Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात असलेल्या मराठवाड्यात आता वरुणराजाने अतिवृष्टीची मालिका सुरू केली आहे. मंगळवारी (२९ ऑगस्ट) सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २१ मंडळांत अतिवृष्टी झाली.

यामध्ये जालना जिल्ह्यातील पाचनवडगाव (८५ मिलिमीटर), जालना ग्रामीण (९४ मिमी) सातोना (१३२ मिमी), श्रीष्टी (१५७ मिमी), मंठा (७० मिमी), ढोकसाल (७४ मिमी), तळणी (७० मिमी), अंबड (७०मिमी), सुखापुरी (७५ मिमी), घनसावंगी (८७ मिमी), राणी उंचेगाव (६५ मिमी), परभणी जिल्ह्यातील देवुळगाव (६५ मिमी), वालूर (७८ मिमी), हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ (६५ मिमी), लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद (७८ मिमी), उस्मानाबाद जिल्ह्यातील सावरगाव (६७ मिमी), नळदुर्ग (७० मिमी), मंगरुळ (९८ मिमी), उमरगा (७५ मिमी), डाळींब (८४ मिमी), जेवळी (८४ मिमी) या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

दीड महिना गायब असलेल्या पावसाने अवघ्या दोन आठवड्यांत मराठवाड्यात दमदार पुनरागमन केले असून बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळांना पावसाने झोडपले आहे. विभागात मंगळवारी सकाळपर्यंत पावसाने सर्व तालुक्यांमध्ये हजेरी लावली. मराठवाड्यात मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत एकूण २०.२७ मिलिमीटर पाऊस झाला असून, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ४.५२, जालना ३५.२५, परभणी २३.८२, हिंगोली २३.८०, नांदेड १३.११, बीड १९.३६, लातूर ११.१८, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३१.२४ मिलिमीटर पाऊस झाला.

लातूरमध्ये दमदार पाऊस

लातूर जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी दुपारनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. सांयकाळी ही पावसाची रिमझिम सुरुच होती. आकाश ढगांनी भरून आलेले असल्यामुळे मंगळवारच्या रात्रीही पाऊस मुक्कामी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चाकूर, उदगीर, देवणी, निलंगा, औसा, रेणापूर या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरवात झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पाउस झाला. देवणी येथे यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाउस पडत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. रेणापूरातही जोरदार पाउस पडत असल्यामुळे शेतातूनही पाणी वाहत असल्याची माहिती राजू धर्माधिकारी यांनी दिली. लातुरात दुपारी एक वाजेपर्यंत निरभ्र वातावरण होते. दुपारनंतर आकाशात पावसाळी ढग जमा होण्यास सुरुवात झाली आणि सरीवर सरी बरसू लागल्या. बुधवारी महालक्ष्मीच्या भोजन पुजेसाठी भाज्या खरेदी करण्याकरीता, तसेच केळीचे पाने, फुलांच्या खरेदीसाठी गंजगोलाई, दयानंद गेट परिसरात महिलांनी गर्दी केली होती. मात्र, पावसाळी या ठिकाणी भाजी विक्रेत्यांसह खरेदीदारांची मोठी तारांबळ उडाली.

लातुरात मंगळवारी सकाळी आठपर्यंत वार्षिक सरासरीच्या ६३ टक्के पाऊस झाला आहे. मंगळवारच्या पावसामुळे सरासरीत वाढ होणार असून परतीचा पाउस असाच झाला तर वार्षीक सरासरी ही गाठण्यास मदतच होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ६५ टक्के पाऊस

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असून आतापर्यंत सरासरीच्या ६५ टक्के इतका पाऊस झाला आहे. मात्र, हा पाऊस जिल्ह्यातील जलसाठा वाढण्यासाठी अपुराच आहे. जिल्ह्यातील जलसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची निंरंत गरज आहे.

गेल्या ४८ तासांत झालेल्या रिमझिम पावसाने जिल्ह्यातील नद्या-नाले ओसंडून वाहत असून या पावसामुळे खरिपाच्या तूर, कापूस, ऊस व फळबागा यांना फायदा होणार आहे. शिवाय या पावसाचा फायदा रब्बी पिकांना होईल. जुलैअखेरीस उस्मानाबाद जिल्ह्यातील २१९ प्रकल्पांत उपयुक्त जलसाठा १६ टक्के इतका होता तो या पावसाने वाढून २१ टक्क्यापर्यंत पाहोचला आहे . जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पात सध्या २ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा असून अन्य १७ मध्यम प्रकल्पात २८ टक्के, तर २०१ लघुप्रकल्पांत २१ टक्के इतका जलसाठा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ६१४ मिमी इतका पाऊस उस्मानाबाद तालुक्यात झाला असून तो वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के इतका आहे.


नांदेड शहरात रिपरिप

जिल्ह्यात मंगळवार २९ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी १३.११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात एकूण २०९.८३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५०१.१९ मिमी. पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीनुसार आतापर्यंत ५२.४५ टक्के इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ पर्यंत नांदेडमध्ये १२.२५ मिमी., मुदखेडमध्ये २०.३३ मिमी.इतका पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ समाजकल्याणचे ३७ कोटी पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये विविध कामे करण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे ३७ कोटींचा निधी असतानाही वर्षभरापासून अधिकाऱ्यांकडून कुठलीच सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. परिणामी फाइल एकाच जागी थांबली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांमुळेच हे घडल्याचा आरोप केला आहे.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण भागांमधील दलित वस्त्यांमध्ये सिमेंट रस्ते, पाण्याची टाकी, समाजमंदिर आदी विविध कामे करण्यात येतात. समाजकल्याण विभागाला २०१६-१७ मध्ये आलेल्या २० कोटींमधून नऊ कोटी ४२ लाख रुपयांचे नियोजन करणे अद्याप बाकी आहे. १७-१८ साठी २७ कोटी रुपये आलेले आहेत. १० जुलै २०१७ रोजी २३७ कामांना समाजकल्याण विषय समितीने मंजुरी दिली. त्यास पुढची मंजुरी अद्याप मिळावयाची आहे. तीन ऑगस्ट रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांच्याकडे संचिका आली. त्यांनी टिप्पणीमध्ये स्वाक्षरी केली, परंतु प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेशावर स्वाक्षरी न करता ही संचिका विभागाला परत करण्यात आली. पाच डिसेंबर २०११ च्या अध्यादेशानुसार कामांना मंजुरीचे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे याबाबत सदस्यांनाच संभ्रम आहे. मागच्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठक झाली. तीत दलित वस्ती सुधार योजनेचा विषय निघाला. सदस्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.

