौकात आले होते. पण, हाणामारी व गर्दी पाहून धाव घेतली. त्यांच्या पोलिस ठाण्याची हद्द नसतानाही दोघांनी जमावाला पांगवले. सुरक्षिततेच्या दृष्टीने तिघांना क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणून कर्तव्य बजावले. हद्दीच्या वादातून नेहमी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी नंद व तायडे यांच्या कामगिरीतून धडा घेण्याची गरज आहे.

तरुणी, तिचा भाऊ व तरुणाची चौकशी, समुपदेशन करण्यात आले. मुलीला चुकीची जाणीव झाल्याने तिने भावाची माफी मा‌गितली. त्यांची एकमेकाविरुद्ध तक्रार नसल्याने त्यांना समजावून घरी पाठवण्यात आले.
नरेंद्र पाडळकर, सहायक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाकपचा जिल्ह्यात सहा ठिकाणी रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात, शेतमालाला हमीभाव द्या, त्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा कायमचा निधी निर्माण करा, शेतकरी-शेतमजुरांना पेन्शन द्या, आदी मागण्या करण्यात आल्या.
भाकपतर्फे विविध मागण्यांसाठी २४, २५, २६ रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून शहरात पाच ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. वसंतराव नाईक चौक, लिंबे जळगाव येथे आंदोलन तासभर सुरू होते. सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली.
२०१३ च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करा, समुद्धी महामार्ग रद्द करा, भाकड गाई सांभाळणाऱ्यांना अनुदान द्या, रोजगार हमी मजुरांना किमान वेतन ४०० रुपये द्या, अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी अभय टाकसाळ, जयश्री गायकवाड, कैलास कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी मेहबूब कुरेशी, पंढरीनाथ कांबळे, इब्राहीम पटेल, रंगनाथ कळसकर, बंडू मोटे, हरिभाऊ हटकर, इब्राहीम शेख, मेजर सुखदेव बन, लाला शेख, आप्पासाहेब कौसे, गणेश कसबे, राम मालकर, सतिश पल्हाळ, तुकाराम पाटील, माणिक सुरासे फैय्याज कुरैशी, लतिफ पटेल आदींची उपस्थिती होती.

‘आंदोलन व जनतेचा थेट संबंध’

फुलंब्रीः तालुक्यातील आळंद येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळी ११ वाजता औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे राज्य सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.
यावेळी ते बोलतंना डॉ. कांनगो म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात व इतर अनेक राज्यात शेतकऱ्यांचा संप, आंदोलने होत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा व जनतेचा थेट संबंध आहे, हे लक्षात घ्या. शेतकरी वाचला तर शेती वाचेल व शेती वाचली तरच जनतेची भूक भागेल. या मागण्यांसाठी बुधवार ते शुक्रवारपर्यंत देशभरात आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनाकडे तटस्थपणे न पाहता सामील व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी तालुका सचिव अशोक जाधव, कौतिक पायगव्हाण, आजिनाथ शेळके, काकाजी तायडे, रावसाहेब पायगव्हाण, दादाराव तायडे, युसूफ पठाण, मोबीन बेग, गजाबा तायडे , हनीफ पठाण, शेख अकबर, सर्जेराव तायडे आदींसह शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडोदबाजार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक साईनाथ रामोड, उपनिरीक्षक ए. ओ. पठाण आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

पोलिसांविरुद्ध संताप

सिल्लोडः भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे रस्ता रोको करून शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर पोलिसांनी सय्यद अनिस व संगीता अंभोरे यांना ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर येऊन आम्हाही अटक करा, अशी मागणी केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. नंतर पोलिसांनी नमते घेत दोघांना सोडून दिले. या आंदोलनात तालुका सचिव जिलानी खान पठाण, शेख अमान, शेख अजीज, शेख बाबू, बाबुराव पठाडे, संगीता अंभोरे, शेख फारुख, मोहम्मदखा पठाण, फेरोजखा पठाण आदी सामील झाले होते. रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्दापुरात बंधारा बांधला की नाही?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फर्दापूर (ता.सोयगाव) येथे बंधारा न बांधताच बिल उचलले गेले. या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी केली होती. याप्रकरणी मंगळवारच्या स्थायी समिती सभेत चर्चा होऊन तीन सदस्यीय समितीमार्फत स्थळपाहणी करण्याचे ठरले होते. त्यानुसार बुधवारी स्थळपाहणी करण्यात आली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेकडील रेकॉर्ड आणि बंधारा साइटची पाहणी केल्यानंतर याविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे. अनेक बाबींबाबत शंका असल्याने तांत्रिक तपासणीची शिफारस समितीने केली आहे.

फर्दापूर येथे जिल्हा परिषद सिंचन विभागांतर्गत सिमेंट बंधारा मंजूर झाला. बंधाऱ्याला २०१४मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यासाठी दहा लाखांची तरतूद केली होती. काही कारणास्तव बंधारा उभारला गेला नव्हता. दीड वर्षे त्यात काहीच हालचाल झाली नव्हती. २०१५मध्ये फर्दापूरमध्ये नवीन ग्रामपंचायत पदाधिकारी आले. ३१ मार्च २०१६ ग्रामपंचायतीने बंधारा उभारणीस मुदतवाढ मिळावी, असे पत्र जिल्हा परिषेस दिले होते. याच दिवशी बंधारा झाल्याच्या दाव्यावरून ६ लाख ५० हजारांचा धनादेश काढण्यात आला, मात्र हा वठण्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यावरून धनादेश अडविण्यात आला होता. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य भिकाबाई तडवी यांनीही याप्रकरणी तक्रार केली होती. याची दखल घेत मंगळवारच्या स्थायी समिती सभेत मुद्दा उपस्थित केला गेला. किशोर बलांडे, उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी प्रशासनाच्या त्रुटी समोर आणल्या. बंधारा न बांधताच पैसे कसे काय उचलले जात आहेत? या प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

दरम्यान, स्थळपाहणीसाठी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना गटनेते अविनाश गलांडे, काँग्रेस सदस्य किशोर बलांडे, सिल्लोडचे गटविकास अधिकारी दाभाडे आणि अन्य एक अधिकार आज फर्दापूरला गेले. परिसरात अनेक बंधारे आहेत. त्यामुळे झेडपीत मंजूर झाला बंधारा क्रमांक-तीन नेमका कोणता, याबाबत अधिकृतरीत्या कुठलेही मत नोंदविता येत नाही, असे समिती सदस्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीने मात्र या समितीकडे ‘आमच्याकडे कुठलाही बंधारा झाला नाही,’ असे लेखी दिले. त्यामुळे संभ्रम आणखी वाढला. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्थळपाहणी केलेलाच बंधारा बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे नेमके काम झाले की नाही, बंधारा अधिकृत की अनधिकृत, अगदी शेवटच्या दिवशी मुदतवाढ का मागितली गेली, असे अनेक मुद्दे शंका उपस्थित करणारे आहेत. दरम्यान, तांत्रिक तपासणीसाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलोद्योगासाठी घेणार सीएमआयएचा पुढाकार

