Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

झेडपी शाळांची तपासणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी प्रशासनाने तालुकानिहाय भरारी पथकांची निर्मिती करण्याचे जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, फुलंब्री, खुलताबाद आणि पैठण तालुक्यात पथके नेमली आहेत. या पथकांकडून पाच ते सात डिसेंबरदरम्यान शाळांची तपासणी केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

शिरसे म्हणाले,‘जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत अधिक वाढ व्हावी, यासाठी आम्ही प्रशासकीय पातळीवर काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक नेमण्याचे जाहीर केल होते. ही पथके तालुक्यातील शाळांची तपासणी करून तेथील अडचणी जाणून घेतील. शाळेत काही प्रशासकीय पातळीवरील अडचणी असल्या तर त्या सोडविण्याच्या दृष्टीने भरारी पथकाकडून पाहणी केली जाईल. औरंगाबाद, फुलंब्री, खुलताबाद आणि पैठण तालुक्यात भरारी पथके नेमली असून, पाच ते सात डिसेंबरच्या काळात या पथकांकडून पाहणी केली जाईल. उर्वरित तालुक्यांमध्येही लवकरच पथके नेमण्यात येतील.’

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या योजनांचे प्रस्ताव १५ डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याबाबत शिरसे यांनी सांगितले होते. त्याबद्दल शिरसे म्हणाले,‘बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांच्या कामांची यादी अंतिम टप्प्यात आहे. पीसीआय इंडेक्सनुसार प्राधान्यक्रम ठरविला जाईल आणि या कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या जातील. तीर्थक्षेत्र विकास योजनेबद्दलही पालकमंत्र्यांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाईल. दलितवस्ती सुधार योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागविले असून लाभ न मिळालेल्या प्रस्तावांना प्राधान्य देण्यात येईल. त्याची यादी एक, दोन दिवसांत निश्चित होईल आणि १५ डिसेंबरपर्यंत ही सर्व कामे बऱ्यापैकी मार्गी लागतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलींचा ताबा रेस्क्यू फाउंडेशनकडे देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहादा येथे वेश्या व्यवसायात अडकलेल्या अल्पवयीन मुलींचा तात्पुरता ताबा रेस्क्यू फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडे देण्यात यावा आणि प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ज्युव्हेनाईल जस्टीस अॅक्ट अन्वये चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सोमवारी औरंगाबाद खंडपीठाचे प्रबंधक यांच्यासमोर या मुलींना हजर करण्यात आले आणि त्यांनी शहानिशा करून या मुलींचा ताबा रेस्क्यू फाउंडेशनला दिला.
शहादा येथे २०१४ मध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या ६८ महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी १८ मुली या अल्पवयीन असल्याचे आढळले. त्यांचा ताबा आपल्याला देण्यात यावा अशी विनंती त्यांच्या पालकांच्यावतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात करण्यात आला. सुनावणीअंती या मुलींचा ताबा त्यांच्या पालकांकडे देण्यात आला. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या या औरंगाबाद खंडपीठात रेस्क्यू फाउंडेशन या अशा महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने आव्हान दिले. सुनावणीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्यात आला. हे प्रकरण अजून उच्च न्यायालय खंडपीठात प्रलंबित आहे. या मुलींचा ताबा आपल्याला देण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका रेस्क्यू फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले.


पालक-मुलींचा आक्रोश
सोमवारी शहादा पोलिसांनी १६ मुलींना निबंधकांसमोर हजर केले. त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश वाचून दाखवून समजावून सांगण्यात आला. त्यांना मुंबईला रेस्क्यू फाउंडेशनच्या ताब्यात दिले जात असल्याचे कळल्याबरोबर मुलींबरोबर आलेल्या त्यांच्या पालकांनी एकाच आक्रोश सुरू केले. पालक आणि मुली दोघेही मोठमोठ्याने रडू लागल्याने गोंधळ निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी कौशल्याने परिस्थिती हाताळत पालक तसेच मुलींना खंडपीठ इमारतीबाहेर काढले आणि मुलींना रेस्क्यू फाउंडेशनच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा केंद्र रद्द होण्याची चिन्हे

$
0
0

औरंगाबाद : शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक हायटेक कॉपी प्रकरणात चौकशी समितीने मंडळाला अहवाल सादर केला आहे. चौकशीत कॉलेज प्रशासनावरही ठपका ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधित प्रकरणात दोषी विद्यार्थ्यांवर कारवाईसह परीक्षा केंद्रावर कारवाई निश्चित करण्यात आल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली.

