Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नवरात्रोत्सवानिमित्त शहरात चोख बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. यानिमित्त पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. दोन हजार पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडी नेमण्यात आली आहे. तसेच कर्णपुरा व विविध रास दांडियाच्या ठिकाणी विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरात कर्णपुरा येथे दरवर्षीप्रमाणे यात्रेला सुरुवात झाली आहे. तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्णपुरा यात्रेत पाकीटमारी, मंगळसूत्र चोरी, छेडछाड रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या उत्सवा‌करिता ३५ पोलिस निरीक्षक, ९६ एपीआय, पीएसआय, दीड हजार पोलिस कर्मचारी, २२५ महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर सहा फिक्स पॉइंट लावले आहेत. या बंदोबस्तावर पोलिस आयुक्त, उपायुक्त व एसीपी नजर ठेवून आहेत.
गणेशोत्सवात शहरात एक हजार विशेष पोलिस अधिकारी निवडण्यात आले. त्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवला होता. यंदा नवरात्रोत्सवात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रास दांडियामध्ये पोलिसांच्या मदतीकरिता महिला व पुरूष विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरिकांनी बंद केले दुभाजक

$
0
0

नागरिकांनी बंद केले दुभाजक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन पाच ते कॅनाट प्लेस मार्गावरील रस्त्यांच्या दुभाजकांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. नागरिकांनी आठ महिन्यांपूर्वी महापाल‌िका प्रशासनाकडे दुभाजक दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, मनपाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी बांबू दगड, रिकाम्या कुलरचा वापर करीत तात्पुरत्या स्वरुपात अपघाताला निमंत्रण देणारे हे दुभाजक बंद केले आहे.
शहरातील अनेक रस्त्यावरील दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. सिडको एन पाच ते कॅनाट प्लेस भागात तर अनेक ठिकाणी ‌जमीनदोस्त झाले आहे. काही दुभाजकामध्ये वाहनधारकांनी शॉर्टकट मारण्यासाठी गॅप निर्माण केला आहे. या गॅपमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येथील जागरुक नागरिक राहुल इंगळे यांनी महापालिका सदरील दुभाजकातील धोकादायक गॅप बंद करण्याची देखील मागणी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, आठ महिने उलटले तरी मनपा प्रशासनाने या दुभाजकाच्या दुरुस्तीची कोणतीही पावले उचलली नाहीत. परिणामी सिडको एन पाच ते कॅनाट रस्त्यावरील दुभाजकातील गॅप नागरिकांनी स्वतः बंद केला आहे. यासाठी बांबू, दगड, रिकामे कुलरचे खोके याचा वापर नागरिकांना करावा लागला आहे.
आठ महिन्यांपूर्वी मनपा प्रशासनाला निवेदन सादर करीत या दुभाजकांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. या भागात कॉलेजच्या मुलांचे प्रमाण जास्त आहे. या दुभाजकातील गॅपमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मनपा प्रशासनाने या गोष्टीची दखल घेत या दुभाजकांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
- राहुल इंगळे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या गरजांसाठी 'दक्षता पेट्रोलियम'

$
0
0


पोलिसांच्या गरजांसाठी 'दक्षता पेट्रोलियम'
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार पोलिसांचे पेट्रोल पंप
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पोलिस कल्याण निधी’अंतर्गत राज्यभरातील सर्व जिल्ह्यात ‘दक्षता पेट्रोलियम’ नावाने पोलिस प्रशासनाच्या मालकीचे पेट्रोलपंप सुरू करण्यात येणार आहेत. या पेट्रोल पंपांमधून मिळणारा सर्व नफा पोलिस कल्याण निधीत जमा होणार आहे. त्याद्वारे गरजू पोलिस कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना किंवा आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदत करण्यासाठी पोलिस कल्याण निधी असला तरी तिथल्या निधी संकलनासाठी पोलिसांना अनेकदा हात पसरावे लागतात. या निधी संकलनात पोलिसांकडून दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे आता जिल्हास्तरावर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नियंत्रणात पोलिसांना त्यांच्या मालकीचे पेट्रोल पंप दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात नागरपूर ग्रामीण, ठाणे शहर, ठाणे ग्रमीण, नाशिक, पुणे या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे. येत्या सहा महिन्यांत या ठिकाणी पंपांना सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद ग्रामीण, जालना, लातूर, बीड येथे पेट्रोलपंप मिळणार आहे. या पंपाचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडून मागविण्यात आला आहे.
पोलिस पाल्यांना रोजगार
औरंगाबाद ग्रामीण पोलिस कल्याण निधीअंतर्गत चिकलठाणा परिसरात पंप सुरू करण्यात येणार आहे. हा पेट्रोल पंप २४ तास सुरू राहील. या ठिकाणी १२ जणांना रोजगार उपलब्ध होईल. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाच नोकरी देण्याचा मानस असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
आठ प्रस्ताव आले
पोलिसांसाठी मंजूर झालेल्या पेट्रोल पंपांवर पोलिसांच्या वाहनांना सवलतीच्या दरात इंधन देण्याचा प्रयत्न आहे. तसेच, इथल्या इंधनविक्रीतून होणारा नफा हा थेट पोलिस कल्याण निधीत जमा होणार आहे. हे पंप हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेडच्या माध्यमातून स्थापन करण्यात येणार आहे. एचपीसीएल कंपनीच्या सहमतीनंतर रितसर करार करून हे पेट्रोल पंप सुरू होतील. सध्या आमच्याकडे राज्यातून आठ प्रस्ताव आलेले आहेत. दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या मालकीचे पंप राहतील, अशी माहिती राज्याच्या सहाय्यक पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरोदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून माजी सैनिकांची भरती

