Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दोन दिवसांपूर्वी उघडलेला जुगारअड्डा उद्ध्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवघ्या दोन दिवसांपूर्वी उदघाटन करून थाटामाटात सुरू केलेल्या जुगार अड्डयावर आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री छापा मारला. रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमागे इमारतीचा तळमजला व पहिल्या मजल्यावर हा अड्डा सुरू होता. अड्डा चालवणाऱ्या माजी नगरसेवक, एमआयएमचा विद्यामान नगरसेवक व इतर ४८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून रोख पावणेपाच लाख रुपये, हँडसेट, दुचाकी, असा साडेचौदा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये माजी नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल सत्तार (रा. सादातनगर,) विद्यामान नगरसेवक जहागीरखान अब्बासखान उर्फ अज्जू पहेलवान (रा. कटकटगेट), मॅनेजर देवानंद जगन्नाथ घाटेशाही (रा. समतानगर) यांच्यासह संतोष बळीराम कुंडलकर (रा. जालना), माधव नारायण वाणी (रा. हर्सूल), विनोद कपूरचंद पगारिया, (रा. श्री‌कृष्णनगर, शहानूरमिया रोड), किशोर उत्तमराव चव्हाण (रा. वजनापूर, ता. गंगापुर), संतोष मोहनदास नागदेव (रा. सीटीएस ०७, अरिहंतनगर), अशोक कापडिया (रा. गोवर्धन अपार्टमेंट, पानदरिबा), बंडू उर्फ उत्तम जगन्नाथ दुबे (रा. घाणेगाव, ता. गंगापूर), संजय रमेशचंद्र अग्रवाल (रा. फ्लॅट क्र. १६, चंद्रगुप्त अपार्टमेंट, शहानूरवाडी), गोरख आमराव आटोळे (रा. नरीमननगर, जालना), सय्यद इलियास सय्यद बाबू (रा. रवण सराडा, अंबड), अविनाश बळीराम चौधरी (रा. प्लॉट क्र. १६, उल्कानगरी), गौस कुरेशी मुसा कुरेशी (रा. खुलताबाद, ह. मु. सिल्लेखाना), शरद बन्सीलाल सिंघवी (रा. एन-४, सिडको), महेश श्रीनिवास दांगडिया (रा. नुपूर अपार्टमेंट, महेशनगर), मंगेश साईनाथ मुंडे (रा. सी-९, उल्कानगरी), राजू धोंडीराम जगदाळे (रा. हर्सूल सावंगी), नारायण सखाराम शिंदे (रा. देवानगरी), संजय गुलाबचंद जैन (रा. स्टेडियमसमोर, गारखेडा), जफर अब्दूल गफार (रा. दहीपुरी, ता. अंबड), मदन दामोदर राजेकर (रा. गल्ली क्र. १०, पुंडलिकनगर), अफसर बेग अहेमद बेग (रा. सादातनगर), अशोक रामराव करंके (रा. एमआयडीसी कॉलनी, वेदांतनगर), मिलिंद चंद्रसिंग पाटील (रा. सुदर्शन हाऊसिंग सोसायटी, वेदांतनगर), सुलेमान खान शेरखान (रा. सादातनगर), शिवाजी रामभाऊ चाळगे (रा. हडको कॉर्नर, एन-१३), अनुरथ प्रल्हाद गिरे (रा. सारा वैभव, जटवाडा रोड), शेख रफिक शेख बद्रोद्दीन (रा. संजयनगर), गजानन रामराव सुलतानी (रा. अंबड चौफुली, जालना), अन्वर कुरेशी सलीम कुरेशी (रा. नूतन कॉलनी), रमेश लक्ष्मण गायकवाड (रा. सावंगी हर्सूल), गंगाधर मारोती करेवाड (रा. श्रीकृष्णनगर), विलास पांडुरंग निकम (रा. चिंचोली लिंबाजी, ता. कन्नड), शेख लाल शेख बाबू (रा. शहाबाजार, चंपा चौक), प्रकाश विश्वनाथ वानखेडे (रा. रेल्वे क्वॉर्टर, रुम क्र.८०), रामचंद्र ठाणसिंग राजपूत (रा. एन-७, सिंहगड कॉलनी), संभाजी लहू जाधव (रा. विशालनगर, गारखेडा), फेरोज खान खाजा खान (रा. सादातनगर), शेख रियाज शेख फारुख (रा. कन्हैय्यानगर, जालना), संजय जगन्नाथ आरड (रा. बालाजीनगर), शेख अन्वर शेख शेरा (रा. सादातनगर), मुमताज खान महेबुब खान (रा. सिल्कमिल कॉलनी), गणेश संतराम वेताळ (रा. सुल्तानपूर, ता. खुलताबाद), फेरोज खान अहेमद खान (रा. सादातनगर), शरीफ खान बशीर खान पठाण (रा. अमीदनगर, सातारा परिसर), साईनाथ रामसिंग हरणे (रा. हर्सूल), शेख बाबू शेख रऊफ (रा. अन्सार कॉलनी) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

पीआय ‌शिनगारे निलंबित

रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. हा अड्डा वेदांतनगर पोलिस ठाणे हद्दीत सुरू होता. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांचा निष्काळजीपणा दिसून आल्याने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी शिनगारे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस‌ निरीक्षकालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा उत्पादकांना रोख रक्कम द्यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
‘व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मालाचे चुकारे शक्यतो रोख द्यावेत, चेक देताना त्याच दिवसांचे द्यावेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक ओढाताण होणार नाही,’ असा सल्ला माजी आमदार आर. एम. वाणी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला. यावर्षी बाजार समितीला गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचपट म्हणजे ६१ लाख रुपये नफा झाल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा नागपूर मुंबई महामार्गावरील कांदा मार्केटमध्ये सोमवारी घेण्यात आली. या सभेला सभापती काकसाहेब पाटील, उपसभापती राजेंद्र चव्हाण, माजी सभापती अॅड. आसाराम रोठे, शिवसेना तालुकाध्यक्ष रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष साबेरखान, बाबासाहेब जगताप, आनंदी अन्नदाते, सुलभा भोपळे, संचालक संजय पाटील निकम, जे. के. जाधव, रामहरी जाधव, ज्ञानेवर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभापती काकासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. बाजार समिती सचिव विजय सिनगर यांनी ताळेबंदाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष आव्हाळे यांनी केले.

