Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पगार मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। परभणी

गेल्या पाच महिन्यांपासून पगार मिळत नसल्याचे कारण सांगत जिंतूर तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुमित्रा संवडकर असे या महिलेचे नाव असून ती बोर्डी गावची रहिवाशी आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून आपल्याला पगार मिळत नाही, अशात सरकार आपल्याकडे रजिस्टर मागते. झेरॉक्ससाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी आत्महत्या करत आहे असा उल्लेख सुमित्रा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेखही या चिठ्ठीत करण्यात आला आहे.

खूप मोर्चे काढले. अंगणवाडी मदतनीस म्हणून मी दिवसरात्र कष्टही घेतले. पण आज काही सुचतच नाही असे म्हणत, सरकार मागत आहे ते २००८ पासूनचे रजिस्टर कुठून द्यायचे? असा प्रश्न संवडकर यांनी चिठ्ठीत उपस्थित केला आहे.

आपण मंदिरात अंगणवाडी भरवल्याचेही त्यांनी लिहिले आहे. याचे सरकारने कौतुक केले पाहिजे. आपण ५ वर्षे कशी अंगणवाडी चालवली याच्याशी सरकारला काहीही देणेघेणे नाही. रजिस्टरसाठी १००० रुपये लागतात. माझ्याकडे एक रुपयाही नाही असेही सुमित्रा यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरपालिकेचा भूखंड विक्री व्यवहार रद्द करा

$
0
0

तुळजापूर नगरपालिकेचा भूखंड
विक्रीचा व्यवहार रद्द करण्याचे आदेश
म. टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
तुळजापूर नगर पालिकेने संस्थेसोबत भूखंड विक्री करण्याचा केलेला व्यवहार रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिला. या आदेशामुळे याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली.
तुळजापूर नगरपालिकेने १९८५ मध्ये शहरामध्ये इलगरदेल याती या संस्थेस धर्मशाळा बांधण्यासाठी ४९ आर भूखंड विकला होता. त्यानंतर या संस्थेने साता बारावर संस्थेच्या नावाची नोंदणी व्हावी यासाठी अर्ज केला. दरम्यान, संस्थेचे नाव सातबारा लावण्यात येत नसल्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.
या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली असता खंडपीठाने महसूल विभागास नाव नोंदणी संदर्भात संस्थेचे आणि तुळजापूर पालिकेचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घ्यावा. उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली असता नगरपालिकेने केलेला विक्री केल्याचा व्यवहार चुकीचा आहे, भूखंड विक्री करण्यासाठी नगरपालिकेने राज्य शासनाची परवानगी घेणे बंधनकारक असताना देखील संस्थेस परस्पर भूखंड विकल्यामुळे तो व्यवहार रद्द करण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकाऱ्याच्या समितीने दिला. समितीच्या या निर्णयाला पुन्हा संस्थेने खंडपीठात आव्हान दिले. याचिकाकर्त्याची बाजू अनंत पाटील यांनी मांडली. सरकारच्या वतीने अतुल काळे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ऑल ऑऊट ऑपरेशनमध्ये नशेखोर टार्गेट

$
0
0

ऑल ऑऊट ऑपरेशनमध्ये नशेखोर टार्गेट

पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी घेतला निर्णय

म. टा. प्र‌तिनिधी, औरंगाबाद ः

शहरात विविध ठिकाणी विशेष औषधींच्या नशेसोबत अन्य पदार्थांचीही नशा वाढत चालली आहे. मादक पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी पोलिस विभागाकडून ‘विशेष ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्याचा निर्णय पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी घेतला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

व्हाइटनर, मेफड्रोन, कफ सीरपसह अन्य पदार्थांद्वारे शहरातील अनेकजण नशेच्या आहारी जात आहेत. यात युवकांची संख्या अधिक आहे. याशिवाय पोलिस आयुक्तांकडे आलेल्या तक्रारीत जिन्सी, एमआयडीसी वाळूज, सिडको, बेगमपुरा तसेच अन्य पोलिस ठाण्यांच्या परिसरात अशा पदार्थांची विक्री होत असल्याची माहितीही मिळाली आहे. तत्कालीन आयुक्त अमितेश कुमार यांच्या काळात मेडिसीनद्वारे नशा करण्याच्या काही घटनांत कारवाई झाली होती. त्या प्रकरणात संबंधित औषध विक्रेत्यांनाही पोलिस आयुक्तालयाकडून ताकीद देण्यात आली होती.

अशी प्रकरणे हाताळताना, विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सहज उपलब्‍ध असलेल्या मादक द्रव्यांच्या आहारी जाणाऱ्या युवकांना मोठे शारीरिक नुकसानी होते. यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरच ‘ऑल आऊट ऑपरेशन’ सुरू करण्यात येणार आहे. या ऑपरेशनमध्ये महाविद्यालये, संशयित भागात अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तसेच असे मादक पदार्थ घेणाऱ्या युवकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले आहेत.

असेही आले समोर प्रकरण

धडधाकट शरीरयष्टी आणि चांगले वक्तृत्व असलेला एक तरुण एका घटनेत एका पोलिस ठाण्यात आला होता. तो पोलिसांना तपासकार्यात चांगले सहकार्य करीत होता. पोलिसांच्या मात्र, दोन ते तीन तासानंतर त्याचे हात थरथर कापू लागले. त्याला चकरा येऊ लागल्या व त्याची प्रकृती एकदम बिघडली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तो मादक द्रव्यांच्या आहारी गेल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली व या प्रकरणी पावले उचलण्यास सुरुवात झाली.

रेल्वे स्टेशनवर व्हॉइटनर गँग

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर काही महिन्यांपूर्वी एका मुलाची हत्या झाली होती. या हत्येचा तपास सुरू झाल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या आसपास राहणाऱ्या काही मुलांना व्हॉइटनरच्या नशेची सवय असल्याची माहिती समोर आली होती. या हत्येच्या प्रकरणात त्या व्हॉइटनर गँगच्या सदस्यांचीही चौकशी लोहमार्ग पोलिसांनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणात्मक लिखाणाला प्राधान्य द्याः कुलगुरू डॉ. चोपडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘दर्जेदार लेखन जगातील सर्व लोकांपर्यंत पोहचते. त्यामुळे गुणात्मक लिखाणाला प्राधान्य द्या. दर्जेदार लिखाण तुम्हाला जागतिक पातळीवर घेऊन जाईल’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. विद्यापीठात आयोजित लेखक कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्र आणि स्प्रिंगर नेचर यांच्या वतीने लेखक कार्यशाळा घेण्यात आली. सिफार्ट सभागृहात मंगळवारी कार्यशाळा झाली. यावेळी मंचावर स्प्रिंगर नेचरचे व्यवस्थापक रघू कुटप्पन, मार्गदर्शक डॉ. गितीका सरीन आणि ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धर्मराज वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेचे उदघाटन केल्यानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी संशोधकांशी संवाद साधला. ‘आपण सोने खरेदी करताना शुद्धता तपासतो. त्यानुसार प्रत्येक संशोधक व शिक्षकाने दर्जेदार व जागतिक दर्जाचे लेखन करावे. प्रकाशनातून ज्ञान निर्मिती व ज्ञान निर्मितीतून समाज निर्मिती होते. म्हणून ज्ञान निर्मितीची प्रक्रिया महत्त्वाची आहे’ असे चोपडे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धर्मराज वीर यांनी केले. चक्रधर कोटी यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रा. सतीश पद्मे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत २०० संशोधक सहभागी झाले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी गजानन खिस्ते, अनिल खरतडे, सचिन गाडेकर, योगेश सुरवाडे, मंगल करतोड, कविता तुपे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडेचा जामीन फेटाळला

