Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पेरणी झाली; आता आभाळाकडे डोळे

0
0
सिल्लोड तालुक्यात मृग नक्षत्रात पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. शेतकऱ्यांनी सर्वच वाणाच्या लागवडीला पसंती दिली असून तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

परभणी महापालिका आयुक्तांच्या चौकशीचे आदेश

0
0
परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तांची कार्यपद्धती; तसेच त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सहाय्यक उपायुक्त यांची नियुक्ती करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही आरोपांची चौकशी करावी, असे आदेश देण्यात आले होते.

कपाशीचे भवितव्य सिंचनावर अवलंबून

0
0
पैठण तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. आतापर्यंत केवळ पाच ते सात टक्के पेरणी झाली आहे.

तलाठ्यांच्या कार्यालयाचे भाडे वाढविणार

0
0
अत्यंत कमी भाड्यात कार्यालय सुरू करण्याची कसरत करणाऱ्या तलाठ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कार्यालयाच्या भाड्याच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

काम वाटप समितीची बंदोबस्ताविना बैठक

0
0
लॉटरी पद्धतीने तसेच, स्थानिक संस्थांना प्राधान्य देत सिंचन विभागाच्या सुमारे ८० कामाचे वाटप जिल्ह्यातील विविध मजूर सहकारी संस्थांना बुधवारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्याप्रमाणे यंदा बैठकीसाठी पोलिस बंदोबस्त बोलविण्यात आला नव्हता.

हवामानानुसार पीक पद्धती गरजेची

0
0
बीड जिल्ह्यातील पारंपरिक पीक उत्पादन इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असून ते वाढविण्यासाठी त्यामध्ये असलेल्या त्रुटी काढून योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचे मत औरंगाबाद विभागाचे कृषी पालक संचालक पी.एन. पोकळे यांनी व्यक्त केले. प्रत्येक विभागानुसार हवामान बदलते.

सिद्धार्थ तलाव बंदच, पंधरा लाखांचे नुकसान

0
0
पाण्याचे लिकेज काढण्यासाठी बंद केलेला महापालिकेचा सिद्धार्थ जलतरण तलाव गेल्या चार महिन्यांपासून बंदच आहे. ऐन हंगामात जलतरण तलाव बंद राहिल्याने सुमारे १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

औरंगाबादच्या काही भागांत पाऊस

0
0
शहराच्या काही भागात गुरुवारी दुपारी चार वाजता मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. सरस्वती भुवन शाळेच्या अलिकडे पाऊस पडत असताना औरंगपुऱ्याकडील भागात नागरिकांनी वादळी वारे अनुभवले.

अचानक काम ‘बंद’ आंदोलन

0
0
सर्वशिक्षा अभियानांतर्गत मुदतवाढ न मिळाल्यामुळे चाळीस कर्मचाऱ्यांनी गुरूवारी अचानक काम बंद केले. त्यामुळे पुस्तकांच्या वाटपाचे काम ठप्प झाले. अखेर आयुक्तांनी या प्रकरणात मध्यस्थी केली व मुदतवाढीचे पत्र संबंधितांना देण्याची तयारी दर्शवली.

पाच ग्रामपंचायतींची तपासणी

0
0
गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव, गणेशवाडी, बोलेगाव, खडकनारळा, जोगेश्वरी या संत गाडगेबाबा अभियानात सहभाग घेतलेल्या पाच ग्रामपंचायतींची मंठा पंचायत समितीच्या तालुकास्तरीय तपासणी समितीने बुधवारी तपासणी केली.

FDAची कारवाई; चौघे दगावले

0
0
अन्न व औषध प्रशासनाच्या जुलमी व बेकायदा कारवायांमुळे चार औषध व्यापाऱ्यांचा हृदयविकाराने अंत झाला, असा आरोप ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अॅन्ड ड्रगिस्ट्स असोसिएशन’चे सचिव अनिल नावंदर यांनी केला आहे.

आ. सत्तार यांना MIMचे आव्हान

0
0
‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेसाठी एकत्र असून त्यांनी मुस्लिमांसाठी काहीच केले नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांना आव्हान देणार आहोत.

जादू ‘बाबा चमत्कार’ची!

0
0
‘वीस वर्षांत सिनेमाचे तंत्रज्ञान बदलले; पण लक्षवेधी भूमिकेतील सक्षमता कायम असल्याने ‘झपाटलेला २’मधील ‘बाबा चमत्कार’ रसिकांना पुन्हा आवडला आहे. ही माझ्यासाठी मोठी पोचपावती आहे’ असे मत ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी व्यक्त केले.

पाच महिन्यांत २३ खून

0
0
शहरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांमुळे मरण झाले स्वस्त, असे म्हणण्याची वेळ आली आहे. संवेदनशील असलेल्या औरंगाबाद शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस दल कसोशीने प्रयत्न करत आहे.

पक्की पावती घेऊनच बियाणे खरेदी करावे

0
0
औरंगाबाद जिल्ह्यासाठी ७५१६२० पाकिटांची गरज आहे. प्रत्यक्षात दहा जूनपर्यंत २१३७५४० पाकिटे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये, कारण सर्व वाण समतूल्य आहेत; शिवाय फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना परवानाधारक विक्रेत्यांकडून पक्की पावती घेऊनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी सभापती विजया निकम चिकटगावकर यांनी केले.

मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांनाच घ्या प्रवेश

0
0
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना मान्यताप्राप्त संस्थांनाच प्रवेश घ्या, ज्यांना विविध सक्षम प्राधिकरण व राज्य सरकारची मान्यता नसेल, अशा ‌संस्था, विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे 'डीटीई'ने स्पष्ट केले आहे.

आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने तीन वर्षे सक्तमजुरी

0
0
आत्महत्येला कारणीभूत ठरल्यावरून एकाला कोर्टाने तीन वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. श्रीरंग भीमराव चिकटे (वय ५०) यांनी दोन वर्षांपूर्वी आरोपी रमेश नारायण इंगळे (रा. टाऊन हॉल, जयभीमनगर) याच्या मेहुणीला दहा हजार रुपये उसने दिले होते.

तोट्यातील बाजार समित्यांचे विलिनीकरण किंवा बंद

0
0
कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आहेत. बाजार समित्या फायद्यात येणार नाहीत, त्या बंद किंवा विलिनीकरण केल्या जातील, असा इशारा कृषिमंत्री राधाकृष्म विखे पाटील यांनी संचालक मंडळांना दिला आहे. समितीचे सचिव यापुढे बदलीसाठी पात्र ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाळूजमध्ये कामगाराला सहका-यांची मारहाण

0
0
कंपनीत कामाला येऊ नये म्हणून सहकारी कामगाराला दोघांनी मारहाण केल्याची घटना वाळूज एमआयडीसी भागात गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीटूने दिला प्रशासनाला एका महिन्याचा अल्टिमेटम

0
0
कंत्राटी पद्धत रद्द करा, यासह कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी शुक्रवारी सीटू संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मागण्यांबाबत येत्या एक महिन्याच्या आता सकारात्मक विचार करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images