Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

$
0
0

पालकमंत्र्यांच्या आदेशावरून सेना नगरसेवकांनी केले प्रशासनाला टार्गेट
भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
निलंबित अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेतल्यामुळे पालकमंत्री रामदास कदम यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला टार्गेट केल्याचे बोलले जात होते. या प्रकारामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकही कोंडीत पकडले गेले.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी निलंबित केले होते. या अधिकाऱ्यांच्या निलंबनाला पालकमंत्री रामदास कदम यांचे समर्थन होते. वेळोवेळी त्यांनी निलंबनाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. भ्रष्ट अधिकाऱ्यांना थारा देऊ नका, असेही त्यांनी बजावले होते. एक महिन्यापूर्वी बालाजीनगरात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात कदम यांनी पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना आदेश देताना निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत घेऊ नका, असे बजावले होते. पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर दोनच दिवसांत मुगळीकर यांनी निलंबित अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना पालिका सेवेत सामावून घेतले. त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्राम सोहळ्याच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वी कदम यांचे शहरात आगमन झाले होते. यावेळी त्यांनी काही नगरसेवकांबरोबर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेनुसार सर्वसाधारण सभेत निलंबित अधिकाऱ्यांच्या मुद्दावरून प्रशासनाला घेरण्याचे ठरविण्यात आले. त्याची जबाबदारी राजेंद्र जंजाळ यांच्यावर देण्यात आली. ठरल्याप्रमाणे जंजाळ यांनी सभागृहात निलंबित अधिकाऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला, पण सभागृहात नेहमी आक्रमकपणे विविध विषय मांडणारे शिवसेनेचे काही प्रमुख नगरसेवक उपस्थित नव्हते. नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, नितीन साळवी यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी जंजाळ यांची पाठराखण केली. याचवेळी भाजपच्या नगरसेवकांनी निलंबित अधिकाऱ्यांचा प्रश्न काढण्यास विषय पत्रिकेचा आधार घेऊन विरोध केला, त्यामुळे हे नगरसेवकही प्रशासनासोबत कोंडीत पकडले गेले.
अँटीचेंबरमध्ये निलंबनाचा निर्णय ?
निलंबित अधिकाऱ्यांच्या मुद्यावरून महापौरांनी सभा तहकूब केल्यावर महापौरांच्या अँटीचेंबरमध्ये चर्चा झाली. चर्चेच्या वेळी जंजाळ देखील उपस्थित होते. याचवेळी जंजाळ यांचे नगरसेवकपद एक दिवसासाठी निलंबित करण्याचे ठरविण्यात आल्याची चर्चा देखील पालिकेच्या वर्तुळात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कला शाखेकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अंतिम फेरी मंगळवारपासून (१८ सप्टेंबर) सुरू होत आहे. ही फेरी २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. सोमवारी रिक्त जागांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. दहा हजार ४१ जागा रिक्त आहेत. सर्वाधिक तीन हजार ७७४ रिक्त जागा कला शाखेच्या आहेत.

अंतिम फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने मागील आठवड्यात जाहीर केले होते. या फेरीत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले, परंतु काही अडचणीमुळे त्रुटी राहिल्या त्यांना १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन अर्जात बदल करण्याची मुभा होती, तर १८ सप्टेंबर रोजी रिक्त जागांची यादी जाहीर केली करण्यात आले. त्यानंतर आता ‘एटीकेटी’ विद्यार्थ्यांना १९ ते २५ सप्टेंबरपर्यंत या फेरीमध्ये ऑनालाइन क्लिक करून अॅलोकेशन मिळवता येईल. याचदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. ही फेरी २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

शहरात यंदा प्रथम अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होते आहे. नऊ जूनपासून प्रक्रिया सुरू आहे. अद्याप ती पूर्ण झालेली नाही. एवढ्या फेऱ्यांनंतरही रिक्त राहिलेल्या जागांचा आकडा मोठा आहे. दहा हजार ४१ जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमध्ये कला शाखा सर्वात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ विज्ञान विषयाच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण मोठे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने कॉलेज प्रशासनासमोरील अडचणी वाढल्याचे चित्र आहे, तर शिक्षण विभागाने प्रक्रियेला विलंब केल्याने जागा रिक्त राहिल्याचे कॉलेज प्रशासन ओरड करते आहे.

रिक्त जागा
कला शाखा..... ३७७४
वाणिज्य...........१३१७
विज्ञान.............३६१८
एमसीव्ही..........१३३२

एकूण कॉलेज....१०२
प्रवेश क्षमता......२४११०
रिक्त...............१००४१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमदार पावसाने मराठवाड्यातील टंचाई हटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळ आणि पाणीटंचाई हे शब्द मराठवाड्याला अंगवळणी पडले असले, तरी यंदा मराठवाड्यावर वरुणराजाने कृपा केल्याचे चित्र आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात अपेक्षित सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, आतापर्यंत विभागातील ७६पैकी २५ तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे, तर दहा तालुक्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