बाऊन्स झालेला चेक

वार्षिक सर्वसाधारण सभेत एका शेतकऱ्याने व्यापाऱ्याचा बाऊन्स झालेला चेक माजी आमदार वाणी यांना दाखविला. त्याची दखल घेऊन माजी आमदारांनी शेतकऱ्यांना मालाचे चुकारे रोखीने करण्याची सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोककलावंतांवर उपासमारीची वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुंभेफळ येथील साई लोकनाट्य कला मंदिर लोककलांच्या जतनासह कलाकारांच्या उपजिविकेचे साधन म्हणून चालविण्यात येत होते. ग्रामपंचायतीच्या परवानगीसह इतर आवश्यक सर्व परवानग्या असूनही पोलिसांनी धादांत खोटी कारवाई केली. तर जिल्हा प्रशासन कला केंद्राचा नूतनीकरण परवाना देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशी माहिती केंद्राचे संचालक बाबासाहेब गोजे-पाटील यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा प्रशासनाने परवाना दिला नसल्यामुळे साई कला केंद्रातील लोकलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी गोजे यांनी केली आहे. सर्व नियम व अटींचे पालन करून निखळ मनोरंजनासाठी २००५ मध्ये साई कला केंद्र सुरू करण्यात आले. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत परवाना नूतनीकरणाची मुदत होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिस कर्मचाऱ्यांनी पाच ऑक्टोबरला कला केंद्रावर धाड टाकण्याची कारवाई केली. या कारवाईत गुन्ह्याचा संबंध नसताना गोजे यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाने नूतनीकरण करण्यात आले. याची नोंद परवान्यावर आहे. या आधारावर पुढील चौकशी करून न्याय देण्याची मागणी गोजे-पाटील यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा सहकारी बँकेस पाच कोटींचा नफा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रगती होत असून आणखी सुधारणा आवश्यक आहेत. सर्व सदस्य, संचालक, सभासदांच्या सहकार्याने बँकेला यावर्षी पाच कोटी रुपयांचा नफा झाला,’ अशी माहिती चेअरमन सुरेश पाटील यांनी दिली.
जिल्हा बँकेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी घेण्यात आली. सभेचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक राजेश्वर कल्याणकर यांनी केले. त्यानंतर रामकृष्ण पाटील नागदकर सहकारी प्रशिक्षण केंद्राचे प्रा. रमेश देशमुख यांनी सहकार कायदा कलम २४ अंतर्गत सभासदाचे कर्तव्य, अधिकार आणि जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. सुरेश पाटील यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. विषयपत्रिकेवरील सर्व ठराव मंजूर करण्यात आले.
बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन सुरेश पाटील म्हणाले, की पतसंस्थेच्या वाढीव कर्ज व्याजदराबाबत विचार केला जाईल. ‘शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेची सरकार दरबारी नोंद घेऊन वैजापूर तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी डॉ. कल्याण काळे यांनी केली. बँकेच्या विकासासाठी संस्था मजबूत असली पाहिजे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.
या सभेला दामोधर नवपुते, आमदार संदीपान भुमरे, बाबुराव पवार, नितीन पाटील, प्रभाकर पालोदकर, रंगनाथ काळे, किरण पाटील, अंकुश रंधे, जगन्नाथ काळे, अभिजित देशमुख यांच्यासह संचालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाने मारल्याने विद्यार्थ्यास बहिरेपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षकाने कानावर मारल्याने विद्यार्थ्यास गंभीर जखम होऊन बहिरा झाल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता जटवाडा रोडवरील बुन इंग्लिश स्कूलमध्ये घडला. या प्रकरणी पालकाच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख रफिक शेख अब्दुल रशीद (वय ४७ रा. दिल्लीगेट) यांचा मुलगा शेख हुजेफ (वय १५) हा फरहतनगर येथील शाळेत नववीचा विद्यार्थी आहे. शुक्रवारी अरबी विषयाचा वर्ग सुरू असताना गोंधळ घालत असल्याच्या कारणावरून त्याला शिक्षक अब्दुल कदीर अब्दुल जब्बार (वय ४४, रा. बुन स्कूलमागे, फरहतनगर) यांनी उजव्या कानावर जोराची थापड मारली. यामुळे हुजेफच्या कानाला गंभीर दुखापत होऊन कान बधीर झाला. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय शेख सरवर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

