Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भारतीय दलित पँथरचे गायरानासाठी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कन्नड तालुक्यातील मौजे घाटशेंद्रा येथील गट क्रमांक ११४ येथील गायरान जमीन १९७३ पासून कसणाऱ्यांच्या नावे सातबारा फेर लावावा यासह इतर मागण्यांसाठी भारतीय दलित पँथर्सतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करण्यात आले.
घाटशेंद्रा येथील गट क्रमांक ११४ येथील गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावे फेर करावा, गेल्यावर्षी उभ्या पिकात गुरे चारून व जेसीबीने नुकसान केले, तसेच यावर्षी मेंढपाळांनी शेळ्या, मेंढ्या घालून व हाताने पिके उपटून पिकांचे नुकसान केले, त्याची भरपाई द्यावी, मेंढपाळ व सहकाऱ्यांवर कारवाई करावी, जिल्हा उद्योग केंद्रातील बीज भांडवल योजनेची बँकेच्या नावे पाठलेली प्रलंबित कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे आदेश बँकांना द्यावेत, संजय गांधी निराधार लाभधारकांचे थकीत मानधन तत्काळ द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. या उपोषणात १८ जणांनी सहभाग घेतला. निवेदनावर लक्ष्मण भुतकर, गीताबाई म्हस्के, भीमराव साळवे, सुखदेव कांबळे, गोरख गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिमोटने वीज चोरी; आरोपीस अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिमोटद्वारे वीज चोरी करण्यासाठी आपल्या शरीफ कॉलनी परिसरातील कुलरच्या कारखान्यामध्ये आवश्यक ते तांत्रिक फेरफार करुन देणाऱ्या आरोपीला सोमवारी (१४ ऑगस्ट) अटक करण्यात येऊन त्याच्याकडून लाखाची उपकरणे-तांत्रिक साहित्य जप्त करण्यात आले. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, गुरुवारपर्यंत (१७ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले.
या प्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे (एन-१२) सहाय्यक अभियंता अविनाश ज्ञानेश्वर चव्हाण यांनी फिर्याद दिली होती. रिमोटद्वारे वीज चोरी करणाऱ्या आरोपी मारुती जयराम पवार (वय ६२, रा. हडको, औरंगाबाद) व आरोपी सदाशिव बाबुलाल राठोड (वय ५२, रा. मयूरनगर, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीदरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अश्फाक अजीज काझी (वय ४७, रा. शरीफ कॉलनी, औरंगाबाद) याच्याकडून दोघांनी मीटरमध्ये फेरफार करुन घेतल्याची कबुली दिली. त्यावरून आरोपी अश्फाक याला सोमवारी अटक करण्यात आली. आरोपी अश्फाक याच्या कुलरच्या कारखान्यातून ६ विद्युत रिमोट, २१ विद्युत मीटर, ७ करंट ट्रान्स्फॉर्मर, १ सोल्डर गन, तसेच कटर, पकड, वायर, स्क्रू ड्रायव्हर आदी एक लाख १६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

चोरीच्या साहित्याचा शोध सुरू

आरोपी अश्फाक याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, गुन्हा गंभीर असून, आरोपीने वीज चोरीसाठी वापरलेले करंट ट्रान्स्फॉर्मर व इतर उपकरणे-साहित्य कुठून व कोणाकडून आणले, आरोपीचे इतर कोणी साथीदार आहेत का आदींचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला गुरुवारपर्यंत (१७ ऑगस्ट) पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची तिरंगा यात्रा जल्लोषात

$
0
0

भाजपची तिरंगा यात्रा जल्लोषात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सोमवारी शहरातून मोठ्या जल्लोषात तिरंगा यात्रा काढली. ‘भारत माता की जय’चा जयघोष करत कार्यकर्त्यांनी यात्रा मार्ग दणाणून सोडला होता.
क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ढोल ताशाचा गजर, देशभक्तीपर गीत आणि कार्यकर्त्यांचा जल्लोषात या यात्रेस सुरुवात झाली. मेजर शर्मा, मटाचे सिनीअर असिस्टंट एडिटर प्रमोद माने, ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे तसेच अमित फुटाणे, महेश डागा यांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, प्रमोद राठोड, गजानन बारवाल, जालिंदर शेंडगे, कचरु घोडके, सचिन झवेरी, बाळासाहेब गायकवाड, जगदीश सिद्ध, साधना सुरडकर, लता दलाल, मनिषा भन्साली यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पैठणगेट, टिळकपथ, सिटीचौक, शहागंज मार्गे काढण्यात आलेल्या यात्रेचा समारोप रात्री उशिरा संस्थान गणपती मंदिर येथे करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळ लेणीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणीतील सुरक्षाव्यवस्था कुचकामी असल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा उघडकीस आले. वेरूळ लेणी क्रमांक १६ समोर मेटल डिटेक्टर व पोलिस बंदोबस्त आहे. पण, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे रंगीत तालीम करताना उघडकीस आले आहे.
वेरूळ लेणी येथे पोलिसांनी शुक्रवारी रंगीत तालीम केली. येथे पर्यटन हंगामात हजारो पर्यटक भेट देतात, पण त्यांना सुरक्षा पुरवण्याची व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. लेणी परिसरात २०१३ मध्ये बसवलेले १० सीसीटीव्ही कॅमेरे २०१६ पासून बंद आहेत. हे एक वर्षांपासून बंद असलेले कॅमेरे सुरू करण्याचे प्रयत्न भारतीय पुरातत्व विभागाने केलेले नाहीत.
औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या सुरक्षाविषयक आढावा बैठकीत याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होणे किती आवश्यक आहे, हे दाखवण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी लेणी परिसरात रंगीत तालीम केली. यावेळी यामध्ये मेटल डिटेक्टर आणि १० सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे स्पष्ट झाले. ‘सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर बेवारस बॅग कोणी आणून ठेवली हे समजू शकले असते,’ असे पोलिस निरीक्षक हरीष खेडकर यांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा येथे फक्त देखावा झालेला आहे. उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, बूम बॅरीयर, डोम कॅमेरे, क्विक रिस्पॉन्स टीम, तांत्रिक व आधुनिक तंत्रज्ञान माहित असलेले कर्मचारी नेमण्याची गरज आहे.