$
0
0

आजपासून माजी सैनिकांची भरती
औरंगाबाद : महाराष्ट्रातील पात्र इच्छुक माजी सैनिकांसाठी १३६ इन्फट्री बटालियन (टी.ए.) इको, महारच्यावतीने पर्यावरणीय दलासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान सकाळी ६ वाजता विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद येथील पटांगणात नायब सुभेदार, शिपाई जी डी, शिपाई एम टी (वाहनचालक), सिग्नलमॅन, भांडारपाल, सुतार, लोहार, ड्रेसर, ईक्वीपमेंट दुरुस्ती या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी त्याठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, औरंगाबाद यांनी केले आहे.
या भरतीकरीता सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ५ वर्षाच्या आतील सर्व जवान आणि जे.सी.ओ. यांना अर्ज करता येणार आहे. पीपीओ, डिस्चार्ज पुस्तक, अधिवास प्रमाणपत्र, रिलीज मेडिकल बोर्ड प्रमाणपत्र इत्यादींची मूळ प्रत व पासपोर्ट साईज कलर फोटो १० घेऊन हजर रहावे. माजी सैनिक निवृत्ती वेतन धारक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. माजी सैनिकावर कुठेही पोलिस केस किंवा कोर्ट केस नोंदलेली नसावी, शारीरिक पात्रतेत उंची १६० से.मी., वजन ५० किलो, छाती ८२ व फुगवून ८७ से.मी. असावी. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकृत आरोपींकडून महिलांची छेडछाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मथुरानगर सिडको एन-सहा भागात विकृत आरोपींनी महिलांची छेड काढली. याप्रकरणी शुक्रवारी एका पीडित महिलेने सिडको पोलिस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरुद्ध विनयभंगाची तक्रार देखील दिली, मात्र पोलिसांनी केवळ समज देऊन सोडल्यानंतर आरोपींनी परिसरात धुडगूस घालून काचा फोडल्या. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी रविवारी सिडको पोलिस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर दोन्ही आरोपी भावांना अटक करण्यात आली.

मथुरानगर भागात एक ३० वर्षांची महिला पती, सासू, सासऱ्यासोबत राहते. या महिलेच्या घरासमोर संशयित आरोपी बाळू उर्फ देवेंद्र उर्फ गणेश आश्रूबा पैठणे व सतीश पैठणे कुटुंबासोबत राहतात. बाळू हा गेल्या सहा महिन्यांपासून या महिलेला अश्लील शेरेबाजी करीत होता. त्याला समजावून देखील सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान, बाळूने शुक्रवारी सकाळी या महिलेची छेड काढली. या महिलेने तिच्या पतीला हा प्रकार सांगितला. महिलेच्या पतीने व परिसरातील नागरिकांनी आरोपी बाळूला समजावून सांगत असताना त्याचा भाऊ सतीशने, ‘माझ्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला, तर ठार मारू,’ अशी धमकी दिली. याप्रकरणी महीलेने शुक्रवारी पोलिस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार दिली होती.

समज दिल्यानंतर धुडगूस
दरम्यान, आरोपी बाळू हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी त्याला समज देऊन सोडले होते. बाळू व त्याचा भाऊ सतीश यांनी मथुरानगरात गेल्यानंतर धुडगूस घातला. या कुटुंबाला शिवीगाळ करीत तेथील घरांच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकाराने महिला संतप्त झाल्या. रविवारी सकाळीच महिलांच्या जमावाने पोलिस ठाणे गाठले. आरोपींना अटक करण्याची मागणी करीत ठिय्या देण्यात आला. पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी तातडीने सूत्रे फिरवत संशयित आरोपी बाळू व सतीश पैठणे यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगाला बाबासाहेब समजले देशाला नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले. जगविख्यात शैक्षणिक संस्था-विद्यापीठांनी बाबासाहेबांनाच सर्वाधिक गौरविले व जगाला खऱ्याअर्थाने बाबासाहेब समजले; परंतु आपल्या देशाला बाबासाहेब समजलेच नाहीत. मुळात बाबासाहेबांना अजूनही मानसिक-भावनिक पातळीवर स्वीकारलेले नाही, हे देशाचे फार मोठे दुर्दैव आहे, अशी टीका प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ‘लॉयर्स डे’निमित्त केली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ जुलै १९२३ रोजी वकिली पेशा सुरू केला. हा दिवस पाच वर्षांपासून ‘लॉयर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त रविवारी तापडिया नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया, प्रदीप देशमुख, मनोहर टाकसाळ, व्ही. डी. साळुंके, रवींद्र देशमुख, आनंदसिंग बायस, नानासाहेब शिंदे, प्रल्हाद खंडागळे, संजय भिंगारदेव, सुदेश शिरसाठ, अमोल सावंत, एस. एस. काझी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. मुणगेकर म्हणाले, विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता, असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरुंनी मला प्रत्यक्ष सांगितले. ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’मध्येही डॉ. आंबेडकर यांच्या गौरवार्थ तैलचित्र लावण्यात आले आहे. मात्र भारतात डॉ. आंबेडकर यांना अजूनही ‘महारांचा पुढारी-दलितांचा पुढारी’ असे संबोधले जाते. घटनानिर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान नाही, असा आरोप अरूण शौरी यांनी केला होता. परंतु देशामध्ये बाबासाहेबांच्या तोडीची एकही व्यक्ती नव्हती म्हणून त्यांना घटना समितीमध्ये घेण्यात आले. तसेच घटना समितीचे काही सदस्य आजारी होते, तर काहीजण गैरहजर होते. त्यामुळे घटनेचा मूळ ड्राफ्ट तयार करण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर आली, असे खुद्द घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनीच नोंदविले आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा जन्म या देशात झाला, हे देशाचे सुदैव आहे, पण देशाला बाबासाहेब समजेले नाही, हे देशाचे दुर्दैव आहे, असेही मत नोंदविले. गेल्या ४० वर्षांपासून देशाचा बट्ट्याबोळ सुरू असून, अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही प्रामाणिकपणा, निष्ठा, अभ्यासूपणा असे एक ना अनेक गुण बाबासाहेबांकडून शिकलेच पाहिजे, असेही डॉ. मुणगेकर म्हणाले.

