Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ भरती मेळाव्यात ‘आयटीआय’च्या २,७१६ विद्यार्थ्यांना नोकरी

$
0
0

भरती मेळाव्यात ‘आयटीआय’च्या २,७१६ विद्यार्थ्यांना नोकरी

इंजिनीअरिंगचेही विद्यार्थी नोकरीसाठी मेळाव्यात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयटीआयमध्ये झालेल्या दोन दिवसांच्या भरती मेळाव्यात २ हजार ७१६ विद्यर्थ्यांना जॉब मिळाले. शहरातील ५५ कंपन्यांमध्ये नोकरीची संधी या विद्यार्थ्यांना मिळाली आहे. आयटीआय विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बारावी, पॉलिटेक्निकसह इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनीही नोकरीची मागणी केल्याचे समोर आले आहे.

शासकीय मुलांच्या आयटीआयमध्ये बुधवार, गुरुवार असा दोन दिवस शिकाऊ उमेदवार भरती मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात ५५ कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली. आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांच्या (ट्रेड) विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली. आज दुसऱ्या दिवशी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन दिवसांत २ हजार ७१६ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निकालानंतर विद्यर्थ्यांना रूजू करून घेतले जाणार आहे. अद्याप विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना काही दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

इलेक्ट्रीशन, फिटर, वेल्डर ट्रेड पुढे

भरती मेळाव्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रीशीयन, फिटर, वेल्डर, मशिनीस्टसारख्या ट्रेडच्या विद्यार्थ्यांचा आकडा मोठा आहे.

संधाता, यंत्रकारागीर घर्षक, कातारी, कोपा, आरएसी, एमएमटीएम, रंगारी अशा ट्रेडला ही चांगली मागणी होती. मेळाव्या २२ जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते. तर, आयटीआयमध्ये विविध ८० ट्रेडचे शिक्षण दिले जाते. त्यातील सहा, सात ट्रेडलाच सर्वाधिक मागणी असते.

आम्हालाही नोकरी हवी..

अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नोकरी नसल्याचे वारंवार बोलले जाते. विशेषतः अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करून अनेकांना नोकरीसाठी भटकंती करावी लागते आहे. आयटीआयमध्ये झालेल्या मेळाव्यात इतर विद्यार्थ्यांनीही नोकरीची विचारपूस केल्याच्या नोंदी आहेत. त्यात अंभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मेळाव्यात आम्हाला संधी मिळेल का, याबाबत विचारणा केल्याचे आयटीआयचे उपप्राचार्य एस. वाय. शेख यांनी ‘मटा’ला सांगितले.

एकूण जागा..... ६२७९

विद्यार्थ्यांची नोंदणी... ३४००

नोकरी मिळाली......... २७१६

एवढ्या कंपन्यांमध्ये संधी... ५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ हवामान खात्याचे इशारे झाले फोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मान्सूनच्या आगमनापासून ते पावसाळ्यापर्यंत राज्यात हमावान खात्याचे भाकित चुकल्याची अनेक उदाहरणे आहेत. मराठवाड्यातही गेल्या आठवड्यात दोन वेळेस पाऊस पडणार असल्याचे दिलेले इशारे खोटे ठरले असून, आता येत्या चोवीस तासात पाऊस पडणार असल्याचा पुन्हा एक अंदाज वर्तवला आहे.

राज्यात हवामान खात्याच्या फसव्या अंदाजावर गेल्या काही दिवसांत बरीच चर्चा झाली. या विभागावर राजकारण्यांनीही तोंडसुख घेतले असून, हवामान खात्याच्या फसव्या गणिताची प्रचिती मराठवाड्यालाही मिळत आहे. परतीच्या पावसाचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात आठवड्याभरापासून पाऊस गायब आहे. विशेष म्हणजे या कालावधीत १९ व २१ सप्टेंबर रोजी पुढील चोवीस तासात पावसाचा इशारा देण्यात आला होता. २० सप्टेंबर रोजी मराठवाड्यात केवळ १ मिलीमीटर पाऊस झाला, तर २१ तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यानंतर दोन दिवस १० ते १३ मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप घेतली आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये अद्यापही ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्याने या तालुक्यांना पावसाची गरज आहे.

आता पुन्हा २४ तासात अंदाज
सप्टेंबर महिन्यात २७ दिवसांपैकी १४ दिवस पाऊस पडला असून, १३ दिवस कोरडे होते. २० सप्टेंबर रोजी हवामान विभागाने काढलेल्या पत्रामध्ये चोवीस तासात मराठवाड्याच्या काही भागात मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला. प्रत्यक्षात मात्र २१ रोजी १०.३ मिलीमीटर तर २२ सप्टेंबर रोजी केवळ १३.५ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतरही किरकोळ वगळता कोणत्याही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. हवामान खात्याने आता २८ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मराठवाड्यात येत्या चोवीस तासात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ हिमायतबाग चकमक; मंगळवारी निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील हिमायतबाग येथे २०१२ साली काही दहशतवाद्यांनी एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार करून हवालदार शेख आरेफ यांना गंभीर जखमी केले होते. या गुन्ह्यात पकडलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध ‘खुनाचा प्रयत्न केल्याचा’ गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या खटल्याची सुनावणी जिल्हा कोर्टात पूर्ण झाली असून, या प्रकरणाचा निकाल तीन ऑक्टोबरला विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या कोर्टात अपेक्षित आहे. यातील चार आरोपींना वेगवेगळ्या कारागृहातून जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्यापैकी काहींचे ‘इन कॅमेरा’ जबाबही नोंदविण्यात आले होते.