तब्बल ५० दिवस कोरडे गेलेल्या मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावणे सुरू केले आहे. लातूर (१०१.२६ टक्के), बीड (१०८.२४ टक्के) आणि उस्मानाबाद (१०८.२५ टक्के) जिल्ह्यात अपेक्षित सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जालना जिल्हाही अपेक्षित सरासरीच्या जवळ पोचला आहे. विभागातील २५ तालुक्यांमध्ये १०० टक्‍क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून, दहा तालुक्यांमध्ये ९० टक्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये निम्म्या मराठवाड्यात पाऊस वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे. वैजापूर (११४.४५), जालना (१००.२१), परतूर (१०५.८७), मंठा (१०९.८८), अंबड (१०९.६५), नांदेड (१०४.२३), मुदखेड (१०६.७७), बीड (११७.०४), पाटोदा (१५०.०७), आष्टी (१५२.८९), शिरुर कासार (१०५.५०), अंबेजोगाई (१०५.७८), केज (१२६.०८), धारूर (१२६.०८), लातूर (११५.४२), रेणापूर (१३७.१५), चाकूर (१०५.६५), निलंगा (११०.१४), देवणी (१०१.२८), शिरुर अनंतपाळ (१२४.११), उस्मानाबाद (१४१.०२), तुळजापूर (१०३.८८), उमरगर (१०७.८४), वाशी (११३.४३) व परंडा (१३८.११) तालुक्यांत आजपर्यंतच्या अपेक्षित सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

मराठवाड्यात परिस्थिती फारशी गंभीर नसली, तरी औरंगाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हे सरासरीत पिछाडीवर अाहेत. या जिल्ह्यांना परतीच्या पावसावर अवलंबून रहावे लागणार आहे. मराठवाड्यात मोसमामध्ये ७९९ मिलिमीटर अपेक्षित पाऊस असून, त्या तुलनेत १८ सप्टेबरपर्यंत विभागात ५५६.६८ (८६.३१ टक्के) पाऊस झाला आहे, मात्र औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यांतील तब्बल सात तालुक्यांमध्ये ६० टक्केही पाऊस झाला नाही. यामध्ये सोयगाव (५३.७१ टक्के), खुलताबाद (५३.५०), पालम (५६.४४), पाथरी (४९.२८), कळमनुरी (४९.५२), किनवट (५५.८७), माहूर (४१.५०), हिमायतनगर (४९.०९) व देगलूर (४५.३७) या तालुक्यांचा समावेश आहे. गेल्या महिन्याभरात झालेल्या दमदार पावसामुळे तुलनेत पिछाडीवर असलेल्या या तालुक्यांची स्थिती ५० टक्‍क्यांपेक्षा पुढे सरकली.

नऊ तालुक्यात ९० टक्‍क्यांपेक्षा अधिक
विभागात ९० टक्‍क्यांपेक्षा अधिक व शंभर टक्‍क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ९ आहे. यामध्ये सिल्लोड (९२.१७), घनसावंगी (९६.८४), औंढा नागनाथ (९८.५३), वडवणी (९७.६८), माजलगाव (९१.१४), औसा (९०.९४), अहमदपूर (९०.८१), कळंब (९०.८४), भूम (९७.६३) या तालुक्यांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांमध्ये या तालुक्यांचीही सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय पाऊस
जिल्हा.................टक्केवारी
औरंगाबाद.............७७.२३
जालना.................९६.२०
परभणी.................६९.९६
हिंगोली.................७१.७२
नांदेड...................६९.३२
बीड.....................१०८.२४
लातूरय.................१०१.२६
उस्मानाबाद............१०८.२५
(टक्केवारी सोमवारपर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून

$
0
0

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून
दहावी परीक्षा १ मार्च ते २४ मार्च दरम्यान
औरंगाबाद : दहावी, बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०१८मध्ये होणाऱ्या परीक्षा कधी होतील, याचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च दरम्यान होणार आहे. ‘फेब्रुवारी-मार्च २०१७’ परीक्षांच्या वेळापत्रकाचा विचार केला तर, एक आठवडा परीक्षांचे वेळापत्रक अलीकडे आले आहे.
मंडळाने संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. संभाव्य तारखांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. मंडळाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र (१२वी) परीक्षा २१ फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१८ दरम्यान होणार आहेत. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा १ मार्च २०१८ ते २४ मार्च २०१८ दरम्यान होणार आहेत. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतुने वेळापत्रक जाहीर केल्याचे मंडळाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्याच्या हेतुने शैक्षणिक वर्ष सुरू होताच वेळापत्रक माहित होत असे. २०१३ पासून मंडळ अशा प्रकारचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करते. यंदा अवेळापत्रक जाहीर होण्यासाठी सप्टेंबर उजाडावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाड कोसळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाभळीचे झाड अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बनेवाडीजवळ रविवारी मध्यरात्री घडली. विनोद राधेश्याम कार्डीवाल (वय ३०, रा. बनेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे.

या विषयी वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हे स्पेक्टरा ऑइल कंपनीचा मार्केंटिंग मॅनेजर म्हणून काम पाहत होते. त्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत. रविवारी मध्यरात्री शहरातील काम संपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी दुचाकीवर निघाले होते. यावेळी बनेवाडी गावाच्या अलीकडे त्याच्या अंगावर बाभळीचे झाड कोसळले. यामध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. गावातील एका नागरिकाला झाडामध्ये दुचाकीच्या लाइटचा प्रकाश दिसल्याने हा प्रकार लक्षात आला. वेदांतनगर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी मशीन बोलावून झाड बाजूला काढण्यात आले. विनोद यांना घाटीत हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विनोद उत्कृष्ट क्रिकेटपटू
विनोद हे उत्तम क्रिकेटपटू होते. शहरातील प्रीमियम लिग स्पर्धा; तसेच मुंबई येथील स्पर्धेत देखील ते खेळले होते. जॉन्टी म्हणून त्याची ओळख होती. मनमिळाऊ असलेल्या विनोदच्या मृत्यूमुळे बनेवाडी, पद्‍मपुरा भागात हळहळ व्यक्त होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडी बाजारात मोबाइल चोरांचा सुळसुळाट