$
0
0

फुलोद्योगासाठी घेणार सीएमआयएचा पुढाकार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात किंवा शेंद्रा एमआयडीसीमध्ये शेती, फुलशेतीवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्र‌िक्लचर (सीएमआयए) पुढाकार घेणार आहे. यादृष्टीने लवकरच शेतकरी, फुलोत्पादक आणि फलोत्पादकांशी चर्चा करण्यात येणार आहे.
सीएमआयए आणि आस्था फाउंडेशनतर्फे नुकत्याच झालेल्या यशवंत व्याख्यानमालेत शास्त्रज्ञ पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी येथील उद्योजक व प्रसिद्धी माध्यमांसोबत चर्चा करताना औरंगाबाद येथील वातावरण फुलोद्योगासाठी पोषक असल्याचे सांगितले होते. हाच धागा पकडून प्रा. शर्मा यांच्या सूचनेकडे लक्ष देण्याचे सीएमआयएने ठरवले आहे. या परिसरातील पाण्याचे प्रमाण, आर्द्रता, फुलांचे उत्पादन, मागणी याचा अभ्यास करण्यात येणार आहे. या बाबी गुलाब, चमेली, निशिगंध शेतीसाठी पोषक असल्याचे प्रा. शर्मा यांनी सांगितले होते. याचा उपयोग इंडस्ट्रिज वाढवण्यासाठी कसा होईल, यासाठी सीएमआयए प्रयत्न करणार आहे. शहर व शेजारच्या परिसरातील फ्लोरिक्चररिस्ट व फ्लोरिकल्चर विकसित करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत उत्पादन, विपणन आणि आयात-निर्यात यावरच चर्चा करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पुढील एक-दोन महिन्यात पार पाडण्याचा सीएमआयएचा प्रयत्न आहे.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा शहरात येऊन गेले. त्यांनी फ्लोरिकल्चर इंडस्ट्रिविषयी सूचना केल्या आहेत, त्याचे पालन केले जाईल, या इंडस्ट्रिजच्या विस्तारास प्राधान्य देण्याचे काम सीएमआयए करणार आहे.

- प्रसाद कोकीळ, अध्यक्ष सीएमआयए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘कॅन्सर’ला पाणीपुरवठा

$
0
0

अखेर ‘कॅन्सर’ला पाणीपुरवठा
‘कुंभकर्ण झोपे’तील महापालिकेला अडीच वर्षांनंतर आली जाग
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्रातील पहिल्याच शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलला ज्युबली पार्कपासून स्वतंत्र जलवाहिनी करून द्या, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने १६ डिसेंबर २०१४ रोजी महापालिकेला दिले होते. मात्र, त्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी पालिकेने हॉस्पिटलला जलवाहिनी करून दिली खरी; परंतु मागच्या साडेचार महिन्यांपासून हॉस्पिटलला पालिकेकडून पाण्याचा शब्दशः थेंबही मिळत नव्हता. या प्रकरणी मागच्या आठवड्यामध्ये खंडपीठात सुरू झालेल्या सुनावणीनंतर झोपेचे सोंग घेतलेली पालिका खडबडून जाग झाली आणि कॅन्सर हॉस्पिटलचा पाणी पुरवठा एकदाचा सुरू झाला.
खंडपीठाच्या दणक्यानंतर शनिवारपासून (२२ जुलै) हॉस्पिटलला पाणी पुरवठा झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मागच्या सलग तीन दिवसांपासून हॉस्पिटलला पुरेसा पाणी पुरवठा सुरू झाला आहे. अर्थात, हा पाणी पुरवठा पुढेही सुरळीतपणे सुरू राहणार आहे का पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’, अशा चिंतेत संपूर्ण हॉस्पिटल व घाटी प्रशासन सध्यातरी आहे. या प्रश्नी ‘मटा’ने जबाबदार यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला.
येथील कॅन्सर हॉस्पिटलचे २१ सप्टेंबर २०१२ रोजी उद्घाटन झाले. त्याआधीच हॉस्पिटलमध्ये महापालिकेचा ८ इंची नळ होता. मात्र, हॉस्पिटलची रोजची गरज एक ते दीड लाख लिटर पाण्याची असताना, पालिकेच्या नळाद्वारे दर तिसऱ्या दिवशी १०-२० हजार लिटरपेक्षा जास्त पाणी कधीही मिळाले नाही. त्यामुळेच पहिल्या दिवसापासून कॅन्सर हॉस्पिटलला रोजच ५ ते ७ टँकर घ्यावे लागले. या प्रकाराची दखल घेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने, ‘सहा महिन्यांत ज्युबली पार्कपासून हॉस्पिटलपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी तयार करा’ असे आदेश १६ डिसेंबर २०१४ रोजी दिले होते. या कामासाठी हॉस्पिटल प्रशासनाने पालिकेला ४५ लाखांचा धनादेश द्यावा, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले होते. हा ४५ लाखांचा धनादेश पालिकेकडे सुपूर्दही करण्यात आला होता. सहा महिन्यांत जलवाहिनीचे काम करण्याचे शपथपत्र पालिकेने खंडपीठामध्ये तेव्हाच सादर केले होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करुनदेखील खंडपीठाच्या आदेशानंतर तब्बल अडीच वर्षांनी हॉस्पिटलच्या स्वतंत्र जलवानिहीने काम पूर्ण झाले. जलवाहिनी आली, परंतु त्यानंतर तब्बल साडेचार महिने नवीन जलवाहिनीला थेंबभरही पाणी आले नाही. त्यातच पूर्वीचा आठ इंची नळ पालिकेने बंद केल्यामुळे तिसऱ्या दिवशी मिळणारे अत्यल्प पाणीदेखील मिळणे बंद झाले आणि हॉस्पिटलमध्ये पाण्याचा शब्दशः ठणठणाट होता. तरीदेखील पालिकेला कशाचेही सोयरसुतक नव्हते. वारंवार लेखी निवेदने, तोंडी विनंती करूनही पालिकेने त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले. मात्र, मागच्या आठवड्यात खंडपीठामध्ये या प्रश्नी सुनावणी सुरू झाल्यानंतर पालिका खडबडून जागी झाली आणि शनिवारपासून कॅन्सर हॉस्पिटलला एकदाचा पाणी पुरवठा सुरू झाला.
खासगी टँकरवर १५ लाखांवर खर्च
उद्घाटन झाल्यापासून या हॉस्पिटलला खासगी टँकरशिवाय पर्याय नव्हता. पूर्वीच्या ८ इंची नळाद्वारे मिळणारे पाणी गरजेच्या तुलनेत अत्यल्प होते व उपचार-शस्त्रक्रियांसाठी किमान प्रक्रियायुक्त पाणी असावे, या दृष्टिकोनातूनच पालिकेने त्यांच्या टँकरद्वारे प्रक्रियायुक्त पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी हॉस्पिटलने पालिकेकडे केली होती. ही मागणीही धुडकावून लावल्यामुळे हॉस्पिटलला खासगी टँकरशिवाय पर्याय राहिला नव्हता. या खासगी टँकरवर मागच्या साडेचार वर्षांत १५ लाखांपेक्षा जास्त खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कॅन्सर हॉस्पिटलला पाणी पुरवठा सुरू झाला आहे. हॉस्पिटलला शनिवारपासून पाणी पुरवठा केला जात आहे व सध्या तरी पुरेसा पुरवठा होत आहे.
– डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी
हॉस्पिटलला पाणी पुरवठा सुरू झाला असून, यापुढेही घाटीच्या धर्तीवर हॉस्पिटलला पुरेसा व विनाखंड पाणी पुरवठा होईल, अशी किमान अपेक्षा आहे.
– डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, शासकीय कॅन्सर हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांवर कारवाई नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हायकोर्टाच्या आदेशानंतर शहरातील ११०० धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई बुधवारपासून सुरू करण्याची घोषणा करणारे महापालिकेचे आयुक्त अचानक मुंबईला रवाना झाले. त्यामुळे धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई झालीच नाही. विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे आयुक्त मुंबईला गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले, तर धार्मिक स्थळांवरील कारवाईचा तपशील घेऊन ते मुंबईला रवाना झाल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात होती.