$
0
0

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ
औरंगाबाद: घर बांधण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करी‌त तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ करण्यात आला. तसेच या विवाहितेला घराबाहेर हाकलून देत पतीने दुसरा विवाह केल्याप्रकरणी विवाहितेने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पती शेख महेबुब शेख रऊफ, शेख रऊफ, जोहरा बेगम, शेख कादर, शेख तायरा, अफसाना बेगम व मुमताज बेगम (सर्व रा. इंद्रानगर, बुलढाणा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रार केल्याने मारहाण
पोलिसांत दिलेली तक्रार मागे घे, असे म्हणत ३० वर्षांच्या विवाहितेला दोघांनी मारहाण केली. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता हा प्रकार सातारा परिसरात घडला. याप्रकरणी संशयित आरोपी मोहम्मद सईद व मोहम्मद सईद (सर्व रा. सिल्कमिल्क कॉलनी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेळ्याच्या वादातून मारहाण
घरावर शेळ्या चढून पत्रे कोसळल्याने झालेल्या वादातून नगीना महेबूब शहा (वय २७ रा. मिसारवाडी) या महिलेला, तिच्या पतीला व दिराला मारहाण करण्यात आली. मिसारवाडी भागात हा प्रकार घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाच्या पदवी परीक्षा १० नोव्हेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा १० नोव्हेंबरपासून होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिवाळीच्या सुट्या आणि युवक महोत्सव असल्यामुळे परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्याची मागणी प्राध्यापक संघटनेने केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी परीक्षा ११ ऑक्टोबरपासून घेण्याचे नियोजन केले होते. प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले होते, तर परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येणार होते. मात्र, या परीक्षेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टा) विरोध केला. दिवाळीची सुटी १५ ऑक्टोबरपासून असल्यामुळे सुटीत परीक्षा कशी घेणार असा सवाल संघटनेने केला होता. विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा इंद्रधनुष्य महोत्सवाचे नियोजन निश्चित असल्याचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. डॉ. मुस्तजीब खान यांनी सांगितले होते. तसेच नऊ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेता येणार नसल्याचे प्रशासनाला सांगितले. विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव २९ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान विद्यापीठ परिसरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत चर्चा झाली. पदवी सत्र परीक्षा १० नोव्हेंबरपासून घेण्याचे निर्णय निश्चित झाला. पदव्युत्तर परीक्षेचे संभाव्य नियोजन पाच डिसेंबरपासून केले आहे. या बैठकीला विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे आणि अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कचरा पुन्हा पेटला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारी मांडकीसह नारेगाव क्षेत्रातील सुमारे वीस गावातील नागरिकांनी कचरा डेपोवर जाणारी वाहने दुपारी चारपर्यंत रोखून धरली. पालिका आयुक्तांनी नागरिकांची भेट घेवून तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर, तूर्तास हा तिढा सुटला.

शहरात गोळा होणारा कचरा महापालिकेतर्फे दररोज नारेगाव येथील कचरा डेपोमध्ये नेऊन टाकला जातो. त्यामुळे नारेगाव, वरूड, गोपाळपूर, दौलतपूर, अंतापूर, सहजतपूर यासह अन्य गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण वाढले आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील या कचऱ्याचा त्रास होतो. महापालिकेतर्फे या संदर्भात कोणताही प्रतिबंधात्मक उपाय राबवला जात नाही. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचरा डेपो तातडीने स्थलांतरित करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी कचरा वाहतूक करणाऱ्या पालिकेच्या गाड्या नारेगाव येथे अडविल्या. दुपारी चारपर्यंत गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या आंदोलनाची दखल घेवून पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी नारेगाव येथे जावून आंदोलकांची भेट घेतली. नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने तातडीने काम करण्याचे आश्वासन दिले. रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. नागरिकांनी मुगळीकर यांना निवेदन दिले. आंदोलन करणाऱ्यांमध्ये भाऊसाहेब गायके, बाबासाहेब भेसर, रवींद्र भेसर, रामेश्वर चक्कर, बंडू गायके, बाबासाहेब हिरडे, डॉ. विजय डक, मदन डक, ज्ञानेश्वर हिरडे, बाळू डक, विष्णू भेसर, भास्कर गायके, गणेश गायके, बाबासाहेब गायके, ज्ञानेश्वर भेसर, किशोर गायके, अशोक कुबेर, मंजाराम देवखळे, रामेश्वर गायके, बबन बडेकर, सोनाजी देवखळे, भगवान गायके, पूनमसिंग राजपूत, कुंडलिक गायके, गणेश हिरडे, संतोष मेहर, मयूर डक आदींसह नागरिकांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिर्याणीत चक्क कुत्र्यांचे मांस

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शहराच्या विविध भागात स्वस्त दरात विकल्या जाणाऱ्या बिर्याणीमध्ये कुत्र्यांचे मांस वापरले जात आहे,’ अशी शंका केंद्रीय पशू कल्याण मंडळाच्या पशू कल्याण अधिकारी मेहर मथरानी यांनी सोमवारी व्यक्त केली. महापालिकेला या संदर्भात दक्ष राहण्याची सूचना देखील त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या सुचनेवरून मेहर मथरानी यांनी महापालिकेला भेट दिली. दिवसभरात त्यांनी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृह नेता गजानन मनगटे यांची भेट घेतली. तसेच त्यांनी मनपाच्या डॉग स्क्वॉडसोबत जावून कुत्रे कसे पकडतात याची पाहणीही केली. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला.

मथरानी म्हणाल्या, ‘शहरात कुत्र्यांची मुंडकी आढळून येत आहेत. धड मात्र गायब झाल्याचे लक्षात येते. ही बाब अत्यंत धोकादायक आहे. शहरात काही ठिकाणी स्वस्त दरात बिर्याणी विकली जाते. त्यात कुत्र्याचे मांस वापरण्यात येत असावे. कुत्र्यांना देखील योग्य वागणूक मिळाली पाहिजे. त्यांची हत्या करणे किंवा त्यांच्यावर अन्याय करणे चुकीचे आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करणे हाच एकमेव उपाय आहे, परंतु शहरात दोन वर्षांपासून नसबंदी बंद आहे. त्यामुळे नसबंदी तात्काळ सुरू करण्याची सूचना आपण पालिका प्रशासनाला केली आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तूर घोटाळाप्रकरणी तेरा जणांना अटक

