Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नवीन जलवाहिनीचा मुहूर्त हुकला

$
0
0

नवीन जलवाहिनीचा मुहूर्त हुकला
छावणीच्या बैठकीत एक डिसेंबरपर्यंत काम सुरू करण्याचे आदेश दिले होते अध्यक्षांनी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खाम नदीतून गेलेल्या दुषित जलवाहिनीमुळे गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्यानंतर हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत नवीन जलवाहिनी तयार करण्याचा निर्णय होऊन एक डिसेंबरपर्यंत जलवाहिनीचे काम सुरू करण्याचे आदेश परिषदेच्या २४ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत अध्यक्षांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात कामच नव्हे तर कामाच्या निविदेपासून कोणतीही तयारी सध्या तरी सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काम सुरू होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
छावणी परिसरात गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आणि १० नोव्हेंबरपासून ते २४ नोव्हेंबरपर्यंत गॅस्ट्रोच्या सहा हजार रुग्णांनी केवळ छावणी परिषदेच्या रुग्णालयात उपचार घेतले. त्याशिवाय तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णांनी खासगीत उपचार घेतल्याचेही समोर आले. खाम नदीतून पुढे आलेल्या छावणीच्या दुषित जलवाहिनीतूनच गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झल्यानंतर उशिरा का होईना तेवढीच जलवाहिनी बदलण्यात आली व याच काळाच कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंत जमिनीपासून ८ ते १० फुटांवरुन व पुलाशी समांतर अशी सुमारे ४०० मिटरची नवीन जलवाहिनी तयार करण्याचा निर्णय परिषदेच्या नगरसेवकांनी परिपत्रक काढून घेतला. तसेच २४ नोव्हेंबर रोजी छावणी परिषदेच्या बैठकीमध्ये या जलवाहिनीचा विषय निघून या जलवाहिनीला मान्यता देत ४० लाखांचा निधीदेखील अध्यक्ष व ब्रिगेडिअर अनुराग विज यांनी मंजूर केला. त्याचवेळी या जलवाहिनीचे काम एक डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेशही अध्यक्षांनी दिले. मात्र गुरुवारपर्यंत (३० नोव्हेंबर) तरी काम सुरू झाले नव्हते किंवा काम सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली नव्हत्या. त्यामुळे एक डिसेंबरपर्यंत तरी काम सुरू होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नवीन जलवाहिनी नवीन वर्षात?
छावणी परिषदेचा अभियंता रजेवर असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी रजेवर राहणार असल्याचे समजते. ‘सीईओ’देखील शहराबाहेर आहे. त्यामुळे निविदा काढण्यापासूनची सर्व कामे होण्यासाठी व प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी निदान काही आठवड्यांचा कालावधी तरी लोटणार आणि नवीन जलवाहिनीसाठी नवीन वर्ष उजाडणार, अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बाजीराव नस्तानी’, ‘अखंड’ अंतिम फेरीत

$
0
0

‘बाजीराव नस्तानी’, ‘अखंड’ अंतिम फेरीत

राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत औरंगाबाद केंद्रावरील प्राथमिक फेरीत सुमीत तौर लिखित-दिग्दर्शित ‘बाजीराव नस्तानी’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. प्रवीण पाटेकर लिखित-दिग्दर्शित ‘अखंड’ नाटक दुसरे आणि रामेश्वर झिंजुर्डे दिग्दर्शित ‘एका खटल्याची साक्ष’ नाटक तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. मुंबई येथील अंतिम फेरीसाठी ‘बाजीराव नस्तानी’ व ‘अखंड’ या दोन नाटकांची निवड झाली आहे.

५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत तब्बल २१ नाटके सादर झाली. नवीन विषय आणि नवोदित रंगकर्मी असे स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. सादरीकरणात बहुतेक नाटके सरस असल्यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती. या स्पर्धेला रसिकांनीही भरभरून प्रतिसाद देत नवीन रंगकर्मींचा उत्साह वाढवला. या स्पर्धेचे निकाल सांस्कृतिक कार्य संचालनालयाने बुधवारी जाहीर केले. ‘बाजीराव नस्तानी’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. ‘अखंड’ नाटक दुसरे आणि ‘एका खटल्याची साक्ष’ नाटक तिसरे आले. या स्पर्धेचे परीक्षण उदय गोडबोले, अभिमन्यू कोयंडे व प्रतिभा नागपुरे यांनी केले. मुंबई येथील अंतिम फेरीत ‘बाजीराव नस्तानी’ आणि ‘अखंड’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

-----विजेते संघ

----नाटक

प्रथम - बाजीराव नस्तानी (सुवर्णाक्षी बहुउद्देशीय प्रतिष्ठान)

द्वितीय - अखंड (गाथा बहुउद्देशीय संस्था)

तृतीय - एका खटल्याची साक्ष (स्वरांजली नाट्य संस्था)

----दिग्दर्शन

प्रथम - प्रवीण पाटेकर (अखंड)

द्वितीय - सुमीत तौर (बाजीराव नस्तानी)

----प्रकाशयोजना

प्रथम - वाल्मिक जाधव (बाजीराव नस्तानी)

द्वितीय - अक्षय फुलझळके (वं माय)

----नेपथ्य

प्रथम - रवी बारवाल (एका खटल्याची साक्ष)

द्वितीय - उमेश राजहंस (नथिंग टू से)

----रंगभूषा

प्रथम - गीतांजली कुलकर्णी (चाणक्य विष्णूगुप्त)

द्वितीय - संजय पाटील (वं माय)

---उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक

सिद्धांत पाईकराव (बाजीराव नस्तानी)

निकीता मांजरमकर (नथिंग टू से)

----अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे

प्रियांका गंगावणे (सारी रात्र), मोहिनी सावजी (एक नवे आंदोलन), पूजा गायकवाड (ओयासिस), ज्ञानेश्वरी देशपांडे (वं माय), रामेश्वर झिंजुर्डे (एका खटल्याची साक्ष), गणेश मुंडे (अखंड), प्रितेश कोसंबे (देव चोरला माझा) व मनोज ठाकूर (सुसाट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतीचौक-रेल्वेस्टेशन ‘स्मार्ट रोड’ होणार

$
0
0

क्रांतीचौक-रेल्वेस्टेशन ‘स्मार्ट रोड’ होणार
स्मार्टसिटीच्या बैठकीत मिळाली मान्यता
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा अडीच किलोमीटरचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग ‘स्मार्ट रोड’ करण्याचा निर्णय गुरुवारी स्मार्टसिटी प्रकल्पाच्या स्पेशल पर्पज व्हेइकलच्या (एसपीव्ही) बैठकीत घेण्यात आला. स्मार्ट रोडच्या कामासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च होणार असून या कामाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
स्मार्टसिटीच्या एसपीव्हीची बैठक गुरुवारी एसपीव्हीचे मार्गदर्शक व राज्याच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन यांनी मूळ शहरात स्मार्टसिटी प्रकल्पातून कामे झाली पाहिजेत, असा मुद्दा लावून धरला. त्यानुसार क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसीत करण्याचा निर्णय एसपीव्हीच्या बैठकीत घेण्यात आला.
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम २०१२ - १३ यावर्षी करण्यात आले. सहा पदरी असलेल्या या रस्त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण करण्यात आली आहे. दुभाजकाच्या दोन्हीही बाजूला १४ - १४ मीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. १४ मीटरमध्ये साडेसात मीटरचा रस्ता काँक्रिटचा, तर साडेसहा मीटरचा रस्ता डांबराचा तयार करण्यात आला आहे. या संपूर्ण कामावर २८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील किमान एक रस्ता स्मार्ट रोड म्हणून विकसीत करण्याची तरतूद आहे. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता शहराच्या दृष्टीने आदर्श रस्ता तयार करण्यात आला आहे. हाच रस्ता स्मार्ट रोड म्हणून विकसीत करण्याची मागणी महापौर व सभागृह नेत्यांनी एसपीव्हीचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांच्याकडे केली. त्यांनीही लगेचच ही मागणी मान्य केली. त्यामुळे आता हा रस्ता ‘स्मार्ट रोड’ होणार आहे. १६ कोटी रुपये यासाठी खर्च केले जाणार असून या कामाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पोरवाल यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रस्ताव तयार झाल्यावर जास्तीत जास्त एक महिन्यात या रस्त्याचे ‘स्मार्ट रोड’ साठीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
स्मार्ट रोड मध्ये काय होणार ?
अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दोन्हीही बाजूने झाडे लावणार
वॉकिंग टॅक, सायकल ट्रॅक तयार करणार
दुभाजकाची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण
आकर्षक पद्धतीने दिवाबत्तीची व्यवस्था
संपूर्ण रस्ता सातत्याने स्वच्छ ठेवणार
पर्यटकांसाठी रस्ता आकर्षण ठरणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपदासाठी फुलंब्रीत थेट लढत

$
0
0

नगर पंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी ४१ उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी दोघांत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. नगरसेवकपदासाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे सुहास शिरसाठ व आघाडीचे राजेंद्र ठोंबरे यांच्यात नगराध्यपदाची निवडणूक रंगणार आहे.
येत्या १३ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष व १८ नगरसेवक, अशा एकूण १८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या विरोधात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने अाघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असून आठ दिवसांपासून प्रचार सुरू केला आहे. अाघाडीचे चिन्ह अद्याप निश्चित झालेले नाही, चिन्ह वाटप शुक्रवारी करण्यात येणार आहे.
उमेदवारः नगराध्यक्ष सुहास त्र्यंबकराव शिरसाठ (भाजप), राजेंद्र गंगाधर ठाेंबरे (अाघाडी), नगरसेवक-वार्डनिहाय उमेदवारः वार्ड १ एकनाथ ढाेके (भाजप), अानंदा ढाेके (अाघाडी), अनीस कुरेशी (अपक्ष), वार्ड २ द्वारका जाधव (भाजप), सुरेखा जाधव (अाघाडी) यमुना दांडगे (अपक्ष), वार्ड ३ सईद रफीक पटेल (भाजप), मुदस्सीर पटेल (अाघाडी), सय्यद अजहर अकबर (अपक्ष), अय्युब याकुब पटेल (अपक्ष), वार्ड ४ शामबाई गुंजाळ (भाजप), शांताबाई दणके (अाघाडी), सुमन भगुरे (अपक्ष), साखराबाई वडाेरे (अपक्ष), वार्ड ५ शेख रजिया गफार (भाजप), मन्सुरी सुमैय्या अलिम (अाघाडी), वार्ड ६ अश्विनी जाधव (भाजप), सुरेखा गायकवाड (अाघाडी),वार्ड ७ सविता प्रधान (भाजप), गयाबाई प्रधान (अाघाडी), शशिकलाबाई तुपे (अपक्ष), सुनंदा प्रधान (अपक्ष), वार्ड ८ इंदुबाई मिसाळ (भाजप), रुपाली बनसाेडे (अाघाडी), वार्ड ९ युनूस शाह (भाजप), अब्दुल रऊफ कुरेशी (अाघाडी), वार्ड १० जमीर पठाण (भाजप), वाजीद सय्यद (अाघाडी), अजय गंगावणे (अपक्ष), सय्यद जफरोद्दीन अफजलोद्दीन (अपक्ष), वार्ड ११ मीरा काथार (भाजप), माेहिनी काथार (अाघाडी), कुशिवर्ता काथार (अपक्ष), वार्ड १२ वैशाली शिनगारे (भाजप), कल्पना देशमुख (अाघाडी), वार्ड १३ गणेश राऊत (भाजप), संजय माेरे (अाघाडी), वार्ड १४ रत्ना साेनवणे (भाजप), मनीषा साेनवणे (अाघाडी), वार्ड १५ अजय शेरकर (भाजप) मतीन पटेल (अाघाडी), वार्ड १६ अकबर पटेल (भाजप), काशिनाथ वाघ (अाघाडी), वार्ड १७ गजानन नागरे (भाजप), राजेंद्र नागरे (अाघाडी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरती घोटाळ्यातील ‘त्या’ अधिकाऱ्यांवर दोषारोप पत्र सादर होणार