पदाधिकारी आक्रमक
अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी तात्काळ संचिका निकाली काढण्याचे आदेश दिले होते. तेव्हा दोन दिवसांत काम मार्गी लागेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मुधकरराजे अर्दड यांनी सांगितले. त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही, असे अॅड. डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती धनराज बेडवाल, सदस्य किशोर बलांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. समाजकल्याण विभागामार्फत दरवर्षी येणाऱ्या निधीमधून दलित वस्ती सुधार योजनेची कामे केली जातात. पंचायत समितीकडून येणारे प्रस्ताव मंजूर केले जातात. परंतु आता मंजूर झालेल्या प्रस्तावांबाबत अभ्यास करायचा असल्याचे उत्तर दिले जात आहे. याबद्दल किशोर बलांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कामे दोन दिवसांत मार्गी लागणार ?
समाजकल्याणचा निधी पडून असल्याप्रकरणी सदस्यांनी प्रशासनावर आरोप केला होता. यासंदर्भात सदस्यांनी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांची भेट घेतली. अर्दड यांनी दोन दिवसांत कामे मार्गी लागतील, असे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सदस्यांनी तूर्तास न्यायालयात जाण्याचे टाळले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या कोट्यवधींच्या निविदा रद्द

$
0
0

औरंगाबादः केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायदा जुलै महिन्यात लागू केला. महाराष्ट्रात जीएसटीनंतर सरकारी कार्यालयांतील कामे, निविदा प्रक्रिया राबविण्यास अडचणी आल्या होत्या. राज्याच्या वित्त विभागाने १९ ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून जुलै महिन्यात तसेच त्यापूर्वी मंजूर झालेल्या पण कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) न दिलेल्या सर्व कामांच्या निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या कामांसाठी स्वतंत्र अल्प मुदत निविदा (शॉर्ट टेंडर नोटीस) काढावी आणि प्रक्रिया राबवावी असे नमूद केले आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कोट्यवधींच्या कामांना फटका बसणार असून कोल्हापुरी गेट खरेदीपासून, विविध विषय समित्यांच्या कामांच्या फेरनिविदा कराव्या लागणार आहेत.
जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारने १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा परिषदेने नवीन कामांच्या निविदा व अन्य प्रक्रिया राबवू नये, असे कळविण्यात आले होते. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर त्याचा अतिरिक्त बोजा संबंधित कामाच्या किमतीवर कसा लावायचा ? त्याची नोंद कोणत्या आधारे घ्यावयाची ? यासंदर्भात राज्य पातळीवर एकत्रित मार्गदर्शन करण्यात येणार होते. दरम्यान १९ ऑगस्ट रोजी राज्याच्या वित्त विभागाने जीआरद्वारे कळविले आहे की १ जुलैनंतर किंवा त्या आधी मंजूर झालेले पण कार्यारंभ आदेश न दिलेल्या सर्व कामांच्या निविदा रद्द करण्यात याव्यात, यासाठी अल्प मुदतीची निविदा काढून फेरनिविदा कराव्यात आणि प्रक्रिया पूर्ण करावी.
या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील अनेक कामांना फटका बसणार आहे. उपकरातून सिंचन विभागांतर्गत १५५ कोल्हापुरी बंधाऱ्यांना ३००० गेट बसविण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. अडीच कोटींमधून हे गेट खरेदी करण्यात येणार होते. मात्र हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत प्रलंबित राहिला. दरम्यान १९ तारखेच्या जीआरनंतर ही निविदा रद्द होणार आहे. समाजकल्याण विभागांतर्गत दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ७ कोटींच्या २३७ कामांचा प्रस्ताव सादर केला गेला. त्याची प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे. आता या प्रस्तावांना फेरसादर करावे लागणार आहे. कारण जीएसटीनंतर या सर्व कामांसाठीचे अंदाजपत्रक बदलून द्यावे लागणार आहे. अशीच अडचण अन्य विभागांनाही भासणार आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या विकासकामांवर परिणाम होणार आहे.

परिणाम होणारी कामे
- सिंचन, कोल्हापुरी गेट खरेदीः अडीच कोटी
- समाजकल्याण, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विविध २३७ योजनाः सात कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम डावलून शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत औरंगाबाद व खुलताबाद तालुक्यातील काही शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. ही प्रतिनियुक्ती कायम की तात्पुरती ? यासंदर्भात शिक्षण विभागाकडे माहिती उपलब्ध नाही. राजकीय शिफारसीमुळे झालेल्या प्रतिनियुक्त्यांमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे वर्षभर विविध प्रक्रिया राबविल्या जातात. ग्रामविकास खात्यातर्फे यंदा आंतर जिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन राबविली गेली. त्यानंतर जिल्हांतर्गत बदली प्रक्रियाही ऑनलाइनच राबविण्यात आली. समायोजनासाठी स्थानिक प्रशासनाच्या अभ्यासानंतर प्रक्रिया राबविणे आवश्यक असते. प्रतिनियुक्त्यांबाबत ठराविक कालावधीपर्यंत अर्ज स्वीकारले जातात. हे अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवून त्यांच्या मार्गदर्शनानंतर पात्र शिक्षकांना त्याचा लाभ मिळतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी खुलताबाद आणि औरंगाबाद तालुक्यातील काही शिक्षकांच्या सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्त्या करून देण्यात आल्या. ही प्रक्रिया जिल्हा पातळीवर बंद असताना या प्रतिनियुक्त्या कशा झाल्या ? हा प्रश्न शिक्षकांना सतावत आहेत. या प्रतिनियुक्त्यांसाठी राजकीय शिफारशी होत्या. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे शिक्षण विभागाला या शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या कराव्या लागल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रशासनाचे कानावर हात
नियम डावलून होत असलेल्या कामाबद्दल शिक्षकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांच्याकडेच विचारणा केली असता ते म्हणाले, ‘असा प्रकार कुठेच घडला नाही. एखाद्या दोन शिक्षकी शाळेतील दोन्ही शिक्षक काही कारणास्तव दीर्घ रजेवर असतील तर तिथे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी काही ठिकाणी ही सोय केली असेल. माहिती घेऊनच त्यावर प्रतिक्रिया देता येईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ उत्कृष्ट शिक्षकाची निवड प्रशासनाने करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य सरकारकडून पाच सप्टेंबर रोजी उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले जातात. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया राबविली जाते. हा पुरस्कार मिळावा, यासाठी शिक्षकांना प्रशासनाकडे अर्ज केला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचे कार्य प्रशासनाला माहित असते. असे असताना शिक्षकांकडून का अर्ज मागविले जातात ? हा प्रश्न आहे. गुरूंच्या कार्याची दखल घेऊन प्रशासकीय पातळीवरच जर पुरस्कार निवड झाली तर यामागचे सगळे राजकारण बंद होण्यास मदत मिळणार आहे.