२०१२मध्ये हिमायतबागेत झालेल्या चकमकीत एटीएस पथकातील पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात दहशतवादी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखान याला अहमदाबाद (गुजरात) येथील कारागृहातून, तर इतर तीन दहशतवाद्यांना नाशिक व औरंगाबाद येथील कारागृहातून कडक पोलिस बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीवेळी, औरंगाबादेतून अहमदाबादला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आवाज स्पष्ट ऐकायला येत नसल्याची तक्रार अबरारने केल्यानंतर कोर्टाने त्याला सुनावणीप्रसंगी हजर करण्याचे आदेश दिले होते. २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांना पकडण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या पथकाने हिमायतबागेत सापळा रचला होता. या वेळी दहशतवाद्यांनी एटीएस पथकावर गोळया झाडण्यास सुरुवात केली होती. यात पोलिस हवालदार शेख आरेफ यांना गोळी लागली होती. बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दहशतवादी अझहर ऊर्फ खलील कुरेशी ठार झाला होता, तर दहशवादी मोहम्मद शाकेरच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. या प्रसंगी पाठलाग करून एटीएसने दहशतवादी अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबूखान (रा. चंदननगर, इंदौर, मध्यप्रदेश) यास पकडले होते. यानंतर पोलिसांनी अन्वर हुसेन (रा. लाभारिया, इंदौर, मध्य प्रदेश) याला अटक केली होती. दहशतवाद्यांकडून ४ गावठी कट्टे, २ रिव्हॉल्व्हर, १७ जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. पकडलेल्या दहशवाद्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध विशेष कोर्टात दोन महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भविष्यासाठी नोटबंदी फायद्याचीः पवाह

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नोटबंदी-जीएसटीकडे सकारात्म पहा. दूरगामी फायद्यासाठी हे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन गुरुवारी बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पवाह यांनी व्यक्त केले. ते चिकलठाणा येथे बव्हेरिया मोटर्स शोरूमच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

पवाह म्हणाले, ‘भारत आमच्यासाठी फार सुरुवातीपासून मोठी बाजारपेठ राहिला आहे. अर्थव्यवस्था सुधारायची असेल, तर थोड्या कळा सहन कराव्याच लागतील. लहान मुलाला वाढवताना जसा थोडा त्रास होतो, त्यावेळी आपण दूरगामी परिणाम चांगला व्हावा, अशी अपेक्षा ठेवतो. तसेच नोटबंदी आणि जीएसटीचे आहे. आलिशान कार निर्मितीत जर्मन बीएमडब्ल्यूने भारतातील बाजारावर आपले अधिराज्य पूर्वीपासूनच मजबूत केले आहे. भारतामध्ये ६८ हजार ‘बीएमडब्ल्यू’चे ग्राहक आहेत. औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये २५० ग्राहकांच्या गाड्या रस्त्यांवरून धावत आहेत. महाराष्ट्रातील बाजारपेठेमध्ये आपले अधिराज्य अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने विक्री दालनांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना औरंगाबादेतून ‘बीएमडब्ल्यू’ची विक्री करण्याबरोबरच अल्ट्रा मॉडर्न फुल्ली फ्लेज केंद्र सेल्स, सर्व्हिस, स्पेअर पार्टस्, बिझनेस सिस्टीम्सच्या सर्व प्रक्रियांमधील उच्च दर्जाचा अनुभव मिळणार आहे. गुरुग्राम, सिंगापूर, मलेशिया व जर्मनीमधील बीएमडब्ल्यू प्रशिक्षण केंद्रामधील सर्व्हीस इंजिनिअर्सच्या टिमद्वारे प्रशिक्षण दिलेले तज्ज्ञ औरंगाबादमध्ये गाड्यांची देखभाल करणार आहेत.’

टू व्हीलरमध्ये उतरणार
पवाह म्हणाले, ‘टीव्हीएससोबत बीएमडब्यू करार करून टू व्हीलर बाजारात उतरणार आहे. आमचा चेन्नईतील प्रकल्प स्थिर आहे. तूर्तास औरंगाबादला गुंतवणूक करण्याचा विचार नाही, मात्र भारतात १२०० कोटींची गुंतवणूक करणार आहोत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बनावट विमा अपघात; पसार तक्रारदार अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट अपघात विमा प्रकरणातील एचडीएफसी विमा कंपनीचा पसार व्यवस्थापक व तक्रारदार सतीश औचार याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. हा प्रकार ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणात यापूर्वी पोलिस जमादार, डॉक्टर तसेच एका दलालाला अटक करण्यात आली होती.

फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सायबर सेलच्या मदतीने हा घोटाळा उघडकीस आणला होता. यामध्ये या टोळीने बनावट अपघाताचे पंचनामे पोलिसांच्या व डॉक्टरांच्या मदतीने सादर केले होते. यामध्ये तब्बल २२ विम्याच्या दाव्यामध्ये ४८ लाख रुपये उकळण्यात आले होते. सुरूवातीला या प्रकरणात एचडीएफसी विमा कंपनीचा व्यवस्थापक सतीश औचार याने तक्रार दाखल केली होती. मात्र नंतर तपासात त्याचा देखील या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तो पसार झाला होता. पोलिसांनी यापूर्वी पोलिस जमादार आर. आर. शेख, डॉ. महेश मो‌हरीर व दलाल शेख लतीफ शेख अब्दुल यांना अटक केली होती. पसार झालेल्या औचारला बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोटेगाव-कोपरगाव’चे सर्वेक्षण कोकण रेल्वेकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद लोहमार्ग गोव्याशी जोडण्यासाठी रोटेगाव-पुणतांबा प्रस्तावित मार्गाऐवजी रोटेगाव-कोपरगाव कॅडलाइनच्या सर्वेक्षणाचे काम कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे सोपविण्यात आले आहे. या २२ किलोमीटर लोहमार्गाची मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी केली होती.

शिर्डी देवस्‍थानाच्या शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त साई दर्शनासाठी दक्षिणेतून मोठ्या संख्येने भाविक येतात. थेट शिर्डीला जाण्यासाठी जुन्या प्रस्तावित रोटेगाव-पुणतांबा रेल्वे मार्गाऐवजी कोपरगाव कॅडलाइनचा प्रस्ताव मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी रेल्वे विभागासमोर सादर केला होता. या प्रस्तावावर कोणताही निर्णय न झाल्याने वर्मा यांनी दिल्लीत उपोषण केले. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी २२ किलोमीटरच्या या प्रस्तावित कोपरगावमार्गे होणाऱ्या मार्गाचे फायदे समजावून सांगितले होते. पुणतांबा लोहमार्ग तयार करताना नदीवर मोठा पूल बांधवा लागणार आहे. यामुळे पुणतांबा मार्ग अधिक खार्चिक असल्याची मांडणी त्यांनी केली होती.

त्यानंतर रेल्वे विभागाने रोटेगाव ते कोपरगाव या लोहमार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या पत्रात रोटेगाव कोपरगाव कॅडलाइनच्या सर्वेक्षणाचे काम कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडे देण्यात आले आहे. या सर्वेक्षणाते निष्कर्ष सकारात्मक असल्यास औरंगाबाद थेट शिर्डीशी जोडता येईल, अशी माहिती वर्मा यांनी दिली.

गोवा जोडले जाणार
रोटेगाव-कोपरगाव लोहमार्ग झाल्यास शिर्डीबरोबर दौंड रेल्वे मार्गावरील कोल्हापूर, गोवा या पर्यटन स्‍थळांकडे जाणाऱ्या मार्गांशी औरंगाबादशी थेट जोडले जातील. औरंगाबाद किंवा नांदेड येथून रोटेगाव, कोपरगावमार्गे थेट रेल्वे सोडता येणार असल्याची माहितीही वर्मा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहापैकी पाच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कन्नड तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीसाठी निवडणूका होत असून त्यापैकी बिनविरोध निवड झालेल्या सहापैकी पाच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचपदाच्या उमेदवारांचा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी सत्कार केला.
पक्ष आदेश मानून खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात आहे. सहापैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध शिवसेनेच्या ताब्यात घेतल्या आहेत. या निवडणुकीत उमेदवारांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे. निवडणुकीत निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आमदार जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुक्यातील बिनविरोध निवड होणारे हस्ता येथील सरपंच वंदना मनोहर नीळ व सर्व सदस्य, शिरोडी येथील सरपंच जयेश काकासाहेब बोरसे व सदस्य, औराळीच्या सरपंच सुनीता कडुबा कुमावत, वडगाव जाधवचे सरपंच जगदीश रामधन राजपूत, भारंबा तांडाच्या सरपंच शंकुतलाबाई फकीरराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल टी पॉइंटला तोतया पोलिस अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रवाशाला लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलिसाला हर्सूल पोलिसांनी तत्काळ अटक केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी हर्सूल टी पॉइंट येथे घडला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात महेमुद शेख रुस्तम (वय ४३, रा. हर्सूल, चेतनानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत आसाराम तुपे (वय २७) हे शुक्रवारी सोलापूर येथून शहरात आला होता. सिडको बसस्टँड येथे उतरल्यानंतर भावाची वाट बघते ते हर्सूल टी पॉइंट येथे थांबले होते. यावेळी संशयित आरोपी शेख महेमुद शेख रुस्तम (वय ४३ रा. हर्सूल, चेतनानगर) हा तेथे आला. त्याने तुपे यांना कोण आहेस, काय करत आहेस, बॅगेत काय आहे अशी विचारणा सुरू केली. तुपे यांनी त्याला बॅग उघडून दाखवली. यावेळी आपण पोलिस असल्याचे सांगत महेमुदने तुपेला दुचाकीवर बसण्यास सांगितले. दरम्यान, यावेळी हर्सूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर, पीएसआय सोन्ने, जमादार वाघ व चालक रहीम शेख तेथून जात होते. तुपे यांनी पोलिसांचे वाहन पाहून त्यांना थांबवून ही घटना सांगितली. पोलिस निरीक्षक कल्याणकर यांनी महेमुदला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी तो दारू पिलेला आढळला. त्याच्या विरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निरीक्षक कल्याणकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रिड्रेसल’चे निकाल विद्यापीठात रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तब्बल दहा हजार विद्यार्थी पुनर्मूल्यांकन प्रक्रियेच्या (रिड्रेसल) निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन विषयांचा अपवाद वगळता सर्व विषयांचे निकाल तयार आहेत. मात्र, निकालाची तांत्रिक प्रक्रिया करण्याची जबाबदारी असलेल्या ‘एमकेसीएल’चे कामकाज रेंगाळल्यामुळे निकालास उशीर झाल्याचे परीक्षा विभागाने म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब केला. निकालात पुरेशी पारदर्शकता नसल्याचा दावा विद्यार्थी संघटनांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने तपासल्या नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. यावर्षी पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी तब्बल दहा हजार अर्ज आले. मात्र, पुरेसे नियोजन नसल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. २५ सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचा दावा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी केला होता. प्रत्यक्षात २९ सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर होऊ शकले नाही. परीक्षा विभागाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, तांत्रिक प्रक्रियेचे काम ‘एमकेसीएल’ (पुणे) कंपनीकडे आहे. वारंवार अर्ज करूनही तत्परतेने प्रक्रिया होत नसल्यामुळे निकाल रखडला असे डॉ. रगडे यांनी स्पष्ट केले. बी. ए., बी. एस्सी., एम. एस्सी., विधी, बायोटेक्नॉलॉजी, सामाजिकशास्त्रे यांचे निकाल तयार आहेत. पण, गुणपत्रिका देणे शक्य नसल्यामुळे परीक्षा विभाग अडचणीत सापडला आहे. उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स देऊन पाच दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‘थर्ड ओपिनियन’ची प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल तयार आहेत. ‘एमकेसीएल’ यंत्रणेने वेळेत काम केल्यास विद्यार्थ्यांना लवकर निकाल मिळणे शक्य आहे.
दरम्यान, परीक्षा विभागात कर्मचारी कमी असल्यामुळे प्रत्येक प्रक्रिया रेंगाळत आहे. विद्यापीठ प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेणे आ‍वश्यक आहे. केवळ ‘एमकेसीएल’वर आक्षेप घेणे योग्य नाही असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