ई-टेंडर प्रक्रिया

वेरूळ लेणी परिसरातील १० सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या कॅमऱ्यांची वॉरंटी संपलेली असून नवीन कॅमेरे बसविण्यासाठी ई-टेंडर प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ दिवसांत नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. मेटल डिटेक्टर सुरू आहे, असे वेरूळ लेणी येथील संवर्धन सहायक राजेश वाकलेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रोझोनमध्ये रंगणार स्वातंत्र्य दिनाचा उत्सव

$
0
0

प्रोझोनमध्ये रंगणार स्वातंत्र्य दिनाचा उत्सव
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा यंदा प्रोझोन मॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मंगळवारी (१५ ऑगस्ट) सकाळी साडेसात वाजेपासून रात्री साडेआठपर्यंत प्रोझोनमध्ये असंख्य प्रकारचे रंगतदार कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. टाइम्स ग्रुपच्या सहभागाने आयोजित या सोहळ्यात औरंगाबादकरांनी आवर्जून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजता प्रोझोन लॉन्सवर प्रोझोनचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तत्पूर्वी, प्रोझोनच्या सिक्युरिटीत तैनात जवान 'सिक्युरिटी परेड' करतील. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत होईल. यावेळी शहरातील प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे हे राष्ट्रभक्तीपर गाणी सादर करतील. यानंतर राहुल अंकुशे यांच्या ग्रुपचे विद्यार्थी राष्ट्रभक्तीपर गाण्यांवर डान्स करतील. काही विद्यार्थी आपल्या सुमधुर आवाजात काही गाणी सादर करतील. यावेळी 'राईड विथ प्रोझोन'च्या माध्यमातून शहरातील असंख्य रायडर्स औरंगाबादकरांना वाहतूक नियमांच्या पालनाचा महत्त्वपूर्ण संदेश देतील.
देशाच्या सीमेवर रात्रंदिवस संरक्षण करणाऱ्या सैन्यातील दोनशेहून अधिक जवानांना प्रोझोनच्या वतीने सायंकाळी निमंत्रित करण्यात आले आहे. रोटरॅक्ट क्लब आणि प्रोझोनच्या वतीने आयोजित सोहळ्याला ब्रिगेडियर (स्टेशन कमांडर) अनुराग विज, प्रोझोनचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद, प्रोझोनचे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर जितेंद्रसिंग सलुजा, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष आरटीआर मोहसीन शेख, आरटीआर राजदीप चावला, रोटेरियन आरटीआर सरस्वती पवार आदींची उपस्थिती असणार आहे. यावेळी सैन्यातील जवानांना तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी लिहिलेल्या तब्बल १० हजार संदेशांचे पोस्ट कार्ड्स ब्रिगेडियर (स्टेशन कमांडर) अनुराग विज यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल.
यावेळी राजन मंदा हे राष्ट्रभक्तीपर कविता सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण करतील. त्यानंतर 'अगम्य बँड' आणि 'राधे बँड'चे कलावंत बँडवर राष्ट्रभक्तीपर गीते सादर करतील. तर 'सिझलर्स ग्रुप', 'इन्फेनाईड्स डान्स ग्रुप' आणि 'फॅन फाऊंडेशन'चे कलावंत डान्स परफॉर्मन्स करतील.
टाइम्स ग्रुपच्या सहभागाने स्वातंत्र्य दिनानिमित्त दिवसभर चालणाऱ्या या भरगच्च कार्यक्रमाचे अँकरिंग विनय शर्मा करतील. जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी सहकुटुंब या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रोझोनचे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर जितेंद्रसिंग सलुजा यांनी केले आहे.
प्रोझोन रिटेल अवॉर्ड
ध्वजवंदन सोहळ्यानंतर प्रोझोन लॉन्सवर प्रोझोनमधील विविध स्टोअर्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या निवडक एक्झिक्युटिव्हना 'प्रोझोन रिटेल अवॉर्ड' देऊन सन्मानीत करण्यात येईल. प्रोझोन व्यवस्थापनात चांगली कार्य करणाऱ्या निवडक प्रतिनिधींना देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येईल. एक्झिक्युटिव्हचा उत्साह वाढावा यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.
राईड विथ प्रोझोन
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमात प्रोझोनने सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने 'राईड विथ प्रोझोन'चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ वाजता शहरातील हौशी रायडर्सच्या सहभागाने ही राईड काढण्यात येईल. लेह-लडाखला नियमितपणे जाणारे हौशी रायडर्सचे ग्रुप यात सहभागी होतील. यावेळी उपस्थित रायडर्स औरंगाबादकरांना सेफ ड्रायव्हिंगचे महत्त्व पटवून देतील. स्वतःच्या संरक्षणासाठी हेल्मेट परिधान करूनच दुचाकी चालवावी, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, चुकीच्या दिशेने वाहन न चालवणे, झेब्रा क्रॉसिंगनेच रस्ता ओलांडावा, यासारख्या गोष्टीचे प्रबोधन हे रायडर्स करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यातीलच धार्मिक स्थळे पाडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्य रस्त्याला आणि वाहतुकीला अडथळा ठरणारीच धार्मिक स्थळे पाडली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ५०० ते १०० धार्मिक स्थळांवरच हातोडा पडू शकेल, असे मानले जात आहे. दरम्यान, पालिकेकडे नव्याने ११५ आक्षेप दाखल झाले आहेत.