जिल्हा परिषदेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यातून एक शिक्षक उत्कृष्ट पुरस्कारासाठी निवडला जातो. त्यासाठी शिक्षकाला फाइल सादर करावी लागते. त्यात आजवर केलेले काम, त्यासंदर्भात घेतली गेलेली दखल, विविध संस्था, संघटनांकडून मिळालेले पुरस्कार याचा समावेश असतो. तालुकापातळीवर पाठविलेले प्रस्ताव जिल्ह्याला येतात. तिथे अर्जाची छाननी होते. तालुकानिहाय प्रत्येकी एक शिक्षकाचे नाव निवडून तो प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. अर्ज करतानाच मोठी चाळणी लावली जाते. बहुतांश अर्जांचा राजकीयदृष्ट्या विचार केला जातो. आगामी वाटचाली डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांना प्राधान्य दिले जात असल्याने खऱ्याखुऱ्या आदर्श शिक्षकांवर अन्याय होतो. या पद्धतीऐवजी प्रशासनाने त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे जर शिक्षकांची निवड केली तर ती अधिक पारदर्शक ठरेल, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.

शिक्षकांच्या कार्याचा गौरव करायचाच असेल, तर संबंधित शिक्षक बांधवाकडूनच त्यांच्या कार्याचा प्रस्ताव सादर करून घेण्यापेक्षा यासाठी शिक्षण विभागातील यंत्रणेचा वापर करावा. शिक्षकाने आतापर्यंत राबवलेल्या शालेय-सहशालेय उपक्रम,यशस्वी प्रयोग,गुणवत्ता या बाबीचा यात प्रामुख्याने अंतर्भाव असावा. शिक्षक वेतनवाढी मिळवण्यासाठीच प्रस्ताव दाखल करतात, ही धारणा चुकीची आहे.
- राजेश हिवाळे, जिल्हा परिषद शिक्षक

आपल्या गुणवत्तेचे, जीव तोडून केलेल्या शैक्षणिक सामाजिक कार्याचे मूल्यांकन व्हावे, त्याचे कौतुक व्हावे ही कोणत्याही शिक्षकाची अपेक्षा असते. पुरस्कारांच्या माध्यमातून काही प्रमाणात पूर्ण होत असते. वर्षातून एक दिवस पुरस्कार देण्यापेक्षा गुरुजनांच्या कार्याची वेळोवेळी दखल घेऊन त्यांचे चांगले कार्य समाजासमोर आणल्यास शिक्षकांसाठी तो खरा गौरव ठरेल.
- रोहिणी विद्यासागर, जिल्हा परिषद शिक्षक

पुरस्कार मिळणे आणि प्राप्त करून घेणे वेगळे आहे. प्रशासनाने शिक्षकाची दखल घेऊन स्वतःच पुरस्कारासाठी निवड करणे आवश्यक आहे. त्यातून शिक्षक निवडीचे राजकारण बंद होईल आणि खऱ्या शिक्षकांना न्याय मिळेल. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार ठरलेल्या दिवशीच दिले गेले पाहिजेत. राजकीय मंडळींच्या तारखांनुसार पुरस्कार देणे योग्य नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरते.
- दिलीप ढाकणे, जिल्हा परिषद शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी

$
0
0

पेन्शनमध्ये वाढ करण्याची
पेन्शनर्स संघटनेची मागणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी महामंडळ, विद्युत महामंडळ, साखर कारखाने, सहकार बँक तसेच खासगी कारखाने आदी, विविध संस्था, कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या पेन्शनमध्ये दरमहा ४ हजार ५०० रुपये हंगामी वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईपीएस - ९५ निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीचे सरचिटणीस अॅड. सुभाष देवकर यांनी केली आहे.
देशात सेवानिवृत्त झालेल्या ५४ लाख ५५ हजार पेन्शनधारकांच्या पगारातून पीएफ कपात करण्यात आली आहे. त्यापोटी सरकारकडे सुमारे ३ लाख ४५ हजार कोटी रुपये जमा आहेत. त्या रक्कमेवर दरवर्षी मिळणाऱ्या १७ कोटी रुपयांच्या व्याजातून ही अंतरिम हंगामी वाढ देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी खडकेश्वर येथे पेन्शनधारकांच्या आयोजित बैठकीत केली. हंगामी वाढ देताना सरकारला कोणत्याही प्रकराची वेगळी आर्थिक तरतूद करण्याची गरज पडणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. समितीचे अध्यक्ष पी. बी. देशमुख, अॅड. अब्दुल कय्युम शेख, रामराव बोर्डे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, जी.व्ही. गाडेकर, डॉ. कृष्णकुमार कवठेकर, सांडू मन्सुरी, माधुरी जोशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडाईचा पदग्रहण सोहळा दोन सप्टेंबरला

$
0
0

क्रेडाईचा पदग्रहण सोहळा दोन सप्टेंबरला
अध्यक्षपदी रवी वट्टमवार स‌‌चिवपदी अाशुतोष नावंदर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नियोजित अध्यक्ष रवी वटटमवार यांनी गुरुवारी (३१ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली.
वट्टमवार म्हणाले, नूतन कार्यकारिणी २०१७-२०१९ पर्यंत असेल. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथील सीता हॉलमध्ये संध्यकाळी ७ वाजता हा पदग्रहण सोहळा होईल. अध्यक्षपदी रवी वटटमवार, सचिवपदी आशुतोष नावंदर, कोषाध्यक्षपदी सुनील बेदमुथा यांची निवड झाली आहे. या नियोजित पदग्रहण सोहळ्यास रोजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, नगरविकास मंत्री रणजीत पाटील, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडमोडे, आमदार सर्वश्री अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, आदींची उपस्थिती असेल. क्रेडाईचे राज्य अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, राजेंद्रसिंग जबिंदा, अर्चित भारूका आदींही यावेळी उपस्थिती राहील, असे वट्टमवार म्हणाले.
नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी - नरेंद्रसिंग जबिंदा, नि‌तीन बगाडिया, विकास चौधरी, भास्कर चौधरी, संग्राम पटारे, आशुतोष नावंदर, सुनील बेदमुथा, रामेश्वर भारूका, संभाजी अतकरे, अनिल अग्रहारकर, नीलेश अग्रवाल, अखिल खन्ना, विजय सक्करवार, गोपेश यादव, पंजाबराव तौर, रोहित सूर्यवंशी, प्रशांत अमिलकंठवार, संदेश झांबड, बालाजी येरावार यांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला नूतन कार्यकारिणीसह ज्येष्ठ सदस्य उप‌स्थित होते.