तंत्रशिक्षण मंडळातर्फे पॉलिटेक्निक परीक्षेत हायटेक कॉपीप्रकरण औरंगाबादमध्ये समोर आले. शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक परीक्षा केंद्रावर हायटेक कॉपीप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर तंत्रशिक्षण सहसंचालक स्तरावरील तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. त्यांनी चौकशी करून अहवाल दिला.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याकडे मोबाइल कसा आला, यांसह सीसीटीव्ही चित्रिकरण, विद्यार्थी, शिक्षकांचे जबाव नोंदविले. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल समितीने मंडळाला सादर केला. ३० नोव्हेंबरला परीक्षा संपल्याने मंडळ काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समितीने प्रथमदर्शनी परीक्षा केंद्रावर ठपका ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; केंद्रावर परीक्षेबाबत हवी तेवढी खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे केंद्रासह, या प्रकरणात काही जणांवर कारवाई होऊ शकते. यामध्ये मंडळ परीक्षा सेंटर रद्द करून दोषी असलेल्यांना परीक्षेच्या कामकाजातून वगळू शकते.

चौकशी समितीने अहवाल मंडळाला सादर केला आहे. पोलिसांनी आमच्याकडूनही माहिती घेतली. या प्रकरणात मंडळ दोषींवर कारवाई करेल. दोषी विद्यार्थ्यांवरही कारवाई केली जाईल. त्याचबरोबर परीक्षा केंद्र रद्द करणे, संबंधित शिक्षकांना परीक्षेच्या कामकाजातून वगळणे अशा स्वरुपाची कारवाई होऊ शकते.
- आनंद पवार, उपसचिव, तंत्रशिक्षण मंडळ, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्वासने नको, लाभ देण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, वृत्तपत्र विक्रेत्यास अधिकृत लायसन्स मिळावे, शासकीय घरकूल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी (पाच डिसेंबर) वृत्तपत्र विक्रेता संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.

मंत्रालयात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या समवेत झालेल्या बैठकीत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची १५ ऑगस्टपर्यंत स्थापन करण्याची घोषणा केली होती. यानंतर संघटनेकडून अनेकवेळा स्मरणपत्रेही पाठवण्यात आली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. असंघटित कामगार असलेला वृत्तपत्र विक्रेता अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यांसह एसटी प्रवासासाठी राज्य संघटनेच्या कार्यकारणी सदस्य, पदाधिकाऱ्यांना मोफत सेवा मिळावी, संघटनेच्या बैठकीला शासकीय विश्रामगृह सवलतीच्या दरात मिळावे, विधान परिषदेवर असंघटित कामगारांचा प्रतिनिधी घ्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांना निवेदन दिले.

यावेळी ‘स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन झालेच पाहिजे’, ‘आश्वासने नको लाभ द्या’, ‘खूप झालं दुर्लक्ष, कधी देणार लक्ष’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या निदर्शनप्रसंगी शहरातील वर्तमानपत्र विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राज्यव्यापी आंदोलनाचा भाग असलेल्या या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, सचिव निलेश फाटके, कोषाध्यक्ष गणेश भोसले, आसाराम कुलकर्णी, भीमराव वायभट, माणिक कदम, गणेश भोसले, बाळासाहेब गायके, स्वागत मानकर, सारंग निकम, प्रकाश वाघ, नितीन दहाड, अमोल धामणे, मोहमद फईम, राम काळे, अनिल बरगे, शिवाजी ढेपले, चुडीवाल आदींची उपस्थिती होती.

असंघटित कामगार क्षेत्रासाठी शासनाकडे निधी पडून असून, वापर होत नाही. कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी आमची मागणी आहे. यापूर्वी तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेही मागणी केली होती.
- अण्णासाहेब जगताप, अध्यक्ष

वर्तमानपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची गरज आहे. विक्रेत्यांना सुविधा मिळाल्यास, त्याचा सर्वाधिक फायदा वयोवृद्ध विक्रेत्यांना होईल.
- निलेश फाटके, सचिव

कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्यास असंघटित क्षेत्रात कामगार असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना याचा उपयोग होईल. आम्हाला पेन्शन मिळावी, अशीही आमची मागणी आहे.
- गणेश भोसले

कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्यास गरीब वर्तमानपत्र विक्रेत्यांना सरकारी लाभ मिळणे शक्य होईल व वर्तमानपत्र विक्रेत्यांमध्ये यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
- भीमराव वायभट

शासनाने वर्तमानपत्र विक्रेत्यांसाठी मंडळ स्थापन करणे आवश्यक असून, त्याचा लाभ वयोवृद्ध विक्रेत्यांना होईल. सरकारी लाभ मिळाल्यास भविष्याची काही प्रमाणावर चिंता दूर होऊ शकेल.
- माणिक कदम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभारी कारभार संपणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘प्रभारी’ कारभार प्राधिकरणे अस्तित्वात आल्यानंतर संपण्याची चिन्ह आहेत. प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, लेखाधिकारी नियुक्ती प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. राज्यपाल कार्यालयाशी विद्यापीठ प्रशासनाने सातत्याने थेट पत्रव्यवहार करून प्रलंबित नियुक्ती प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती.

