Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

७२ लाखांचे ‘वर्क स्टेशन’ रुग्णसेवेत

$
0
0

७२ लाखांचे ‘वर्क स्टेशन’ रुग्णसेवेत
भूल देण्याच्या तीन ‘हायएंड’ उपकरणांचा घाटीतील गोरगरीब रुग्णांना होणार लाभ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूल देण्यासह पल्स, बीपी, मॉनिटर, ईसीजी, व्हेंटिलेटर अशा अनेक महत्वाच्या अत्याधुनिक व एकत्रित सेवा देणारे ‘अॅनॅस्थेशिया वर्क स्टेशन’ घाटीमध्ये दाखल झाले आहे. विशेष म्हणजे अशी एक नव्हे तर तीन उपकरणे रुग्णालयाला उपलब्ध झाली आहेत. ७२ लाख ४५ हजार रुपयांच्या तीन उपकरणांचा गंभीर व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी मोठा उपयोग होणार आहे. घाटीतील एका छोटेखानी कार्यक्रमात उपकरणाचे उद्घाटन झाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) भूलशास्त्र विभागाच्या वतीने बुधवारी (२० सप्टेंबर) हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुहास जेवळीकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे तसेच विविध विभागप्रमुखांची उपस्थिती होती. यातील तीन उपकरणांपैकी एक कान-नाक-घसा व अस्थिव्यंगोपचार विभागाच्या शस्त्रक्रियागृहामध्ये (ओटी १) उपलब्ध होणार आहे. दुसरे उपकरण हे शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहामध्ये (ओटी ३), तर तिसरे उपकरण हे सीव्हीटीएस विभागाच्या शस्त्रक्रियागृहामध्ये उपलब्ध असणार आहे. यानिमित्ताने डॉ. येळीकर यांनी उपकरणाचे बटन दाबून उद्घाटन केले. तसेच भूलशास्त्र विभागात नव्याने पदोन्नती झालेल्या डॉ. जेवळीकर व डॉ. गायत्री तडवळकर यांचा अधिष्ठातांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सहयोगी प्राध्यापक डॉ. रश्मी बेंगाली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
गरजेपुरतीच भूल मिळणार
‘अॅनॅस्थेशिया वर्क स्टेशन’ हे पूर्णपणे ऑटोमॅटिक व सध्याचे ‘हायएंड’ उपकरण असून, या उपकरणाद्वारे रुग्णाच्या पल्स, रक्तदाब, ईसीजी व इतर सर्व महत्वाच्या नोंदी एकाचवेळी ठेवल्या जातील. त्याचवेळी उपकरणाद्वारे रुग्णाला व्हेंटिलेटरसह अनॅस्थेशियाही दिला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे उपकरणाद्वारे संबंधित रुग्णाला गरजेपुरता व नेमक्या प्रमाणात भूल दिली जाऊ शकते. त्यामुळे रुग्णाला भुलेचा डोस कमीही पडणार नाही तसेच जास्तही होणार नाही. एखाद्या वेळेला रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला तर त्याला ‘वर्क स्टेशन’द्वारे आपोआप व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होईल. मुख्य म्हणजे केवळ एक भूलतज्ज्ञ हे उपकरण चालवू शकेल. त्यामुळे कमी मनुष्यबळात व कमीत कमी ‘अॅनॅस्थेशिया गॅसेस’मध्ये हे उपकरण रुग्णसेवेत येईल, अशी माहिती डॉ. जेवळीकर, सहाय्यक प्रा. डॉ. संदीप बोडखे यांनी दिली.
चार कोटींची उपकरणे डिसेंबरपर्यंत
‘वर्क स्टेशन’चा खास उपयोग क्लिष्ट शस्त्रक्रियांवेळी व शस्त्रक्रियेनंतरही होणार आहे. त्याचप्रमाणे ‘डीपीसी’च्या निधीतून मिळणारी ४ कोटी १६ लाखांची उपकरणे घाटीमध्ये डिसेंबर-जानेवारीपर्यंत उपलब्ध होतील. इतर विभागांनीही उपकरणांची गरज जरूर कळवावी. मात्र आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय शिक्षकांनी अपडेट राहणे खूप गरजेचे आहे, असे मत डॉ. येळीकर यांनी कार्यक्रमात नोंदविले. ‘डीएम-निओनॅटॉलॉजी’ तसेच ‘डीएम-कार्डिओलॉजी’साठी ‘एमसीआय’कडून पाहणी होणार असून, दोन्ही विषयांना मान्यता मिळाल्यास घाटीसाठी ती अभिमानाची बाब ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जायकवाडीत ऊर्ध्व भागातून पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मोठ्या धरणातून पाणी सोडण्यात आहे. हे पाणी गुरुवारी सकाळी जायकवाडी धरणात पोहचणार असून शुक्रवारी दुपारनंतर जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
सध्या जायकवाडी धरणात ८९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरण काठोकाठ भरण्यासाठी अजून दोन फूट पाणीपातळी वाढण्याची गरज आहे. दोन दिवसांपासून नाशिक, अहमदनगर जिल्हा व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. या भागातील सर्व धरणे शंभर टक्के भरली असल्याने दोन्ही जिल्ह्यातील मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या धरणातून विसर्ग करण्यात येणारा पाणीसाठा गुरुवारी सकाळी जायकवाडी धरणात पोहचणार असून त्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता चव्हाण यांनी दिली.
सध्या, जायकवाडी धरणात सहा हजार क्युसेक प्रमाणे पाण्याची आवक आहे. धरणात गुरुवारी सकाळपासून पाणयाची आवक वाढून ३० ते ५० हजार क्युसेक होईल, असा जलसंपदा विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार गुरुवारी दिवसभर आवक सुरू राहिल्यास शुक्रवारी कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडावे लागेल, असे शाखा अभियंता चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणात ६६.२४ टक्के पाणीसाठा होता.