मराठा मोर्चे केले ‘मॅनेज’
सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायमूर्तींनी ज्याला खुनी ठरवले ती व्यक्ती आज पंतप्रधान असून, देशाचा सर्व प्रकारचा खोटेपणा आता चव्हाट्यावर येत आहे. एवढेच नव्हे, तर मराठा मोर्चेदेखील सरकारनेच ‘मॅनेज’ केले, असा आरोप निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीतही महिलांचा टक्का जेमतेम

$
0
0

नोकरीतही महिलांचा टक्का जेमतेम
विभागात शासकीय सेवेत स्त्री कर्मचाऱ्यांचे कमी
औरंगाबाद : पारंपरिक आणि व्यावसायिक शिक्षणात विद्यार्थिनींचे प्रमाण वाढत असले तरी शासकीय सेवेत अजूनही महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर अशा मोठ्या शहरांचा अपवाद वगळता खासगी नोकरीतही संख्या तुलनेने कमी आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात राज्यात सर्वात कमी स्त्री कर्मचारी हिंगोली जिल्ह्यात आहेत.
आधुनिक काळात स्त्रियांनी घराबाहेर पडून नोकरी-व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली आहे. महत्त्वाच्या पदांवर कार्यरत स्त्रियांनी वेगळा ठसा उमटवला आहे. जनसामान्यांशी निगडीत विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात महिला अधिकारी आघाडीवर आहेत. स्पर्धा परीक्षेद्वारे उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील मोठ्या पदावर स्त्री कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. तरीसुद्धा सद्यस्थितीत ‘क’ आणि ‘ड’ गटात सर्वाधिक स्त्री कर्मचारी आहेत. महिला सबलीकरणाचा गाजावाजा असताना शासकीय सेवेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे ‘शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष २०१५’ या अहवालात स्पष्ट झाले. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जिल्ह्यानिहाय शासकीय कार्यालयातील स्त्री कर्मचाऱ्यांचे त्या जिल्ह्यातील एकूण पदनियुक्त कर्मचाऱ्यांशी प्रमाण नोंदविण्यात आले. यात मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी २३ टक्के स्त्री कर्मचारी आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यात हे प्रमाण कमी आहे. सर्वात कमी प्रमाण हिंगोली जिल्ह्यात अवघे दहा टक्के आहे. विभागनिहाय पाहणीनुसार कोकण विभागात सर्वाधिक २०.३ टक्के तर नाशिक विभागात सर्वात कमी १५.६ टक्के स्त्री कर्मचारी आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कर्मचाऱ्यांपैकी स्त्री कर्मचाऱ्यांचे प्रमाण १८.५ टक्के आहे. जालना जिल्ह्यात १३.४ टक्के, परभणी जिल्ह्यात १५.५ टक्के, हिंगोली जिल्ह्यात १०.४ टक्के, बीड १७ टक्के, नांदेड १५.३ टक्के, उस्मानाबाद १६.८ टक्के आणि लातूर जिल्ह्यात हेच प्रमाण १५.८ टक्के आहे. पारंपरिक मानसिकता असल्यामुळे अजूनही काही भागात मुलींना नोकरी करू दिली जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रोडवर पुन्हा ठिगळपट्टी

$
0
0

औरंगाबाद ः खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या औरंगाबादकरांना थोडा दिलासा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी जालना रस्त्यावर पुन्हा ठिगळपट्टी केली. गेल्या काही महिन्यांपासून जालना रस्त्यावरील जीवघेणे खड्डे औरंगाबादकरांची डोकेदुखी बनले आहेत.

शहरातील सर्वाधिक रहदारीच्या जालना रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. महावीर चौक ते चिकलठाणा या मार्गावरील दोन्ही बाजूच्या रस्त्याची चाळणी झाली आहे. खड्ड्यातून वाट काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता महापालिकेच्या हद्दीत असूनही देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. तीन वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत जालना रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले. पावसाळ्यात रस्त्याची डागडुजी करता येत नाही. त्यामुळे दोन वेळा खडी, माती टाकून खड्डे बुजविले गेले, पण त्यानंतर झालेल्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खड्डे उघडे पडले. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने खडी, डांबर टाकून खड्डे बुजविले. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण केले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवघ्या ६ मिनिटांत ‘आधार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

तिचा जन्म होऊन अवघे ६ मिनिट झाले असले तरी तिच्याकडे स्वतःची आधारच्या माध्यमातून ओळख आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात जन्मलेल्या भावना संतोष जाधव हिला जन्म झाल्यानंतर अवघ्या ६ मिनिटात आधार कार्ड मिळाले असून तिने भारतात नवीन रेकॉर्ड बनवले आहे. जन्मल्यानंतर सर्वात कमी वेळेत तिला आधारच्या रूपाने भारतीय नागरिक असल्याची ओळख मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमातंर्गत जन्मलेल्या बाळांना तात्काळ आधार देण्याची योजना सुरू केल्याने हे शक्य झाले.

यापूर्वी मध्यप्रदेश राज्यातील झाबुवा येथील राखी या मुलीला जन्म झाल्यानंतर २२ मिनिटांत आधारकार्ड मिळाले होते. मात्र, हे रेकॉर्ड उस्मानाबाद स्त्री रुग्णालयात जन्म घेतलेल्या भावनाने मोडले. स्त्री रुग्णालयातील सर्जन, स्त्रीरोग, बालरोग डॉक्टर यांनी वेळेचे योग्य प्रकारे नियोजन करून आधार व जन्म दाखला दिला. यासाठी सर्व डॉक्टरांची टीम तत्परतेने हजर होती.