विद्यापीठ अधिसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात पोचली आहे. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. या निवडणुकीनंतर विविध प्राधिकरणे अस्तित्वात येणार आहेत. विद्यापीठात ३१ ऑगस्ट २०१४पासून अधिकार मंडळे नसल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. मागील तीन वर्षांत गैरसोयीचे निर्णय घेण्यात आले. परिणामी, विद्यार्थी आणि शैक्षणिक वर्तुळाला समस्यांचा सामना करावा लागला. अधिकार मंडळांच्या माध्यमातून प्रशासकीय निर्णयावर नियंत्रण राहणार आहे. विद्यापीठात अधिकार मंडळे व स्थायी प्रशासकीय अधिकारी नसल्यामुळे कामकाज विस्कळीत झाले. परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकपदी नऊपेक्षा जास्त प्रभारी अधिकाऱ्यांनी काम केले. सतत प्रभारी कामकाज असल्यामुळे परीक्षा आणि निकालाचा सावळागोंधळ वाढला. काही प्रभारी अधिकाऱ्यांनी वादातून अंग काढत पदाचा राजीनामा दिला. सध्या परीक्षा संचालकपदी डॉ. दिगंबर नेटके कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाला सहाय्य करण्यासाठी नेटके यांना बोलावले आहे. या स्थितीत परीक्षा संचालकाची नियुक्ती करण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करीत आहे. कुलसचिव पदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यपाल कार्यालयाने मंजुरी दिली असून, मुलाखत प्रक्रिया लवकर राबवण्यात येईल असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. लेखाधिकारी पदाची जबाबदारी डॉ. नंदकुमार राठी सांभाळत आहेत. या पदाची नियुक्ती प्रक्रिया राबवण्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात प्रक्रिया सुरू होऊन दोन महिन्यात नियुक्ती पूर्ण होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, प्र-कुलगुरू पदाच्या मुलाखती होऊन दोन महिने झाले आहेत. तीन उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून एका नावावर शिक्कामोर्तब करण्यावरून नियुक्ती रखडली आहे. उच्च गुणवत्ता आणि अनुभव असलेला उमेदवार निवडला जाणार आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार राज्यातील इतर विद्यापीठात प्र-कुलगुरुची नियुक्ती झाली आहे.

प्राधिकरणांची लगबग
सिनेट, मॅनेजमेंट कौन्सिल, अॅकॅडमिक कौन्सिल आणि बोर्ड ऑफ स्टडीज लवकरच अस्तित्वात येणार आहे. ‘सिनेट’मध्ये ३९ निवडून आलेले सदस्य, १७ नियुक्त सदस्य आणि २० अशासकीय सदस्य असे एकूण ७६ सदस्य असतील. व्यवस्थापन परिषदेत एकूण २५ सदस्य, विद्या परिषदेत ७५ सदस्य आहेत आणि अभ्यास मंडळाचे १८ सदस्य असतील. अधिकार मंडळाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कामकाजाला गती मिळणार आहे, तर प्रभारी प्रशासकीय अधिकारी असल्यास कामे रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रलंबित नियुक्त्या तातडीने करण्यासाठी प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक समायोजनाचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यानंतर शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे, परंतु आधीच्याच शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न किचकट होऊन बसला आहे. औरंगाबाद विभागात ३०० शिक्षकांपैकी केवळ १०३ शिक्षकांचे समायोजन झाले आहे.

पटसंख्या कमी झाल्याने अनेक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०१५-१६ व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विभागात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तरावरील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या ३००हून अधिक आहे.

दोन वर्षांत शिक्षण विभागाने केवळ शंभर शिक्षकांचे समायोजन केले आहे. विभागाच्या कारभारामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची फरफट होते आहे. त्यातच आता नवीन शाळा बंदचा निर्णयानंतर अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्नही समोर येणार आहे. विभागात सर्वाधिक अतिरिक्त शिक्षक औरंगाबाद व बीड ‌अशा दोन जिल्ह्यांत आहेत. समायोजनाचा संचालकांनी आढावा घेत, कारवाईच्या सूचना दिल्या.

नाव नोंदणीसाठी अधिकारी जाणार
समायोजनात संस्था सहकार्य करत नाहीत. मुख्याध्यापक, प्राचार्यांचे पगार थांबविल्यानंतरही संस्थांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने उपाय शोधला आहे. थेट शिक्षण विभागाचा अधिकारी संबंधित संस्थेत जाऊन समायोजित शिक्षकाची उपस्थिती पटावर नाव नोंदणी करेल. तशा सूचना संचालकांनी दिल्या आहेत. त्याची अमंलबजावणी शिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या पातळीवरून करायची आहे.