$
0
0

दीड कोटींची फसवणूक;

मांडेचा जामीन फेटाळला
एकच फ्लॅटची तिघांना केली विक्री
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात तोच फ्लॅट तीन जणांना विक्री करून सुमारे दीड कोटींची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपी व बिल्डर तसेच ‘प्रसन्न कन्स्ट्रक्शन’चा मालक प्रफुल्ल मधुकरराव मांडे याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी फेटाळला. पोलिस कोठडीनंतर बिल्डर मांडे हा न्यायालयीन कोठडीअंतर्गत हर्सूल कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी तपासानंतर पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपी मांडे याने कोर्टात दुसऱ्यांदा नियमीत जामीन अर्ज दाखल केला होता. यापूर्वी कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. दुसऱ्या अर्जाच्या सुनावणीवेळी, आरोपीविरोधात ठोस पुरावा आहे व त्याला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली. तसेच आर्थिक गुन्हे व आरोपीविषयी सुप्रिम कोर्टातील विविध खटल्यातील संदर्भदेखील सुनावणीवेळी देण्यात आले. हा युक्तिवाद मान्य करुन कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. सहाय्यक सरकारी वकील अवसरमोल यांना अ‍ॅड. योगेश सोमाणी यांनी सहकार्य केले.
असे आहे प्रकरण
समर्थनगरातील दीपक इंद्रराव पवार यांच्या वडिलांनी आरोपीकडून उदय कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावरील फ्लॅट ६१ लाखांत खरेदी करण्याचे ठरविले होते. त्यासाठी आरोपी मांडे याला १० व १५ लाखांचे दोन धनादेश देण्यात आले होते. मात्र फ्लॅट देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रार देण्यात आली होती व क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात मांडे याला पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी महिन्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहे. प्रति मिनिट ३० व ४० शब्द या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमासाठी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून त्यांच्या संगणक टायपिंग संस्थेमार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत.
परीक्षा परिषदेने परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, पुढीलवर्षी जानेवारीत ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. १६ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. १७ ते १९ नोव्हेंबर निलंबित शुल्कात अर्ज भरता येणार आहे. जुले ते डिसेंबर सत्रासाठीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होणार आहे. त्याच विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. मागील वर्षी परीक्षेत नापास झालेल्या, विद्यार्थ्यांना रिपिटर म्हूणन परीक्षेस बसता येणार आहे. यासाठी विद्यार्थी किमान ८ वी उत्तीर्ण असावा, शासनमान्य संगणक टायपिंग संस्थेत आठवड्यात किमान चार तासांप्रमाणे परीक्षेच्या तारखेपूर्वी चार महिने किंवा ८० घड्याळी तास नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

परीक्षा पहिल्या आठवड्यात

मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमातील टायपिंग परीक्षा होणार आहे. त्यात सुरुवातीला इंग्रजी विषयाची परीक्षा २ ते ८ जानेवारी या कालावधीत होणार आहे. मराठी, हिंदी १३ ते १८ जानेवारी कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षा परिषदेने त्याबाबतच्या सूचना आपल्या वेबसाइटवरही दिलेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेदाभेदांना मूठमाती द्या

$
0
0




सुरेश कुलकर्णी, जालना

हजारो वर्षांपासूनच्या विकृत आचरणाची सवय बदलण्याची आपल्याला सर्वांत मोठी आवश्यकता आहे. मनुष्य तर्काने नाही, तर सवयीने वागतो. मागील काळात जे झाले, त्याचे परिमार्जन करायला हवे. हिंदू धर्मातील भेदाभेदांचे समूळ उच्चाटन करून सर्वांसोबत बंधूभावाचा धर्म आणि समता प्रस्थापित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ मोहन भागवत यांनी मंगळवारी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जालना शहरात समरसता संगम या विशेष समारंभाचे आयोजन केले होते, या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये जालना जिल्ह्यातील स्वयंसेवकांसह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू धर्माविषयी विवेचन करताना, मोहन भागवत म्हणाले, ‘विषमतेमुळे हजारो वर्षे त्रास सहन करणाऱ्यांबरोबर स्पृश्यअस्पृश्यतेची पापे घडली. त्याचे निराकरण झाले पाहिजे. सर्व भेदाभेदांना मूठमाती दिली, तरच देशाचा कायापालट होईल. यासाठी संघाचे सक्रिय समर्थन आणि सहभाग आहे.’
हिंदू धर्मासाठी आवश्यकता व्यक्त करताना ते म्हणाले, ‘हिंदू धर्मात आपण कोणती भाषा बोलतो? कोठे आणि कसे राहतो? कोणत्या देवाची उपासना करता? कोणत्या जातीचे आहोत? आणि काय खाता व काय खात नाहीत? हे कुणी बघत नाही अनेक परंपरा, पंथ संप्रदाय व पूजा पद्धती आहेत. आपल्या देशावरील आक्रमणे झाली व त्यातून काही जणांनी पूजा पद्धती बदलली असली, तरी त्यांची मूळ ओळख बदलणार नाही. हिंदूत्व हे या सगळ्या विविधतांचा स्वीकार करणारे आहे. बंधूभावाचा धर्म डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सांगितला आहे. वेड्यासारखे वागणारे हिंदू आता भेदाभेदांना मूठमाती देऊन एक झालेले आहेत, असे जगाने बघितले तरच आपण उन्नत होऊ शकतो.’
स्वहिताबरोबर सर्व जगाचे हित बघणारा भारत हा एकमेव देश आहे. आपल्या देशाने जगाला हे दाखवण्यासाठी केवळ तर्क करून चालणार नाही, तर शक्तीच्या उपासनेची गरज आहे. संघटित समाजात शक्ती उत्पन्न होते आणि भारताची प्रतिष्ठा आता संपूर्ण जगात वाढली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण एकच आणि एकमेकांचे आहोत, हे शाश्‍वत सत्य असून तेच आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे. जात, भाषा आणि पंथ ही हिंदूची ओळख नाही. विविधतेत एकता हेच हिंदुत्व असून त्यासाठी समस्त मानव जातीने एकत्र येऊन जगाला आपली ताकत दाखवून द्यायची आहे. जातिभेदविरहित संघटीत हिंदू समाज निर्मिती हेच संघाचे उद्दीष्ट आहे, असेही भागवत म्हणाले.
‘हिंसा ही दुखःद आहे. कोणत्याही मनुष्याला क्षुद्र म्हणून हिणवणे, अतिशय दोषपूर्ण आहे. कोणत्याही परिस्थितीत हे मान्य होणार नाही. प्रत्येक मणुष्यात देव आहे,’ असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.
जिल्हा संघचालक सुनिल गोयल यांनी सर्वांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर संघाचे देवगिरी प्रांत संघचालक अॅड. गंगाधरराव पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे जिल्हा कार्यवाह राजेंद्र कळकटे यांनी केले.

