Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेल्वे कर्मचाऱ्यांना हायपर टेन्‍शन, शुगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे कर्मचाऱ्यांवर सतत कामाचा ताण वाढल्याने त्याच्यामध्ये आजारही वाढत चालले आहेत. हक्काची सुट्टी न मिळणे, सतत कामाचा दबाव असणे यामुळे ट्रॅफिक सेक्‍शनच्या विभागातील कर्मचाऱ्यांना हायपर टेन्‍शन आणि शुगरसह अन्य आजाराने ग्रासले असल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर काही दिवसांपूर्वी रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या तपासणी कार्यक्रमात २७ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वाहतूक विभाग सोडून अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना छोटे मोठे आजार वगळता अन्य कोणतेही मोठे आजार सापडलेले नाहीत. मात्र वाहतूक विभागात काम करणाऱ्या गनमॅनपासून स्‍थानकप्रमुख पदाचे काम करणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये आजारपणाची लक्षणे वाढली आहेत.
या तपासणी कार्यक्रमात लाइनवर काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कमी वयात हायपर टेन्‍शन आणि शुगर होण्याच्या मार्गावर असल्याचे चिन्हे दिसत आहे. याशिवाय काही कर्मचाऱ्यांना या आजाराने ग्रासले असल्याचीही माहिती समोर आली आहे. उच्च दाबाचे त्रास वाढल्याने काही कर्मचाऱ्यांना हा त्रास वाढल्याने एखादा अपघात होण्याची शक्यताही वैद्यकीय विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे.

आजारपणाची कारणे

सतत ड्युटी, सुटीच्या दिवशी काम, अपघाताची सतत भीती, अपघातानंतर कारवाईची भीती, चार्जशिट दिल्याने दबाव, कुटुंबाला पुरेसा वेळ न देणे, व्यायामाकडे दुर्लक्ष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीईटी’ची ‘वेबसाइट हँग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण सेवक पदासाठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पहिल्याच दिवशी बंद पडली. वेबसाइट वारंवार हँग होत होती; तसेच प्राथमिक व उच्चप्राथमिक या स्तरांचा वेगवेगळा उल्लेख नसल्याने अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. सुमारे आठ वर्षांनंतर प्रथमच शिक्षण सेवक भरतीसाठी प्रक्रिया होत आहे.

शासनाने शिक्षण सेवक पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना दोन नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया www.mahapariksha.gov.in या वेबसाइटवर करावी लागणार आहे. सुमारे आठ वर्षांच्या प्रतीक्षेत ही भरती होत असल्याने राज्यातील लाखो डीटीएड, बीएडधारकांनी प्रक्रियेसाठी गर्दी केली, परंतु पहिल्या दिवशी वेबसाइट हँग झाली. त्यामुळे एक अर्ज भरण्यास तासभरापेक्षा अधिक काळ लागत होता. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. शुल्क भरण्याच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर ही प्रक्रिया बंद पडत होती., काहीवेळा ‘यू आर लॉगड् इन यूजर’ असा मेसेज येत होता. त्यामुळे अर्ज भरणेही अनेकांना शक्य झाले नाही.

प्राथमिक, उच्च प्राथमिकस्तर एकत्र
शिक्षकांची परीक्षा प्राथमिक, उच्च प्राथमिक अशा दोन वेगवेगळ्या स्तरांवर होणार आहे, परंतु वेबसाइटवर अर्ज भरताना सर्व स्तर एकच येत होते. त्यामुळे कोणत्या स्तरातून अर्ज भरायचा, हे निश्चित करताना अडचणी येत होत्या. यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषद, शिक्षण विभागाचे सचिव यांना दूरध्वनी करून तांत्रिक अडचणींचा पाढा वाचला. त्यानंतरही सायंकाळपर्यंत वेबसाइट दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.

परीक्षा अशी होणार
ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षा जिल्ह्यांच्या मुख्यालयी होणार आहे. एका दिवसात, तीन सत्रांत ऑनलाइन पद्धतीने ही ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. १२ ते २१ डिसेंबर यादरम्यान ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

पात्रतेत ‘टीईटी’चा समावेश
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) उल्लेख करण्यात आला नव्हता. यावर राज्यातील टीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. राज्यात डीटीएड, बीएडधारकांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ५८ हजार २४४ हजार एवढी आहे. परीक्षा परिषदेने ‘टीईटी’ची अर्हता असल्याचे पसिद्धीपत्रक काढत स्पष्ट केले.

प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्जाची मुगत ः २२ नोव्हेंबरपर्यंत
- हॉल तिकीट मिळणार ः एक ते ११ डिसेंबर
- ऑनलाइन परीक्षा ः १२ ते २१ डिसेंबर

‘सीईटी’कडे राज्यातील लाखो बेरोजगारांचे लक्ष लागलेले आहे. गुरुवारी, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया केली, पण वेबसाइट हँग असल्याने वेळ लागत होता. तांत्रिक अडचणींबाबत औरंगाबादसह राज्यभरातून विद्यार्थ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. प्रक्रिया सुरळीत करण्याचे आश्वासनही आम्हाला देण्यात आले.
- सचिन चौधरी, ‘डीटीएड’ उत्तीर्ण विद्यार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विक्रेत्यांचे दुकान बंद आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेले गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावेत, यांसह अन्य मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्हा कृषी साहित्य वितरक संघटनेने दुकान बंद आंदोलन सुरू केले.

