Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हज हाऊसचे कंत्राट रद्द

$
0
0

हज हाऊसचे कंत्राट रद्द
सिडको काढणार नवीन निविदा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
हज हाऊसचे बांधकाम निश्चित केलेल्या अवधीत पूर्ण न झाल्याने अखेर यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट सिडकोने रद्द केले आहे. गेल्या सोमवारी हे कंत्राट रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सिडकोमधून देण्यात आली.
हज हाऊसचे काम एक अाॅगस्‍ट २०१७ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. सध्या दोन स्लॅबसह अन्य काही काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण न झाल्याने सिडको प्रशासनाने या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सिडको बोर्डाकडे सादर केला होता. बोर्डानेही या प्रस्तावाला मंजुरी दिली.
हे कंत्राट रद्द करून नवी निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी चार ते सहा महिन्यांचा अवधी लागेल. त्यानंतर नवीन कंत्राटदाराकडून या इमारतीच्या कामाला पुन्हा सुरुवात होईल.

हज हाऊसचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी सिडकोकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, कंत्राटदाराकडून काम होत नसल्याने अखेर ते कंत्राट रद्द करण्यात आले. नवीन निविदा प्रक्रिया झाल्यानंतर हज हाऊसचे काम वेगात पूर्ण करून घेण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.
ओमप्रकाश बकोरिया, ‌प्रशासक, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षाचालकाला लुटणारे दोन आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिक्षाचालकाला चाकुचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या दोघांना सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजता कलाग्रामजवळ घडली होती. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
योगेश उत्तम चव्हाण (वय २१, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) हे रिक्षाचालक शनिवारी रात्री साडेआठ वाजता प्रोझोन मॉलमार्गे संजयनगर येथे कलाग्राम समोरून जात होते. यावेळी दोन अनोळखी तरुणांनी अडवून चाकुचा धाक दाखवला व हजार रुपये बळजबरीने काढून घेतले होते. याप्रकरणी योगेशने सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, योगेशने सांगितलल्या वर्णनावरून या आरोपींचा शोध सुरू होता. या गुन्ह्यामध्ये रवींद्र आसाराम शेजुळ (वय २१, रा. त्रिवेणीनगर) याचा हात असल्याची माहिती खबऱ्याने पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना दिली. पोलिसांनी रवींद्रला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अरविंद सोपान साबळे (वय २४, रा. गौतमनगर) याच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे मुनीर पठाण, राम हत्तरगे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेट बँक कर्मचाऱ्याने हडपले दहा लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
शहरातील भारतीय स्टेट बँकेतील रोखपालाने खातेदारांच्या खात्यावरून रक्कम परस्पर काढून अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपहार एकूण ९ लाख ८९ हजार रुपयांचा आहे. संशयित आरोपीचे नाव चंद्रभान परभत भडाईत असून तो सेवानिवृत्त आहे.
भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक सुयोग अमृत नगरदेवळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ ऑक्टोबर २०११ ते २२ नोव्हेंबर २०१४ या काळात हा अपहार करण्यात आला. खातेदार ताराबाई रोहिदास लांडगे यांच्या खात्यातून ६ लाख २८०० रुपये, शंकर धर्मा गायकवाड यांच्या खात्यातून एक लाख ३५ हजार व नामदेव चत्रू राठोड यांच्या खात्यातून दोन लाख २९ हजार रुपये, असे एकूण ९ लाख ८९ हजार रुपये चंद्रभान परभत भडाईत याने परस्पर काढून घेतले. ही बाब बँक तपासणी अहवालात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे.
संशयित आरोपीने बँकेत स्वतःचा आयडी वापरून बँकेची व खातेदाराची फसवणूक केल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात कलम ४२०नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अस्मान शिंदे हे करत आहेत.

तीन वर्षानंतर गुन्हा

शंकर धर्मा गायकवाड (रा. भिल पलटण, कन्नड) हे कन्नड सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्याचे निवृत्ती वेतनाची रक्कम भारतीय स्टेट बँकेतील खात्यात जमा होत होते. ते रक्कम काढण्यासाठी १० जून २०१५ रोजी बँकेत गेले असता खात्यावरील पैसे काढल्याचा प्रकार लक्षात आला होता. ताराबाई रोहिदास लांडगे या शहीद जवानाच्या पत्नी असून त्यांच्या खात्यातील रक्कम सुद्धा परस्पर काढण्यात आली होती. हा प्रकार २०१४ साली उघडकीस आला होता. मात्र, बँक व्यवस्थापनाने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. दरम्यान, या प्रकरणी तीन वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपीसी’साठी आज मतदान