सहाशे गावांमधून प्रतिसाद
नवीन जालन्यातील बाजार समितीच्या समोरच्या भागातील देऊळगावराजा ते भोकरदन वळण रस्त्याच्या राजूर चौफुली जवळच्या वीस एकर परिसरात समरसता संगम सभेला अलोट गर्दी होती. अतिशय शिस्तबद्ध रचनेत २५ हजार खुर्च्यांवर नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सभेला उपस्थित प्रत्येक नागरिकाला व स्वयंसेवकांना पुरी भाजीचे पॅकेट देण्यात आले. जालना जिल्ह्यातील ९९७ पैकी सहाशे गावांतून ३५०० संघ स्वयंसेवक संघाच्या गणवेषात उपस्थित होते. तर, जालना शहरातील ३००० स्वयंसेवक गणवेषात उपस्थित होते. जिल्ह्यात या समरसता संगम सभेच्या यशस्वीतेसाठी १००० स्वयंसेवकांनी संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन समरसतेचा जागर केला व नागरिकांना निमंत्रित केले.

क्षणचित्रे
- या कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ उभे करण्यात आले होते. व्यासपीठाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समरसतेसाठी कार्य करणाऱ्या ऋषी, मुनी, संत-महंत व समाजसुधारक यांची छायाचित्रे होती
- कार्यक्रम स्थळ पूर्णत: प्लास्टिकमुक्त व पर्यावरण पूरक होते. परिसर स्वच्छतेसाठी ठिकठिकाणी कचरा पेट्या ठेवण्यात आल्या होत्या
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली होती
- ठिकठिकाणी सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या
- विविधतेत एकतेचा संदर्भ देणारे फलक जागोजागी लावण्यात आले होते
- मैदानावर सर्वत्र मोठ्या एलईडी स्क्रीन वर समारंभाची ताजी चलचित्रे दाखवण्यासाठी विशेष व्यवस्था उभारण्यात आली होती
- वाहन तळाची शिस्तबद्ध व्यवस्था होती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म. टा. राउंड टेबल,‘क्या हुआ तेरा वादा ?’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रसिद्ध नाटककार अरविंद जगताप यांनी शहरातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा मुद्दा मांडून महापालिका ‘भगवान भरोसे’ असल्याचे जाहीर कार्यक्रमात ठणकावून सांगितले. राज्यभरातील कलाकारांनी वेळोवेळी जाहीर वाभाडे काढल्यानंतरही मनपा प्रशासनाने नाट्यगृहांचे नूतनीकरण केले नाही. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मंगळवारी राउंड टेबल घेऊन या प्रश्नावर सविस्तर चर्चा घडवून आणली.
शहरातील संत एकनाथ रंगमंदिर आणि संत तुकाराम नाट्यगृहांची दुरवस्था असह्य झाली आहे. कलाकार आणि रसिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशांत दामले, चिन्मय मांडलेकर, सुयश टिळक, सुमित राघवन यांच्यासह अनेक कलाकारांनी नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर बोट ठेवले. नाट्यलेखक-गीतकार अरविंद जगताप यांनी नाट्यगृहांचा मुद्दा मांडत मनपाने लाज सोडल्याची परखड टीका केली. प्रथितयश कलाकारांनी मांडलेल्या मुद्यांकडे मनपाने लक्ष द्यावे, असे मत रंगकर्मींनी मांडले. संत एकनाथ रंगमंदिराच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्याची घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी १५ ऑगस्ट रोजी केली होती. ही घोषणा हवेतच विरल्यामुळे रसिक आणि रंगकर्मी संतप्त झाले आहेत.

संत एकनाथ रंगमंदिरात यावर्षी तीन नाटकांचे प्रयोग आयोजित केले होते. रंगमंदिराची प्रचंड दुरवस्था झाल्याचे यानिमित्त पहायला मिळाले. सोयीसुविधांच्या मुद्दा सातत्याने उपस्थित होऊनही महापालिका प्रशासन रंगमंदिराची दुरूस्ती करीत नाही हे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. संत एकनाथ रंगमंदिर व संत तुकाराम नाट्यगृहांचा नव्याने आराखडा तयार करावा. हौशी नाट्यसंस्थांना कमी दरात नाट्यगृह द्यावे आणि दोन नाटकांमधील वेळ वाढवावी. अगोदरचा कार्यक्रम लवकर संपत नसल्याने नंतरच्या कार्यक्रमाच्या संयोजकांना फार धावपळ करावी लागते. या शहरात सांस्कृतिक अधिकारी नसल्यामुळे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. प्रतिकात्मक आंदोलनातून महापालिकेचा निषेध नोंदवण्याची वेळ आली आहे. शहरातील खासगी नाट्यगृहे सुस्थितीत असताना मनपाची नाट्यगृहांची आबाळ का व्हावी याचे कोडे उलगडत नाही. आता नवीन पर्यायांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
- प्रकाश त्रिभुवन, ज्येष्ठ नाटककार

महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नाट्यगृहांकडे केलेले दुर्लक्ष हा कोडगेपणा आहे. सव्वा वर्षे तुम्ही महापौर होता की आम्ही होऊ या वादात शहर बकाल झाले. महापौर करंडक, राज्य-राष्ट्रीय स्तरावरील कलावंत यांचा सन्मान असे उपक्रम बंद पडले. किमान चांगल्या दर्जाचे नाट्यगृह देणे प्रशासनाची जबाबदारी आहे. या सत्तासंघर्षात सांस्कृतिक क्षेत्राचे नुकसान नको. एखादा महोत्सव किंवा स्पर्धा घेतल्याशिवाय महापौर आणि नगरसेवकांना अडचणी कळणार नाहीत. सांस्कृतिक क्षेत्राला बळकटी देणाऱ्या घटकात नाट्यगृहे आहेत. त्यात फारसे अर्थकारण नसल्यामुळे कदाचित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना स्वारस्य वाटत नाही. मात्र, कलेची जाण असलेला दिलीप शिंदे यांच्यासारखा आयुक्त नाट्यगृहांची कशी देखभाल ठेवतो याचे अनुकरण सर्वांनी करणे आवश्यक आहे. ध्वनीव्यवस्थासुद्धा नाट्यगृहाने पुरवणे बंधनकारक असूनही रंगकर्मींची गैरसोय केली जाते.
- प्रा. डॉ. राजू सोनवणे, रंगकर्मी

वर्षभर सातत्याने सांस्कृतिक उपक्रम आयोजित करीत असल्यामुळे नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा वारंवार सामना करावा लागतो. संत एकनाथ रंगमंदिर मराठवाड्याच्या सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आहे. रंगकर्मींची ती शान आहे. पण, विकासात्मक दृष्टिकोन नसल्यामुळे त्याची वाईट अवस्था झाली. मंदिराला निधी देणारे खासदार कधीतरी रंगमंदिराला निधी देतील अशी अपेक्षा आहे. राज्यभरातील नावाजलेल्या कलाकारांनी औरंगाबाद शहरात येऊन जाहीर टीका केली. तरीसुद्धा मनपा प्रशासनाला जाग येत नसेल तर कलाकार, चित्रकार, साहित्यिक, पत्रकार यांनी एकत्रितपणे आंदोलन उभारणे गरजेचे आहे. या आंदोलनात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अभ्युदय परिवार सहभागी होईल.
- सुबोध जाधव, सरचिटणीस, नवमहाराष्ट्र युवा अभियान

