Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबादला १६ पदके

$
0
0

औरंगाबादला १६ पदके
स्केटिंग स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रोलर रिले स्केटिंग फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तेविसाव्या अखिल भारतीय रोलर रिले स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले. त्यात औरंगाबादच्या स्केटरनी सोळा पदके जिंकली.
गोवा येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतील तीनशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये औरंगाबादच्या साई आंबे, राजेश भावसार, साई नटराजन, अदिती जवळगीकर, अद्वैत पिलखाने, अभिनव वानखेडे, वैदेही लव्हारे, श्रेयस करंगळे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. सुरज जाधव, चैतन्य राजपूत, समर्थ ठाकूर, अंशुम जैस्वाल, अनिरुद्ध जंजाळ, ओम जवळगीकर हे रौप्यपदकाचे मानकरी ठरले, तर वरद मोरे, अथर्व देवकर यांनी ब्राँझपदके पटकावली.या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांची मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विजेत्यांना फेडरेशनचे अध्यक्ष नितीन घोगरे, अनंत जोशी, भिकन आंबे, प्रभाकर ढगे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने २१ पदकांची कमाई केली. त्यात औरंगाबादच्या खेळाडूंनी १६ पदके जिंकली आहेत.
अंतिम निकाल ः प्रोफेशनल इनलाइन - ४ ते ६ वर्षे वयोगट : मुले - १. के. वेदांत (तमिळनाडू), २. श्लोक चव्हाण (महाराष्ट्र). मुली - १. श्रीशा कारंजे (मध्य प्रदेश). ६ ते ८ वर्षे मुले - १. रायन डिसुझा (गोवा), २. अथर्व साळुंके (महाराष्ट्र), ३. वेदांत कुंभार (महाराष्ट्र). मुली - १. कृती कय्या (आंध्र प्रदेश), २. स्वस्ती शेट्टी (तमिळनाडू), ३. हनिफा मेहनज (कर्नाटक). ८ ते १० वर्षे मुले - १. तन्मय कोटाळे (महाराष्ट्र), २. सुरज फरीद्र (कर्नाटक), ३. वेदांत हेरवाडे (राजस्थान). मुली - १. तनिष्का मेमाने (गुजरात), २. जेसरल फर्नांडिस (गोवा).
१० ते १२ वर्षे मुले - १. साई आंबे (महाराष्ट्र), २. केन फर्नांडिस (गोवा), ३. श्रीयश आलेकर ((महाराष्ट्र). मुली - १. कुविरा अशोटीकर (गोवा), २. नव्या शेट्टी (आंध्र प्रदेश), ३. नायोमी वेलो (कर्नाटक). १२ ते १४ वर्षे मुले - १. शिवम संकलापुर (केरळ), २. सुरज जाधव (महाराष्ट्र), ३. जी. सोमसेटर (कर्नाटक).
फॅन्सी इनलाइन ः चार वर्षे मुली - १. वंशदा अय्या (आंध्र प्रदेश), २. मनस्विता के. (कर्नाटक). मुले - १. राजेश भावसार (महाराष्ट्र). ४ ते ६ वर्षे मुले - १. साई नटराजन ((महाराष्ट्र), २. चैतन्य राजपूत (महाराष्ट्र). मुली - १. अदिती जवळगीकर (महाराष्ट्र), २. राजलक्ष्मी (तमिळनाडू). ६ ते ८ वर्षे मुले - १. अद्वैत पिलखाने (महाराष्ट्र), २. समर्थ ठाकूर (महाराष्ट्र), ३. अवधूत बांगेकर (महाराष्ट्र). ८ ते १० वर्षे मुले - १. अभिनव वानखेडे (महाराष्ट्र), २. अंशुम जैस्वाल (महाराष्ट्र), ३. वरद मोरे (महाराष्ट्र). १० ते १२ वर्षे मुले - १. राजवर्धन राजपूत (महाराष्ट्र), २. अनिरुद्ध जंजाळ (महाराष्ट्र), ३. सार्थक भुते (महाराष्ट्र). मुली - १. वैदेही लव्हारे (महाराष्ट्र), २. सानिका भानगरे (मध्य प्रदेश), ३. वेदिका पवार (राजस्थान). १२ ते १४ वर्षे मुले - १. श्रेयस करंगळे (महाराष्ट्र), २. ओम जवळगीकर (महाराष्ट्र), ३. अथर्व देवकर (महाराष्ट्र).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा हजाराची लाच घेताना एजंट अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादीत शेळी मेंढी पालन संगोपन करण्यासाठी दाखल केलेला कर्ज प्रस्ताव कार्यालयातील अधिकारी यांना सांगून मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून दहा हजाराची लाच घेणाऱ्या एजंटाला अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी जळगाव टी पॉइंट येथे केली.
तक्रारदार याने एजंट सिद्धार्थ काशीनाथ नगराळे (वय २७ रा. गांधेली) याच्या मार्फत महामंडळाकडे कर्ज प्रस्ताव सादर केला होता. नगराळे याने तक्रारदाराला माझ्या ओळखीच्या अधिकारी कर्मचारी यांना पैसे द्यावे लागतील, त्या शिवाय तुमचे पाच लाखांचे कर्ज मंजूर करणार नाही, असे सांगत २५ हजारांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची सोमवारी पडताळणी केली तेव्हा नगराळे याने तडजोडीअंती दहा हजार मागितले. ही रक्कम घेऊन बुधवारी जळगाव ‌टी पॉइंट जवळील हॉटेल लेमन ट्रीजवळ बोलावले होते. येथे लाच घेताना नगराळेला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्री‌कांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक एस. आर. जिरगे, उपअधीक्षक किशोर चौधरी, भरत राठोड, सचिन गवळी व इतरांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्यांच घडवल्या वैजापुरात गणेशमूर्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
राजस्थानी मूर्तिकारांनी तयार केलेल्या श्रीगणेशाच्या सुबक मूर्ती शहरातील गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरत आहेत. स्टेशन रस्त्यावरील सेंट मोनिका शाळेच्या समोरील शेतात छोट्या जागेत गेल्या एक महिन्यापासून जवळपास २० मुर्तीकार मूर्ती तयार करत आहेत.
या मूर्तिकारांनी एका महिन्यात ५००पेक्षा जास्त मूर्ती तयार केल्या आहेत. यंदा जीएसटीमुळे मूर्तींच्या किमतीमध्ये वाढ झाली असून गेल्या वर्षी चाळीस रुपयांना मिळणारी गणेशमूर्ती यावर्षी ६५ रुपयांना मिळत आहे. या ठिकाणी १२० रुपयांपासून नऊ हजार रुपयांपर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सध्या काही मूर्तींवर अखेरचा हात मारण्याचे काम सुरू आहे. मोरावर, गायीवर व उंदरावर विराजमान झालेल्या गणेशमूर्तींसह सिंहासनावर आरुढ झालेल्या सहा ते सात फूट उंचीच्या गणेशमूर्ती पाहून गणेशभक्त हरखून जात आहेत. मूर्ती खरेदी करण्यासोबतच मूर्ती बघण्यासाठी गणेशभक्त गर्दी करत आहेत. शिर्डीसह अनेक ठिकाणांहून मूर्तीच्या ऑर्डर्स मिळत असल्याचे सांगण्यात आले. यंदा पहिल्यांदाच वैजापूर शहरात गणेशमूर्ती बनवण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखड्याचे प्रतिज्ञापत्र बदलणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विकास आराखड्याबद्दल तत्कालीन आयुक्तांनी सुप्रिम कोर्टात सादर केलेले प्रतिज्ञापत्र बदलण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत. हे प्रतिज्ञापत्र तत्कालीन आयुक्तांच्या भूमिकेशी विसंगत असेल, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन राजकीय दबावापुढे झुकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहराचा सुधारित विकास आराखडा दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. तो तयार करताना सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय झाला, बड्यांच्या जमिनी आरक्षणातून वगळल्या आणि अस्तित्वात असलेल्या वसाहतींवर आरक्षणे टाकल्याचा आरोप झाला होता. आराखड्यावर नागरिकांनी सूचना-हरकती घेतल्या. त्यामुळे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी आयुक्त म्हणून आपण या विकास आराखड्याशी सहमत नाही, असा स्पष्ट उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र सुप्रिम कोर्टात सादर केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयुक्तांनीच विकास आराखड्याशी सहमत नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यामुळे सुप्रिम कोर्टात विकास आराखड्याचा मुद्दा तग धरणार नाही, असे मानले जात होते. त्यामुळे विकास आराखड्यासाठी ज्यांनी ‘धावपळ’ केली ते अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले.