वरच्या धरणातून विसर्ग

जायकवाडीच्या वरील भागातील धरणातून होत असलेला विसर्ग पुढीलप्रमाणेः निळवंडे २२७७५ क्युसेक, भंडारदरा ५६७३ क्युसेक, दारणा ४३१६ क्युसेक, गंगापूर २७४२ क्युसेक, नांदूर मधमेश्वर १५७७५ क्युसेक, ओझरवेअर १३००० क्युसेक, पालखेड १७३२ क्युसेक, नागमठाण ५२०० क्युसेक.

आरओएसनुसार नियोजन

रिजव्हायर ऑपरेशनल शेड्यूल (आरओएस) नुसार २० सप्टेंबरच्या दिवशी जायकवाडी धरणात ९८.२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवला जाऊ शकत नाही. मात्र, २० सप्टेंबरला जायकवाडी धरणात ८८.६८ टक्के पाणीसाठा असल्याने आजतरी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले नाही, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

जायकवाडीची पाणीपातळी १५१९.९० फूट
गेल्या २४ तासांतील आवक १५.०५ दलघमी
आवक - ६१५५ क्युसेक
एकूण पाणीसाठा - २६६३.४०९ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा -१९२५.३०३ दलघमी
धरणाची टक्केवारी - ८८.६८ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई व ३ मुलींची आत्महत्या

$
0
0

आई व ३ मुलींची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद :

नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.), येथील आई व तिच्या ३ सुशिक्षित मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.

ही घटना मंगळवारी (१९ सप्टेंबर) रोजी घडली. सलगरा (दि.) येथील शेतकरी मधुकरराव देवराव चव्हाण यांच्या पत्नी छाया मधुकर चव्हाण (वय ४०), मोठी मुलगी कु. शीतल मधुकर चव्हाण (वय १९), कु. पल्लवी मधुकर चव्हाण (वय १६) आणि कु. आश्विनी मधुकर चव्हाण (वय १५) या चौघींनी त्यांच्या स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. या घटनेने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एकाच कुटुंबातील चौघींनी आत्महत्या केल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेषत: मधुकर चव्हाण यांच्या या तिन्ही मुली सुशीक्षित आहेत. मोठी मुलगी बीएच्या तृतीय वर्षात शिकत होती, तर दुसरी मुलगी १२ वी व तिसरी मुलगी ११ वीमध्ये नळदुर्ग येथे शिक्षण घेत होत्या. मधुकर चव्हाण यांचा मुलगा सुनील मधुकर चव्हाण (वय १२) हा कोल्हापूर येथे शिक्षणासाठी असतो. घटना घडली तेव्हा तो कोल्हापूर येथे होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चारही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. पंचनामा आणि शवविच्छेदन ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ४० वसाहतीत पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काळोखाने भारलेला दिवस, विजांचा कडकडाट आणि तुफान पावसाने बुधवारी शहराला झोडपले. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या पावसाचा वेग इतका होता की, त्यामुळे जवळपास ४० वसाहतींमधील घरात पाणी शिरले. रात्री साडेआठपर्यंत चिकलठाणा वेधशाळेमध्ये ५३.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये असलेला उकाडा बुधवारीही कायम होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास वाऱ्याचा वेग मंदावला व संपूर्ण शहरावर ढगांनी गर्दी केली. त्यानंतर काही वेळेतच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तासाभरानंतर पावसाचा वेग वाढला व शहरात काळोख पसरला. जवळपास सर्वच भागात दमदार पावसाने हजेरी लावली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडली. पावसाच्या तुफान वेग आणि पसरलेल्या काळोखामुळे चारचाकी वाहनधारकांनीही रस्त्यावर स्पष्ट दिसत नसल्यामुळे गाड्या पार्किंग लाइट लावून रस्त्याशेजारी उभ्या केल्या.

शहरामधील जयभवानीनगर, विकासनगर, उस्मानपुरा, सिडको एन चार डी सेक्टर, सहकारनगर, दशमेशनगर, अंबिकानगर, गजानननगर, दादा कॉलनी, कैलासनगर, मल्हार चौक परिसरतील घरे, गारखेडा, सिटी मार्बल कॉम्पॅलेक्समधील गाळे, पारिजातनगर, एन चार, टाऊन सेंटर, क्रांतीनगर, औषधीभवन, दलालवाडी, दिवाणदेवडी, स्नेहनगर, एन ११ सुदर्शननगर, नूर कॉलनी, टाऊन हॉल, मयूर पार्क, गुलमोहोर कॉलनी, पीरबाजारमधील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा वेग इतका होता की लहान गल्ल्यांमध्ये उभ्या असलेले अनेक दुचाकी वाहनांमध्येही पाणी शिरले होते. निराला बाजार येथील एका घराची भिंत कोसळण्याची घटना घडली असून, दिवाणदेवडी येथील एक जुना वाडा पावसामुळे पडला. पावसामुळे सातारा परिसरातील एमआयटी कॉलेजच्या पुढील नाला ओव्हर फ्लो झाला होता. यामुळे गावातील लोक काही वेळ अडकले होते.