उच्च माध्यमिकस्तरावर ‘कला’ शाखा पुढे
प्राथमिक, माध्यमिकपेक्षा ‌उच्च माध्यमिकस्तरावर समायोजनाचा प्रश्न गंभीर आहे. विभागात मागील वर्षी ७२ शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यामध्ये केवळ १४ शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाले. उर्वरित शिक्षक समायोजनाच्या प्रतिक्षेत विभागाचे खेटे मारत आहेत. ७२ पैकी १२ शिक्षकांचे तर, विषयच नाहीत. त्यामुळे या शिक्षकांना विभागाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्यांचाही समायोजनाचा प्रश्न कायम आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभियांत्रिकी क्षेत्रात व्यापक संधी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भारतात अभियांत्रिकी क्षेत्रात काम करण्यास व्यापक संधी आहे. संशोधक विद्यार्थ्यांचा उत्साह काम करण्यास उद्युक्त करणारा आहे. सध्या रशिया सरकार भारतीय विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप योजना राबवत आहे. विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी कामगिरीसाठी संधीचा लाभ घ्यावा,’ असे प्रतिपादन रशियाचे प्रा. इफ्तीकार बी. अब्बासोव यांनी केले. ग्यान परिषदेत ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती-तंत्रज्ञान विभागात साप्ताहिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मानव संसाधन विकास मंत्रालय प्रायोजित ही ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अॅकॅडेमिक नेटवर्क्स’ (जीआयएएन) कार्यशाळा आहे. या कार्यशाळेचे सोमवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी उद‍्घाटन केले. यावेळी रशियातील सदर्न फेडरल विद्यापीठातील प्रा. इफ्तीकार बी. अब्बासोव, समन्वयक प्रा. डॉ. रत्नदीप देशमुख, विभागप्रमुख डॉ. भारती गवळी, डॉ. के. व्ही. काळे, सहसमन्वयक डॉ. सी. नम्रता यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू चोपडे यांनी आंतरराष्ट्रीय संधीवर भाष्य केले. ‘भारतीय शिक्षण व्यवस्थेत सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवणे गरजेचे असते. जगभरातील शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षकांचा परस्परसंवाद घडून आणण्यासाठी कार्यशाळा आहे. यातून समस्यांवर काम करण्यास प्रेरणा मिळेल,’ असे चोपडे म्हणाले.
देशातील उच्च शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ आणि उद्योजकांना एका मंचावर आणून ज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी ग्यानला मान्यता दिली आहे. सध्याच्या शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्ता सुधारणे, वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता वाढवणे, जागतिक उत्कृष्टतेचे सामर्थ्य वाढविणे या बाबींचे उद्दिष्ट ठेऊन संगणकशास्र व माहिती तंत्रज्ञान विभागात कार्यशाळा सुरू झाली आहे. विद्यापीठाने ‘ग्यान’कडे एकूण नऊ प्रस्ताव पाठवले होते. त्यात संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि इंग्रजी विभागाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. रत्नदीप देशमुख यांनी ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अॅकॅडेमिक नेटवर्क्स’च्या उपक्रमाची माहिती सांगून भविष्यातील फायद्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळा येत्या रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार्य करार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व सदर्न फेडरल विद्यापीठात कार्यशाळेनिमित्त सहकार्य करार करण्यात येणार आहे. या करारामुळे विद्यापीठातील संशोधकांना शैक्षणिक संधी मिळेल, असे डॉ. रत्नदीप देशमुख यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर मार्गदर्शन करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसदराचे आंदोलन चिघळले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड
उसाच्या दराचे आंदोलन माजलगावात चिघळले असून, वाढीव दरासाठी फडातील कोयता बंद करण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला. या आंदोलकांनी शहराजवळ उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवाही सोडली.
बीड जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांनी उसाचे दर जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे सातत्याने आंदोलन करत कारखान्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. यातूनच, माजलगाव तालुक्यात वाढीव दराच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती, सुकाणू समिती, शिवसेना यांच्यासह शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकरी यांच्यात बैठक झाली त्यात फडातील कोयता बंद करा असा निर्णय झाला. या आधीही शेतकरी संघर्ष समिती, शिवसेना, सुकाणू समिती व स्थानिक सर्वपक्षीय नेते आणि आणि शेतकरी यांनी साडेतीन हजार रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी विविध आंदोलने केली आहेत. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मोंढा परिसरात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी उसास भाव वाढून मिळत नाही, तोपर्यंत फडातील कोयता चालू द्यायचा नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात झाला. त्याचबरोबर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची अडवणूक करून वाहनांच्या चाकाची हवा संतप्त शेतकऱ्यांनी सोडून दिली. दरात वाढ होत नाही किंवा या प्रश्नी काही सन्मानजनक तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची तयारी दाखवल्याने आंदोलन चिघळले असून वाहतूक ठप्प झाली आहे. शहरानजीक असलेल्या परभणी फाट्याजवळ उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनास अडवून त्याच्या टायरची हवा सोडण्यात आली.
बीड जिल्हा हा ऊस मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ही पुढे आला. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊस पिकाची लागवड वाढल्याने जिल्ह्यात अर्धा डझनहून अधिक साखर कारखाने उभारले गेले आहेत. यातील जिल्ह्यातील वैद्यनाथ, माजलगाव, येडेश्वरी, एनएसएल, जय भवानी, आंबा साखर व छत्रपती असे सात साखर कारखाने या गळीत हंगामात सुरू आहेत. तर गजानन, विखे-पाटील हे दोन साखर कारखाने बंद आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वातावरणाचा तुरीला फटका