तीन शिफ्टमध्ये काम

परीक्षा विभागात पाच झेरॉक्स मशीनवर तीन पाळ्यात काम सुरू आहे. उत्तपत्रिका झेरॉक्स करून योग्य नमुन्यात विद्यार्थ्यांना देण्याची परीक्षा विभागाची जबाबदारी आहे. दुसरीकडे ‘एमकेसीएल’चे कामकाज पुणे शहरातून होत असल्यामुळे सहज संपर्क साधता येत नाही. वारंवार ई-मेल पाठवूनही प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे.

सध्या विधी शाखेचे निकाल तयार असूनही जाहीर करता येत नाही. दोन विषयांचा अपवाद वगळता सर्व निकाल तयार आहेत. तांत्रिक अडचणी दूर झाल्यास निकाल लवकर जाहीर करण्यात येतील.
- डॉ. सतीश दांडगे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदल्याप्रकरणी मंगळवारी सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य शासनाने शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात घेतलेल्या नवीन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीवेळी, न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. हे शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष असल्याची टिप्पणी करीत याचिकाकर्त्या शिक्षकांच्या २७ आणि २९ सप्टेंबर रोजीच्या रजा नामंजूर करून गैरहजेरी नोंदविण्याचे आदेश दिले. दरम्यान, या याचिकांवरील सुनावणी मंगळवारी (३ ऑक्टोबर) ठेवण्यात आली आहे.
राज्य सरकारने १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात नवीन शासन निर्णय काढला. या निर्णयानुसार होणाऱ्या बदल्यांना स्थगिती द्यावी, बदल्या रद्द कराव्यात यासाठी प्राथमिक शिक्षकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात ११ याचिका दाखल झाल्या आहेत. २७ फेब्रुवारीच्या २०१७ रोजीच्या शासन निर्णयालाही शिक्षकांनी विरोध करत खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकांच्या सुनावणीअंती खंडपीठाने, २७ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय वैध असून त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, राज्य सरकारने १२ सप्टेंबर २०१७ रोजी नवीन शासन निर्णयाद्वारे शिक्षकांच्या फक्त संवर्ग एक व दोनच्या बदल्या या २७ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संवर्ग तीन व चारवर अन्याय करणारा असल्याने शिक्षकांनी १२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात खंडपीठात ६००पेक्षा जास्त शिक्षकांनी ११ याचिका दाखल केल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, अॅड. शैलेश ब्रह्मे, अॅड. शिवकुमार मठपती, अॅड. सुविध कुलकर्णी, अॅड. गजानन क्षीरसागर, अॅड. रवींद्र गोरे आदी काम पाहत आहेत. याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळीही शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अत्याचार; तरूणास अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन वर्षापासून सोयगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला गुरुवारी (२८ सप्टेंबर) अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, दोन ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.
फिर्यादी १६ वर्षीय मुलीचे आई-वडील ऊसतोडीसाठी पुण्याला गेले होते. पीडिता भाऊ-बहिणीसोबत राहत होती. संशयित आरोपी सुरेश मुकुंदा सोनवणे (वय २२, रा. पळशी, सोयगाव) हा पीडितेच्या काकासोबत नेहमी घरी येत असे. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले. यातून ती गर्भवती राहिली व तिला मुलगी झाली. दरम्यान, लग्नाची मागणी केली असता तो दोन वर्षांपासून फरार झाला होता. त्याला गुरुवारी अटक करुन त्याला शुक्रवारी कोर्टात केले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे बाकी असून, आरोपीचे कोणी साथीदार आहे काय, याचा शोध घ्यावयाचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला २ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपकरी अंगणवाडी सेविकांवर दबाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी ११ सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. पण, झेडपीचे अधिकारी, कर्मचारी दबाव टाकून अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या आरोप करत शुक्रवारी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मुंबई येथील मोर्चानंतर शहरात परत आलेल्या आयटक प्रणित अंगणवाडी सेविकांनी अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन केले. यावेळी कदम यांच्या दालनासमोर निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर विविध तालुक्यांचे बालविकास प्रकल्प अधिकारी व आयटक युनियनच्या नेत्यांना एकाचवेळी चर्चेसाठी बोलावून बाजू ऐकून घेण्यात आली. अपशब्द व गलिच्छ भाषा न वापरण्याच्या, अंगणवाड्या सक्तीने न उघडण्याच्या कडक सूचना कदम यांनी सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांच्या आश्वासनानंतर शनिवारचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराओ आंदोलन मागे घेण्यात आले. अपमानास्पद वागणूक सुरू राहिल्यास पाच ऑक्टोबर रोजीच्या राज्यव्यापी जेलभरो आंदोलनादिवशीही या मुद्द्याकडे लक्ष वेधले जाईल, असा इशारा आयटकने दिला.
यावेळी आयटक युनियनचे राज्य उपाध्यक्ष प्रा. राम बाहेती, अनिल जावळे, शीला साठे, माया भिवसाने, सुनिता शेजवळ, नूरजहाँ पठाण, तारा बनसोडे आदींची भाषणे झाली.