यवतमाळ जिल्ह्यात पिकावर चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक, औषध फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकरी, शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू झाले. अनेक शेतकरी, मजूर बाधित आहेत. या दुर्दैवी घटनेबद्दल संघटनेला तीव्र दुख आहे, पण या सर्व प्रकाराला केवळ कृषी विक्रेतेचे दोषी आहे, असा प्रचार होत आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जबाबदार धरून कृषी खाते पोलिस कारवाई करत आहे. विक्री परवाने रद्द करणे, विक्री बंद आदेश देणे अशी गंभीर कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकारामुळे व्यवसाय करणे अवघड झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संघटनेने गुरुवारपासून चार दिवसांचे दुकान बंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात तहसीलदार; तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांना मागण्याचे निवेदन सादर केले. संघटनेचे पदाधिकारी जगन्नाथ काळे, राकेश सोनी, कल्याण उकिरडे आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या
- चुकीच्या पद्धतीने दाखल गुन्हे मागे घ्या
- निलंबित करण्यात आलेले विक्री परवाने पूर्ववत देण्यात यावे
- ऑनलाइन परवान्यात समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत व परवान्यामध्ये कीटकनाशकाचे उगम प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी
- विक्रेत्याकडील बियाणे, कीटकनाशके व खते यांचा हस्तलिखित रजिस्टरऐवजी संगणकीय पद्धतीने नोंदविण्यात आलेला साठा ग्राह्य धरावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेश बेदमुथा जालन्यात; मुकीम देशमुख औरंगाबादेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांची जालना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागेवर चंद्रपूर जिल्हा परिषदेतील ए. एम. सिरसे यांची बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर जालना जिल्हा ग्रामीण संस्थेचे प्रकल्प संचालक मुकीम देशमुख यांची औरंगाबादेत प्रकल्प संचालक म्हणून बदली केली आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा यांनी दलित वस्ती सुधार योजनेत सुधार करण्याचा; तसेच सिंचनच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या दीड महिन्यापासून ते रजेवर होते. त्यांचा अतिरिक्त पदभार उपमुख्य कार्यकारी वासुदेव सोळंके यांच्याकडे होता. अखेर बेदमुथा यांची यांची जालना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी बदली झाली. गेल्या सव्वा वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालकपदावर मुकीम देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.

जालन्याहून येत असलेले मुकीम देशमुख यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेत ही चौथी नियुक्ती आहे. याआधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. दरम्यान, औरंगाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ यांची फुलंब्री पंचायत समितीत, तर फुलंब्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांची औरंगाबाद पंचायत समितीत गट विकास अधिकारी बदली झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा स्वीकृत सदस्याची निवड न करण्याचे निर्देश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
परभणी महापालिकेत शुक्रवारी होत असलेल्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठीच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नामनिर्देशीत सदस्याच्या नियुक्तीविषयी अंतिम निर्णय न घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. मंगेश पाटील यांनी दिला.
पालिकेची गेल्या मे महिन्यात निवडणूक झाली. त्यानंतर संबंधित राजकीय पक्षांनी महसूल आयुक्तांकडे गटाची नोंदणी केली. पक्षीय बलाबलानुसार नामनिर्देशीत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी संबंधित गटनेत्यांकडून प्रस्ताव दाखल करणे अभिप्रेत आहे. त्यानुसार भाजप गटातर्फे तत्कालीन गटनेते मोकिंद खिल्लारे यांनी दिलीपसिंह ठाकूर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करावी यासाठी पालिका आयुक्तांकडे १२ जून रोजी प्रस्ताव पाठविला होता. पण परभणी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठविले व मधुकर गव्हाणे यांचे नाव नामनिर्देशीत नगरसेवक पदासाठी सुचविले. १५ जून रोजी पहिली सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी पालिका आयुक्तांनी याविषयी पुढील सभेत निर्णय घेण्याची भूमिका घेतली. आता ३ नोव्हेंबर रोजी(शुक्रवार) सभा घेण्याचे ठरवल्यावर ३० ऑक्टोबर रोजी आयुक्तांनी नामनिर्देशीत सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव दाखल करण्याची सूचना केली. त्या नाराजीने दिलीपसिंह ठाकूर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. पालिका आयुक्तांची भूमिका विसंगत असल्याचे म्हणणे मांडण्यात आले. खंडपीठाने प्रकरणात ८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली. तोपर्यंत भाजप नामनिर्देशीत सदस्याच्या नियुक्तीविषयी अंतिम निर्णय न घेण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्याची बाजू महेश देशमुख यांनी मांडली. या प्रकरणात सरकारी वकील एस. बी. जोशी यांनी तर आयुक्तांतर्फे सत्यजीत बोरा हे काम पाहत आहेत .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई संघांचे निर्विवाद वर्चस्व