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना
मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या ओखी चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणामध्ये अचानक बदल झाला असून, सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या वातावरणात मंगळवारी दिवसभर जालन्यामध्ये सूर्यदर्शन झाले नाही. तसेच, या वातावरणाचा फटका जिल्ह्यातील ५१ हजार हेक्टर क्षेत्रावरील तुरीच्या पिकांना चांगलाच फटका बसू शकतो.
अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ओखी वादळाच्या झळा जिल्ह्यातील एकूण वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. जिल्ह्यातील वातावरणात सोमवारपासून बदल होत आहे. मंगळवारी सकाळपासून ढगांच्या दाटीवाटीने जिल्ह्यातील आकाशात गर्दी झाली होती. दिवसाच्या सुरुवातीला थंडीचा तडाखा होता मात्र दुपारपासून थंडीचा जोर कमी झाला आणि वातावरणात दमटपणा वाढला आहे.
जिल्ह्यातील दोन लाख ७९ हेक्टरमधील कापूस बोंडअळीने प्रभावित झालेला आहे, तर ढगाळ वातावरणामुळे ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर उभ्या तुरीच्या पिकांना चांगला फटका बसू शकतो. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. या ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीवर फार परिणाम होणार नाही. मात्र, खरीपाच्या तुरीवर मोठ्या प्रमाणात किड पडण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील गव्हाला ढगाळ वातावरणामुळे नुकसान होणार आहे. यंदाच्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाला आणि त्यामुळे रब्बी हंगामाच्या आशा उंचावल्या आहेत मात्र ढगाळ वातावरणामुळे हरबरा पिकावर घाटीअळी पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुक कविसंमेलन गुरुवारी रंगणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाचकांच्या उदंड प्रतिसादावर ‘महाराष्ट्र टाइम्स’ची औरंगाबाद आवृत्ती शनिवार, नऊ डिसेंबर रोजी सहावा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या आनंद सोहळ्यानिमित्त गुरुवारी ‘मटा फेसबुक कविसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मागील वर्षी राज्यभरातील कवी सहभागी झाले होते.

‘महाराष्ट्र टाइम्स’ वर्धापन दिनानिमित्त ‘मटा फेसबुक कविसंमेलन’ होणार आहे. गुरुवारी (सात डिसेंबर) सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत कविसंमेलन आहे. राज्यभरातील कवींना स्वरचित कविता फेसबुक पेजवर अपलोड करता येणार आहे. तर रसिकांना कवितांचे रसग्रहण करता येईल. दर्जेदार कवितेसाठी खास पारितोषिक आहे. मान्यवर कवी या स्पर्धेचे परीक्षण करणार असून, सर्वोत्कृष्ट पाच कवींची निवड करण्यात येईल. या कवींना प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात येणार आहे. चला, तर मग व्हा सहभागी या वैशिष्ट्यपूर्ण काव्य सोहळ्यात.

- वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच
- स्वरचित कविता असाव्यात
- दर्जेदार कवितेसाठी पारितोषिक
- फेसबुकवर ‘मटा कविसंमेलन’ पेजला भेट द्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेच्या वेळेबाबत बोर्ड ठाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावी, बारावी परीक्षेला विद्यार्थ्यांनी वेळेवरच उपस्थित राहिले पाहिजे, यावर शिक्षण मंडळाने शिक्कामोर्तब केले. याबाबत विभागीय मंडळ अध्यक्षांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, ११ वाजता परीक्षा असेल, तर विद्यार्थ्याला त्याच वेळेपर्यंत परीक्षा वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. अतिशय अपवादात्मक परिस्थितीतच प्रवेशाचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यावेळी उशिरा येण्याचे कारण तपासले जाईल, असेही मंडळाने स्पष्ट केले.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. यावर्षी परीक्षेला प्रवेश देण्याबाबत मंडळाने कठोर नियम केला आहे. सकाळी ११ वाजता परीक्षा असल्यास विद्यार्थ्यांना ११पर्यंतच परीक्षा वर्गात प्रवेश दिला जाईल. यापूर्वी पूर्वी अर्धातास उशिरा आल्यानंतरही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात असे. यावर्षीपासून ही सवलत बंद करण्यात आली आहे. हा निर्णय मागे घेण्याबाबत दबाव होता, परंतु मंडळ निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या अध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय कायम ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. निर्णयामुळे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसेल, असे मंडळाला वाटते. मंडळाचा हा निर्णय काटेकोरपणे पाळणे परीक्षा केंद्रप्रमुखांना बंधनकारक असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यालाच प्रवेश दिला जाईल, असेही मंडळातील सूत्रांनी सांगितले.

