Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गोळ्या खाऊ घालून तीन वेळा गर्भपात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विवाहितेचा गोळ्या खाऊ घालून तीन वेळा गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीनंतर हर्सूल पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पतीने दुसरा विवाह केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी २३ वर्षांच्या विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, हा प्रकार मे २०१५ ते २० ऑगस्ट २०१७ या कालावधीत घडला. संशयित आरोपी संदीप सानप याने तिच्यासोबत ओळख वाढवून प्रेमसबंध निर्माण केले. यनंतर दोन मित्रांसमोर एका मंदिरात त्याने पीडितेसोबत विवाह केला. विवाहानंतर ही पीडित महिला तीन वेळा गर्भवती राहिली. यावेळी संदीपने तिला गोळ्या खाऊ घालून गर्भपात केला. त्याचबरोबर संदीपने दुसरे लग्न केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. ही पीडिता चौथ्या वेळेस गर्भवती असताना संदीप व त्याच्या नातेवाईकांनी तिला मारहाण केली. हातपाय धरून तिच्या तोंडात गोळ्या टाकून चौथ्यांदा गर्भपाताचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी संदीप सानप, विश्वनाथ सानप, संदीपची आई, त्याचे नातेवाईक, त्यांची पत्नी व इतर तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गर्भपात करणे, गर्भपाताचा प्रयत्न करणे, मारहाण करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक भोसले हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेशन दुकानावरील ४२० पोते तांदूळ जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथून गुजराथमधील नवसारी येथे नेण्यात येणारा सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील ४२० पोते तांदूळ पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली.
सार्वजिक वितरण व्यवस्थेचा तांदूळ काळ्या बाजारात पाठवण्यात येत असल्याची माहिती सिल्लोड शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी सापळा रचून भोकरदन-सिल्लोड रस्त्यावरील एक पंपासमोर ट्रकला (जी जे ०३ बी व्ही ३००८) थांबवून चौकशी करण्यात आली. या ट्रकमध्ये ४२० पोते तांदूळ सापडला. तांदळाची किंमत एक लाख ६३ हजार रुपये व ट्रकची किंमत दहा लाख रुपये आहे, हा ऐवज ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी ट्रकचालक महेबूब हफसी, क्लिनर अबेदीन समानुर मंहमद( रा. दोघे उपलेटा जि. राजकोट) यांना अटक केली. फौजदार बजरंग कुटुंबरे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक, क्लिनर, अल्ताफ मेमन (चिखली), पद्मावती फुड कंपनीचा मालक (नाव माहीत नाही), ट्रकमालक रफीकभाई गडा (जुनी मेगाती. जि. राजकोट) या पाच जणांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू सेवा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्य आरोपीस अटक

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अल्ताफ मेमन (रा. चिखली) याला १०७ पोते तांदूळ हैद्राबाद येथे विकण्यासाठी घेऊन जाताना साखरखेर्डा (बुलडाणा) येथे पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक भगीरथ देखमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित दहशतवाद्यांना केले कोर्टासमोर हजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील हिमायतबाग येथे २०१२मध्ये झालेल्या चकमकप्रकरणाची सुनावणी जिल्हा कोर्टात सुरू झाली आहे. संशयित दहशतवाद्यांनी एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार करून हवालदार शेख आरेफ यांना गंभीर जखमी केले होते. यावेळी पकडलेल्या एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील चार संशयितांना वेगवेगळ्या कारागृहातून शुक्रवारी जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्यापैकी काहींचे ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदविण्यात आले.
हिमायतबागेत झालेल्या चकमकीत एटीएस पथकातील पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात संशयित दहशतवादी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखान याला अहमदाबाद (गुजरात) येथील कारागृहातून, तर इतर तिघांना नाशिक व औरंगाबाद येथील कारागृहातून कडक पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीवेळी, औरंगाबादेतून अहमदाबादला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आवाज स्पष्ट ऐकायला येत नसल्याची तक्रार अबरारने केल्यानंतर कोर्टाने त्याला सुनावणीप्रसंगी हजर करण्याचे आदेश दिले होते. २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या पथकाने हिमायतबागेत सापळा रचला होता. त्यावेळी संशयित दहशतवाद्यांनी एटीएस पथकावर गोळ्या झाडल्या, त्यात हवालदार शेख आरेफ हे जखमी झाले. पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात अझहर ऊर्फ खलील कुरेशी ठार झाला, तर मोहम्मद शाकेर पायाला गोळी लागून जखमी झाला होता. एटीएसने अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखान (रा. चंदननगर, इंदौर, मध्यप्रदेश) यास पाठलाग करून पकडले होते. त्यानंतर अन्वर हुसेन (रा. लाभारिया, इंदौर, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४ गावठी कट्टे, २ रिव्हॉल्व्हर, १७ जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. पकडलेल्या दहशवाद्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

दररोज सुनावणी

या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध विशेष कोर्टात दोन महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची दररोज सुनावणी होणार आहे, असे सरकारपक्षातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खा. उदयनराजे न आल्याने हिरमोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
पिशोर रोडवरील ईदगाह मैदान व कब्रस्तानाच्या जागेचा सातबारा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आलेल्या गर्दीचा हिरमोड झाला. खासदार भोसले येणार असल्याने शहरात उत्सुकता होती.
या कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते, जमात-ए-हिंदचे शहराध्यक्ष अता उर रहेमान, उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम पंच कमेटीला दोन हेक्टर २२ आरचा सातबारा सुपूर्द करण्यात आला. या जागेचे बांधकाम व इतर कामांसाठी आमदार सत्तार व आमदार हर्षवर्धन जाधव प्रत्येकी ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी कोळी समाजाच्या काही विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सभापती धनराज बेडवाल, बाजार समिती सभापती राजेंद्र मगर, पंचायत समिती सदस्य किशोर पवार, जयेश बोरसे, प्रदीप बोडखे आदींची उपस्थिती होती.