$
0
0

मुंबई संघांचे निर्विवाद वर्चस्व
औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीची यशस्वी कामगिरी
राज्य शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबईच्या जिम्नॅस्टनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. पुणे व नाशिकच्या खेळाडूंनीही लक्षवेधक कामगिरी बजावली.
विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. मुंबई संघाने १४ वर्षे, १७ वर्षे आणि १९ वर्षे अशा तीनही गटांत सांघिक विजेतपद पटकाविले. आदित्य फडणीस, मानस मानकवळे, सोहम नाईक, पूर्वा किरवे, आदी खामकर यांनी वैयक्तिक गटात अजिंक्यपद निश्चित केले.
अंतिम निकाल ः १७ वर्षे वयोगट - मुले : सांघिक अजिंक्यपद - १. मुंबई (३०९.४ गुण), २. पुणे (२३६.३५), ३. नाशिक (२१५.५), ४. अमरावती (१५०.१), ५. औरंगाबाद (११५.५), ६. नागपूर (१०८.५). वैयक्तिक अजिंक्यपद - १. आदित्य फडणीस (६३.९ गुण, मुंबई), २. मनीष गाढवे (६२.६५, मुंबई), ३. हिमांशू म्हांत्रे (मुंबई), ४. हर्ष धुमाळे (क्रीडा प्रबोधिनी), ५. कबीर मुरूणकर (नाशिक), ६. युवराज लवंड (मुंबई), ७. चैतन्य देशमुख (मुंबई), ८. श्रेयस मंडलिक (मुंबई), ९. आदित्य प्रजापती (पुणे), १०. इशान खार्या (नाशिक). मुली : सांघिक अजिंक्यपद - १. मुंबई (१८२), २. औरंगाबाद (१५४.१५), ३. नाशिक (१११.३५), ४. पुणे (११०.३५). वैयक्तिक अजिंक्यपद - १. पूर्वा किरवे (मुंबई), २. इशिता रिवाळे (मुंबई), ३. रिद्धी हत्तेकर (औरंगाबाद), ४. सिद्धी हत्तेकर (औरंगाबाद), ५. मयुरी आयर (मुंबई), ६. सलोनी वाडके (मुंबई), ७. ऐश्वर्या बेलदार (क्रीडा प्रबोधिनी), ८. रिया सावंत (मुंबई), ९. रिची भंडारी (औरंगाबाद), १०. सान्या केळकर (पुणे).
१४ वर्षे वयोगट : मुले सांघिक विजेतेपद ः १. मुंबई (३१८.५ गुण), २. पुणे (२९१.५५), ३. नाशिक (२३४.४५), ४. अमरावती (१९६.४), ५. औरंगाबाद (१८३.५५), ६. नागपूर (१४७.७). वैयक्तिक अजिंक्यपद - १. मानस मानकवळे (मुंबई), २. निशांत करंदीकर (मुंबई), ३. सार्थक राऊळ (मुंबई), ४. आयुश खामकर (मुंबई), ५. सौम्यजित डे (पुणे), ६. सुमित ढाली (पुणे), ७. आर्यन डावांडे (मुंबई), ८. पार्थ घुगरे (मुंबई), ९. प्रसात सांगळे (नाशिक), १०. अर्जुन चव्हाण (पुणे). मुली : सांघिक विजेतेपद ः १. मुंबई (२०९.७ गुण), २. पुणे (९६.३), ३. नाशिक (६२.५), ४. नागपूर (६२.१), ५. अमरावती (४४.९), ६. औरंगाबाद (४४). वैयक्तिक विजेतेपद - १. सोहम नाईक (मुंबई), २. गरिमा शर्मा (मुंबई), ३. सलोनी दादरकर (मुंबई), ४. ऋचा देवळे (मुंबई), ५. राजूल घोडके (मुंबई), ६. अनिशा पाटील (मुंबई), ७. मनस्वी जामजरे (क्रीडा प्रबोधिनी), ८. तन्वी कुलकर्णी (पुणे), ९. अनुष्का नन्नावरे (पुणे), १०. मृणाल वासडीकर (क्रीडा प्रबोधिनी).
१९ वर्षे वयोगट मुली : सांघिक विजेतेपद - १. मुंबई (१८२,३ गुण), २. पुणे (१५३.७), ३. नाशिक (१२६.३५), ४. औरंगाबाद (४४.४५). वैयक्तिक विजेतेपद - १. आदी खामकर (मुंबई), २. मुक्ता जोशी (पुणे), ३. वैदेही देऊळकर (मुंबई), ४. रमा साने (पुणे), ५. मृण्मयी जोशी (मुंबई), ६. प्रियांका भावसार (नाशिक), ७. साधिका सावंत (नाशिक), ८. साक्षी पिंपळे (मुंबई), ९. अरुषा गावरी (पुणे), १०. ज्युली प्रभू (मुंबई).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘एटीएम’ ठकसेनांची टोळी जेरबंद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातील लोकांना एटीएम कार्डची अदलाबदल करून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ७० एटीएम कार्ड जप्त केले आहेत. यातील मुख्य आरोपी शैलेद्र सिंग हा सातवी पास असून, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अटक केलेल्यांमध्ये शैलेंद्र सिंह घिसाराम (रा. सुलतानपुरी, दिल्ली), राजेश सतवीरसिंह (रा. सुलेमान नगर, दिल्ली), विनोंद सिंह गजेसिंग (रा. लोहारी हिस्सार, हरियाणा), पालाराम गजेसिंग (रा. लोहारी, हरियाणा) यांचा समावेश असून, दोन जण फरार आहेत.

वैजापूर भागातील रंगनाथ मस्के हे वैजापूर येथे भारतीय स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये नऊ सप्टेंबर रोजी पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएम मशीनमधून कार्ड स्वॅप करूनही पैसे निघत नव्हते. त्यामुळे मागेच उभ्या असलेल्या एका भामट्याने मदतीचा बहाणा करून त्यांचे कार्ड स्वॅप करून दिले. त्यानंतर मस्के यांना पिन क्रमांक टाकण्यास सांगितले. दरम्यान भामट्याने मस्के यांचे एसबीआयचे एटीएमकार्ड स्वत:कडे ठेवत हुबेहुब दुसरे एटीएम कार्ड त्यांच्या हाती टेकवले. या वळेत मस्के यांनी एंटर केलेला एटीएमचा पिन क्रमांक भामट्याने हेरून घेतला. यानंतर तो पसार झाला. दुसऱ्या दिवशी मस्के यांना खात्यातून ७७ हजार काढल्याचा संदेश आला. त्यावेळी एटीएमकार्ड तपासले असता ते आपले नसल्याचे लक्षात आले व भामट्याने कार्डची अदलाबदल करून पैसे लांबवल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मस्के यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे हा तपास देण्यात आला. सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग तसेच त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या टोळीचा शोध घेतला. यातील आरोपींना मध्यप्रदेश येथून अटक केली.

५० लाखांच्या वर...
या प्रकरणात महाराष्ट्रासह छत्तीसगढ, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथेही अशा प्रकारचे गुन्हे या टोळीने केल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीने पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम सर्वसामान्यांच्या एटीएममधून लंपास केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

...अशी फसवणूक
ग्रामीण भागात एटीएमवर आलेल्या ग्राहकांच्या पाठीमागे उभे राहून त्यांचा पिन क्रमांक ओळखण्याचा प्रयत्न या टोळीतील सदस्य करित असत. एटीएम वापरत येत नसल्याने मदत करण्यासाठी यातील एक सदस्य पुढे येऊन त्यांचे एटीएम टाकून त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करायचा. एटीएम चालत नसल्याचे कारण दाखवून ग्राहकाला एटीएम परत करून दयायचा. एटीएम परत करित असताना एटीएम कार्डची अदलाबदल केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेघना मेहताचा जामीन फेटाळला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तीन भागीदारांना २७ कोटी १३ लाखांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात मेघना समीर मेहता हिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी फेटाळला.