प्रश्नपत्रिका परत द्यावी लागेल
विद्यार्थ्याने परीक्षेला हजर राहण्याच्या वेळेशिवाय परीक्षेचा वर्ग सोडण्यावरही बंधन आणण्यात आले आहे. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्याला वेळ संपण्यापूर्वी वर्गातून बाहेर सोडले जाणार नाही. वर्ग सोडायचा असेल, तर प्रश्नपत्रिका संबंधित पर्यवेक्षकांकडे जमा करावी लागणार आहे. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिद्धार्थ’मधील हत्तीणींना रविवारी निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पश्चिमेकडे असलेले हत्तीघर आता सुने होणार आहे. बच्चे कंपनीचे आकर्षण असलेल्या दोन हत्तीणींना येत्या रविवारी विशाखापट्टणम येथे नेण्यात येणर आहे. हौदातील पाणी सोंडेत घेऊन पाण्याचे फवारे उडविण्याची गंमत आता छोट्या दोस्तांना पाहता येणार नाही.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील सरस्वती आणि लक्ष्मी या हत्तीणी सर्वांसाठीच आकर्षणाचे केंद्र. प्राणिसंग्रहालयात हत्तीघराच्या भिंतीभोवती उभे राहून हत्तीणींच्या लिला न्याहाळण्याऱ्या गर्दीच्या चेहऱ्यावर उत्साह, कुतूहल भरून गेलेले असायचे. गेल्या दोन दशकांपासून आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या हत्तीणींना येत्या रविवारी (दहा डिसेंबर) विशाखापट्टणम येथे पाठविण्यात येणार आहे. प्राणिसंग्रहालयात हत्ती ठेवण्यास सेंट्रल झू ऑथॅरिटीने मज्जाव केल्यामुळे त्यांना औरंगाबाद सोडावे लागणार आहे.

महापालिकेने सिद्धार्थ उद्यानाच्या परिसरात प्राणिसंग्रहालय सुरू केल्यानंतर म्हैसूर येथून १९९६मध्ये शंकर आणि सरस्वती ही हत्तीची जोडी आणण्यात आली. शंकर आणि सरस्वतीपासून नोव्हेंबर १९९७मध्ये लक्ष्मीचा जन्म झाला. शंकर, सरस्वती व लक्ष्मी हे प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण होते. प्राणिसंग्रहालयात सुरुवातीची दोन - तीन वर्षे हत्तीवरची सफर सुरू होती. आजारपणामुळे २०००मध्ये शंकरचे निधन झाले. तेव्हापासून सरस्वती आणि लक्ष्मी या दोन हत्तीणी प्राणिसंग्रहालयात आहेत. शंकरच्या मृत्युनंतर हत्तीवरची सफर बंद करण्यात आली. त्यानंतर हत्तीघराच्या परिसरात माहुताच्या मदतीने हत्तींची कसरत दाखवली जात होती. हत्तीणींना प्राणिसंग्रहालयात ठेवू नका, असे आदेश सेंट्रल झू ऑथॅरिटीने पाच वर्षांपूर्वी दिले, पण औरंगाबादेत मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. हत्ती या प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण आहेत, असे सांगून पालिकेच्या प्रशासनाने काही लोकप्रतिनिधींच्या मदतीने हत्तीणींना ठेवून घेतले होते. हत्तीणींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मंगळवारी सेंट्रल झू ऑथॅरिटीच्या नागपूर येथील कार्यालयातून असिस्टंट कंझर्वेशन ऑफ फॉरेस्ट मिसाळकर व डॉ. बावीस्कर प्राणिसंग्रहालयात आले होते. त्यांनी दोन्ही हत्तीणींची तपासणी करून विशाखापट्टणमपर्यंत प्रवास करण्यास त्या सक्षम असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार नऊ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी झुऑलॉजीकल पार्कमधील तीन माहूत औरंगाबादेत येणार आहेत. सरस्वती व लक्ष्मीला घेऊन ते रविवारी रवाना होणार आहेत.

५० हजारांचा खर्च
सरस्वती, लक्ष्मी यांना विशाखापट्टणमला नेण्याचा खर्च ५० हजार रुपये आहे. त्यांना घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था औरंगाबादेतूनच करण्यात आली आहे. वाहतुकीचा खर्च सेंट्रल झू ऑथॅरिटीतर्फे केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिलोलीच्या नगराध्यक्षा अपहारप्रकरणी कोठडीत