उस्मानाबाद स्त्री रुग्णालयात सुरेखा व संतोष जाधव या दाम्पत्याची मुलगी भावना हिचा २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी जन्म झाल्यावर बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. तिची तब्येत ठीक असल्याचे स्पष्ट झाल्यावर तिची १२ वाजून ९ मिनिटांनी आधार नोंदणी मशीनवर फोटो काढून नोंदणी केली. अवघ्या ६ मिनिटात आधार क्रमांक देण्याचे भारतातील एक नवीन रेकॉर्ड स्थापित केले.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा शल्य चिकित्सक एकनाथ माले यांच्या हस्ते आधार व जन्म दाखला मुलीच्या पालकांना देण्यात आला. यानंतर स्त्री रुग्णालयात असलेल्या भावनाच्या जन्माचे स्वागत जन्मोत्सव या कार्यक्रमात करण्यात आले. हे रेकॉर्ड बनवण्यासाठी डॉ. चंचल बोडके, डॉ. राहुल वाघमारे, डॉ. रेखा टिके, डॉ. पंकज पाटील, डॉ. सतीश आदटराव, डॉ. सुधीर सोनटक्के, डॉ. श्रीकांत मिनीयार या डॉक्टरांची टीम कार्यरत होती. सहायक अधिसेविका मंदाकिनी शिंदे यांच्यासह कर्मचारी होते.

बालकांचा जन्मोत्सव उपक्रम

भावनाला जन्मल्यावर आधार व जन्माचा दाखल मिळाला असून गेल्या १ वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात जन्मतः आधार व लहान बालकांचा जन्मोत्सव हे उपक्रम राबविले जातात. त्यातून १३०० बालकांना आधार क्रमांक मिळाला. डिजिटल इंडिया मोहिमेला उस्मानाबाद जिल्ह्यात गती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पैठणचा कारखाना पुन्हा एकदा वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
संत एकनाथ साखर सहकारी कारखाना भाडेकरारावर चालवण्यासाठी घेणारी शीला अतुल शुगर टेक प्रा. लि. ही कंपनी तीन महिन्यापूर्वी स्थापन झाली आहे. केवळ दहा लाख रुपये भागभांडवल असणाऱ्या या कंपनीला कोट्यवधी रुपयांचा कारखाना ताब्यात देण्याचा व्यवहार संशयास्पद आहे, असे निवेदन काराखान्याच्या चार संचालकानी कार्यकारी संचालकांना दिले आहे.
संत एकनाथ साखर कारखाना अठरा वर्षांसाठी भाडेकरारावर चालवण्यासाठी घेणाऱ्या सचिन घायाळ शुगर या कंपनीसोबत कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाचे कोर्ट व साखर आयुक्ताकडे वादप्रकरण दाखल केले आहे. दरम्यान, चेअरमन तुषार शिसोदे यांनी सचिन घायाळ कंपनीचा करार रद्द झाला नसताना कारखाना नाशिक येथील शीला अतुल शुगर कंपनीला भाडेकरारावर चालवण्यासाठी देण्याचा ठराव घेतला आहे. शीला अतुल शुगर कंपनीचे भागभांडवल केवळ दहा लाख रुपये असून कंपनी तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच ७ जून २०१७ रोजी स्थापन झाली आहे. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नाही व केवळ दहा लाख रुपये भागभांडवल असणाऱ्या कंपनीला कोट्यवधीचा संत एकनाथ साखर कारखाना भाडेकरारावर देण्याचा व्यवहार संशयास्पद आहे, असा आक्षेप विद्यमान संचालक अप्पासाहेब पाटील, ज्ञानेश औटे, आसाराम शिंदे व अहिल्याबाई झारगड यांनी कार्यकारी संचालक याना दिलेल्या निवेदनात घेतला आहे.
भाडेकरारावर चालवण्यासाठी दिलेल्या कंपनीसोबतचा करार रद्द न करता कारखाना चालवण्यासाठी पात्र नसणाऱ्या दुसऱ्या कंपनीला कारखाना भाडेकरारावर देण्याचा हालचालीमुळे, यंदा कारखाना सुरू होण्याबद्दल ऊसउत्पादकांमध्ये संभ्रम आहे.
...
करार नसताना कारखाना ताब्यात
संत एकनाथ साखर कारखाना नाशिक येथील शीला अतुल शुगर कंपनीला भाडेकरारावर चालवायला देण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला आहे. मात्र, सचिन घायाळ शुगर प्रा. लि. या कंपनीसोबतचा करार अद्याप रद्द केलेला नाही. शीला अतुल शुगर कंपनीसोबत कोणताही करार न करता कारखाना त्यांच्या ताब्यात दिल्या आश्चर्य व्यक्त होत आहे.
....
कोट
शीला अतुल शुगर कंपनीविषयी कारखान्याच्या काही संचालकांनी उपस्थित केलेली शंका निराधार आहे. करार झाला नसताना या कंपनीने आतापर्यंत दोन ते अडीच कोटी रुपये खर्च केलेले आहे. -तुषार शिसोदे, चेअरमन, संत एकनाथ साखर कारखाना
..
शीला अतुल शुगर कंपनी ही बनावट कंपनी आहे. आमचा करार रद्द झाला नसताना केवळ राजकीय फायद्याकरिता कारखान्याचे चेअरमन शिसोदे सर्वांची फसवणूक करत आहेत.
-सचिन घायाळ, चेअरमन, घायाळ शुगर कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण बाजार समितीस चाळीस लाखांचा नफा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
‘गेल्या वर्षी तेरा लाख रुपये तोट्यात असलेल्या पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला यावर्षी ४० लाख रुपयांचा नफा झाला आहे. पणन मंडळाच्या टॅली सॉफ्टवेअरमध्ये दररोज जमा-खर्च दाखल करणाऱ्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये पैठणच्या बाजार समितीला पहिला क्रमांक मिळाला आहे,’ अशी माहिती सभापती राजू भुमरे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार संदीपान भुमरे यांची प्रमुख म्हणून उपस्थिती होती. बाजार समितीचा पारदर्शक कारभार व संस्थेची प्रगती याबद्दल आमदार भुमरे यांनी समाधान व्यक्त करून २५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले. या सभेत बिडकीन उपबाजार समिती येथे पेट्रोल पंप व ब्रिज कार्यालय इमारत बांधणे, या उपबाजार समितीमध्ये फळ, भाजीपाला आडत, भुसार माल, कापूस खरेदी सुरू करणे, विहामांडवा व पाचोड उपबाजार समितीमध्ये ब्रिज कार्यालय इमारत व पक्के रस्ते बांधणे, पैठण मुख्य बाजार आवार, विहामांडवा व पाचोड उपबाजारात स्वच्छतागृह बांधकाम, पैठण येथील कार्यालयाचे सुशोभीकरण करणे आदी निर्णय घेण्यात आले, अशी माहिती सचिव एन. आर. विखे यांनी दिली.
या सभेला दत्ता गोर्डे, ज्ञानेश्वर कापसे, राम एरंडे, कैलास कळसकर, माणिक खराद, अंबादास गवारे, सुरेश दुबळे, केदार शिंदे, विजय हजारे. कुसुमबाई बोंबले, सुनंदा मोगल, राजेंद्र किसे, भाऊसाहेब लबडे, भागीनाथ नाटकर, महावीर काला, महेश मुंदडा व राजू टेकाळे या संचालकासह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेला चिरडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्णपुरा येथे दर्शनासाठी पायी जाणाऱ्या महिलेचा ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी पहाटे चार वाजता कोकणवाडी चौकात घडला. लालमती रामआशिष पासवान (वय ६० रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश ह. मु. सिंधी कॉलनी), असे या महिलेचे नाव आहे. वेदांतनगर पोलिसांनी ट्रकचालकाला ट्रकसह ताब्यात घेतले आहे.
मृत लालमती पासवान या दोन महिन्यांपूर्वी ‌पती व मुलासह नातेवाईकाकडे राहण्यास आल्या होत्या. नवरात्रोत्सवमुळे परंपरेनुसार शहरातील हजारो महिला पहाटेच पायी कर्णपुरा येथील मंदिरात दर्शनासाठी जातात. लालमती या सुद्धा सोमवारी पहाटे नातेवाईक महिलांसह पायी कर्णपुऱ्यात जात होत्या. यावेळी कोकणवाडी चौकात त्यांना मागून येणाऱ्या आयशर ट्रकचालकाने धडक दिली, त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने जागीच मृत्यू झाला. वेदांतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवले, तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारो भाविक महिला पहाटे महिला कर्णपुऱ्यात दर्शनासाठी जातात. त्यापैकी अनेकींनी लालमती यांना ट्रकने‌ चिरडल्याचे पाहिले, त्यांना यामुळे धक्का बसला. अनेक महिलांच्या डोळ्यात हा अपघात पाहून अश्रू आले.