$
0
0


सात मोबाइल लंपास
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जाधववाडी नवा मोंढा येथे रविवारी खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना मोबाइल चोरांचा चांगलाच फटका बसला. चोरट्यांनी सात घटनेत ८२ हजारांचे मोबाइल लंपास केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधववाडी येथील भाजी मार्केटमध्ये रविवारी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी संधी साधत चोरट्यांनी सात जणांचे मोबाइल लंपास केले. यामध्ये शिवाजी तुळशीराम जाधव (वय ४२ रा. मयुरपार्क) यांच्यासह अशोक निकम, सदाशीव तुपे, सौरभ सावजी, सुदाम जंगले, भुजंग बागडे व नरेंद्र मुळे यांचे मोबाइल लांबवण्यात आले. एकूण ८२ हजारांचे हे मोबाइल आहेत. याप्रकरणी शिवाजी जाधव यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीबी स्क्वॉड, चार्ली नावालाच
आठवडी बाजारातून मोबाइल चोरीस जाण्याच्या घटना सातत्याने घडतात. पोलिसांना हे प्रकार माहित असून देखील आठवडी बाजारात कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. पोलिस ठाण्याचे डीबी स्क्वॉड, चार्ली, गुन्हे शाखेच्या पथकांची आठवडी बाजारातील गस्त नावालाच दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अब की बार… जेब पे वार..’

$
0
0

‘अब की बार… जेब पे वार..’
पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
देशात गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलची भाव गगनाला भिडले असून या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी (१८ सप्टेंबर) निदर्शने केली.
पैठणगेट येथे झालेल्या निदर्शनाप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत दरवाढ ‌त्वरित कमी केली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी प्रदेश संघटक विजय साळवे, प्रदेश सरचिटणीस अभिषेक देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहर उपाध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनासाठी विकी चावरिया, पंकज जाधव, सुशील क्षिरसागर, विनोद पगारे, किशोर विटेकर, अब्दुल अलिम, जावेद खन, अतुल बीडकर, अनिल जाधव, राजेंद्र वाघमारे, प्रथमेश पाटील, राजेंद्र ढेपले, मोबिन शेख, अक्षय घुलक्षे, राज आव्हाड, प्रफुल्ल पाटील, वैभव बेडके, रवी जाधव, विक्की बनसोडे, कैलास सुरसे, मयुर चौधरी, नीलेश मातकर, अजित कासार, सोमेश्वर राठोड आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबनाचा वाद कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर सहा कर्मचारी वेगवेगळ्या कारणांवरून निलंबित आहेत. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्या तडकाफडकी निलंबनानंतर वाद निर्माण झाला आहे. सर्व निलंबित कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सेवेत सामावून घेण्याची मागणी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाने केली आहे. या मागणीमुळे निलंबित कर्मचाऱ्यांचा मुद्दा विद्यापीठ प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे.

सेवेतील अनियमितता आणि वैयक्तिक वादामुळे विद्यापीठ सेवेतील सहा कर्मचारी निलंबित आहेत. दोन प्राध्यापक आणि चार कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. काहीजण मागील चार वर्षांपेक्षा जास्त काळ निलंबित असून कपात वेतन मिळत आहे. न्यायालयीन प्रक्रिया क्लिष्ट असल्यामुळे विद्यापीठाकडून जोरकस बाजू मांडली जात नाही. शिवाय वादाच्या प्रकरणात सामोपचाराने तोडगा काढत नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. या अडचणीमुळे निलंबनाची प्रकरणे जास्त काळ प्रलंबित राहतात. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे निलंबन झाल्यानंतर निलंबनाचा मुद्दा चर्चेत आला आहे. वादग्रस्त निलंबन प्रकरणे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. रसायन तंत्रज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर गौरशेटे बुधवारी रुजू झाले. विभागातील वादामुळे त्यांना दीड वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करूनही रुजू करून घेत नसल्याने गौरशेटे यांनी जुलै महिन्यात विद्यापीठात उपोषण केले. विद्यापीठ प्रशासनाने एक सदस्यीय समिती नेमून ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल मागवला होता. समितीने अहवाल दिल्यानंतर प्रा. गौरशेटे यांना रुजू करून घेण्यात आले.

समिती नेमली
कुलसचिव पदावर निवड करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अर्ज मागवले आहेत. या पदासाठी २५ अर्ज आले असून कॅम्पसमधील एकही प्राध्यापक या पदासाठी इच्छुक नाही. मागील प्रक्रियेत कॅम्पसमधील अनेक प्राध्यापक पात्र होऊ शकले नव्हते. अर्जांची छाननी करण्यासाठी समिती नेमली जाणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई

$
0
0

निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत घेतल्याचा जाब विचारला
शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई
भाजप - शिवसेना आमनेसामने