$
0
0

तूर घोटाळाप्रकरणी तेरा जणांना अटक
म .टा. प्रतिनिधी, जालना
जालना येथील बहुचर्चित तूर घोटाळा प्रकरणात १३ आरोपींना चंदणझिरा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तूरखरेदी घोटाळ्याप्रकरणी ७१ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल असून यात ४९ शेतकरी, १८ व्यापारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांकडून कमी दराने तूरखरेदी करून ती शेतकऱ्याच्या नावे हमीभावाने विक्री करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या पैकी तेरा आरोपींना रविवारी चंदणझिरा पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये शरद किसन भुंबर, ज्ञानेश्वर विठ्ठलराव शिंदे, सतीश चंद्रकांत अवसेकर, राजकमल श्रीराम तापडीया, सतीश हिरालाल बाहेती, भगवान नासाहेब आनंदे, कैलास गणेशराव सहाने, संजय देविदास मिसाळ, सुदर्शन पाटीलबा भुंबर, विशाल नकुलराव भिसे व कृष्णा मुरलीधर पवार, शिवकुमार कामड आणि वीरेंद्र रूनवाल यांचा समवेश आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनघा रोटे यांच्या न्यायालयात या आरोपींना हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. विपुल देशपांडे यांनी काम पाहिले.
दरम्यान, तूरखरेदी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तेरा व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ जालना बाजार समितीमधील आडत व्यापाऱ्यांनी सोमवारी बंद पाळून निषेध नोंदवला. यावेळी राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांना व्यापाऱ्यांनी एक निवेदन दिले.
अब तक ५७ फरारच
दरम्यान, तूर घोटाळ्यातील ७१ आरोपींपैकी ६९ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर हे अटकसत्र सुरू झाले. तेरा आरोपी अटकेत असून एका आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी उर्वरित ५७ आरोपी मात्र अद्यापही फरारच असून त्यांना केव्हा अटक होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींच्या मुत्यूनंतर पित्याची आत्महत्या

$
0
0

मुलींच्या मुत्यूनंतर पित्याची आत्महत्या
म. टा. प्रतिनिधी, जालना
परतूर तालुक्यातील काल वाई येथे रविवारी (२४ सप्टेंबर) दोन मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे व्यथित झालेल्या त्यांच्या वडिलांनी त्याच विहिरीत आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले.
केशव रामभाऊ गायकवाड (वय ३५) हे रविवारी आपल्या दोन मुली साक्षी (वय ९) व मिनाक्षी (वय ६) यांच्यासह शेतात गेले होते. त्यावेळी लिंबाच्या झाडावर त्यांना माकडे दिसली. गायकवाड यांनी त्या माकडांना हुसकावण्याचा प्रयत्न करत असताना माकडे मुलींच्या दिशेने धावली. त्यामुळे भेदरलेल्या दोघी पळत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्या. वडिलांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पाण्यात बुडाल्याने दोघींचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे व्यथित झालेले केशव गायकवाड काल रात्रीपासून घरातून निघून गेले होते. त्यांचा शोध घेता सोमवारी सकाळी त्याच विहिरीजवळ त्यांची चप्पल दिसली. त्यामुळे विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. हे दुख: सहन न झाल्याने गायकवाड यांनी त्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मागे पत्नी व चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे या घटनेचा पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. के. शेख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पॅसेंजर रेल्वे वेळेत सोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निजामबाद - पुणे आणि मनमाड - काचिगुडा पॅसेंजर गाडी वेळेत निर्धारित वेळेत चालवा किंवा त्या मार्गावर पर्यायी रेल्वेची व्यवस्था करा, अशी मागणी करत विद्यार्थिनींनी सोमवारी रेल्वेस्थानक प्रमुख एल. के. जाखडे यांना घेराव घातला.

शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थिनी; तसेच लासूर स्टेशन, रोटेगाव, करंजगाव, पोर्टूळ या गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी भारतीय रेल्वे प्रवासी सेनेच्या नेतृत्वात रेल्वेस्थानक प्रमुख एल. के. जाखडे यांची भेट घेतली. निजामाबाद - पुणे - निजामाबाद पॅसेंजर रेल्वे मेगा ब्लॉक मुळे अंशतः परभणी ते नांदेड यामध्ये चालविण्यात यावी, मनमाड - काचिगुडा पॅसेंजर ही मेगा ब्लॉकमुळे गाडी उशिराने चालत आहे. ती रेल्वे अंशतः नांदेड - मनमाड यामध्ये चालविण्यात यावी. धर्माबाद - मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस मेगाब्लॉकपर्यंत नांदेड - मनमाड या दरम्यान चालविण्यात यावी. हैदराबाद - औरंगाबाद पॅसेंजर ही रेल्वेही उशिराने धावत आहे. ही रेल्वे ब्लॉक दरम्यान परळी ते औरंगाबाद दरम्यान डेमू शटल म्हणून चालवावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थिनींनी केली. पॅसेंजर रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे विद्यार्थिनींना महिला विश्रामगृहात थांबावे लागते. येथे अस्वच्छता आणि भिकाऱ्यांमुळे बसायला जागा नाही. या ठिकाणी व्यवस्था पुरवावी. महिला विश्राम कक्षात फक्त तिकीट असलेल्या प्रवाशांना बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी संतोषकुमार सोमानी यांच्यासह प्रीती जैस्वाल, अंकिता जयस्वाल, कोमल अधिकार, पूर्व शर्मा, गायत्री जायस्वाल, किनार खेतरे, लता लोखंडे, मयुरी चव्हाण, उज्ज्वला सूर्यवंशी, अमृता लेकुरवाळे, श्रुती निकम आदी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रस्ते टेंडर जबाबदारी; शासनाने झटकली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शंभर कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे टेंडर कसे काढायचे, याचा निर्णय महापालिकेने स्वतःच्या स्तरावर घ्यावा, असे सांगत शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाचे टेंडर निलंबितांच्या वळणावर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शासनाने मंजूर निधीतून ३१ रस्त्यांची कामे करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्या रस्त्याच्या कामासाठी किती खर्च करायचा हे देखील ठरवून दिले आहे. अनुदान मंजूर होवून आणि रस्त्यांची नावे निश्चित होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटला, पण अद्याप पालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली नाही. शंभर कोटींचे एकत्रित टेंडर न काढता पन्नास कोटींचे दोन टेंडर काढावेत किंवा पंचेवीस कोटींचे चार टेंडर्स काढावेत याबद्दल पालिकेचे प्रशासन व पदाधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यानच्या काळात पालिकेने नगर विकास खात्याला पत्र लिहून टेंडर प्रक्रिया कशी करायची या बद्दल मार्गदर्शन मागवले. शासनाने पालिका आयुक्तांच्या नावे उलट टपाली पत्र पाठवून टेंडर्सच्या संदर्भात पालिकेने स्वतःच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे कळविले आहे.