आमदारांचा दावा

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले यांना निमंत्रिक करून वातावरण निर्मिती केली होती. पण, ते उपस्थित न राहिल्याने जनता निराश झाली आहे. खासदार उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने त्यांच्या हस्ते मुस्लिम समाजासाठी सातबारा देण्याचा इरादा होता. परंतु, ढगाळ हवामान व कोर्टाच्या कामकाजामुळे ते आले नाहीत, असा दावा आमदार जाधव यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमाल नृत्याची चुरस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धमाल नृत्याला मिळणारी तरुणाईची दाद आणि नृत्य सादरीकरणातील लक्षणीय पदलालित्याने रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद आयोजित युवक महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला. महोत्सवात एकल गायन, रॅम्प वॉक आणि नृत्याचे बहारदार सादरीकरण झाले.

रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे राज्यस्तरीय युवक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदा महोत्सवाचे सोळावे वर्ष असून, स्पर्धक आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘रोटरी इलाइट’ ही स्पर्धकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची कठोर परीक्षा पाहणाऱ्या स्पर्धेत तब्ब्ल ३० तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. वैयक्तिक मुलाखत, गटचर्चा, रॅम्प वॉक, सामान्य ज्ञान या फेरीचा त्यात समावेश होता. या स्पर्धकांना शहरातील विविध भागात पाठवून तिथल्या समस्या आणि उपाय यावर सादरीकरणाचा टास्क देण्यात आला होता. यातून ‘मिस्टर’ आणि ‘मिस रोटरी इलाइट’ तसेच ‘बेस्ट पर्सनॅलिटी’ अशा तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन अश्विन बालेकर करीत आहेत.

एकल गायन स्पर्धेत तब्ब्ल ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ‘प्यार दिवाना होता है’, ‘झूम झूम बाबा’, ‘ये समा समा है ये प्यार का’, ‘हसता हुआ नूरानी चेहरा’, ‘चुरा लिया है’ या लोकप्रिय गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे संयोजन सरिता लोणीकर यांनी केले. उत्स्फूर्त वक्तृत्त्व स्पर्धेत स्पर्धकांना ऐनवेळी विषय देण्यात आला. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर स्पर्धकांनी भाष्य केले. या स्पर्धेचे संयोजन अमित वैद्य यांनी केले. एकल नृत्याच्या स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी लोकनृत्यापासून ते फिल्मी नृत्यापर्यंत कौशल्यपूर्ण सादरीकरण झाले. नृत्य सुरू असताना तरूणांनी टाळ्या-शिट्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. सायंकाळी समूह नृत्य स्पर्धा रंगली.

आज समारोप
युवक महोत्सवात शनिवारी रॉक बॅण्ड स्पर्धा होणार असून संयोजन दीपक पवार करीत आहेत. एकल गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि ‘रोटरी इलाइट’ अंतिम फेरी होणार आहे. सायंकाळी सात वाजता रोटरीचे माजी प्रांतपाल प्रफुल्ल मिरजगावकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरण करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा कुख्यात गुंड शहरातून हद्दपार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील दहा कुख्यात गुंडाना पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या आदेशानुसार एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुंडाविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. यामध्ये परिमंडळ एक व परिमंडळ दोन मधील गुन्हेगारांचा समावेश आहे.
पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनमधील गुंड संदीप रमेश ठाकूर (वय २७, रा. साईनगर, सातारा परिसर), अक्षय उर्फ भैया रमेश वाहुळ (वय १८, रा. साईनगर, सातारा), आनंद इंद्रजीत नागलोद (वय २३, रा. न्यु शांतीनिकेतन कॉलनी), कर्नलसिंग तारासिंग कल्याणी (वय ३५, रा. छोटा मुरलीधरनगर), संतोष प्रकाश आरते (वय ३२, रा. विजयनगर), नंदू ‌शिवाजी ‌शेजवळ (वय २१, रा. सावंगी), शिवाजी रतन कासारे (वय ३२, रा. सावंगी), प‌रिमंडळ एकमधील मोहम्मद रफीक उर्फ बाबा पंगा मोहम्मद यासीन (वय ४७, रा. पडेगाव), साईनाथ रामनाथ गायकवाड (वय ३६, रा. गोलवाडी) व हुसेनखान उर्फ शेरखान अलीयारखान (वय ४६, पेन्शन कॉलनी) यांना हद्दपार करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे व विनायक ढाकणे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ओबीसी विद्यार्थ्यांना एक हजार ३००हून अधिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती लागू करून ती महागाई निर्देशांनुसार देण्यात यावी, सर्व आर्थिक विकास महामंडळांची कर्जे माफ करावीत, यांसह अन्य मागण्यांसाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ओबीसी, भटके विमुक्त समाजांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर धरणे आंदोलन केले.
महात्मा फुले समता परिषद, भारतीय भटके व विमुक्त आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती, जनक्रांती संघ, सावता परिषद, फुले ब्रिगेड, अखिल भारतीय कैकाडी महासंघ, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, नाभिक महामंडळ, विश्वकर्मा सुतार समाज, ओबीसी संघर्ष समिती आदीं संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
न्याय्य मागण्या त्वरित मान्य करा, अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. मुख्य संयोजक मनोज घोडके, अमीन जामगावकर, संजय मेडे, सरस्वती हरकळ, संजीवनी घोडके, तुकाराम घोडके, रामभाऊ पेरकर, अॅड. महादेव आंधळे, आर. जी. देठे, संदीप धुगरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलकांच्या मागण्या
- ओबीसी, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक, अण्णाभाऊ साठे यांसह अन्य आर्थिक विकास महामंडळांना भरीव आर्थिक तरतूद करावी
- महामंडळांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.
- महामंडळाची सर्व कर्ज माफ करण्यात यावीत
- ओबीसी विद्यार्थ्यांना एक हजार ३००पेक्षा अधिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती लागू करून ती महागाई निर्देशांनुसार देण्यात यावी
- राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी ओबीसी तज्ज्ञाची त्वरित नियुक्ती करण्यात यावी
- जात पडताळणीच्या जाचक अटी रद्द करावी
- ओबीसी, भटक्यांची जनगणना सक्तीने करून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ देण्यात यावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीत ५७ टक्के पाऊस