वाहतूक शाखेचा निष्काळजीपणा

वाहतूक शाखेने कर्णपुरा यात्रेनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. मात्र त्याचे नेमके नियोजन जाहीर केलेले नाही. वाहतूक व्यवस्थेत बदल केला असताना हा ट्रक मनाई असलेल्या मार्गावर कसा काय आला, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साहित्य ही नेहमी दिनांक नसलेली बातमी’

$
0
0

म. टा. प्र‌ति‌निधी, अाैरंगाबाद
‘साहित्य ही नेहमीच दिनांक नसलेली बातमी असते. साहित्य हे काळ आणि स्थळाच्याही पुढे जावून टिकते. जगभरातील घटना बातमीपत्राच्या माध्यमातून येतात व सायंकाळपर्यंत बाजुला जातात. तिच्यात वास्तवतेसोबत काही प्रमाणात कृत्रिमता असते,’ असे प्रतिपादन इंग्रजी साहित्याचे अभ्यासक प्रा. प्रदीप देशपांडे यांनी रविवारी केले.
राजहंस प्रकाशनच्या अंगणात रविवारी साहित्यिक, पत्रकारांच्या ‘संडे क्लब’ या उपक्रमात डॉ. भवान महाजन यांच्या ‘मैत्र जीवाचे’ मराठी पुस्तकाच्या ‘सोलमेट्स’ या इंग्रजी भाषांतराचे प्रकाशन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या पुस्तकाचे भाषांतर पूनम सुद यांनी केले आहे. यावेळी व्यासपीठावर राजहंस प्रकाशनचे श्याम देशपांडे, जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर, डॉ. छाया महाजन यांची उपस्थिती होती.
प्रा. देशपांडे म्हणाले, डॉ. महाजन यांच्या पुस्तकाचा प्रवास आश्चर्यकारक आहे. त्याची दखल समीक्षकांनी घेतली नाही, परंतु मराठी, हिंदी, गुजराती आणि आता इंग्रजी असा त्याचा प्रवास झाला आहे. वेगवेगळ्या भाषेच्या वाचकांना हे पुस्तक आवडावे, अशी मांडणी करण्यात आली आहे. खरे तर सैद्धांतिक अभ्यास साहित्य अंगाने आवश्यक असतो. हे पुस्तक शास्त्रोक्त समिक्षा या अंगाने लिहले गेलेले नाही. वाड्मयाचा अभ्यास करून भवान महाजन यांनी हे पुस्तक लिहिलेले नाही कारण ते लोकांनी डोक्यावर घेतले आहे. समीक्षक हे पुस्तकाला कोणत्या ना कोणत्या साहित्य प्रकारात आहे, असे सांगून त्याची वर्गवारी करत असतात. परंतु, कोणत्याही साहित्य प्रकारची पर्वा न करता लिहिणाऱ्या लेखकांमध्ये डॉ. महाजन आहेत. समीक्षा लेखनाविषयी अधिक परखड मत मांडतांना डॉ. देशपांडे म्हणाले, समीक्षा ही घडून गेल्याचे विवेचन असावी पण ती साहित्याची दिशा ठरवणारी नसावी. अतिशय सुंदर असणाऱ्या या पुस्तकाचे भाषांतर सुंदर झाले आहेत, असे देशपांडे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित, प्रा. जयदेव डोळे, धनंजय चिंचोलीकर, मनोज तुळपुळे, नम्रता फलके, डॉ. अनंत कडेठाणकर, डॉ. यशवंत देशपांडे, डॉ. नितीन बापट, डॉ. अमित महाजन, डॉ. सोनल महाजन, प्रा. प्रभाकर चौधरी, पत्रकार भारत गजेंद्रगडकर, प्रा. श्रीकांत तांबे, प्रा. दिनकर बोरीकर यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड हजार ‘बीयू’ची जिल्ह्यात आवश्यकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
जिल्ह्यातील २१७ ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी १५२८ बॅलेट युनिट (बीयू) व ७६५ कंट्रोल युनिटची (सीयू) गरज लागणार आहे.
जिल्ह्यातील मतदान यंत्रांची गरज भागवण्यासाठी काही युनिटची परभणी आणि नांदेड जिल्ह्याकडे मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यावेळी सरपंचाची निवड थेट मतदारातून होणार असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता आहे. राज्य निवडणुक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. ग्रामपंचायत निवडणूक निर्भय, मुक्त, शांततामय, पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात; निवडणूक निर्णय अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्यात समन्वय ठेऊन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. निवडणूक होत असलेल्या जिह्यातील ग्रामपंचायतींची संख्याः कन्नड ५१, गंगापूर ३५, औरंगाबाद ३४, वैजापूर २५, पैठण २२, सिल्लोड १८, फुलंब्री १७, खुलताबाद १०, सोयगाव ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसात हजार शिशुंना बहिरेपणाची शिक्षा