धार्मिक स्थळांवरील कारवाईसंदर्भात पालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सोमवारी पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘अ’ वर्गातील धार्मिक स्थळे पाडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ‘ब’ वर्गातील जी धार्मिक स्थळे मुख्य रस्त्यास किंवा वाहतुकीस अडथळा ठरत नाहीत, त्यांच्यावगही कारवाई होण्याची शक्यता नाही. ही धार्मिक स्थळे नियमित होऊ शकतील. ती नियमित करण्यासंदर्भात सर्व संबंधित विभागाचा अभिप्राय घेतला जाणार आहे. कारवाईतून खासगी जागेवरील धार्मिक स्थळे देखील वगळली जाणार आहेत. मुख्य रस्त्यांवर, विकास आराखड्यातील रस्त्यावर किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या धार्मिक स्थळांवर मात्र हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.

धार्मिक स्थळांसंदर्भात महापालिकेकडे यापूर्वी ८०६ आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय नव्याने ११५ आक्षेप दाखल झाले आहेत. यासर्व आक्षेपांची छाननी करून त्यांची वर्गवारी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती मुगळीकर यांनी दिली. या समितमध्ये उपायुक्त अय्युब खान, रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, अफसर सिद्दिकी, करमूल्य निर्धारक व संकलक वसंत निकम, विशेष कक्षाचे प्रमुख एम. बी. काजी यांचा समावेश करण्यात आला आहे. हे अधिकारी तीन दिवसांत आक्षेपांची छाननी करून आयुक्तांना अहवाल सादर करतील. हा अहवाल आयुक्त १७ ऑगस्ट रोजी पालिकास्तरीय समितीच्या बैठकीत ठेवतील. समिती त्या अहवालावर निर्णय घेईल, असे मुगळीकर यांनी सांगितले.

सुट्टीच्या दिवशीही आक्षेप स्वीकारणार
धार्मिक स्थळांवरील आक्षेप सुट्टीच्या दिवशी देखील स्वीकारले जातील, असे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी स्पष्ट केले. महापालिकेला १५ आणि १७ ऑगस्ट रोजी सुट्टी आहे. या दोन्ही दिवशी आक्षेप स्वीकारले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेत आऊट सोर्सिंगचा धमाका

$
0
0

पालिकेत आऊट सोर्सिंगचा धमाका
‘आपली माणसे’ घुसवण्यासाठी चढाओढ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
महापालिकेत आऊट सोर्सिंगचा धमाका सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असल्यामुळे कंत्राटदाराच्या माध्यमातून कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अनुषंगाने ‘आपली माणसे’ घुसवण्यासाठी अधिकारी, पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.
महापालिकेत आतापर्यंत तीन टप्प्यांत नोकरभरती झालेली आहे. त्यानंतर नोकरभरतीवर शासनाने निर्बंध लादल्यामुळे नोकरभरती करण्यात आली नाही. दरम्यानच्या काळात पालिकेच्या सेवेतून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त झाले. सुमारे ४५० अधिकारी - कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागल्यामुळे त्याचा विकास कामांवर परिणाम होऊ लागला. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत उमटू लागले. त्यामुळे आऊट सोर्सिंगवर कर्मचारी भरतीचा निर्णय घेण्यात आला. त्यात प्रामुख्याने कनिष्ठ अभियंता, सबव्होर्सियर, स्वच्छता निरीक्षक या पदांचा समावेश करण्यात आला. आऊट सोर्सिंगने कर्मचारी भरती करण्यासाठी पालिकेने टेंडर काढले. काढलेल्या टेंडरनुसार एका खासगी संस्थेला आऊट सोर्सिंगद्वारे महापालिकेला कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. पालिकेच्या सेवेत कनिष्ठ अभियंता, सबव्होर्सियर आणि स्वच्छता निरिक्षक ही तिन्हीही पदे महत्त्वाची असल्यामुळे या पदांवर आपल्या माणसांची वर्णी लागावी यासाठी काही पदाधिकारी - नगरसेवकांसह अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागली. त्यातून आतापर्यंत कनिष्ठ अभियंता या पदासाठी ३०, सबव्होर्सियर या पदांसाठी ३० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षकाच्या १८ जागा देखील भरण्यात आल्या आहेत. या सर्वांना ११ महिन्यांसाठी नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
नियुक्त पत्र देताना उमेदवारांकडून सुरक्षा ठेवीच्या नावाखाली ५० हजार रुपये, एक लाख रुपये घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम कंत्राटदाराच्या तिजोरीत जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय काही लोकप्रतिनिधींनी देखील आपले खिसे गरम करून घेतल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. येत्या काही महिन्यात आऊट सोर्सिंगवर सफाई कामगार देखील घेतले जाणार आहेत, त्यासाठीची टेंडर प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

आऊट सोर्सिंगवर घेतलेले कर्मचारी ११ महिन्यांसाठीच आहेत. या काळात ते महापालिकेसाठी काम करतील, महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करतील. हे करीत असताना त्यांच्याकडून काही गडबड झाली व त्यात महापालिकेचे नुकसान झाले तर त्याची भरपाई व्हावी या उद्देशाने महापालिकेने कंत्राटदाराकडून ५० लाखांची बँक गॅरंटी घेतली आहे.
अय्युब खान, उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणीसाठी आज अखेरची संधी