0
0

परभणी - पावसाळ्याचे साडे तीन महिने उलटले असून आता काही दिवसातच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मात्र, या साडे तीन महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५७.२७ टक्के एवढाच पाऊस झाला. उरलेल्या दीड महिन्यांत तब्बल ४३ टक्के पाऊस अपेक्षीत आहे. ज्यामुळे परभणी जिल्ह्यावरील संकट अजुनही कायम असून शेतकरी अजुनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्याची एकूण पावसाची सरासरी ७७४.६२ मिलिमीटर एवढी आहे. त्यापैकी १५ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ४४३.६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो की वार्षिक सरासरीच्या केवळ ५७.२७ टक्के आहे. तर साडे तीन महिन्यातील अपेक्षित पावसाच्या ७० टक्के असून अजुनही ३० टक्के पावसाची तूट कायम आहे. गेल्या १५ दिवसांत सततच्या पावसामुळे भरपूर पाऊस पडला असे वाटत असले तरी संपूर्ण जुलै महिना आणि ऑगस्टचा निम्मा महिना कोरडा गेल्याने पावसाची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
परभणी जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत मोजण्यात येत असलेलया पर्जन्यमानाच्या सरासरीत आजपर्यंत केवळ ५७.२७ टक्के पाऊस झाला. हा पाऊस साडे तीन महिन्यातील असून आता येत्या काळात निम्मा पाऊस अपेक्षित आहे. परतीच्या पावसाचा अंदाज नसतो, मात्र हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दहा दिवस भरपूर पर्जन्यमानाचे आहेत. त्यामुळे या दहा दिवसात जिल्ह्याची पावसाची सरासरी भरून निघावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आजपर्यंत समाधानकारक पाऊस असून वार्षिक सरासरीच्या ८५.२३ टक्के पाऊस झाला. या खालोखाल सोनपेठ ८१.३६, पूर्णा ८०.९५, मानवत ७५.२६, परभणी ७०.४४, जिंतूर ६७.२९, गंगाखेड ६३.७४ आणि सर्वात कमी पाऊस पालम तालुक्यात ५६.४६ व पाथरी तालुक्यात केवळ ४९.६७ टक्के एवढा पाऊस झाला.

प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा
या हंगामात आतापर्यंत पडलेल्या निम्म्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेले येलदरी अजुनही ५ टक्क्यांवर स्थिरावले आहे. या प्रमाणेच मध्यम प्रकल्पातील मासोळी, खडका व इतर काही लहान प्रकल्पांमध्ये ५० ते ६० टक्के जलसाठा आहे. हे प्रकल्प जिल्ह्याच्या सिंचनाच्या दृष्टीकोनातून भरणे आवश्यक असून येत्या काळात दमदार पाऊस होऊन हे प्रकल्प भरावीत, अशी अपेक्षा सर्वच जण व्यक्त करू लागले आहेत.


तालुके टक्केवारी
सेलू - ८५.२३
सोनपेठ -८१.३६
पूर्णा - ८०.९५
मानवत - ७५.२६
परभणी - ७०.४४
जिंतूर - ६७.२९
गंगाखेड - ६३.७४
पालम - ५६.४६
पाथरी - ४९.६७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टाकळी बंधाऱ्याचे जलपुजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर तालुक्यातील टाकळी (शि.), बोपला, चाटा व धानोरी शिवारात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत युवा सांस्कृतीक संवर्धन, मुंबई यांच्या वतीने नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले. या कामांतर्गंतच्या टाकळी (शि.) येथील बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे जलपुजन व बंधाऱ्याच्या काटावर वृक्षारोपण् जिल्हा बँकेचे संचालक रमेश कराड व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांच्या हस्ते शुक्रवारी टाकळी येथे करण्यात आले.
लातूर तालुक्यातील टाकळी (शि.), बोपला, चाटा व धानोरी शिवारात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत युवा सांस्कृतीक संवर्धन, मुंबई यांच्यावतीने दहा किलोमीटर नदी-नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले. सध्या होत असलेल्या पावसामुळे या नदी-नाल्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. या साठलेल्या पाण्याचे रमेश कराड व अभिमन्यू पवार यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना रमेश कराड म्हणाले, ‘ लातूर तालुक्यातील टाकळी (शि.), बोपला, चाटा व धानोरी शिवारात झालेल्या जलयुक्तच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांच्या विहिरी व कुपनलिकांच्या पाण्यात वाढ होत असून येत्या रब्बी हंगामासाठी या पाण्याचा येथील शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात अनेक विकासाची कामे होत आहेत. या कामांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.’
यावेळी बोलताना अभिमन्यु पवार म्हणाले, ‘लोकनेते स्व. गोपिनाथराव मुंडे यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेसाठी सरकार दरवर्षी २५ कोटी रुपये एवढा वाटा देत आहे. यापुढे शेतकऱ्यांनी गटशेतीचा प्रयोग करावा, गटशेतीसाठी राज्य सरकार अनेक सवलती देत असून त्याचा लाभ जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.’
यावेळी युवा सांस्कृतीक संवर्धनचे अध्यक्ष संजय पांडे, भाजपचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय जाधव, लता भोसले, गोविंद नरहरे, भागवत सोट, हनुमंत नागटिळक, त्र्यंबक गुट्टे, जयंत चौधरी, श्यामसुंदर वाघमारे, विकास कांबळे, अरुण लांडगे, अरविंद सुरकुटे, भैरवनाथ पिसाळ, अमर गायकवाड, रागिनी यादव, श्वेता लोंढे, विशाल जाधव, नितीन वाघमारे हे उपस्थित होते. प्रास्ताविक विजय काळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार जयंत चौधरी यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरकारचे नियोजन कोलमडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शेतकरी कर्जमाफीसाठी केवळ तारीख पे तारीख, कोळशाच्या साठ्याअभावी विजेचा लपंडाव, विद्यापीठांचे रखडलेले निकाल, डेंग्यू, स्वाइन फ्लू, कुपोषण अशा आरोग्याच्या तऱ्हा पाहता संपूर्ण राज्याचे नियोजन कोलमडले असून, मंत्र्यांची खात्यांवर पकड नाही,’ अशी जोरदार टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी युती सरकारच वस्त्रहरण केले.

