Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रधान सचिवांना कोर्टाचे आदेश

$
0
0
समांतर जलवाहिनीच्या पीपीपी तत्वावर कामाच्या आणि पाणीपुरवठा उपविधी मंजुरीबाबत राज्य शासनास मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने विचारणा केली आहे. नगररचना विभागाच्या प्रधान सचिवाने समांतरच्या निर्णय प्रक्रियेस लागणाऱ्या अपेक्षित कालावधीबाबत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्या. अंबादास जोशी व न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत.

‘डीएमआयसी’ संमतीपत्राची होळी

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी जमीन देण्यास निलजगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. डीएमआयसी प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर हक्क समितीच्या बैठकीत रविवारी (एक डिसेंबर) डीएमआयसीच्या संमतीपत्राची होळी करण्यात आली.

गटसचिवांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

$
0
0
मराठवाड्यातील गटसचिवांचे सेवा व वेतनविषयक प्रश्न प्रलंबित आहेत. गटसचिव कर्मचारी कृती संघटनेने अनेकवेळा वेगवेगळी आंदोलने करून राज्य सरकारला निवेदने सादर केली. दिवाळी अंधारात गेल्यामुळे त्रस्त झालेल्या गटसचिवांनी जाहीर केल्याप्रमाणे रविवारी भीकमांगो आंदोलन केले.

प्रस्ताव सादर करताच गॅस पाइपलाइन

$
0
0
‘दिल्ली - मुंबई इंड्रस्ट्रियल कॅरिडॉर’ प्रकल्पामध्ये (डीएमआयसी) समावेश असूनही, आतापर्यंत औरंगाबादच्या गॅस पाइपलाइनबाबत कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याबद्दल पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी रविवारी आश्चर्य व्यक्त केले.

देश तोडण्याचे षड् यंत्र सुरू

$
0
0
देश तोडण्याचे षड्यंत्र चालू असून कधी धर्माच्या नावाने, कधी भाषेच्या नावावर प्रयत्न सुरू आहे. तेव्हा आपसातील मतभेद दूर सारून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. राष्ट्राच्या विकासामध्ये स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शांती प्रस्थापित करण्यासाठी आपले काय योगदान आहे? याचा प्रत्येक नागरिकांनी वेळीच जागृत होऊन विचार करण्याची गरज आहे.

साहित्य खरेदीसाठी पैसे देऊ नयेत

$
0
0
महावितरणकडून होणारी जनतेची लूट थांबविण्यासाठी आता राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पुढे सरसावले आहेत. नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही कामासाठी किंवा वस्तू खरेदीसाठी शिवाय वाहततुकीचा खर्च म्हणून दमडाही देऊ नये.

मुख्याध्यापकाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू

$
0
0
बीड शहरातील वाढत्या रहदारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-सोलापूर महामार्ग व त्यावरील मोठ्या वाहनामुळे शहरात अनेक अपघात झालेले आहेत. सोमवारी ट्रकने धडक दिल्याने निवृत मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. विठ्ठल गोपीनाथ सोनवणे असे मरण पावलेल्याचे नाव आहे.

ठेवीदारांसाठी भाजप काढणार मोर्चा

$
0
0
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सर्वसामन्य ठेवीदारांना त्यांच पैसा मिळाला पाहिजे तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेला राज्य सरकारने दोनशे कोटीची मदत द्यावी. या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष येत्या पाच डिसेंबरला बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

सोबलगाव प्रकल्पातील पाणी पेटले

$
0
0
तालुक्यातील सोबलगाव प्रकल्पातील पाणी शेतीसाठी सोडण्याच्या तर पिण्यासाठी पाणी आरक्षीत ठेवण्याच्या वादातून शेखपुरवाडी, इंदापूर, बाजारसावंगी, सोबलगाव येथील शेतकऱ्यांच्या दोन गटात चांगलाच संघर्ष निर्माण झाला आहे.

महायुतीचे कार्यकर्ते रस्त्यावर

$
0
0
जालना - खामगांव रस्त्याचे रखडलेले काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना-भाजपा रिपाइ महायुतीने सोमवारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यासंदर्भात त्वरीत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांनी दिला.