क्रेडाईचे अधिकृत १८६ सदस्य
शहरात अनेक बिल्डर तयार होऊ लागले आहेत. अनेक बेकायदेशीर बांधकामे होत आहेत, याला बळी पडू नका, स्वत:ची फसवणूक करून घेऊ नका, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले. क्रेडाई संघटनेत शहरात १८६ सदस्य असून त्यांच्याकडूनच नागरिकांनी गृह खरेदी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. लवकरच क्रेडाईकडून एक्स्पोचे आयोजनही करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळाचे निर्णय ‘प्रगतीपथा’वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे, मात्र गेल्यावर्षी बैठकीत घेतलेले निम्म्यापेक्षा अधिक निर्णयांची अंमलबजावणी अद्याप अपूर्ण आहे. गेल्या बैठकीमध्ये विविध विभागांशी संबंधित ३२ निर्णय घेण्यात आले, मात्र त्यापैकी केवळ १२ निर्णयांचीच अंमलबजावणी झाली असून, तब्बल २० निर्णय ‘प्रगतीपथा’वर आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय बैठकांसाठी सभागृह बांधण्यासाठी १६ कोटी ७२ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. काही दिवसांतच इमारतीचा नकाशा तयार करण्यात आला, मात्र या कामाचा अर्थसंल्पात समावेश न झाल्याने आर्थिक तरतूद रखडली आहे. लेबर कॉलनी येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करण्यासाठी ४० कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली. या कामाचा २०१७च्या अर्थसंकल्पातही समावेश आहे, मात्र ही जागाच ताब्यात नसल्यामुळे अंमलबजावणीची गाडी अडकली आहे. जालना येथे ‘सीड पार्क’ उभारण्यासाठी निर्णय जाहीर करण्यात आला होता. जालना जिल्ह्यातील पाणशेंद्रा येथे ३० हेक्टर जागा निश्चितही करण्यात आली. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ११ एप्रिल २०१७ रोजी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र अद्याप एमआयडीसीकडून जागा ताब्यात घेण्यात आली नाही. जालना येथे रेशीम कोषाची बाजारपेठ उभारण्याबाबत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, इमारत बांधकामाची परवानगीचे काम रखडले आहे. पदविका अभ्यासक्रमांचे श्रेणीवर्धन, प्राणीसंग्रहालयासाठी मिटमिटा येथे जमीन देणे, कॅन्सर रुग्‍णालयाला स्टेट कॅन्सर इनस्टिट्यूटचा दर्जा देणे; तसेच सेवा नियमित करणे आदी निर्णयांवर अंमलबजावणी झाली आहे.

जलसंधारण आयुक्तालय नावालाच
औरंगाबाद शहरात जलसंधारण आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय झाला. आयुक्तालय सुरूही झाले, मात्र केवळ नावालाच. येथे अद्यापही आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली नाही. कृषी आणि जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे समायोजनाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे आयुक्तालयाचा तूर्त उपयोग नाही.

१६ आणि १७ सप्टेबरला मंत्रिमंडळ बैठक
तब्बल आठ वर्षांच्या खंडानंतर औरंगाबादला गेल्यावर्षी मंत्रिमंडळ झाली. यावर्षी सप्टेबर महिन्यात १६ आणि १७ सप्टेबरला औरंगाबाद शहरात बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आणि मंत्रिमंडळाच्या संभाव्य बैठकीच्या तयारीसाठी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेशोत्सवः नवप्रणाली क्रीडा मंडळाचे पावली पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‌आकर्षक वेशभुषा, थिरकण्यास भाग पाडणारा ढोल-ताशांचा ताल अणि सर्वच कौटुंबीक सदस्य असलेले महिला तरुणींचे पावली पथक, हे अजबनगर येथील नवप्रणाली गणेश क्रीडा मंडळाचे आकर्षण आहे.
अजबनगर येथे ३० वर्षांपूर्वी नवप्रणाली गणेश क्रीडा मंडळाची स्थानिक नागरिक लक्ष्मीकांत रापतवार, प्रभू रापतवार, सुनील जाधव, शत्रुघ्न आरगडे, महेश पाटील, बाळू कोठारी, अरूण देशपांडे, अतुल मिरजगावकर आदींनी स्थापना केली. या मंडळाने १५ वर्षांपासून ढोल व पावली पथकाची परंपरा सुरू केली आहे. संयोजक अक्षय रापतवार यांनी स्थापन केलेल्या ढोल पथकात ४५ जण आहेत. शिवाय शंभरावर महिला, पुरूष, तरुण-तरुणी, मुले-मुली या पावली पथकात आवर्जून सहभागी होतात. या पथकाचा सराव गणेशोत्सवाच्या एका महिन्यापूर्वीपासून पथकाचा सराव सुरू होतो. शहरातील इतर मंडळ फायबरचे ढोल वापरतात, मात्र नवप्रणाली मंडळाकडे चामड्याचे ढोल आहेत. या ढोलचे वजन फायबर ढोलच्या तुलतेत जास्त व किंमतीही जास्त असते.
विसर्जन मिरवणुकीदिवशी मंडळातील सर्वजण कुर्ता पायजमा व फेटा असा पारंपारिक पेहराव करतात. त्यामुळे हे मंडळ मिरवणुकीत आकर्षण ठरते. प्रशिक्षक अक्षय पाताळयंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ रापतवार, शुभम जाधव, अभिषेक कुलकर्णी, अक्षत चव्हाण, सौरभ देव, उद्यन जाधव, राहुल जाधव आदी दररोज रात्री सराव करून घेतात.

एक महिन्यापासून रोज तीन तास सराव सुरू आहे. यामध्ये गजानना गजानना, गणपती आरती, सलामी, माऊली माऊली, राम लखन, जय मल्हार, ‌शिवछत्रपती, पावली आदी चाली बसवल्या आहेत. फायबरच्या ढोलपेक्षा चामड्याच्या ढोलवर सराव करणे जास्त अवघड जाते.
-अक्षय पाताळयंत्री, प्रशिक्षक

आमच्या पावली पथकात मंडळातील सदस्यांचे कुटुंब सहभागी होतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांचा सहभागी असतो. गर्दीमध्ये पावली पथकातील सर्वांच्या सुरक्षेची आवर्जून काळजी घेतली जाते.
-अक्षय रापतवार, संस्थापक अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमची संस्कृती’चे लक्षवेधी ढोल पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ढोल पथक ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी प्रतापनगर-देवानगरीतील ‘आमची संस्कृती वाद्यपथक’ प्रयत्न करत आहे. या पथकात परिसरातील नव्हे, तर शहरातील अनेक भागातील तरूण- तरुणींसह वयोवृद्धांचाही समावेश आहे.
गणेशोत्सवात ढोल-ताशा पथक नेहमीच लक्ष वेधून घेते. त्यात वेगळेपण जपण्याचा ‘आमची संस्कृती वाद्यपथक’ प्रयत्न करत आहे. प्रतापनगर-देवानगरी येथील रहिवासी संग्राम पवार, संदीप कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन दोन वर्षांपूर्वी या पथकाची स्थापना केली. परिसरातील असलेल्या तरुणांना एकत्र करत निधी संकलन, दात्यांची मदत, यातून ढोल-ताशे खरेदी केले. प्रतापनगर येथील मैदानावर रोज सायंकाळी मोठ्या उत्साहात सराव सुरू केला. परंतु, मंडळातील सदस्य ढोल-ताशा वाजविण्यात प्रवीण नसल्याने दुसऱ्या मंडळातील सदस्यास आणून प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी प्रत्येकाला शिस्त, वादनातील प्रकार, ताल याचे प्रशिक्षण दिले आणि काही दिवसातच ‘आमची संस्कृती’चे सदस्य ढोल-ताशा वाजविण्यात तरबेज झाले आहेत.
अतिशय लयबद्ध, विविध चालींवर वादन करणारे पथक म्हणून या पथकाची ओळख आहे. पथकातील सर्व सदस्य नवखे असल्याने गणेशोत्सवाच्या दोन ते तीन महिना आधीपासून तालीम करतात. मंडळात ३५ तरूण व १० तरुणीचा समावेश आहे. या शिवाय काही सदस्य टीव्ही सेंटर, विष्णुनगरातूनही येतात.