तुफान पावसामुळे नारळीबाग येथे असलेल्या पुलावर मोठ्या प्रमाणावर साचलेले पाणी नाल्यामध्ये वेगाने पडत होते, मात्र पावसाचे रौद्र रूप पाहून चारचाकी तसेच दुचाकी वाहनधारकांनी या रस्त्यावरून न जाता इतर रस्त्याचा पर्याय निवडला. पावसाचे पाणी ओसरल्यानंतर हा पूल पुन्हा रहदारीसाठी सुरू झाला.

२७नंतर पुन्हा दमदार
दमदार पावसानंतर येणारे पाच दिवस औरंगाबादसह मराठवाड्यात पावसाचा वेग काहीसा मंदावणार आहे, मात्र २७ सप्टेंबरनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज चिकलठाणा वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ पंढरीनाथ साळवे पाटील यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शाळकरी मुलीला वाचवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळा सुटल्यावर घरी परतणारी शाळकरी मुलगी नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे लक्षात आल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी तिला वाचवले. एका खासगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर तिला घरी पाठवले.

अंबिकानगरमधून वाहणारा नाला चिकलठाणा एमआयडीसीमधून येतो. चिकलठाणा एमआयडीसी, एसटी कॉलनी, अंबिकानगर मार्गे हा नाला विमानतळाच्या पाठीमागे जाऊन मिळतो. सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर या नाल्याला पूर आला. अंबिकानगर व राजीव गांधीनगर याला जोडणारा एक छोटा पूल आहे. या पुलावरून पाणी वाहत होते. अंबिकानगर भागातील नालंदा शाळेतील विद्यार्थिनी राणी सुरेश दाभाडे (वय ८) या पुलावरून घराकडे जात होती. तिला पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. चारशे ते पाचशे फुट अंतरावर नागरिकांनी तिला पकडले आणि प्रवाहाच्या बाहेर काढले. यावेळी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, मोहन साळवे, ज्ञानेश्वर डांगे, संतोष लाखे, महापालिका वॉर्ड अधिकारी मीरा चव्हाण, अग्निशमन दलाचे पथक उपस्थित होते. या सर्वांनी प्रयत्न करून त्या मुलीला नाल्याबाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर कोटींच्या कामाचे विभाजन नाही

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शंभर कोटींच्या कामांचे तुकड्यांमध्ये विभाजन करता येणार नाही. या कामाचे एकत्रित टेंडर काढा किंवा ३१ रस्त्यांसाठी ३१ टेंडर्स काढा, अशा आशयाचा अध्यादेश राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाच्या संदर्भात महापालिकेची कोंडी झाली आहे.

राज्य शासनाने औरंगाबादमधील रस्ते विकासासाठी शंभर कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. त्यातून ३१ रस्त्यांची कामे करा असेही आदेश दिले. कोणत्या रस्त्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील शासनाने ठरवून दिले आहे. शंभर कोटी रुपयांच्या अनुदानाचे विभाजन करून रस्त्यांची कामे करण्याची योजना पालिकेत राबवली जात आहे. २५ - २५ कोटी रुपयांचे चार टेंडर्स काढायचे की ५० - ५० कोटी रुपयांचे दोन टेंडर काढायचे यावर अद्यापही खल सुरू आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या बद्दल अद्याप मतैक्य झालेले नाही. दरम्यानच्या काळात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १९ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढून कामांच्या संदर्भात आचारसंहिता घालून दिली आहे. या विभागाचे अवर सचिव सचिन चिवटे यांच्या स्वाक्षरीचा हा अध्यादेश आहे.

या अध्यादेशानुसार शासनाच्या मंजूर अनुदानातून रस्त्यांचे काम करण्यासाठी एक तर एकत्रित टेंडर काढणे गरजेचे आहे किंवा जेवढ्या रस्त्यांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तेवढ्या रस्त्यांसाठी वेगवेगळे टेंडर काढणे गरजेचे आहे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे महापालिकेला २५ - २५ किंवा ५० - ५० कोटींचे टेंडर काढता येणार नाहीत. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी एका कंत्राटदाराला जास्तीत जास्त दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम द्या, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. कंत्राटदाराकडून घ्यावयाच्या सुरक्षा अनामतीच्या संदर्भातही अध्यादेशात स्वतंत्रपणे उल्लेख करण्यात आला आहे. कंत्राटदाराने ज्या किंमतीचे टेंडर भरले आहे, त्या किंमतीच्या दोन टक्के रक्कम सुरक्षा अनामत म्हणून घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