$
0
0

‘डीपीसी’साठी आज मतदान
उद्या मतमोजणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) ४० सदस्य निवडीसाठी बुधवारी (२० सप्टेंबर) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्र उभारण्यात येणार असून २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येतील.
जिल्हा नियोजन समितीवर मनपातील १३, जिल्हा परिषदेतील २४ आणि नगरपालिकांमधील ३ सदस्य असे एकूण ४० सदस्य निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. निवडणुकीत २९३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. बॅलेटपेपरद्वारे पसंती क्रमांक टाकून मतदान होईल.
निवडणुकीसाठी अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, देवेंद्र कटके, दीपक चव्हाण हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाडाखोड करुन फसवणूक; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाच्या ताब्यात असणाऱ्या भागिरथी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या नक्कल अर्जात खाडाखोड करुन शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला शुक्रवारपर्यंत (२२ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी दिले. सागरसिंग गुसिंगे, असे त्याचे नाव आहे.
या प्रकरणी न्यास नोंदणी कार्यालयातील अधीक्षक संजय सुरेशचंद्र जोशी यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पाच जानेवारी रोजी वकील व संशयित आरोपी राहुल एकनाथ शिंदे (वय ३९, रा. भीमनगर, भावसिंगपुरा, औरंगाबाद) याने भागिरथी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या कागदपत्रांची नक्कल घेण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात अर्ज केला होता. मात्र शिंदे याने धमार्दाय सहआयुक्त कार्यालयातील अधीक्षक ल. प्र. थोरात व कनिष्ठ लिपिक सागरसिंग कचरुसिंग गुसिंगे (वय ३८, रा. गजानन मंदिर कडा ऑफीस) यांना हाताशी धरून बनावट कागदपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याचे धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीत समोर आले होते. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी सागरसिंग गुसिंगे याला अटक करून मंगळवारी (१९ सप्टेंबर) कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती निवारण यंत्रणा पैठणमध्ये सज्ज ठेवा

$
0
0

अतिवृष्टिचा इशारा व जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सोमवारी पैठण तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. संभाव स्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
जायकवाडी धरणातून १९९० व २००६मध्ये पाणी सोडल्यानंतर पैठण शहर व तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील १५ गावे, बीड, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातील गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. सध्या जायकवाडी धरणात सुमारे ९० टक्के पाणीसाठा असून कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडले जाऊ शकते. या परिस्थितीत वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. या बैठकीला तहसीलदार महेश सावंत, पोलिस निरीक्षक अशोक गिरी, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, महावितरणचे अभियंता रवींद्र गायकवाड, आरोग्य विभागाचे अधिकारी वाघ, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. धनशेट्टी, धरण शाखा अभियंता अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश मोरे, सहाय्यक निबंधक श्रीराम सोन्ने, पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि महेश आंधळे, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर पायघन, नायब तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, आनंद बोबडे आदी अधिकारी उपस्थित होते.

या मुद्द्यांवर चर्चा

संपर्क साधने, पोहणाऱ्याचे पथक तैनात करणे, स्वयंसेवी संस्थांची मदत, जेसीबी, पोकलेन, हायवा, गॅसकटर याचा आढावा घेण्यात आला. कठीणप्रंसगी आपदग्रस्तांच्या वाहतुकीसाठी एसटी बस यंत्रणा कार्यान्वित करणे, शाळा, महाविद्यालये, मठ, धर्मशाळा, मंदिर ताब्यात घेऊन पूर बाधितांची तात्पुरती व्यवस्था, पोलिसांची गस्त वाढविणे या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. या काळआत अन्नधान्याचा मुबलक साठा ठेवण्याच्या सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापूस व्यापाऱ्यासा चौदा लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कापूस खरेदी करून पैसे न देता शहरातील कापस व्यापाऱ्याची १४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार एप्रिल २०१५मध्ये घडला. याप्रकरणी अहमदाबाद येथील व्यापाऱ्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखिलेश शांतीलाल सोनी (वय ४३ रा. शांती व्हिला, एन ३) व त्यांचे भाऊ जगदीश शांतीलाल सोनी यांची रेणुका कॉटन कंपनी आहे. सोनी बंधू कापूस गाठी खरेदी-विक्री करतात. सोनी बंधुकडे मार्च २०१५ मध्ये अहमदाबाद येथील कापूस व्यापारी जगदीश एम. सोनी यांनी संपर्क साधला. त्यांच्यात कापसाच्या १०० ते २०० गाठी पाठवण्याबाबत चर्चा झाली. पण, जगदीश एम. सोनी यांच्याशी नवीन संपर्क असल्याने अखिलेश सोनी यांनी विश्वास ठेवला नाही. परंतु, जगदीश एम. सोनी यांनी कापूस पाठववा व वेळेवर रक्कम देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, अखिलेश सोनी यांनी ९ एप्रिल २०१५ रोजी जगदीश एम. सोनी यांनी सांगितल्याप्रमाणे प्रताप स्पिन टेक्स लि. मोहरा, अंबाला, हरियाणा या कंपनीला १४ लाख रुपयांच्या १०० कापूस गाठी पाठवल्या. त्यापोटी जगदीश एम. सोनी हे दोन दिवसात आरटीजीआरसद्वारे बँकेत रक्कम जमा करणार होते. पण, रक्कम जमा न झाल्याने अखिलेश सोनी यांनी विचारणा केली असता कंपनीने पैसे दिले नाही, त्यांच्याकडून पैसै मिळताच रक्कम देईन, अशी थाप मारली.
दरम्यान, अखिलेश यांनी प्रताप कंपनीमध्ये विचारणा केली असता जगदीश एम. सोनी यांना पैसे दिल्याची माहिती मिळाली. अखिलेश सोनी यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना पैसे मिळाले नसल्याने जगदीश एम. सोनी याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नवले हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निओनॅटॉलॉजी’साठी घाटी सज्ज