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या निलंबित अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत घेतल्याचा जाब विचारणाऱ्या शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनाच महापौर भगवान घडमोडे यांनी एक दिवसांसाठी निलंबित केले. जंजाळ प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करीत असताना त्यांच्या पाठीशी शिवसेनेचे अन्य नगरसेवक उभे होते, तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी निलंबित अधिकाऱ्यांचा विषय न काढता सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर चर्चा करा, अशी मागणी केली. त्यामुळे सभागृहात भाजप - शिवसेना आमनेसामने आल्याचे चित्र होते.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कामातील अनियमीततेबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, लेखाधिकारी संजय पवार, नगररचना विभागातील उपअभियंता आर. पी. वाघमारे यांना निलंबित केले होते. विद्यामन आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी या सर्वांचे निलंबन रद्द करून विभागीय चौकशीच्या आधीन राहून या अधिकाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेतले. मुगळीकर यांनी घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत जाब विचारला. तेव्हा सुरुवातीला महापौर भगवान घडमोडे यांनी जंजाळ यांना बोलण्याची संधी देण्याचे टाळले, विषयपत्रिका सुरू आहे, त्यावर बोला असे ते म्हणाले. त्यामुळे जंजाळ संतापले. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करू नका, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना कामावर घेतले त्याबद्दल आम्हाला प्रशासनाकडून खुलासा हवा आहे, असे जंजाळ म्हणाले. यावर महापौरांनी तुम्ही बोला, प्रशासनाकडून मलाही खुलासा घ्यायचा आहे, असे सांगितले. त्यावर काँग्रेसचे अफसर खान, भाजपचे राजगौरव वानखेडे उभे राहिले. शासनाच्या पत्रानुसार आयुक्तांनी तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यावर चर्चा न करता विषय पत्रिका घ्या, अशी मागणी या दोघांनी केली. त्यामुळे महापौर भगवान घडमोडे यांनी पाच मिनिटांसाठी सर्वसाधारण सभा तहकूब केली. सभा तहकूब झाल्यावर महापौरांच्या अँटीचेंबरमध्ये महापौरांसह भाजपचे प्रमोद राठोड, दिलीप थोरात, राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ, आयुक्त मुगळीकर चर्चा करण्यासाठी एकत्र आले. दरम्यानच्या काळात सभागृहनेते गजानन मनगटे मात्र काही कामाच्या निमित्याने निघून गेले.

अँटीचेंबर मध्ये चर्चा झाल्यावर सर्वसाधारण सभा पुन्हा सुरू झाली. त्यानंतर दिलीप थोरात, राजू शिंदे यांनी प्रथम विषय पत्रिका घ्या, त्यानंतर चर्चा करा अशी मागणी केली. काँग्रेसचे अफसर खान यांनीही हीच मागणी लावून धरली. यावर महापौर म्हणाले, मी चर्चा करायला तयार आहे, या विषयावर चर्चा घडवून आणायची आहे. एमआयएमचे विकास एडके म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल महापौर काय निर्णय घेतात याकडे सर्व शहराचे लक्ष लागून आहे. त्यानंतर जंजाळ यांनी निलंबित अधिकाऱ्यांबद्दल शासनाचे आदेश काय आहेत, त्या अधिकाऱ्यांना रुजू करून घेण्याची कारवाई का केली, विभागीय आयुक्तांचे शपथपत्र काय आहे, कोर्टाचे आदेश काय आहेत असे प्रश्न विचारले. राजू शिंदे यांनी शिवसेनेला टार्गेट करून अधिकाऱ्यांवरील कारवाईचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला घोडेले यांनी विरोध केला. ते म्हणाले, सभागृहात पक्षाच्या किंवा नेत्याच्या नावाने बोलू नका आम्ही ते सहन करणार नाही. यावर जंजाळ म्हणाले, अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केले होते, आम्ही निलंबित केले नव्हते. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांचे निलंबन आयुक्तांनीच का रद्द केले याचा खुलासा झाला पाहिजे. महापौरांनी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना खुलासा करण्यास सांगितले. मुगळीकर यांनी शासनाचे पत्र वाचून दाखवले. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले, त्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी मी सुरू केली. त्यानंतर या चौकशीच्या निर्णयाच्या आधीन राहून अधिकाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेत कामाचा व्याप आणि निकड लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांना सेवेत घेताना त्यांच्यावर काही बंधने घातली आहेत. आयुक्तांच्या खुलाशामुळे जंजाळ यांचे समाधान झाले नाही. त्यांनी महापौरांच्या समोरचा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापौरांनी जंजाळ यांचे नगरसेवकपद एक दिवसासाठी निलंबित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रेस्तराँचे जीएसटी दर कमी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हॉटेल, रेस्तराँचा एसी व नॉन एसी असा भेद न करता जीएसटी दर कमी करावेत, अशी मागणी हॉटेलचालकांनी जीएसटी विभागाच्या सह आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे केली आहे.