अधिकारी नियुक्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन आयुक्तांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या नेमके उलटे सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिका प्रशासन विकास आराखड्याच्या मसुद्याशी सहमत आहे, असे प्रतिज्ञापत्र येत्या काही दिवसात सादर केले जाण्याची शक्यता आहे. सुधारित प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी महापालिकेतील काही अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी विद्यार्थ्यांनी केली झेडपी शाळा डिजिटल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील भवन येथील जिल्हा परीषदेत शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्थांनी चार लाख रुपये जमा करून त्यातून शाळेला १५ टॅब, टच स्र्कीन प्रोजेक्टर, संगणक व होम थिएटर भेट दिले. माजी विद्यार्थ्यांनी ही शाळा डिजिटल केली असून या यंत्रणेचे उद्‍घाटन नुकतेच करण्यात आले.
भवन येथील जिल्हा परिषद शाळेत १९८६-८७ मध्ये पहिली ते चौथीपर्यत शिकलेले माजी विद्यार्थी सोशल मिडियाच्या माध्यमातून २७ वर्षानंतर एकत्र आले. हे विद्यार्थी सध्या वैद्यकीय, इंजिनीअरिंग, शिक्षक, उद्योग आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्या शाळेने आपल्याला शिकविले, मोठे केले, त्या शाळेचे उपकार फेडण्यासाठी त्यांनी चार लाख रुपये जमा केले. शाळा डिजिटल करण्याच्या या त्यांच्या प्रयत्नानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक उरफाटे, केंद्रप्रमुख फुसे, सरपंच सुरेखा कळम व ग्रामपंचायत सदस्याचे सहकार्य मिळाले. डिजिटल शाळेचे उद्‍घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत तीन संगणक व १५ टॅब देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्ष समीर सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद सुरडकर यांनी केले, तर देविदास बोर्डे यांनी आभार मानले.