हायकोर्टाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने शहरातील अवैध व बेकायदा धार्मिक स्थळे पाडण्याचे आदेश महापालिकेला दिले. तात्काळ ही कारवाई सुरू करा, असे कोर्टाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी महापालिकास्तरीय समितीची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुगळीकर यांनी, धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई बुधवारपासून सुरू केली जाईल, असे जाहीर केले. त्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बुधवारी पहाटेपासून कारवाई सुरू होईल, असे मानले जात होते, परंतु ही कारवाई सुरूच झाली नाही.

आयुक्त मुगळीकर सकाळीच मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. विध‌िमंडळ अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नांसंदर्भात मुगळीकर मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले, परंतु धार्मिक स्थळांवरील कारवाईचा तपशील मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी आयुक्त अचानकपणे मुंबईला गेल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात होती. महापौर भगवान घडमोडे देखील मंगळवारपासून मुंबईतच आहेत. महापौर व आयुक्त मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घेतील व त्यांना कारवाईसंदर्भात माहिती देतील, असे सूत्रांनी सांगितले.

आजपासून कारवाई
अवैध व बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई महापालिकेतर्फे गुरुवारपासून केली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या कारवाईसाठी पालिकेच्या यंत्रणेने साहित्याची जमवाजमव सुरू केली. सायंकाळी प्रशासकीय विभागात नव्याने खरेदी केलेले टोपले, फावडे, कुदळ, टिकाव जमा करण्यात आले. मजुरांची जमवाजमव देखील सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आयुक्तांनी जाहीर केल्यानुसार धार्मिक स्थळे हटविण्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली. उपायुक्त रवींद्र निकम, अय्युब खान, करमूल्य निर्धारक व संकलक वसंत निकम व अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख एम. बी. काजी यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षित विश्रामगृह द्या, महिला वाहकांची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मध्यवर्ती बस स्‍थानकातील महिलांच्या विश्रामगृहात काहीच सुविधा नाहीत. शिवाय रात्रीच्या वेळी हे विश्रामगृह महिला करिता असुरक्षित आहे. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी महिलांचे विश्रामगृह स्थलांतरित करावे, अशी मागणी महिला वाहक व कर्मचाऱ्यांनी प्रभारी व्यवस्‍थापकांकडे केली आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातील व्यवस्थापक भुसारी यांची मंगळवारी दुपारी एसटी कामगार संघटनेसह इतर संघटनांचे पदाधिकारी, महिला कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. मध्यवर्ती बसस्थानक येथील महिलांच्या विश्रामगृहासमोर दुचाकी वाहनांची पार्किंग आहे. रात्रीच्यावेळी येथे पुरूष उघड्यावर लघवी करतात. त्यामुळे महिला वाहकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विश्रामगृहाची अवस्था वाईट असून सुविधा तोडक्या आहेत.
महिला कर्मचाऱ्यांना ड्युटी घेण्यासाठी वरच्या मजल्यावर जावे लागते, तेथे पुरुषांसाठी विश्रामगृह आहे. ते भरपूर स्वातंत्र्य घेऊन वावरतात असल्याने येथे वावरणे कठीण होते. त्यामुळे महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, महिलांचे विश्रामगृह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी आहे. यावेळी अरूणा चिद्री, साबेरा सिद्दिकी, संध्या वानखेडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

निर्णयाचे आश्वासन

महिला कर्मचाऱ्यांची बाजून नीट समजावून घेऊन व्यवस्थापक भुसारी यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच प्रशासनासोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीच्या घोषणेनंतर ५४ शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे त्रस्त असलेला शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलने केली. त्यानंतर राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणाही केली, मात्र त्यानंतरही मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, घोषणनेनंतर ५४ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे.
सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जून महिन्यात राज्यभरात रान पेटवले. काही दिवसांत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत कर्जमाफीची घोषणा केली, मात्र शेतकरी आत्महत्यांना विराम लागला नाही. मुख्यमंत्र्यांनी २५ जून रोजी ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर २३ जुलैपर्यंत मराठवाड्यात ५४ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. राज्यात १ जून रोजी कर्जमाफीसाठी आंदोलने सुरू झाली होती. या महिन्यातही मराठवाड्यातील तब्बल ७९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते.
गेल्यावर्षीचा पावसाचा खंड आणि त्यानंतर हातातोंडाशी आलेले पिकाची मोठ्या पावसाने केलेली धुळधाण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्वच आर्थिक गणिते बिघडली, पेरण्यांसाठी झालेला खर्च, लहान मोठे कर्ज, सावकारी यामुळे त्रस्त झाले होते. यंदाही जुलै महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड होता.
जानेवारी ते जुलै २०१७ या कालावधीत विभागात तब्बल ५१३ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले असून, सरकारी समितीने यातील ३३९ प्रकरणांना पात्र, तर ७९ आत्महत्यांच्या प्रकरणांना अपात्र ठरवले आहे. गेल्या सात महिन्यांतील तब्बल ९५ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मराठवाड्यात गेल्या ७ महिन्यांपैकी सर्वाधिक ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पाठोपाठ ८१ आत्महत्या मार्च महिन्यात झाल्याची नोंद आहे. जानेवारी महिन्यात ७२, फेब्रुवारी ६२, मार्च ८१, एप्रिल ७६ तर जून महिन्यात ७९ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.

कर्जमाफीनंतरच्या आत्महत्या
औरंगाबाद.......०५
जालना...........०६
परभणी..........०७
हिंगोली..........०६
नांदेड............०७
बीड.............१३
लातूर............०७
उस्मानाबाद.....०३
एकूण...........५४
(२३ जुलैपर्यंत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लातुरात विक्रमी खड्डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर तालुक्यातील १५ हजार शौचालय बांधकाम पूर्ण करण्यासाठी एकाच दिवशी १४ हजार शौचालय खड्डे पाडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. आतापर्यंत ८ हजार २३० खड्डे पूर्ण झाले आहेत. एकाच दिवसात सर्वाधिक खड्डे घेत लातूर तालुक्याने यापूर्वी तेलंगणा राज्यातील आठ हजार खड्डे खोदण्याचा विक्रम मोडला आहे.
लातूर पंचायत समितीने सकाळी ६ ते ३ पर्यंत या नऊ तासांत ८ हजार २३० शौचलय बांधकाम करण्यासाठी खड्डे खोदण्याची ऐतिहासिक कामगिरी हाती घेतली. रात्री बारा वाजता ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त खड्ड्याचे काम पूर्ण होईल. यापूर्वी तेलंगणा राज्यात आठ हजार खड्डे खोदण्याचा विक्रम केला होता. बुधवारी लातूर पंचायत समितीने तो मोडून काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुमार मेघमाळे यांच्या संकल्पनेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी पुरी, गटविकास अधिकारी दाजी दाईंगंडे, तालुका संपर्क अधिकारी उद्धव फड यांनी कल्पक नियोजन केले.
या मोहीमेसाठी २० टीम तयार केल्या आहेत. यात सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह जनार्दन समुद्रे, विशाल भंडे, संजय मोरे, प्रकाश म्हेत्रे, चव्हाण, साचणे, जैस्वाल यांचा सहभाग होता.