देशात एक जुलैपासून सर्वत्र जीएसटी लागू झाला. यात नॉन-एसी हॉटेलसाठी १२ टक्के, तर एसी हॉटेलसाठी आणि मद्याचा परवाना असलेल्या हॉटेलसाठी १८ टक्के, तर पंचतारांकित हॉटेलसाठी २८ टक्के कर आकारला. ही आकारणी जास्त असल्याची ओरड होत आहे. त्यात अनेक हॉटेल्समध्ये एखाद्या भागातच एसी लावला जातो, तर उर्वरित परिसर नॉन एसी असतो, मात्र अशा ठिकाणी सरसकट १८ टक्केच जीएसटी आकारला जातो. त्यामुळे नॉन एसीत बसलेल्या ग्राहकांच्या बिलातही १८ टक्के जीएसटी समाविष्ट करावा लागत आहे. त्यामुळे अनेकदा ग्राहक नाराज होतात, वादही होतो. गैरसमज दूर करण्यासाठी नियम समजावून सांगावे लागतात. स्पष्टीकरण द्यावे लागत आहे त्यामुळे सर्व हॉटेलसाठी सरसकट १२ टक्के जीएसटी लागू करावा, अशी मागणी हॉटेलचालकांनी केली आहे, अशी माहिती हॉटेल व्यावसायिक किशोर शेट्टी यांनी दिली. वेस्टन इंडिया हॉटेल्स असोसिएशनसह अन्य संघटनांमार्फत अर्थमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती औरंगाबाद हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होळकर खूनप्रकरण; चौघांच्या कोठडीत शनिवारपर्यंत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा परिसरातील बँक व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर खून प्रकरणात होळकर यांची पत्नी व प्रमुख आरोपी भाग्यश्रीसह चौघा आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत (२३ सप्टेंबर) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी दिले. सखोल तपासासाठी पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आल्यानंतर चौघांच्या कोठडीमध्ये वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेकटा गावातील शाखा व्यवस्थापक जितेंद्र होळकर यांचा शुक्रवारी मध्यरात्री अडीचला हात-पाय बांधून व गळा चिरून खून करण्यात आला होता. मात्र अवघ्या २४ तासांत होळकर यांचा खून पत्नी भाग्यश्रीसह चौघा आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने व दीर्घ कुटील कारस्थान रचून केल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी आरोपी भाग्यश्री जितेंद्र लोणे-होळकर (रा. छत्रपती नगर, सातारा, औरंगाबाद), आरोपी किरण काशिनाथ गणोरे (रा. नारळीबाग, औरंगाबाद), आरोपी शेख तोशिफ शेख इब्राहिम (रा. जुना बाजार, औरंगाबाद) व आरोपी शेख हुसेन उर्फ बाबू शेख बशीर (रा. आजीम कॉलनी, औरंगाबाद) यांना अटक करुन सोमवारी (११ सप्टेंबर) कोर्टात हजर केले असता, चौघा आरोपींना सोमवारपर्यंत (१८ सप्टेंबर) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, झालेल्या तपासाबाबत समाधान व्यक्त करून पुढील सखोल तपासासाठी चौघा आरोपींच्या पोलिस कोठडीत २३ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

आरोपींच्या मोबाइलचा डेटा तपासणार
पोलिस कोठडीदरम्यान अनेक पैलू उघडकीस आले. खुनाची सुपारी देण्यासाठी भिशी जमा केली होती. त्यातून मिळालेले १० हजार रुपये आरोपी किरण गणोरेला देण्यात आले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांना भाग्यश्रीच्या मोबाइलचा डेटा तपासावयाचा आहे, आरोपींनी व्हॉटसअ‍ॅपवर काही संदेश पाठवले आहेत का, अन्य कोणाशी संपर्क केला होता का, याचा शोध घ्यावयाचा असल्यामुळे पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती करण्यात आल्यानंतर कोर्टाने आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा हजारांची लाच घेताना जिन्सीचा जमादार गजाआड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्राध्यापकाकडून पंधरा हजाराची लाच घेताना जिन्सी पोलिस ठाण्याचे जमादार गजानन तुपे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता लिटिल फ्लॉवर शाळेसमोर ही कारवाई करण्यात आली.

या घटनेतील तक्रारदार हे प्राध्यापक आहेत. त्यांच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज आला होता. या तक्रारीचा तपास जमादार गजानन आत्माराम तुपे याच्याकडे होता. या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तुपे यांनी प्राध्यापकला पंचवीस हजाराची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने प्राध्यापकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची पडताळणी केली असता तडजोडीअंती जमादार तुपे यांनी पंधरा हजाराची लाच मागितली होती. त्याने सोमवारी सायंकाळी मिलिंद चौकातील लिटिल फ्लॉवर शाळेसमोरील नॅशनल हॉटेल येथे लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. पोलिसांनी सायंकाळी या ठिकाणी सापळा रचत लाच घेताना जमादार तुपे याला अटक केली. पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उप‌अधीक्षक किशोर चौधरी, वर्षाराणी पाटील, पोलिस निरीक्षक अनिता वराडे यांनी सापळ्याचे नियोजन केले. हा सापळा कर्मचारी दिलीपसिंग राजपूत, गणेश पंडूरे, संदीप आव्हाळे, अश्वलिंग होनराव, मिलिंद इप्पर व संदीप चिंचोले यांनी यशस्वी केला. आरोपी गजानन तुपेविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ थंड डोक्याने वर्धनचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वर्धन घोडे या दहा वर्षीय मुलाचा पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करणाऱ्या दोन आरोपींपैकी एका आरोपीचा नियमित जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. तपकिरे यांनी फेटाळला. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे हाती लागले असून, आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने खून केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केला. तो ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला.

टिळकनगरातील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून २७ फेब्रुवारी २०१७ रोजी वर्धन विवेक घोडे या दहा वर्षीय मुलाचे पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्याला दौलताबाद घाटामध्ये कारने नेऊन त्याचा गळा आवळून खून केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून खून करणाऱ्या अभिलाष सुधीर मोहनपूरकर (रा. टिळकनगर) व श्याम लक्ष्मण मगरे (रा. तडगूर, ता. मदनूर, जि. निजामाबाद, ह. मु. टिळकनगर) या दोघांना २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या होत्या. त्या दोघांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून ६२३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, अभिलाष सुधीर मोहनपूरकर याने अ‍ॅड. अशोक ठाकरे यांच्यामार्फत नियमित जामीन मिळण्यासाठी जिल्हा कोर्टात अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी, गुन्हा गंभीर असून थंड डोक्याने खून करण्यात आल्याचे व त्याचे सबळ पुरावे सापडल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