$
0
0

नोंदणीसाठी आज अखेरची संधी
रॅम्पवर चालण्याचा महिलांकडून सराव; ‘मटा मिसेस औरंगाबाद’ स्पर्धेची उत्सुकता वाढली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :
शहरातील गृहिणींसाठी महाराष्ट्र टाइम्स घेत असलेल्या ‘मटा मिसेस औरंगाबाद’ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. तुम्हालाही स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर आजच आपली नाव नोंदणी करा. आज (१५ ऑगस्ट) स्पर्धेच्या नोंदणीचा अखेरचा दिवस आहे. औरंगाबादमध्ये प्रथमच होत असलेल्या या अनोख्या स्पर्धेत सहभागी व्हा.
‘मटा मिसेस औरंगाबाद’ या स्पर्धेत तुमचे सौंदर्य, कला आणि बुद्ध‌िमत्तेची कसोटी लागणार आहे. अनेक महिला मंडळाच्या सदस्यांनी या स्पर्धेसाठी आपला प्रवेश फॉर्म भरून दिला आहे. ज्या ज्या सहभागी होत आहेत, त्या आपल्या मैत्रिणींनाही स्पर्धेत येण्यासाठी आग्रह करू लागल्या आहेत.
शहरातील २६ ते ४५ वयोगटातील गृहिणी या सौंदर्यस्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सौंदर्य आणि अदाकारी अर्थात कला अन् बुद्धिमत्तेची कसोटी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यातील कलाकाराला जागे करा आणि सज्ज व्हा ‘मिसेस औरंगाबाद’ बनण्यासाठी. स्पर्धेसाठी ‘मिसेस औरंगाबाद’ किताबासह आठ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. उपविजेती, तृतीय, चौथा व पाचवा क्रमांक अशी पाच पारितोषिके आहेत. याशिवाय बेस्ट ड्रेस, बेस्ट मेकअप, बेस्ट परफॉर्मन्स अशी तीन विशेष पारितोषिकेही दिली जाणार आहेत. ‘मिसेस औरंगाबाद’ ही स्पर्धा २० ऑगस्ट रोजी होणार आहे. स्पर्धकाला चार राऊंडची परीक्षा द्यावी लागणार आहे. यात इंट्रोडक्शन राऊंड, रॅम्पवॉक, कोणताही एक कलाप्रकार तीन मिनिटांत सादर करणे व त्यानंतर प्रशोनत्तराचा राऊंड होईल. त्यातून परीक्षक विविध पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड करतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही आजच ९८२२६३०५५५ या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करता येईल.

मटा मिसेस औरंगाबाद ही एक सुवर्ण संधी आहे. यामुळे विवाहित महिलांनाही छान आणि नावाजलेलं व्यासपीठ मिळणार आहे. या स्पर्धेमुळे प्रत्येकीला आनंद तर नक्कीच मिळेल, पण त्यासोबतच स्वतःचाही नव्याने शोध घेऊन समाजासमोर येता येईल. खरंतर पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्येच अशा स्पर्धांचे आयोजन होत असते, पण मटाने आम्हा औरंगाबादकर महिलांसाठीही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. महिलांनी स्पर्धेत नक्की सहभागी व्हावे. स्वतःच्या कलागुणांना एक नवी ओळख निर्माण करून देऊन आपण सर्वच या स्पर्धेचा आनंद घेऊ.
कस्तुरी जोशी, सहभागी स्पर्धक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुलंब्री तालुक्यात दुष्काळाची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यात पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने पिके वाळत आहेत. या पिकांचे तत्काळ पंचनामे करून फुलंब्री तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तहसीलदारांकडे नुकतीच करण्यात आली.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकभाऊ पाथ्रीकर व सरपंच वरूण पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखाली
शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी जून महिन्यात खरिपाची पेरणी केलेली आहे. मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मका, कापूस, सोयाबीन, तूर व इतर सर्व शेती पीक शंभर टक्के वाळून गेले आहे. पीक गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.
या निवेदनावर द्वारकदास पाथ्रीकर, सरपंच वरूण पाथ्रीकर, संदीप काकडे, अविनाश पाथ्रीकर, ज्ञानेश्वर जाधव, चंद्रकांत शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, सुधाकर बनसोड, प्रमोद ताठे, सांडू खामाट, बाळकृष्ण बनसोड, गणेश पाथ्रीकर, उत्तमराव बनसोड, भीमराव बनसोड, बाळासाहेब पाथ्रीकर, भाऊसाहेब बनसोड, कृष्णा चव्हाण, कचरू कोलते, उमेश पाथ्रीकर, रमेश बनसोड, मधुकर बनसोड, दिनकर बनसोड, राधाकिसन खामाट, योगेश पाथ्रीकर, बापूराव बनसोड, गणेश सोनवणे, प्रदीप पाथ्रीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्या

-वाळलेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करा.
-हेक्टरी एक लाखापर्यंत आर्थिक मदत करा.
-फळबागा वाचविण्यासाठी आर्थिक तरतूद करा.
-शेतकरी पाल्यांची प्राथमिक, उच्चशिक्षण फी माफ करा.
-निकषाशिवाय शंभर टक्के कर्जमाफी, ऑनलाइन अर्जाची अट रद्द करा.
-पीकविमा कंपन्यांना मंजुरीचे आदेश द्या.
-दुष्काळ जाहीर करून तातडीने उपाययोजना करा.
-जनावरांसाठी तत्काळ चारा छावण्या सुरू करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यवर्ती बसस्थानकातून सोनसाखळी लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशाची ७५ हजार रुपयांची सोनसाखळी चोराने लंपास केली. हा प्रकार रविवारी दुपारी अडीच वाजता घडला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जग्गनाथ गोपीनाथ पाठक (वय ६३ रा. तीसगाव ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे रविवारी शहरात आले होते. ते गावी जाण्यासाठी दुपारी अडीच वाजता मध्यवर्ती बसस्थानकात आले. बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांची सोनसाखळी चोरांनी लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्या जाऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी जमादार सोनवणे हे तपास करीत आहेत.