$
0
0

साडेसात हजार शिशुंना बहिरेपणाची शिक्षा
औरंगाबाद : ‘नॅशनल प्रोग्राम फॉर प्रीव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ डेफनेस’ म्हणजेच कर्णबधिरत्वासंबंधीचा राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर झाला असला तरी प्रत्यक्षात उपाययोजना व उपचार पद्धतींपासून देशातील रुग्ण अजूनही कोसोदूर असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी ठार बहिरेपणासह जन्मलेल्या तब्बल आठ हजार शिशुंपैकी केवळ ४०० ते ५०० शिशुंवर बहिरेपणापासून मुक्ती देणारी ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया होत आहे. सद्यस्थितीत राज्याच्या कोणत्याही आरोग्य योजनेमध्ये या शस्त्रक्रियेचा समावेश नाही व केंद्राच्या योजनेमध्ये समावेश झाला असला तरी त्यासाठी शिशुंची फार मोठी ‘वेटिंग’ आहे. या पार्श्वभूमीवर कर्णबधीर मुले-व्यक्तींच्या वाटेला अजूनही दुर्लक्ष आणि दुर्लक्षच येत असल्याचे चित्र गडद आहे.
भारतामध्ये प्रत्येक एक ते दीड हजार जन्मणाऱ्या शिशुंमध्ये एक ते दोन शिशू हे ठार बहिरेपणासह जन्मतात. या प्रमाणानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी आठ हजार मुले बहिरेपणासह जन्मतात आणि त्यापैकी केवळ ४०० ते ५०० शिशुंवर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ होत आहे. त्यामुळे ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ची गरज असणारे साडेसात हजार शिशू हे शस्त्रक्रियाविना म्हणजेच ठार बहिरेपणासह आपले आयुष्य कंठत आहेत व त्यामुळेच त्यांच्या नशिबी मूक-बधीरत्व असे दुहेरी अपंगत्व येत आहे. अशा मुलांवर पहिल्या एक ते दोन वर्षांत ही शस्त्रक्रिया झाली तर ‘स्पीच थेरपी’ व इतर उपचारांच्या सहाय्याने अशी मुले काही वर्षांत पूर्णपणे सामान्य मुलांच्या बरोबरीने शिकू शकतात. अलीकडेच जर्मनीमध्ये तर तिसऱ्या महिन्यात एका शिशुवर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया झाली असल्याचे डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. भारत देशमुख यांनी ‘मटा’ला सांगितले. सुदैवाने जन्मल्या-जन्मल्या ‘बेरा’ तपासणीमध्ये कोणत्याही तीव्रतेचे कर्णधीरत्व उघड होऊ शकते व त्यानंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या शस्त्रक्रियेसाठी एरवी ८ ते १० लाखांचा खर्च येतो. मात्र, बीपीएल व सामान्य कुटुंबातील मुलांसाठी सीएम फंडातून तसेच विविध संस्थांच्या देणगीतून एखाद्या लाखामध्ये शस्त्रक्रिया होऊ शकते, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. ‘राजीव स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक’च्या संचालिका व श्रवणतज्ज्ञ प्रिया भाले म्हणाल्या, ‘रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया’च्या काही वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार, चार वर्षांखालील तब्बल चार लाख मुलांमध्ये तीव्र ते अतितीव्र बहिरेपणा आढळून आला; परंतु त्यापैकी केवळ एक हजार मुलांवरच ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया होऊ शकली. एवढा मोठा ‘गॅप’ अजुनही कायम असला तरी काही प्रमाणात स्थिती नक्कीच सुधारतच असल्याचे भाले यांनी नमूद केले. तरीही शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढण्याची फार मोठी गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकूण नागरिकांमध्ये तब्बल २० टक्के नागरिकांमध्ये कमी-अधिक-तीव्र स्वरुपाचा बहिरेपणा स्पष्टपणे दिसून येतो. दुर्दैवाने अंधांना सहानुभूती मिळते, पण बहिरेपणा असणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते व त्यांची चक्क कुचेष्ठा केली जाते. सर्दी-पडसेसारख्या छोट्या-मोठ्या आजारांवर तात्काळ उपचार केले, रक्तदाब-मधुमेह-तंबाखूसेवन टाळले किंवा नियंत्रण ठेवले आणि कानावर आघात होणे, कानावर झापड मारणे असे प्रकार टाळल्यास बहिरपणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्याचवेळी औद्योगिक ठिकाणी ध्वनी प्रदूषणापासून संरक्षण करणारी ‘इअरप्लग’सारखी खास उपकरणे वापरणे, ‘पॉवर हॉर्न’-फटाके व इतर ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्यास बहिरेपणाची समस्या बऱ्याचअंशी कमी होऊ शकते. मात्र ध्वनी प्रदूषणाकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते व त्यामुळेच दिवसेंदिवस बहिरेपणाची समस्या वाढत असल्याचे मत कान-नाक-घसातज्ज्ञ व ‘आयएमए’चे शहराध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल यांनी नोंदविले.
सरकारी योजनेचा आधार शून्य
पूर्वीची ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ व आताच्या ‘महात्मा फुले योजने’मध्ये ‘कान-नाक-घसा’संबंधीच्या सर्व शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसाठी राखीव असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शस्त्रक्रियांसाठी फार मोठे ‘वेटिंग’ आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये या प्रकारच्या कोणत्याही शस्त्रक्रिया-उपचार होत नाहीत. त्याचवेळी आजपर्यंत ‘कॉक्लिअर इम्प्लांट’चा समावेशही या योजनेमध्ये करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारच्या ‘एडीआयपी’ योजनेमध्ये ‘कॉक्लिअर इम्प्लांट’चा समावेश असला तरी ‘वेटिंग’मुळे रुग्णांचे हाल होत आहेत. सद्यस्थितीत शहरातील ‘युनायटेड सिग्मा हॉस्पिटल’मध्ये किमान चार ते पाच रुग्ण सहा महिन्यांपासून शस्त्रक्रियेला मान्यता मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत, असेही डॉ. रोहिवाल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुणवंतांच्या कर्तृत्वाला दातृत्वाचा सलाम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मटा हेल्पलाइन’द्वारे मदत करण्यात आली. पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी समाजाचे दातृत्व पाहून विद्यार्थी भावुक झाले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवेल्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ दरवर्षी ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रम राबवते. या उपक्रमाअंतर्गत पाच विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विश्वकर्मा सभागृहात सोमवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, ‘कॉसमॉस बँके’चे व्यवस्थापक विठ्ठल गर्जे, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शुभम दांडगे, कोमल पळसकर, सूरज सवणे, ऋतुजा जाधव आणि रोहिणी जाधव या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी धनादेश प्रदान केले.

शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याची जाणिव असलेले विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीवर सहज मात करतील, असा विश्वास डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला.

‘दर्जेदार शिक्षण आवश्यक असते. गरीब पालकांनी पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवले. अडचण नसल्यास जागृती नसते. पोटात आग असेल, तर जाग असते. त्यामुळे अडचण कधी-कधी भाग्याची असते. संघर्षातून या मुलांना ताकद मिळून ते उत्तम यश मिळवतील,’ असे डॉ. भापकर म्हणाले. मागील वर्षी निवडलेली गुणवंत विद्यार्थिनी संघरक्षिता बिरारे हिने मनोगत मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांनी केले. गिरीधर पांडे यांनी सूत्रसंचालन केले आणि उन्मेष देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेबारा हजार शेतकऱ्यांना वीज कनेक्शनची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महावितरण आपल्या दारी’ योजनेत अर्ज केलेल्या सुमारे साडेबारा हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत उघड झाली. या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज करून रक्कम भरली आहे. पण, त्यांना २०११पासून अद्याप वीज मिळालेली नाही. त्यांना कनेक्शन देण्यासाठी ९२ कोटी रुपयांची गरज लागणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
महावितरण कार्यालयात सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे हे होते. या बैठकीला महावितरण ग्रामीण विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर, शहर अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, कार्यकारी अभियंता ए. पी. पठाण यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत कृष्‍णा पाटील डोणगावकर यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वीज मीटर मिळत नसल्याची तक्रार केली. शहर आणि ग्रामीण भागात वीज मिटरचा तुटवडा असून वरिष्ठ कार्यालयाकडे चार हजार मीटरची मागणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये नवीन वीज मीटर प्राप्त झाल्यानंतर वीज कनेक्‍शन देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मुबलक कोळसा उपलब्ध झाल्याने औरंगाबाद शहरात नोव्हेंबरपर्यंत भारनियमन होण्याची शक्यता नसल्याचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील सुरेवाडी भागात वीज तारांचा प्रश्न कायम असून तो तीन महिन्यात सोडविण्याची सूचना खासदार खैरे यांनी केली. शहरात नुकत्याच झालेल्या भारनियमनात अनेक प्रामाणिक ग्राहक नाहक भरडले गेले, त्या ग्राहकांवर पुन्हा ताण पडू नये यासाठी डीटीसी मीटर लावण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