रक्ताचे डाग कपड्यांवर
मृताच्या रक्ताचे डाग आरोपींच्या कपड्यांवर आढळून आले आहेत. तसेच आरोपींनी वर्धनचा खून करुन मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये ठेऊन ते खंडणीची मागणी करीत होते, हेही तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आरोपी अभिलाष याला जामीन मंजूर करू नये, अशी विनंतीही विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केली. हा युक्तीवाद मान्य करुन कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘दंगल’मुळे वाढला कल

$
0
0

‘दंगल’मुळे वाढला कल
काका पवार यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे कुस्ती क्षेत्राकडे मुलींचा कल वाढला असून त्याला वलय प्राप्त झाले आहे. पालकांनाही आपल्या मुलीने कुस्तीचा आखाडा गाजवावा, असे वाटू लागले आहे. मागील काही वर्षांत भारतीय महिला कुस्तीपटूंनी महिला कुस्तीला प्रतिष्ठा निर्माण करून दिली होती, ती दंगलमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली, असे मत अर्जुन पुरस्कार विजेते माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू काका पवार यांनी येथे केले.
डाक विभागाच्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनानंतर बोलतना पवार म्हणाले, ‘दंगल आणि सुलतान या चित्रपटांनी कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पुरातन काळापासून देशात कुस्तीला एक वेगळे स्थान आहे. परंतु, कुस्तीचा आखाडा केवळ पुरुषांसाठीच आहे असा समज होता. ‘दंगल’ चित्रपटाने भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मुलींना कुस्तीचा आखाडा मिळवून दिला. मुलींच्या कुस्तीला या चित्रपटाने मोठी चालना मिळाली. सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटाने युवा वर्गात कुस्तीबद्दल आकर्षण निर्माण केले.’
रिओ ऑलिंपिक स्पर्धेत महिला खेळाडूंनीच पदके जिंकली. कुस्तीपटू साक्षी मलिकनेही पदक जिंकले. त्यापूर्वीही सुशील कुमार व योगेश्वर दत्तने कुस्तीमध्ये ऑलिंपिक पदक मिळवले होते. रिओ ऑलिंपिकवेळी झालेल्या राजकारणाचा फटका खेळाडूंना बसला. सुशील कुमार व नरसिंग यादव यांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला. अखेर हे दोघेही ऑलिंपिकमध्ये सहभागी झाले नाहीत. पर्यायाने देशाचे पदक हुकले, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, पुणे या ठिकाणी दर्जेदार कुस्तीपटू घडत आहेत. त्याचवेळी मराठवाड्यातील कुस्ती कुठे आहे, असा प्रश्न पडतो. मराठवाड्यात गुणवान कुस्तीपटू आहेत. परंतु, त्यांना प्रशिक्षणाची मोठी उणीव जाणवते. प्रशिक्षकाबरोबरच मॅटची सुविधाही आता महत्त्वाची आहे. जगभरात मॅटवरच कुस्ती खेळली जाते. मॅटशिवाय कु्स्तीला आता पर्याय नाही. परंपरेत अडकून न जाता आता मॅटवरील कुस्ती स्वीकारली पाहिजे. तरच कुस्ती क्षेत्रात प्रगती करणे शक्य आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
कुस्ती लीग स्पर्धेचा उदयोन्मु्ख कुस्तीपटूंना चांगला फायदा होत आहे. कुस्तीपटूंसमोर विविध खर्च भागवण्याचे मोठे आव्हान असते. आहारावर त्यांचा मोठा खर्च होतो. शिवाय स्पर्धेला जाण्याच्या खर्चही आता मोठा आहे. कुस्ती लीगमुळे खेळाडूंची आर्थिक परिस्थिती सुधारत असून ही चांगलीच गोष्ट आहे. शिवाय प्रायोजकांचेही कुस्तीकडे लक्ष वाढत आहे. त्याचा फायदा खेळाडूंना निश्चितच होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोट...
जुन्या वस्तादांनी तालिमींना वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मराठवाड्यात गुणवान कुस्तीपटूंची कमतरता नाही. शालेय पातळीवरच कुस्ती प्रशिक्षक नसतील, तर कुस्तीपटू कसे घडणार, हा प्रश्न आहे. त्याबरोबरच मॅटची सुविधा गावपातळीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.
- काका पवार, अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन दरवाढीच्या विरोधात लातुरात निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
इंधन दर वाढीच्या विरोधात दोन्ही काँग्रेस रस्त्यावर उतरले. लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र आंदोलने केले. येत्या काळात दरवाढीला आळा न बसल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
क्रुड ऑईलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत असताना केंद्र आणि राज्य सरकार अवाजवी कर लावून सामान्य जनतेस लुटत आहेत. गेल्या काही महिन्यापासून इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यात १६ रुपयांपेक्षा जास्त किमंतीने इंधन दरात वाढ झालेली आहे. एक्साईज ड्युटी २१ रुपये, दुष्काळ कर ११ रुपये, व्हॅट १६ रुपये या किंमती ८० रुपयापर्यंत का नेल्या आहेत असा सवाल करण्यात आला. त्याच प्रमाणे राज्य सरकार २७ रुपये, केंद्र सरकार २२ रुपये प्रतिलिटर जनतेकडून उकळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अतिरीक्त दरवाढ मागे घेण्यात आली नाही तर जनआंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला.
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे चंदन पाटील-नागराळकर, बाबासाहेब पाटील, मकरंद सावे, पप्पु कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने निवेदन दिले.
काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अशोक गोविंदपूरकर यांच्या नेतृत्वाखाली बार्शी रोडवरील पेट्रोल पंपासमोर निदर्शने केली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना निवेदन देण्यात आले. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईचा आलेख वेगाने वाढणार असून अन्नधान्य, दुधापासून सर्वच जीवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. तसेच या दरवाढीचा थेट परिणाम उद्योग व्यवसायावर होणार असून माल वाहतूकही महागणार आहे. यासाठी महाराष्ट्र व केंद्र सरकार जबाबदार असल्याने त्याचा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निषेध करण्यात आला.
या आंदोलनात काँग्रेसचे माजी अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, मनपा सभापती अशोक गोविंदपूरकर, मनपा विरोधी पक्ष गटनेते अॅड. दीपक सूळ, महिला शहर अध्यक्षा सपना कीसवे, महेश काळे, नेताजी बादाडे, अॅड. फारूक शेख, पप्पू देशमुख, प्रमुख अल्ताफ शेख, सिकंदर पटेल, रत्नदीप अजनीकर, प्रवीण घोटाळे, नगरसेवक सचिन बंडापल्ले, सय्यद इम्रान, अयूब मनियार, दत्ता सोमवंशी, शैलेश बोइनवाड, योजना कामेगावकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ गुणवत्ता विकत मिळत नसते, निर्माण करावी लागते