पोलिस चौकी नावालाच

मध्यवर्ती बसस्थानकात स्वतंत्र पोलिस चौकी असून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. पम, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथे सतत चोऱ्या होत आहेत. पाकिटमारीसह दुचाकी चोरीच्या घटनाही घडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपमुळे राज्य अधोगतीकडे

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सत्तेत एकत्र राहूनही वरून भांडणे दाखविण्याचे प्रकार राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना करत आहेत. देशात अव्वल म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राला शिवसेना आणि भाजप दोघे मिळून अधोगतीकडे नेत आहेत, असा आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना केला.
आमदार राणे म्हणाले, राज्यात सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत. एकीकडे शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका पार पाडते तर दुसरीकडे सत्तेत सहभागी आहे. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात त्यांचा ढोंगीपणा उघड झाला. दोन्ही पक्ष मिळून राज्याला अधोगतीकडे नेत आहेत. हे फार काळ चालणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील जनतेने त्यांची ही खेळी अनुभवली. शिवसेना तीन वर्षांपासून तळ्यात मळ्यातचा खेळ करत आहे. हे दोन्ही पक्ष आतून एकच आहेत. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे घोटाळेही उघड झाले, असे ते म्हणाले.
‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सरकारने जाहीर केली. पण शेवटच्या घटकापर्यंत त्याचा फायदा जोवर पोचत नाही तोवर या घोषणेचा अजिबात विश्वास नाही. निकष, प्रक्रिया पाहता या घोषणेत आणखी खूप बदल करावे लागणार आहेत. मुळातच शेतीचे धोरण आणखी बळकट करण्यासाठी अभ्यासाची अतिशय गरज आहे. शेती विकासाचे मॉडेल विकसित करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतीची आताची परिस्थिती बदलण्यास मदत मिळेल. यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल टाकण्याची गरज आहे. नाकापर्यंत आल्यानंतर कर्जमाफी करणे हा काही ठोस उपाय नव्हे. शेतकऱ्यांना ताकद देण्याची गरज आहे. अन्य राज्यांमध्ये काय उपाययोजना केल्या जातात, त्याची माहिती घेऊन त्या आपल्या राज्यात राबविल्या पाहिजेत.’ असे आमदार राणे यांनी नमूद केले.

मराठा मोर्चानंतर सकारात्मक प्रवास

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या आठवड्यात मुंबईत अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात भूमिका मांडताना आमदार नितेश राणे म्हणाले, कोपर्डी, अॅट्रॉसिटी आणि मराठा आरक्षण हे तीन मुद्दे होते. यापैकी दोन मुद्दे न्यायप्रविष्ट असून तिसरा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. राज्य सरकारवर दबाव टाकायचा होता. मराठा समाजाची ताकद दाखवून द्यायची होती. मुंबई मोर्चाच्या निमित्ताने त्यादृष्टीने निश्चितच सकारात्मक पाऊल पडले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकर सोडविण्याबाबत सरकारला पुढाकार घ्यावाच लागणार आहे. सरकारला मराठा समाजाची ताकद दिसून आली. प्रत्येक गोष्टीसाठी संवाद ठेवणे गरजेचे आहे. मोर्चाच्या निमित्ताने सकारात्मक प्रवास सुरू झाला आहे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ ऑगस्टनिमित्त वाहतुकीच्या नियमांसंबंधी जनजागृती

$
0
0

१५ ऑगस्टनिमित्त वाहतुकीच्या नियमांसंबंधी जनजागृती
शिस्त भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये वाहतुकीच्या नियमांसंबंधी जनजागृती व्हावी आणि त्याचे पालन सातत्याने केले जावे यासाठी मंगळवारी (१५ ऑगस्ट) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्त भारत अभियान केले आहे. ही माहिती या अ‌भियानाचे समन्वयक भगवंत ग्रामले आणि लक्ष्मण लांडगेवाड यांनी दिली.
हे अभियान १५ ऑगस्टला सकाळी १० ते १२ या दरम्यान सिडको बस स्टँड सिग्नल येथे राबवण्यात येईल. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक अनिल भालेराव यांची विशेष उपस्थित असेल. या अभियानाचे औचित्य खास स्वातंत्रदिन पाहून करण्यात आले आहे. यात शहरातील काही शाळा, विविध संस्था आणि नागरिकांचा समावेश असेल. हे अभियान समाजहितासाठी आहे. वाहतुकीच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करावे असे आवाहन यानिमित्ताने केले जाणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे आणि हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन ग्रामले आणि लांडगेवाड यांनी केले आहे. याचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने असलेला चंद्रगुप्तनगर भाग (यात गजानन महाराज मंदिर, एन-३ एन४ सिडको, मुकुंदवाडी परिसर, व जालनारोड अलिकडील भाग) याद्वारे करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत असून यात सकाळी १० वाजता संघाचे सर्व या भागातील स्वयंसेवक व नागरिक सहभागी होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-काँग्रेसमुळेच नोकऱ्यांमधील अनुशेष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात अनुसूचित जाती, जमाती तसेच मुस्लिम व हिंदू धर्मियांमध्येही मोठ्या प्रमाणावर मागासवर्गियांची संख्या मोठी आहे. देशात सत्ता असलेल्या भाजप आणि काँग्रेसने सरकारी नोकऱ्यांमधील अनुशेष भरला नसल्याने मागासवर्गियांना अधिकार मिळू शकले नाहीत, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे खासदार वीर सिंग यांनी केले.
राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांना सहारनपूर (उत्तर प्रदेश) येथील बहुजनांच्या प्रश्नावर भाजप व केंद्र शासनाने राज्यसभेत बोलू न दिल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पक्षातर्फे सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठवाडास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदशाध्यक्ष विलास गरुड, प्रदेश महासचिव डॉ. शरदचंद्र वानखेडे, अशोक जाधव आदींची उपस्थिती होती.
यावेळी वीर सिंग म्हणाले की, देशाला स्वातंत्र मिळून ७० वर्षे पूर्ण झाले, मात्र आजही अनेक मागासवर्गियांना संविधानिक दर्जा मिळाला नसल्यामुळे त्यांना पूर्ण आरक्षण मिळू शकले नाही. सत्ताधारी नेत्यांची नियत स्वच्छ असती, तर मागासवर्गियांना संविधानाचा फायदा मिळाला असता. आज देशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठा अनुशेष भरण्याची गरज असताना केंद्रातील सरकारने देशातील रेल्वे, विमान प्राधिकरणासाख्या संस्थांचे खाजगीकरणाचा घाट घालण्याचा विचार करत आहे. आज जे आरक्षण मिळाले आहे, ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले असल्याचे वीर सिंग यांनी सांगितले. मंडल आयोगासाठी कांशीराम यांनी केलेल्या प्रयत्नांचीही माहिती उपस्थितांना दिली. केंद्रातील सरकार मुस्कटदाबी करत असून सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शरदचंद्र वानखेडे यांनी सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. मराठवाडास्तरीय धरणे आंदोलनासाठी मोठ्यासंख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोक चव्हाणांना धक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