$
0
0


‘निओनॅटॉलॉजी’साठी घाटी सज्ज
महिनाअखेरपर्यंत ‘एमसीआय’कडून होऊ शकते तपासणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नवजात शिशू विभागामध्ये (निओनॅटॉलॉजी) ‘डीएम-निओनॅटॉलॉजी’ हा सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’कडून (एमसीआय)तपासणी होणार असून, ही तपासणी महिन्याअखेरपर्यंत कधीही होऊ शकते, असे संकेत आहेत. विशेष म्हणजे सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी अपेक्षित असलेले मनुष्यबळ तसेच सोयी-सुविधा विभागामध्ये उपलब्ध असल्यामुळे ‘डीएम’ अभ्यासक्रम सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा घाटीमध्ये ‘निओनॅटॉलॉजी’ विभाग सुरू झाला असून, अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा असलेला ४० खाटांचा सुसज्ज ‘नवजात अतिदक्षता विभाग’ (एनआयसीयू) हे या विभागाचे बलस्थान आहे. घाटीतील ‘सर्जिकल बिल्डिंग’मध्ये बालरोग विभागाच्या शेजारी हा विभाग कार्यरत असून, मराठवाड्यातील पहिले डीएम-निओनॅटॉलॉजिस्ट डॉ. एल. एस. देशमुख हे या विभागाचे प्रमुख आहेत. सद्यस्थितीत ‘एनआयसीयू’मध्ये ४० खाटा असल्या तरी कोणत्याही वेळेस त्यापेक्षा कितीतरी जास्त नवजात शिशू या विभागामध्ये वेगवेगळ्या उपचारांसाठी दाखल असतात. विशेष म्हणजे मराठवाड्यातील गोरगरीब कुटुंबातील नवजात शिशुंना हा विभाग मोठा आधार ठरला आहे. खासगी रुग्णालयांतील ‘एनआयसीयू’साठी दिवसाला दोन ते तीन हजार रुपये शुल्क आकारले जात असताना, घाटीतील ‘एनआयसीयू’मध्ये जवळजवळ निःशुल्क दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसचा रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून अतिरिक्त दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी जालना रोडवर केम्ब्रिज शाळेजवळ निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नंतर सोडून दिले.
औरंगाबाद तालुका काँग्रेस कमिटीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. माजी आमदार डॉ. कल्याण काळे, तालुकाध्यक्ष रामराव शेळके, जगन्नाथ काळे, पैठण तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, सेवादलाचे शहराध्यक्ष अतिश पितळे, महिला काँग्रेस शहराध्यक्षा सरोज मसलगे, विठ्ठल कोरडे, जहीरशेठ करमाडकर,पंचायत समिती सभापती कैलास उकिरडे, जिल्हा परिषद सदस्य बबन कुंडारे, संतोष शेजूळ,सुरेश शिंदे,कलीम पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रुड ऑइलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत असताना केंद्र आणि राज्य सरकार अवाजवी कर लावून सामान्य जनतेस लुटत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यात १६ रुपयांपेक्षा जास्त किमंतीने इंधन दरात वाढ झालेली आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी करत ही अन्यायकारक दरवाढ त्वरित कमी करा, अशी मागणी केली. किसन राठोड, अर्जुन शेळके, अनुराग शिंदे, एकनाथ मुळे, राजेंद्र पोफळे, सुभाष डिघुळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्ते ताब्यात व सुटका

याप्रसंगी गॅस व इंधन दरवाढीचा निषेध करत संतप्त कार्यकर्त्यांनी शासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या, वीजबिल माफ करून भारनियमन बंद करा, शेतकऱ्यांचा खरीत हंगाम वाया गेल्यामुळे तात्काळ मदत जाहीर करा, आदी मागण्या केल्या. रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत काळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नंतर सोडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, देवळाई परिसरात नागरी सुविधा द्या