७८७ अंगणवाड्यांमध्ये आहार

संपामुळे पूरक पोषण आहार विस्कळित झाला आहे काय ? अशी विचारणा केली असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम म्हणाले, संपाचा परिणाम आहे, पण जिल्ह्यात आज ७८७ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार देण्यात आला. बीडीओ, सीडीपीओंना सूचना केल्या असून आशा स्वयंसेविकांच्या मदतीने आहार पुरविण्याचे सांगितले आहे. ३२७ अंगणवाडी सेविका आणि १३० मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेसाठी भाजपची चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षक ऑक्टोबर महिन्यात राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. युतीमध्ये जे मतदारसंघ भाजप लढवत नाही, तेथे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत ३५० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठेवले आहे. त्यादृष्टीने आतापासून ‘होमवर्क’ सुरू केले जाणार असल्याचे वृत्त आहे.

लोकसभेच्या २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळविले. २०१९मध्ये त्यापैक्षाही जास्त यश मिळविण्यासाठी ३५० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी ठेवले आहे. त्यासाठी आतापासून व्यूहरचना आखली जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत भाजपचे केंद्रीय निरीक्षक राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे निरीक्षक प्रामुख्याने प्रमुख पदाधिकारी, लोकसभा मतदारसंघातील भाजपचे लोकप्रतिनिधी, संघ परिवारातील प्रमुख व्यक्ती यांच्याशी चर्चा करून अंदाज घेणार आहेत. या निरीक्षकांचे टार्गेट सध्या भाजप लढत नसलेले लोकसभा मतदारसंघ अाहे. महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेबरोबर युती आहे. तीन दशकांपासून असलेल्या युतीमुळे राज्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये वाटण्या झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांत भाजपने कधीच उमेदवार उभा केले नव्हते. भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार उभा केला नाही. तुलनेने त्या-त्या पक्षांची ताकद देखील त्या लोकसभा मतदारसंघात कमीच आहे.

ताकद कमी असलेल्या व शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवून भाजपचा उमेदवार कसा निवडून आणता येईल, याबद्दल भाजपने निरीक्षकांच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; केंद्रीय निरीक्षक अहवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना सादर करणार आहेत. त्यानंतर आवश्यक ती यंत्रणा उभारली जाणार आहे.

औरंगाबादसाठी महेंद्रसिंह निरीक्षक
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपची स्थिती, संभाव्य उमेदवार आदी बाबींची चाचपणी करण्यासाठी भाजपचे उत्तरप्रदेश येथील खासदार महेंद्रसिंह पाच सप्टेबर रोजी औरंगाबादेत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक होणार आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीचे निरोप शुक्रवारी काही पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर कोटींच्या टेंडरसाठी पालिकेत धावाधाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शंभर कोटींची चार टेंडर काढून रस्त्यांची कामे करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी महापालिकेत टेंडरसाठी धावाधाव सुरू होती. सायंकाळीच टेंडर निघाले पाहिजेत यासाठी पदाधिकाऱ्यांची घालमेल होत होती, तर अधिकारी गोलमेज परिषदेत व्यस्त होते. त्यामुळे शासनाचे पत्र येऊनही टेंडर प्रक्रियेबद्दल अनिश्चितता कायमच होती.