नांदेड पालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा दिला. काँग्रेसच्या पाच, शिवसेनेच्या चार तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी पालिका आयुक्ताकडे राजीनामा दिला असून हे दहा नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या वृत्ताला भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा नांदेड निवडणूक प्रभारी सुजितसिंह ठाकूर यांनी दुजोरा दिला आहे.

भाजपने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना चक्रव्युहात घेरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सोमवारी काँग्रेसचे माजी उपमहापौर सरजितस‌िंह गील, किशोर यादव, स्नेहा पांढरे, अन्नपूर्णा ठाकूर, नवल पोकर्णा तर शिवसेनेचे दीपकसिंह रावत, ज्योती खेडकर, वैशाली देशमुख, विजय गुर्रम व राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप चिखलीकर, श्रद्धा चव्हाण या दहा नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामे दिले आहेत. आता हे सर्वच जण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, ठाकूर यांनी नांदेडचे आणखी काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून येत्या काळात ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले. पालिका निवडणुकीत भाजपला विजयाची खात्री असल्याने पक्षात येणाऱ्या नगरसेवकांचा ओघ वाढत आहे. नांदेड पालिकेत परिवर्तन अटळ असून पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास ठाकूर यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

शिवसेनेत राजीनामास्त्र

दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिला असून, त्यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवला आहे. तिकडे नांदेड युवासेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याबरोबर युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध कार्यक्रमांनी विलासरावांना आदरांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी बाभळगाव येथील विलासबाग येथे प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी देशमुख कुटुंबियासह विविध क्षेत्रातील मान्यवरासह व नागरीकांनी पुष्प अपर्ण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बाभळगाव येथील विलासबाग येथे प्रारंभी विलासराव देशमुख यांना आमदार दिलीपराव देशमुख, सुवर्णा देशमुख, आमदार अमित देशमुख, अदिती देशमुख, धिरज देशमुख, अवीर, अवन, अभिजीत देशमुख, सत्यजित देशमुख, जयसिंहराव देशमुख यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर व असंख्य जनसमुदायाने लोकनेत्यास भावपूर्ण आरदारांजली अर्पण करून अभिवादन केले.
आदरांजली वाहण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड, लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, अॅङ. व्यंकट बेद्रे, त्र्यंबकदास झंवर, महापौर सुरेश पवार, दीपक सूळ, स्थायी समिती अध्यक्ष अशोक गोविंदपूरकर, माजी आमदार एम. जी. मुळे (बसवकल्याण), रेणा साखरचे चेअरमन आबासाहेब पाटील, दत्तात्रय बनसोडे, लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश राठी, रमेश बियाणी, व्ही. पी. पाटील, ललित शहा, विक्रम हिपरकर, विजय देशमुख, बी. व्ही. मोतीपवळे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, यशवंतराव पाटील, लक्ष्मण मोरे, दिलीप माने, विकास साखरचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, विलास बँकेचे व्हा. चेअरमन चंद्रकांत देवकते, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, सुधाकर तेलंग, कार्यकारी अभियंता भंडे, पोलिस निरीक्षक दिलीप खोडवे, जिल्हा परिषद गटनेते संतोष तिडके, लातूर तालुकाध्यक्ष दगडुसाहेब पडीले, जळकोट तालुकाध्यक्ष मन्मथप्पा किडे, अहमदपूर तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राजाराम पोवार, यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तालमणी डॉ. राम बोरगावकर आणि समुह यांनी स्वरांजली कार्यक्रम सादर केला. प्रार्थना सभेचे सूत्रसंचालन रामानूज रांदड यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रेन डेड शिक्षिकेचं यकृत प्रत्यारोपणासाठी मुंबईत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । औरंगाबाद

ब्रेन डेड झालेल्या एका शिक्षिकेवर काल औरंगाबाद येथील माणिक रुग्णालयात अवयवदानासाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिचं यकृत प्रत्यारोपणासाठी मुंबईत पाठवण्यात आलं आहे. तर, अन्य अवयवांचं प्रत्यारोपण औरंगाबादेतील वेगवेगळ्या रुग्णालयात होणार आहे. औरंगाबाद शहरातील हे १३वं अवयवदान ठरलं आहे.

बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे अंगणवाडी शिक्षिका असलेल्या ५० वर्षीय महिलेला अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या या महिलेला प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथील दुनाखे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार, या महिलेला माणिक रुग्णालयात दाखल करून तिच्यावर काल सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिचं यकृत प्रत्यारोपणासाठी विमानानं मुंबई येथील ग्लोबल रुग्णालयाला पाठविण्यात आलं. तिच्या दोन्ही मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण औरंगाबादच्या रुग्णालयातच होणार आहे. तसेच, कॉर्नियाचं प्रत्यारोपण औरंगाबादच्या कसबेकर रुग्णालयात होईल. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ग्लोबल रुग्णालयाच्या डॉक्टरांचं पथक करणार आहे. महिला रुग्णांनाच या अवयव प्रत्यारोपणाचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परस्पर संवाद हाच प्रगती मूलमंत्र’

$
0
0

औरंगाबाद : आपसातील संवाद हाच कोणत्याही संस्थेच्या प्रगतीचा मूलमंत्र असतो. प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी या सर्वांमध्ये उत्तम परस्पर संवाद असला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए.चोपडे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी सकाळी कार्यक्रम झाला. कुलगुरु डॉ. चोपडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आला. ते म्हणाले, ‘जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश म्हणून आपली ओळख आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत आपण तत्वज्ञान, तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. भारतीय तरुणांनी आपल्या कार्य कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकाविला आहे. कोणत्याही देशाचे मोठेपण हे तेथील विद्यापीठ व प्राध्यापकांवर अवलंबून असते. आपले विद्यापीठ हे देशातील नामांकित संस्थामध्ये येण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ यावेळी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे, ‘निलिट‘चे कार्यक्रारी संचालक संजीवकुमार गुप्ता, नलिनी चोपडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजीब खान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

उद्या ‘एक शाम देश के नाम’
नाटयशास्त्र विभागातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘एक शाम देश के नाम’ या संगीत, नृत्य आणि नाट्य आधारित देशभक्तीपर कार्यक्रमाचे शुक्रवारी (१८ ऑगस्ट) सायं साडेसहा वाजता नाट्यशास्त्र विभागात करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. चोपडे असतील. यावेळी कुलसचिव डॉ. जब्दे, कार्यासन अधिकारी डॉ. सरवदे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. खान आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टँपिंग अभावी पंप बंद

$
0
0

स्टँपिंग अभावी पंप बंद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
वजन मापे विभाग शहरातील नादुरुस्त पंप दुरुस्त झाल्याबाबत स्टँपिंग करीत नसल्याने शहरातील १५ पेट्रोल पंप बंद पडले आहेत. यामुळे उर्वरित पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी होत आहे.
ठाणे येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर औरंगाबाद शहरातही पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली होती. पेट्रोल विक्रीत दोष आढळल्याने चुन्नीलाल पेट्रोल पंपास सील लावण्यात आले आहे. मात्र, तपासणीत निर्दोष असलेल्या पंपाना नवीन अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल पंपावरील एखादे पेट्रोल भरण्याचे यंत्र बिघडल्यास किंवा त्यामधून कमी पेट्रोल येत असल्यास हा पंप वजन मापे विभागाच्या तपासणीशिवाय किंवा त्यांनी प्रमाणित केल्याशिवाय सुरू करू नये, असा नियम आहे. पेट्रोल चोरीची प्रकरणे समोर आल्यानंतर वजन मापे विभागाने प्रत्येक महिन्यात २० तारखेपासून पंपांच्या तक्रारी सोडविण्यात येतील असा मौखिक आदेश दिला आहे. त्यामुळे शहरातील १५ पेट्रोल पंपाचे संच बंद आहेत. मात्र, वजन मापे विभागाकडून पुढे काहीच हालचाल होत नसल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसू लागला आहे.

पंपावरील यंत्राची स्टॅपिंग झाली नसल्याने शहरातील अनेक पंप बंद आहेत. याबाबत संबंधीत विभागाला तसेच कंपनीला माहिती देण्यात आली आहे. कंपनीकडून हे पंप सुरू करण्यासाठी कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे रांगा लागत आहे. वाहनधारकांनाच याचा त्रास होत आहे.
अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असो‌सिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे तिघांना जीवनदान; दोघांना दृष्टी