रस्त्यांच्या कामांच्या टेंडर संदर्भात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने नुकताच एक नवीन अध्यादेश काढला, त्यानुसार पालिकेला शंभर कोटींचे एकच टेंडर काढणे बंधनकारक आहे किंवा ३१ रस्त्यांसाठी ३१ टेंडर काढता येणे शक्य आहे. आता शासनाने आयुक्तांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश दिल्यामुळे पन्नास किंवा पंचेवीस कोटींच्या पटीत टेंडर काढले जातील असे बोलले जात आहे.

‘योग्य’ निर्णय घेणार
पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी कामातील अनियमिततेबद्दल काही अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. या अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याबद्दल प्रशासनाने शासनाचे मार्गदर्शन मागवले. शासनाने आयुक्तांनी स्वतःच्या स्तरावर या संदर्भात निर्णय घ्यावा असे कळविले. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करून त्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. या कार्यवाहीला प्रमुख पदाधिकाऱ्यांचे देखील समर्थन होते. रस्त्यांच्या कामांच्या टेंडरबद्दल देखील शासनाने तसेच मार्गदर्शन केल्यामुळे प्रशासन व पदाधिकारी मिळून ‘योग्य’ निर्णय घेतील असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे मनसुबे उधळा

$
0
0

भाजपचे मनसुबे उधळा
नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे आवाहन, काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, नांदेड
देशात कमळ, राज्यात कमळ आणि नांदेडमध्ये कमळ ही घोषणा भारतीय जनता पक्षाने दिली आहे. परंतु देशात अंधार, राज्यात अंधार आणि आता नांदेडमध्येही अंधार करण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्यांचा हा मनसुबा उधळून लावण्यासाठी भाजपला उखडून टाकण्याची सुरुवात नांदेडमधून करा, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी नांदेडमध्ये केले.
काँग्रेस-पीआरपी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ चौफाळा येथील निरंजन आश्रम शिवमंदिरामध्ये नारळ फोडून करण्यात आला. यानंतर झालेल्या जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, डी. पी. सावंत, अमरनाथ राजूरकर, विजय खडसे, माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सरचिटणीस बी. आर. कदम, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, केदार पाटील साळुंके, गंगाधर सोंडारे, सुमती व्याहाळकर, नारायण श्रीमनवार, संतोष पांडागळे, मंगला धुळेकर, अनिता हिंगोले, पुष्पाताई शर्मा, कविता कळसकर, प्रकाश मुथा, सतीश राखेवार, लक्ष्मीकांत गोणे, प्रल्हाद सुरकुंटवार, गोविंद पोपूलवार, दिगंबर मोरे, अमित काबरा, गंगाप्रसाद काकडे, शहाजी नळगे, मनान चौधरी, पप्पू कोंडेकर आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, जुन्या नांदेडातील चौफाळा विभागाचे काँग्रेससाठी वेगळे महत्त्व आहे. या विभागातून १९५२ साली सर्वप्रथम डॉ. शंकरराव चव्हाण यांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीचा शुभारंभ ते नेहमीच चौफाळ्यातून करत असत. त्या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती करत काँग्रेसने चौफाळ्यामधून प्रचाराचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी ‘अच्छे दिन आऐंगे’ म्हणून जे सत्तेत आले, त्यांना ‘अच्छे दिन’ कुठे आहेत हा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे. पेट्रोलचे दर ८१ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये रेशनवरील साखर बंद केली आहे. मागील सहा महिन्यांत राज्यातील सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे इथे भाजपला पराभूत केले पाहिजे.
काही वर्षापूर्वी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ असा नारा दिला होता. तसाच नारा आता ‘भाजप-एमआयएम भाई भाई’ असा दिला जात आहे. भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी एमआयएम मुस्लिम मतांच्या विभागणीसाठी काम करीत आहे. भाजपकडे नेता नाही. केवळ स्वतःचे काळे धंदे लपविण्यासाठी काही मंडळी या पक्षात गेली आहेत. शिवसेना महागाईच्या नावावर ओरडत आहे. त्याऐवजी हा पक्ष सत्तेच्या बाहेर का पडत नाही असा सवाल करतानाच महापालिकेतील सत्ता काँग्रेसकडे सोपवा, असे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले की, अशोक चव्हाण हे नांदेडचे नव्हे, तर महाराष्ट्राचे नेते आहेत. जेव्हा मतदानाची वेळ येते, तेव्हा नांदेडकरांनी त्यांच्या पारड्यात मते टाकली आहेत. आता सर्व विरोधक एकत्र आले आहेत. मत विभागणीचा प्रयोग केला जात आहे. नांदेडचा सर्वांगीण विकास होण्यासाठी चव्हाण यांना महापालिकेत ताकद द्या. शरद रणपिसे म्हणाले की, भाजपमध्ये सावळागोंधळ सुरू आहे. भाजपच्या गोंधळामुळेच राहुल गांधीच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची सभा नांदेडात रद्द करण्यात आली. मताची विभागणी करण्यासाठी एमआयएम आणि बहुजन आघाडी असा प्रयोग जरी होत असला तरी या पक्षाला जनता थारा देणार नाही.
डी. पी. सावंत यांनी नांदेडची निवडणूक बदलाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. अमरनाथ राजूरकर यांनी नांदेडला भाजपाने ९८ टक्के गुण मिळवूनसुद्धा स्मार्ट सिटी योजनेतून वगळल्याचे सांगितले. मुस्लिमांना फसविणाऱ्या एमआयएमने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मतदान केले. या दोन पक्षाची छुपी युती आहे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनील, गणेश यांची उल्लेखनीय कामगिरी