डॉ. उल्हास उढाण लिखित ‘यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राचा आशय’ या ग्रथांच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. फ. मुं. शिंदे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रा. उमाकांत राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी पवार म्हणाले, ‘राज्य सरकाच्या मनाला आले तसे काम सुरू आहे. राज्यात शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची भरती नसताना एकाच दिवशी १० लाख मुले फुटबॉल खेळले. शिक्षक भरतीचा विषय काढला की मंत्री त्याकडे दुर्लक्ष करतात. शिक्षण तसेच खेळात राज्यात बोजवारा उडाला आहे. राज्यात कर्जमाफीचा गोंधळ उडाला असून कर्जमाफीसाठी केवळ तारखांवर तारखा जाहीर करण्यात येत आहेत. यामुळे प्रत्यक्षात कर्ज माफ होणार की नाही ? या बाबत शेतकरी संभ्रमात आहे,’ असे पवार म्हणाले.

पुस्तका‌विषयी बोलताना पवार यांनी डॉ. उल्हास उढाण यांची स्तुती केली. ‘यशवंतराव चव्हाण यांचे कार्य एका पुस्तकात सामावणारे नाही, मात्र डॉ. उढाण यांनी कौतुकास्पद प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या जडण घडणीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा असून त्यांची कार्य गौरवास्पद आहे, मात्र आताच्या पिढीचे वाचन कमी असल्यामुळे त्यांना फारशी माहिती नाही,’ अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली. ‘नियती बदलत गेली, मात्र यशवंतरावांची नियत कधीच बदलली नाही,’ अशा शब्दांत अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी यशवंतरावांच्या कार्याचा गौरव केला. ‘शासनाला येणाऱ्या काळात शैक्षणिक धोरण आखताना या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल,’ असे पुस्तकाचे लेखक डॉ. उल्हास उढाण यांनी सांगितले.

रेल्वेचा बोजवारा अन् बुलेट ट्रेन
‘विकासाला आमचा विरोध नाही, मात्र एकीकडे देशभरात रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर अपघात होताना रेल्वेच्या सुविधांचा बोजवारा उडाला असताना बुलेट ट्रेनचे उदघाटन करण्यात येत आहे. मुंबईमध्ये दररोज एका प्रवाशाला जीव गमवावा लागत असल्याची अवस्था आहे. रेल्वे रुळांची उंची वाढवण्याचे प्रश्न जैसे थे असताना नवीन स्वप्न दाखवण्यात सरकार गुंग आहे. ज्यांनी घरदार सोडले त्यांना समाजकारणाचे निर्णय घेता येत नाहीत,’ असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सेनेला सत्तेची उब हवी आहे
औरंगाबादः ‘सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका पार पाडत असलेली शिवसेना सत्तेबाहेर पडण्याचे धाडस करणार नाही. त्यांना विरोध करून सत्तेची उबही हवी आहे,’ अशी टीका शुक्रवारी अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, आमदारांची फोडाफोडी तसेच जीएसटीच्या सावळ्या गोंधळाबद्दल पत्रकारांशी गप्पा मारल्या. पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे आमदार जाणार या केवळ वल्गना आहेत. कुणीही राज्यकर्ते पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. राज्यातील दहा लाख शेतकरी बोगस असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ज्या शेतकऱ्याकडे सातबारा आहे, तोच कर्जमाफीसाठी अर्ज करु शकतो. या शेतकऱ्यांना अपात्र म्हणू शकता, मात्र बोगस कसे म्हणता येईल. मराठा आरक्षणाबाबत तयार करण्यात आलेली समिती म्हणजे सरकारचे वेळाकाढूपणाचे धोरण आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.

अजित पवार, कार्यकर्ते अन् सेल्फी
सत्तेत असताना विरोधकांवर आणि आता विरोधात असताना सत्ताधाऱ्यांवर तोफ डागून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी काही वेगळ्याच मूडमध्ये होते. एका कार्यक्रमाच्या निमित्याने त्यांचे सायंकाळी विमानतळावर आगमन झाले, तेव्हा त्यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला. कार्यकर्त्यांना अजित दादांबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. एरवी तापट स्वभावाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांनी आपल्या स्वभावाला मुरड घालून कार्यकर्त्यांचा सेल्फीचा हट्ट पूर्ण केला. पालकमंत्री रामदास कदम व अजित पवार यांचे सायंकाळी एकाच विमानाने औरंगाबादेत आगमन झाले. पवार यांच्या स्वागतासाठी आमदार सतीश चव्हाण, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, सचिन मुळे, जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख, विनोद पाटील, सुरजीतसिंग खुंगर, ख्वाजा शरफोद्दिन आदी उपस्थित होते. स्वागत स्वीकारून पवार आपल्या गाडीजवळ आले, तितक्यात त्यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला. त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. पवार गाडीत पुढच्या सीटवर जाऊन बसले, तरीही कार्यकर्त्यांचा सेल्फीचा हट्ट सुरूच होता. त्यामुळे गाडीचे दार लावून न घेता त्यांनी कार्यकर्त्यांना सेल्फी काढण्याची मुभा दिली. त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘समांतर’च्या दिशेने वाटचाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जीर्ण झालेल्या जलवाहिन्या, पाणीपुरवठ्याची वाढती मागणी त्यामुळे जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत नवीन पाइपलाइन टाकण्याची परवानगी शासनाकडून घ्या, असा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर होऊन शासनाने मंजुरी दिल्यास पालिकेची पुन्हा समांतर जलवाहिनीच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे.

शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मांडला आहे. प्रस्तावात म्हटले आहे की, ‘जायकवाडीतून शहरापर्यंत ७०० मि. मी. व १२०० मि. मी. व्यासाच्या दोन पाइपलाइनच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी ४० वर्षे तर १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी २८ वर्षे जुनी झाली आहे. या दोन्ही पाइपलाइनची कार्यक्षमता तांत्रिकदृष्ट्या संपली असल्याने वेल्डिंग केल्यानंतरही पाइपलाइन वारंवार फुटत आहे. हे प्रमाण असेच राहिले, तर शहराचा पाणीपुरवठा बंद होऊन आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जायकवाडी धरण ८२ टक्के भरलेले असूनही महापालिका पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे नवीन पाइपलाइन टाकण्याची परवानगी शासनाकडून घ्यावी.’ प्रस्तावाचे सूचक म्हणून नगरसेवक राजेंद्र जंजाळ असून व अनुमोदक म्हणून सभागृह नेता गजानन मनगटे, नगरसेवक बन्सी जाधव, कमलाकर जगताप यांची नावे आहेत.

कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावे
‘नवीन पाइपलाइन टाकण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत जलवाहिन्या फुटून पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावी व न्यायालय निर्णयाच्या अधीन राहून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत नवीन पाइपलाइन महापालिका, जलसंधारण विभाग किंवा कोणत्याही सक्षम यंत्रणेकडून टाकण्यास परवानगी द्यावी,’ अशी विनंती प्रस्तावात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नाल्याच्या हद्दी हरवल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिअभिलेख आणि महापालिकेच्या वादात शहरातील नाल्याच्या हद्दी हरवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे असून, नाल्यावरील हजारो अतिक्रमणांवरही याच कारणाने कारवाई झाली नाही आणि त्यामुळेच हजारो घरात पावसाचे पाणी शिरून शहरवासीयांची झोप उडाली.

औरंगाबादमधून सहा प्रमुख नाले वाहतात. या नाल्यांची हद्द ठरवून त्यावर झालेल्या बांधकामाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने पाच वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार भूमिअभिलंख कार्यालयाला वीस लाख रुपयांचे शुल्क दिले. त्यानंतर भूमिअभिलेख कार्यालयाने नाला सर्वेक्षणाचे काम सुरू केले, परंतु सहा पैकी दोनच नाल्याचे सर्वेक्षण करून हे काम थांबले. उर्वरित चार नाल्यांच्या सर्वेक्षणाचे काम न झाल्यामुळे नाल्यांच्या हद्दीची कागदपत्रे पालिकेच्या ताब्यात आली नाहीत. नाल्याची हद्दच ठरली नसल्याचे कारण पुढे करून महापालिकेने देखील नाल्यांच्या पात्रात होणाऱ्या किंवा झालेल्या बांधकामांवर कारवाई केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार दोन नाल्यांचे दोन नकाशे महापालिकेच्या नगररचना विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यात प्रामुख्याने शहानूरवाडी नाल्याचा समावेश आहे. नाल्यांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेने त्यानंतर भूमिअभिलेखकडे विचारणा केली, तर मनुष्यबळाचे कारण पुढे करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर महापालिकेने सर्वेक्षणाचा विषय बंद केला.

शहरातून वाहणाऱ्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली. पंधरा-वीस फुटांचे नाल्याचे पात्र दोन ते पाच फुटांवर येऊन थांबले. त्यामुळे पुराचे पाणी वाहून जाण्यास जागा राहिली नाही. त्याचा परिणाम नाल्याकाठच्या घरांवर झाला आहे. हजारो घरे धोक्याच्या उंबरठ्यावर आली आहेत. त्यामुळेच बुधवारी झालेल्या पावसामुळे नाल्याकाठच्या वसाहतींमध्ये हाहाकार उडाला. सिडको एन चार, जयभवानीनगर, गारखेडा या भागात दाणादाण उडाली. नाल्यांचे सर्वेक्षण करून त्यावरील बांधकामांची माहिती भूमिअभिलेख कार्यालयाने महापालिकेला सादर केली नाही, त्यामुळे सरकारची मालकी असलेल्या नाल्यांवरच्या बांधकामांवर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेचा नाही, असे म्हणून पालिकेच्या प्रशासनाने हात वर केले आहेत.

पालिकाच जबाबदार
वास्तविक पाहता महापालिकेच्या क्षेत्रात झालेल्या प्रत्येक बांधकामाची जबाबदारी महापालिकेचीच आहे. त्यामुळे नाल्यावरच्या बांधकामांची जबाबदारी महापालिकेला झटकता येणार नाही, असे जाणकारांचे मत आहे, परंतु भूमिअभिलेख खात्याने नाल्याचे नकाशे व हद्दी दिल्या नाहीत असे म्हणून पालिकेचे प्रशासन या बांधकामांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

महापालिका व भमिअभिलेख यांची सांगड घालून नाल्यांचे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. पावसामुळे नाले तुंबले, नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पालिकेच्या ड्रेनेज, पाणीपुरवठा, रस्ते विभागाने योग्य प्रकारे काम न केल्यामुळे ही वेळ आली. त्यामुळे या तिन्हीही विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे पत्र मी आयुक्त व महापौरांना दिले आहे. नाल्यांवरच्या बांधकामांसंदर्भात शनिवारी बैठक घेतली जाईल. - गजानन बारवाल, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॉर्पिओने ६ जणांना चिरडले; ४ ठार, २ जखमी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

औरंगाबाद-जालना रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ गाडीनं चिरडल्याची घटना आज सकाळी घडली. जालना रोडवरील केंब्रिजशाळेजवळ सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्कॉर्पिओचा चालक फरार झाला आहे.