$
0
0


सातारा, देवळाई परिसरात नागरी सुविधा द्या
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा, देवळाई परिसरातील नागरी समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सविता कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रविवारी निवेदनाद्वारे केली आहे.
झालर क्षेत्रात असल्याने सातारा - देवळाई परिसर हा काही वर्ष सिडकोकडे होता. बांधकाम परवानगी पोटी सुमारे ८ कोटी रुपये सिडकोकडे जमा होते. हा परिसर महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर सिडकोने ही रक्कम मनपास दिली, पण दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही सातारा देवळाई परिसरात नागरी सुविधा मिळाल्या नाहीत. या निधीतून गोदावरी ढाबा ते पी. डी. जवळकर हायस्कूल, रेणुका माता कमान ते देवळाई सातारा मार्ग चौक तसेच देवळाई चौक ते देवळाई गाव या रस्त्यांचे काम करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आदेशित करावे, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, अनिल मकरिये, मनोज पांगारकर, विवेक देशपांडे, सुरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान, सातारा देवळाई नागरी विकास प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बस फक्त नावालाच

$
0
0

शहर बस फक्त नावालाच

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर बस सेवा महापालिकेने चालविण्याबाबत चर्चा सुरू केल्यानंतर सिटीबसच्या विस्ताराला ब्रेक लावण्यात आला आहे. शिवाय कर्मचारी संख्या कमी असल्याने सिटीबस पूर्ण क्षमतेने चालविण्यात अडचणी येत आहेत.

औरंगाबाद शहरात धावणाऱ्या ३१ बससाठी सध्या शहर बस विभागाला ५० कर्मचारी देण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०१० मध्ये जेव्हा सिटीबस सुरू करण्यात आली होती तेव्हा ती चालविण्यासाठी ‌‌निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरांना शहरात ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीची काही वर्षे हा निर्णय अंमलात आणण्यात आला. मात्र, त्यानंतर एसटीच्या सेवेत नवीन भरती झालेले ड्रायव्हर सिटीबससाठी नियुक्त करण्यात आले. उत्पन्न कमी येत असल्यामुळे या ड्रायव्हर आणि कंडक्टरचीही परीक्षा होत होती. यामुळे अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टरांना शहर बसची ड्युटी नको अशी परिस्थिती मधल्या काळात झाली होती. वर्ष २०१६ ते १७ च्या सुरुवातीपर्यंत सिटीबसमध्ये १५ ते २० कर्मचारी कमी होते. यामुळे शहर बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आगार प्रमुखांवरही आली होती.

विभाग नियंत्रक रा. ना. पाटील यांनी शहर बस चालविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ सिडको विभागाला दिल्यानंतर सध्या नियोजित मार्गावर सिटीबस सुरू आहे. औरंगाबाद शहरातील बस संख्या वाढविण्याचा निर्णय विभाग नियंत्रकांनी घेतला होता. मात्र, महापालिकेने स्मार्ट सिटीमध्ये शहर बस सेवा चालविण्याचा निर्णय घेतला. महापालिकेसोबत काही बैठकाही महापालिकेच्या झाल्या. यामुळे महामंडळाकडून सिटीबस महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार असल्याने शहरामधील सिटीबसचा विस्तार थांबविण्यात आला आहे. महापालिकेने शहर बस मोजक्या मार्गावर चालविण्याचा निर्णय नंतर जाहीर केला होता. त्यामुळे सिटीबस बंद करावी किंवा नाही याबाबत एस.टी. महामंडळाला अद्यापही कोणताच निर्णय घेता आलेला नाही.

तोट्यात असलेल्या सिटीबसचा विस्तार केल्यास ती प्रवाशांच्या उपयोगी पडू शकते. यासाठी शहरात शंभरच्या वर बसची गरज पडणार आहे. शिवाय कर्मचारी संख्या ही दोनशेच्यावर लागणार आहेत. महापालिकेची भूमिका अजूनही अस्पष्ट असल्यामुळे शहर बस सेवेच्या विस्ताराला ब्रेक लागलेला आहे.

या आहेत अडचणी

नवीन सिटीबस दिल्या जात नाहीत.

कर्मचारी संख्या वाढविण्यात येत नाही.

शहरात अनेक ठिकाणी बस थांबे देण्यात आलेले नाहीत.

जुन्याच थांब्याचा वापर प्रशासनाला करावा लागत आहे

शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर बस नाही

महापालिकेने तयार केलेले थांबे अजूनही महामंडळाकडे कागदांवर हस्तांतरित केलेले नाहीत.