$
0
0

सुनील, गणेश यांची उल्लेखनीय कामगिरी
सहाशे किलोमीटर अंतराची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण
‘बीआरएम’ स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुरत-अहमदाबाद-सुरत अशी सहाशे किलोमीटर अंतराची बीआरएम सायकलिंग स्पर्धा औरंगाबादच्या डॉ. सुनील देशमुख आणि गणेश गुंडावार यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. ११२ उड्डाण पूल हे स्पर्धा मार्गातील सर्वांत मोठे आव्हान होते. कडक उन्हाने आमचा कस लागला, असे देशमुख व गुंडावार यांनी सांगितले.
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. सुनील देशमुख हे गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे सायकलिंग करतात. ६०० किलोमीटर अंतराची बीआरएम सायकलिंग स्पर्धा डॉ. देशमुख यांनी ३६ तास २५ मिनिटांत पूर्ण केली. या स्पर्धेसाठी ४० तासांचा कालावधी दिलेला होता. या स्पर्धेत ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यांपैकी ३० स्पर्धकांना शर्यत पूर्ण करण्यात यश आले. त्यात औरंगाबादच्या देशमुख व गुंडावार या दोन सायकलपटूंचा समावेश होता.
या स्पर्धेविषयी ‘मटा’शी संवाद साधताना देशमुख म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वीपासून मी नियमित सायकलिंग करीत आहे. २००, ३००, ४०० किलोमीटर अंतराची बीआरएम सायकलिंग स्पर्धा मी पूर्ण केली आहे. त्यामुळे ६०० किलोमीटर अंतराची बीआरएम स्पर्धा मला खुणावत होती. सुरत-अहमदाबाद-सुरत या ६०६ किलोमीटरच्या अंतरात तब्बल ११२ उड्डाणपूल होते. तसेच भरपूर ट्रॅफिकचाही सामना करावा लागला. शिवाय कडक उन्ह तळपत असताना सायकलपटूंचा कस लागला. ४५० किलोमीटर अंतर पूर्ण झाल्यानंतर कडक उन्हामुळे खूप थकवा आला होता. तेव्हा शर्यत मध्येच सोडून द्यावी असे वाटत होते. परंतु, जिद्द सोडली नाही. अखेरच्या दीडशे किलोमीटर अंतर जिद्दीच्या जोरावर पार केले. उड्डाणपुलांमुळे ही स्पर्धा अतिशय कठीण व आव्हानात्मक होती. सायकलिंग, धावणे व ट्रायथलॉन अशा तीन्ही प्रकारांत मला रस आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. ६०० किलोमीटरची बीआरएम स्पर्धा वयाच्या ५१ व्या वर्षी पूर्ण केल्याचा मोठा आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
छप्पन वर्षीय गणेश गुंडावार म्हणाले, ‘या वर्षी जानेवारी महिन्यापासून मी नियमित सायकलिंग करीत आहे. मधुमेह झाल्याने व्यायाम म्हणून सायकलिंग करू लागलो. नियमित सरावाने तसेच सायकलिंगपटूंचा चांगला ग्रुप लाभल्याने बीआरएम सारख्या स्पर्धेत सहभाग घेण्याचे धाडस केले. २००, ३००, ४०० किलोमीटर अंतराची स्पर्धा मी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. त्यामुळे ६०० किलोमीटर अंतराची बीआरएम सायकलिंग स्पर्धा पूर्ण करण्याचा विश्वास मला होता. ४० तासांऐवजी मी ही स्पर्धा ३९ तासांमध्ये पूर्ण केली. अखेरच्या टप्प्यात १५० किलोमीटरचे अंतर कापायचे होते. तेव्हा खूपच थकवा जाणवू लागला होता. त्यासाठी माझ्याकडे केवळ नऊ तास शिल्लक होते. जिद्दीने मी हे अंतर कापले आणि वेळेपूर्वी शर्यत पूर्ण केली याचा मला मोठा आनंद आहे. या स्पर्धेत दीडशे किलोमीटर अंतराचे चार टप्पे होते. प्रत्येक १५० किलोमीटर अंतरासाठी १० तासांचा अवधी होता. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर वेळेची अचूकता साधणे आवश्यक असते. या स्पर्धेसाठी मी दर रविवारी शंभर किलोमीटरचे अंतर कापत होते. त्याचा मला फायदा झाला, असेही गुंडावार यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटनेचे सचिव चरणजित संघा म्हणाले, ‘सहाशे किलोमीटर अंतराची बीआरएम सायकलिंग स्पर्धा ही ४० तासांमध्ये पूर्ण करावी लागते. नियमित सराव असूनही अशी स्पर्धा पूर्ण करताना सायकलपटूंचा कस लागतो. यात डॉ. सुनील देशमुख व गणेश गुंडावार हे दोघेही यशस्वी ठरले. त्यांच्या यशाने औरंगाबादेतील सायकलपटूंना निश्चित चालना मिळेल. सध्या औरंगाबादेत ५० सायकलपटू हे नियमित सराव करत आहेत. त्यातून बीआरएम स्पर्धा गाजवणारे खेळाडू घडतील, असा विश्वास संघा यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ रणरागिणींची युद्धकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पद्मपुरा भागात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून ५१ मुलींना शिवकालीन युद्धकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, लाठी या शस्त्रांचा प्रशिक्षणासाठी वापर करण्यात आला आहे. स्वसंरक्षण व शिवकालीन युद्धकला जतन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

