Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा

0
0
‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा या विषयांचा अभ्यास कच्चा असून सातत्याने चर्चा केल्यानंतर निर्णय घ्यावे लागतात. प्रश्न सोडवत नसाल तर, आमचा नाईलाज आहे.

थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करा

0
0
बँकातील करोडपती थकबाकीदारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा, यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लाईज असोसिएशनच्या सभासदांनी महाराष्ट्र बँकेच्या सिडको येथील विभागीय कार्यालयसमोर जोरदार निदर्शने केली.

उत्पादन शुल्काला उशिरा आली जाग

0
0
शहरातील अवैध दारू विक्रेत्यावर, तसेच हॉटेलवर गुन्हे शाखेने वक्रदृष्टी वळवली आहे. त्यांच्या कारवाया सुरू झाल्याचे पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागालाही उशिरा जाग आल्याचे दिसत आहे.

‘मृत्यूच्या मार्गावर’ आणखी एक बळी

0
0
पैठण रोडवरील माँबापच्या दर्ग्याजवळील वळणावर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता झालेल्या अपघातात ज्येष्ठ वकिलाचा मृत्यू झाला आहे. पुरेसा रुंद नसलेला रस्ता, धोकादायक वळणे आणि अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक यांमुळे सातत्याने अपघातांना आमंत्रण देणाऱ्या या रस्त्यावर आणखी एका नागरिकाचा बळी गेला आहे.

नव्या वर्षात स्टॅम्प ड्युटी ऑनलाइन

0
0
राज्यात मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी आता ऑन लाइन स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) भरावी लागणार आहे. त्याची अंमलबजावणी येत्या एक जानेवारी २०१४पासून करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ बँकांशी करार करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिक्षकांच्या बदलींचा लवकरच निर्णय

0
0
जिल्हा परिषदेमधील तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या माध्यमिक शिक्षकांच्या आपसातील बदलींबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.

आंबेडकर बँक ताब्यात घेण्याचे षड्यंत्र

0
0
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक ताब्यात घेण्याचे विरोधकांचे षडयंत्र असून त्यासाठी ते अवैध मार्गाचा वापर करीत आहेत. खोटेनाटे वाद करुन बँकेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे, असा आरोप संस्थापक अध्यक्ष भीमराव आरक यांनी केला.

मराठीसाठी हवीत हक्काची चित्रपटगृहे

0
0
‘मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्याचा वाद निरर्थक आहे. राज्यात हक्काची २०० चित्रपटगृहे मिळाल्यास मराठी चित्रपटांचा व्यवसाय वाढू शकतो. अर्थकारण सुधारल्यास मराठी चित्रपटांचे सादरीकरण तगडे होईल,’ असे मत अभिनेता मकरंद अनासपुरे याने व्यक्त केले.

मुलींच्या नावे २५ हजारांची FD

0
0
येत्या वर्षभरात पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या मुलींच्या नावे महापालिका पंचेवीस हजारांची मुदतठेव ठेवणार असल्याची घोषणा, महापौर कला ओझा यांनी आज पालिकेच्या वर्धापनदिनाच्या निमित्याने केली.

भडकल गेटवर भीमसागर

0
0
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयासह विविध ठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आल्या.

मोबाइलचोर गजाआड

0
0
दोन मोबाइल चोरांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. मोहंमद जरेफ मोहंमद खाजा (वय २३, रा. अबरार कॉलनी, बीड बायपास) व लहू चव्हाण (वय १९, रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

DMIC साठी आतापर्यंत ११०० हेक्टरसाठी संमतीपत्र

0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे ११०० हेक्टर जमिनी संपादनासाठी संमतीपत्र दिले आहे. उर्वरित जमिनीसाठीही लवकरच संमतीपत्रे मिळण्याची अपेक्षा आहे.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, १ जखमी

0
0
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तर एकजण जखमी झाला आहे. बीड बायपास महामार्गावर शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.हुसेन मेहताब पठाण ( वय २२, रा. डोणगांव, जि.जालना) असे अपघातात मृत झालेल्या तरुणांचे नाव आहे.

राष्ट्रध्वजाच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी

0
0
येत्या १ जानेवारी २०१४ पासून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांवर दररोज राष्ट्रध्वज लावण्याच्या निर्णयाची ‘भारतीय ध्वजसंहिता २००६’ प्रमाणे अंमलबजावणी करायची आहे. या नवीन निर्णयामुळे अधिकारी व सरपंच धास्तावले आहेत.

गोमंतक मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी भांड

0
0
तिसऱ्या अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची निवड करण्यात आली आहे. गोमंतक मराठी साहित्य परिषद आणि गोवा राजभाषा संचालनालयाच्या वतीने तिसरे अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलन साखळी डिसोलीत १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

लाल्या रोगामुळे कापसाचे उत्पादन घटण्याची भीती

0
0
कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ऐन हंगामात पाने, फुले व कैऱ्या गळत आहेत. यंदा पाऊस असूनही कापसाचे उत्पादन मिळणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा तालुक्यात ४८ हजार हेक्टरवर खरीप हंगामात कापसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे रोख रक्कम हाती आली नाही.

बालगृहातील अत्याचार : तपासाबाबत सूचना

0
0
इंदिरा गांधी बालगृहातील बालकांवरील अत्याचार प्रकरणांची गंभीर महिला व बालविकास मंत्रालय अंतर्गत असलेल्या जिल्हा सल्लागार मंडळाने घेतली आहे. मंडळाचे अध्यक्ष अॅड. एम. एन. देशमुख यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात भेट देत या प्रकरणाच्या तपासाविषयी माहिती घेत आवश्यक त्या सुचना केल्या.

अपघातात ६ विद्यार्थी ठार, १० जखमी

0
0
तुळजापूरपासून दहा किलोमीटरवर, शनिवारी सकाळी सातला, दोन खासगी बसच्या टकरीत सात जण ठार तर, दहा जण जखमी झाले. मृतांमध्ये सांगवडे (ता. करवीर) कोल्हापूर येथील सांगवडे माध्यमिक हायस्कूलच्या सहा विद्यार्थी आणि वाहनचालकाचा समावेश आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

अखेर विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश

0
0
शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गतच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नाही. यावर विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर शनिवारी प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली.

फेसबुकवर महिलेची बदनामी

0
0
महिलेच्या छायाचित्राचा वापर करून फेसबुकवर संबंधित महिलेची बदनामी करणाऱ्या एका आरोपीविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images