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नगरपालिकेतील विकासनिधीचा गैरवापर केल्याप्रकरणात, बिलोलीच्या नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनविण्यात आली आहे.
मैथिली कुलकर्णी २०१२-१३मध्ये नगराध्यक्ष असताना, त्यांच्यासह तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके, अभियंता भास्कर शिंदे, लेखापाल शंकर जाधव, लिपिक ए. जी. कुरेशी यांनी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा अधिक गैरव्यवहार केल्याची तक्रार आहे. विकासनिधीची कामे केल्याचे दाखवून बनावट बिले काढणे, रस्त्याचे काम न करता पैसे उचलणे, बैठकांना न जाता दौरे दाखवून बिले उचलणे, शासकीय निधीचा गैरव्यवहार करणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. चार महिन्यांपूर्वी बिलोली न्यायालयाच्या आदेशाने या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाला, तरी राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही होत होता. माजी नगराध्यक्ष यादराव तुडमे, नगरसेवक यशवंत गादगे यांच्यासह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आंदोलने केले. दोन आठवड्यापूर्वी आरोपींविरुद्ध कारवाई करण्यासाठी बिलोलीत मोर्चाही निघाला होता. बिलोली पोलिसांनी अभियंता भास्कर शिंदे, लिपिक ए. जी. कुरेशी या दोघांना अटक केली होती. सध्या हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
बिलोली न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांनी जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात जामिनासाठी दाद मागितली; परंतु दोन्ही न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. सोमवारी नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणातील अन्य आरोपी मुख्याधिकारी अजित डोके व सेवानिवृत्त लेखापाल शंकर जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला वगळण्यात यावे, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यावर ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या संतोष कुलकर्णी यांच्या मैथिली या पत्नी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
औरंगाबादमध्ये १५० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या व्हाइट टॉपिंग रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेतील अडथळा दूर झाला आहे. पालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढली आहे. पालिकेच्या प्रतिज्ञापत्रान्वये हमी दिल्याने याचिकेचा उद्देश सफल झाला, असे निरीक्षण नोंदवत याचिका निकाली काढली.

औरंगाबाद पालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेसंदर्भात धनजंय कांबळे यांनी सादर केलेल्या याचिकेची सुनावणी मंगळवारी न्या. रवींद्र बोर्डे व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठासमोर झाली. औरंगाबाद शहरात १५० कोटींच्या ५२ रस्त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेचा वाद औरंगाबाद खंडपीठात पोचला होता. सर्व कंत्राटदारांच्या निविदा स्वीकारण्याचे आदेश खंडपीठाने गेल्या सुनावणीच्या वेळी दिले होते. या आदेशानुसार त्या कंत्राटदारांनी निविदा भरल्याचे पालिकेने प्रतिज्ञापत्र दाखल करुन कोर्टात सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे देवदत्त पालोदकर यांनी तर पालिकेतर्फे संभाजी टोपे यांनी बाजू मांडली.

निविदेतील अटीला होता आक्षेप
महापालिकेने १५० कोटींच्या रस्त्याच्या कामासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेमध्ये, शहरालगत ६० चौरस मीटर प्रति तास सिमेंट काँक्रिट तयार करणारा प्रकल्प असलेल्या कंत्राटदारास निविदा सादर करण्याची अट समाविष्ट केली होती. ३० चौरस मीटर प्रति तास सिमेंट काँक्रिट तयार करणारे शहरालगत आठ प्रकल्प असून, त्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकल्पातून पालिकेस ६० चौरस मीटर प्रति तास सिमेंट काँक्रिट देण्याची तयार दाखवून निविदेत भाग घेऊ देण्याची विनंती केली होती, मात्र पालिका प्रशासनाने ही विनंती नाकारल्याने धनंजय कांबळे यांनी खंडपीठात याचिका केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५२ हजार शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांच्या कृषीपंपाकडे असलेल्या वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसांत औरंगाबाद विभागात ५२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

औरंगाबाद विभागात येणाऱ्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ३ लाख १७ हजार ३३१ ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे २ हजार ३६४ कोटी रुपयांची थकबाकी अनेक वर्षांपासून आहे. या वीज बिलाच्या वसुलीसाठी ऑक्टोंबरमध्ये कारवाई सुरू करण्यात आली होती. ही कारवाई सुरू होताच शेतकऱ्यांसाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजिवनी योजना जाहीर केली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना पाच हजार रुपये भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. ३० नोव्हेंबर ही योजनेची शेवटची तारीख होती. या योजनेतंर्गत तीन लाख १७ हजार वीज ग्राहकांमधून फक्त ३ हजार २९२ कृषीपंप धारकांनीच या योजनेचा लाभ घेऊन एक कोटी ७२ लाख ७१ हजार ३६२ रुपयांचा वीज बिलाचा भरणा केला आहे. औरंगाबाद शहरातील २५६ वीज ग्राहकांनी १९ लाख रुपयांचा वीज बिल भरणा करून योजनेत लाभ घेतला आहे. यानंतर कृषी संजिवनी योजनेला मुदतवाढ न मिळाल्याने, महावितरण कार्यालयाने वीज बिल वसुलीसाठी एक डिसेंबरपासून कारवाई सुरू केली. पाच दिवसांत औरंगाबाद ग्रामीणमध्ये ५० हजार ४१३ आणि जालन्यात २ हजार ५२९ अशा एकूण ५२ हजार ९४२ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्यात आल्याची माहिती माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मटा’ वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या सहा वर्षांत औरंगाबादकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. गुरुवारी (आज) फेसबुक कविसंमेलनाने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. दहा ते १५ डिसेंबरदरम्यान नाटक, संगीत कार्यक्रम, विविध विषयांवरील कार्यशाळा शहरवासीयांसाठी पर्वणी ठरणार आहेत.