माझ्या पिढीच्या रंगकर्मींची सुरूवात संत एकनाथ रंगमंदिरात नाट्य सादरीकरणाने झाली. सद्यस्थितीत त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. मनपा आयुक्त, खासदार, आमदार, नगरसेवक यांना निवेदने देऊन प्रश्न सुटेल असे वाटत नाही. नामांकीत लोकप्रतिनिधींनी प्रतिकात्मक आंदोलन केल्यानंतरही कुणीच पुढाकार घेतला नाही. यावरून यांच्या मनोवृतीची सहज कल्पना करता येईल. पालकमंत्र्यांनी घोषित केलेल्या दोन कोटी रूपये निधीचे पुढे काय झाले, ते ठाऊक नाही. महिला कलाकारांनी नाटकात कामच करू नये अशी स्थिती आहे. घाणेरडे स्वच्छतागृह, खिडकीला काचा नसलेले ग्रीन रूम, फुटलेल्या फळ्यांचा रंगमंच या स्थितीत काम करणे शक्य नाही. मनपाला शरम वाटेल, असे आंदोलन साखळी पद्धतीने हाती घेणे गरजेचे आहे.
- प्रा. योगिता तळेकर-महाजन, रंगकर्मी

नाट्यगृहांची दुरवस्था हे मराठवाड्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचे वस्त्रहरण आहे. राज्यातील कलाकारांनी नाट्य प्रयोगाला आल्यानंतर नाट्यगृहांचे जाहीर वाभाडे काढणे हा त्यांचा अपमान नाही, तर औरंगाबाद शहराचा अपमान आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या ग्रीक रंगभूमीचे अवशेष अजून अस्तित्वात आहेत. मात्र, सातत्याने नूतनीकरण करूनही नाट्यगृहे बकाल कशी होतात ? या परिस्थितीला नाकर्तेपणा जबाबदार आहे. नेत्यांची आश्वासने फक्त ‘बोलाचा भात अन् बोलाची कढी’ आहेत. आतासुद्धा नाट्यगृहांची अवस्था सुधारत नसल्यास कलाकार आंदोलन करतील. कलाकारांनी नेहमीच क्रांती केली आहे. शहरात गणेशोत्सवातसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम नसतात. इतका रूक्षपणा जपणारी ही एकमेव महापालिका असेल. फक्त नेत्यांच्या वाढदिवसाला नाटकाचा प्रयोग ठेवून गर्दी जमवतात. ही गर्दी खुर्च्यांचे नुकसान करते.
- प्रा. डॉ. अनिलकुमार साळवे, नाट्यलेखक- दिग्दर्शक

‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा मारत असताना रस्ते आणि नाट्यगृहे यांची सारखीच अवस्था झाली आहे. या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही. कलाकारांनी मोठे आंदोलन हाती घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रश्न चव्हाट्यावर मांडणे आवश्यक आहे. प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार असल्यामुळे नाट्यगृहांची गरज असते. सांस्कृतिक संपन्नता कोणत्याही शहरासाठी भूषणावह असते. मग औरंगाबाद शहरातच अशा उपक्रमांची मुस्कटदाबी कशासाठी. कृतीशील प्रयत्न झाल्यास नाट्यगृहांची दुरवस्था बदलू शकते. अन्यथा, हीच स्थिती कायम राहणार आहे. कलाकारांनी एकत्रितपणे जनआंदोलन उभारल्यास प्रशासनाला नमते घ्यावे लागेल. अशा आंदोलनासाठी हीच योग्य वेळ आहे.
- गणेश घुले, गीतकार

नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न वारंवार उपस्थित होऊनही सुटला नाही. नाट्यगृहांचे खासगीकरण करून प्रश्न सोडवण्याचा मुद्दासुद्धा काहींनी मांडला. मात्र, आर्थिक कुवत नसलेल्या हौशी नाट्यसंस्थांची परवड होईल असा कोणताही निर्णय घेऊ नये. अटी घालून खासगीकरण झाले तरी अटी पाळल्या जातील याची खात्री नसते. आता एकूणच कला क्षेत्राबाबत उदासीनता वाढली आहे. इथली नाट्यगृहे तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाहीत. प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था आणि तांत्रिक साधने नसतात. मग असे पोकळ वासे कशासाठी उभारले ? मनपा प्रशासनात कला क्षेत्राबद्दल आस्था नसणारे अधिकारी आहेत. लोकप्रतिनिधींना शहराच्या सांस्कृतिक प्रश्नाची जाण नाही. या पेचात शहराचे प्रचंड नुकसान झाले. लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत.
- प्रा. डॉ. अशोक बंडगर, रंगकर्मी

रंगकर्मींचे सवाल

- पालकमंत्र्यांच्या दोन कोटी रुपये घोषित निधीचे काय झाले ?
- महापालिकेत सांस्कृतिक अधिकाऱ्याची नियुक्ती का रखडली ?
- आमदार-खासदार यांच्या आश्वासनांचे काय झाले ?
- सांस्कृतिक महोत्सव कधी सुरू करणार ?
- मनपाच्या अर्थसंकल्पातील सांस्कृतिक निधी कुठे वळवला ?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीडमध्ये रब्बीचा पेरा वाढणार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

यंदा झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे यंदा बीड जिल्ह्यामध्ये रब्बी पिकांचा पेरा वाढणार आहे. जिल्ह्यात पेरणीला वेग आला असून, येत्या काही दिवसांमध्ये ही कामे आणखी वेगाने उरकली जाणार आहेत. यंदा जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढणार असून, गहू, हरभरा या पिकांना शेतकरी प्राधान्य देतील, असे चित्र आहे.
बीड जिल्ह्यत गेल्या काही वर्षांत दुष्काळाचे सावट होते. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६६६ मिलिमीटर असताना, जिल्ह्यात काही वर्षांत सरासरीच्या निम्माही पाऊस होत नव्हता. त्यामुळे रब्बी पिकांची शाश्वती शेतकऱ्याला नव्हती. त्यामुळे गेल्या काही वर्षात रब्बी पेरणी घटली होती. या वर्षी जिल्ह्यात तब्बल ७०४ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. या पावसाने खरीप पिकांचे नुकसान काही प्रमाणात झाले आहे. मात्र, या पावसाने जिल्ह्यात बऱ्याच वर्षांनंतर रब्बीचा पेरा वाढला आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र तीन लाख १० हजार हेक्टर आहे. मात्र, या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३४ हजार हेक्टरवरची पेरणी उरकली असून, त्याची टक्केवारी ४५ टक्के आहे. जिल्ह्यातील १४२ सिंचन तलाव आहेत. यापैकी बहुतेक प्रकल्प भरले असून, विहिरी भरून वाहत आहेत. या अतिपावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस, बाजरी ही खरीप पिके पाण्यात गेल्याने उत्पादन घटले. खरीप घटल्यानंतर यावर्षी झालेल्या दमदार पावसाने रब्बीच्या पिकावर बळीराजाची आस निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीचा पेरा वाढला आहे.

