Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डीएनए फिंगरप्रिंट्स शेवटचा धागा

$
0
0
श्रुती भागवत खून प्रकरणात आरोपीचे फिंगरप्रिंट्सचे डीएनए नमुने घेण्यासाठी भागवत यांच्या घरातील साहित्य हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. दिल्ली येथील ‘एम्स’ संस्थेच्या तांत्रिक अडचणीमुळे हैदराबाद येथील संस्थेत साहित्य पाठवण्यात आल्यामुळे त्याची तपासणी करण्यास उशीर होत आहे.

अवकाळीचा पिकांना फटका

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यासह बीड, लातूरच्या परिसरात सोमवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी पहाटेपर्यंत कमी-अधिक स्वरूपात सुरूच होता. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील सहा महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून या अवकाळी पावसाने भाजीपाला आणि कापूस, ज्वारीसारख्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

लातूर जिल्ह्याला झोडपले

$
0
0
सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. मंगळवारी पहाटे तर, पावसाळ्यापेक्षाही अधिक जोमाने पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रेणापूर तालुक्यातील पानगावात १४३ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

भाड्याच्या आठ मोटारी बंद

$
0
0
सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी नियमित कामकाजाच्या पहिल्याच दिवशी प्रशासकीय शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. सिडकोने भाड्याने घेतलेल्या १८ पैकी ८ मोटारगाड्या बंद केल्या आहेत.

वक्फच्या जागा ताब्यात घेण्यासाठी मोहीम

$
0
0
वक्फ बोर्डाच्या निर्विवाद मालकीच्या जमिनींचा ताबा बोर्डाला मिळावा यासाठी महसूल, पोलिस, महापालिका आदी प्रशासकीय यंत्रणांसह वक्फ बोर्डाने तातडीने मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी सोमवारी येथे दिले.

बोर्डाचा 'गॅझेट' उपलब्ध होणार एका क्लिकवर

$
0
0
महाराष्ट्राच्या विविध भागात वक्फ बोर्डाच्या मालमत्ता आहे. अनेक ठिकाणी या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांना वक्फ बोर्डाच्या संपत्तीविषयी माहिती व्हावी यासाठी २००२ साली तयार करण्यात आलेला गॅझेटची सर्व माहिती ऑनलाइन करण्यात येणार आहे.

‘क्राइम डेटा’मुळे मंगळसूत्रचोर पोलिसांच्या ताब्यात

$
0
0
एन ४ भागातून महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरील दोन आरोपींनी मंगळवारी रात्री पळवले होते. गुन्हा केल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याने दुचाकी चालविणाऱ्या आरोपीने दुचाकी सोडून पलायन केले.

जनतेची २४ तास सेवा करा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथ समित्यांच्या माध्यमातून युवकांनी चोवीस तास जनतेची सेवा करण्याचे काम करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

जालन्याच्या वीज उपकेंद्राला अडथळा

$
0
0
भूमि अभिलेख कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे जालना येथील नवीन ३३ केव्ही वीज उपकेंद्रांचे बांधकाम थांबले आहे. दीड महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर, अडीच कोटी रुपयांचे हे उपकेंद्र रद्द होण्याची शक्यता आहे.

वर्षभरात संपणार प्रतीक्षा

$
0
0
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून शासकीय दंत महाविद्यालयाच्या परिसरात हॉस्टेल असावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. कित्येक वर्ष सरकार दरबारी मागणी करून अखेरीस त्यास मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे सरकारच्या अपेक्षेपेक्षा फास्ट या हॉस्टेलचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे केलेली प्रतीक्षा आता वर्षभरात संपणार आहे.

घटना बिहारमधील पळापळ औरंगाबादेत

$
0
0
औरंगाबाद शहरात मंगळवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची अफवा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच पोलिसांपर्यंत आली. बायजीपुरा परिसरात हा प्रकार घडल्याचेही सांगण्यात आले.

उड्डाणपुलाविरोधात एल्गार

$
0
0
मोढा नाका येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या विरोधात येथील व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळला. मोंढा नाका चौकात झालेल्या तीव्र निदर्शनात झालेल्या व्यापाऱ्यांनी पुलाला तीव्र विरोध केला आहे.

रस्ता निधीचा प्रश्न विधानसभेत

$
0
0
इंधन विक्रीतून महापालिका क्षेत्रातून जमा केला जाणाऱ्या निधीतून शहराच्या विकासासाठी निधी देण्यात यावा, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात कलम १०५ प्रमाणे चर्चा करून, निधी शहराच्या विकासासाठी वळवून आणण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रदीप जैस्वाल यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

रस्तेप्रश्नी पेट्रोलपंपचालक आक्रमक

$
0
0
औरंगाबाद महानगरपालिकेत रस्त्याच्या विकासाच्या नावाखाली पेट्रोल डिजेलवर वाढीव कर आकारणी केल्यामुळे, शहरातील इंधनाची विक्री घटली. शहरवासीयांकडून व्हॅट वसूल करूनही राज्य सरकार रस्त्याच्या विकासासाठी, महापालिकेला निधी देत नसल्याच्या विरोधात तसेच, अन्य मागण्यांसाठी औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनतर्फे बुधवारी बंद पुकारण्यात आले.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६.५ कोटींचे अनुदान

$
0
0
बिलोली परिसरातील शेतकऱ्यांना सुमारे साडेसहा कोटींची आर्थिक मदत राज्य सरकारने मंजूर केली. ही मदत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी प्रयत्न केले होते.

९० शाळकरी मुलांना चुंबळीत विषबाधा

$
0
0
बीड जिल्ह्यातील चुंबळी येथील दोन शाळेतील मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात जेवण केल्यानंतर हा प्रकार घडला.

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

$
0
0
शासकीय आधारभूत किंमत १३१० रुपये प्रति क्विंटल असताना शासकीय खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला मका खासगी व्यापाऱ्यांकडे ८५० ते १००० रुपये प्रतिक्विंटलला विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

उसतोड मजुरांच्या मुलांची अडचण

$
0
0
बीड जिल्ह्यातून दरवर्षी लाखो मजूर ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. त्यांच्या बरोबर त्यांचे कुटुंब ही सहा महिन्यासाठी गाव सोडून जातात. या स्थलांतरामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शिक्षण खंडीत होऊ नये म्हणून या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी दरवर्षी जिल्ह्यात वसतिगृह चालवले जातात. यावर्षी वीस हजारहून अधिक ऊसतोड मजुरांची मुलांचे स्थलांतर रोखण्यात आले आहे.

‘उर्दू माध्यमांच्या शिक्षकांवर अन्याय’

$
0
0
जिल्हा परिषदेतील उर्दू माध्यमांच्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप उर्दू शिक्षक संघटनेने केला आहे. यासंदर्भात संघटनेने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे, की उर्दू शिक्षक संघटनेने वारंवार निवेदने दिली. चर्चा केली तरीही उर्दू माध्यमांच्या अनेक समस्या अद्यापही सोडविण्यात आलेल्या नाहीत.

वाळूपट्ट्यात राज्यमंत्र्यांचा हस्तक्षेप?

$
0
0
परवानगीपेक्षा अधिक अकरा हजार ब्रास वाळूचे अवैध उत्खनन करून साठा केल्याप्रकरणी गुत्तेदारास जिल्हाधिकाऱ्यांनी साडेआठ कोटी रुपयांचा दंड केला होता. हा दंड रद्द करून त्या गुत्तेदाराला जप्त केलेला वाळू साठा उचलण्याचे आदेश महसूल राज्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images