Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रस्त्यांच्या कामाचे टेंडर निघाले

$
0
0
निघाले, रस्त्यांच्या कामांचे टेंडर निघाले, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर व नगरसेवकांवर आली आहे. आरोप-प्रत्यारोपांनंतर पालिकेच्या प्रशासनाने शनिवारी रस्त्यांच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. या कामांसाठी ३१ कोटी रुपये खर्च केला जाणार असून वीस किलोमीटरचे रस्ते यातून केले जाणार आहेत.

पेपरफुटीला औरंगाबाद कनेक्शनच

$
0
0
जळगाव येथे पेपरफुटी प्रकरणाचे कनेक्शन औरंगाबादमध्येच असल्याचे स्पष्ट होत आहे. या संदर्भात जळगाव पोलिसांनी आरोपी सागर बावतसह शनिवारी येथील मुख्य वितरण केंद्राला भेट दिली.

उद्यानाचे पार्किंग बस स्टँडमध्ये

$
0
0
पालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाला स्वतंत्र पार्किंगच नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी बस स्टँडमधील पार्किंगचा सहारा घ्यावा लागतो. या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जबर शुल्क आकारले जात असल्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

लालबाग आंबा बाजारात दाखल

$
0
0
फळांचा राजा आंबा बाजारात दाखल झाला आहे. जाधववाडी येथील जिल्हा कृषी उपन्न बाजार समितीत शनिवारी तीन क्विंटल आंबे दाखल झाले आहे. मात्र, आवक जादा प्रमाणात नसल्याने आंब्याची चव चाखण्यासाठी सध्या थोडा जास्त खिसा रिकामा करावा लागत आहे.

येळकोट येळकोट जय मल्हार

$
0
0
‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात रविवारी सातारा येथे चंपाषष्ठी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिजेजुरी अशी ख्याती असलेल्या साताऱ्यात दिवसभरात अडीच लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले.

मिटमिट्यातील अतिक्रमणावर हातोडा

$
0
0
मिटमिटा येथील शंभर एकर गायरान जमिनीवर होत असलेला अवैध कब्जा तहसील कार्यालयाने रविवारी मनपाच्या मदतीने हाणून पाडला.

चार दिवसांत पारा ९ अंशांनी घसरला

$
0
0
हेलेन चक्रीवादळाच्या प्रभावामुळे निर्माण झालेले ढगाळ वातावरण स्वच्छ झाल्यानंतर, दोन दिवसांपासून गुलाबी थंडी पडली आहे.

मोकळ्या जागांवर डम्पिंग ग्राउंड

$
0
0
नारेगाव येथील डम्पिंग ग्राउंड शिफ्ट करण्याचा प्रश्न सुटत नसल्यामुळे वॉर्डावॉर्डात पालिकेने डम्पिंग ग्राउंड तयार केले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

चेस चॅम्पियनशीपला उत्साहात प्रारंभ

$
0
0
महाराष्ट्र टाइम्सच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र टाइम्स चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत विशाल साळुंके, चैतन्य कलंत्री, सुधांशू निकम, जतीन देशपांडे, साक्षी चितलांगे, ऋत्विक मोहरील, ह्रषिकेश बक्षी यांनी आपापल्या गटात तिसऱ्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे.

मनसेचे अॅप्लिकेशन येणार

$
0
0
लवकरच पक्षाचे ‘अॅप्स’ उपलब्ध होणार असून या माध्यमातून पक्षबांधणी घट्ट करा अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस प्रमोद पाटील यांनी केली.

रेशन दुकानांनी जादा गहू उचलल्याची तक्रार

$
0
0
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी सन २०१० ते २०१२ या कालावधीत उललेल्या जादा ए पी एल गव्हाबद्दल चौकशी करावी, अशी मागणी शिवना येथील योगेश शेषराव राऊत यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.

शेतक-यांना पीक विमा मंजूर

$
0
0
ष्ट्रीय पिक विमा योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील दहा हजार १०६ शेतकऱ्यांना सुमारे दोन कोटी ७८ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम वाटप केली जाणार आहे.

पोलिसांत तक्रार केली : तरूणाला मारहाण

$
0
0
पोलिसात तक्रार देण्याच्या कारणावरुन तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी विठ्ठलनगर येथे घडला. याप्रकरणी मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्तया आला आहे. श्रीरामनगर येथील अतुल विश्वंभर घडामोडे हा तरुण शनिवारी सायंकाळी विठ्ठलनगर येथील सुशीलादेवी हायस्कुल ‌जवळून पुतण्याला सोडवण्यासाठी जात होता.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

$
0
0
पैठणचे आमदार संजय वाघचौरे शेकडो समर्थकासह रविवारी पुन्हा एकदा जायकवाडी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याने, धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दंडाची रक्कम भरण्यास सवलत द्यावी

$
0
0
जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेली दंडाची रक्कम भरण्याला स्टोन क्रशर आणि खदानधारक तयार आहेत, मात्र हा दंड भरण्यात प्रशासनाने सवलत द्यावी. दंडाची रक्कम भरण्यासाठी हप्ते निश्चित करावेत, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा स्टोनक्रशर व खदानधारक संघटनेने केली आहे.

बस-ट्रकच्या अपघातात ६ जणांचा मृत्यू

$
0
0
पुसदहून लातूरकडे निघालेल्या बसला दगडी कोळसा भरून येणाऱ्या ट्रकने समोरा-समोर धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले आहेत. ही घटना नागपूर-नांदेड राज्य महामार्गावरील चुंचा गावच्या फाट्याजवळ रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

भाजपतर्फे आज जिल्ह्यात रास्ता रोको

$
0
0
भाजपच्या जिल्हा शाखेतर्फे सोमवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी दिली.

ठिबक सिंचनामुळे तरारली वरुडची शेती

$
0
0
उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, सिंचन क्षेत्रात वाढ आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी वरुडकाजी येथील बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपरिक सिंचन पद्धतीला फाटा देऊन ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.

‘राजकीय आरक्षण रद्द करा’

$
0
0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) ने लोकसभा व विधानसभा मतदार संघाचे राजकीय आरक्षण बंद करावे, अशी मागणी केली आहे. राजकीय आरक्षण रद्द झाल्याशिवाय दलितांचे ऐक्य होऊन आत्मसन्मान जागृत होणार नाही, अशी भूमिका रविवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मांडण्यात आली.

जल नियमांना आमदारांचा विरोध

$
0
0
जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्याच्या नियमांच्या विरोधात मराठवाड्यातील आमदार नागपूर अधिवेशनात आवाज उठविणार आहेत. सरकारने या नियमांमध्ये कायद्यातील समन्यायी पाणी वाटपाच्या कलमाचा समावेश करावा, अशी मागणी आमदारांनी केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images