चार लाखांची वर्गणी

अजय खाजेकर, सुनील साघरे, दशरथ तेलंग्रे, इकबाल शेख, शिवाजी तुपे, विलास सिरसाठ, संतोष कावळे, अंकुश देवरे, अंकुश बडक, गजानन काकडे, देविदास बोर्डे, स्वप्ना, मद्रीकर, अनिता गावंडे, रोहिणी जोशी, कल्पना साखरे, अर्चना कळम, कल्पना गोंगे, संगिता तुपे, गीता तांबट यांनी एकत्र येऊन वर्गणी जमा केली. त्यांनी १५ टॅब, टच स्र्कीन प्रोजेक्टर, संगणक व होम थिएटर भेट दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्डपार्टी इन्स्पेक्शनशिवाय कंत्राटदाराला पेमेंट नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेच्या कामाचे थर्डपार्टी इन्स्पेक्शन केल्याशिवाय कंत्राटदाराचे पेमेंट करू नका, असे आदेश महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी प्रशासनाला दिले. नागपूर येथील महालेखापरीक्षक कार्यालयाने या योजनेच्या कामाचे लेखापरीक्षण करून अनेक त्रुटी काढल्या. त्यांच्या पूर्ततेबद्दल महालेखापाल कार्यालयाकडून लेखी स्वरुपात अभिप्राय मागवा, अशी सूचना देखील त्यांनी केली.

भूमिगत गटार योजनेच्या कामाचे महालेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने देखील कामांची पाहणी करून अहवाल सादर केला. कामात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ‘मटा’ने ‘ऑडिट भूमिगतचे’ ही वृत्त मालिका प्रसिद्ध केली. त्या अनुशंगाने बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेचे राजू वैद्य यांनीही ‘भूमिगत’च्या कामाचे वाभाडे काढले. या कामाचे थर्डपार्टी इन्सपेक्शन झाल्याशिवाय कंत्राटदाराचे पेमेंट करू नका, अशी मागणी वैद्य व राजगौरव वानखेडे यांनी केली.

त्रुटींची पूर्तता केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याबद्दल महालेखापरीक्षकांकडून काहीच अभिप्राय आला नाही, हे गंभीर आहे. त्यामुळे महालेखापरीक्षकांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून अभिप्राय मागवून घ्या, अशी मागणी या नगरसेवकांनी केली. त्यानुसार सभापती गजानन बारवाल यांनी अभिप्राय मागविण्याचे आदेश दिले.

खोटेपणा झाला उघड
भूमिगत गटार योजनेचे काम उपअभियंता व वॉर्ड अभियंता यांच्या देखरेखीखाली झाले आहे, असे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी सांगितले, पण ‘भूमिगत गटार योजनेच्या कोणत्याही कामाबद्दल आम्हाला विचारण्यात आले नाही,’ असे वॉर्ड अभियंत्यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे अफसर सिद्दिकी यांचा खोटेपणा उघड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात आढळला प्राध्यापिकेचा मृतदेह

$
0
0

औरंगाबाद : ज्युबलीपार्क परिसरातील मॉडर्न डीएड कॉलेजच्या महिला प्राध्यापकाचा मृतदेह राहत्या घरी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आढळून आला. बंद असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये आकस्म‌िक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रा. लुभना मसरत शेख महंमद जुनेद (वय ४४) असे त्यांचे नाव आहे. त्या सिटीचौकातील अमोदी कॉम्प्लेक्समध्ये राहत होत्या. त्यांचे पती महंमद जुनेद बॉम्बे मर्कंटाइल बँकेच्या खुलताबाद येथील शाखेत कार्यरत आहेत. ते खुलताबादला राहतात. लुभना मसरत शेख यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. महंमद जुनेद बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास औरंगाबादेतील घरी आले. त्यांनी दरवाजा ठोठावला, पण दरवाजा कुणीच उघडला नाही. घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी सिटीचौक पोलिस स्टेशन गाठून पालिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक योगेश धोंडे काही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी फ्लॅटचा दरबाजा तोडला त्यावेळी लुभना यांचा मृतदेह तेथे आढळला. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. लुभना यांचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएड प्रवेशाचा गोंधळ संपेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बीएड, पदव्युत्तर (एमएड) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अद्याप कागदावरच आहे. विद्यापीठांच्या निकालामुळे लांबलेली ‘बीएड’ची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही, तर ‘एमएड’ प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीनंतर गुणवत्ता यादी रद्द करण्यात आली.