स्वच्छता चळवळ झाली गतिमान
तालुक्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गटविकास अधिकारी, सर्व खातेप्रमुख, तालुका समन्वयक, समूह समन्वयक, सर्वात महत्वाचे योगदान राहिले. गावस्तरावर काम करणारे सरपंच ग्रामसेवक आणि गावातील इतर सर्व कर्मचारी यांनी झोकून देऊन काम केले. त्यामुळे तालुक्यातील स्वच्छता चळवळ गतिमान झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘समृद्धी’च्या हाती धुपाटणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत जिल्ह्यातील १७६ शेतकऱ्यांची नाराजी दूर केली, असा डांगोरा प्रशासनाने पिटला. मात्र, एकाही प्रकरणात रजिस्ट्री करून घेण्यात अद्याप यश आले नाही.

समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील ६२ पैकी ५९ गावांचे दर प्रशासनाने १२ जुलै रोजी जाहीर केले. यातील पहिल्या टप्प्यात ४० तर दुसऱ्या टप्प्यामध्ये १९ गावांची दरनिश्चिती केली. दरम्यान शेतकऱ्यांची मनधरणी सुरूच असल्यामुळे आठवडाभरापूर्वी औरंगाबाद, वैजापूर तसेच गंगापूरमधील १७६ शेतकऱ्यांनी जमीन देण्याची संमती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिली. संमतीपत्र भरून घेतल्यानंतर सर्च रिपोर्टची प्रक्रिया पूर्ण करून थेट खरेदी व्यवहार पूर्ण केला जाणार आहे. शेतकऱ्यांसोबत व्यवहार करण्यासाठी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याला स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप एकाही गावातील शेतकऱ्याच्या जमिनीची निर्धारित दरानुसार खरेदी – विक्री झाली नाही. शेतकऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेतल्यानंतर रजिस्ट्री व त्यानंतर शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला देण्यात येईल. संमतीपत्र भरून घेतल्यानंतर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील ६२ गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे.

या गावचे शेतकरी
औरंगाबाद तालुक्यातील बेंदेवाडी येथील २०, मुर्शीदकुली ४, कोनेवाडी ७, करंजगाव ७, शेवगा २६, शरणापूर ८, तर गावदरी तांडा येथील २७ शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यासाठी संमती दर्शवली आहे. संमती देण्यामध्ये वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील ७७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
पीक विमा भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असताना बँकांनी पीक विमा स्वीकारण्यास टाळाटाळ केली. याबाबत अनेक निवेदने व तक्रारी झाल्यानंतर अखेर हिमायतनगर येथे पीक विमा स्वीकारण्यास बुधवारपासून सुरुवात केल्याने बँकेत गर्दी झाली. दरम्यान, गर्दी आटोक्यात येत नसल्याने एका पोलिसाने बँकेच्या आवारात एका वृद्ध शेतकऱ्यावर लाठीमार केला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बसस्थानाक परिसरात रास्ता रोको करून पोलिसांच्या दादागिरीचा निषेध केला. याप्रकरणी पोलिसाला निलंबित करून गुन्हा दाखल करावा आणि पीकविमा भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे शेतकरी बँक व सेतू सुविधा केंद्रात पीक विमा काढण्यासाठी जात आहे. मात्र, तेथे गेल्यानंतर ऑनलाइनच्या कारभाराने कर्मचारी त्रस्त आहेत. विमा कंपनीने सक्तीचे आदेश देत ऑनलाइन पीक विमा फॉर्म व रक्कम घेण्यास स्पष्ट आदेश दिले आहेत, पण संबधित कंपनीचे सर्व्हर डाऊन होत आहे. सेतूसह बँक अधिकाऱ्यांनी विमा घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांनी हिमायतनगरचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांना २५ जुलै रोजी तक्रार देऊन पीक विमा घेण्यासाठी बँकेला आदेश द्यावेत अशी मागणी केली.
या मागणीसाठी होकार देत स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी २६ बुधवारपासून पीक विमा काढण्यास सुरुवात केली आहे. विमा भरण्याची तारीख ३१ जुलै असल्याने शेतकऱ्यांनी हिमायतनगर येथील बँकेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या रांगेमध्ये प्रचंड गर्दी असल्याने आणि आठवडी बाजारचा दिवस असल्याने पोलिसांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गोंधळ होत असल्याने कार्ला येथील शेतकरी गोविंदराव राघोजी सुरोशे (वय ७५) रांगेत उभा राहिले असता पोलिसांनी लाठीने बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या गुडघ्याला व पायाला मार लागला. त्यांना प्रथमोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, शेतकऱ्यावर पोलिसांनी हल्ला करणे हे अशोभनीय कृत्य आहे. अशाप्रकारचे काम करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी जनशक्ती प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बलपेलवाड, तालुकाध्यक्ष गजानन ठाकरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा स्पर्धा १९ ऑगस्टपासून