सिडकोतील विजय मदनलाल अग्रवाल यांच्यासह कमलकिशोर तायल व गोपाल अग्रवाल यांच्या मालकीची हिरापूरमधील पाच एकर जमीन विकसित करून त्यावर गृह प्रकल्प उभारण्यासंदर्भात आर. के. कॉन्स्ट्रोचा बिल्डर समीर मेहता व मेघना मेहता यांनी करारनामा केला होता. या गृह प्रकल्पातील ४७२ फ्लॅटची विक्री करुन त्याने भागिदारांना २७ कोटी १३ लाखांना गंडा घातला होता. हिरापूरच्या गट क्रमांक ३० मधील गृहप्रकल्पाच्या एन व एम या इमारतींची विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. इमारतींमधील काही फ्लॅटस त्याने ग्राहकांना विकले. या ग्राहकांनी बँकेकडून कर्ज घेऊन मेहताला फ्लॅटसच्या किंमतीनुसार रक्कमही अदा केली. मात्र सदरील ग्राहकांचे पैसे ठरलेल्या बँकेत जमा केले नसल्याचे प्रकरण उघड झाले आहे. यामुळे फिर्यादींनी सदर प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात बिल्डर समीर मेहता व मेघना समीर मेहता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रकरणात मेघना मेहता फरार असून तिने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, तो कोर्टाने फेटाळला. प्रकरणात सरकरी पक्षास अ‍ॅड. एम. बी. पाटणी व अ‍ॅड. दीपक पडवळे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पगारिया यांना खंडणी मागणाऱ्यास बेड्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उद्योजक राहुल पगारिया यांना पत्र पाठवून सात लाखांची खंडणी मागणाऱ्या एका रिक्षाचालकाला गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या दिवशी १९ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी रिक्षा चालकाने अदालत रोडवरील पगारिया अॅटो शो रूमच्या सुरक्षा रक्षकाकडे एक लिफाफा दिला. या लिफाफ्यामधील पत्रातून सात लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास कुटुंबातील सदस्यांच्या जीवावर बेतेल, अशी धमकी देण्यात आली होती. पोलिसांमध्ये तक्रार केल्यासही ठार मारू, असा इशारा देण्यात आला होता. हिंदीत असलेल्या या पत्रामुळे राहुल पगारिया यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना भेटून याबाबत माहिती दिली. खंडणीचा गुन्हा असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे दिला. आधी रिक्षा चालकाच्या वर्णनावरून व सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित इसमाचा शोध घेतला. मुकुंदवाडी अंबिकानगर येथे शेख चांद शेख अहमद या रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. त्याने ही चिठ्ठी आपण दिल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक काचमांडे हे करित आहेत.

दुसरी घटना
पगारिया यांना खंडणी मागण्याची ही शहरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी जिन्सी येथे कप्तान पेन्टस दुकानाच्या मालकाकडे खंडणीसाठी त्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुजा, सुदीप्ता, यशराज उपांत्य फेरीत

$
0
0

ऋतुजा, सुदिप्ता, यशराज उपांत्य फेरीत
राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्राच्या ऋतुजा चाफळकर व तेलंगणाच्या आदिती तारे यांनी राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत गुरुवारी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत धडक मारली.
विभागीय क्रीडा संकुलातील एन्ड्युरन्स टेनिस सेंटरमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गटात ऋतुजा चाफळकरने द्वितीय मानांकित सृजना रायाराळाचा ६-३, ७-६ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आदिती तारेने उत्तर प्रदेशच्या पंधराव्या मानांकित पूर्वी भटविरुद्ध ३-६, ७-५, ७-५ असा संघर्षपूर्ण विजय साकारला. अव्वल मानांकित सुदिप्ता कुमारने सहाव्या मानांकित रेनी सिंगलाचा ६-४, ७-६ असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित संजना सिरीमल्लाने दहाव्या मानांकित आदिती नारायणवर ६-२, ७-६ अशी मात केली.
मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित यशराज दळवीने अनिरुद्ध कृष्णाचे आव्हान ४-६, ६-०, ६-२ असे संपुष्टात आणले. अव्वल मानांकित क्रिशन हुडाने सातव्या मानांकित धन्या शहाला ६-२, ६-२ असे पराभूत केले. द्वितीय मानांकित उदित गोगाईने नवव्या मानांकित अर्जुन गोहाडवर ६-३, ६-३ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. अमन दहियाने चिराग दुहानला ६-३, ६-१ असे नमवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गुजरातचा चित्तथरारक विजय

$
0
0

गुजरातचा चित्तथरारक विजय
बडोदा संघाची महाराष्ट्रावर मात
लोगो - महिला क्रिकेट स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पश्चिम विभागीय १९ वर्षांखालील महिला वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरुवारी गुजरात संघाने सौराष्ट्र संघाचा चुरशीच्या लढतीत चार धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र संघास बडोदा संघाकडून १०४ धावांनी पराभव पत्करावा लागला.
एमजीएम क्रीडा संकुलावर झालेल्या सामन्यात गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकांत सर्वबाद १११ धावा काढल्या. गुजरातची सलामीची फलंदाज इस्तिसा पटेलने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. तथापि, गुजरातच्या इतर फलंदाजांना वैयक्तिक २५ धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. गुजरातचे चार फलंदाज शून्यावरच बाद झाले. ४३ अवांतर धावांमुळे त्यांना शतकी टप्पा पार करता आला. सौराष्ट्राकडून एस. जेठवाने ३, तर टी. धारानीने २ विकेट्स घेतल्या.
सौराष्ट्र संघासमोर विजयासाठी ११२ धावांचे आव्हान होते. सौराष्ट्र संघाच्या १ बाद १०० धावा झाल्या असताना ते सहज विजय मिळवतील, असे वाटत होते. मात्र, अवघ्या ७ धावांमध्ये नऊ फलंदाज लागोपाठ बाद झाल्याने सौराष्ट्राचा डाव १०७ धावांवर संपुष्टात आला. परिणामी, त्यांना चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सौराष्ट्राच्या मकवाना (२८) व तान्या राव (२८) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. त्यांचे पाच फलंदाज धावांचे खातेही उघडू शकले नाहीत. गुजरातच्या पी. ए. तळपदाने ८ धावांत चार विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. ए. एन. पटेलने ३ विकेट्स घेतल्या.
एडीसीए मैदानावर झालेल्या सामन्यात बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २ बाद २६४ धावा केल्या. बडोद्याची सलामीची फलंदाज वाय. एच. भाटियाने १५६ चेंडूंत १३१ धावांची खेळी केली. राधा यादवने ७६ चेंडूंत नाबाद ९१ धावा फटाकावल्या. भाटिया व यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी रचली. प्रत्युत्तरादाखल, महाराष्ट्राच्या डावाची सुरुवात खराब झाली. सोनवणे एक धाव करून बाद झाली. प्रियांका घोडकेने सर्वाधिक ५१ धावा काढल्या. ए. ए. गायकवाड (२६) वगळता अन्य फलंदाज २५ धावांच्या आतच बाद झाल्या. त्यामुळे महाराष्ट्राला १०४ धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. चार्मीने ३२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. मोहितेने ३, तर रिद्धी मौर्याने २ विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक ः १) बडोदा - ५० षटकांत २ बाद २६४ (यस्तिका भाटिया १३१, राधा यादव नाबाद ९१, अमृता जोसेफ १६, प्रग्या रावत नाबाद १२, ए. ए. गायकवाड १-४५, एन. एस. भोर १-४६) विजयी विरुद्ध महाराष्ट्र संघ - ४८.५ षटकांत सर्वबाद १६० (प्रियांका घोडके ५१, ए. ए. गायकवाड २६, एच. ए. देशमुख १७, एन. एस. भोर १६, आय. एम. पाठारे १४, चार्मी ४-३२, मोहिते ३-४३, रिद्धी मौर्या २-३१, राधा यादव १-१५).
२) गुजरात संघ - ४३ षटकांत सर्वबाद १११ (इस्तिसा पटेल ३०, एच. के. पटेल १५, अवांतर ४३, साक्षी जेठवा ३-२७, टी. धारानी २-१०, हिराल राठोड १-२१, सुजन सामा १-१२) विजयी विरुद्ध सौराष्ट्र संघ - ४८.१ षटकांत सर्वबाद १०७ (जान्हवी मकवाना २८, तान्या राव २८, मेघना जमबुचा १६, अंजली पटेल ३-२८, पिनल तळपदा ४-८, मुस्कान वासावा १-७, एच. के. पटेल १-१३).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कचनेर यात्रेसाठी एसटीकडून 'जादा' बस