महापालिकेने पैसे भरावेत

जयभवानीनगर ते रेल्वे स्टेशन मुकुंदवाडी या रस्त्याचे भूसंपादन झाल्यानंतर रस्त्यावरील वीज खांब व डीपी अद्याप स्थलांतरित केले नाही, अशी माहिती जयभवानीनगरच्या नागरिकांनी बैठकीत दिली. त्याची माहिती देताना, हा रस्ता एमएसआरडीमार्फत करण्यात येणार आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यासाठीचा खर्च एमएसआरडीसी भरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. पण, खांब स्थलांतरची जबाबदारी महापालिकेची असल्याने त्यांनी महावितरणकडे रक्कम जमा करावी, असे निर्देश खासदार खैरे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानी यात्रेत महसूल अधिकाऱ्यांची अरेरावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा महसूल यंत्रणेच्या एकाधिकारशाही व दंडेलशाहीमुळे चर्चेचा विषय झाला आहे. मंदिर व्यवस्थापनाचा कुठलाही अनुभव नसलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या अरेरावीचा भाविकांना मोठा फटका बसत आहे.
तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मात्र यासंदर्भात मौन बाळगून असल्याने, महसूल अधिकाऱ्यांच्या देवस्थानमधील वाढत चाललेल्या मनमानी कारभाराला त्यांचा अलिखित पाठिंबा असल्याची यानिमित्ताने चर्चा आहे. तुळजाभवानी यात्रेदरम्यान सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्यासाठी पोलिस सक्षम असताना यंदा महसूल अधिकाऱ्यांनी देवस्थानची सुरक्षा यंत्रणा खासगी सुरक्षा रक्षकांच्या हवाली केली असून, त्यांनी पोलिस यंत्रणेवर अविश्वासच व्यक्त केला असल्याचे दिसून येत आहे.
उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी तर सध्या बाऊन्सरच्या संरक्षणात मिरविण्याचा ठेका घेतल्याचे दिसून येत आहे. तुळजापूर येथील यात्रा दिमाखात
सुरू असताना स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी असा खटाटोप करीत असून, यातूनच काही अप्रिय गोष्टी, वाद मंदिरात निर्माण होऊ लागल्या असून, याचा फटका वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना बसू लागला आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या समवेत दर्शनासाठी गेलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना मंदिरात जाऊ देण्यास सुरक्षा रक्षकाने रोखले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. वास्तविक पाहाता देवस्थान समिती व जबाबदार महसूल अधिकायाना अशा अप्रिय घटना रोखता आल्या असत्या, मात्र सारे काही आपल्याला कळते अशा तोहऱ्यात ही अधिकारी मंडळी वागताना दिसत आहेत. मंदिरात गर्दीवर नियंत्रण करण्याबरोबरच नवरात्र महोत्सव उत्साहात पार पाडण्याकामी पोलिस यंत्रणा सतत सेवा बजावीत असताना महसूलच्या अधिकाऱ्यांनी मंदिरातील व्यवस्था खासगी सुरक्षा यंत्रणेच्या स्वाधीन करण्याचा नवीन पायंडा का पाडला याचे गणित देवस्थान समितीचे सदस्य असलेल्या आमदार मधुकरराव चव्हाण यांना देखील अद्याप उमजले नाही.

खासगी सुरक्षा रक्षकांची दादागिरी
मंदिरातील गाभाऱ्याची सुरक्षा हाती घेतलेले सुरक्षा रक्षक मात्र त्यांच्या सोयीनुसार मर्जीतील पुजाऱ्यांना व त्यांच्या हितचिंतकांना सोडत असून त्याच्याकडे मात्र देवस्थानचे व्यवस्थापक हेतुतः दुर्लक्ष करीत आहेत. यात्रा कालावधीत अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच एस. टी. महामंडळाच्या वाहक व चालकांना तसेच आरोग्य सेवा बजाविणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र दर्शनासाठी या खासगी सुरक्षा रक्षकांच्या दादागिरीना सामोरे जावे लागत आहे.

तुळजापूरची नवरात्र यात्रा उत्साहात व्हावी यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. कुठलीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. कळत न कळत वाद झाले तरी त्याकडे सर्वांनी सामंजस्य भूमिकेतूनच पाहावे. प्रशासनाला व सर्व यंत्रणेला भाविकांनी व नागरिकांनी सहकार्य करावे. नवरात्र महोत्सव हा आपल्या सर्वांचाच आहे, अशी सर्वांची भूमिका असायला हवी.
पंकज देशमुख,
जिल्हा पोलिस प्रमुख, उस्मानाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दलित व विद्रोही साहित्य कृतीशील’

$
0
0


‘दलित व विद्रोही साहित्य कृतीशील’
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दलित आणि विद्रोही साहित्य हे कृतीशील साहित्य आहे, त्यात संघर्ष असतो याचे प्रतिबिंब डॉ. जनार्दन काटकर आणि डॉ. धनराज माने लिखित ‘संघर्षशील योद्धा: कवीवर्य वामन निंबाळकर’ या समीक्षा ग्रंथात दिसून येते, असे प्रतिपादन डॉ. महेश खरात यांनी केले.
शहरातील शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. जनार्दन काटकर, नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजचे डॉ. धनराज माने यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘संघर्षशील योद्धा: कवीवर्य वामन निंबाळकर’ या समीक्षा ग्रंथाचे रविवारी मसापच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. खरात हे बोलत होते. विचारपीठावर मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, लेखक जनार्दन काटकर, कवी वामन निंबाळकर यांच्या पत्नी स्नेहलता निंबाळकर, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य कुमुद गोरे-खर्डेकर यांची उपस्थिती होती.
खरात म्हणाले, यशवंत मनोहर, केशव मेश्राम यांच्यापासून वामन निंबाळकर यांच्यापर्यंत सर्वांनी हे कृतीशील साहित्य टिकवले आणि लोकांच्या पसंतीसही पडले. स्नेहलता निंबाळकर यांनी वामन निंबाळकर यांच्या जीवन संघर्षाची माहिती दिली. डॉ. जनार्दन काटकर यांनी पुस्तक लिखणामागील भूमिका सांगितली. रमेश रावलकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वैजापूरमध्ये मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
पंधरा दिवसापासून सुरू असलेला संप आणि मागण्यांकडे दुर्लक्ष करत अन्यायकारक शासन निर्णय मंजूर केल्याच्या निषेधार्थ वैजापूर येथे आयटकतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व शिवसेनाचे जिल्हा परिषद सदस्य प्रा. रमेश बोरनारे यांनी पाठिंबा दिला.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या मोर्चाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष प्रा. राम बाहेती, कॉ. शालिनी पगारे यांनी केले. मोर्चाची सुरुवात पंचायत समिती येथून करण्यात आली. आमदार चिकटगावकार यांनी आंदोलकांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या विधीमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले. हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर सरकारविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. येथे शिवसेना तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य प्रा. रमेश बोरनारे यांनी पाठिंबा देऊन भाजप सरकारच्या धोरणांचा धिक्कार केला. प्रा. राम बाहेती यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. जात, धर्म, गोरक्षा यावरील राजकारणात रस असणाऱ्या भांडवलवादी सरकारला कष्टकरी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या २७ सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनात शक्ती दाखवून देण्याचा इशारा दिला. धरणग्रस्त समितीचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, योगेश साळवे यांनी देखील उपस्थित राहून संपास पाठिंबा दिला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images