जय बजरंग क्रीडा मंडळ व शिवकालीन युद्धकला प्रसारक आखाडा यांनी नवरात्रोत्सवात मुलींना स्वसंरक्षणासाठी सज्ज करणारा उपक्रम हाती घेतला आहे. दैत्यासूरमर्दिनी भद्रकाली रणरागिणी पथकाच्या माध्यमातून दररोज ५१ मुलींना युद्धकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिवकालीन युद्ध कला प्रसारक आखाड्याचे प्रशिक्षक गोरक्षनाथ कुंडलवाल यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. प्रशिक्षणातून मुलींमध्ये आत्मविश्वास तयार करण्यात येत आहे. स्वसंरक्षणाचे धडे गिरवल्यानंतर मुलींनी समाधान व्यक्त केले. नवरात्र हा आदिशक्तीची उपासना करणारा धार्मिक उत्सव असतो. नवी शक्ती आणि नवीन उत्साह निर्माण करणारा हा उत्सव युद्धकलेचे धडे देण्यासाठी अनुकूल ठरला आहे. पद्मपुर्‍यातील ५१ रणरागिणी शिवकालीन युद्भकलेची प्रात्यक्षिके सादर करीत आहेत. या मंडळात शालेय ते महाविद्यालयीन स्तरावरील मुलींचा समावेश आहे. महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढा देण्याची हिंमत युद्धकलेने दिली आहे. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला या शस्त्रांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. संतांचे संस्कार, देशभक्ती आणि अन्यायाविरूद्ध लढण्याचे सामर्थ्य देणारे मर्दानी खेळ तरुण पिढीसाठी आवश्यक आहेत, असे प्रशिक्षक गोरक्षनाथ कुंडलवाल यांनी सांगितले.

धाडसी ‘अग्निचक्र’
सर्व महिलांना स्वसंरक्षणासाठी युद्धकला उपयोगी ठरू शकते. लाठी-काठी चालवण्यासोबतच वैविध्यपूर्ण शिवकालीन शस्त्र प्रकारांची माहिती देण्यात आली. ‘अग्निचक्र’ प्रकारात काठीच्या दोन्ही टोकांना आग लावून फिरवतात. अग्निचक्र तयार करण्याची कला लक्षवेधी आहे. विविध धाडसी युद्ध प्रकारांचे प्रात्यक्षिक करून आणि माहिती जाणून घेऊन रणरागिणी सज्ज झाल्या आहेत. शहरात प्रथमच मुलींना शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पाणंदमुक्ती झाली कागदोपत्री!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराची पाहणी करून पाणंदमुक्ती संबंधीचा अहवाल शासनाला पाठवण्यासाठी आलेली सरकारची समिती लवचिक धोरण स्वीकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या विविध भागात ‘उघड्यावर’ जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त असतानाही समिती पालिकेला ‘एनओसी’ देण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दोन ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण शहरांमध्ये ‘ओडीएफ’ अभियान (हगणदारी मुक्त शहर) राबवण्याचा निर्धार करण्यात आला. या अभियानासाठी शहराची निवड करण्यात आली. सुमारे ७,९०० वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट पालिकेला देण्यात आले. एका शौचालयासाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान शासनातर्फे दिले जाते. महापालिकेच्या यंत्रणेने उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले, पण त्यात शंभर टक्के यश प्राप्त झाले नाही. किमान दीड हजार वैयक्तिक शौचालये बांधणे अद्याप बाकी आहे. दोन ऑक्टोबर काही दिवसांवर आल्यामुळे शासनाचे पाच जणांचे एक पथक स्वच्छता व ‘ओडीएफ’च्या कामाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी शहरात दाखल झाले. सदस्यांनी सकाळपासून पाहणीस सुरूवात केली. पडेगाव - मिटमिटा, सातारा, अंबिकानगर, राजनगर मुकुंदवाडी, डॉ. आंबेडकरनगर, भावसिंगपुरा आदी भागात पाहणी केली. काही ठिकाणी ओडीएफचे काम चांगले झाले आहे, पण काही ठिकाणी प्रभावीपणे काम होणे बाकी आहे, असे मत पथकातील एका ज्येष्ठ सदस्याने व्यक्त केले.

कामात नाना विघ्ने
पथकातील सदस्यांनी वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामांची पाहणी केली. लाभार्थींचे पासबूक तपासले. शौचालयाचा फोटो, लाभार्थीचा फोटो आणि पासबूकचा फोटो त्यांनी काढून घेतला. काही लाभार्थींशी त्यांनी चर्चा देखील केली. अनुदान उशिरा मिळाले, त्यामुळे वेळेत शौचालय बांधता आले नाही, पाऊस सुरू होता त्यामुळे बांधकामात व्यत्येय आला अशी कारणे लाभार्थींनी सांगितली. लवकरात लवकर शौचालय बांधून घ्या, अशी सूचना पथकातील सदस्यांनी लाभार्थींना केली. उद्या बुधवारी देखील हे पथक शहराच्या विविध भागात पाहणी करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी मंगळवारी जारी केले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांची बदली क्रांतिचौक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ‌शिवाजी कांबळे यांची वर्णी लावण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक विवेक सराफ यांची पीआरओ पदावरून दौलताबाद पोलिस ठाणे, दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांची मुकुंदवाडी, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक रामेश्वर रोडगे यांची छावणी वाहतूक शाखा, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे सतीश टाक यांची आयुक्त यांचे पीआरओ म्हणून बदली करण्यात आली आहे. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा पदभार सध्या सहायक पोलिस निरीक्षक बंडेवाड यांच्याकडे प्रभारी म्हणून सोपवण्यात आला आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे शहर वाहतूक शाखेचा अति‌रिक्त कारभार देण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी वर्णी लागावी यासाठी अनेक पोलिस निरीक्षकांचे प्रयत्न सुरू होते. ते राजकीय मंडळींकडून लॉबिंग करत असल्याची चर्चा होती. पोलिस निरीक्षक सावंत यांचा या पदावरील कार्यकाळ अद्याप दीड वर्षे शिल्लक होता. पण, बदली होणार या अपेक्षेने इतर दोन महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मंगळवारी झालेल्या बदल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन नवरात्रात फुलांचे भाव दुप्पट