$
0
0

क्रीडा स्पर्धा १९ ऑगस्टपासून
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंडेबकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या हंगामास क्रॉसकंट्री स्पर्धेने प्रारंभ होणार आहे. १९ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा जालन्यात आयोजित करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या क्रीडा विभागात क्रीडा संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या वेळापत्रक अंतिम स्वरूप देण्यात आले. या बैठकीस प्रदीप इंगळे, भालचंद्र सानप, सचिन देशमुख, नेताजी मुळे, ज्योती गायकवाड यांच्यासह सुरेंद्र मोदी, अभिजीत दिख्खत, किरण शुरकांबळे, मसुद हाश्मी यांची उपस्थिती होती. ‘बाटू’शी संलग्न असलेल्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही. मात्र, द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती क्रीडा संचालक डॉ. प्रदीप दुबे यांनी सांगितले.
आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक
क्रीडाप्रकार दिनांक ठिकाण
१) क्रॉसकंट्री १९ ऑगस्ट संत रामदास कॉलेज, घनसावंगी, जालना
२) बास्केटबॉल २२ ते २४ ऑगस्ट
३) जलतरण २३ ऑगस्ट विद्यापीठ कॅम्पस
४) ज्युदो २६ ऑगस्ट व्ही. पी. कॉलेज, कन्नड
५) बॉक्सिंग २८ ऑगस्ट मोरेश्वर कॉलेज, भोकरदन
६) तिरंदाजी २९ ऑगस्ट संत सावता माळी कॉलेज, फुलंब्री
७) टेनिस ३० ऑगस्ट राजश्री शाहू कॉलेज, पाथरी
८) बॉल बॅडमिंटन ३१ ऑगस्ट चेतना कॉलेज, औरंगाबाद
९) तायक्वोंदो १ सप्टेंबर केएसके कॉलेज, बीड
१०) वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, बेस्ट फिजिक्स ३, ४ सप्टेंबर मौलाना आझाद कॉलेज
११) व्हॉलिबॉल (महिला) ४ सप्टेंबर महिला कॉलेज
१२) टेबल टेनिस ६ सप्टेंबर खोलेश्वर कॉलेज, अंबाजोगाई
१३) खोखो ७, ८ सप्टेंबर एएससी कॉलेज, नळदुर्ग
१४) बुद्धिबळ ८, ९ सप्टेंबर योगेश्वरी कॉलेज, अंबाजोगाई
१५) क्रिकेट (महिला) ११, १२ सप्टेंबर ज्ञानकुंवर महिला कॉलेज, जालना
१६) व्हॉलिबॉल अ झोन पुरुष १३, १४ सप्टेंबर राष्ट्रमाता इंदिरा गांधी कॉलेज, जालना
१७) व्हॉलिबॉल ब झोन १४, १५ सप्टेंबर लोकमान्य टिळक कॉलेज, वडवणी
१८) व्हॉलिबॉल सेंट्रल झोन १६, १७ सप्टेंबर लोकमान्य टिळक कॉलेज, वडवणी
१९) जिम्नॅस्टि्क्स, मल्लखांब १६, १७ सप्टेंबर एमएसएम कॉलेज, औरंगाबाद
२०) कुस्ती १८, १९ सप्टेंबर आर. डी. भक्त फॉर्मसी कॉलेज, जालना
२१) अॅथलेटिक्स उस्मानाबाद २०, २१ सप्टेंबर व्यंकटेश महाजन कॉलेज, उस्मानाबाद
२२) अॅथलेटिक्स जालना २०, २१ सप्टेंबर बीपीएड कॉलेज, जालना
२३) अॅथलेटिक्स बीड २२, २३ सप्टेंबर बीपीएड कॉलेज, बीड
२४) अॅथलेटिक्स औरंगाबाद २२, २३ सप्टेंबर विद्यापीठ कॅम्पस
२५) अॅथलेटिक्स सेंट्रल झोन २४, २५ सप्टेंबर विद्यापीठ कॅम्पस
२६) बॅडमिंटन २८, २९ सप्टेंबर जनविकास कॉलेज, बनसारोळा
२७) कबड्डी ब झोन ६, ७ नोव्हेंबर शरदचंद्र कॉलेज, शिराढोण
२८) कबड्डी अ झोन ७, ८ नोव्हेंबर एएससी कॉलेज, बदनापूर
२९) कबड्डी सेंट्रल झोन ९, १० नोव्हेंबर एएससी कॉलेज, बदनापूर
३०) कबड्डी महिला १३, १४ नोव्हेंबर डी. डी. कॉलेज, वाळूज
३१) फुटबॉल १७ ते १९ नोव्हेंबर तेरणा कॉलेज, उस्मानाबाद
३२) हॉकी २०, २१ नोव्हेंबर पीईएस कॉलेज, औरंगाबाद
३३) हँडबॉल २२, २३ नोव्हेंबर पंडितगुरू पार्डीकर कॉलेज, सिरसाळा, बीड
३४) नेमबाजी २४ नोव्हेंबर एमजीएम कॉलेज, औरंगाबाद
३५) क्रिकेट औरंगाबाद २४ ते २६ नोव्हेंबर मौलाना आझाद कॉलेज
३६) क्रिकेट जालना २४ ते २६ नोव्हेंबर सी. पी. कॉलेज, जालना
३७) क्रिकेट उस्मानाबाद २४ ते २६ नोव्हेंबर
३८) क्रिकेट बीड २४ ते २६ नोव्हेंबर एसआरटी कॉलेज, अंबाजोगाई
३९) क्रिकेट सेंट्रल झोन २८ व २९ नोव्हेंबर मौलाना आझाद कॉलेज, औरंगाबाद
४०) सॉफ्टबॉल २ डिसेंबर शिवाजी कॉलेज, कन्नड
४१) योगा ४ डिसेंबर एम. पी. लॉ कॉलेज, औरंगाबाद
४२) तलवारबाजी ४ डिसेंबर आर. जी. बगडिया कला कॉलेज, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ क्षणोक्षणी हिटलरशाही आठवते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘देशातील सध्याची राजकीय परिस्थिती क्षणोक्षणी हिटलरशाहीची आठवण करून देणारी आहे. गोहत्या, राममंदिर, तलाक असे प्रश्न निर्माण करण्यामागची भूमिका समाजाने लक्षात घेण्याची वेळ आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि समाजवादी नेते भाई वैद्य यांनी बुधवारी (२६ जुलै) केले. ते मंथन विचारपीठातर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात बोलत होते.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय सभागृहात हा कार्यक्रम झाला. भाई वैद्य यांनी वयाची नव्वदी पार केली आहे. त्यानिमित्ताने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देशभरातील सद्यस्थितीवर त्यांनी उपस्थितांशी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रताप बोराडे होते. व्यासपीठावर सुभाष लोमटे, ज्ञानप्रकाश मोदाणी यांची उपस्थित होती. भाई वैद्य म्हणाले, ‘देशापुढे जागतिकीकरण व जमातवाद ही मोठी आव्हाने आहेत. केंद्रातील सरकारला धर्माधिष्ठीत राष्ट्र निर्माण करावयाचे असल्याने त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न आहेत. केंद्रातील सरकार मोदी किंवा भाजपचे नाही, तर संघांचे आहे. धार्मिक भूमिका प्रभावी करून हिंदू विचार वाढविण्यावर त्यांचा भर आहे. दुसऱ्या समाजाला दुय्यम वागणूक देत त्यांना शत्रू समजायचे असा त्यांचा विचार असून खोटे बोलण्यात संघाचा हात कोणी धरू शकत नाही. जागतिकीकरणामुळे बेरोजगारी, विषमता वाढली. शिक्षण, आरोग्यासारख्या गरजांकडे दुर्लक्ष होते आहे,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रताप बोराडे, डॉ. भालचंद्र कानगो, रमेश खंडागळे, शेख इकबाल मिन्ने, प्रा. विजय दिवाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष लोमटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

वित्तीय भांडवलशाहीचे युग
‘पूर्वीच्या काळात उद्योग क्षेत्रामुळे रोजगार मिळायचा. आज मात्र कामगारांना रोजगाराऐवजी संधी कमी करणारे उद्योगधोरण ठरत आहे. आधुनिकता आणण्याच्या नावाखाली हे केले जात आहे. उत्पादन वाढत असताना कामगार कमी करण्यावर उद्योगांचा प्रयत्न असतो. हे वित्तीय भांडवलशाहीच युग आहे,’ असे भाई वैद्य म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग इच्छुकांची संख्या वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेश प्रक्रियेत तीन हजार १८६ विद्यार्थ्यांचा नव्याने सहभाग झाला आहे. ऑनलाइन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा प्रथमच प्रवेश फेरीदरम्यान संधी देण्यात आली. दोन दिवसांत राज्यभरात विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हे विद्यार्थी तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने यंदा प्रथमच अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत प्रवेश फेरीदरम्यान अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली. प्रारंभी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेत पाच ते १७ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी व निश्चितीसाठी मुदत देण्यात आली. त्यानंतर गुणवत्ता यादी व प्रत्यक्ष प्रवेश फेरीला सुरुवात झाली. अनेक विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगसाठी अर्ज केले नव्हते. दुसऱ्या फेरीनंतर या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली. त्यांनी १९ व २० जुलै रोजी अर्ज नोंदणी व निश्चिती केली होती. ऑनलाइन नोंदणी व सुविधा केंद्रात जाऊन निश्चितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी पूर्ण केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली; तसेच त्यांच्या जागा वाटपाची यादी जाहीर करण्यात आली. राज्यभरात तीन हजार १८६ नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी व निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता आले.