$
0
0

नोकरभरती घोटाळ्यातील ‘त्या’ अधिकाऱ्यांवर दोषारोप पत्र सादर होणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
लाड समितीच्या माध्यमातून महापालिकेत झालेल्या नोकर भरतीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अकरा अधिकाऱ्यांवर या प्रकरणात ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्या दोषारोप पत्र सादर करून विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश शासनाच्या नगर विकास खात्याने दिले आहेत.
औरंगाबाद महापालिकेत २०१० - १४ या काळात लाड समितीमार्फत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. एकूण २५० कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. नियुक्त्या देताना अनियमितता झाल्याचे आढळून आल्यावर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने सनदी अधिकारी भास्कर मुंडे यांची नियुक्ती केली. मुंडे यांनी चौकशी करून आपला अहवाल शासनाला सादर केला. त्यात अकरा अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. ठपका ठेवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये विजय जावरे (तत्कालीन उपायुक्त, प्रशासन), अजय चारठाणकर (तत्कालीन उपायुक्त महसूल), विजय जाधव (तत्कालीन मुख्य लेखा परिक्षक), रवींद्र निकम (उपायुक्त प्रशासन), सपना वसावा (तत्कालीन अस्थापना अधिकारी), सी.एम. अभंग (तत्कालीन अस्थापना अधिकारी), धनंजय आंधळे (तत्कालीन मुख्य लेखा परिक्षक), मो.रा.थत्ते (तत्कालीन मुख्य लेखा परिक्षक), ओ.सी.शिरसाट (विधी सल्लागार), नाथा चव्हाण (तत्कालीन अस्थापना अधिकारी), महावीर पाटणी (तत्कालीन अस्थापना अधिकारी) यांचा समावेश आहे.
या सर्वांवर दोषारोप पत्र सादर करून त्यांची विभागीय चौकशी तात्काळ सुरू करा असे आदेश शासनाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आतापर्यंतचे सर्वात क्रुर सरकारः राष्ट्रवादीची टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
‘राज्य व केंद्रातील सरकारमुळे शेतकरी, कष्टकरी, कामगार, लहान व्यावसायिकांसह सर्व वर्गात कमालीची नाराजी व अस्वस्थता आहे. हे आतापर्यंतचे सर्वात क्रूर सरकार आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर शिवाजी चौक येथे आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमण्यात आलेले खासगी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी राज्याचे प्रशासन ताब्यात घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या योजनांना प्राधान्यक्रम न देता बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गसारख्या योजनांकडे राज्याचा महसूल वळवला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
या मोर्चात माजी आमदार संजय वाघचौरे, प्रदेश उपाध्यक्ष महेबुब शेख, प्रदीप कंद, दत्ता भांगे, शैलेश चौधरी, विजय गोरे, डाॅ. गुलदादखाॅ पठाण, गोविंदतात्या शिंदे, अरूण काळे, कल्याण भुकेले, रघुनाथ ठोंबरे, भाऊसाहेब तरमळे, रेवननाथ कर्डिले, बालाजी नलभे, बजरंग लिंबोरे, ज्ञानेश घोडके, ज्ञानेश घोडके, जितू परदेशी आदींसह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सामील झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांचे बूट हरवतात तेव्हा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्ट सिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा बूट हरवला. हरवलेल्या बुटाची शोधमोहीम स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी हाती घेतली, पण बूट सापडला नाही. ‘स्मार्ट चोराचे’ हे कृत्य असल्याचे मानून जिल्हाधिकारी अनवाणी पायानेच कारमध्ये बसून घराकडे निघून गेले.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एसपीव्हीची बैठक गुरुवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी साडेतीनपर्यंत चालली. संशोधन केंद्रात पायात बूट किंवा चप्पल घालून जाण्यास परवानगी नाही. बूट आणि चप्पलींसाठी संशोधन केंद्राच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ व्यवस्था करण्यात आली आहे. बैठकीसाठी आलेल्या सर्वांनी या ठिकाणी आपली पादत्राणे काढली आणि ते बैठकीला जाऊन बसले. साडेतीन वाजता जेव्हा बैठक संपली तेव्हा सर्वजण बाहेर आले. प्रत्येकाने आपापली पादत्राणे घातली. जिल्हाधिकाऱ्यांचा बूट मात्र या ठिकाणी सापडला नाही. त्यांनी आजुबाजुला बुटाचा शोध घेतला, पण त्यात त्यांना यश आले नाही. एव्हाना संशोधन केंद्रात जमलेले बहुतेक प्रतिनिधी निघून गेले होते. मोजकेच सात-आठ जण उपस्थित होते. त्यांचे बूट संशोधन केंद्राच्या परिसरात होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक बुटासंदर्भात चौकशी केली. बूट चोरीला गेला की ‘रिप्लेस’ झाला याचा छडा लावल्याशिवाय आपण येथून जाणार नाही, असे म्हणत त्यांनी ‘बुट टू बुट’ चौकशी केली. त्यानंतर तो चोरीलाच गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अनवाणी पायानेच जिल्हाधिकारी कार मध्ये बसले आणि घराकडे रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारतीय संविधान परिचय’ अभ्यासक्रम डिसेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बापू-सुधा काळदाते प्रतिष्ठान आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातर्फे ‘भारतीय संविधान परिचय’ हा अभ्यासक्रम डिसेंबरपासून सुरू होत आहे. तीन महिने कालावधीचा या अभ्यासक्रमाची डिसेंबरमध्ये नवीन बॅच असेल, दर शनिवारी हा अभ्यासक्रम व्याख्यान, प्रश्नोत्तरे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे शिकविला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिष्ठानतर्फे २०१५पासून औरंगाबादमध्ये हा अभ्यासक्रम शिकविला जातो. नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, स्वतंत्र भारताच्या वाटचालीत संविधानाचे महत्त्व समजावे म्हणून अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम २४ सत्रांचा आहे. त्याची बॅच १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. माणिकचंद पहाडे महाविद्यालयाच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येक शनिवारी साडेनऊ ते दुपारी साडेचार यादरम्यान हा वर्ग चालतो.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परीक्षा घेतली जात नाही. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. एका बॅचमध्ये ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाची बॅचची सुरुवात होत असल्याने याचे उद्घाटन १५ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. एम. पी. लॉ कॉलेजमध्ये सायंकाळी साडेचार वाजता ज्येष्ठ समाजसेवक रजिया पटेल यांच्या उपस्थितीत अभ्यासक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ‘महिला आणि संविधान’ विषयावर त्या मार्गदर्शन करतील. अॅड. डॉ. कल्पलता भारस्वाडकर पाटील अध्यक्षस्थानी असतील. पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. सी. एम. राव, अण्णासाहेब खंदारे, डॉ. बी. व्ही. परांजपे, संयोजक अपर्णा कोत्तापल्ले, यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वच्छ भारत’साठी काउंटडाउन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांकडे ३१ मार्च २०१८ पर्यंत शौचालय बांधण्याच्या राज्य शासनाच्या उद्दिष्ट पूर्ततेकडे मराठवाडा वेगाने जात आहे. मात्र, अद्यापही मराठवाड्यात तब्बल तीन लाख ३० हजार कुटुंबांकडे शौचालये नाहीत.
केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनेपैकी एक असलेल्या स्वच्छ भारत मिशनची डेडलाइन संपत आली असताना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून विभागावार बैठका घेऊन केंद्राच्या योजनेला गती देण्यासाठी प्रयत्न केला. यामुळे अवघ्या दहा महिन्यांत विभागात सात लाख कुटुंबांकडे शौचालये बांधण्यात आली. आता डेडलाइन संपण्यासाठी केवळ पाच महिने शिल्लक असून या कालावधीत मराठवाड्यात तब्बल तीन लाख ३० हजार कुटुंबांकडे शौचालय बांधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र या कालावधीत विभागात अत्यंत कासवगतीने कामे झाली. एक जानेवारी २०१७ अखेर मराठवाड्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये २३ लाख ३१ हजार ३६२ कुटुंबांपैकी ११ लाख २१ हजार ७६ कुटुंबांनी (४८.०९ टक्के) शौचालये बांधले होते. मात्र त्यानंतर कामाला वेग मिळाला, आता नोव्हेंबरअखेर विभागातील १९ लाख ८७ हजार २७२ कुटुंबांनी (८५.७५ टक्के) शौचालये बाधले आहेत. जालना जिल्ह्याने आकडेवारीत तरी पहिली बाजी मारली असून रेकॉर्डनुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांनी शौचालये बांधली आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक २१ टक्के काम शिल्लक आहे. इतर जिल्ह्यातही १० ते १५ टक्के काम होणे शिल्लक आहे. मार्च २०१८ पर्यंत ग्रामीण मराठवाड्याला स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट असले तरी येत्या चार महिन्यांमध्ये तब्बल तीन लाख कुटुंबांकडे शौचालये बांधण्याचे काम पूर्ण होणे अवघड आहे. शासनाकडून या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक घरासाठी प्रोत्साहनपर १२ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच रुपयाच्या हव्यासापायी दहा हजार गमावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद:

ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला पाण्याची बाटली विकण्याचा हव्यास एका विक्रेत्याला फारच महागात पडला. थोडाथोडका नव्हे चक्क दहा हजारांचा दंड त्याला यासाठी भरावा लागला. रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना पाण्याची बाटली महागात विकताना पकडल्यावर हा दंड आकारण्यात आला.

रेल्वे स्टेशनवर विविध विक्रेते प्रवाशांना विविध पदार्थ विकत असतात. पिण्याच्या पाण्याची बाटली विकरणारेही येथे आहेत. स्टेशनवर पाण्याची बाटली १५ रुपयांतच विक्री केली जावी, अशा स्पष्ट सूचना आहेत. त्यापेक्षा जास्त किमतीला बाटली विक्री झाल्यास दंडाची तरतूद आहे. मात्र, ग्राहकांना ही बाब माहिती नसल्याचा फायदा घेत पाणी बाटली विक्रेते प्रवाशांकडून पाच-दहा रुपयांना या बाटल्या विकतात.

२४ नोव्हेंबर रोजी रेल्वे स्टेशनवर नागरसोल-नरसापूर रेल्वे आली आणि स्टेशनवरील विविध पदार्थ, पाणी बाटली विक्रेत्यांची धावपळ सुरू झाली. रेल्वेतील प्रवाशांना आपल्याकडील वस्तू विकण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. एक विक्रेता पाण्याची बाटली १५ रुपयांऐवजी २० रुपयांना विकत होता. याचवेळी रेल्वेचे वाणिज्यिक निरीक्षक धनंजय सिंह व त्यांचे पथक तपासणी करीत होते. प्रवाशांकडून पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे आकारले जात असल्याचे लक्षात येताच चौकशी करण्यात आली. संबंधित विक्रेता हा रेल्वे कॅन्टीन चालक सी. सीसया यांच्याकडे काम करीत असल्याचे या पथकाला कळाले.
रेल्वे प्रवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी निरीक्षक धनंजय संह यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. त्याने व्यवस्थित समाधानकारक उत्तरे न दिल्याने प्रवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. १५ रुपयांची बाटली २० रुपयांना विकल्याप्रकरणी दहा हजार रुपये दंड ठोठावला गेल्याने स्टेशनवरील विक्रेत्यांचे धाब दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुक्यातील सात शाखांमधील अधिकाऱ्यांनी त्रुटी दूर केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ग्रीन यादीतील पात्र तालुक्यातील ६८० लाभार्थी शेतकऱ्यांच्या सोसायटीच्या खात्यावर एक कोटी ८६ हजार रुपये एक दोन दिवसांत जमा होणार आहेत.
तालुक्यातील ९५४ थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी दोन कोटी २९ लाख ४९ हजार ९९७ रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम तालुक्यातील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात शाखेत जमा करण्यात आली आहे. बँकेमार्फत सोसायटीच्या सभासद खात्यात रक्कम जमा करून खतावणी करून बाकी मिळाली, असा शेतकऱ्यांना मोबाइलवर कर्जबाकी मिळाली असा एसएमएस पाठवला जाणार आहे. या शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेत सहभागी होण्यासाठी खुलताबाद तालुक्यातील २७ हजार ८३२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. यापैकी ९५४ थकबाकीदार शेतकरी असून ३३९० चालू बाकीदार शेतकरी आहेत. पहिल्या टप्प्यात ६८० शेतकऱ्यांच्या सोसायटीच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या याद्या अद्यायवत तसेच काही किरकोळ दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्यांनी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केलेली नाही.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांच्या सोसायटीच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत कर्जबाकी मिळालेल्या शेतकऱ्यांना मोबाइलवर एसएमएस येईल.
-अर्चना वाडेकर, सहायक निबंधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यप्रदेशातून गोवंंश तस्करी; ५० वासरे जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
गोवंश तस्करी करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीविरुद्ध बिडकीन व एमआयडीसी पैठण पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५० गोवंशासह (वासरे) २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बिडकीन पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पंडित सोनवणे सहकाऱ्यासह बुधवारी रात्री गस्त घालताना ढोरकीन गावाजवळील चमडा फॅक्टरीजवळ काही तरूण ट्रकमधून जनावरे उतरवत असल्याचे दिसले. पोलिसांनी वाहन थांबवताच पाच तरुणांनी पळ काढला, त्यांचा पाठलाग करून चौघांना ताब्यात घेण्यात आले. अबीद शकुरखा डोल, आझाद मंहमद रफिक न्याहगर (दोघे रा. मुलतानपूर, जि. मन्सोर, मध्यप्रदेश), शेख खलील शेख रशीद (रा. जमालशहा कॉलनी सिल्लोड), फेरोज सलमान शेख (रा. औरंगाबाद), अशी त्यांची नावे आहेत. त्यांना अटक केली आहे. सल्लाद्दीन शेख हा पळून गेला आहे. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली त्यात पाय बांधलेल्या अवस्थेत ५० वासरे सापडली. ही जनावरे ताब्यात घेऊन पारुडी येथील गोशाळा येथे पाठवण्यात आली आहेत. हे घटनास्थळ पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात हद्दीत असल्याने बिडकिन पोलिसांनी गोवंश व मुद्देमाल हस्तांतर केला. याप्रकरणी पाच जणाविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादेत विक्री?
ही वासरे सोमवारी मध्यप्रदेशातून आणून चमडा फॅक्टरीच्या गोदामात ठेवले होते. ते दुसऱ्या दिवशी औरंगाबादेतील कत्तलखान्यात विकण्यासाठी घेऊन जाणार होते, असे संशयित आरोपींनी सांगितले. आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्पक प्रयोगांनी वेधले लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वायू प्रदूषण, टाकाऊपासून घरगुती उपयोगात येणाऱ्या साहित्याची निर्मिती, मुलींच्या सुरक्षेसाठी मोबाइल अॅप, सुलभ सौर फवारणी यंत्र असे प्रयोग गुरुवारी भरलेल्या विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी सादर केले. सामाजिक समस्यांवर उपाय मांडणाऱ्या प्रयोगांसह सोशल मीडियाचा गैरवापराला आळा, सुरक्षित डाटा अशा भविष्यातील भेडसावणाऱ्या समस्यांची उकल करणारे प्रयोगही लक्षवेधक ठरले.