औरंगाबाद-जालना रोडवर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव स्कॉर्पिओ गाडीनं चिरडले. या अपघातात भागिनाथ लिंबाजी गवळी (वय ५६), नारायण गंगाराम वाघमारे (वय ६५), दगडूजी बालाजी ढवळे (वय ६५) आणि अनिल विठ्ठल सोनावणे (वय ४५) यांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, हे सर्व जण चिकलठाण्यातील हनुमान चौकात राहणारे आहेत. भरधाव आलेल्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्यानं चार जणांचा यात मृत्यू झाला. गाडी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर गाडी रस्त्यांच्या बाजुला असलेल्या खड्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून फरार झालेल्या स्कॉर्पिओ चालकाचा शोध घेत आहेत. दरम्यान, भरधाव आलेल्या स्कॉर्पिओने या चार जणांना चिरडल्याचे प्रत्यक्षदर्शिनं सांगितलं असून गाडी सोडून चालक फरार झाला आहे. गाडीचा नंबर एमएच-२७-एव्ही-५२८२ असून ही गाडी अमरावतीची असल्याची माहिती मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नवरात्रात तुळजाभवानीचे पेड दर्शन महागले

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळात पेड दर्शनाच्या दरात तिपटीने वाढ करण्यात आली असून दर्शनासाठी ३०० रुपये मोजावे लागणार आहेत. हा दर १०० रुपये इतका आहे.
महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानीचा नवरात्र उत्सव देशभरात महत्वाचा मानला जातो. या महोत्सवा दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगणासह देशभरातील भाविक लाखोंच्या संख्यने उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुरात येत असतात. येथील दर्शनाचे व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी व व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानाने पेड दर्शनाचा निर्णय घेतला व यासाठी प्रति व्यक्ती १०० रुपये दराने आकारणी सुरू केली. या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले. यामुळे मंदिराचे उत्पन्न लाखो रुपयाने वाढले. मात्र, अवघ्या १ महिन्यात मंदिर संस्थानाने नवरात्र उत्सवाचे कारण दर्शवित पेड दर्शनाच्या दरात तिपटीने वाढ केली.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात २१ सप्टेंबर रोजी घटस्थापना होत असून ही दरवाढ घटस्थापना ते अश्विन पौर्णिमा दरम्यान ६ ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे. या काळात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पेड दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. विशेष म्हणजे पेड दर्शनाचे पास हे मंदिरापासून २ किलो मीटर लांब असलेल्या घाटशीळ येथील प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आले आहेत.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पेड दर्शनाचा उपक्रम राबविताना शिर्डी व तिरुपती बालाजी या मंदिर संस्थांच्या धर्तीवर हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. तिरुपती असो की शिर्डी मंदिर भाविकांची कितीही गर्दी झाली किंवा विविध महोत्सवात पेड दर्शनासह इतर दर्शनाच्या दरात कसलीही वाढ केली जात नाही. मात्र, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मात्र नवरात्रात भाविकांची गर्दी जास्त असल्याचे कारण पुढे करीत ही दर वाढ केली आहे.

निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी
तुळजाभवानी येथे दर्शनासाठी येणारा भाविक हा सर्वसामान्यस्तरातील असून ३०० रुपये दर हा त्याच्या खिशाला परवडणारा नाही त्यामुळे मंदिर संस्थानच्या या निर्णयामुळे भाविकांच्या तीव्र अशी नाराजी आहे. मंदिर संस्थानाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशीही मागणी भाविकांतून जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ हैदराबाद मुक्तीसंग्रामाची माहिती वेबसाईटवर

0
0


अरुण समुद्रे, लातूर
हैदराबाद मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्याची परिपुर्ती करणारा लढा म्हणून ओळखला जातो. या लढ्यात मराठवाड्यातील जनेतेने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. या लढाची नव्या पिढीला माहिती व्हावी म्हणून मराठी भाषेतील संकेतस्थळ लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयातील इतिहासाचे शिक्षक मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक भाऊसाहेब उमाटे यांनी तयार केले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती नव्या पिढीला व्हावी, प्राथमिक बाबीची ओळख व्हावी, या लढ्यातील दुर्लक्षीत घटनाना उजाळा मिळावा हा यामागील उद्देश असल्याचे उमाटे यांनी सांगितले.
www.bhausahebumate.com या संकेत स्थळावर मुक्तीसंग्रामातील महत्वपूर्ण घटनांची ओळख करून देण्यात आली आहे. यामध्ये आर्य समाजाचे कार्य, स्वामी रामानंद तीर्थ, गांधीजी आणि स्वामीजी, मुक्तीसंग्रामातील जालीयनवाला बाग- गोरटा, कल्हाळीच्या वीराची शौर्यगाथा, हुतात्मा वेदप्रकाश, हुतात्मा गोविंदराव पानसरे, ऑपरेशन पोलो, या विषयावर लेख, या विषयावर उपलब्ध असलेल्या संदर्भ ग्रंथाची यादी, या इतिहासाशी संबंधित फोटो तसेच गोरटा हत्याकांडा विषयीचा माहितीपट, स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव सायगावकर यांच्या मुलाखतींचा समावेश आहे.
तरुणपिढीसाठी एका अॅपची ही निर्मिती करण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोरवरुन bhausahebumate हे अॅप डाउनलोड करून घेता येऊ शकते. आगामी काळात या विषयावरील जास्तीत जास्त अभ्यासपूर्ण माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या संकेतस्थळाच्या निर्मितीमध्ये सर्व तांत्रिक मदत सॉफ्टलिंक लॅबचे वसीन खान केली असल्याचा उमाटे यांनी सांगितले.
‘मटा’मुळे प्रेरणा मिळाली
गेल्या वर्षी १७ संप्टेंबर रोजी महाराष्ट्र टाइम्समध्ये औरंगाबाद येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्व्हे प्रकाशित करण्यात आला होता. त्यात तरुणपिढी मराठवाड्याच्या इतिहासापासून अनभिज्ञ अशा आशयाचा अहवाल होता. यातून प्रेरणा घेऊन युवापिढीला हा मुक्तीसंग्रामाचा इतिहास ज्ञात व्हावा यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे भाऊसाहेब उमाटे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मर्दानी दगडाबाईंची इच्छा अपूर्णच