शहरातील रस्ते विकासासाठी शासनाने औरंगाबाद महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यातून ३१ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे केली जाणार आहेत. टेंडर काढण्यावरून संभ्रम असल्याने सरकारचे मार्गदर्शन मागवण्यात आले होते. या कामासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपयांचे चार टेंडर काढण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे पत्र नगरविकास विभागाने काल पाठविले. त्यानंतर महापौरांसह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हलका झाला. शुक्रवारी टेंडर निघेल असा अंदाज या सर्वांनी बांधला होता. आयुक्त डी. एम. मुगळीकर आपतकालीन व्यवस्थापनासंदर्भात दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला गेले होते. शासनाचे पत्र आल्याची माहिती त्यांना कळवून दिल्लीहून तातडीने बोलावून घेण्यात आले. त्यांचे शुक्रवारी सकाळी शहरात आगमन झाले. त्यानंतर पालिकेत बैठकांचे सत्र सुरू झाले.

महापौर घडमोडे यांनी फोनवरून आयुक्तांशी दिवसभरात तीन - चार वेळा संपर्क साधला आणि आजच्या आज टेंडर काढा, असा आग्रह धरला. महापौरांना प्रोटोकॉल मोडून आयुक्तांच्या बंगल्यावर किंवा अधिकाऱ्यांची बैठक सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात जाणे शक्य नव्हते. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी आयुक्तांची भेट घेऊन टेंडरसंदर्भात चर्चा केली. आजच्या आज टेंडर निघाले पाहिजे, अशी सर्वांची भावना असल्याचे त्यांनी आयुक्तांच्या कानी घातले.

आयुक्तांनी देखील त्याच संदर्भात काम सुरू आहे, अधिकारी टेंडरचा मसुदा तयार करीत आहेत. सर्व तयारी झाल्यावर लगेचच टेंडर काढले जाईल, असे स्पष्ट करून त्यांनी सभापतींची बोळवण केली. टेंडरचा मसुदा तयार करण्यासाठी प्रमुख अधिकारी संशोधन केंद्रात सकाळपासून बसले होते. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे काम सुरूच होते.

ताक फुंकून पिणार!
शंभर कोटींच्या रस्त्यांचे टेंडर काढताना प्रशासनातर्फे अत्यंत काळजी घेतली जात आहे. यापूर्वी शासनाने रस्त्यांच्या कामासाठी २४ कोटी रुपयांचा निधी दिला होता. हा निधी मिळाल्यावर देखील काही पदाधिकारी व राजकीय नेत्यांनी टेंडर लवकर काढण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मागे लकडा लावला होता. त्यात काही अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ‘या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये आणि शासनाच्या अनुदानातून रस्त्यांचे काम योग्य प्रकारे व्हावे, यासाठी टेंडरचा मसुदा तयार करताना आम्ही ताक देखील फुंकून पित आहोत,’ अशी भावना एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. मसुदा तयार होण्यास किमान दोन दिवस लागतील. त्यामुळे मंगळवारीच टेंडर निघू शकतील, असे या अधिकाऱ्याने सूचित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोट्या खेळा’ आंदोलन करून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजना पाच वर्षांपासून बंद असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘गोट्या खेळा’ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
महामंडळाचे भागभांडवल ५०० कोटी रुपये करावे, महामंडळास तत्काळ निधी द्यावा, पाच वर्षांपासून बंद असलेल्या एनएसएफडीसी योजना तत्काळ सुरू करा, महामंडळाच्या प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजनेसाठी मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतू पाच कोटी रुपये द्यावेत, पाच वर्षांत एकही कर्ज प्रस्ताव मंजूर न करणाऱ्या राष्ट्रीयकृत व बहुराष्ट्रीय बँकांचे परवाने रद्द करावे व बँक अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
महामंडळातर्फे मातंग समाजातील बेरोजगारांकरिता कर्ज योजना राष्ट्रीयकृत आणि बहुराष्ट्रीय बँकांमार्फत राबवल्या जातात. आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे असताना या कर्ज योजनांचे कर्ज प्रस्ताव आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शिफारस होत असल्याने पाच वर्षांपासून योजनाचे ८० ते ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण होत नाही. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर मच्छिंद्र कांबळे, संतोष पवार, योगेश दणके, प्रकाश शेजवळ, संदीप घुले, मंगेश खोतकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

योजना बंद

राज्य शासनाकडून महामंडळास अपेक्षित निधी वेळेत उपलब्‍ध होत नाही, राष्ट्रीय मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडे हमी घेत नसल्यामुळे एनएसएफडीसी अंतर्गत सर्व योजना बंद करण्यात आल्या आहेत, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिल्डर संजय कासलीवालला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कासलीवाल कन्स्ट्रक्शनचे बिल्डर संजय कासलीवाल याला आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दुपारी चिंतामणी कॉलनी परिसरात अटक केली. मलकापूर बँकेकडून चार कोटीचे कर्ज घेत तारण ठेवलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावून फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मलकापूर को ऑपरेटिव्ह बँकेच्या गुलमंडी शाखेचे व्यवस्थापक संजय रमेश फिरके यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये संजय कासलीवाल बँकेचे जुने ग्राहक असल्याने त्यांच्यावर बँकेचा विश्वास होता. डिसेंबर २०१२मध्ये कासलीवाल याने चार कोटीच्या कॅश क्रेडिटसाठी प्रस्ताव दाखल केला होता. यासाठी त्यांनी सातारा गट क्रमांक ७४मधील प्लॉट क्रमांक एक व १६ कर्जापोटी तारण ठेवल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. बँकेने त्याच्या प्रस्तावानंतर चार कोटीचे कर्ज मंजूर केले, मात्र कासलीवाल याने कर्जाच्या रक्कमेचा भरणा मुदतीत केला नाही. त्यामुळे बँकेने त्यांच्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला. यावेळी कासलीवाल याने कोर्टाला सादर केलेल्या कागदपत्रामध्ये प्लॉट क्रमांक एक व १६ मंजूर रेखांकनात मिळकत नसल्याचे नमूद करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे बँकेने त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रा दिली.

पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीक‌ांत नवले, एपीआय अमोल सातोदकर, पीएसआय सुभाष खंडागळे तसेच पथकाने आरोपी संजय कासलीवालला शुक्रवारी दुपारी अटक केली.

तारण प्लॉटवर बांधले फ्लॅट
बँकेने तारण ठेवलेल्या मालमत्तेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. बँकेकडे तारण ठेवलेल्या प्लॉट क्रमांक एकवर इमारतीचे बांधकाम करून त्यातील फ्लॅट ग्राहकांना विकल्याचे निष्पन्न झाले. तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावर बँकेच्या कर्ज बोजाची नोंद असताना व बँकेकडे कर्ज बाकी असताना देखील कोणतीही संमती न घेता कासलीवाल याने बनावट कागदपत्रांआधारे तारण मालमत्तेमध्ये फेरबदल करीत बँकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमा कंपनीने नाकारले शेतकऱ्यांचे २६४ प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रातील चुकांमुळे जिल्ह्यातील ६२ प्रस्ताव निर्णयाअभावी प्रलंबित आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह जालना बीड जिल्ह्यातील मागील वर्षात २६४ प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारकडून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात विजेचा धक्का, सर्पदंश, पाण्यात बुडून, आदी अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपयांची मदत विमा कंपन्यामार्फत दिली जाते. योजनेअंतर्गत विम्याची रक्कम घेण्यासाठी वारसांना प्रस्ताव द्यावा लागतो. त्यात पंचनामा, मरणाचे कारण, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक याचा समावेश करून कृषी विभागाकडे तो सादर केला जातो. कृषी विभागाकडून पडताळणी केल्यानंतर प्रस्ताव विमा कंपनीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतो.
या योजनेत गेल्या वर्षी (२०१५-१६) औरंगाबाद जिल्ह्यातून १५७, जालना ११७ व बीड २३२ असे एकूण ५०६ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी २४१ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. विमा कंपनीने २६३ प्रस्ताव नाकारले असून दोन प्रस्तावावर निर्णय प्रलंबित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चालू वर्षात (२०१६-१७) औरंगाबाद जिल्ह्यात ६४, जालना २४ व बीड ३३ असे एकूण १२१ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी ३२ प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आले होते. त्यावर सुनावणी होऊन ९ प्रस्ताव मंजूर झाले असून एक नामंजूर झाला. उर्वरित २२ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आहे. कागदपत्राच्या पूर्ततेसाठी ८९ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