$
0
0

कचनेर यात्रेसाठी एसटीकडून 'जादा' बस
औरंगाबाद ः श्री पार्श्वनाथ यात्रा कचनेर यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको, शहागंज, मध्यवर्ती बसस्थानकासह पैठण येथूनही जवळपास ७० जादा बस कचनेरला सोडल्या जाणार आहेत.
शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानकातून आगार एक व दोनच्या प्रत्येकी तीन बस आठ व नऊ वाजता सुटणार आहेत. यात्रेच्या दिवशी शनिवारी (चार नोव्हेंबर) सकाळी ६.३० औरंगपुरा, शहागंज, मध्यवर्ती बसस्थानक, टी.व्ही. सेंटर, सिडको बसस्थानक येथून जादा बस सोडल्या जाणार आहेत. यात शहागंज येथून दहा बस, औरंगपुरा ते कचनेर दोन बस, सीबीएस ते टीव्ही सेंटरमार्गे कचनेर आठ बस आणि सीबीएस वरून बाबा पेट्रोलपंपमार्गे कचनेरसाठी १५ बस अशा एकूण ३५ बस सिडको आगाराकडून सोडल्या जाणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून बाबा पेट्रोलपंप मार्गे कचनेरला दहा बस सुटणार आहेत. यासह पैठण येथून दोन बस ढोरकीन मार्गे तर गंगापूर येथून सीबीएस-बाबा पेट्रोलपंप मार्गे तीन बस कचनेरकडे धावतील. रवीवारी यात्रेच्या परतीच्या प्रवासासाठी दोन्ही आगाराच्या प्रत्येकी दोन बस कचनेर येथे मुक्कामी थांबतील. तसेच प्रवाशांची गर्दी बघून आणखी जादा बस परतीच्या प्रवासासाठी सोडल्या जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी दुकानांचे परवाने रद्द करू नकाः बागडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
‘एकाही कृषी दुकानाचा परवाना रद्द करून नये, परवाना निलंबनाची मुदत कमी करावी,’ असे आदेश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

जाचक अटी व गुन्हेगारी वागणुकीच्या निषेधार्थ गुरुवारपासून तालुक्यातील ३५० कृषी दुकाने तीन दिवस बंद आहेत. यासर्वांनी आज पंचायत समिती सभागृहात बैठक घेऊन बागडे यांना निमंत्रित केले होते. यावेळी दुकानदारांनी होणारा त्रास व वागणूक याबाबतच्या व्यथा मांडल्या.

औषधी, खते, बियाणे यांचे नमुने कृषी अधिकारी घेतात. त्याचे बिलही घेतले जाते, मात्र हे अधिकारी एकही पैसा देत नाहीत. प्रत्येक औषधी कंपनीचे उगम प्रमाणपत्र मागितले जाते. असे प्रमाणपत्र संबंधित कंपनीने आम्हाला दिले पाहिजे. जी कंपनी उगम पत्र देत नाही त्या कंपनीवर शासनाने कारवाई करावी. जेवढ्या औषधींचा परवाना आहे तेच औषध विक्री करावे असे सांगितले जाते, मात्र दिवसेंदिवस नव्या कंपन्या निघतात. तीच औषधे शेतकरी मागतात. यासाठी कंपनीने सर्व परवाने घ्यावे याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वच दुकानदार गुन्हेगार असल्याची वागणूक मिळत आहे. ज्या कंपनीच्या औषधामुळे या घटना घडल्या त्या कंपनीस जबाबदार धरून कारवाई करा, अशी मागणी औषध विक्रेत्यांनी केली.

यावर बागडे म्हणाले, ‘कुठले औषध बाजारात आले किंवा येणार आहेत याची यादी कृषी कार्यालयाने तयार करून दुकानदारापर्यंत पोचवावी. यात जो काही दोष असेल त्या कंपनीवर कारवाई करावी. दुकानदारांना विनाकारण त्रास देऊ नये. निलंबनाची मुदत कमी करावी. १९६८च्या कायद्यात बदल करण्याची शिफारस मी करतो. छोट्या कारणावरून परवाने रद्द करू नये,’ असे आदेश बागडे यांनी जिल्हा कृषी अधिकारी अनंत गंजेवार यांना दिले.