अध्यापक पदवी अभ्यासक्रमाची (बीएड) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक चार वेळा बदलण्यात आले. बीएडसाठी १३ व १४ मे रोजी सीईटी झाली. त्यानंतर अद्याप प्रवेशाची फेरीच सुरू झालेली नाही. १७ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती, परंतु तिची प्रतीक्षा संपलेली नाही. पदवी परीक्षांचे निकाल लांबल्याने नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. हे वेळापत्रकही पाळले गेले नाही. केंद्रीय प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशाच्या प्रक्रियेत १७ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. त्यानंतर दोन दिवस आक्षेपांसाठी होते. अंतिम गुणवत्ता यादी २३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार होती. बुधवारी यादी जाहीर झाली नाही. जागा वाटपाची यादी ३० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीचाच प्रश्न कायम असल्याने ही यादी जाहीर होणार का, हा प्रश्न कायम आहे.

वेळापत्रक पुढे जाणार
जागा वाटपाची यादी ३० ऑगस्ट रोजी जाहीर केल्यानंतर प्रवेशाची फेरी एक सप्टेंबरला सुरू होणार आहे, असे सांगण्यात आले. दुसरी फेरी ११ सप्टेंबरला सुरू होईल. २५ सप्टेंबरला तिसरी फेरी असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रकही पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रक्रिया आणि कॉलेज केव्हा सुरू होणार हा प्रश्न कायम आहे.

एमएडचा निकालच नाही
अध्यापक पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमएड) २८ मे रोजी सीईटी घेण्यात आली. त्याचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर निकालात अनेक उमेदवारांना शून्य गुण मिळाल्याचे दर्शविण्यात आले. निकालात त्रुटी झाल्याचे लक्षात आल्यानंतर निकाल ब्लॉक करून ठेवण्यात आला. अजून या प्रवेशाची प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे सत्र ही लांबणार आहे.

राज्यातील कॉलेज ः ५५०
प्रवेश क्षमता ः ४५५००
सीईटी दिलेले विद्यार्थी ः ४१२२८
मराठी माध्यम ः २९१७३
इंग्रजी माध्यम ः १२०५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकारी वापसीबद्दल सभापतिंचे तोंडावर बोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अधिकाऱ्यांच्या वापसीवर संतापलेल्या सभापती गजानन बारवाल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत शांततेचे धोरण स्वीकारले. त्यांनी बुधवारच्या बैठकीत हा विषय सुद्धा काढला नाही; त्यामुळे हे मतपरिवर्तन कसे झाले, असा प्रश्न विचारला जात होता.
आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी निंलबन रद्द करून शहर अभियंता सखाराम पानझडे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे व नगररचना विभागातील शाखा अभियंता आर. पी. वाघमारे यांना रुजू करून घेतले आहे. त्यांचे निलंबन रद्द होणार असल्याची कल्पना स्थायी समिती सभापतींना नव्हती, ते रुजू झाल्यानंतरच माहिती मिळाली. त्यामुळे संतापलेल्या सभापतींनी अधिकाऱ्यांच्या वापसीबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला जाब विचारू, असा इशारा दिला होता. त्यामुळे स्थायी समिती बैठकीत ते काय भूमिका घेतात याकडे पालिका वर्तुळात उत्सुकता होती. परंतु, सभापतींनी हा विषयच काढला नाही. सभापतींच्या शेजारच्या खुर्चीवर पानझडे व सभागृहात इतर अधिकाऱ्यांबरोबर डॉ. नाईकवाडे उपस्थित होते. सभागृहातील सदस्यांनीही याबद्दल प्रश्न विचारला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी स्थायी समितीत गैरव्यवहारावर चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
झेडपीच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत कन्नड तालुक्यात १४ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे नुकतेच उघडकीस आले. याप्रकरणी मृत कर्मचाऱ्यास दोषी धरण्यात आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, हे प्रकरण सखोल चौकशीसाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत बुधवारी मंजूर करण्यात आला.
या सभेला अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती विलास भुमरे, कुसुम लोहोकरे, मीना शेळके, सीईओ मधुकरराजे अर्दड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव, वासुदेव सोळंके यांच्यासह सदस्य उपस्थित होते. विषयपत्रिकेवर कुठलेच महत्वाचे विषय नसल्याने ऐनवेळचे विषय मांडले गेले. महिला व बालकल्याण विभागांतर्गत १४ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते, प्रशासनाने यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी याच विभागातील एक मृत कर्मचारी दोषी असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या चौकशी अहवालातून पुढे आले होते. या प्रकरणात आणखी सखोल चौकशी व्हायला हवी, यात अधिकारीही दोषी असू शकतात, या मुद्यावरून प्रा. रमेश बोरनारे, किशोर बलांडे, किशोर पवार, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती विलास भुमरे यांनी प्रशासनाला चांगलेच घेरले. १९ लाख रुपयांची देयके असताना ३३ लाखांची बिले अदा कशी काय केली गेली ? संबंधित प्रकरणात एकात्मिक बाल विकास अधिकारी यांनी, असे म्हटले आहे की, ३२ पैकी १० धनादेशांवर त्यांची स्वाक्षरी नाही, तर मग त्याची तपासणी कोणत्या माध्यमातून झाली ? एवढ्या मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असताना त्याबाबत मुख्यालय अनभिज्ञ कसे काय राहिले ? आदी प्रश्न उपस्थित केले.
गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर चौकशी समिती नेमली. अहवाल आल्यानंतर पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. २००५ पासूनचे ऑडिट पुन्हा करावे, अशी शिफारस करणारे पत्र नागपूर महालेखापरीक्षकांना पाठविले आहे. आपल्याला चेक तपासणीसाठी उपलब्ध झाले नाहीत. मात्र सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी सांगितले.

आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी

या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावी, असा ठराव किशोर बलांडे यांनी मांडला. त्यास रमेश गायकवाड यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, आजच्या सभेत झालेल्या चर्चेचे इतिवृत्तही पोलिसांना द्यावे, असे बलांडे यांनी सूचविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्टेशनचा पंप तीन दिवसात हटविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वेस्टेशन समोरील पेट्रोल पंप येत्या तीन दिवसात हटवा, असे आदेश महापालिका स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी प्रशासनाला दिले. या आदेशानुसार तीन दिवसात पेट्रोलपंप हटविण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
हा विषय सिद्धांत शिरसाट यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, यापूर्वी झालेल्या बैठकीत देखील मी हा विषय उपस्थित केला तेव्हा अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत कारवाईचे आश्वासन दिले होते. अद्याप पंप तेथेच आहे. पंप हटविण्याबद्दल वक्फ बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्र असताना अधिकारी चालढकलपणा का करतात, असा सवाल त्यांनी केला. सभापतींच्या आदेशानुसार खुलासा करताना उपायुक्त रवींद्र निकम म्हणाले की, पेट्रोल पंपासंबंधी कारवाईसाठी जिल्हाधिकारी, नगररचना विभाग व अग्निशामक विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यांची परवानगी घेऊन कारवाई केली जाईल. या उत्तराला शिरसाट यांनी आक्षेप घेत, वक्फ बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्र असताना पुन्हा इतर विभागाच्या परनावगीची गरज कशाला, असा प्रश्न विचारला. ‘वक्फ बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्र असून जागेचा मोबदला दिला आहे. त्यामुळे तीन दिवसात पेट्रोल पंप व त्याला लागून असलेली दुकाने काढा, ’ असे आदेश सभापतींनी निकम यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छताचे प्लास्टर पडून तीन विद्यार्थी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
औरंगाबाद तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छताचे प्लास्टर पडून तीन विद्यार्थी जखमी झाले. ही घटना बुधवारी घडली.
औरंगाबादपासून अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हर्सूल सावंगी जवळ नायगाव आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उर्दू माध्यमाच्या दुसरी इयत्तेच्या वर्गात छताचे प्लास्टर दुपारी साडेतीनच्या दरम्यान पडले. या घटनेत अबुनूर मुसा, रिझवान महोमद हुसेन, इसराईल शेख हे तीन विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांच्यावर गावातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. दरम्यान, ही माहिती समजल्यानंतर नागरिकांनी शाळेत गर्दी केली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शेख अमीद, फरीद कय्युम, जावेद गफार शेख, शेख मुस्तक आदींसह शालेय समितीच्या सदस्यांनी धाव घेतली. त्यांनी पालकांसोबत संवाद साधून वातावरण शांत केले. येथील शाळेत ६७६ विद्यार्थी असून १६ खोल्या आहेत.
जिल्हा परिषद शाळेच्या सहा वर्ग खोल्यांचे बांधकाम २००७मध्ये झाले. या कामात दर्जा राखण्यात आला नाही. परिणामी, फक्त दहा वर्षांत या खोल्या जीर्ण झाल्या आहेत, अशी तक्रार ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६२ महिलांचे पैठणी क्लस्टर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठणमधील पैठणी विणणाऱ्या ६२ महिलांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन केली आहे. यातून पैठणी क्लस्टरची उभारणी करणार आहे. उद्योग संचालनालय आणि रेशीम उद्योग संचालनालय यांचे या क्लस्टरला सहकार्य लाभले आहे. हा खासगी क्लस्टरचा प्रोजेक्ट सुमारे सुमारे पावणेपाच कोटींचा असून यात ६२ महिलांची फक्त २० टक्के गुंतवणूक असेल. सरकार ८० टक्के गुंतवणूक अनुदानतत्त्वावर करणार आहे हे विशेष. या क्लस्टरला शासनाची मंजुरी मिळाली असून लवकरच याचे काम सुरू होणार आहे.
याविषयी माहिती ‌देताना जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दिलीप गुरलवार यांनी सांगितले, महिलांचे स्वावलंबन, त्यानंतर त्यांना आम्ही नऊ एकर जागा घेण्यास सांगणे, त्या जागेवर एक कंपनी स्थापन करणे ही प्रक्रिया झाल्यावरच हे पैठणी साडी क्लस्टर अस्तित्वात येणार आहे. हा प्रोजेक्ट सुमारे पावणेपाच कोटींचा आहे. या महिलांना आधी प्रशिक्षित करण्यात आले. हे प्रशिक्षण त्यांच्या कलागुणांना पूरक आहे. यात नव्या पायाभूत सुविधा मिळवत प्रगती कशी करायची हे शिकविले आहे. त्यांना धारवाड, कर्नाटक, बंगळुरू, दिल्ली, सूरजखेड, मुंबई, ससमीरा येथे धागा निर्मिती, कापड तयार करणे, रंग काम, डिझायनिंगचे प्रशिक्षण दिले आहे. यातून त्या आता पैठणी हस्तकला विणकामात तरबेज झाल्या असून वर्षाला तीन लाखांचे उत्पन्न मिळवू लागल्या आहेत. स्वावलंबी बनण्यासाठी पैठणी विणकामात आणखी कौशल्य साध्य करण्याचा या महिलांनी संकल्प केला. त्यानुसार प्रथम एमएसएसआयडीसीअंतर्गत सहा महिने प्रशिक्षण घेतले. वर्षभरात लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळू लागले आहे.