आमचे पथक दोन वर्षांपूर्वी स्थापन झाले. ४५हून अधिक सदस्य कार्यरत आहेत. आपल्या वैभवशाली परंपरेचे जतन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- संग्राम पवार, सदस्य

ढोल पथकाच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणण्याचे काम होत आहे. एक उत्साही वातावरण यामुळे तयार होते. या मंडळाच्या माध्यमातूनच आम्ही वर्षाभर विविध सामाजिक उपक्रमही राबवितो.
- संदीप कुलकर्णी, सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा ‘स्पोर्टी बाल गणेशा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडकोमधील कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे यंदा ‘स्पोर्टी बाल गणेशा’चा देखावा तयार करण्यात आला. आहे. हे प्रतिष्ठान दरवर्षी वेगळी संकल्पना सादर करते.
पर्यावरणपूरक टाकाऊ वस्तुंपासून देखाव्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. देखाव्यात मुख्य गणेश ४० फूट उंच डोंगराववर ट्रेकिंग करताना दिसत आहे. १५ बाल गणेश क्रिकेट, तिरंदाजी, बास्केटबॉल, हॉकी, टेबल टेनिस, बॉक्सिंग, बॅडमिंटन, सायकलिंग, गोळाफेक आदी मैदानी खेळ खेळताना दिसत आहेत. लहान मुले घोडा, पाळणा, झोका आदी खेळ बालगणेशासोबत खेळत आहेत. सर्व बालगणेशांची आणि स्पोर्टी गणेशांची निर्मिती जुने बेडशीट, टेलरकडील चिंध्या, लाकुड, आदींपासून केली आहे. पूजेसाठीची मूर्ती मातीची आहे. ‘सर्व मुलांनी मोबाइल, व्हिडिओ गेमच्या आहारी न जाता मैदानी खेळ खेळावे’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी दिली.
या उपक्रमासाठी अलका कोरडे, वैभव कोरडे, रवींद्र पाठक, अतुल सावजी, संजय राठोड, आतिक पठाण, प्रल्हाद गायकवाड, संतोष गायकवाड, सय्यद मजहर, राजू दौड, साजेद जहागीरदार, शेख मुस्ताक, अनिल गावंडे, नौशाद भाई, संदीप इधाटे आदींनी मेहनत घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी ७५ टक्क्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
गेल्या ११ दिवसांपासून जायकवाडी धरणात २० ते ३० हजार क्युसेकदरम्यान पाण्याची आवक सुरू असल्याने नाथसागरातील पाणीसाठा ७५.७६ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. धरण भरण्यासाठी आणखी पाच फूट पाणीपातळी वाढण्याची गरज असल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

नाशिक, नगर जिल्ह्यांत व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे २० ऑगस्टपासून नाथसागरात सरासरी २० ते ३० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणात २० ते २२ ऑगस्टदरम्यान सर्वाधिक ६० हजार क्युसेक पाण्याची आवक वाढली होती. धरणाच्या पाणीपातळीमध्ये ११ दिवसांत जवळपास साडेपाच फूट वाढ झाली. धरणाच्या साठ्यात ५२०.६७ दशलक्ष घनमीटरने म्हणजेच जवळपास १८.५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची भर पडली, असेही शाखा अभियंता चव्हाण यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५२२ फूट असून, सध्या पाणीपातळी १५१७.१५ फूट आहे. धरण काठोकाठ भरायला अाणखी पाच फूट पातळी वाढण्याची गरज आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा गुरुवारी रात्री आठपर्यंत ७५.७६ टक्क्यांपर्यंत पोचला.

दृष्टिक्षेपात पाणीसाठा
एकूण साठा : २३७३.४१७ दलघमी
उपयुक्त साठा : १६४४.८०२ दलघमी
टक्केवारी : ७५.७६
आवक : ४६,५४८ क्युसेक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बायांनो नवरे सांभाळा’ने पोट धरून हसवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी गणेश महासंघाच्या वतीने आयोजित छावणी महोत्सवात बुधवारी लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका असणाऱ्या 'बायांनो नवरे सांभाळा' या नाटकाचा प्रयोग रंगला. प्रदीप पटवर्धन यांची मुख्य भूमिका असलेल्या नाटकातील कलाकारांनी उपस्थितांना खदखदून हसविले.
श्री गणेश महासंघ छावणीच्या वतीने आयोजित छावणी महोत्सव २०१७ मध्ये बुधवारी सायंकाळी 'बायांनो नवरे सांभाळा' नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष रखमाजी जाधव, उपाध्यक्ष अॅड. ओमप्रकाश साबू, कार्याध्यक्ष अॅड. सुरेश वर्मा, कोषाध्यक्ष विजयन स्वामी, सचिव मनोज बडजाते, मार्गदर्शक अशोक सायन्ना यांची उपस्थिती होती.
सिनेमा कलाकार, पुणे ग्रुपच्या या नाटकाचे लेखन मधूसुदन कालेलकर, दिग्दर्शन कुलदीप पवार, तर निर्माते संदीप विचारे आहेत. विनोदवीर प्रदीप पटवर्धन आणि धनश्री अष्टेकर यांच्यासह अनिल गावडे, जयंत पोतदार, निनाद गावडे, जयंत पानसे, स्वप्ना सानप, प्रियांका कासले, हेमा जुहेकर यांच्या नाटकात प्रमुख भूमिका होत्या.
नाटकाचे कथानक नवरा-बायको, आई-बाबा, तरुणी पेइंग गेस्ट आणि शेजाऱ्यांभोवती फिरणारे आहे. 'कोण नाई कोणाचं...अन दाळ भात लोणचं', 'एकदा पाऊस पडून गेल्यावर झाडावरच्या आंब्याना किंमत राहात नाही', 'बाहेर शेण खायला गेलेला बैल लवकर घरात येत नाही', 'सफारी घालून भिकाऱ्यासारखे दिसतोय', अशा संवादांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
नाट्यप्रयोगाला माजी आमदार डॉ. कल्याण काळे व नामदेव पवार, शहर महासंघ प्रमुख अध्यक्ष राजू शिंदे, नीलेश राऊत, नगरसेवक राजू बनकर, भाऊ जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्टेल, लायब्ररी धुळखात पडून