२५० प्रकरणात लाभ
औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यातून आता पर्यंत ६२७ अपघातात मृत पावलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव दोन वर्षात प्राप्त झाले असून त्यापैकी आतापर्यंत केवळ २५० शेतकऱ्यांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचआर’चा खरा अर्थ नात्यातील आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एचआरचा (ह्युमन रिसोर्सचा) खरा अर्थ नात्यातील आनंदसारखाच आहे, असे प्रतिपादन उद्योगपती ऋषी बागला यांनी केले. औरंगाबाद एचआर फोरमच्या पाचव्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्योगपती निर्लेपचे व्यवस्थापकीय संचालक राम भोगले यांचीही उपस्थिती होती.
हॉटेल ताज विवांटामध्ये ‘भविष्यातील संकटे दूर कशी करावीत’ हा विषयावर परिषद घेण्यात आली. यावेळी बागला म्हणाले, मालक म्हणजे नेमके कोण आणि त्या शब्दामागील मर्म काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एचआरचा नेमका अर्थ ‘हॅपिनेस इन रिलेशन’ म्हणजे नात्यातला आनंद असा अाहे. ग्राहक, कामगार, पुरवठादार, समाज व सरकार या पाच घटकांच्या समाधानावर व्यवसाय उभा राहतो, असे बागला यांनी सांगितले.
मॅनेजर आणि मॅनेज्ड या शब्दांच्या वापराऐवजी फक्त सहकारी हा शब्द वापरला जात असल्याने मैत्रीपूर्ण वातावरण निर्मिती होऊन संस्थेच्या विकास गतिमान होतो. उद्योगात मालकाचा वाटा असतो, पण कामगारांचा देखील भाग असतोच; हा विचार रुजवण्यासाठी एचआर सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते, असे मत राम भोगले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात एस. हरिनाथ यांच्या ‘न्यु आंत्रप्रुनरशिप’ या विषयाने झाली. या परिषदेला १६० एचआर व्यावसयिक, संस्था, कंपन्यांच्या सदस्यांची उपस्थिती होती. हर्षल शर्मा यांनी फोरमच्या उपक्रमांचे सादरीकरण केले. संस्थापक सदस्य योगेश जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उज्ज्वला जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोहन जोगदंडे, मोहन कोलते, विनीत गिराम, संजय कपाटे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेरोजगारांना फसवणारा तरूण अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आरोग्य शिबिरांच्या कामासाठी नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना फसवण्याच्या प्रयत्नातील एकाला गुन्हे शाखेने अटक केली. दिलीप मंगरुस्वा गुप्ता (वय ३२, मूळ. रा. कोकर, जि. रांची, झारखंड, सध्या रा. दिशानगरी, बीड बायपास), असे त्याचे नाव आहे. त्याने काल्डा कॉर्नर भागात गेल्या महिन्यापासून स्पर्श हेल्थ कँप नावाने ऑफीस थाटले होते. त्याने काही महिन्यापूर्वी जयपूरमध्येही २५० बेरोजगारांची फसवणूक केली असून तो राजस्थान पोलिसांना वाँटेड आहे.
काल्डा कॉर्नर भागातील स्पर्श पब्लिक हेल्थ कँपतर्फे वर्तमानपत्रात पंचायत सर्वेक्षक, तालुक्यामध्ये बीपीओ, कंपाउंडर, लॅब टेक्निशीयन पाहिजेत, अशा जाहिराती दिल्या होत्या. शिवाय कार्यालयात मॅनेजर, टेलिकॉलर, प्रोगामिंग ऑफीसर, शिपाई, सुरक्षारक्षक आदी पदे भरली होती. त्याच्याकडून दहा हजार ते तीस हजार रुपयांपर्यंतच्या नोकरीचे आमिष दाखवण्यात येत होते व नोंदणी शुल्कापोटी एक हजार रुपये घेण्यात येत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
या माहितीवरून पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक अनिल वाघ यांनी येथे गुरुवारी केलेल्या पाहणीत तथ्य आढळले. त्यानंतर स्पर्शचा संचालक दिलीप मंगरुस्वा गुप्ता याला अटक करण्यात आली. या प्रकरणी विकास जाधव (वय २७ रा. काजीवाडा) यांच्या तक्रारीवरून गुप्ता विरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कांबळे, उपनिरीक्षक वाघ, मनोज चौहान, भगवान शिलोटे, शेख हकीम, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी, अयुब पठाण, भावसिंग चव्हाण आदींनी केली.

केंद्र शासनाची बनावट पत्रके जप्त

गुप्ताच्या ताब्यातून बेरोजगारांकडून भरून घेतलेले बायोडाटा, केंद्र शासनाच्या नावाची बनावट पत्रके, बनावट नेमणूक प्रमाणपत्र, बँकांचे चेकबुक, एटीएम कार्ड, मोबाइल सिमकार्ड, हँडसेट, राजस्थान सरकारचे पत्रक, लॅपटॉप, वर्तमान पत्रातील जाहिरातींची पत्रके, आदी एक लाख १५ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले.

जयपूर येथे फसवणूक

दिलीप गुप्ता याने जुलैमध्ये जयपूर येथे स्पर्श पब्लिक हेल्पलाइन फर्म स्थापन केली होती. ही केंद्र शासनाची योजना असून ९४० कोटींचे टेंडर मिळाल्याची थाप मारत विविध पदांच्या भरतीसाठी बेरोजगारांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेऊन २५० जणांची फसवणूक केली होती. याप्रकरणी तेथील श्यामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुप्ता हा जयपूर पोलिसांना वाँटेड आहे. त्याने नाशिक येथेही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीसगाव घाटातून मंगळवारपासून वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कन्नड
औरंगाबाद-धुळे महामार्गावरील चाळीसगाव औट्रम घाटातून हलक्या वाहनांसाठी तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी घाटात दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, हा घाट सध्यातरी अवजड वाहनांसाठी बंदच राहणार आहे.
मुसळधार पावसामुळे घाटातील रस्ता २० ऑगस्ट रोजी खचला आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ताबडतोब हाती घेण्यात आले. सध्या रस्त्याच्या अर्ध्या भागाचे काम पूर्ण झाले आहे. परिणामी, मंगळवारपासून (३ ऑक्टोबर) हलक्या वाहनांसाठी येथून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. या रस्त्यावरून दुचाकी, कार, जीप आदी वाहनांना प्रवेश दिला जाईल.
सततच्या मुसळधार पावसामुळे २० ऑगष्टच्या रात्री कन्नड शहराच्या बाजूकडून तीन किलोमीटर अंतरावर दरड व पाणी कोसळून घाटरस्ता मोठ्या प्रमाणावर खचला आहे. हा प्रकार ताबडतोब लक्षात आल्याने रस्ता बंद करण्यात आला व जीवीतहानी टळली. घाटरस्ता बंद झाल्याने कन्नड शहराचा जळगाव व धुळे विभागाशी संर्पक तुटला आहे.

खचलेल्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. येत्या मंगळवारपासून चारचाकी छोट्या प्रवासी वाहनांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा तपासणी करून जड वाहतूक सुरू केली जाईल.
- महेश पाटील, व्यवस्थापक, महामार्ग प्राधीकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images