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
आजचा काळ हा फक्त गुणवत्तासाठीचा आहे. तुमच्याजवळ कितीही पैसे असतील तरीही गुणवत्ता विकत घेता येत नाही, ती फक्त काबाड कष्टाने, जिद्दीने मिळवावी लागते. गुणवत्तेला श्रीमंती किंवा गरिबी माहिती नसते. गुणवत्ता ही बाजारात विकत मिळत नाही, ती निर्माण करावी लागते असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी मांडले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये सोमवारी २३ व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभागामार्फत आयोजित गुणगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी या व्यासपीठावर भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी संघनायक सुभेदार संभाजी कदम, प्रभारी कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे , क्रीडा विभागाचे संचालक मनोज रेड्डी, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा अमरजितसिंग यांची विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थी विकास विभागातर्फे विविध युवक महोत्सवामध्ये पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, संघव्यवस्थापक, प्रशिक्षक यांचा सत्कार तसेच उत्कृष्ट वार्षिक अंक पारितोषिक आणि इतर विविध स्पर्धा प्रमाणपत्राचे वितरण यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर क्रीडा विभागातर्फे अखिल भारतीय अंतर विद्यापीठ व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे मार्गदर्शक, व्यवस्थापक, प्राचार्य यांचा गौरव करण्यात आला.
पुढे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि खेळावर विद्यापीठाची पत अवलंबून असते. इतर राज्यात जाऊन जर संघाने उत्कृष्ट कामगीरी केली तर तिथे त्या विद्यापीठाच्या नावाचा दबदबा निर्माण होतो. स्पर्धेमध्ये हार जीत तर होतच असते पण जिंकलो म्हणून हुरळून जाऊ नये आणि हरलो म्हणून जिद्द सोडू नये. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ देशाच्या इतर कोणत्याही विद्यापीठापेक्षा कमी नाही. चांगला नागरिक आणि गुणवान विद्यार्थी यावर देशाची प्रगती अवलंबून आहे.’
सुभेदार संभाजी कदम म्हणाले, ‘जीवनात शारीरिक संपत्ती सर्वात महत्त्वाची आहे. पैसा येतो जातो श्रीमंती येते जाते पण शारीरिक संपत्ती चांगली टिकवून ठेवणे हे आपल्याच हाती असते. खेळामुळे हे सर्व शक्य आहे. खेळामुळे तुम्हाला शारीरिक संपत्तीसह प्रतिष्ठा, नौकरी आणि पैसेही मिळतात. त्यामुळे खेळाकडे विशेष लक्ष द्या.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाशा पटेल यांची जामीनावर सुटका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
येथील एका पत्रकाराला शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा माजी आमदार पाशा पटेल यांच्या विरोधात विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी दुपारी पटेल यांना अटक करून त्यांची जामीनावर सुटका केली.
शनिवारी पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी औसा रोडवरील विश्रामगृहातील एका कक्षात पत्रकार विष्णु बुरगे यांनी त्यांना उद्देशून शेतकऱ्याची वाट लावली असे म्हटले होते. त्यानंतर पटेल यांनी या पत्रकाराला शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी बुरगे यांच्या फिर्यादीवरून रविवारी विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पाशा पटेल यांच्या विरोधात नोंदवलेला गुन्हा दखल पात्र आणि तोही जामीनपात्र असल्यामुळे सोमवार दुपारी विवेकानंद ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिस ठाण्यातच त्यांचा एका शेतकऱ्यांने जामीन घेतल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती पाशा पटेल यांचे वकील अॅड. आकाश जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० टीएमसीकरिता कालबद्ध कार्यक्रम आखा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
दमणगंगेचे ५० टीएमसी (पाच अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून ते मराठवाड्याला उपलब्ध करन देण्यासाठी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेचे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी स्वागत केले आहे. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालात समावेश करून हे कालबद्ध कार्यकम आखावा, अशी मागणी देखील अ‍ॅड. देशमुख यांनी केली आहे.
मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे नार-पार-तापी आणि दमण गंगा पिंजाळ खोऱ्यातील एकूण ११३ टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या हक्काचे असून ते गुजरातला देऊ नये. हे पाणी गोदावरी खोऱ्यात सोडावे या मागणीसाठी वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री औरंगाबाद येथे येणार असल्याने अ‍ॅड. देशमुख यांनी त्यांना पत्राद्वारे दमणगंगेचे पाणी गुजरातला देण्यास विरोध करावा आणि गोदावरी खोऱ्यात सोडावे, अशी मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी ५० टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याची केलेली घोषणा हा परिषदेच्या पाठपुराव्याचाच विजय असून मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकतेचे दर्शन घडविले आहे. मात्र, आजवरचा अनुभव लक्षात घेता प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अ‍ॅड. देशमुख यांनी सांगितले.
अ‍ॅड. देशमुख यांनी मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि दमणगंगेबाबत निवेदन दिले. त्यावेळी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संजय केणेकर, डॉ. भागवत कराड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे लवकर घ्यावी आणि मराठवाडा जनता विकास परिषदेच्या सादरीकरणाला वेळ द्यावा अशी विनंतीदेखील यावेळी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करतानाच ही घोषणा प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी कालबद्ध कार्यकम आखावा यासाठी पाठपुरावा करणार आहे. मराठवाड्याबाबतच्या घोषणांच्या अंमलबजावणीबद्दल नेहमीच विलंब होतो. या ५० टीएमसी व्यतिरिक्त एकूण ११३ टीएमसी पाण्याबाबत आग्रही राहणार आहोत.
-अ‍ॅड. प्रदीप देशमुख, अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वकर्मा समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
‘सामाजिक एकात्मतेसाठी समर्पक भावनेने विश्वकर्मावंशीय समाज उन्नतीसाठी व अन्यायाविरुद्ध सदैव प्रयत्नशील राहणार आहे,’ असे प्रतिपादन विश्वकर्मावंशीय समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नागोराव पांचाळ यांनी केले. वेरूळ येथे विश्वकर्मा पूजनदिन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. त्यावेळी पांचाळ बोलत होते.
संघटनेतर्फे वेरूळ येथे दोन वर्षांपासून सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. विश्वकर्मा मंदिर येथे होमहवन, यज्ञ, अभिषेक, धर्मध्वजरोहण हे उपक्रम आचार्य श्री श्री शिवात्मनंद सरस्वती (बंगळुरू), स्वामी अमरदास बापू (राजस्थान), अभादास आचार्य (गुजरात), स्वामी जगदीश गुरुजी पांचाळ (मध्यप्रदेश), महंत हर्षानंदगिरी (नासिक), स्वामी महेंद्रबापू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निघालेल्या विश्वकर्मा यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीत रत्नागिरी येथून आलेल्या महिला ढोल ताशा पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वेरूळ येथील प्राचीन मंदिराचा नामफलकाचे महंताच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दत्ताजी भाले रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
अभयदासजी महाराज यांनी विश्वकर्मा समाजाचे राष्ट्र निर्माणातील महत्त्व विषद केले. डॉ. चक्रपाणी चोपोवार लिखित ‘भारतीय संस्कृतीचे संवर्धक विश्वकर्मा शिल्पकार’ व ‘समाज अडला कुठे’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष बालाजी खरडे पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय बोराडे, विवेकानंद सुतार, अविनाश गव्हाणकर, संजय दीक्षित, योगेश हिवलकर, भास्कर जंजाळकर, सुनील जाणवे, काशिनाथ फुलंब्रीकर, दिलीप दीक्षित यांनी परिश्रम घेतले.