गुणवत्ता यादी वाढली
राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाच्या नव्याने प्रक्रियेत सहभागी होण्याची संधीचा विद्यार्थ्यांना लाभ झाला. या प्रक्रियेमुळे गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीतील शेवटच्या क्रमांकापासूनचा गुणवत्ता क्रमांक दिला गेला आहे. नव्या गुणवत्ता यादीत तीन हजार १८६ विद्यार्थ्यांची भर पडली आहे. एक लाख ७ हजार १२५ वरून ही गुणवत्ता यादी एक लाख १० हजार ३११ क्रमांकापर्यंत पोचली आहे.

इच्छुकांची संख्या वाढली
प्रक्रियेत नव्याने विद्यार्थ्यांचा समावेश झाल्याचा लाभ कॉलेजांनाही होणार आहे. इच्छुकांची संख्या वाढली आहे. मागील वर्षीपर्यंत अशा प्रकारे प्रवेश प्रक्रियेदरम्यान अर्ज नोंदणी व निश्चितीची संधी देण्यात आलेली नव्हती. कॉलेजस्तरावरून या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागत असे. त्यामुळे अनेकांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नव्हता. आता हे विद्यार्थी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून आल्याने या विद्यार्थ्यांना शासनाच्या सुविधांचाही लाभ होणार आहे, तर इंजिनीअरिंग प्रवेशासाठी इच्छुकांची संख्याही वाढली आहे.

पहिली गुणवत्ता यादी...१०७१२५
नव्या अर्जांनंतर..........११०३११

इंजिनीअरिंग कॉलेज...१६५
प्रवेश क्षमता..............१५५०००
प्रवेश इच्छुक.............११०३११

विभागातील कॉलेज....३३
प्रवेश संख्या..............१२१८२
इच्छुक विद्यार्थी..........१३५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकेतील मावशीला डॉक्टर भाचीचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घर सांभाळण्यासाठी ठेवलेल्या भाचीने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मावशीला लाखो रुपयांचा गंडा घालत कारचालक प्रियकरासह पोबारा केला. सिडको एन चार भागात फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत हा प्रकार घडला. पलायन करताना या जोडीने रोख पाच लाख रुपये, सात लाखांचे दागिने, कार, स्कुटी, भांडी, कपडे, फर्निचर आदी ऐवज सोबत नेला.

एन चार भागातील एक महिला डॉक्टर पतीसह अमेरिकेत वास्तव्यास आहे. या जोडप्याचा एन चार भागात बंगला आहे. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी या महिलेने तिच्या भाचीला बंगल्याची केअरटेकर म्हणून ठेवले होते. ही भाची न्हावा (ता. पालम, जि. परभणी) येथील रहिवासी असून, सिडकोतील एका महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. या भाचीला कॉलेजमध्ये जाण्यासाठी होंडा सिटी कार होती. चालक म्हणून राजू माटेची नियुक्ती करण्यात आली होती.

या भाचीने अमेरिकेतील आपल्या मावशीला एक मेल पाठवला. ‘एक जण आपल्याला ब्लॅकमेल करीत असून त्यामध्ये तुमची देखील नावे आहेत. यामुळे मी घाबरून गेले अाहे,’ असा उल्लेख मेलमध्ये होता. मावशीला हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यांचा भाचा नितीन ज्ञानोबा इंदराळे (वय ३२, रा. मायानगर, एन दोन) याला, काय झाले आहे, ते पाहण्यासाठी पाठवले. यावेळी ‌इंदराळे त्या ठिकाणी गेले असता भाची घरातील सामानासह बेपत्ता असल्याचे आढळले. कार व कारचालकाचा देखील काही ठावठिकाणा नव्हता.

या जोडप्याने जाताना घरातील रोख पाच लाख, सात लाखांचे सोन्याचे दागिने, होंडा सिटी, घरगुती कपडे, भांडी, फर्निचर, लॅपटॉप, आयपॅड, मोपेड स्कुटी आदी लाखोंचा ऐवज लंपास केला. नितीन इंदराळे यांच्या तक्रारीवरून चालक राजू मोटे (रा. औसा, जि. लातूर) याच्यासह भाचीविरुद्ध चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डॉ. मंगला वैष्णव यांनी लिहितेच राहावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. मंगला वैष्णव यांनी मोठ्या आजारपणाशी दोन हात करत असताना दोन पुस्तके लिहिली, लेखांचा संग्रह एकत्र केला आणि तो पुस्तक स्वरुपात आणला ही आनंददायी, समाधानाची बाब आहे. यापुढेही त्यांनी लिहितेच राहावे, अशा शब्दांत त्यांना गुरुवारी मान्यवरांनी सदिच्छा दिल्या.

ज्येष्ठ लेखिका डॉ. मंगला वैष्णव यांच्या ‘स्मृती दरवळ’ आणि ‘वासंतिक द्वादशी’ या पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी झाले. ज्येष्ठ सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. पंडित नाथराव नेरळकर, प्रा. दिनकर बोरीकर, वसंत मासिकाचे संपादक दिलीप देशपांडे हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी रजत प्रकाशनचे अशोक कुमठेकर यांचीही उपस्थिती होती.

डॉ. वैष्णाव म्हणाल्या, ‘मी मोठ्या आजारापणा तोंड दिले. यात वेळ कसा जाईल, शारीरिक श्रम कमी कसे होतील, हे डॉक्टर पाहत होते, पण मी बौद्धिक श्रम केले. आजारपणातही लेखांचा संग्रह तयार केला वर्तमानपत्रातील लेखांचा संग्रह जपून ठेवला. ते लेख कुमठेकरांच्या मदतीने रजत प्रकाशनद्वारे आज प्रकाशित करत आहे. यासाठी मुलगी अर्चना आणि मानसपुत्राचा खूप फायदा झाला. हे दोन्ही पुस्तके आज वसंत मासिकाचे संपादक देशपांडे आणि मुलीस अर्पण करत आहे.’

यावेळी पंडित नेरळकर म्हणाले, ‘आजारपण मीही सोसले धर्नुवात झाला असताना मी देखील तंबोरा जवळ केला आणि आजारावर मात केली अशीच मात वैष्णव यांनी केली आहे. त्यांचा आजार मोठा होता. त्यांवर केलेली मात नक्कीच मोठी आहे. त्यांनी यापुढेही लिहिते राहावे.’