शासनाच्या या अध्यादेशामुळे महापालिका प्रशासनाचे मनसुभे धुळीस मिळाले आहेत. शासनाच्या आदेशाला बाजूला सारून आपल्या पद्धतीने काम करण्याच्या प्रवृत्तीला शासनाने अध्यादेशाद्वारे चपराक लगावली आहे. रस्त्यांच्या कामाचे शंभर कोटींचे एकत्रित टेंडर किंवा ३१ रस्त्यांचे ३१ टेंडर महापालिकेला काढावे लागतील, कारण महापालिकेचे स्वतःचे मॅन्युअल नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मॅन्युअलनुसार महापालिकेचे काम चालते. - रेणुकादास (राजू) वैद्य, शिवसेना नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जालना जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जालना
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने बुधवारी दुपारपासून हजेरी लावली. जालना शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या सरवर सरी येत होत्या.
जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यातील पावसाने ९० टक्के सरासरी गाठली. मात्र, भोकरदन तालुक्यात अद्यापही पावसाची वाट शेतकरी बघत आहेत. तालुक्यातील एकमेव जुई धरण जवळपास भरत आले आहे. त्यामुळे भोकरदन शहरासह सुमारे २५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. मात्र राजूर, पारधसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठे पाणीसाठे अजून कोरडेच आहेत.तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकारक आहे.
जाफ्राबाद तालुक्यात पावसाने बुधवारी सायंकाळी हजेरी लावली. तालुक्यातील कापूस आणि तुरीचे पिक चांगले आहे. मात्र, मान्सूनच्या पहिल्या आठवड्यात लावलेल्या सोयाबीनच्या शेंगांची काढणीचे काम सध्या तातडीने करणे गरजेचे आहे. मात्र, रोज पडत असलेल्या पावसाने सोयाबीनची काढणी संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे. तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा बोजवारा उडाला असून अनेक ठिकाणी सिमेंटचे बंधारे फुटले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकामुळे घरात पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाच्या सोयीसाठी संपूर्ण कॉलनी वेठीला धरल्याचा प्रकार सिडकोतील अग्रसेन भवन परिसरात घडला. पूर्वी अस्तित्वात असलेली नाली नव्याने तयार करण्याचा प्रयत्न सुरू असताना या भागातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अक्षरशः तळे साचले.
अग्रसेन भवन परिसर सिडकोच्या अंतर्गत येत होता. सिडको प्रशासनाने या भागात पाणी वाहून जाण्यासाठी योग्य आकाराच्या नाल्या तयार केल्या होत्या. हा परिसर महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर आता याच परिसरातील नाल्यांचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. पूर्वीच्या रूंद नाल्यांमुळे सिमेंटचे पाइप टाकून काम केले जात आहे. या कामामुळे पूर्वीच्या नालीची रूंदी कमी झाली असून, पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अग्रसेन भवन परिसरातील कॉलनींमध्ये पाणीच पाणी जमा झाले आहे. नालीचे काम सुरू असल्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नाही. त्यामुळे आजूबाजूच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये, घरांच्या परिसरात पाणी साचले आहे. या पाण्यातून मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न या भागातील नागरिकांच्या समोर निर्माण झाला आहे. महापालिकेची यंत्रणा मात्र अद्याप या भागात पोचली नाही.

चारचाकी गाडीसाठी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात एका लोकप्रतिनिधीचे जवळचे नातेवाईक राहतात. त्या नातेवाईकाला गाडी घरातून काढण्यासाठी व पुन्हा गाडी घराच्या आवारात उभी करण्यासाठी जुन्या नालीचा त्रास होत होता. हा त्रास कायमचा संपवण्यासाठी नालीमध्ये सिमेंटचे पाइप टाकण्याची शक्कल लढवण्यात आली. सिमेंटच्या पाइपमुळे नालीची रुंदी कमी झाली आणि संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले आहे. एका नातेवाईकासाठी संपूर्ण कॉलनी वेठीस धरणाऱ्या लोकप्रतिनिधीबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच कोटी लीटर क्षमतेचा पाझर तलाव भरला

$
0
0

पाच कोटी लीटर क्षमतेचा पाझर तलाव भरला

रोटरी क्लबतर्फे साई केंद्रात उभारणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद पूर्वतर्फे साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात आलेला पाझर तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे तब्बल पाच कोटी लीटर पाणी साठविले गेले आहे.

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद पूर्वतर्फे दोन वर्षांपूर्वी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन साई क्रीडा केंद्रात पाझर तलाव उभारण्याविषयी चाचपणी करण्यात आली होती. या प्रोजेक्टसाठी रोटरी फाऊंडेशनने सोळा हजार डॉलर, ऑस्ट्रेलियन रोटरी क्लबने साडेपाच हजार डॉलर रकमेची मदत केली. तसेच रोटरी क्लब पूर्वच्या पदाधिकारी व सभासदांनी सात लाख रूपये जमवले. जिल्हा रोटरी क्लबनेही पाच हजार डॉलरची मदत केली. २५ लाख रूपये खर्चून साई केंद्रात दोन पाझर तलावाची उभारणी करण्यात आली, अशी माहिती प्रोजेक्ट चेअरमन जी. डी. अग्रवाल यांनी ‘मटा’शी संवाद साधताना दिली.

फेब्रुवारी महिन्यात साई केंद्रात पाझर तलावाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. जुलै महिन्यात तलावाचे काम पूर्ण झाले. चार महिन्यांच्या कामाने पाझर तलावाबरोबरच मातीच्या तलावाच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले. त्यामुळे तब्बल पाच कोटी लीटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने मातीच्या तलावासह दोन्ही पाझर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.

काठोपाठ भरलेल्या पाझर तलावाची पाहणी करताना जी. डी. अग्रवाल म्हणाले, ‘दहा दिवसांपूर्वी मी तलावाची पाहणी केली होती. त्यावेळी दोन्ही तलाव रिकामेच होते. पण आता भरून वाहणाऱ्या तलावामुळे प्रोजेक्टचा हेतू सफल झाल्याचा आनंद होत आहे. या प्रोजेक्टसाठी रणजितसिंग गुलाटी, बाबुराव खोसे, प्रशांत देशपांडे, बी. डी. भुमकर यांची मोठी मदत झाली. तलावाचे काम करताना तब्बल आठ हजार ट्रॅक्टर माती काढण्यात आली. या तलावामुळे पाच कोटी लीटर पाणी साठवले असले तरी जवळपास ७५ कोटी लीटर पाणी जिरले. त्यामुळे परिसरातील वसाहतींमध्ये असलेल्या बोअरच्या पाणी क्षमतेतही वाढ झाल्याशिवाय राहाणार नाही. तसेच वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील घरांमध्येही पाणी शिरत होते. तलावात पाणी रोखल्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, असे अग्रवाल यांनी सांगितले.