तीन लाख १० हजार हेक्टर
बीड जिल्ह्यातील रब्बी हंगामाचे क्षेत्र

४५ टक्के
आतापर्यंत झालेली पेरणी

१०५ टक्के
यंदा झालेला पाऊस

पेरणीचा हालहवाल
- जिल्ह्याचे रब्बीच सरासरी क्षेत्र तीन लाख १० हजार हेक्टर असून, यंदा रब्बीचा पेरा वाढणार.
- सर्वाधिक रब्बी ज्वारीचा पेरा होईल. ८६ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीचा पेरा.
- सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत चार हजार हेक्टरवर गहू पेरणी पूर्ण.
- हरबरा पिकाचे सरासरी क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत ३९ हजार हेक्टरवर हरबरा पेरण्यात आला आहे.
- दोन हजार हेक्टरवर मका पेरणी

बीड जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला. नद्या-नाले वाहिले, विहिरींचे पाणी वाढले आहे. त्यामुळे रब्बी पिकाला पाण्याची पाळी मिळू शकते. यातून रब्बी पिकांची उत्पादकता यंदा वाढणार आहे. कृषी विभागाने रब्बीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन खत बियाण्यांचे नियोजन केले आहे
- डी. बी. बिटके,
कृषी विकास अधिकारी, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजेरी बायोमेट्रिक प्रणालीवर नोंदवण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कार्यालयीन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवर नोंदविण्याबाबत जीएसटी कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी उदासीन असल्याचे समोर आले. हे वरिष्ठांनी गांभीर्याने घेऊन बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. दोन महिन्यांपासून येथील कार्यालयात बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात येत असून अधिकाऱ्यांच्या दालनातच बहुतेक मशीन लावण्यात आले आहेत, हे विशेष. राज्य वस्तू व सेवाकर विभागाच्या येथील कार्यालयात सुमारे पावणे दोनशे अधिकारी व कर्मचारी आहेत. या सर्वांची कार्यालयीन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे घेतली जात आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आधी आधार नंबर टाकून पुढील प्रक्रिया करावी लागते. परंतु, काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयातून जाताना प्रणालीवर नोंद घेत नसल्याचे तपासणीत समोर आले. वेतनाची परिगणना ही बायोमेट्रिक प्रणालीवर नोंदविलेल्या उपस्थिती आधारे करण्यात येणार आहे. दरम्यान, सूचना करूनही नियमांचे पालन न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवरच घ्यावी, असे कार्यालयीन आदेशच काढण्यात आले आहेत. शिवाय रजा व कामानिमित्त भेटी यांची नोंद करून वरिष्ठांची मान्यता घेण्यात यावी, असे आदेश काढल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनातील संगणकात ही प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनर्सधारक सात डिसेंबरला दिल्लीत धडकणार

$
0
0

पेन्शनर्सधारक सात डिसेंबरला दिल्लीत धडकणार
जनआक्रोश मेळाव्यात निर्णय
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी पेन्शनर्सधारकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून येत्या सात डिसेंबर रोजी संसद भवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय पेन्शनधारकांनी घेतला आहे.
गांधी भवनात मंगळवारी अल्प पेन्शनधारकांचा ‘जनआक्रोश मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. ईपीएस ९५ निवृत्ती कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीचे सरचिटणीस अॅड. सुभाष देवकर, अॅड. अब्दुल कय्युम शेख, अॅड. कृष्णा पाटील जाधव, लालमियॉ शहा, बलराम पाटील, जी.व्ही. गाडेकर, आर.के. कळसकर, सांडू मन्सुरी, रावसाहेब गोरे, माधुरी जोशी, शारदा देवकर, जयश्री पहाडे आदी उपस्थित होते.
महागाई भत्त्यासह दरमहा साडेसात हजार रुपये पेन्शन द्यावी, पेन्शन मंजुरीपर्यंत कोशीयार समितीच्या अहवालानुसार तीन हजार रुपये महागाई भत्त्यासह दरमहा देण्यात यावे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे पूर्ण पगारावर पेन्शन लागू करा, दोन वर्ष वेटेजचा लाभ ईपीएस ९५ पेन्शनधारकांना मंजूर करा यासह अन्य प्रलंबित मागण्याबाबत या मेळाव्यात चर्चा करण्यात आली.
राज्यात साडेपाच लाख तर मराठवाड्यात ५७ हजार पेन्शनधारक आहेत. पेन्शनमध्ये वाढ व्हावी, म्हणून वयोवृद्ध गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत आहेत. मात्र, असे असतानाही शासनदरबारी त्यांची दखल घेतली जात नाही, अशी खंत सुभाष देवकर यांनी व्यक्त केली.
पेन्शनधारकांची एकजूट दाखविण्यासाठी सात डिसेंबरला रामलिला मैदानावरून संसदेवर धडक मोर्चा काढला जाणार आहे.
खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे यांच्यासह त्या त्या जिल्ह्यातील खासदारांना २० नोव्हेंबर रोजी निवेदन सादर करण्यात येणार आहे. आंदोलनाबाबत अधिकाधिक पेन्शनधारकांना माहिती व्हावी, यासाठी तालुकास्तरावर मेळावे, जनजागृती अभियानही हाती घेण्याचा निर्णय या जन आक्रोश मेळाव्यात घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामदेवतेच्या साक्षीने खैरे, दानवेंत बाचाबाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या साक्षीने अंगारकी चतुर्थीच्या दिवशी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात बाचाबाची झाली. गटप्रमुखांच्या यादीवरून या दोघांमध्ये जाहीर भांडण झाल्याचे सूत्रांने सांगितले. खैरे-दानवे एकमेकांवर धावून गेले, पण सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आवरले.
औरंगाबादेत असताना खासदार चंद्रकांत खैरे नियमीतपणे संस्थान गणपतीच्या दर्शनाला जातात, चतुर्थीच्या दिवशीतर ते आवर्जून दर्शनासाठी जातात. या परिपाठानुसार ते मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास संस्थान गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महापालिकेचे माजी सभागृहनेते किशोर नागरे, माजी नगरसेवक प्रफुल्ल मालाणी उपस्थित होते. खासदार खैरे यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना संस्थान गणपतीच्या मंदिरात गटप्रमुखांची यादी घेऊन बोलावले होते. जिल्हाप्रमुख दानवे यांना यादी घेऊन येण्यास थोडा उशीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. खासदारांना पासपोर्ट कार्यालयात बैठकीसाठी जायचे होते, दानवे यांची वाट पाहिल्यामुळे पासपोर्ट कार्यालयात जाण्यास त्यांना उशीर होत होता. इतक्यात दानवे यांचे आगमन झाले. ते येताच खैरे यांनी गटप्रमुखांच्या यादीबद्दल विचारणा केली. दानवे यांनी त्यांच्या हातात यादी सोपवली. खैरे यांनी यादी पाहिली असता यादीत बराच बदल केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबद्दल त्यांनी दानवे यांना जाब विचारला आणि यावरूनच दोघांमध्ये खड्या आवाजात भांडण सुरू झाले. सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी खैरे-दानवे यांना बाजुला केले. खासदार खैरे मोटारीत बसल्यानंतर दानवे पुन्हा त्यांच्या जवळ जावून तावातावाने बोलत होते, असे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा काही जणांनी मध्यस्थी केल्यानंतर खासदार बैठकीसाठी निघून गेले.