उसासोबत सोयाबीन, कापसाला भाव द्या

$
0
0
महाराष्ट्रात उसासोबतच सोयाबीन आणि कापूस ही पिके सुद्धा नगदी पिके आहेत. त्याचेही भाव यंदा कोसळलेले आहेत. त्यामुळे सहा तारखेला होणाऱ्या बैठकीत कृषीमंत्री शरद पवार यांच्या समितीने ऊसासोबतच सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव देण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची मागणी भाजपाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली.

मारहाणीच्या निषेधार्थ कन्नड तालुक्यात बंद

$
0
0
शहरातील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरला शनिवारी मारहाण झाल्याच्या निषेधार्थ तालुका रुग्णसेवा मंडळाच्या आवाहनावरून येथील सर्व रुग्णालयांनी एक दिवसाचा बंद ठेवला.

अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी पाठवले शैक्षणिक साहित्य

$
0
0
अमेरिकेतील शालेय विद्यार्थ्यांनी बचत करून सिल्लोड तालुक्यातील एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा संच पाठवला आहे. ही भेट मिळाल्याने तांडाबाजार, दहिगाव व गोळेगाव येथील विद्यार्थी हरखून गेले आहेत.

मृत्यूपूर्व जबाब पुन्हा नायब तहसीलदारांकडे

$
0
0
मृत्युपूर्व जबाब नोंदविण्याची जबाबदारी पुन्हा एकदा नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी हे काम नायब तहसीलदारांकडून न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आले होते.

आरोग्य केंद्रांचे टीबी तपासणीकडे दुर्लक्ष

$
0
0
राज्य सरकारच्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात टीबी (क्षयरोग) तपासणी मोहीम राबविली जाते. ही मोहीम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात दैनंदिन ओपीडीमध्ये क्षयरोग संशयित रुग्ण स्क्रिन करणे अपेक्षित आहे.

पैसे मागणारा कर्मचारी निलंबित

$
0
0
एसटी महाभरती ऑनलाइन केल्यानंतर आतापर्यंत सुरळीत पार पडलेल्या भरती प्रक्रियेला, पुन्हा खिळ बसली आहे. औरंगाबाद एसटी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने एका उमेदवाराला अकाऊंट नंबर पाठविल्यामुळे खळबळ उडाली आहे.

प्रचलित संहितेचा सुसह्य आविष्कार

$
0
0
समाजातील कुप्रथांचा बिमोड करणारा पोलीस इन्स्पेक्टर अनेक हिंदी-मराठी चित्रपट आणि नाटकांत दिसला आहे. रांगडा, न्यायप्रिय आणि तोडीस तोड संवाद जवाब देणारा हा नायक निर्मात्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही नेहमी भुरळ घालत आला आहे.

आधारस्तंभांची नेमकी मांडणी

$
0
0
समाजाचा आरसा ही वर्तमानपत्राची ओळख पूर्वापार आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला राजकारण्यांनी सोयीने वापरल्यानंतर उडणारा गणि या गोंधळातून बाहेर पडणाऱ्या भानगडी व कुलंगडीचे खुमासदार कथानाट्य बब्रुवान रुद्राकंठावार लिखित ‘चौथ्या इस्टेटीच्या बैलाला’ नाटकात रंगवले आहे.

सिम्युलेटरवरून डिझेल बचतीचे धडे

$
0
0
एसटी चालवताना डिझेलची बचत कशी करावी, याची माहिती सिम्युलेटरच्या सहाय्याने बस चालकांना देण्यात आली. मध्यवर्ती बस स्थानकामध्ये (सीबीएस) हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

खेळाडूंसाठी ‘साई’मध्ये एक कोटीचे जिम

$
0
0
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रात (साई) एक कोटींचे अत्याधुनिक जिम उभारण्यात आले आहे. विविध क्रीडा सुविधांबरोबरच आता खेळाडूंना अतिशय उपयुक्त ठरणारे जिम उभारण्यात आल्यामुळे साई क्रीडा केंद्राच्या वैभवात भर पडली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images