रोटरी क्लब पूर्वने दोन पाझर तलाव निर्माण केले. गोगाबाबा टेकडीकडून येणारे पाणी त्यामुळे अडले. पाच कोटी लीटर पाणी साठवण क्षमता या तलावात आहे. परिसरातील वसाहतींना याचा निश्चितच फायदा होईल. केंद्रात लावण्यात आलेल्या शेकडो झाडांनाही याचा फायदा होणार आहे. रोटरी क्लबने घेतलेल्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे.

- वीरेंद्र भांडारकर, उपसंचालक, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र


पाणी टंचाई हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. पाण्याचे दुर्भीक्ष्य लक्षात घेऊन रोटरीतर्फे हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. २५ लाख रूपयांचा निधी उभारण्यासाठी सर्वांचाच हातभार लागला. पाच कोटी लीटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाल्याबरोबरच पाणी बचतीसाठी हा प्रोजेक्ट मैलाचा दगड ठरणार आहे.

- जी. डी. अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन, रोटरी क्लब पूर्व.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सणासुदीच्या काळात रेल्वे बुकींग 'फुल्ल'

$
0
0

सणासुदीच्या काळात रेल्वे बुकींग 'फुल्ल'

मुंबई, दिल्ली, हैदराबादसह

तिरुपतीच्या रेल्वेला गर्दी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

सणासुदीच्या काळात औरंगाबादहून अनेक प्रवासी मुंबई, दिल्ली तसेच हैदराबादकडे प्रवास करतात. अनेक प्रवासी औरंगाबाद ते मनमाड असा रेल्वेचा प्रवास करून मनमाडहून दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्‍थान तसेच अन्य राज्यातील आपल्या गावाकडे किंवा पर्यटनासाठी जात असतात. त्यासाठी अनेक प्रवाशांनी अॅडव्हान्स तिकीट बुकींग केले आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली, हैदराबादसह तिरुपतीच्या रेल्वेंना आगामी काळात तोबा गर्दी असणार आहे.

दिल्लीकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या चार महिन्यांची तिकिटे बुक झाली आहेत. अजंता एक्सप्रेस आणि तिरुपती या रेल्वेचीही बुकींग फुल्ल आहे. त्यामुळे ऐनवेळी तिकीट मिळण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

अद्याप विशेष रेल्वेची घोषणा नाही

सुट्ट्यांच्या काळात नियमित रेल्वेला होत असलेल्या गर्दीमुळे विशेष रेल्वे सोडण्यात येते. अाैरंगाबाद ‌किंवा नांदेड येथ्‍ाून यंदाही दिल्ली, जयपूर, बंगलोर तसेच अन्य मार्गावर विशेष रेल्वे सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप विशेष रेल्वे सोडण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी सरकारकडून जनतेची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलच्या किंमती कमी होत असताना केंद्र आणि राज्य सरकार विविध अवाजवी कर लावून सामान्य जनतेला लुटत आहेत. मोदी सरकारकडून होणारी ही लुबाडणूक उघड करण्यासाठी जनजागृती अभियान आखले आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
काही महिन्यांपासून इंधनाचे दर सतत वाढत असून दोन महिन्यात १६ रुपयांपेक्षा जास्त दरवाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त होऊनही सत्ताधाऱ्यांना त्यांच्याही काहीही घेणे दिसत नाही, असा आरोप तांबे यांनी केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी त्यांनी एका प्रश्नांवर बोलताना केली. यावेळी डॉ. जितेंद्र देहाडे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील, अखिल पटेल, खालेद पठाण आदी उपस्थित होते.
सरकारकडून होणारी लूट लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोल पंप व घरोघरीत जाऊन पत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात येणार आहे. हे अभियान राज्यव्यापी असून इंधनावर २८ टक्के जीएसटी लावला इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा काँग्रेसचा दावा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पाच रुपयांत एक लिटर शुद्ध पाणी

$
0
0

पाच रुपयांत एक लिटर शुद्ध पाणी

मॉडेल रेल्वेस्थानकावर तीन वॉटर प्युरिफायर मशीन बसविणार

औरंगाबाद ः

औरंगाबाद रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफायर मशीन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याची नवीन मशीन बसविण्याची प्रक्रिया सुरू असून या मशीनमधून पाच रुपयांमध्ये एक लिटर पाणी रेल्वे प्रवाशांना उपलब्‍ध होणार आहे.

मेट्रो शहरातील रेल्वेस्थानकांप्रमाणे आता औरंगाबाद रेल्वेस्थानकावरही पिण्यासाठी फिल्टर पाणी उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेस्थानकावर तीन वॉटर प्युरिफायर व्हेंडिंग मशीन बसविल्या जात आहेत. यापैकी एक वॉटर वेंडिंग मशीन जुन्या प्रतीक्षालयाच्या शेजारी लावली जात आहे. तर, दुसरी मशीन नवीन शेडमध्ये आणि तिसरी मशीन दोन नंबर प्लॅटफॉर्मवर लावली जाणार आहे. या मशीनद्वारे रेल्वेप्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. दमरेने प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने बुधवारी एक वॉटर प्युरिफायर मशीन बसविण्यासाठी रेल्वेस्थाकावर आणली.