अंबादास दानवे यांच्या कडे मी चार महिन्यांपासून गटप्रमुखांची यादी मागत आहे. पण ते यादी देत नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यादी महत्त्वाची आहे. भाजपची तयारी वन बुथ-टेन युथ अशी सुरू असताना शिवसेनेची गटप्रमुखांची यादी तयार असली पाहिजे, असा माझा आग्रह होता. त्यावरून थोडा वाद झाला. वाद होतात व सुटतही असतात. वाद असणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. मी वयाने मोठा आहे, रागवण्याचा मला अधिकार आहे, त्याला प्रत्युत्तर कुणी देऊ नये.
-चंद्रकांत खैरे, खासदार

संस्थान गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मी गेलो होते. तेथे खासदार चंद्रकांत खैरे यांची भेट झाली. ते आमचे नेते आहेत, मी त्यांना नमस्कार केला. वादाचा प्रसंग घडला नाही.
-अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचे अपात्र मतदार कुलगुरुंच्या कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकीच्या पदवीधर गणाची अंतिम मतदारयादी तांत्रिक चुकांनी वादात सापडली आहे. एकाच मतदाराचे तब्बल तीन वेळेस नाव असणे, पत्ते व व्यक्ती बदलणे अशा चुका आहेत. केंद्रनिहाय यादी करताना अतिरिक्त नावे वगळली जाणार आहेत. मात्र, आधार कार्डच्या एका बाजुची प्रत दिल्याने अपात्र ठरलेल्या मतदारांबाबत अंतिम निर्णय कुलगुरू घेतील, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
पदवीधर गणाची निवडणूक मतदारयादी वादग्रस्त ठरली आहे. अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यापासून शेकडो मतदारांनी आक्षेप घेतला आहे. पहिल्या यादीत अपात्र ठरवल्यानंतर त्रुटी दूर करण्यात आल्या. कागदपत्रे जमा केल्यानंतरही काही मतदारांचे नाव यादीत नाही. आधार कार्डच्या एका बाजुची प्रत दिलेले मतदार अपात्र ठरले आहेत. या मतदारांनी निवडणूक विभागाच्या निकषांवर आक्षेप घेतला आहे. आधार कार्डची झेरॉक्स प्रत नसलेले मतदार मतदारयादीत आहेत. या मतदारांचे अर्ज अपात्र कसे ठरले नाही, असा सवाल अर्जदार लक्ष्मण नवले यांनी केला आहे. याबाबत निवडणूक विभाग आणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे त्यांनी दाद मागितली. मात्र, दोन्ही ठिकाणी प्रतिसाद मिळाला नसल्याने कायदेशीर दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही मतदारांची चक्क तीन वेळेस नावे आहेत. महिलेची नोंद पुरूष आणि पुरुषाची नोंद महिला अशी झाली आहे. शेकडो नावांचा गोंधळ असल्यामुळे मतदारयादी जाहीर करताना प्रशासनाने खबरदारी घेतली नसल्याचा आरोप मतदारांनी केला. पदवीधर गणात विद्यापीठ उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंच आणि सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेचे पॅनल लढत देणार आहेत. आता शिवसंग्राम संघटना आणि युवा सेना यांनीसुद्धा निवडणूक मैदानात उडी घेतली आहे. काही मतदारांची नावे अपात्र ठरल्यामुळे या पॅनलच्या मतदारांनी कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले. प्रशासनाने मतदारयादीतून हेतुपुरस्सर वगळल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.

अतिरिक्त नावे वगळणार

अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर जिल्हानिहाय व केंद्रनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. या प्रक्रियेत दोन वेळेस नावे आलेल्या मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. सध्या एकच यादी असल्यामुळे नावे शोधणे कठीण झाले आहे. मतदारयादीत सुटसुटीतपणा नसल्याचे मतदारांनी सांगितले. आधार कार्डाच्या एका बाजुचीच प्रत दिलेले अर्ज अपात्र ठरले आहेत. या अर्जदारांना मतदानाची संधी देण्याचा अंतिम निर्णय कुलगुरूच घेऊ शकतात असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.

अंतिम मतदारयादीत नाव नसल्यामुळे दाद मागितली. पण, प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे आधार कार्डाची प्रत न दिलेले मतदार अंतिम यादीत आहेत. याबाबत कायदेशीर दाद मागणार आहे.
- लक्ष्मण नवले, पदवीधारक मतदार

युवा सेना स्वतंत्रपणे पॅनल लढवणार आहे. तीन उमेदवारांची नावे निश्चित झाली असून सात उमेदवारांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. नावे निश्चित झाल्यानंतर अर्ज दाखल करणार आहोत.
- राजेंद्र जंजाळ, निमंत्रक, युवा सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिंदुत्वाला खरा धोका संघापासून’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