बस थांब्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा उभ्या राहण्याचा फटकाही एसटीला बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिपदी कोणाची वर्णी; भाजपमध्ये लॉबिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे स्पष्ट संकेत देताच भाजपमधील इच्छुकांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मराठवाड्यातील किमान आणखी एका आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यासाठी औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, उस्मानबाद जिल्ह्यातील आमदार, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस नेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेशाची चर्चा, शिवसेना-भाजप युतीत निर्माण झालेला तणाव आदी कारणांमुळे राज्यातील राजकारण तापलेले आहे. त्याचवेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातमीमुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील वेळी संधी मिळाली नसली तरी, यावेळी संंधी मिळेल, या अपेक्षेने अनेकांनी जोरदार लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. काही जणांनी मुंबईत तळ ठोकला आहे.
मराठवाड्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर या तिघांकडे कॅबीनेट मंत्रिपद आहे. त्यांचे प्रगतीपुस्तक चांगले असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता नाही. या तिघांसह मराठवाड्यातील आणखी एका आमदाराची वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ व महामंडळावर प्रतिनिधीत्व न मिळालेल्या जिल्ह्यातील आमदारास प्राधान्य राहील. पक्ष वाढीसाठी प्रयत्न, गुणवत्ता निकषावर मंत्रिमंडळ समावेशासाठी आमदारांची पडताळणी केली जाणार असल्याचे समजते. उस्मानबादचे विधानपरिषद सदस्य भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला यंदा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आमदार अतुल सावे, प्रशांत बंब यांच्या नावांची चर्चा असून शेवटी कोणाची वर्णी लागणार कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

इच्छुक असणे, यात गैर असे काहीच नाही. मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यावर योग्यवेळी निर्णय घेतला जाईल.
- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडाईचे ‘ड्रीम होम’ प्रदर्शन २१ सप्टेंबरपासून

$
0
0


क्रेडाईचे ‘ड्रीम होम’ प्रदर्शन २१ सप्टेंबरपासून
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील घर घेऊ इच्छ‌िणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत ‘ड्रीम होम-२०१७’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी मंगळवारी दिली.
वट्टमवार म्हणाले, क्रांतीचौकातील हॉटेल मॅनॉर लॉन्स येथे सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन असेल. या प्रदर्शनात ५७ क्रेडाई सभासद, २० ते २५ बँका आणि वित्तीयसंस्था, बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स, सरकारी संस्था, म्हाडा, सिडको, ऑरिक, मनपा, एमएसईबी यांची दालने असणार आहेत. याशिवाय पेंटस्, किचन ट्रॉलीज, अॅल्युमिनियम, ग्लास विंडोज, सॅनिटरी, इंटेरिअर डिझयानर्स आदींची दालनेही या ड्रीम होम प्रदर्शनात असणार आहे.
३०० हून अधिक स्कीमची माहिती या प्रदर्शनातून दिली जाईल. रेरा, महारेरा, जीएसटी, नोटबंदी आणि मंदी यासारख्या अडथळ्यांवर मात करत हे प्रदर्शन पहिल्यांदा होत असल्याचे वट्टमवार यांनी सांगितले. शहरातील ग्राहकांना सध्या या प्रदर्शनातून दाखविण्यात येत असलेल्या स्कीममध्ये पंतप्रधान आवास योजनेचाही फायदा होऊ शकतो. शहराचे स्मार्ट सिटीत होणारे रुपांतर, शहर परिसरात डीएमआयसी, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, शहराजवळच येणार जेएनपीटीचा ड्रायपोर्ट प्रोजेक्ट यामुळे शहराचे औद्योगिक आणि व्यापारीदृष्ट्या असलेले महत्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर घर खरेदीला वाव येणार आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास अत्यंत पोषक वातावरण आहे.