शुक्रवापासून (२२ सप्टेंबर) या मशीनद्वारे रेल्वे प्रवाशांना शुद्ध पाणी मिळू शकेल. पाणी देण्यासाठी तिन्ही मशीनवर प्रत्येकी एक कर्मचारी नेमण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेस्थानक प्रमुख एल. के. जाखडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमएड प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुणवत्ता यादीत त्रुटी राहिल्याने अध्यापक पदव्युत्तर अभ्यासक्रमाची (एमएड) प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. परंतु, प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थीच इच्छुक नसल्याचे समोर आले आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक कॉलेजमध्ये एक-दोन विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे.
बीएड व एमएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली, शिवाय मुंबई विद्यापीठाच्या निकालामुळे बीएड व गुणवत्ता यादीतील चुकांमुळे एमएडची प्रक्रिया लांबली. एमएडला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक नसल्याचे पहिल्याच फेरीत समोर आले.कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची मुदत गुरुवारी संपली. खासगी कॉलेजप्रमाणे शासकीय अध्यापक महाविद्यालयांमध्येही प्रवेशाची अवस्था गंभीर आहे. औरंगाबादच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात पहिल्या फेरीत फक्त दोन प्रवेश झाले.

आजपासून दुसरी फेरी

दुसरी फेरी शुक्रवारपासून (२२ सप्टेंबर) सुरू आहे. त्यानुसार, २२ ते २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजचे ऑप्शन भरायचे आहेत. २९ रोजी अलॉटमेंट यादी जाहीर केली जाणार आहे. ३ ते ५ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश घ्यावयाचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा नियोजन मंडळावर ४० सदस्यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) ४० सदस्यांची निवड करण्यात आली आहे. निवडणुकीचा निकाल गुरुवारी (२१ सप्टेंबर) जाहीर करण्यात आला असून डीपीसीवर १८ सदस्य निवडणुकीद्वारे, तर २२ सदस्य बिनविरोध निवडून आले.
जिल्हा नियोजन समितीवर मोठ्या निर्वाचन क्षेत्रातून (महापालिका) निवडून आलेल्या १३ सदस्यांमध्ये खान सायराबानो अजमल, सायली जमादार, पठाण अस्मा फिरदोस रफिक, भारती सोनवणे हे विजयी झाले. कैलास गायकवाड, आशा भालेराव, आत्माराम पवार, कादरी जमीर रहीम अहेमद, मनीषा लोखंडे, शोभा वळसे, राहुल सोनवणे, अप्पासाहेब हिवाळे व सचिन खैरे हे बिनविरोध निवडून आले. ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून (जिल्हा परिषद) निवडून आलेल्या २४ सदस्यांमध्ये शुभांगी काजे ,अविनाश गलांडे (शिवसेना), एल. जी. गायकवाड, शिवाजी पाथ्रीकर (भाजप), किशोर बलांडे, सय्यद क‌लीम (काँग्रेस) सुरेश गुजराणे (भाजप), गोपीचंद जाधव (काँग्रेस), अक्षय जायभाये (शिवसेना), छाया अग्रवाल, पुष्पाबाई काळे (भाजप), पल्लवी नवथर (काँग्रेस), मोनाली राठोड (शिवसेना) हे उमेदवार निवडून आले. सीमा गव्हाणे (काँग्रेस), ज्योती चोरडिया (भाजप), स्वाती निरफळ, वैशाली पाटील, शितल बनसोड (शिवसेना), अनिता मोटे (भाजप), बबन कुंडारे (काँग्रेस), शामराव बनसोड (भाजप), साधना एडके (शिवसेना), रेखा नांदूरकर (भाजप), शिवाजी ठाकरे (काँग्रेस) हे बिनविरोध निवडून आले. लहान नागरी निर्वाचन क्षेत्रातून (नगरपालिका) सुदर्शन अग्रवाल हे निवडणुकीद्वारे, तर अब्दुल समीर व स्वाती कोल्हे हे बिनविरोध निवडून आले. ही माहिती अप्पर जिल्हाधिकारी निर्वाचन अधिकारी पी. एल. सोरमारे यांनी दिली. निवडणुकीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, देवेंद्र कटके, दीपक चव्हाण यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार ‌महाविद्यालयात पार्किंग निःशुल्क