देशातील हिंदुत्वाला खरा धोका अन्य कोणापासून नसून, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून आहे. देशात संविधान मानणारे आणि संविधानाला विरोध असलेल्यांची लढाई देशात सुरू आहे. रामाच्या नावावर राज्य करणाऱ्या बनावट देशभक्तांचा पराभव आवश्यक असून, चहावाले पंतप्रधान नरेंद्र मोदी देश
विकायला निघाले आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारने उस्मानाबादेत बोलताना केली.
परिवर्तनवादी विद्यार्थी-युवक संघटनाच्या वतीने आयोजित पुष्पक मंगल कार्यालयातील सभेत तो बोलत होता. सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस आहे, तसेच रशियन क्रांतीही याच दिवशी झाली होती, याकडे लक्ष वेधत त्याने भाषणाला सुरुवात केली. तो म्हणाला, ‘देशात धर्म आणि रोजीरोटीचा प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. देशात थोडेफार लोक बोलत असून, त्यांना त्रास दिला जात आहे. या लोकांना तुरुंगात टाकले जाते किंवा गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश यांच्याप्रमाणे हत्या केली जाते. ज्यात सामान्य जनतेचा सहभाग नसेल, कोणतीही गोष्ट राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रवाद होऊ शकत नाही. ती केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा राजकीय प्रश्न ठरू शकतो. संवाद दोन पक्षात व्हायला हवा. तो एकतर्फी झाला तर तो संवाद नसतो.तो एक आदेश असतो.’
बिहारमध्ये शिक्षणाला प्राधान्य नाही, त्यामुळे तेथील नागरिक अन्य राज्यांमध्ये रोजगारासाठी जातात. तर, मुंबईमध्ये या परप्रांतियांवर हल्ले होतात. त्याग, प्रेम व बलिदानाचे प्रतीक असलेल्या शिवरायांच्या, संभाजी राजे, तुकाराम यांच्या राज्यात काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी भांडवल करण्यात मग्न आहेत. आपल्याला दुही, तिरस्कार पेरणाऱ्या योगी आदित्यनाथ यांचा भगवा पाहिजे का, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. तसेच, नोटबंदी, जीएसटीवरही टीका केली. केंद्रात भाजपचे सरकार आहे. देशातील १८ राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. असे असताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकरणात दोषारोपपत्र सादर करण्यास भाजप कचरत आहे, याकडेही त्याने लक्ष वेधले. सभास्थळी कन्हैयाकुमारच्या साथीने ‘हमे चाहिये आझादी...’च्या घोषणा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्कर्ष पॅनलचे उमेदवार विद्यापीठात जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवडणुकीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांनी मंगळवारी अधिसभा संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, विद्या परिषद आदी गटातील अधिकृत उमेदवारांची नावे पॅनलचे जाहीर केली.
अधिसभा संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, विद्यापरिषद गटाची निवडणूक २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अधिसभा संस्थाचालक गटात खुला प्रवर्गात डॉ. अविनाश येळीकर, कपील आकात, गोविंद देशमुख आहेत. अधिसभा प्राचार्य गटाच्या खुला प्रवर्गात डॉ. जयसिंग देशमुख, डॉ. भारत खंदारे, डॉ. अशोक पंडित, डॉ. अली झाकीर अब्बास अली, एससी प्रवर्गात डॉ. अभिजीत वाडेकर, ओबीसी प्रवर्गात डॉ. सोपान निंभोरे आहेत. अधिसभा शिक्षक गटाच्या खुला प्रवर्गात डॉ. राजेश करपे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. अंकुश कदम, डॉ. श्याम कदम, डॉ. मुंजा धोंडगे महिला प्रवर्गात डॉ. विजया मुसांडे, एससी प्रवर्गात डॉ. बाबासाहेब कोकाटे, एसटी प्रवर्गात डॉ. फिरोज खान पठाण, एनटी प्रवर्गात डॉ. फुलचंद सलामपुरे आणि ओबीसी प्रवर्गात डॉ. सदाशिव सरकटे आहेत. विद्या परिषदेचे उमेदवार डॉ. संजय कोरेकर, डॉ. खान मोहम्मद, डॉ. संजय अस्वले, डॉ. विलास खंदारे, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. अरूधंती पाटील, डॉ. प्रभाकर कराड आहेत. अधिसभा विद्यापीठ शिक्षक गटात डॉ. रामराव चव्हाण, डॉ. स्मिता अवचार, डॉ. सुरेश गायकवाड उमेदवार आहेत. पॅनलचे पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅट्रॉसिटी कायद्यान्वये आठ महिन्यात ५८ गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व सुधरित अधिनियमान्वये जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये ५८ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये आवश्यक ती कारवाई तत्परतेने करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या वतिने करण्यात आले होते. या बैठकीत १ जानेवारी २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत ५८ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी ३३ गुन्ह्यात पोलिस तपास सुरू असून, १९ प्रकरणे कोर्टात असल्याची माहिती देण्यात आली. जानेवारी १९९५ ते ऑक्टोबर २०१७ पर्यंत एकूण १०१७ गुन्हे दाखल झाले, त्यापैकी ४१७ गुन्ह्यात आरोपींची निर्दोष मुक्तता, ३४ गुन्ह्यांत शिक्षा, तर ३२७ गुन्हे कोर्टात प्रलंबित असल्याची मा‌हिती देण्यात आली.
या बैठकीसाठी अशासकीय सदस्य उत्तमराव गाढेकर, विभीषण काळे, मनोज भारस्कार, विष्णू वाघ, चंद्रकांत जाधव, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके, सहाय्यक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, उपअधीक्षक आमले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘युपीआरएन’द्वारे डॉक्टरांचा डेटा होणार सज्ज

$
0
0


Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweeet-@nnirkheeMT
औरंगाबादः देशभरातील प्रत्येक अलोपॅथीच्या डॉक्टरला ‘युनिक परमनंट रजिस्ट्रेशन नंबर’ (युपीआरएन) मिळणार असून, याच क्रमांकाच्या आधारे देशभरातील डॉक्टरांचा निश्चित डेटा एका क्लिकवर उपलब्ध होऊन प्रत्येकवेळी अद्ययावतही होणार आहे. राज्यांसह देशाच्या पातळीवर आरोग्यविषयक धोरणे राबविण्यासाठी तसेच कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांपर्यंत पोहोचणेदेखील याच ‘युनिक नंबर’द्वारे शक्य होणार आहे.

सद्यस्थितीत ‘इंडियन मेडिकल रजिस्ट्री डेटाबेस’द्वारे (आयएमआर) देशातील सगळ्याच डॉक्टरांचा निश्चित आकडा, त्यांची शाखा, संपर्क क्रमांक, पत्ता व इतर महत्वाची माहिती उपलब्ध असेलच असे नाही. यामध्ये नवीन डॉक्टरांची नोंदणी होत असली तरी मृत पावलेले, परदेशात स्थायिक झालेले, दुसऱ्या शहरात-राज्यात व्यवसाय करीत असलेले, वैद्यकीय व्यवसाय सोडलेले अशा सर्वांची अद्ययावत माहिती अभावानेच मिळते. डॉक्टरांचे बदललेले संपर्क क्रमांक-पत्ते यांच्या अचूक माहितीचा फार मोठा अभाव ‘आयएमआर डेटाबेस’मध्ये असल्याचे सांगितले आणि ही उणीव ‘युपीआरएन’द्वारे भरून काढली जाणार आहे. आधार क्रमांकाशी पडताळणी करूनच प्रत्येक डॉक्टरला ‘युपीआरएन’ क्रमांक दिला जाणार असून, त्याद्वारे प्रत्येक डॉक्टरसह त्यांची शाखा, संपर्क क्रमांक, पत्ता व इतर महत्वपूर्ण माहिती प्रत्येक वेळी अद्ययावत होत जाणार आहे. त्यामुळे एखादा डॉक्टर वैद्यकीय व्यवसायासाठी परदेशात किंवा दुसऱ्या राज्यात गेल्यास त्याचे निश्चित ‘स्टेटस’ एका क्लिकवर उपलब्ध होईल. ‘युपीआरएन’साठीची नोंदणी किंवा नूतनीकरण अनिवार्य असून नोंदणीसाठी कुठलेही वेगळे शुल्क लागणार नसून, लवकरच इंटरनेटद्वारे घरबसल्या नोंदणी करता येणार आहे.

आजारांचा निश्चित डेटाही मिळेल
सद्यस्थितीत देशातील मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात, क्षयरोग आदी कोणत्याच आजारांचा निश्चित डेटा उपलब्ध नाही, जो प्रगत देशांमध्ये सहज उपलब्ध असतो. मात्र ‘युपीआरएन’द्वारे व विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे देशभरातील डॉक्टरांची ओपीडी-आयपीडी लिंक केली जाऊ शकते आणि त्याद्वारे प्रत्येक आजाराचा व रुग्णांचा निश्चित डेटा उपलब्ध होऊन आरोग्यविषयक धोरणांची अंमलबजावणी करता येऊ शकेल, असे ‘आयएमए’चे नियोजित शहराध्यक्ष डॉ. कुलदिपसिंग राऊळ म्हणाले.