यावेळी सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, शिवाजीराव पाथ्रीकर, पंचायत समिती सदस्य नाथा काकडे, यांच्यासह तालुका फर्टिलायझर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुदाम जाधव, उपाध्यक्ष सोमिनाथ म्हस्के, सचिव बबन जाधव, राजेंद्र साहुजी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरडधान्य केंद्राचा नमनाला भ्रमनिरास

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कन्नड
‘ऑनलाइन नोंदणीशिवाय भरड धान्य केंद्रावर शेती माल खरेदी करता येणार नाही. सरकारचा हा निर्णय म्हणजे भ्रमनिरास आहे,’ अशी टीका शुक्रवारी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली. ते कन्नड येथे शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ झाल्यानंतर बोलत होते.

शेतकऱ्यांना खरिपाच्या मका, बाजरी व ज्वारी पिकांना खरेदी आधारभूत किमंत मिळावी, खासगी व्यापाऱ्याकडून लूट थांबावी यासाठी महसूलचा पुरवठा विभाग, बाजार समिती व खरेदी, विक्री संघाकडून औरंगाबाद महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील गोदामामध्ये भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे जाधव यांनी उदघाटन केले. यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी सी. डी. खाडे यांनी भरड धान्य विक्रीसाठी आणण्या अगोदर केंद्रावर ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. त्याशिवाय माल खरेदी करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. सरकारच्या या धोरणावर उदघाटनानंतर जाधव यांनी टीका केली. सरकारचा हा निर्णय भ्रमनिरास करणारा आहे. ऑनलाइनसाठी संबंधित यंत्रनेने स्थानिक पातळीवर ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रास्ताविक के. बी. काळे यांनी केले. आभार तहसीलदार महेश सुधळकर यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषद सभापती धनराज बेडवाल, पुरवठा अधिकारी जी. एम. आयलनवार, पंचायत समिती सभापती मीनाबाई मोकासे, बाजार समिती सभापती राजेंद्र मगर आदींची उपस्थिती होती.

ऑनलाइन भरडधान्य विकण्यासाठी यंदाचा पीक पेरा असलेला सात-बारा, आधार कार्ड, बँकेचा खाते क्रमांक आवश्यक आहे. या नोंदणीसाठी खरेदी -विक्रीच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर संबंधीत अॅप डाऊनलोड करून जागेवरच ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे.

ऑनलाइन भरडधान्य खरेदी करण्याचा निर्णय भ्रमनिरास करणारा आहे. यामुळे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांचीच कोंडी होणार आहे. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. - हर्षवर्धन जाधव, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत ‘स्ट्रोक’वर उपचारासाठी प्रयत्न

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ब्रेन स्ट्रोक म्हणजेच पक्षाघाताचा झटका आलेल्या रुग्णांना पहिल्या तीन तासांत विशिष्ट प्रकारच्या इंजेक्शनसह तातडीचे उपचार झाले तर संबंधित रुग्ण पूर्वपदावर येऊ शकतो आणि या अत्याधुनिक उपचार पद्धतीचा लाभ अनेक व्यक्तींना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मिळत आहे. हीच अत्याधुनिक सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

‘स्ट्रोक’वरील उपचार घाटीमध्ये उपलब्ध करण्याच्या हेतुने गुरुवारी (३ नोव्हेंबर) चाचपणी करण्यात आली. या संदर्भात घाटीत सेवा देणारे मानद मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर यांनी औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्यासह इतर प्राध्यापक व निवासी डॉक्टरांशी चर्चा केली व असे उपचार घाटीमध्ये होऊ शकतात का, याविषयी चाचपणी करण्यात आली. असे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले तर नेमके कोण-कोणते उपचार तातडीने करणे गरजेचे आहे, नेमक्या कोण-कोणत्या तपासण्या-चाचण्या तातडीने करणे गरजेचे आहे व या चाचण्या किती वेळेत होणे गरजेचे आहे, तसेच पक्षाघाताच्या झटक्यावर अतिशय उपयुक्त असल्याचे सिद्ध झालेले ‘टीपीए-अल्टेप्लेझ’ हे खास इंजेक्शन देण्यासाठी संबंधित रुग्ण पात्र आहे का, संबंधित रुग्णाचा रक्तदाब व इतर वैद्यकीय परिमाणे अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित आहेत का आदींचा प्रोटोकॉल व प्राधान्यक्रम कसा हवा, याविषयी डॉ. कांजाळकर यांनी मार्गदर्शन केले.

कमी किमतीत उपचाराचा प्रयत्न
पक्षाघाताच्या झटक्यावरील ‘टीपीए-अल्टेप्लेझ’ या इंजेक्शनची खासगीतील किंमत ५० हजारांपर्यंत आहे. मात्र हे इंजेक्शन ‘डीएमईआर’च्या दर करारावर (रेट कॉन्ट्रॅक्ट) उपलब्ध असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ३५ ते ४५ हजारांपर्यंत उपलब्ध होऊ शकते. अर्थात, संबंधित रुग्ण ही किंमत देऊ शकतो का व हे इंजेक्शन रुग्णालयात २४ तास उपलब्ध केल्यानंतर ‘एक्स्पायर’ झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची आदी प्रश्न उपस्थित होत असले तरी, अलीकडे तरुणांमध्येही वाढत असलेल्या ‘स्ट्रोक’च्या पार्श्वभूमीवर यासंबंधी ठोस निर्णय घेतला जाणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

‘स्ट्रोक’वरील इंजेक्शन व उपचार घाटीमध्ये ‘मेडिसिन’अंतर्गत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. – डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी

‘स्ट्रोक’वरील उपचार ‘मेडिसिन’चे डॉक्टर करू शकतात. त्याशिवाय आता घाटीमध्ये मेंदूविकारतज्ज्ञ उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हे उपचार सुरू करणे शक्य आहे. – डॉ. मकरंद कांजाळकर, मानद मेंदूविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदगीरच्या विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या उदगीर येथील सुनील बालाजी बिरादार (वय २६) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी घडलेली ही घटना शुक्रवारी सकाळी सुनीलचे वडील बालाजी बिरादार यांना अमेरिकेतून फोन आल्यावर कळाली.

