Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कौशल्याने गुन्हेगारी रोखा

$
0
0
कर्तव्य मेळाव्यामध्ये कौशल्य सादर करणाऱ्या पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कौशल्य पणाला लावावे, असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले. पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

सुखना धरणावर उतरला पाखर थवा

$
0
0
दरवर्षी येणार पाहुणे पक्षी थोडे उशिराका होईना दाखल होत आहेत. रिंगप्लवर हा छोटासा पक्षी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून युरोपातून सुखना धरणाच्या परिसरात दाखल झाला आहे. या परिसरात तुरळक प्रमाणात फ्लेमिंगोचेही दर्शन होत आहे.

मुस्लिम आरक्षणासाठी बीडमध्ये मोर्चा

$
0
0
देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्ष झाली तरी मुस्लिम समाजाचा विकास झाला नाही. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाची मागणी होते आहे. बीडमध्ये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

कांदा घसरला : शेतक-यांना चिंता

$
0
0
भाजी मंडईत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या किरकोळ दरात प्रतिकिलो २० ते ३० रूपये इतकी घट झाली आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या उस्मानाबाद शहरातील भाजी मंडईत चांगल्या प्रतीचा कांदा ३० रूपये ‌प्रतिकिलो या दराने विकला जात आहे.

पाण्यासाठी घेतले दालनात कोंडून!

$
0
0
आपेगाव व हिरडपुरी येथील बंधाऱ्यांत जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) प्रशासकांच्या दालनात स्वतःला कोंडून घेऊन आंदोलन सुरू केले.

औरंगाबादमधूनच फुटला पेपर...

$
0
0
‘मॅथ्स-१’चा पेपर वितरण केंद्रातून फुटला नसल्याचे मंडळाने केलेल्या स्टॉक व्हेरिफिकेशनमधून शुक्रवारी स्पष्ट झाले. समितीला प्रश्नपत्रिकेचे पाकिट येथूनच गहाळ झाल्याचे धागेदोर सापडले असून मंडळाची डोकेदुखी वाढली आहे.

औरंगाबादच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा

$
0
0
महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी राज्य सरकारकडून येणे असलेला साडेआठ कोटी रुपये मिळवले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्त्यांचा क्रम ठरवण्यासाठी चर्चा केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

औताडेंनी सुनावले खडे बोल

$
0
0
मिटिंगची वेळ तारीख कळवूनही एवढी कमी उपस्थिती कशी ? तालुका पातळीवर पक्षाने सांगितलेले कार्यक्रम राबविण्यासाठी कुणी उत्सुक दिसत नाही. पुढच्या काळात कामात सुधारणा करा, अशा शब्दात काँग्रेस जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

कस्टोडियन सहाय्यकाला अटक

$
0
0
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ‘मॅथ्स-१’चा पेपरफुटी प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी शनिवारी मंडळाच्या विभागीय कार्यालयातील कस्टो‌डियन सहाय्यकाला अटक केली. राजेंद्र पुरी असे या सहाय्यकाचे नाव असून पाकिटे गहाळ झाले याची माहिती असताना ही, त्याने ही माहिती दडवून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

समितीकडून पुन्हा तपासणी

$
0
0
मॅथ्स-१च्या पेपरला औरंगाबाद विभागीय वितरण केंद्रातूनच पाय फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण मंडळ अधिकाऱ्यांना चांगलेच अंगलट आले आहे. विभागीय उपसचिव यांच्यासह त्यांचे दोन सहायक सचिवांची पोलीसांनी चौकशी केली तसेच ज्या बॉक्समधून पाकिट गेले तो बॉक्स पोलिसांनी आज ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

मुंबईकराचा आदेश अन् अधिकारी बेजार

$
0
0
सरकारी मुख्यालय मुंबई असल्याने राज्यभरातील कार्यालयांना कधी काय फतवा येईल, याचा नेम नाही. त्यातही एखादी माहिती तत्काळ पाठवा, असे आदेश असले की अधिकारी बेजार होऊन जातात. वरिष्ठांचे आदेश कसे असतात याचा चांगलाच अनुभव शुक्रवारी घाटीतील अधिकाऱ्यांना आला.

वेतनासाठी गटसचिवांचे सोमवारी आंदोलन

$
0
0
कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेत काम करणाऱ्या गटसचिवांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र सहकारी गटसचिव व कर्मचारी संघटनेतर्फे येत्या सोमवारी (एक डिसेंबर) शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे.

१.५ लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
किराणा दुकान फोडून चोरट्यांने गल्ल्यातून सोन्याचे दागिन्यांसह दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तीसगांव येथे शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली असून याच परिसरातून एक दुचाकी व तीन मोबाइलही चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादेत एडसग्रस्तांच्या संख्येत घट

$
0
0
सरकारी यंत्रणांनी दाखविलेली कार्यतत्परता आणि ग्रामीण भागातील गावागावामध्ये झालेली जनजागृती यामुळे गेल्यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

बेकायदा गर्भलिंग निदान

$
0
0
गर्भलिंग निदान करण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरुन डॉक्टरासह दोन एजंटाच्या विरोधात शुक्रवारी रात्री दीड वाजता क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली तर दोन एजंटचा तपास सुरू आहे.

उसतोड मजुराची आत्महत्या

$
0
0
पालम तालुक्यातील रावराजूर गावच्या शिवारात उसतोड मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. रहीम खान गुलाबखान पठाण असे त्याचे नाव आहे. अंबड तालुक्यातील टाका गावचा रहिवाशी आहे.

अधिका-यांच्या गाड्यांचे गणित चुकले

$
0
0
जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी दिल्या गेलेल्या गाड्यांचे गणित चुकल्याने अनेक अधिकाऱ्यांना फटका बसत आहे. त्यातच हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे तीन गाड्या मागितल्या आहेत. त्यामुळे पुढचा महिना गाड्या कशा ‘मॅनेज’ करायचा असा प्रश्न झेडपी प्रशासनासमोर पडला आहे.

बुंग... सहल विमानातून!

$
0
0
आता डिसेंबर सुरु होत असून, शाळांमध्ये गॅदरिंगसह सहलींचे बेत आखले जात आहेत. सहलीच्या आठवणी पुस्तकातील ‘पिंपळपान’ किंवा मोरपिसासारख्या अलगद मनामध्ये जपून राहाव्यात, असेच प्रत्येकाला वाटत असते. हेच स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी दौलताबादच्या एका शाळेतील विद्यार्थी यंदा दिल्लीच्या सहलीवर जात आहेत आणि तेही थेट विमानातून.

‘निळवंडे’तून दीड ‘टीएमसी’

$
0
0
बांधकामासाठी निळवंडे प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या सुमारे पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यापैकी केवळ दीड टीएमसी पाणी जायकवाडी धरणापर्यंत पोचले आहे. डिसेंबरपासून धरणाचे बांधकाम सुरू करायचे असूनही पावसाळ्यात तब्बल पाच टीएमसी पाणी निळवंडे प्रकल्पात का अडवून धरले, याचे उत्तर जलसंपदा खात्याकडे नाही.

प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला ‘ब्रेक’

$
0
0
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारातील पाच रस्ते दुरुस्त करण्याची घोषणा सरकारने केली. त्यापाठोपाठ त्याच्या निविदाही प्रसिद्ध केल्या, मात्र पैसे मिळण्याची खात्री नसल्यामुळे शहरातील कंत्राटदारांनी या निविदा भरण्याकडे पाठ फिरविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images