देवगिरी कॉलेजमध्ये गुरुवारी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. राज्यभरातून विविध उच्चमाध्यमिक हायस्कुल, ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले. अमरावतीच्या शिवाजी सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी धनश्री ठाकरे, मेघना राऊत यांनी ‘स्मार्टफोन मायक्रोस्कोप’ तयार केला आहे. त्यांनी मोबाइलच्या सहाय्याने सूक्ष्मदर्शकयंत्र तयार केले. वैज्ञानिक उपकरणे महाग होत असताना त्यांनी घरच्या घरी हे उपकरण तयार केले. ‘देवगिरी’च्या ओंकारसिंग विद्यार्थ्यांने महिला सुरक्षेसाठी ‘वुमन सेफ्टी’ नावाचे अॅप तयार केले. अडचणीत असल्यावर अॅप सुरू केले किंवा मोबाइलच्या बटनांना क्लिक केले की जवळच्यांना संदेश (मेसेज) व स्थळ (लोकेशन) पाठविले जाते. प्लास्टिक कचऱ्याचा रस्त्यासाठी वापर, रसायनिक किटकनाशकांचा वापर न करता तंबाखू, मिरची अशापासून सेंद्रीय किटकनाशक तयार करण्याचा प्रयोग. रेणुका जोशी या विद्यार्थिनीने प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून घरगुती कूलर तयार केला. सौर ऊर्जा, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती अशा अनेक प्रयोगांनी लक्ष वेधले.

प्रदर्शनात ३१ संघांनी यात सहभाग घेतला. उद्घाटन कार्यक्रमाला पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे, डॉ. सी. एस. पाटील, प्रा. रजनीकांत गरूड, प्रा. संभाजी कमानदार, प्रा. प्रदीप सोळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात प्रत्येक वर्षी ५० हजार मतदारांची भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात लोकसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या विविध मतदार नोंदणी मोहिमांत दरवर्षी सुमारे ५० हजार मतदार वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ नंतर जिल्ह्याच्या मतदारसंख्येत दीड लाखांची वाढ झाली आहे.

ग्रामीण भागात सिल्लोड मतदारसंघ नोंदणीत आघाडीवर असून, शहरात पश्चिम मतदारसंघात तीन वर्षांत २२ हजार ३९२, पूर्व मतदारसंघात १३ हजार, तर मध्य मतदारसंघात आठ हजार १३२ मतदार वाढले आहेत.

मतदार नोंदणी वर्षभर सुरू असते. फक्त यादी अद्ययावत करण्याचे काम दरवर्षी जानेवारी अखेरपर्यंत हाती घेण्यात येते. त्यामुळे नवीन नोंदणी करणाऱ्यांना ऑफलाइन व ऑनलाइन नोंदणी करणे सोपे झाले आहे. जिल्ह्यात २०१४मध्ये २४ लाख ८८ हजार ३७० मतदार होते. एक जानेवारी २०१७ रोजी २५ लाख ९५ हजार ६६ मतदारांची नोंदणी झाल्याचे समोर आले. ऑक्टोबर २०१७पर्यंत २६ लाख ३६ हजार ३५४ मतदारांची नोंद झाली आहे. स्थलांतरित मतदारांसाठी ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभर कनेक्टिव्हिटी असलेले सॉफ्टवेर जिल्हा निवडणूक विभागाशी जोडण्यात आले असल्याने एकाच मतदाराची देशाची अनेक ठिकाणी मतदार नोंदणी नसेल.

मतदारसंघ व मतदार
सिल्लोड ः २९९९३३
कन्नड ः ३००४२१
फुलंब्री ः ३०२८२३
औरंगाबाद मध्य ः २९४८१७
औरंगाबाद पश्चिम ः ३०९८५९
ओरंगाबाद पूर्व ः २७५४६३
पैठण ः २७८८६३
गंगापूर ः २८५८००
वैजापूर ः २८८३५६
एकूण मतदार ः २६३६३५४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआयची पुन्हा परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिकाऊ उमेदवारासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना यंदापासून ऑनलाइन परीक्षा घेतली गेली. अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच न मिळाल्याने परीक्षेलाच बसता आले नसल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांची विशेष बाब म्हणून परीक्षा घेण्याचा विचार केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘आयटीआय’मधून विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर स्थानिक कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाणारी परीक्षा यंदापासून ऑनलाइन पद्धतीने होत आहे. परीक्षा २४ आणि २५ नोव्हेंबरला झाली, परंतु अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच मिळाले नाहीत. त्यामुळे अनेकांची परीक्षेची संधी हुकली. निवड झालेल्या कंपनीमध्ये वर्षभर काम केल्यानंतर ही परीक्षा घेतली जाते. ऑनलाइन परीक्षा होणार असल्याने शिकाऊ उमेदवारांना परीक्षेसाठी संबंधित कंपन्यांनी हॉलतिकीट देणे अपेक्षित होते. यामध्ये गोंधळ उडाला अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीट न मिळाल्याने ऑनलाइन परीक्षा देता आली नाही. परीक्षा न देता आल्याने शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही. राज्यभरासह देशभरात असा गोंधळ उडाल्याने शेकडो विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न असल्याच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद येथील शासकीय ‘आयटीआय’मधील सुमारे तीन हजार विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला बसतात.

डिसेंबरमध्ये परीक्षा?
शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्रासाठीची ऑनलाइन परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याचा विचार केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. नियमितपणे वर्षभरातून दोन वेळा ही परीक्षा होते. एप्रिल व ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेतली जाते. देशपातळीवर ही परीक्षा होते. यंदा हा गोंधळ उडाल्याने पुन्हा महिनाभरात परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.