देशातील डॉक्टरांसह देशातील आजारांची निश्चित आकडेवारी सध्यातरी उपलब्ध नाही. ‘युपीआरएन’द्वारे सर्व प्रकारची आरोग्यविषयक आकडेवारी राष्ट्रीयस्तरावरील उपलब्ध होऊ शकेल. – डॉ. कुलदिपसिंग राऊळ, नियोजित शहराध्यक्ष, आयएमए

‘युपीआरएन’मुळेच राज्यात-देशात नेमके किती डॉक्टर आहेत हे सरकारला कळेल. याच ‘युनिक नंबर’द्वारे कोणताही डॉक्टर देशात कुठेही प्रॅक्टिस करू शकेल. त्याला त्या-त्या राज्याच्या वैद्यकीय परिषदेची मान्यता घेण्याची गरज राहणार नाही. गंभीर चुकीमुळे एखाद्याचे रजिस्ट्रेशन रद्द केले तर तो देशात कुठेच प्रॅक्टिस करू शकणार नाही व बोगस डॉक्टरही चव्हाट्यावर येतील. – डॉ. रवी वानखेडकर, नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय नृत्यातून संस्कृती उलगडणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक इतिहास कथन करणारा ऑरा औरंगाबाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. दर शनिवार व रविवारी शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून इतिहास उलगडला जाणार आहे. नृत्य परंपरेचे विलोभनीय दर्शन या माध्यमातून घडणार आहे, असे महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांनी सांगितले.

महागामी संस्थेत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. एमजीएम संस्थेच्या महागामी गुरुकूल यांच्या वतीने ‘ऑरा औरंगाबाद’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचा सांस्कृतिक विकास आणि पर्यटन विकासासाठी महागामी गुरुकूल दरवर्षी ही नृत्य शृंखला घेत असते. आतापर्यंत या उपक्रमात चार सत्रात ९० नृत्य कार्यक्रम घेण्यात आले. स्थानिक वारसा, शिल्प, शिलालेख आणि इतिहास यांचे दर्शन नृत्यातून घडवण्याचा प्रयत्न कलाकार करतात. यंदा पाचवे सत्र १८ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. दर शनिवार व रविवारी सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत औरंगाबाद वारसा या विषयावर विविध दृष्टिकोनातून शास्त्रीय नृत्य सादरीकरण होईल. औरंगाबाद शहराच्या सांस्कृतिक इतिहासाची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक रसिकांसाठी ही मोठी पर्वणी आहे. या उपक्रमात पर्यटन संस्था, गाइड, हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हल्स सेवा यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत दर शनिवार व रविवारी महोत्सव सुरू राहणार आहे. या पत्रकार परिषदेला प्राचार्य प्रतापराव बोराडे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती.

पर्यटकांची उपस्थिती
मागील चार वर्षांपासून ‘ऑरा औरंगाबाद’ उपक्रम रसिक व पर्यटकांसाठी पर्वणी ठरला आहे. पर्यटनासाठी शहरात आलेले देश-विदेशातील पर्यटक आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असतात. देशभरातील उदयोन्मुख कलाकार भरतनाट्यम, ओडिसी, कथक अशा वैविध्यपूर्ण नृत्यांचे कसदार सादरीकरण करतात. अनेक कलाकार आवर्जून ‘ऑरा औरंगाबाद’ची वाट पाहतात. शास्त्रीय नृत्य कलाकारांना हे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीमुळे मंदी हा कांगावा: चंद्रकांत पाटील

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। जालना

नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असताना विरोधकांकडून आज काळा दिवस पाळला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नोटाबंदीचे जोरदार समर्थन केले. नोटाबंदीमुळे मंदी आली असा केवळ कांगावा करण्यात येत असल्याची टीका महसूल मंत्र्यांनी विरोधकांवर केली आहे. आज देशात कुठेही महागाई किंवा मंदी अस्तित्वात नसून सर्वसामान्य माणूस खूश आहे असा दावाही महसूल मंत्र्यांनी केला आहे. मराठवाड्याच जालना येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करत चंद्रकांत पाटील यांनी आता लोक कॅशलेस व्यवहाराकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे म्हटले आहे. देशात नोटाबंदीचा कुठेही उलटा परिणाम दिसत नाही. उलट आता कॅशलेश व्यवहार करणे लोकांना सोईचे आणि सोपे असल्याचे वाटू लागले असल्याचेही ते पुढे म्हणाले. ज्यांनी वर्षानुवर्षे सर्वसामान्यांचे रक्त शोषून अमाप संपत्ती जमा केली आणि आपल्या गादीखाली दडलली, अशा लोकांनाच आपल्या नोटा बँकेच जमा कराव्या लागल्या असे म्हणत सर्वसामान्यांना नोटाबंदीचा मोठा त्रास झाल्याच्या आरोपाचे पाटील यांनी खंडन केले.

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विरोधकांनी काळा दिवस पाळला. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करत महसूल मंत्र्यांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हा तर मोठा आर्थिक घोटाळा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटाबंदी हा फसलेला प्रयोग नाही, तर मोठा आर्थिक घोटाळा आहे, असा आरोप ‘आम आदमी पार्टी’ने केला. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नोटाबंदी करून जनतेला धोका दिला, असा आरोप करून ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नोटाबंदी म्हणजे सामान्य माणसांच्या झोपेत घातलेला दगड होय. सरकारने सांगितलेले कुठलेही फायदे जनतेपर्यंत पोचले नाहीत, काळा पैसा बाहेर आला नाही. त्याचबरोबर भ्रष्टाचार संपला नाही व दहशतवाद संपला, असा आरोप ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केला.

नोटाबंदीमुळे व्यापारीवर्ग अडचणीत आला आहे. शेतकरी अधिकच लुबाडला गेला. लहान व मध्यम उद्योग बंद होण्याच्या स्थितीत आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या भरमसाट वाढली आहे. एकीकडे निवडणुकीत जनतेला तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये भरू, असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते, मात्र चक्क जनतेच्या खिशातील घामाचा पैसा काढून त्याला बँकेत भरायला भाग पाडले. आज हा पैसा बँकेच्या निर्लेखित कर्जाद्वारे मोठ्या कंपन्या, बडे उद्योगपती यांच्याकडे आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. जिल्हा समन्वयक सुग्रीव मुंडे, दत्तू पवार, सिद्धार्थ बनसोड, अशीर जयहिंद, सुरेश पवार, सतीश संचेती, प्रकाश जाधव, वैजनाथ राठोड, अजबराव मानकर, भरत फुलारे, सय्यद मझहर, शांतीलाल झाडे, उन्मेश चौकसे, सौरभ गौस यांच्यासह मोठ्या संख्येने संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

‘आप’तर्फे ‘धोका दिवस’
केंद्र सरकारने नोटाबंदीच्या निर्णयाला वर्ष पूर्ण झाले आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारने सर्वसामान्य नागर‌िकांना धोका दिला असल्याचे सांगत बुधवारी (आठ नोव्हेंबर) आम आदमी पार्टीने ‘धोका दिवस’ पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारने देशात नोटबंदीचा निर्णय घेऊन चनलामधील मोठ्या नोटा बंद करून दोन हजार रुपयांची नोट चलनामध्ये आणली, मोठ्या नोटा बंद करुन काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी सरकारने त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट चलनामध्ये आणली, यामुळे अधिक काळाबाजार फोफावला आहे. आपल्याच बँकेतील पैसे काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, अनेकांवर उपासमारीची वेळ आली असल्याने नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नुकसान झाले असल्याचे आंदोलनप्रसंगी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर मोहम्मद बशीर, विनोद झारे, अलियार खान, लक्ष्मण पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images