सुनीलच्या वडीलांची उदगीर तालुक्यात हैबतपूर येथे शेती आहे. वडीलांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असून मुलांच्या शिक्षणासाठी ते उदगीर येथील शेतकी निवासजवळ घर करून राहतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. सुनील मेकॅनिकल इंजिनीअर असून त्यांने पुण्यातील सिंहगड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. आठवीपर्यंतचे शिक्षण लाल बहादूर शाळा उदगीर तर बारावीपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथून घेतले होते. ५ ऑगस्ट रोजी तो भारतातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. तीनच महिन्यात ही दुर्देवी घटना घडली.

सुनीलशी शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) शेवटचे बोलणे झाले होते. तो त्याच्या मित्रांमुळे तणावामध्ये होता, तसे त्याने बोलून दाखवले होते. मी त्याला परत भारतात बोलावले होते, असे मृत सुनीलचे वडील बालाजी बिरादार यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावाकडील नागरिकांने त्याच्या घरी गर्दी केली होती. सुनीलचा मृतदेह भारतात आणण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रताप शिवशिवे यांच्यासह नागरिकांनी पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन घटना सांगितली. त्यांनी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयात फोन करून घटनेची माहिती देऊन कुटूंबीयांना सुनीलचा मृतदेह भारतात आणण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याचे रेल्वेप्रश्न अर्थसंकल्पात मार्गी लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे विभागाकडून यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यातील विविध मागण्यांचा समावेश करावा, अशी मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीने केली आहे.
राज्याची पर्यटन राजधानी औरंगाबादला रेल्वे बोर्डाकडून कायम दुय्यम वागणूक दिली जाते. तो दूर करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची मागणी करण्यात आली आहे. रोटेगाव ते कोपरगाव नवीन रेल्वेमार्गासाठी १५०० कोटी, औरंगाबाद-दौलताबाद-कन्नड-चाळीसगांव हा ८८ किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, मनमाड-मालेगाव-धुळे-इंदुर हा मार्ग लवकर पूर्ण करावा, औरंगाबाद चिकलठाणा पिटलाइनचे काम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करावे, आठवड्यातून एकदा धावणाऱ्या रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात, सर्व पर्यटन व धार्मिक स्थळे रेल्वेमार्गाने जोडली जावीत, औरंगाबाद-नागपूर सर्वोदय एक्स्प्रेस सुरू करावी, नांदेड-मुंबई रेल्वे प्रत्यक्षात सुरू करावी आदी मागण्यांचा अर्थसंकल्पात समावेश करावा, अशी मागणी समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी निवेदनाव्दारे केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांना दिले आहे.
इतर प्रश्नासंबधी विधीमंडळात आवाज उठविणारे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी रेल्वेबद्दल गप्प बसतात, अशी खंत यात व्यक्त केली आहे. त्यामुळे उपोषण, निवेदनाच्या मार्गाने रेल्वेप्रश्नांची जाणीव पंतप्रधान, मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री यांना करून देणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर अभियंत्यांची ‘भूमिगत’साठी वकिली

$
0
0

शहर अभियंत्यांची ‘भूमिगत’साठी वकिली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
ऑडिट रिपोर्टचे ‘मेमो रिडिंग’ झालेले नाही. रिपोर्टमधील अनेक मुद्दे गैरलागू आहेत, असे म्हणत ऑडिट रिपोर्ट तेवढा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे संकेत देणाऱ्या महापालिकेच्या शहर अभियंत्यांवर नगरसेवकांनी ‘भूमिगत’ च्या कामाची वकिली करता का, असा आरोप केला. या योजनेच्या कामातील अनियमिततेबद्दल मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांना सविस्तर माहिती देऊन चौकशी करायला भाग पाडू, असा इशाराच नगरसेवकांनी दिला.
महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीला आयुक्त डी. एम. मुगळीकर उपस्थित होते. भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी भूमिगत गटार योजनेचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘या योजनेच्या कामातील अनियमिततेबद्दल स्थायी समितीच्या गेल्या आठ ते दहा बैठकांपासून आम्ही पुराव्यासह बोलत आहोत. या योजनेवरील खर्चाचे ऑडिट देखील करण्यात आले. ऑडिटमध्ये २५ प्रकारचे आक्षेप घेण्यात आले आहेत. सर्वच आक्षेप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. अनियमिततेला जबाबदार धरून सभापती गजानन बारवाल यांनी भूमिगत गटार योजनेचे नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी यांना निलंबित करण्याची व पीएमसीला ब्लॅकलिस्ट करण्याची शिफारस केली होती. सभापतींच्या शिफारसीवर आयुक्तांनी काय कारवाई केली याचा खुलासा झाला पाहिजे. शिवसेनेचे रेणुकादास (राजू) वैद्य म्हणाले, ‘या योजनेचे काम सुरू झाल्यापासून चार - पाच वर्षांत अनेक अनियमितता नगरसेवकांनी, माध्यमांनी उघड केल्या. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठवले. सभापतींनी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची व पीएमसीला ब्लॅकलिस्ट करण्याची शिफारस केली. यावर पालिकेच्या प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते, पण वेळकाढूपणा केला जात आहे.’ भ्रष्टाचाराला पाठिशी घालू नका, असा इशारा वैद्य यांनी दिला.
सभापतींनी आयुक्त डी. एम. मुगळीकरांना खुलासा करण्यास सांगितले. मुगळीकर म्हणाले, ‘संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला होता. त्यांनी मुदत वाढवून मागितली. मुदत वाढवून दिल्यावर काल गुरुवारी अधिकाऱ्यांची उत्तरे प्राप्त झाली. उत्तरे विस्तृत असल्यामुळे ती नीट वाचावी लागतील, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.’ आयुक्तांचे निवेदन संपल्यावर शहर अभियंता सखाराम पानझडे बोलण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, ‘अंतरिम लेखा परीक्षण सभागृहात मांडण्यापूर्वी त्याचे मेमो रिडिंग (आयुक्त व विभागप्रमुखांच्या समोर ऑडिट रिपोर्टचे वाचन) होणे गरजेचे होते. ऑडिट रिपोर्टमधील अनेक पॅरे गैरलागू आहेत. पानझडे यांच्या या विधानामुळे राजू वैद्य संतापले. ते म्हणाले, ‘ऑडिटमधील पॅरे गैरलागू आहेत, असे तुम्ही म्हणता, मग भूमिगत गटार योजनेच्या कामात वेळोवेळी बदल करण्यात आले, त्याला राज्य व केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली नाही, सहा एसटीपीचे चार एसटीपी करण्यात आले त्यालाही शासनाची परवानगी नाही, विशिष्ट प्रकारचे पाइप वापरायचे ठरलेले असताना ते परस्पर बदलण्यात आले, या गंभीर बाबी नाहीत का? ‘भूमिगत’ ची वकिली करू, नका असा इशारा त्यांनी दिला. ‘भूमिगत’च्या एकूणच कामाबद्दल आपण मुख्यमंत्री, पालकमंत्री व विरोधीपक्षनेत्याला माहिती देणार असून या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करायला भाग पाडू, असे राजू वैद्य म्हणाले.
महापौरांचे स्वागत
स्थायी समितीच्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी भेट दिली. सभापती गजानन बारवाल यांनी त्यांचे स्वागत केले. घोडेले यांनीही बारवाल यांचे स्वागत केले. यावेळी आयुक्त देखील उपस्थित होते. घोडेलेंच्या सोबत आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला आले, त्याचा उल्लेख करून राजू वैद्य म्हणाले, स्थायी समितीच्या बैठकीला आयुक्तांना घेऊन आलात त्यामुळे आपले विशेष स्वागत आम्ही करीत आहोत. वैद्य यांच्या या विधानामुळे सभागृहात हस्याचे फवारे उडाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतीचौकातील ध्वजस्तंभ ठरणार शहराची शान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेंगाळलेली कामे, तसेच काला चबुतऱ्यावरून झालेल्या वादानंतर अखेर क्रांती चौकात शहराची शान ठरणारा २०० फूट उंच ध्वजस्तंभ उभा राहिला आहे. मात्र या परिसराची सुरक्षा, तिचे पावित्र्य राखण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनाचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबई येथील राजभवनात असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे औरंगाबादमध्येही ध्वजस्तंभ असावा, अशी सूचना राज्यपाल विद्यासागर राव यांनी केली होती. त्यानुसार ध्वजस्तंभासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने शहरातील विविध जागांची पाहणी करून क्रांती चौकातील झांशीची राणी उद्यानाच्या आवारात ध्वजस्तंभ उभारणे व उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शहरातील उद्योजकांच्या सीएसआर फंडामधून निधी उभारण्यात आला आहे. क्रांती चौक परिसरात एक एकर १० गुंठे जागेवर २०० उंच फूट स्तंभ उभारण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाई तिरंग्याच्या सौंदर्यात भर टाकणार आहे. उद्यानात झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, आवश्यक मंजुरीनंतर स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. क्रांती चौकात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या उद्यानाकडे आतापर्यंत मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे येथे भर दिवसा मद्यपींचा ठिय्या होता. सूर्य मावळताच या भागात चायनीज व इतर खाद्य पदार्थाच्या हातगाड्या लावण्यात येत होत्या. आता ध्वजस्तंभ उभारण्यात आल्यामुळे परिसराला झळाळी प्राप्त झाली आहे.