दरवर्षी परीक्षा देणारे विद्यार्थी : ३०००
ऑक्टोबरमधील विद्यार्थी : १०२८
संधी देणाऱ्या कंपन्या : २५३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परभणीतून येऊन शहरात गुन्हेगारी; एक अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील स्थानिक गुन्हेगारासोबत बाहेरगावचे गुन्हेगार कार्यरत असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने जबिंदा लॉन्सच्या पार्किंगमधून एका १७ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने साथीदारासह परभणीवरून येऊन गुन्हे केले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी एका नागरिकाचे १२ हजार रुपये लंपास केल्याची कबुली दिली.
बीड बायपास रोडवरील ‌जबिंदा लॉन्सच्या पार्किंगमध्ये एक संशयित उभा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याची झडती घेतली असता सात हजार रुपये जप्त करण्यात आले. अधिक चौकशीत हा अल्पवयीन तरूण परभणीचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली. तीन आठवड्यांपूर्वी सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिराच्या कमानीजवळ प्रभाकर जेवरीकर या निवृत्त नागरिकाच्या शबनममधून १२ हजार रुपये लंपास करण्यात आले होते. हा गुन्हा साथीदारासह केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याला सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले. या टोळीचा प्रमुख परभणी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील जाधव आहे. ही टोळी रेल्वेने शहरात दाखल होत होती. लग्न समारंभ व गर्दीच्या ठिकाणी पाकीटमारी केल्यानंतर ते पळून जात होते. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय पवार, जमादार ससाणे, पचरंडे, गावंडे, अफसर शहा, सातपुते, सानप व पिंपळे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कुटीस्वार वृद्धाचा डंपरने चिरडल्याने मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने चिरडल्याने स्कुटीवरील सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक मधुकर पंडितराव कुलकर्णी (वय ६५, रा. भगतसिंगनगर) जागीच ठार झाले. हा अपघात हर्सूल टी पॉइंट येथे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता झाला. पोलिसांचे दुर्लक्ष व हद्दीच्या वादामुळे अपघातानंतर मृतदेह अर्धा तास घटनास्थळी पडून होता.
हर्सूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर कुलकर्णी हे जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार विभागातून लिपिक म्हणून पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. त्यांच्या घरी गुरुवारी कार्यक्रम असल्याने नातेवाईक आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर एका नातेवाईकाला सोडण्यासाठी कुलकर्णी स्कुटीवरून हर्सूल टी पॉइंट येथे गेले होते. तेथून परत येताना टीव्ही सेंटरकडून हर्सूलकडे जाणाऱ्या डांबराच्या डंपरने स्कुटीला जोरदार धडक दिली. डंपरच्या चाकाखाली चिरडल्याने कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला. पळून जाणाऱ्या डंपरचालकाला नागरिकांनी पकडले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी कुलकर्णी यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सिटीचौक पोलिस ठाणे हद्दीत येत असल्याने चालक, डंपरसह हा गुन्हा वर्ग करण्यात आला. याप्रकरणी सुमीत प्रसाद यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक सय्यद अकबर सय्यद रुस्तूम (वय ४७ रा. खत्रीनगर, हर्सूल) याला अटक करण्यात आली. कुलकर्णी यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

मृतदेह अर्धा तास पडून

हर्सूल टी पॉइंट येथे चार पोलिस ठाण्याची हद्द लागते. यामध्ये हर्सूल, सिटीचौक, बेगमपुरा व सिडको पोलिस ठाण्याचा समावेश आहे. नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिल्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह हलवण्यासाठी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२वी अर्जाची प्रक्रिया उद्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत नियमित विद्यार्थ्यांसाठी अतिविलंबाने परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू होते आहे. तर, खासगी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची प्रक्रियाही याच दिवशी सुरू होणार आहे. नियमित विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरला बंद करण्यात आली होती.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०१८च्या दहावी, बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरू झाली. बारावीसाठी मुदतवाढ देत ही प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू होती. नियमित शुल्कानंतर अतिविलंबाने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते.

मंडळाची वेबसाइट अनेकदा हँग असल्याने अर्ज भरण्यास अडचणी निर्माण झाल्या. दहावीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतही अर्ज भरताना विद्यार्थी, शाळांना अडचणी आल्याचे समोर आले होते. बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. ती आता २ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, खासगी विद्यार्थ्यांचे (फॉर्म नंबर-१७) भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियाही २ डिसेंबरपासून सुरू होत आहे.

या विद्यार्थ्यांसाठी मंडळाने वेळापत्रक जाहीर केले. खासगी विद्यार्थ्यांना २ ते ११ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. विलंब शुल्कासह १२ ते १६ डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहे. शाळांना १८ डिसेंबरपर्यंत चालनद्वारे शुल्क भरावयाचे असून २१ डिसेंबरपर्यंत मंडळात विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायच्या आहेत.

अर्ज नाकारता येणार नाही
परीक्षेसाठी अर्ज काढण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले होते. मंडळाने बंधनकारक केले असले तरी, अनेकांकडे आधारकार्ड काढलेले नाहीत. काही विद्यार्थ्यांच्या अर्जातच त्रुटी आहेत. यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची धावपळ उडाली होती. मंडळाने अर्ज केलेला नोंदणी क्रमांक नमूद करण्याचे सांगितले होते. आता हमीपत्र देऊनही अर्ज भरता येणार आहे. आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून अर्ज भरणे नाकारता येणार नाही असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

अतिरिक्त शुल्क वाचले
बारावी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संपली. नियमितनंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया होते. त्यात विद्यार्थ्यांना अधिकचे शुल्क भरावे लागते. यामध्ये दर दिवसाला ठराविक दंड भरावा लागतो. मंडळाने नोव्हेंबरमध्ये ही प्रक्रिया थांबविली. विद्यार्थ्यांना आता प्रक्रिया सुरू होईल त्या दिवशीपासूनचेच शुल्क लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतिरिक्त शुल्क वाचणार असल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीत जमीन गेली, पैसे रखडले