ड्रीम होम प्रदर्शनासाठी आयोजित प्रत्रकार परिषदेस आशुतोष नावंदर, प्रमोद खैरनार, राजेंद्रसिंग जबिंदा, जितेंद्र मुथा, देवानंद कोटगिरे, पापालाल गोयल, सुनील पाटील, विकास चौधरी, नितीन बगाडिया, भास्कर चौधरी, संग्राम पटारे, सुनील बेदमुथा, रामेश्वर भारूका, संभाजी अतकरे, अनिल अग्रहाकरकर, नीलेश अग्रवाल, अखिल खन्ना, विजय सक्करवार, गोपेश यादव, पंजाबराव तौर, रोहित सूर्यवंशी, प्रशांत अमिलकंठवार, संदेश झांबड, बालाजी येरावार,अर्चित भारूका, अंकित अग्रवाल, उदय कासलीवाल, प्रितेश धानुका यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा बसवल्यामुळे शंभर जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नगर पालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व तालुकाध्यक्षांसह १०० जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर पालिकेच्या स्वछता निरीक्षक कार्यलयाशेजारी सोमवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा क्रेनच्या सहाय्याने लोंखडी अँगलवर बसविण्यात आला आहे. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. ही जागा नगर पालिकेची असून बेकायदा जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य पंकज सुधाकर ठोबरे, तालुकाध्यक्ष प्रशांत दादासाहेब सदाफळ, पारस अंबादास घाटे, सूर्यकांत मनोहरराव सोमवंशी, योगेश प्रभाकर ठोंबरे, अमृत शिंदे, दिनेश शंकरसिंग ढाकरे, विशाल पवार, प्रेमसिंग गुलाबसिंग राजपूत, तेजस ज्ञानेश्वर जगताप, योगेश चंद्रपालसिंग राजपूत, शैलेश मुकिंदराव चव्हाण, सुनील बोडखे, दीपक साळूंके, रणजित चव्हाण व इतर १०० जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डांगे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुंडाबळीप्रकरणी सासरा, सासुचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हुंडाबळी प्रकरणात आरोपी असलेल्या सासू तसेच सासऱ्याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी दुसऱ्यांदा फेटाळला. यापूर्वी सासू-सासऱ्यासह पती व दिराने नियमित जामिनासाठी मागच्या महिन्यात सादर केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता.
या प्रकरणी मृत अश्विनी बाबासाहेब कोरे (२३. रा. कसाबखेडा, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) हिचा भाऊ संदीप गंगाधर खोले (३०, रा. पाचोड, ता. अंबड, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, हुंड्यासाठी तसेच मूलबाळ होत नसल्याचे निमित्त करून अश्विनी हिचा शारीरिक-मानसिक छळ केला जात होता. सासरी त्रास होत असल्याचे अश्विनी हिने माहेरी व भावाला कळविले होते. दरम्यान, ८ ऑगस्ट २०१७ रोजी अश्विनी हिचा जळून मृत्यू झाला व घटनेच्या आदल्या दिवशीदेखील अश्विनी हिने ‘आपल्याला त्रास होत असून, येथून घेऊन जा’ असे भावाला कळविले होते. या प्रकरणी पती बाबासाहेब गोविंद कोरे, दीर मनोज गोविंद कोरे, सासू अरुणाबाई गोविंद कोरे (वय ७०) व सासरा गोविंद महादेव कोरे (वय ७५) यांच्याविरुद्ध कलम ३०४ (ब) अन्वये खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सद्यस्थितीत चौघे आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, चौघांनी २४ ऑगस्ट रोजी नियमित जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला होता.

परिस्थितीत बदल नाही

सासू-सासऱ्याने पुन्हा नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी केली. त्यावर, ‘परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नसताना, केवळ वयामुळे जामीन देता येणार नाही’ असे मत नोंदवत कोर्टाने दोघांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुकेशिनीप्रकरणी चालकाचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडकोतील उच्चभ्रू वसाहतीतील नातेवाईकाच्या बंगल्यावर डल्ला मारुन रोख रक्कम, दागिने, घरातील फर्निचर व कार चोरुन डॉ. सुकेशनी येरमे व कारचालक राजू मते यांनी बंगलादेखील कवडीमोल भावात विकला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी मते याचा नियमित जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी मंगळवारी फेटाळला. यापूर्वी त्याचा अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने फेटाळला होता.
अमेरिकेतील डॉ. शिवाजी गुणाले यांच्या मेव्हणीची मुलगी व संशयित आरोपी सुकेशिनी येरमे आणि कारचालक संशयित आरोपी राजू उर्फ राजेंद्र बाबुराव मते (वय ४२, रा. सिडको एन-४) या दोघांनी संगनमत करून गुणाले यांचा बंगला ६७ लाखांना विक्री केला होता. तसेच त्यांनी बंगल्यातील बेडरुममधील कपाटात ठेवलेले रोख ५ लाख रुपये, २५ तोळे दागिने, घरगुती फर्निचर, कार, लॅपटॉप व दुचाकी घेऊन पळ काढला होता. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सुकेशनी व कारचालक राजू मते या दोघांना ६ ऑगस्ट २०१७ रोजी अटक करण्यात आली होती. कोर्टाने त्यांची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
संशयित आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर दोघा आरोपींनी नियमित जामिनासाठी २९ ऑगस्ट रोजी कोर्टात अर्ज दाखल केला होता. हे अर्ज कोर्टाने फेटाळले. त्याला आव्हान देत मते याने जिल्हा कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणीवेळी, आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने मतेचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा सरकारी वकील देशपांडे यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरंग रास दांडियातर्फे उपक्रमांचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद मैदानावर येत्या गुरुवारपासून नवरात्रीनिमित्त नवरंग रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या आयोजनाखाली हा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात सामाजिक तसेच धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घटस्थापनेच्या दिवशी गुरुवारी संबळच्या निनादात भवानीमातेच्या मूर्तीची स्थापना व घटस्थापना करण्यात येणार आहे. तसेच दररोज दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या महिला-तरुणीचे हळदी-कुंकू लावून, तरुणांचे गंधाचा टिळा लावून स्वागत करण्यात येणार आहे. या उत्सवामध्ये शहरातील आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या नऊ महिलांचा नवरंग पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. महिलांचे सरंक्षण या विषयावर एक दिवस प्रात्याशिकासह मार्गदर्शन सनातन संस्थेतर्फे या काळात करण्यात येणार आहे. अंध, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक साहित्य भेट देत दांडियामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. अष्टमीच्या दिवशी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवसांच्या काळात दररोज पन्नास बक्षिसांचे वाटप दांडियामध्ये करण्यात येणार आहे. तसेच गरजू महिलांना शिलाई मशीन व गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. तसेच या दांडियामध्ये पाश्चिमात्य नृत्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे, असे दानवे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शहरप्रमुख संतोष जेजूरकर, जयसिंग होलिये आदींची उपस्थिती होती.