वैष्णव यांचे लिखाण आणि या पुस्तकांतील विविध कथा फार सुरेख आहेत. यापुढेही त्यांनी लिहिते राहिले पाहिजे. आम्हाला छानछान पदार्थ खाऊ घातले पाहिजे. असे सांगत बोरिकर यांनी गंभीर वातावरणात विनोदाची फुंकर घातली. कुलकर्णी यांनी वैष्णव यांच्या माहेरील काही आठवणींसह त्यांच्या लिखाणासंबंधी आठवणींना उजाळा दिला. वृंदा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

अंधार फार झाला, पणती जरा जपून ठेवा
‘अंधार फार झाला, पणती जरा जपून ठेवा... अंधार फार झाला, नाती जपून ठेवा...’ ही ग‌जल गात पंडित नाथराव नेरळकर यांनी डॉ. मंगला वैष्णव यांना लिहित्या राहा, असे सांगत शुभेच्छा दिल्या. गजल गाऊन नेरळकर यांनी उपस्थितांची मने जिंकली आणि थोडक्यात आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७६९ शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यात कर्जमाफीचा गोंधळ अद्यापही सुरू असून अनेक शेतकऱ्यांत कर्जमाफी मिळेल की नाही, याबद्दल संभ्रम आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे बी- बियाणे खरेदी करण्यासाठी १० हजार रुपयांचे तातडीचे कर्ज उपलब्‍ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याचा लाभ चार जिल्ह्यांतील केवळ १७६९ शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफी प्रक्रियेला विलंब होणार असल्याने बी-बियाणे खरेदी करण्याकरिता १० हजार रुपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने काढले होते. पण, आदेश प्राप्त न झाल्याने बँकांतून शेतकरी रिकाम्या हाताने परतले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली चा चार जिल्ह्यांत १७ जुलैपर्यंत कर्ज देण्यात आले. यामध्ये परभणी जिल्ह्यात संख्या सर्वाधिक १५६५ आहे. तेथे प्रत्येकी १० हजार प्रमाणे एक कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांनी १ जून पासून कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी रान पेटवत राज्यभरात संपाचे हत्यार उगारले होते. शासनाने या संपाची दखल घेत उच्चाधिकार समिती तयार करुन थकीत कर्जदार शेतकऱ्यांसोबतच अन्य शेतकऱ्यांकडे असलेले पीक कर्ज माफ करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

चार जिल्ह्यातील कर्जवाटपः कंसात शेतकरीः औरंगाबाद (९८) ९ लाख ८० लाख, जालना (५२) ५ लाख २० लाख, परभणी (१५६५) १ कोटी ५६ लाख, हिंगोली (५४) ५ लाख ४० लाख, एकूण (१७६९) १ कोटी ७६ लाख रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक न्यायालयात झाले स्मार्ट

$
0
0

कौटुंबिक न्यायालयात झाले स्मार्ट
मोफत बालसंकुल, पाळणाघर, मध्यस्थी केंद्राची सुविधा
म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
कौटुंबिक न्यायालयामध्ये होणारे वाद, एकमेकांवर मर्यादा ओलांडून केलेले आरोप, हाणामारीपर्यंत जाणारी प्रकरणे, मोठ्या लोकांच्या या अनियंत्रित वादामध्ये नुकसान होते ते चिमुकल्यांचे. या वातावरणामुळे बालमनावर होणाऱ्या परिणामांची दखल घेत कौटुंबिक न्यायालयाने आपल्या आवारात बालसंकुल, पाळणाघर हे संगोपन केंद्र व मध्यस्थी केंद्र सुरू केले आहे.
कौटुंबिक न्यायालयात पाळणाघर सुरू करणारे औरंगाबाद कौटुंबिक न्यायालय पहिलेच ठरले आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश अरुणा जी. फरस्वाणी यांनी या उपक्रमांसाठी पुढाकार घेतला. कौटुंबिक न्यायालयामध्ये महिला मोठ्या संख्येने महिला येतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये लहान मुलेदेखील सोबत असतात. खटल्यादरम्यान पक्षकार एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करतात. भाषाही चांगलीच असते असे नाही. डोळ्यादेखत भांडणारे आई-वडील पाहून मुले हिरमुसतात. या चिमुकल्यांकडे बघून वकील, न्यायाधीशही हेलावतात. इतक्या लहान मुलाला न्यायालयात कशाला आणले असे विचारल्यावर याला सांभाळायला कुणीच नाही अशी उत्तरे पक्षकार देतात. न्यायालयातील या बंदिस्त वातावरणाची झळ मुलांना बसू न देता या सर्व प्रसंगांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या आवारातच बालसंकुल तयार करण्यात आले आहे. यामध्ये पाळणाघर व बालसंकुल ही संगोपन केंद्र असून पक्षकारांसाठी ​या सुविधा मोफत आहेत. तसेच कौटुंबिक न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालयातील वकील व स्टाफ यांच्यासाठी ही सुविधा तात्पुरत्या स्तरावर मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये मुलांसाठी पिण्याची, झोपण्याची व्यवस्था असून खेळण्याचे साहित्य, शैक्षणिक साहित्य तसेच फेंग शुई संगीत लावण्यात आले आहे. मुलांना व्यस्त करण्यासाठी काही आर्ट अॅक्टिव्हिटीजही घेण्यात येतात. चाईल्ड फ्रेंडली वातावरणासाठी स्वयंसेवी संस्थांचा प्रशिक्षित स्टाफ सेवा देत असून भारतीय समाज सेवा केंद्रातर्फेही सहाय्य केले जाते. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ६ महिने ते २ वर्षांपर्यंतची मुले या केंद्राचा उपयोग घेऊ शकतात. त्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी परवानगी काढावी लागते. न्यायालयीन व्यवस्थापिका वंदना कोचर याचे काम बघतात. पक्षकार, वकिलांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मध्यस्थी केंद्राद्वारे मार्ग काढा