$
0
0

समृद्धीत जमीन गेली, पैसे रखडले
शेतकरी त्रस्त, तत्काळ पैसे देण्याचा होता वायदा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या पहिल्या काही शेतकऱ्यांना तत्काळ जमिनीचा मोबदला मिळाला होता, मात्र आता शेतकऱ्यांना आपल्याच पैशांची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारामुळे कसेबसे जमीन देण्यासाठी तयार झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्केच भूसंपादन झाले असून मोबदल्याला होत असलेल्या उशिरामुळे यापुढे भूसंपादनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची अनेक मार्गांनी मनधरणी केली, यामध्ये गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी रजिस्ट्रीसाठीही पुढे आले असून काही शेतकऱ्यांना ठरलेल्या दरानुसार २४ तासांच्या आत पैसे मिळाले होते, मात्र आता परि‌स्थिती बदलली आहे. रजिसट्री झाली तरी १० ते १५ दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत.
गंगापूर तालुक्यातील इस्लामपूर या गावचे कचरूसिंग दलसिंग जारवाल यांच्या तीन एकर जमीनीपैकी ५२ आर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. १० नोव्हेंबर रोजी अधिकाऱ्यांकडून रजिस्ट्रीची संपूर्ण प्रक्रिया झटपट पार पाडण्यात आली, मात्र जारवाल यांच्या खात्यामध्ये २० दिवसानंतरही जमिनीचा मोबदला जमा झालेला नाही. जारवाल यांनी प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
२७ जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी पहिली रजिस्ट्री करण्यात आली होती. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे चारशे हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले असून रजिस्ट्रीची संख्या ६८८ अशी आहे, मात्र यातील अनेक शेतकऱ्यांना रजिस्ट्रीनंतरही मोबदला मिळाला नसल्याचे चित्र आहे.
अधिकारी काय म्हणतात
भूसंपादनानंतरही मोबदला रखडल्याच्या प्रकरणावर उपजिल्हाधिकारी एम. व्ही. आरगुडे म्हणाले की, शनिवार आणि रविवारी रजिस्ट्री करण्यात आल्यामुळे संख्या वाढली आहे. या प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे काही शेतकऱ्यांना मोबदला देण्यास वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गासाठी १० नोव्हेंबर रोजी जमीन संपादित करण्यात येऊन रजिस्ट्रीही करण्यात आली, मात्र २० दिवसानंतरही मोबदल्याची रक्कम मिळाली नाही. रक्कम मोठी आहे. अधिकाऱ्यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही.
कचरूसिंग जारवाल, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’तून ५० सिटी बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्टसिटी प्रकल्पातून ५० सिटी बस खरेदी करण्याचा निर्णय गुरुवारी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्पेशल पर्पज व्हेइकलच्या (एसपीव्ही) बैठकीत घेण्यात आला. यापैकी पाच बस जानेवारी महिन्यात सुरू करण्याचे देखील ठरविण्यात आले. सिटी बससंदर्भात नेमके धोरण ठरविण्यासाठी चार जणांची समिती याच बैठकीत स्थापन करण्यात आली. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत शहरात पूर्ण क्षमतेने सिटीबस सेवा सुरू होईल असे मानले जात आहे.

एसपीव्हीचे अध्यक्ष, उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांच्या उपस्थितीत गुरुवारी पहिलीच बैठक झाली. बैठकीला एसपीव्हीचे संचालक उपस्थित होते. त्यात जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी), पोलिस आयुक्त यशस्वी यादव, स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, विरोधी पक्षनेते फेरोज खान, पदसिद्ध संचालक प्रमोद राठोड, भाऊसाहेब जगताप, स्मार्ट सिटीचे नोडल ऑफिसर सिकंदर अली, महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता डॉ. डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता एस. पी. खन्ना यांच्यासह स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) आलेल्या सीएचटूएमएल कंपनीच्या प्रतिनिधी यांचा समावेश होता.

पोरवाल म्हणाले, ‘सिटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बस खरेदीची प्रक्रिया कशी असेल, हे एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महापालिका आयुक्तांनी ठरवावे असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली जाईल. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नवल किशोर राम, स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे, महापौर नंदकुमार घोडेले व पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सिटी बस सुरू करण्याबद्दल सविस्तर अहवाल तयार करणार आहे. ५० बस सुरू करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला’

जानेवारी महिन्यात ५०पैकी पाच बस सुरू केल्या जातील. त्यांची खरेदी ‘एसपीव्ही’च्या माध्यमातून करून त्या बस चालवण्यासाठी एस.टी. महामंडळाला दिल्या जातील. सिटी बस चालवण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सर्व्हिस प्रोव्हायडरची नियुक्ती केल्यावर एस.टी. महामंडळाकडे दिलेल्या बस परत घेतल्या जातील. बेंगळुरू मॉडेलवर सिटी बस सेवा चालवण्याचे तत्वतः मान्य करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

एसपीव्हीला स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी असणे गरजेचे आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी शासनाने प्रतिनियुक्तीवर एसपीव्हीसाठी नियुक्त करावा, असा ठराव देखील करण्यात आला. त्याची प्रत शासनाला पाठवून एसपीव्हीवर स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून घेतला जाईल असे पोरवाल म्हणाले.

एसपीव्हीच्या बैठकीत घेतलेले प्रमुख निर्णय
- सिटी बस सेवेसाठी ५० बसची खरेदी करणार.
- एसपीव्हीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी शासनाकडे विनंती करून प्रतिनियुक्तीवर घेणार
- क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित करणार
- घनकचरा व्यवस्थापनाचा अहवाल तयार करण्याचे आदेश
- ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा मास्टर प्लान तयार केला जाणार
- पालिकेच्या इमारतींवर सोलार पॅनल्स बसवण्यासाठी ५३ लाखांच्या खर्चाला मंजुरी
- एसपीव्हीचे स्वतंत्र संचालक म्हणून भास्कर मुंडे यांच्या नियुक्तीला मान्यता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images