$
0
0

हॉस्टेल, लायब्ररी धुळखात पडून
घाटीसह ‘दंत’च्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक; तीन कोटींसाठी वर्षभरापासून फर्निचर व इतर कामे ताटकळली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकाच फटक्यात जळगावला पाच शासकीय महाविद्यालये मंजूर करुन व त्यासाठी तब्बल १२६० कोटींच्या निधीची तरतूदही करण्यात आली; परंतु केवळ तीन कोटींसाठी शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील दोन वसतिगृह, ग्रंथालयाच्या इमारतीतील फर्निचर व इतर छोटी-छोटी कामे रखडली आहेत. त्याचा फटका मात्र दोन्ही महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना बसत आहे. ‘वैद्यकीय’चे वसतिगृह व ग्रंथालयाच्या इमारती पूर्ण होऊन फर्निचरसाठी चक्क वर्षभरापासून धुळखात पडून आहे व ‘दंत’च्या वसतिगृहगाचे काम तर निधीअभावी मागच्या तब्बल तीन-साडेतीन वर्षांपासून खंडित स्वरुपात होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांसाठी घाटी परिसरात सुसज्ज वसतिगृह (पीजी हॉस्टेल) वर्षापूर्वीच बांधून तयार आहे. या इमारतीची अगदी रंगरंगोटीदेखील झालेली आहे. मात्र केवळ कॉट, टेबल, खुर्च्या आदी आवश्यक फर्निचर नसल्याने या सुसज्ज वसतिगृहाचा वापर होऊ शकत नसल्याची दुर्दैवी स्थिती आहे. या नवीन तसेच जुन्या वसतिगृहामुळे बहुतांश निवासी डॉक्टरांचा राहण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचवेळी मध्यवर्ती ग्रंथालयाची सुसज्ज इमारतदेखील बांधून तयार आहे. मात्र पुस्तकांचे रॅक, टेबल, खुर्च्या असे फर्निचर नसल्याने ग्रंथालयाची इमारतदेखील जवळजवळ वर्षापासून धुळखात पडून आहे. दोन्ही इमारतींच्या फर्निचरसाठी दोन कोटी ४७ लाखांचा प्रस्ताव आतापर्यंत अनेकदा पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावाला अजूनही प्रशासकीय मान्यतादेखील मिळालेली नाही. त्यामुळे हे काम होणार तरी कधी, असा प्रश्न निर्माण होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, त्यामुळेच विद्यार्थ्यांना यंदा दोन्ही इमारतींचा लाभ होण्याविषयी शंका घेतली जात आहे. एकीकडे ‘शासकीय वैद्यकीय’ची अशी स्थिती असताना, दुसरीकडे ‘शासकीय दंत’च्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, केवळ ३० लाखांच्या फर्निचरअभावी वसतिगृहाचा उपयोग होऊ शकत नाही. एकूण ९ कोटींच्या ‘दंत’च्या वसतिगृहाचे काम चक्क तीन ते चार वर्षांपासून धिम्या गतीने सुरू आहे. खंडित स्वरुपात निधी मिळाल्याने वसतिगृहाचे कामदेखील आतापर्यंत खंडित स्वरुपात झाले. सद्यस्थितीत ९५ टक्के काम झाले असले तरी अद्यापही तेवढ्या प्रमाणात निधी मिळालेला नाही. विशेष म्हणजेच हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दीड महिन्यापूर्वी राज्य सरकारला फटकारल्यानंतरही ही कामे अद्याप मार्गी लागलेली नाही, असे दिसून येत आहे.
४३२ विद्यार्थ्यांची होणार सोय
‘वैद्यकीय’च्या पीजी हॉस्टेलमध्ये ९६ ब्लॉक्स असून, प्रत्येक ब्लॉकमध्ये दोन निवासी डॉक्टर म्हणजे १९२ निवासी डॉक्टरांना राहण्याची सोय होणार आहे. तसेच ‘दंत’च्या वसतिगृहामध्ये २४० विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होईल. त्याशिवाय दोन्ही वसतिगृहामध्ये वॉर्डन व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही राहण्यासाठी सोय असणार आहे. ‘रेस्ट रूम’ही वसतिगृहामध्ये असणार आहे.
पीजी हॉस्टेल व लायब्ररीचा २.४७ कोटींचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वीच पाठवण्यात आला असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच ‘दंत’च्या वसतिगृहाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, फर्निचरसाठी ३० लाखांच्या निधीची गरज आहे. हा निधीदेखील लवकरच मिळण्याची आशा आहे.
– के. एम. आय. सय्यद, बांधकाम विभाग
पीजी हॉस्टेल व ग्रंथालयाचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आलेला आहे व हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत प्रश्न मार्गी लागतील असे वाटते.
– डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोड दो, मुझे मरने दो