$
0
0

ऐन नवरात्रात फुलांचे भाव दुप्पट
म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
ऐन नवरात्रामध्ये झेंडु, शेवंती, निशिगंध, गुलाब आदी सर्वच फुले महाग झाली आहेत. फुलांचे दर दुप्पट झाले आहेत. गुलाब ३०, झेंडू ४० तर निशिगंधांची फुले २० रुपयांनी महाग झाली आहेत. नवरात्रात फुलांच्या किमती वाढल्याने ग्राहक काहिशी नाराजी व्यक्त करीत आहेत.
नरात्रोत्सवात आदिशक्तिचा जागर आणि तजेलदार झेंडू फुलांच्या माळा असा उत्साही दरवळ असतो. यंदा मात्र सर्व प्रकारची फुलं कमालीची महागली आहेत. फुलांचे उत्पादन घटल्याने थेट नाशिकमधून फुले आणावी लागत आहे. सर्व प्रकारच्या फुलांचे दर यंदा दुपटीने वधारले असून दसऱ्याला १०० रुपये किलोपर्यंत झेंडूच्या फुलांचा दर जाऊ शकतो. गणपती उत्सव, गौरी गणपती, पितृपक्ष, भुलाबाई, नवरात्रोत्सव, विजयादशमी अशा सण-उत्सवाच्या मांदियाळीत फुलांच्या दरवळाने भावभाक्तिही फुलून येते. मात्र, यावर्षी फुलांचे भाव गतवर्षाच्या तुलनेत वाढले असून दरवाढीची ही अतिषबाजी दिवाळीत देखील कायम राहणार आहे, असे मत फूल विक्रेते व्यक्त करीत आहेत.
शेवंतीच्या फुलांमध्येही दरवाढ झाली आहे. जर्बेरा आणि फुलमाळी हे मनोहारी समीकरण यंदा जर्बेरानेही उसळी घेत असून गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर दुप्पट आहेत. लिली, गेलेंडा, तेरडा, निशीगंध, कुंद या फुलांच्या दरातही तेजी आहे. गेलेंडा ६० तर तेरडा ३० ते ६० रुपये किलोने विकले जात आहे. कुंदाची फुलेही ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो अशी त्याची विक्री होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रस्त्याची चाळणी कशी दुरुस्त होणार?

$
0
0

जालना रस्त्याची चाळणी कशी दुरुस्त होणार?
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराची लाइफलाइन असलेल्या जालना रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरते बुजविण्याचे काम सुरू आहे, पण रस्ता मजबूत आणि डांबरीकरण करण्यासाठी झाल्यास १५ कोटी रुपये लागणार आहेत. हा पैसा देणार कोण ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या संभ्रमात रस्त्याची दुरुस्ती मात्र रखडणार आहे.
महापालिकेच्या हद्दीत असूनही जालना रस्ता देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पाच उड्डाणपूल बांधले आहेत. त्यामुळे दहा किलोमीटरच्या या रस्त्यात चार यंत्रणांची मालकी आहे. रस्त्यावरून सर्वाधिक वाहतूक होत असल्याने साहजिकच रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे जास्त लक्ष द्यावे लागते. राज्य सरकारने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कित्येक वर्षे निधी दिला नव्हता. २०१३ मध्ये २१ कोटी रुपये शहरातील पाच पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर केले, पण प्रत्यक्षात हा पैसा मिळण्यास वर्षभराचा कालावधी गेला. दरम्यान, दुरुस्तीचे कंत्राट निश्चित होण्यास काही कालावधी झाला. जालना रस्त्याच्या दहा किलोमीटरचे तीन टप्पे पाडून कंत्राट दिले गेले. त्यानुसार खडीकरण, खड्डे भरणे आणि डांबरीकरण झाले. या निविदेत तीन वर्षांचा दोष निवारण कालावधी निश्चित केला होता. तीन वर्षांच्या काळात या रस्त्याची काही डागडुजी करावयाची असल्यास संबंधित कंत्राटदाराने करणे अपेक्षित होते. तीन वर्षांचा हा कालावधी नुकताच संपला. दरम्यान, मे महिन्यापासून मागणी करूनही जालना रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. गेल्या तीन महिन्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वेळा कचखडी, माती टाकून खड्डे बुजविले पण ते तात्पुरत्या स्वरुपात होते. त्यामुळे एकाच पावसात पुन्हा खड्डे उघडे पडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी जालना रस्ता विस्तार आणि मजबुतीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वतीने करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार सर्वेक्षणही झाले, पण रस्ता दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी देण्याची तरतूद एनएचएआयकडे नसल्याने रस्त्याची अडचण झाली. दरम्यान, हा रस्ता केंद्राकडे जाणार असल्याने पीडब्ल्यूडीने यंदा रस्ते दुरुस्तीसाठी कुठलीच तरतूद ठेवली नाही. त्यामुळे आता जालना रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करावयाचे झाल्यास निधी आणायचा कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महावीर चौक ते चिकलठाणा विमानतळ हा रस्ता पीडब्ल्यूडीकडे आहे. त्यापैकी महावीर चौक ते क्रांतीचौक उड्डाणपूल एवढा पॅच महापालिकेच्या अखत्यारित आहे. उर्वरित रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी किमान १५ कोटी रुपये आवश्यक आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग एवढा निधी आता एका रस्त्यासाठी देणे शक्य नाही. त्यामुळे केंद्राच्या मदतीशिवाय हा रस्ता होणे अशक्य आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी जर केंद्राकडे मागणी केली तरच आता जालना रोड पूर्ण दुरुस्त होऊ शकेल, अशी स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images