हा व्यवसाय एकत्रितपणे केल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो हे पाहून त्यांनी कंपनी स्थापन करून पैठणजवळ नऊ एकर जागा खरेदी केली आहे. या जागेला एनएटीपी करून घेण्यात आले असून कंपनीच्या नावावर ही जागा आहे. या कंपनीच्या इतर महिला संचालकांशिवाय पदसिद्ध संचालकपदी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक असणार आहेत, अशी माहितीही गुरलवार यांनी दिली. क्लस्टर हा पर्यटनवाढीसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. त्यामध्ये माहिती केंद्र, प्रशिक्षण केंद्रापासून अॅम्फी थिएटर आणि अद्ययावत कॅन्टीनसारख्या सुविधांचा अंतर्भाव असणार आहे.
हातमागावर सूत विणण्यापासून अनेक प्रक्रियांनतर पैठणी तयार होते. तिच्या निर्मितीप्रक्रियेची माहिती देणारे तसेच प्रात्यक्षिक दाखविणारे कारागीर क्लस्टरमध्ये असणार आहेत. तेथे पैठणीचे प्रदर्शन आणि विक्री केली जाईल. या क्लस्टरमुळे या भागातील पैठणी विणकर महिलांचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग, तरुणास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीतील मुलीची छेड काढत विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी बुधवारी ठोठाविली.
पैठण येथील १५ वर्षीय मुलगी १० जून २०१४ रोजी सकाळी साडेअकराला कामानिमित्त जात असताना आरोपी रवींद्र विश्वनाथ पाटेकर (वय २४) याने तिला रस्त्यात अडवून अश्लील वर्तन केले. त्यानंतर पुन्हा गावातील सार्वजनिक कार्यक्रमात छेड काढत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तक्रारीनंतर बालानगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ३५४ (अ), (ड) व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ११ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी सहायक लोकअभियोक्ता अनिल हिवराळे यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर आरोपीला ‘पोक्सो’च्या कलम ११, १२ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपय दंड, तर कलम ३५४ (ड) अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारवासाची शिक्षा ठोठाविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेदिक औषधीत भेसळ, गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औषधीमध्ये भेसळ आढळल्याप्रकरणी गुलमंडी येथील श्रीकृष्ण आयुर्वेदिक भांडाराच्या मालकासह राजस्थान येथील उत्पादकांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
माधव जग्गनाथ निमसे (वय ३५ रा. पुंडलीकनगर रोड) यांनी तक्रार दाखल केली. श्रीकृष्ण आयुर्वेदिक भांडार या दुकानात छापा टाकून औषधांची तपासणी करण्यात आली. यावेळी रुमाबीन वटी समुद बीपीटी १०१५ या औषधामध्ये बिर्ला फार्मास्युटिकल कंपनीच्या उत्पादनात निमेसुलाईड व डायक्लोफेनॉक सोडियम ह्या अॅलोपॅथी द्रव्याची भेसळ केल्याचे आढळले. तसेच गुटिका ३ इन्सेशियल हर्ब्ज कंपनीचे यामध्ये अॅलोपॅथिक सिल्डेनाफिल सायट्रेट या घटक द्रव्याची भेसळ केल्याचे आढळून आले. या प्रकरणी निमसे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दुकानदार सारंग अविनाश जोशी (रा. सुपारी हनुमान रोड, गुलमंडी) उत्पादक प्रेमापालसिंग धुना, संतोषकुमार बिर्ला, नवीनचंद्र बिर्ला (तिघे रा. गंगानगर, राजस्थान) यांच्या विरुद्ध फसवणूक तसेच औषधी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक राठोड हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खोली नदीच्या पुरामुळे नुकसान; पंचनाम्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
अतिवृष्टीमुळे खोली नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी पैठण व पंथेवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील खोली नदीला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी शेतात घुसल्याने, शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसील प्रशासनाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी तालुक्यातील पंथेवाडी, पैठण, कातपूर व वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
निवेदनावर एकनाथ खिस्ती, सुषमा बजाज, संजीवनी कुलकर्णी, हरिनारायण बजाज, उलफत शेख, बादशाह शेख, किशोर रासने, कैलास पठाडे, ज्ञानेश्वर म्हस्के, सुनीता पोहेकर, राजू टेकाले, मंदाबाई शिंदे, चंद्रकला मालपानी, पुष्पबाई काबरा, छबू नाईक, संजू जायभाये, काडुबाळ वीर, दत्ता वाव्हले, बबन भेसळ आदी शेतकऱ्यांनी सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ धोकादायक गेटमधून वाहतूक नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मकईगेट, बारापुल्ला गेट, महेमूद दरवाजा या धोकादायक गेटमधून वाहतुकीस बंदी घाला, अशी मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेची हेरिटेज कमिटी शासनाला पाठवणार आहे. कमिटीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हेरिटेज कमिटीची बैठक आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत विविध आठ निर्णय घेण्यात आले. त्यात धोकादायक गेटमधून वाहतूक बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादचा युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यास प्रस्ताव पाठवण्यासाठी देखील मान्यता देण्यात आली. शहरातील ऐतिहासिक दरवाजे, इमारतींवरील झाडेझुडपे ३१ ऑगस्टपर्यंत काढण्यात यावेत, यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात यावी असेही बैठकीत ठरले. कटकट गेटच्या दोन्हीही बाजूने रस्ता करण्यासाठी मूळ इमारतीला धक्का न लावता काम करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. कटकटगेटचे सुशोभीकरण, डागडुजी लवकरात लवकर करण्याचे देखील ठरविण्यात आले.