$
0
0

चार ‌महाविद्यालयात पार्किंग निःशुल्क

युवा क्रांती एल्गारच्या प्रयत्नाला यश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरस्वती भुवन कॉलेजसह इतर तीन कॉलेजची पार्किंग विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क करण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यापासून युवा क्रांतीचे यासाठी प्रयत्न सुरू होते. यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तरुणांनी सुरू केलेल्या युवा क्रांती एल्गार या संघटनेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पार्किं शुल्काबाबत मोहीम सुरू केली होती. गेल्या एक महिन्यापासून ही मोहीम सुरू होती. विद्यार्थ्यांकडून पार्किंगसाठी आकारण्यात येणारे शुल्क घेऊ नये, अशी मागणी या संघटनेने कॉलेज प्रशासनाकडे केली होती. यासोबत बिल्डिंग फंड घेऊ नये, लायब्ररी फी बंद करावी, कँटीन सुविधा उपलब्ध करून द्यावी, रँगींग वर आळा घालावा अशा मागण्या या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. यापैकी चार कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी पार्किंग निःशुल्क करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. यामध्ये विवेकानंद कॉलेज, छत्रपती कॉलेज, देवगिरी कॉलेज व सरस्वती भुवन कॉलेजचा समावेश आहे. युवा क्रांतीचे अध्यक्ष देव राजाळे, धम्मपाल त्रिभुवन, शुभम दहीवाल, कृष्णा तुंगे, प्रतिक बसैये, भूषण वाहूळ, रोहीत लोखंडे, चेतन नवटे, मनिष जरड, किरण राजाळे आदींनी यासाठी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाचा फटका, अंडरग्राउंड जलमय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात गुरुवारी दुपारी पडलेल्या पावसामुळे विविध भागातील अंडरग्राउंड बांधकामे जलमय झाली. यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांचे हाल झाले. अग्निशमन दलाला पाणी शिरल्याची माहिती देणारे तीस पेक्षा जास्त फोन आले. त्यामुळे शहराच्या रस्त्यांवरून अग्निशमन दलाचे बंब फिरताना दिसले.
शहर व परिसरात गुरुवारीसुद्धा पावसाळी वातावरण होते. सलग तिसऱ्या दिवशी शहरवासियांना सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या, अचानक पावसाचा जोर वाढत होता. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांची तारांबळ उडाली. नाल्यांना पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरण्याएवढा मोठा पाऊस गुरुवारी नव्हता, पण अंडरग्राउंड बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याच्या तक्रारी अग्निशामक दलाला प्राप्त झाल्या.
नुर कॉलनी, पीरबाजार, सिडको एन ४, श्रेयनगर, क्रांती नगर, पारिजातनगर, सिडको एन ५, मल्हारचौक गारखेडा, जयभवानीनगर, क्रांती चौक, उस्मानपुरा, सिडको भागातील महाराष्ट्र बँक, जवाहर कॉलनी, वसंतनगर, पुंडलिकनगर रोड, मयूरपार्क, मुकुंदवाडी, दशमेशनगर, गजानननगर, निराला बाजार, कैलासनगर, गुलमोहर कॉलनी या भागातील अंडरग्राउंडमध्ये पाणी शिरले. हे पाणी सहा बंबांच्या साह्याने काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर व शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी रात्री आठच्या सुमारास जयभवानीनगरमध्ये पाहणी केली.

भाजप कार्यालयात पाणी

रेल्वे स्टेशन रोडवरील भाजपच्या विभागीय कार्यालयाच्या बेसमेंटमध्ये पासवाचे पाणी साचले. यावेळी कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. बेसमेंटमध्ये पाणी आणि तळमजल्यावरील खोलीत पदाधिकाऱ्यांची बैठक ,असे चित्र होते. एका पदाधिकाऱ्याने अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर बंबाने घटनास्थळी येऊन पाणी उपसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहात शिरले पाणी

$
0
0

वसतिगृहात शिरले पाणी

बीएड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रात्र जागवली

वसतिगृहातील सुविधांबाबत तातडीची बैठक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुसळधार पावसाने शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहात पाणी शिरले ते पाणी काढण्यासाठी रात्रभर विद्यार्थ्यांनी जागवली. विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने अधिक हाल झाले. गुरुवारी विद्यार्थ्यांनी बैठक घेत सोयीसुविधांबाबत नाराजी व्यक्त केली.

बुधवारच्या पावसाने शहराच्या अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले. पदमपुऱ्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचेही पावसाने हाल केले. कॉलेजसमोरच विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. पावसाने या वसतिगृहात पाणी शिरले. तळमजल्यातील सगळ्या रूममध्ये पाणीच पाणी साचले, बाहेरही पाणी. रूममध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना बाहेरही पडता येत नव्हते. गुडगाभर पाणी रुममध्ये साचले होते. विद्यार्थ्यांनी बादली बादलीने पाणी बाहेर काढले. मध्यरात्री १ वाजेपर्यंत विद्यार्थी पाणी काढण्याचेच काम करत होते. त्यात विद्युत पुरवठा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे अधिक हाल झाले.

बांधकाम विभागाचे अधिकारी, प्रशासन, विद्यार्थी बैठक

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे इमारतीच्या डागडुजीची जबाबदारी असल्याचे कॉलेज प्रशासनाने सांगितले. बुधवारच्या प्रकरणानंतर गुरुवारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट दिली. कॉलेज प्रशासन, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात बैठक झाली. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील असुविधा बैठकीत मांडल्या. त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

गवतही वाढलेले

वसतिगृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत साचलेले आहे. नियमितपणे गवत न काढल्याने अनेक झुडपांच्या फांद्या रूमच्या खिडकीपर्यंत आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात गवत असल्याने सापांची भीतीही विद्यार्थ्यांना सतावते आहे.