राज्यातून उपस्थिती

संगीतकार विष्णू महाराज सूर्यवंशी यांचे तबला वादन, शाहीर विजय पांडे यांचे सप्तखंजिरी वादन, राष्ट्रीय ओबीसी जणगणना परिषदेचे श्रावण देवरे याचे व्याख्यान, समाजातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात कोकण, मुबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातून समाज बांधव उपस्थितीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी मैदानाची वर्षभरापासून दुर्दशा

$
0
0


झेडपी मैदानाची वर्षभरापासून दुर्दशा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराच्या मध्यवर्ती भागात औरंगपुरा जिल्हा परिषद मैदान आहे. या मैदानावरील फटाका मार्केटला आग लागल्यापासून या मैदानाची रया गेली आहे. वर्षभर या मैदानावर विविध कार्यक्रम असल्याने खेळाडूंना जागा असून देखील खोळंबा होत आहे.
जुन्या शहरात मुलांना खेळण्यासाठी मोजकीच मैदाने आहेत. यामध्ये सरस्वती ‌भुवन शिक्षण संस्थेचे मैदान, मराठवाडा सांस्कृतिक मैदान व औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदान यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद मैदानापूर्वी फक्त खेळण्यासाठी वापरण्यात येत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मैदानावर इतर कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. परिणामी परिसरातील मुले व तरुणांना या मैदानाचा असूनही उपयोग होताना दिसत नाही.
गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दिवाळीच्या काळात फटाका मार्केट भरवण्यात येत होते. मात्र, गेल्या वर्षी या फटाका मार्केटला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. यामध्ये मैदान देखील काळे पडले असून त्याची रया गेली आहे. तरीही मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये मंडप टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात येतात. कार्यक्रम झाल्यानंतर हे खड्डे बुजवण्याचे देखील सांमजस्य आयोजकांकडून दाखविण्यात येत नाही. त्यामुळे मैदानावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच दिसून येतात. लहान मुले खेळत असताना खड्ड्यात पाय अडकून अपघाताचा धोका देखील नाकारता येत नाही. अनेकवेळा राजकीय मंडळीकडून या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे परिसरातील सामान्य नागरिक विनाकारण त्रास नको म्हणून या कार्यक्रमाला विरोध करणे टाळतात. जिल्हा परिषद प्रशासनाने इतर कार्यक्रमांना मैदान देण्याऐवजी केवळ खेळाडू व लहान मुलांकरीता मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी येथील परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images