$
0
0

छोड दो, मुझे मरने दो
पंचावन्न वर्षीय वृद्ध ज्येष्ठाचा आत्महत्येचा प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
बायको आजारी, मुलगा गुजरातला, कुटुंबाचा सारा भार ओढण्यासाठी मुलीलाच परिश्रम घ्यावे लागत आहेत, त्या मुलीचा साखरपुडा झाला, आता तिचे लग्न कसे करावे? अशा ‌विवंचनेत सापडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ‘मुझे जिना नही मुझे छोड दो’, असे म्हणणाऱ्या ५५ वर्षीय नागरिकाला औरंगाबाद मेट्रो असोसिऐशनच्या सदस्यांनी समजूत घालून पटेल समाजाच्या विश्वस्तांच्या स्वाधीन केले.
संग्रामनगर रेल्वे रूळावर आपली जीवन यात्रा संपविण्यासाठी गेलेल्या या व्यक्तीचे नाव सुभाष गणेश पटेल (चौहान), बन्सीलाल नगर असे आहे. सकाळी नरसापूर-नगरसोल रेल्वे येत असताना ते रूळावर झोपलेले असताना संजू गायकवाड, श्रीमंत गोर्डे पाटील, शिवानंद वाडकर, सतीश लिंभोरे, स्वराज गोर्डे पाटील आणि विलास सोनवणे त्यांना वाचविण्यासाठी धावले. पटेल यांची समजूत काढून त्यांना बाजूला आणले. त्यानंतर गणेश पटेल यांनी आपबिती या सर्वांना सांगितली.
सुभाष पटेल हे पत्नी लिलाबेन, दोन मुलांसह बन्सीलालनगर येथे रहात होते. आता मुलगा जय गुजरातला खासगी कंपनीत कामाला आहे. तर मुलगी शुचिता ही कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये काम करते. येथे मुलीवरच पटेल पती-पत्नीची जबाबदारी आहे. पत्नीला पॅरेलॉसिसचा अॅटॅक आलेला, तसेच तिला गँगग्रीन आणि हृदयविकाराचाही त्रास आहे. पटेल यांना नीट दिसत नाही. शिवाय गुडघेदुखीही त्रास देते. अशातच मुलीचा साखरपुडा केला. आता तिचे लग्न कसे करायचे? हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. पुढे कसे होणार या चिंतेने ग्रस्त होऊन त्यांनी हा जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला.
नागरिकांनी त्यांची समजून घालून पाटीदार भवन येथील गुजराती समाजाचे जितेंद्र पटेल, अरविंद भाई हौजवाला, गोविंद पटेल यांच्यासह बन्सीलाल नगरचे सनी घोडेले, प्रतीक गुप्ता यांच्या हवाली केले. पटेल समाजाच्या विश्वस्तांनी सुभाषभाईंना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. ही घटना कळताच त्यांच्या मुलीने पाटीदार भवन येथे धाव घेतली. समाजाने केलेल्या मदतीमुळे लेकीचेही डोळे पाणावले. त्यानंतर ती आपल्या पित्याला घेऊन घरी परतली.
नागरिकांनी जेवण दिले
गुरुवारी सकाळी जेवण न करताच घराबाहेर पडले होते. आधी जालाननगर येथे त्यांनी रेल्वे ट्रॅकवर झोपून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तेथील लोकांनी त्यांना हाकलले. पायी चालत ते देवानगरी भागात गेले. रूळावर झोपून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात ते होते. नागरिकांनी त्यांना समजावून बाजूला नेले. त्यांना जेवायला दिले. नागरिकांनी धीर दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
मिटिंग सुरू असताना...
संग्रामनगर रेल्वे गेट उघडण्याबाबत औरंगाबाद मेट्रो असो‌सिऐशनचे आंदोलन सुरू आहे. त्यासंदर्भात गुरुवारी सकाळी देवानगरी भागातील नागरिकांची बैठक सुरू होती. बैठक सुरू असतानाच काही लोकांचे पटेल यांच्याकडे लक्ष गेले व ते त्यांच्या मदतीसाठी धावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट कागदांदवारे फसवणूक; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाच्या ताब्यात असणाऱ्या भागीरथी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या नक्कल अर्जात खाडाखोड करुन शासनाची फसवणूक करणाऱ्या भागीरथी संस्थेचा कोषाध्यक्ष संजय विठ्ठल जाधव याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी गुरुवारी फेटाळला.
या प्रकरणात यापूर्वी संशयित आरोपी वकील राहुल एकनाथ शिंदे (वय ३९, भीमनगर, भावसिंगपुरा) याला अटक करण्यात आली होती. या संदर्भात न्यास नोंदणी कार्यालयातील अधीक्षक संजय सुरेशचंद्र जोशी यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ५ जानेवारी रोजी राहुल एकनाथ शिंदे याने भागीरथी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या कागदपत्रांची नक्कल घेण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, शिंदे याने धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातील अधीक्षक ल. प्र. थोरात व कनिष्ठ लिपिक सागरसिंग गुसिंगे यांना हाताशी धरून बनावट कागदपत्र बनविले व त्याआधारे संस्थेचा कोषाध्यक्ष संशयित आरोपी संजय जाधव असल्याची कागदपत्रे तयार करुन गंगापूर नगरपालिकेत दाखल केले. दरम्यान, बनावट कादगपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याचे धमार्दाय सहआयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीत समोर आले होते. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यापूर्वीच शिंदे याला अटक केली होती, तर गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी संजय जाधव याने अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात सांस्कृतिक वैभव झाकोळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणेशोत्सवात देखावे आणि नेत्रदीपक रोषणाईची पद्धत अधिक रूढ झाली आहे. या काळात गणेश मंडळे आणि सोसायटीतील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची परंपरा संपली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनाचे प्रमाण घटले असून केवळ सजावटीवर भर देण्यात आला आहे. नाटक, ऑर्केस्ट्रा व मनोरंजक कार्यक्रमांचे प्रमाण घटले आहे. बदलत्या परिस्थितीत जुळवून घेणे कलाकारांसाठी कठीण झाले आहे.
मनोरंजन आणि प्रबोधनाचा उत्तम आविष्कार गणेशोत्सवात घडतो. जनजागृती करताना त्याला मनोरंजनाची जोड देण्याची गणेश मंडळांची परंपरा होती. औरंगाबाद शहरात दर्जेदार मेळ्यांची परंपरा लुप्त झाल्यानंतर नाटक आणि ऑर्केस्ट्राचे प्रमाण वाढले. संगीतमय कार्यक्रमांना उसळणारी भाविकांची गर्दी गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. गेल्या दोन वर्षांपासून देखावे आणि आकर्षक रोषणाईवर भरमसाठ खर्च करणाऱ्या मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना कात्री लावली आहे. यावर्षी शहर आणि जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. दहा दिवस ऑर्केस्ट्रातील कलाकार आणि नाट्य कलावंतांना सुगीचे दिवस असत. गणेशोत्सवात मनोरंजनात्मक कार्यक्रम करून चरितार्थ भागवणारे शेकडो कलाकार आहेत. गणेशोत्सवात कार्यक्रमांचे निमंत्रण नसल्यामुळे कलाकारांची निराशा झाली आहे. छावणी गणेश महासंघाने प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे कीर्तन आणि प्रदीप पटवर्धन यांचे ‘बायांनो नवरे सांभाळा’ या नाटकाचे आयोजन केले होते. काही मोठ्या मंडळांनी जादूचे प्रयोग आणि संगीतमय कार्यक्रम घेतले. पण, सोसायटी आणि लहान मंडळांनी अशा कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे. प्रत्येक गल्लीबोळात मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या शहरात फक्त दिव्यांचा झगमगाट आहे. लोकप्रिय व्यावसायिक नाटकाचे प्रयोग बंद आहेत. औरंगाबाद शहरासह परिसरातील लहान-मोठ्या गावात कार्यक्रमाचे कलाकार नियोजन करीत असत. सांस्कृतिक परंपरा ओसरल्यानंतर कलाकारांची अडचण झाली आहे.

नवीन पायंडा

शहरात सजीव आणि निर्जीव देखाव्यांची मोठी परंपरा आहे. अधिक आकर्षक आणि खर्चिक देखावे उभारण्यावर मंडळांचा भर आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे प्रमाण कमी करून सजावटीवर अधिक खर्च करण्यात येत आहे. हास्य कविसंमेलन, भारूड, मिमिक्री अशा कमी खर्चाच्या कार्यक्रमांना काही मंडळांनी पसंती दिली आहे. मात्र, या कार्यक्रमांची संख्यासुद्धा मोजकीच आहे.