जुनी इमारत

वसतिगृहाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. ड्रेनेजची व्यवस्थाही पूर्णपणे खराब झालेली आहे. त्यामुळे दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात आहे. देखभाल दुरूस्तीसाठी वारंवार मागणी केल्यानंतरही दुर्लक्ष होते आहे. कॉलेज प्रशासनाने त्यासाठी उच्चशिक्षण विभागाकडे पाठपुरावा केल्याचे प्राचार्य डॉ. संजीवनी मुळे यांनी सांगितले. प्रसाधन गृह, वॉटर टँकसाठी उच्चशिक्षण विभागाला ६ सप्टेंबरलाच पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधेलीच्या शेतकऱ्यांचे गळफास लाऊन आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मौजे गांधेली येथील जमीनीचे क्षेत्रफळ, अभिलेखे, नकाशे तसेच गट बदलीमध्ये भूमी अभिलेख विभागाने प्रचंड चुका केल्या आहेत. येथील सर्व जमिनींचे निजामकालीन सर्व्हेनंबर, जुने नकाशे यांचा मेळ घालून विनामूल्य दुरुस्तीच्या मागणीसाठी गांधेली येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी प्रतिकात्मरित्या गळफास घेऊन आंदोनल केले. भूमीअभिलेख कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
बागतलाब गट क्रमांक १ ते ४१ या सर्व जमीन मालकी व ताबे वहिवाटीत वडिलोपार्जित १०० वर्षांपासून आहेत. या ७१ शेतकऱ्यांना सालार जंगच्या नावाखाली नोटीस पाठवून हैराण करण्यात येत आहे. या प्रकारामुळे गांधेलीच्या शेतकऱ्यांना जगणे अवघड झाले आहे. भूमी अभिलेख विभागाने केलेल्या चुकांमुळे कोर्ट कचेऱ्या कराव्या लागत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
चुका दुरुस्त कराव्या या मागणीसह औरंगाबाद व बीड येथील जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख, उपसंचालक, भूमी अभिलेख औरंगाबाद यांनी दहा वर्षात न्यायालय म्हणून दिलेल्या निर्णयाची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायधीशामार्फत समीक्षा व चौकशी करावी, चुकीचे व नियमांचे उल्लंघन करून निर्णय देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबीत करुन त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर बळीराम पोले, गोविंद पोले, रामसिंग रोरे, अय्युब शेख, रामदास रोरे, वजीर शेख, हबीबभाई शेख, हुसेन भाई शेख, अकील शेख, भगवान रोरे, वसीम शेख आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पालिका हद्दीतील १६६ दवाखान्यांची नोंदणी रद्द

$
0
0

पालिका हद्दीतील १६६ हॉस्पिटलची नोंदणी रद्द

नूतनीकरणासाठी १०१ प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिका हद्दीतील तब्बल १६६ हॉस्पिटलची नोंदणी रद्द झाली असल्याची माहिती मिळाली आहे. परवानगीचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेकडे १०१ प्रस्ताव दाखल झाले असून त्यावर निर्णय घेतला जात आहे.

शहर व परिसरातील वसाहतींमध्ये दवाखाना सुरू करण्यासाठी संबंधितांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. महापालिकेतर्फे हॉस्पिटलना परवानगी दिली जाते किंवा परवान्याचे नूतनीकरण करून दिले जाते. परवानगी नसलेल्या दवाखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेकडे ६२९ दवाखान्यांची नोंदणी होती. त्यापैकी सध्या ४६३ दवाखाने सुरू असून १६६ दवाखान्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. दवाखान्याच्या संचालकांनी विनंती अर्ज करून नोंदणी रद्द करून घेतली आहे. दवाखान्यांच्या नूतनीकरणाचे १०१ प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. २१ प्रस्ताव नगर रचना विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आले आहेत. कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे १७ प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आले नाहीत. दहा प्रस्तावांच्या संदर्भात संबंधितांनी महापालिकेचे शुल्क न भरल्यामुळे नूतनीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही.

काही दवाखान्यांनी बांधकाम परवानगीच्या व्यतिरिक्त बांधकाम केलेले असते किंवा काही दवाखान्यांच्या बाबतीत दवाखान्यांच्या वापरात बदल केलेला असतो, त्यामुळे अशी प्रकरणे अभिप्रायासाठी नगर रचना विभागाकडे पाठवण्यात येतात. दवाखान्याची नोंदणी परवानगीचे नूतनीकरण या संदर्भात ‘मटा’ शी बोलताना महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर म्हणाल्या, एप्रिल ते जून दरम्यान नूतनीकरणाचे अर्ज स्वीकारले जातात. या मुदतीत ज्या दवाखान्यांचे अर्ज नूतनीकरणासाठी प्राप्त होत नाहीत ते दवाखाने अनधिकृत समजले जातात. महापालिकेकडे ६२९ दवाखान्यांची नोंदणी आहे, त्यापैकी ४६३ दवाखाने सुरू आहेत व १६६ बंद आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपाचा शहरात फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील सुमारे तीन हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी गुरुवारी संपात सामील झाले. त्यामुळे संपाच्या पहिल्याच दिवशी कार्यालयामध्ये नियमित साफसफाई होऊ शकली नाही.
शहर व जिल्ह्यात सुमारे तीन हजार कर्मचारी संपावर असल्याने शासकीय कार्यालये उघडण्यापासून साफसफाई, टपालांची वाहतूक, संचिका पाठविणे, शासनाकडून आलेले पत्रव्यवहार खातेअंतर्गत पाठविण्याची कामे झाली नाहीत. विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, घाटी हॉस्पिटल, यासह इतर विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गैरसोय झाली. एकूण ५०२ कर्मचाऱ्यांपैकी २०० कर्मचारी संपावर होते. घाटी हॉस्पिटलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या २४२ जागा रिक्त आहेत. हॉस्पिटलचा परिसर गुरुवारी सकाळी घोषणांनी दणाणून सोडले. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम झाला नाही, असा दावा वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक यांनी केला. दरम्यान, के. के. ग्रुपच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांनी रुग्णांना मदत केली. त्यासाठी ग्रुपचे अखिल अहेमद, किशोर वाघमारे, जुनेद शेख आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images