प्रवेशिका आवश्यक

या दांडियासाठी प्रवेशिका अनिवार्य आहे. अजबनगर येथील जिल्हाप्रमुख दानवे यांचे कार्यालय व शिवसेना पदाधिकाऱ्याकडे प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ विद्यापीठात ‘एटीकेटी’चा घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत कुलपती कार्यालयाने विचारणा केल्यामुळे विद्यापीठ प्रशासन अडचणीत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत तोडगा काढण्यावर चर्चा केली.

यंदा अभियांत्रिकी शाखेच्या निकालाची टक्केवारी घसरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरिऑन’ देण्याची मागणी वादग्रस्त ठरली. ‘बामू’ की ‘बाटू’ या संभ्रमामुळे ‘कॅरिऑन’ देण्यावर विद्यार्थी ठाम राहिले. अखेर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ‘कॅरिऑन’ निर्णय जाहीर केला. त्यानंतर द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘एटीकेटी’साठी आंदोलन केले. या विद्यार्थ्यांना ५० टक्के एटीकेटी देण्यात आली. विशेष म्हणजे विद्यापीठ प्रशासनाने एटीकेटीचा निर्णय स्वतःच्या अखत्यारित घेतला आहे. मागील आठवड्यात झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. फक्त एका वर्षासाठीच निर्णय असल्यामुळे स्वतंत्र मान्यतेची गरज नसल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. मात्र, हा निर्णय अंगलट येण्याची शक्यता आहे. कोणत्या नियमानुसार एटीकेटीचा निर्णय घेतला याची थेट विचारणा कुलपती कार्यालयाने केली आहे. त्यामुळे सुसंगत खुलासा करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आटापिटा करीत आहे. याबाबत मंगळवारी दुपारी कुलगुरू, अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, विशेष प्रभारी अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, ‘एटीकेटी’च्या निर्णयावर एकमत झाले नाही असे सूत्रांनी सांगितले. सध्या विद्यापीठातील विस्कळीत प्रशासकीय कामकाज आणि आंदोलनाची दखल कुलपती कार्यालयाने घेतली आहे. शैक्षणिक वातावरण टिकवण्यात विद्यापीठ पिछाडीवर असल्यामुळे काही मुद्द्यावर कुलपती कार्यालय पुन्हा खुलासा मागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पदवी परीक्षेचे शुल्क भरण्याची मुदत २३ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी शुल्क भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आाला.

गुणपत्रिका अजून नाही
नियमाची मर्यादा ओलांडून ५० टक्के एटीकेटी देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना अजूनही गुणपत्रिका मिळालेली नाही. नवीन नियमानुसारचे ‘सॉफ्टवेअर’ नसल्यामुळे गुणपत्रिता तयार झाल्या नाहीत. सुधारित सॉफ्टवेअरसाठी परीक्षा विभागाने ‘एमकेसीएल’ कार्यालयाशी संपर्क साधला आहे. पण, दोन आठवड्यानंतरही गुणपत्रिका तयार करण्याचा निर्णय होऊ शकला नाही. या कामासाठी विद्यापीठाला जास्तीचे शुल्क जमा करावे लागणार आहे. सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ‘तात्पुरता’ प्रवेश दिला आहे, पण शुल्क पूर्ण घेत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. हा गोंधळ आणखी किती दिवस चालणार असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जलकुंभात वसला ‘काळ’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महापालिका मालकीचे शहरातील सर्व जलकुंभ कालबाह्य झाले असून, ते धोकादायक बनले आहेत,’ अशी धक्कादायक माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत दिली. त्यांच्या या विधानाने सभागृह अवाक झाले. आयुक्तांनी सर्व जलकुंभांचे महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आश्वासन दिले.