मकईगेट येथील अतिक्रमण लवकर काढण्यात यावे, मकबरा व पानचक्कीचे सुशोभीकरण व विकास स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यासाठी संबंधित विभागाची संमती घेवून तसा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय हेरिटेज कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. सलीम अली सरोवराच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, ज्या लोकांकडे या जागेच्या मालकीची कागदपत्रे आहेत, त्या लोकांबद्दल सेटलमेंट कमिशनर यांच्याकडे तक्रार करा, असे अशी शिफारस बैठकीत करण्यात आली.

बैठकीला हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष जयंत देशपांडे, भारतीय पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी किशोर चलवादी, समिती सदस्य डॉ. दुलारी कुरैशी, प्रा. उमा पत्तेवार यांच्यासह पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, महापालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम, अय्युब खान, शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी आदी उपस्थित होते.

डॉ. दुलारी कुरैशी यांचा सत्कार
हेरिटेज कमिटीच्या सदस्य डॉ. दुलारी कुरैशी यांची विभागीय हेरिटेज कमिटीवर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा या बैठकीत सर्व सदस्यांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देऊन निरोप देखील देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची प्रक्रिया शासन निर्णय व पालिकेच्या कृती आराखड्यानुसार करावी असे निर्देश देत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. शंतनू केमकर व न्या. नितीन सांबरे यांनी आठ याचिका, तीन जनहित याचिका व चार दिवाणी अर्ज निकाली काढले.

रहदारीला अडथळा ठरणाऱ्या किंवा सरकारी जमिनीवर अडथळा निर्माण करणाऱ्या धार्मिक स्थळांसदर्भात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे. केवळ हिच याचिका प्रलंबित ठेवली आहे. नगरसेवक राजू वैद्य, माजी नगरसेवक समीर राजूरकर, कबीर अर्जुन यांच्या तीन जनहित जनहित याचिका, वक्फ बोर्ड, जय हनुमान सेवाभावी विश्वस्त, बालाजी संस्थान यांच्यासह आठ याचिका व चार दिवाणी अर्जावर बुधवारी सुनावणी झाली.

जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांच्या उपस्थितीत पालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळ समितीची बैठक २१ ऑगस्ट रोजी घेण्याचे आदेश दिले होते. पालिकेने गेल्या सुनावणीच्या वेळी धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा खंडपीठात सादर केला होता. २१ ऑगस्टच्या बैठकीत या आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कृती आराखडा व शासन निर्णय यानुसार धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई करावी व त्याचा अहवाल प्रत्येक शुक्रवारी खंडपीठात सादर करावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे, तर महापालिकेतर्फे संभाजी टोपे यांनी काम पाहिले. खंडपीठाने स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेवर १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

असा आहे कृती आराखडा
- ३० सप्टेंबरः प्राप्त झालेल्या हरकतींचा निपटारा करणे.
- १४ ऑक्टोबरः खासगी जागेवरील धार्मिक स्थळे वगळण्याची कार्यवाही.
- २१ ऑक्टोबरः धार्मिक स्थळांचे वर्गीकरण व ब वर्गातील स्थळे पाडण्यासाठी राज्य समितीची मान्यता.
- २४ ऑक्टोबरः सार्वजनिक व शासकीय जागेवरील धार्मिक स्थळांची अंतिम यादी.
- १७ नोव्हेंबर : ‘ब' वर्गवारीतील प्रकरणनिहाय सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात येणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन्यथा रस्ते यादीबद्दल वेगळा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्ते यादीचा फेरविचार करा, अन्यथा स्थायी समितीच्या पुढील बैठकीत वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देताना स्थायी समितीच्या सभापतींनी महापौरांवर शरसंधान साधले. विशेष म्हणजे महापौर व सभापती भाजपचेच प्रतिनिधी आहेत.

राज्य सरकराने शहरातील रस्त्यांसाठी ९९ कोटी ८४ लाखांना मंजुरी देताना या अनुदानातून कोणत्या रस्त्यांची कामे करायची याची यादीही दिली. त्यात ३१ रस्त्यांचा समावेश करण्यात आला. या रस्त्यांची यादी बुधवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

एमआयएमचे सय्यद मतीन यांनी यादीवर आक्षेप घेतला. ‘जुन्या शहरातील रस्ते यादीत नाहीत. त्यामुळे यादीचा फेर विचार करा. यादीत बदल होईपर्यंत ‘स्थायी’च्या बैठकीत रस्त्यांच्या कामांना मान्यता देऊ नका.’

शिवसेनेचे राजू वैद्य म्हणाले, ‘रस्ते यादीत औरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे याचाही विचार केला नाही. पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते वगळले. स्थायी समिती महत्वाची समिती असताना सभापतींना रस्त्यांच्या यादीची माहिती नसणे ही गंभीर बाब आहे. यादीमधील रस्त्यांची जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी संयुक्त पाहणी करावी व त्यानंतर यादी तयार करावी. कुणाच्या तरी प्लॉटिंगसाठी, कंपनीसाठी रस्ता तयार करणे योग्य नाही,’ असा टोला त्यांनी हाणला. सीताराम सुरे, कीर्ती शिंदे, संगीता वाघुळे, सिद्धांत सिरसाट यांनीही रस्त्यांच्या यादीबद्दल आपले मत व्यक्त केले. भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी ३१ रस्त्यांसाठी ३१ टेंडर काढण्याची सूचना केली.

रस्त्यांचे फेरसर्वेक्षण करून यादी तयार करा. त्याबद्दल आपण मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व महापौरांना पत्र देणार आहोत. यादीमध्ये बदल झाला नाही तर ‘स्थायी’च्या पुढील बैठकीत वेगळा निर्णय घ्यावा लागेल. - गजानन बारवाल, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नांदेड - मुंबई रेल्वेला बोर्डाचा खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड-मुंबई नवी रेल्वे सुरू करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने प्रस्ताव पाठवूनही रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ही गाडी सुरू होण्यास उशीर लागत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या पाहता दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदेड - मुंबई अशी नवी रेल्वे सुरू निर्णय घेतला. तसा प्रस्तावही पाठवली. खासदार अशोक चव्हाण आणि खासदार राजीव सातव यांच्याकडून ही रेल्वे सुरू व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांनीही रेल्वे बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र, अजूनही ही मागणी मंजूर करण्यात आली नाही.

‘राज्यराणी’ला डबे
नांदेड मुंबई रेल्वेला मनमाडपर्यंत आठ डबे असतील. त्यानंतर या गाडीचे डबे राज्यराणी एक्स्प्रेसला जोडून मनमाड ते मुंबई असा प्रवास होईल. नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी ही रेल्वे रात्री १० वाजता निघेल. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर ही रात्री दोनपर्यंत पोहोचेल. सकाळी दहा वाजता मुंबई सीएसटीएम स्टेशन गाठेल. मुंबईहून परतीचा प्रवास सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. रेल्वे रात्री दोनच्या दरम्यान औरंगाबादला पोहोचेल, तर सकाळी सात किंवा आठपर्यंत नांदेडला असेल.

नांदेड-मुंबई रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. आमची तयारी पूर्ण झाली आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळताच ही रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. - डॉ. ए. के. सिन्हा, विभागीय व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images