$
0
0

महिलेचे तिघांना जीवनदान; दोघांना दृष्टी
मराठवाड्यातील १३ वे अवयवदान यशस्वी; यकृताचे मुंबईत, दोन्ही किडनी व कॉर्नियाचे औरंगाबादेत प्रत्यारोपण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काहीशी थंडावलेली अवयवदानाची चळवळ पुन्हा एकदा सुरू झाली असून, तब्बल तीन महिन्यांच्या खंडानंतर मराठवाड्यातील १३ वे अवयवदान सत्तराव्या भारतीय स्वातंत्र्यदिनी मंगळवारी (१५ ऑगस्ट) शहरात यशस्वी झाले. विशेष म्हणजे ब्रेन डेड झालेल्या पन्नाशील्या महिलेने दोन महिलांसह इतरांना जिवनदान तसेच दृष्टिदानही दिले. संबंधित महिलेचे यकृत मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी मंगळवारी रात्री विमानाने पाठवण्यात आले व मंगळवारी मध्यरात्री यकृताचे प्रत्यारोपण झाले. तर, एका मूत्रपिंडाचे शहरातील कमलनयन बजाज हॉस्पिटल व दुसऱ्या मूत्रपिंडाचे शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण झाले. तसेच दोन्ही बुब्बुळांचे (कॉर्निया) शहरातील कसबेकर हॉस्पिटलमध्ये लवकरच प्रत्यारोपण होणार आहे.
दुर्दैवाने, नातेवाईकांची इच्छा असूनही वैद्यकीय कारणांमुळे हृदयाचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही. १५ जानेवारी २०१६ रोजी मराठवाड्यातील पहिले अवयवदान शहरात यशस्वी झाले आणि त्यानंतरच्या १९ महिन्यांत १३ ब्रेन डेड व्यक्तींकडून पन्नासपेक्षा जास्त अवयवांचे दान झाले आहे.
बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे अंगणवाडी शिक्षिका असलेली ५२ वर्षीय महिला ही रविवारी (१३ ऑगस्ट) माजलगावहून दुचाकीवर निघाली होती. तिचा मुलगा दुचाकी चालवत होता, तर संबंधित महिला मागे बसली होती. रस्त्यातील खड्ड्यामुळे तोल जाऊन महिला खाली पडली आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती आणखी गंभीर बनल्यामुळे तिला औरंगाबादच्या दुनाखे हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री आठच्या सुमारास दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ती ब्रेन डेड झाल्यानंतर हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद दुनाखे व इतरांनी नातेवाईकांपुढे अवयवदानाचा पर्याय ठेवला. नातेवाईकांनी परवानगी दिल्यानंतर सर्व यंत्रणा वेगाने हलल्या आणि अवयवदानाच्या शस्त्रक्रियेसाठी संबंधित महिलेला माणिक हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
औरंगाबादेतील ‘झेडटीसीसी’च्या समन्वयातून महिलेचे यकृत प्रत्यारोपणासाठी मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दोन्ही मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण शहरातील ‘कमलनयन’ व ‘युनाटेड सिग्मा’मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘टू डी एको’ व इतर तपासण्यांमध्ये संबंधित महिलेचे हृदय अपेक्षेप्रमाणे कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हृदयाचे दान रद्द करण्यात आले.

माझ्यासह माझ्या रुग्णालयातील डॉक्टर-अधिकाऱ्यांनी नातेवाईकांपुढे अवयवदानाचा सक्षम पर्याय ठेवला. अतिशय दुःखद समयीदेखील नातेवाईकांनी धीरोधात्तपणे अवयवदानाचा निर्णय घेतला. आता आमच्या रुग्णालयालाही ‘रिट्राव्हल सेंटर’ची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– डॉ. मिलिंद दुनाखे, संचालक, दुनाखे हॉस्पिटल
नातेवाईकांनी तातडीने निर्णय घेतल्यामुळेच अवयवदान होऊ शकले. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यातील मोठी-मध्यम रुग्णालये ‘रिट्राव्हल सेंटर’ झाली तर अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक होऊ शकेल आणि आणखी कितीतरी जणांना जिवनदान मिळू शकेल.
– डॉ. उल्हास कोंडपल्ले, संचालक, माणिक हॉस्पिटल
​ अशा दुःखद वेळी नातेवाईकांना अवयवदानाचे महत्व पटवून देणे अतिशय जिकिरीचे असते; परंतु ते योग्य पद्धतीने पटवून दिले तर अवयवदान होण्याची शक्यता अनेक पटींनी बळावते आणि गंभीर रुग्णांना नवे जीवन मिळते. त्यासाठीच सर्व संबंधितांनी नातेवाईकांच्या समुपदेशनाची महत्वाची भूमिका पार पाडणे गरजेचे आहे.
– मनोज गाडेकर, प्रत्यारोपण समन्वयक, झेडटीसीसी
तब्बल तीन महिन्यांनी ‘ब्रेन डेथ रिपोर्टिंग’ झाले आहे, ही नक्कीच समाधानाची बाब आहे. मात्र अजूनही अवयवाचे प्रमाण शब्दशः नगण्य आहे आणि त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यातील मोठी-मध्यम शासकीय-खासगी रुग्णालये ‘नॉन-ट्रान्स्प्लान्ट रिट्राव्हल सेंटर’ झाली पाहिजेत आणि प्रत्येक जिल्ह्यातून अवयदान झाले पाहिजे, तेव्हाच अवयवांच्या प्रतिक्षेतील रुग्णांना नवे जीवन मिळण्याची शक्यता वाढेल.
–डॉ. सुधीर कुलकर्णी, झेडटीसीसी अध्यक्ष, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ धार्मिक स्थळ समितीची आज बैठक

$
0
0

धार्मिक स्थळ समितीची आज बैठक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
धार्मिक स्थळांच्या संदर्भात महापालिकास्तरीय समितीची बैठक आज (गुरुवारी) सायंकाळी चार वाजता महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात होणार आहे.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध केली होती. या यादीवर ८०६ आक्षेप प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या आक्षेपांची छाननी करून त्यांची वर्गवारी करण्यासाठी पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सहा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सहा समित्या स्थापन केल्या. प्राप्त झालेल्या आक्षेपांची छाननी करून त्याचा अहवाल समितीसमोर सादर करण्याचे आदेश मुगळीकर यांनी दिले होते. १८ ऑगस्ट रोजी महापालिकेला धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या संदर्भात हायकोर्टात अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे मुगळीकर यांनी १७ ऑगस्ट रोजी पालिकास्तरीय समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सहाही पथकांचे प्रमुख आपला अहवाल सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images