डासांची उत्पत्ती थांबवण्याच्या संदर्भात आरोग्य विभागाने शासनाच्या निर्देशानुसार उपविधी तयार केले आहेत. त्यात घरातील किंवा घराच्या परिसरातील, गच्चीवरील पाण्याच्या टाक्या कशा असाव्यात, त्यावर झाकण कसे असावे या बद्दलच्या नियमांचा उल्लेख आहे. या नियमांचा संदर्भ देत शिवसेना नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या जलकुंभांची स्थिती कशी आहे, त्यावर कोणत्या प्रकारचे झाकण आहे, जलकुंभांची स्वच्छता केव्हा केली जाते, जलकुंभ स्वच्छ करण्याची पद्धत काय ? असे प्रश्न विचारले. या प्रश्नांना कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘कंत्राटदारांच्या कामगारांकडून ब्लिचिंग पावडर टाकून जलकुंभ स्वच्छ केले जातात.’ यावर घोडेले म्हणाले, ‘चुकीची माहिती सभागृहात देऊ नका. एकही जलकुंभ स्वच्छ केला जात नाही. इटखेडा येथील जलकुंभ माझ्या वॉर्डात आहे आणि आतापर्यंत तो स्वच्छ केल्याची माहिती आपल्याला नाही. त्यामुळे सर्व जलकुंभांचे वर्षभराचे रेकॉर्ड मागवा,’ अशी मागणी त्यांनी केली. यावर खुलासा करताना चहेल म्हणाले, ‘महापालिकेच्या मालकीचे ६३ जलकुंभ आहेत. त्यापैकी ४९ वापरात आहेत. सर्वच जलकुंभ कालबाह्य झाले असून, ते धोकादायक बनले आहेत.’ यावर माजी महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, ‘जलकुंभ धोकादायक बनले आहेत याचा अर्थ केव्हाही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली पाहिजे. पर्यायी व्यवस्था काय, याचाही खुलासा प्रशासनाने केला पाहिजे.’ भाजपच्या अॅड. माधुरी अदवंत यांनी स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा मांडला. ‘स्ट्रक्टरल ऑडिटच्या संदर्भात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला पत्र पाठवले आहे. अद्याप त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही,’ असे चहेल यांनी सांगितले. ‘धोकादायक जलकुंभ, स्ट्रक्चरल ऑडिट गांभीर्याने घ्या,’ असे शिवसेनेचे राजू वैद्य म्हणाले. शिवसेनेचे सुभाष शेजवळ यांनी पडेगाव येथील जलकुंभाच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा मांडला. महापौर भगवान घडमोडे यांनी जलकुंभाच्या एकूणच प्रकरणासंदर्भात आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना खुलासा करण्यास सांगितले. आयुक्त म्हणाले, ‘जलकुंभांच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संपर्क साधून एका महिन्याच्या आत ऑडिट करून घेतले जाईल. ऑडिट झाल्यावर जलकुंभांची नेमकी अवस्था लक्षात येईल. त्यानंतर आपल्य़ाला जलकुंभांच्या संदर्भात निर्णय घेता येईल.’

उपविधीसाठी समिती
‘डास उत्पत्ती थांबवण्यासाठीच्या उपविधीचा प्रस्ताव महापौरांनी स्थगित ठेवला. उपविधी कसे असावेत हे ठरविण्यासाठी आरोग्य सभापती, सर्वगटनेते, विरोधीपक्ष नेता यांची समिती स्थापन करण्यात येत आहे. समितीच्या अहवालानंतर प्रशासनाने उपविधीबद्दल पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करून तो सर्वसाधारण सभेसमोर आणावा,’ असे आदेश महापौरांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक पेट्रोलपंप; शपथपत्र देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह वारसा स्थळांच्या परिसरात असलेली आठ धोकादायक पेट्रोलपंप शहराबाहेर हलविण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत.

आठ पेट्रोलपंप बेकायदा असल्याचा आक्षेप घेत ते शहराबाहेर हलविण्याची विनंती जनहित याचिकेत केली आहे. उपरोक्त प्रकरणी १२ ऑक्टोबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते शहीद अस्लम यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये आठ खासगी पेट्रोल पंपचालक, इंडियन ऑइल, बीपीएल, एचपी आणि रिलायन्स या चार पेट्रोलियम कंपन्या, वक्फ बोर्ड, महापालिका, केंद्र शासन, पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आदी ३२ जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. कायद्यानुसार, पुरातत्वीय संरक्षित स्थळे, शासकीय आणि सार्वजनिक कार्यालये यांच्या शेजारी पेट्रोल पंप असू नयेत. तसेच दोन पंपांमध्ये एक किलोमीटरचे अंतर आवश्यक आहे. असे असताना शहरातील आठ पेट्रोलपंप कायद्याचा भंग करीत असून, त्यांना शहराबाहेर हलविण्याची विनंती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images