अतिक्रमण हटवण्याचे आव्हान

स्मरणीय ध्वजस्तंभाच्या उद्‍घाटनानंतर ध्वजस्तंभ तसेच उद्यानाच्या देखभाल व सुरक्षेचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर राहणार आहे. ध्वजस्तंभाचे काम सुरू असतानाही परिसराला चायनीज व इतर खाद्य पदार्थ विक्रेत्यांचा वेढा होता. ध्वजस्तंभाचे पावित्र्य, परिसराचे सौंदर्य कायम राखले तरच खऱ्या अर्थाने ध्वजस्तंभ शहराची शान ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमएस बॉडी’ बस पत्र्यामुळे रखडली

$
0
0

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘एमएस बॉडी’ची (लोखंडी) पहिली बस पुण्याच्या दापोडी येथे तयार करण्यात आली. या बसच्या बांधणीनंतर तीन महिन्यांपूर्वी चिकलठाणा येथे एमएस बॉडीची बस तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले, पण ते पूर्ण झालेले नाही. पत्र्याचा पुरवठा न झाल्याने ही बस बांधणी रखडल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

राज्यभरातील एसटी महामंडळाच्या कार्यशाळांत गेल्या दोन वर्षांपासून नवीन बस बांधणी बंद करण्यात आली आहे. चेसीसची खरेदी करण्यात आली नसल्याने ही बांधणी बंद आहे. यामुळे या बसच्या जागी आता जुन्या बसची फेरनिर्मिती करण्याचे काम राज्यातील तिन्ही कार्यशाळेत केले जात आहे. चिकलठाणा कार्यशाळेतही अशीच कामे कामगारांकडून करून घेतली जात आहेत.

पुण्याच्या संशोधन विभागाने एमएस बॉडीची बस तयार केली होती. ही बस जुन्या बसपेक्षा अधिक चांगली आहे. त्यातील एक बस सिडकोला देण्यात आली. या बसमध्ये हुटर, फायर अलार्म, इन्टेरिअर यांशिवाय अन्य सुविधा आहेत. या बसप्रमाणे नव्या बसच्या निर्मितीचे काम चिकलठाणा कार्यशाळेत सुरू करण्यात आले. या बसच्या चेसीसवर इंजीन फिटिंगचे काम पूर्ण झालेले आहे, मात्र आतापर्यंत एमएस बॉडीच्या बससाठी लागणारा पत्र्यांचा पुरवठा महामंडळाकडून करण्यात आलेला नाही. याशिवाय या बसमध्ये फायबर लावण्यात येणार आहे. या विशेष डिझाइन असलेल्या फायबर शीटचा पुरवठाही अद्याप करण्यात आलेला नाही. यामुळे एमएस बॉडीच्या बसची बांधणी रखडलेली आहे.

ही आहे अडचण
एमएस बॉडीची बस बांधण्यासाठी आवश्यक असलेली साधन सामग्री खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. एकच बस बांधणी करायची असल्याने साहित्य पुरवठ्याला वेळ लागत आहे. शिवाय नवीन कंत्राट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अाणखी काही दिवस लागणार आहेत. दरम्यान, एमएस बॉडीच्या बससाठी ८० टक्के साहित्यांचा पुरवठा झाला असल्याची माहिती कार्यशाळेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images