0
0

विजय कमळे,जालना
हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात केलेल्या मर्दानी पराक्रमामुळे जिवंतपणीच इतिहासाला नोंद घेण्यास भाग पाडून गावात आपला स्मारक बनविन्याची दगडाबाईंची शेवटची इच्छा आजही फक्त कागदावरच सीमित राहिली. त्यांच्या अंत्यविधीचा खर्च मिळविण्यासाठी कुटुंबियाचे साडे तीन वर्षांपासून फरफट सुरूच आहे.
निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील एक मर्दानी लढवय्यय म्हणजे दगडाबाई देवराव शेळके. बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वरची सून असलेल्या दगडाबाईंना एकदा निजाम सरकारच्या सैनिकांनी शस्रासह रंगेहाथ अटक केली होती. ज्यामुळे त्यांना काही काळ तुरूंगवास देखील भोगावा लागला होता. दगडाबाईंना निजामाच्या सैन्या बरोबरच कुटुमबियांचा आणि समाजाचाही रोष सहन करावा लागला होता. कुटुंब आणि समाजाचा हा विरोध झुगारुन पुरुषाप्रमाणे पँट,शर्ट घालून हातात बंदुक व हातगोळे घेऊन झाशीच्या राणी प्रमाणे अपंग मुलाला पाठीला बांधून घोडयावरून त्या सहकारी मंडळीना रसद पुरवित होत्या.
हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात केलेल्या मर्दानी पराक्रमामुळे दगडाबाईंनी जिवंतपणीच इतिहासाला नोंद घेण्यास भाग पाडले होते. त्यांनी केलेल्या मर्दानी कामामुळे इतरांनाही प्रेरणा मिळावी यासाठी गावात आपला स्मारक व्हावा, अशी इच्छा त्यांनी जिवंतपणीच व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी घरामागील राज्य सरकारची जमीन देखील निश्चित करून ठेवली होती. दगडाबाईंने ५ एप्रिल २०१३ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
स्वातंत्र्य सेनानी असल्याने धोपटेश्वर ( ता. बदनापूर) येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी या अंत्ययात्रेत सहभागी होऊन गावात स्मारक बनवून दगडाबाईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, दगडाबाईंचा मृत्यू होऊन तब्बल साडे तीन वर्ष उलटले असले तरी त्यांचा तो स्मारक मात्र अद्यापही फक्त कागदावरच सीमित आहे.
अंत्यविधीच्या खर्चासाठी फरफट
दरम्यान, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधीचा खर्च शासनामार्फत देण्यात येतो. परंतु, दगडाबाईंचा मृत्यू होऊन तब्बल साडे तीन वर्ष उलटले असले तरी तो खर्च मिळावा म्हणून तिच्या कुंटूबियांची फरफट आजही सुरूच असून प्रशासन मात्र, याकडे लक्ष देण्यास तयार नाही. दगडाबाईंच्या कुटुंबात एकुलता एक अपंग मुलगा असल्याने आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून त्याला शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

दगडाबाईनी जिवंतपणीच स्मारकाची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी जमीन देखील निश्चित करुन ठेवली होती. मात्र, त्यांचे स्मारक आणि अंत्यविधीचा खर्च देण्यास प्रशासन चालढकल करत असून ही मोठी शोकांतिका आहे.
अय्यूब शेख,
ग्रामस्थ, धोपटेश्वर, ता. बदनापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अन्यथा आंदोलकांना तडीपार करू!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित आंदोलकांना तडीपार करण्यात येईल, अशी भूमिका पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शनिवारी दुपारी यादव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विद्यापीठात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून वाद सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी शिवजयंतीच्या कार्यक्रमात पुतळ्याची घोषणा केल्यानंतर कुलगुरूंनी पुतळा उभारणीसाठी ४० लाख रुपयांची तरतूद केली. मात्र, विद्यापीठ परिसरात पुतळा उभारू नये अशी भूमिका काही आंबेडकरवादी संघटनांनी घेतली आहे. तर पुतळा तातडीने उभारण्याची मागणी मराठा संघटनांनी केली आहे. या संघटनांचे आंदोलन तीव्र झाल्यानंतर विद्यापीठाचे कामकाज विस्कळीत झाले. दररोज वेगवेगळ्या संघटनांची शिष्टमंडळे कुलगुरूंना घेराव घालत असल्यामुळे संरक्षण पुरवण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाने पोलिस आयुक्तांना केली होती. त्यानुसार विद्यापीठात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रमुख आंबेडकरवादी संघटनांनी पुतळ्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्यानंतर वाद निवळला आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन आभार मानले. विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण खराब होऊ नये म्हणून संरक्षणाची गरज होती. आंदोलनांमुळे विद्यार्थी व कर्मचारी वेठीस धरले गेले, अशी खंत चोपडे यांनी व्यक्त केली. तर विद्यापीठाचे शैक्षणिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना तडीपार करण्यात येईल असे यादव यांनी सांगितले. आतापर्यंत शहरात दोनशेपेक्षा अधिक गुंडांवर तडीपारीची कारवाई केली आहे. त्यामुळे कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करू, असे यादव यांनी कुलगुरूंना सांगितले. पोलिसांच्या भूमिकेबद्दल चोपडे यांनी समाधान व्यक्त केले.