कौटुंबिक न्यायालयामध्ये असणाऱ्या मध्यस्थी केंद्राविषयी पक्षकारांना बरीच कमी माहिती असते. पक्षकारांना न्याय मिळणे सुकर व्हावे तसेच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी व्हावी म्हणून मध्यस्थी केंद्राचा खूप फायदा होतो. जे प्रकरण तडजोडीने सहज सुटू शकते तिथे मध्यस्थी केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरत असून वेळ व पैसा दोन्हींची बचत होते. यामध्ये अनुभवी व प्रशिक्षित किंवा न्यायाधीश मध्यस्थ असतात. तसेच ही प्रक्रिया गोपनीय असते.
न्यायालयीन व्यवस्थापनाचे योगदान
न्यायालयाचे काम अधिक सुरळीत व सुकर व्हावे याची जबाबदारी न्यायालयीन व्यवस्थापनावर असते. न्यायालयामध्ये असलेल्या सुविधांमध्ये न्यायालयीन व्यवस्थापकांनीही मोलाचा वाटा उचलला आहे. न्यायालयातील सर्व खटल्यांचे जुने रेकॉर्डचे जतन ​आणि नव्याने येणारे रेकॉर्ड ठेवताना अनेकदा जागेचा प्रश्न असतो. कागदपत्रांवर धूळ चढते. यावर पर्याय शोधत न्यायालयात खास डिझाइनचे मोबाइल कॉम्पॅक्टर्स आणले. यामुळे जागेचा प्रश्न तर सुटला शिवाय रेकॉर्ड सुरक्षित राहण्याची चिंता मिटली. न्यायालयाच्या आवारात मारामारीच्या घटना घडतात. न्यायाधीशही अनेकदा रेकॉडिंग तपासतात. त्यामुळे सीसीटीव्हीची भूमिका महत्त्वाची आहे. सध्या कौटुंबिक न्यायालयात ३० सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. महिलांची संख्या व त्यांची अडचण लक्षात घेत सॅनिटरी वेेंडींग मशीन व पॅड नष्ट करण्याचे मशीन बसवण्यात आले आहे. महिला पक्षकार, महिला अधिकारी-कर्मचारी, वकील वर्गासाठीदेखील ही सुविधा उपयोगी ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मराठवाड्यात ‘ई-पीओएस’चा बोजवारा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच धान्य पुरवठ्यामध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील रेशन दुकानांवर ई-पीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल) मशीन बसवण्यात आल्या, गेल्या सहा महिन्यांपासून प्रणाली शंभर टक्के कार्यान्वित करण्यात आल्यानंतरही प्रशासनाला धान्याचा काळाबाजार रोखण्यात अद्यापही यश आले नाही.
एकीकडे रेशनकार्डसोबत आधार लिंकिंगची मोठी आकडेवारी दर्शवण्यात येत असली तरी प्रत्यक्षात बहुतांश रेशन दुकानांवर जुन्याच पद्धतीने धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ई-पीओएसचा काहीही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपुर्वीपासून मराठवाड्यातील कार्डधारकांचा डेटा आधार क्रमांकाशी लिंक करण्याचे काम केले गेले. मे महिन्यापर्यंत ९९ टक्के आधार लिंकअपचे काम झाल्याचा दावा मराठवाड्यातील पुरवठा अधिकायांनी केला होता. मात्र, ही प्रणाली शंभर टक्के कार्यान्वित करूनही काळाबाजार रोखण्यात पुरवठा विभागाला अपयश आलेले आहे.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २५ जुलैपर्यंत केवळ २८.२८ टक्के आधार कार्डधारकांनी ई-पीओएस प्रणालीच्या माध्यमातून धान्य खरेदी केले आहे. यामध्ये ११ लाख व्यवहार झाले असल्याची नोंद पुरवठा विभागाकडे आहे. एकीकडे ९९ टक्के रेशनकार्डधारकांनी आधार लिंक केले असल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र केवळ ३ लाख ११ हजार रेशनकार्डची पडताळणी करण्यात आली आहे. उर्वरीत सर्व लाभाधारकांना मॅन्युअली धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे ई- पीओएस प्रणालीचा मराठवाड्यात पुरता बोजवारा उडाला आहे.
जानेवारी २०१७ पासून ईपीओएस मशीन बसवण्याची कार्यवाही सुरू झाली. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये या मशीन बसवण्यात आल्या. दुसर्या टप्प्यात मार्च महिन्यात जालना, उस्मानाबाद आणि हिंगोलीत तर मे महिन्यात तिसर्या टप्प्यात औरंगाबाद, परभणी, बीड या जिल्ह्यात ईपीओएस कार्यान्वित झाल्या. मशीन कार्यान्वित करण्यापूर्वी सर्व रेशनकार्डधारकांचा डेटा संगणकीकृत करण्यात आला, कार्डधारक कुटुंबातील प्रमुख व इतर सदस्यांचे आधार क्रमांक घेऊन ते रेशनकार्डशी लिंक करण्यात आले, हे काम ९९ टक्के पूर्ण झाल्याचे तत्कालिन पुरवठा सचिवांनी सांगितले होते.



आधार व्हेरिफायला अडचणी
मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामधील रेशन दुकानांवर जून महिन्यापर्यंत ११ हजार ४५४ ई-पीओएस मशीन बसवण्यात आले आहेत, यापैकी ११ हजार १४९ मशीन कार्यान्वित करण्यात आले असून या मशीनद्वारे व्यवहार सुरु करण्यात आला आहे. मात्र पुरवठा विभागाकडे या महिन्यात केवळ ११ लाख ९७६ व्यवहार झाल्याची नोंद आहे. अनेक ठिकाणी आधार कार्डक्रमांक व्हेरिफाय होत नसल्याचे कारण पुढे करुन जुन्याच पद्धतीने रेशनचे वाटप सर्रास सुरू आहे.


प्रशासनचा काळ्याबाजाराकडे कानाडोळा
अनेक ठिकाणी केवळ कुटूंबप्रमुखांचेच आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे, त्यामुळे कुटूंबातील इतर सदस्य धान्य घेण्यासाठी गेल्यास ई-पीओएसवर व्हेरिफिकेशन होत नाही, मात्र तरीही दुकानदारांकडून धान्य वाटप करण्यात येते. त्यामुळे रेशनदुकानावर किती लाभार्थी धान्य घेतात, याची अचूक माहिती अद्यापही पुरवठा उपायुक्तांकडे आलेली नाही.

योजनानिहाय कार्डधारकांची संख्या आणि ईपीओएस प्रणालीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेले धान्य या आकड्यांमध्ये यामध्ये तफावत दिसेल. आधार लिंक नसलेल्या कार्डधारकांना संप्टेबरपर्यंत धान्य वाटपाची परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
वर्षा ठाकूर, पुरवठा उपायुक्त.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या एंट्रीमुळे पत्तेपंचमीत धापवळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे पंचमीला जुगार खेळण्याची परंपरा आहे. त्यानुसार खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर गुरुवारी जुगार खेळला जात असताना पोलिसांनी छापा टाकल्याने सर्वांनी पळ काढला. पण, पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी आलेल्यांच्या दुचाकी जप्त करून पोलिस ठाण्यात आणल्या आहेत.
तालुक्यातील नागमठाण, धोंदलगाव व शिऊर येथेही पत्तेपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. खंडाळा येथे पंचमीत खेळल्या जाणाऱ्या जुगार या खेळाला अशीच परंपरा आहे. हा खेळ जुगार नसून पंचमीच्या आनंदात भर घालणारा मनोरंजनाचा प्रकार आहे, हे पटवून देत ही परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न सर्व समाजातील लोक करतात. पण, जुगाऱ्यांसाठी पर्वणी ठरलेल्या पंचमीला पत्त्यांचे मोठे डाव तालुक्यातील खंडाळ्यात भरविले जातात. जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात नेहमीप्रमाणे गुरुवारी जत्रेचे स्वरूप आले होते. यात झन्ना-मन्ना, एक्का-बादशाह, तिर्रट आदी पत्त्यांच्या जुगारावर हजारो रुपये लावण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे येथे जुगार खेळण्यासाठी लोक जमले होते. पण, यंदा पोलिसांनी कानाडोळा न करता सकाळी ११ वाजताच दाखल होत छापा मारला. छापा पडताच शाळेच्या मैदानातून सर्वांनी पळ काढला. परंतु, पोलिसांनी मैदानावर सापडलेल्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

इतरत्र रंगले डाव

हा खेळ म्हणजे जुगार नव्हे, असा दावा खंडाळ्यातील वयस्कांचा आहे. पोलिसांमुळे पळापळ झाली असली तरी परंपरा कायम ठेवण्यासाठी जुगाराच्या आयोजकांनी शेतात व इतरत्र जूगार खेळवून नागपंचमी साजरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images