Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डॉ. श्रीहरी लहाने यांना दिलासा

$
0
0
अवैध गर्भलिंगनिदान, गर्भपात व अन्य गुन्ह्याखाली बीड सेशन कोर्टात डॉ. श्रीहरी लहाने यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यांचे नाव सर्व गुन्ह्यातून वगळण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. अभय ठिपसे यांनी दिले आहेत.

लोटू पाटलांच्या साहित्याचा शोध सुरू

$
0
0
दिवंगत रंगकर्मी लोटू पाटील यांचे साहित्य नाट्यशास्त्र विभागातून गहाळ झाल्याबाबत पाटील यांचे नातू मंगेश काळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यात औरंगाबादेत येऊन कुलगुरुंकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कचरा समस्या कायम

$
0
0
खासगीकरणाच्या तुलनेत शहरातील साफसफाईचा खर्च तिपटीने वाढला असला तरी, कचऱ्याची समस्या मात्र, कायमच आहे. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सरकार म्हणते लॉटरी जीवनावश्यक

$
0
0
जुगार म्हणून खेळल्या जाणाऱ्या लॉटरीला शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकले असून लॉटरीला एलबीटी (स्थानिक संस्था कर) सूट दिली आहे. ५९ जीवनावश्यक वस्तूंना एलबीटीमधून सूट दिल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या संबंधीचा अध्यादेश शासनाने १० सप्टेबर रोजी काढला आहे.

रब्बी हंगामासाठी पाणी सोडणार

$
0
0
नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून रब्बी हंगामासाठी वैजापूर व गंगापूर या तालुक्यांसाठी येत्या दहा डिसेंबरपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यांसाठी रब्बी हंगामासाठी दोन व उन्हाळ्यासाठी एक अशी तीन आवर्तनाचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

झेडपी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवा

$
0
0
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. ग्राम विकासमंत्री जयंत पाटील यांना समितीच्या वतीने नुकतेच औरंगाबादेत निवेदन देण्यात आले.

सिडकोच्या समस्यांबाबत शेतक-यांचे साकडे

$
0
0
मुकुंदवाडी, मूर्तिजापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या होत्या. यासंदर्भात निर्मल भवन, सिडको मुंबई येथे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी बैठक आयोजित केली होती.

ऊस गाळप शेवटच्या टप्प्यात

$
0
0
उसाचे कमी क्षेत्र आणि शेजारील जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून उसाची पळवापळवी सुरू असल्यामुळे ऊस गाळप जानेवारी महिन्यातच आटोपणार आहे. सध्या जिल्ह्यात एक सहकारी साखर कारखाना आणि तीन खासगी साखर कारखाने सुरू आहेत.

सलग दुस-या दिवशी ठिय्या आंदोलन

$
0
0
वसतिगृहात प्रवेश मिळावा, या मागणीसाठी टाहो फोडणाऱ्या आदिवासी समाजातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींना सलग दुसऱ्या दिवशीही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे.

पुढील आठवड्यात पुन्हा ढगाळ वातावरण

$
0
0
‘बंगालचा उपसागर व हिंद महासागराच्या दरम्यान नवीन चक्रीवादळा निर्माण होण्यासारखी परिस्थिती दिसत आहे. या घडामोडींमुळे येत्या आठवड्यात वातावरण पुन्हा एकदा ढगाळ होईल,’ असे निरीक्षण नांदेड येथील एमजीएम अंतराळ संशोधन संस्थेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी नोंदवले आहे.

३.५ वर्षांनंतर थांबला रिकाम्या फे-यांचा भुर्दंड

$
0
0
औरंगाबाद ते पुणे या मार्गावर धावणाऱ्या निमआराम बसचे नियोजन आणि वाहतुकीचे व्यवस्थापन सिडको आगाराकडून पुन्हा मध्यवर्ती बस स्थानक आगाराकडे वर्ग केले जाणार आहे. त्यामुळे दरदिवशी सिडको ते सीबीएस असा रिकाम्या धावणाऱ्या बसमुळे होणारे नुकसानही थांबणार आहे.

‘NPA’चे निकष लघु उद्योगांना मारक

$
0
0
‘रिझर्व्ह बँकेने ‘एनपीए’च्या मुदतीचा निकष ९० दिवसांवरून १८० दिवस करावा. त्यामुळे मंदीच्या फेऱ्यात सापडलेल्या लघू व सुक्ष्म उद्योगांना साह्य होईल,’ अशी सूचना ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केली आहे.

सोमवारी ६ तासांचा लाइन ब्लॉक

$
0
0
पेरगाव ते देऊळगाव दरम्यान भुयारी रेल्वे मार्गाच्या कामासाठी सहा तासांचा रेल्वे लाइन ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्याचा परिणाम सहा रेल्वेंच्या वेळापत्रकावर होणार असून, त्यामुळे प्रवाशांची अडचण होण्याचा अंदाज आहे.

ENGG च्या प्रश्नपत्रिकांचा प्रवासही ‘ऑनलाइन’

$
0
0
परीक्षेतील गैरप्रकार, गोंधळ रोखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कामकाजात तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरावर भर देत आहे. यात प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविण्यास सुरुवात केली असून, उद्यापासून सुरू होणा-या इंजिनीअरिंग परीक्षेतही हा प्रयोग केला जात आहे.

‘DMIC’चा फायदा आयात-निर्यातीला होणार

$
0
0
‘दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’मध्ये (डीएमआयसी) औरंगाबादचा समावेश आहे. परिणामी, त्याचा थेट फायदा आयात-निर्यातीला मिळणार आहे, असे प्रतिपादन ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन’चे (फिर्इओ) उपाध्यक्ष अमित गोयल यांनी केले.

पालिकेच्या कृपेने कच-याचा ‘सडा’

$
0
0
कोर्टाने ठरवून दिलेले निकष न पाळता पालिकेतर्फे कचरा लिफ्टिंगचे काम केले जात आहे. लिफ्टिंगसाठी वापरले जाणारे टिप्पर्स दर्जाहीन असून, अप्रशिक्षित मजूरांच्या माध्यमातून कचरा उचलून तो लिफ्ट केला जातो.

‘बोर्डा’चे सर्व्हर डाउन

$
0
0
बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यात शिक्षण मंडळाचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना कॉलेजांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. विद्यार्थ्यांची संख्या अधिक व सर्व्हर डाऊन यामुळे गोंधळ उडाला आहे.

बिनपरवानगी अंबरदिवे RTO बासनात बांधणार

$
0
0
अंबरदिवा लावण्याची परवानगी नसलेल्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी वाहनात बदल करून घ्यावा, असे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी काढले आहेत.

‘टीआरपी’ महत्त्वाचा

$
0
0
आजकाल ‘कामा’पेक्षा ‘टीआरपी’चा खेळ मालिका, वाहिनी व कलाकारांसाठी महत्त्वाचा आहे. त्यानुसारच काम करावेच लागते, असे मत अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने मांडले.

आठ रस्ते व्हाइट टॉपिंगचे

$
0
0
पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख आठ रस्ते व्हाइट टॉपिंगचे केले जाणार आहेत. या रस्त्यांना सिमेंटच्या रस्त्यांसारखाच दर्जा असणार असून दरवर्षी देखभाल दुरूस्तीचे काम करावे लागणार नाही, अशी माहिती महापौर कला ओझा यांनी आज शुक्रवारी पत्रकारांना दिली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images