दोन महिन्यांनंतर सलग दुसरी भेट
चौका येथील साई इंजिनीअरिंग कॉलेज सामूहिक कॉपी प्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी आयुक्तालय गाठले होते. दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा चोपडे यांनी आयुक्तालय गाठले. कुलगुरूपदाचा राजशिष्टाचार मोडून कुलगुरू पोलिस आयुक्तालयात गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. विद्यापीठाच्या कामासाठी आयुक्तांची भेट घेतल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले होते. आता यादव यांची भेट घेऊन चोपडे यांनी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पेट्रोल दरवाढीविरोधात निदर्शने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेट्रोल व डिझेल स्वस्तात देण्याचे आश्वासन देऊन भाजप सरकार सत्ताधारी झाले, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी असूनही देशात पेट्रोलचे दर वाढले आहेत. राज्य सरकारने दुष्काळ नसताना दुष्काळ कर आकारून पेट्रोल महाग केले. या प्रकाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर घसरलेले असतानाही देशात पेट्रोल व डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेत. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन भाजपप्रणित एनडीए सरकारने जनतेचा मोठा विश्वासघात केला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर न करता पेट्रोल-डिझेलवर वारेमाप दुष्काळ कर घेतला जात आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांचा खिसा कापणे बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली. सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अनुपमा पाथ्रीकर व शहराध्यक्ष मेहराज पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेविका अंकीता विधाते, सुनीता चव्हाण, छाया जंगले, मंजुषा पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाच्या सुपारीचे पैसे भिशीतून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पतीच्या खुनाच्या सुपारीचे १० हजार रुपये कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या भिशीतून दिल्याचे सांगितल्याने अधिक चौकशीसाठी पोलिसांनी शनिवारी भाग्यश्री लोणे - होळकर हिला जिल्हा परिषदेत आणले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांची चौकशी केली आणि अंतर्गत भिशीसाठी केलेले रजिस्टर ताब्यात घेतले. या घटनेच्या वेळी आरोग्य विभागासमोर प्रचंड गर्दी झाली होती.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील निलंबित कार्यालयीन अधीक्षक भाग्यश्री लोणे-होळकर हिने गेल्या आठवड्यात पतीचा सुपारी देऊन खून करून घेतला. सध्या ती पोलिस कोठडीत आहे. चौकशीदरम्यान खुनाच्या सुपारीसाठी दिलेले १० हजार रुपये कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या भिशीच्या पैशातून दिल्याचे भाग्यश्रीने पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावरून अधिक चौकशीसाठी पोलिस शनिवारी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा परिषदेत पोचले. मोबाइल व्हॅनमध्ये सोबत भाग्यश्री होळकरलाही आणले होते. ही वार्ता पाहता पाहता झेडपीत पसरली आणि गर्दी जमली. गर्दीसमोर तिने चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला. आरोग्य विभागात ती जिथे बसत होती तिथे पोलिसांनी नेले आणि आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांकडे भिशीबाबत विचारणा केली. पुढील तपासासाठी भिशी रजिस्टर ताब्यात घेतले. अर्ध्या तासानंतर पोलिस तिथून रवाना झाले. या प्रकारामुळे झेडपीत चर्चेला ऊत आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुथ्थूट’दरोड्यातील आरोपी ‘हर्सूल’मध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रोडवरील दूध डेअरीजवळ पोलिसांच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांनी मुथ्थूट फिनकॉर्पच्या कार्यालयात दरोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील पाच आरोपींना हैदराबाद येथे अटक करण्यात आली.
दरोड्याचा प्रयत्न फसल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी धूम ठोकली होती. याप्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी हैदराबाद येथून अटक करून शहरात आणले. शनिवारी न्यायालयात हजर केले असता ओळखपरेडसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मोहम्म्द शरीफ अब्दुल कादर कादरी (रा. १२७ रोड मालवाणी मालाड, मुंबई), अर्शद कुतुबोद्दिन खान (रा मुंबई), सैफोद्दीन उर्फ शफी नवाबोद्दिन सय्यद (रा. किराणी माळा, उस्मानाबाद), संतोष दशरथ वीरकर (रामनगर, उस्मानाबाद), मोहम्मद दस्तगीर मोहम्मद यासीन (रा. चंदनगुडा, हैदराबाद) अशी आरोपींची नावे आहेत. १४ मे २०१६ मुथ्थूट फिनकॉर्पच्या व्यवस्थापिका रिना रियाजू यांच्यासह दोन महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजास सुरू केली असता, दोन तीन जण कार्यालयात आले. त्यापैकी पोलिसांच्या वेशात असलेल्या इसमासह दोन जण व्यवस्थापिका रिना रियाजू यांच्या दालनात गेले. त्यांनी तुम्ही सोने गहाण ठेवताना ग्राहकाकडून कोणकोणती कागदपत्रे घेता अशी विचारणा केली. तसेच आमच्याकडे तुमच्या फायनान्स कंपनीत चोरीचे सोने असल्याची तक्रार असून तीन संशयित लोकांची माहिती पाहिजे म्हणत कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. रिना या कागदपत्रे दाखवित असताना कार्यालयात आलेल्या दोन जणांपैकी एकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यावर रियाजू यांनी आपल्या सहकारी हिमा बाबू यांना केरळी भाषेतून आपल्या कार्यालयात चोर आले असून, अलार्म वाजविण्याची सूचना केली. अलार्मचा आवाज एेकून नागरिक मदतीसाठी धावले. त्यावेळी पोलिसांच्या वेषात आलेल्या युवकाने आपल्या जवळीत रिव्हॉल्वर काढून आम्ही पोलिस आहोत, असे म्हणत दहशत निर्माण केली व त्याचा फायदा घेत सर्वांनी पळ काढला.

कट रचला; आश्रय दिला
पळ काढताना दरोडेखोरांनी कार्यालयातील संगणकाचा सीपीयू व इंटरनेटचे डोंगल चोरून नेले होते. आरोपी तेव्हापासून फरार होते. तसेच यातील आरोपींपैकी एकाने कट रचला व आरोपींना आश्रय दिला. या कारणाने या दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना हैदराबादहून अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images