दरवर्षी जवळपास ४० ते ४५ कार्यक्रमांचा समन्वयक म्हणून काम करतो. मात्र, यावर्षी फक्त १० ते १२ कार्यक्रम आहेत. परळी, बीड, खामगाव येथील गणेश फेस्टिव्हल रद्द झाले आहेत. दुष्काळामुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक कार्यक्रमांना फटका बसला आहे.
- राजू परदेशी, नाट्य समन्वयक

पूर्वीच्या तुलनेत सांस्कृतिक कार्यक्रम लक्षणीय घटले आहेत. यावर्षी ‘मराठवाडा एक्सप्रेस’ या माझ्या कार्यक्रमाचे पाच-सहा ठिकाणी प्रयोग झाले. ग्रामीण भागातील कार्यक्रमांची परंपरा संपल्याची खंत वाटते.
- प्रा. विष्णू सुरासे, हास्यकवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका अधिकाऱ्यांची गणेशोत्सवातही चांदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या शेततळ्याच्या खर्चात महापालिका अधिकाऱ्यांनी यंदा दहा टक्के नैसर्गिक वाढ केल्याची माहिती आहे. गणेश विसर्जनासाठी तीन शेततळे तयार केली जातात. त्यावर यंदा सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे. जुजबी खर्चात तयार होणाऱ्या शेततळ्यांवर एवढा खर्च होत असल्याने त्यात काही अधिकाऱ्यांची चांदी होणार असल्याची चर्चा आहे.
गतवर्षीपासून गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे शेततळ्यांची निर्मिती केली जाते. हर्सूल तलावाच्या पायथ्याला एक व दोन शेततळी ज्योतीनगरात तयार केली जातात. हर्सूल तलावाच्या पायथ्याशी तयार केलेल्या शेततळ्यासाठी गतवर्षी दहा लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्याचा आकार ८० फूट लांब, ३० फूट रुंद आणि दहा फूट खोल, असा आहे. जाणकारांच्या मतानुसार, एवढ्या आकाराच्या शेततळ्यासाठी जास्तीत जास्त चार लाख रुपयांचा खर्च आला असता, पण पालिका अधिकाऱ्यांनी दहा लाखांचा खर्च केला. ज्योतीनगरातील शेततळ्यांसाठी देखील १५ लाखांचा खर्च झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. हर्सूल तलावाच्या पायथ्याशी असलेल्या शेततळ्याच्या तुलनेत ज्योतीनगरातील शेततळ्यांचा आकार कमी होता. त्यामुळे तेथे कमी खर्च होणे अपेक्षित होते. परंतु, अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करण्यात आला.
यंदा पुन्हा याच ठिकाणी शेततळे करण्याची योजना आखण्यात आली आहे. गतवर्षी झालेल्या खर्चाच्या सुमारे दहा टक्के जास्तीच्या खर्चाचे नियोजन आहे. त्यानुसार काम देखील सुरू झाले आहे. जास्तीच्या दहा टक्के दरानुसार तीन तळ्यांवर सुमारे ४० लाख रुपये खर्च येईल, असे मानले जात आहे.

म्हणे, खर्च वास्तववादी

शेततळ्यांसाठीच्या खर्चासंदर्भात पालिकेतील संबंधित अधिकारी अधिकृतपणे बोलण्यास तयार नाहीत. तयार केलेले अंदाजपत्रक वास्तववादी असल्याचा त्यांचा दावा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन सणासुदींत भाज्यांचे दर चढेच

$
0
0

ऐन सणासुदींत भाज्यांचे दर चढेच
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणेशोत्सव, महालक्ष्मीसारख्या सणासुदीत भाज्यांचे दर चढलेलेच आहेत. सर्व भाज्या ६० ते ९० रुपये किलो आणि पालेभाज्या सुमारे २० रुपये जुडी याप्रमाणे विक्री होत आहेत.
भाज्यांची आवक मुबलक आहे. सणासुदींमुळे दरांमध्ये तेजी आली आहे. औरंगाबादमध्ये यावल, नाशिक, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड या भागातून भाज्यांची आवक होत असते. गेल्या दोन दिवसांत महालक्ष्मीसाठी लागणाऱ्या १६ भाज्यांची विक्री अधिक झाली. बाजारात सर्व भाज्या गणपतीपूर्वी सुमारे ३० ते ४० रुपये किलो या दराने विक्री होत होत्या. त्या सर्व भाज्या या दोन-चार दिवसांत ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री झाल्या.
पितृपंधरवड्यातही दर चढेच राहणार
बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक मुबलक असली तरी आगामी पितृपंधरवड्यामुळे मागणीत वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांचे दर आणखी वाढू शकतील असा अंदाज भाजीविक्रेते व्यक्त करत आहेत. मात्र, दीड आठवड्यापूर्वी राज्यात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसाने फळभाज्या व पालेभाज्यां मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाजारामध्ये जिल्ह्यातील सर्वच ठिकाणाहून भाज्यांची आवक होत असते. आवश्यक भाज्यांची आवक स्थानिक भागातूनच होते असे कांचनवाडी आणि इटेखडा येथील भाजीविक्रेते प्रेम शिरसाठ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तमध्ये हयगय करणाऱ्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून त्यात हयगय करणाऱ्यांची गय करण्यात येणार नसल्याचे मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले. संत तुकाराम नाट्यगृहात जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता गुरुवारी विभागस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळ, डॉ. विजयकुमार फड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड, नरेगा आयुक्त संजय कोलते, उपायुक्त संजय हजारे, पुणे मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन उपसंचालक मोते आदींसह विभागातील जिल्हाधिकारी, विभागस्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी ते म्हणाले की, मनुष्यबळ नसल्याची सबब खपवून घेतली जाणार नाही, यावर पर्याय म्हणून शासनाच्या जीआर प्रमाणे जलयुक्त शिवार अभियानाकरिता जलसंपदा व इतर विभागातील तांत्रिक, अतांत्रिक कर्मचारी यांच्या सेवा आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात वळवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच शासकीय, निमशासकीय निवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा घेऊन आउटसोर्सिंगद्वारे मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी भापकर यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची स्थिती, प्राप्त निधी व खर्च, लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी झालेली कामे, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या गावांची माहिती, प्रल‌ंबित मस्टर, मनरेगा आदी विविध विषयाचा जिल्हानिहाय आढावा घेतला.

सर्व कामे होतील

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, ज्या गावात जलयुक्त शिवाराची कामे शंभर टक्के झाली आहेत, त्या गावात पुन्हा पाणीटंचाई होऊ नये. तेथे सर्वेक्षण करून डागडुजीची कामे करावीत, असे सांगत यावर्षी मार्च २०१८ पर्यंत जलयुक्त शिवार अभियानाची कामे शिल्लक राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images