वाचकांच्या पाठबळावर सुरू असलेली ही वाटचाल पाहता पाहता सहा वर्षांचे टप्पे पूर्ण करून गेली आहे. सहाव्या वर्धापनदिनानिमित्त औरंगाबादकरांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वर्धापनदिनानिमित्त यावर्षी ‘वेलकम जिंदगी’ या धमाल विनोदी कौटुंबिक नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीष ओक, मराठी चित्रपट अभिनेता अभिनेते भरत जाधव, शिवानी रांगोळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा कार्यक्रम १३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ‘एमजीएम’ च्या रुख्मिणी सभागृहात होईल. सालसा नृत्यप्रकारावर मार्गदर्शन करण्यासाठी दहा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता तरुणांसाठी कलश मंगल कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पौष्टिक पदार्थ कसे बनवावेत, याची माहिती देण्यासाठी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सिडको एन सात येथील गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये कार्यशाळा आयोजित केली आहे. चवदार,आकर्षक केक बनवायचा कसा, याचे प्रशिक्षण देण्यासाठी १२ डिसेंबर रोजी हॉटेल मॅनोर ‘केक बनवा’ कार्यशाळा घेण्यात येईल.

प्रवेशिकांसाठी सूचना
‘मटा’च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘वेलकम जिंदगी’ नाटकासाठी प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेशिका शुक्रवारी, आठ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्र टाइम्स’ कार्यालयात उपलब्ध असतील. ‘प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने प्रवेशिका दिल्या जातील. वाचक, रसिकांनी आपल्या प्रवेशिका वेळ न दवडता घेऊन जाव्यात, असे आवाहन ‘मटा’च्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बिंदूनामावली चौकशीसाठी समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी आवश्यक आलेल्या बिंदूनामावलीच्या चौकशीसाठी राज्य सरकारने जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भात नुकतेच आदेश काढले असून, विभागीय उपायुक्त (आस्थापना) हे समितीचे अध्यक्ष असतील. जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अन्य दोन अधिकऱ्यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात येईल.

झेडपी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न गेल्या एप्रिल महिन्यांपासून राज्यात गाजत आहे. यंदा बदल्या राज्यस्तरावर एकाच ठिकाणी आणि ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात आता बिंदूनामावलीचा विषय काढल्याने या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. समितीमध्ये विभागीय उपायुक्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी समितीत असतील. समितीला चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करावा लागणार आहे.

नव्या निकषानुसार बदल
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एम. बी. तपकिरे व सहकारी कर्मचाऱ्यांनी सुखदेव बनकर सीईओ असताना बिंदूनामावली तयार केली होती. सीईओंच्या स्वाक्षरीनंतर बिंदूनामावली वरिष्ठ कार्यालयाकडे तपासणीसाठी गेली. त्याचवेळी बिंदूनामावलीचा नवीन नमुना निश्चित करण्यात आला. त्यामुळे बिंदूनामावली नव्याने तयार करण्यात आली. आता या बिंदूनामावलीत नवीन निकषानुसार बदल करावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नळदुर्गच्या किल्ल्याला सचिन तेंडुलकर देणार भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याचे रुपडे सध्या पालटले असून, या किल्ल्याचे संगोपन संवर्धन करत असताना या किल्ल्याला पंचतारांकित रूप देण्यात आले असल्याने, हा किल्ला सध्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर लवकरच येणार असल्याची माहिती युनिटी मल्टिकॉन्सचे संचालक भरत जैन यांनी दिली.
या किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व हा किल्ला पर्यटन केंद्र बनावा यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजने अंतर्गत सोलापूर येथील युनिटी मल्टिकॉन्स या डेव्हलपर्स कंपनीच्या माध्यमातून सामंजस्य करारानुसार सध्या या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम
जोमाने व देखणे असे करण्यात आले आहे. तीन-चार वर्षांपूर्वी नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या किल्ल्याचे रुपडेच पार पालटून टाकले आहे. आता या
किल्ल्यात पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या किल्ल्याला खासदार सचिन तेंडुलकर यांचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे यांनी सहकुटुंब नुकतीच भेट दिली. ऐतिहासिक वारसा भावी पिढीला समजण्यासाठी युनिटी मल्टिकॉन्सने जी अपार मेहनत घेत शिवाय या किल्ल्याचे वैभव जतन करीत किल्ल्याचे रुपडे पालटविले त्याबद्धल त्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यात हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने मॉडेल ठरेल असा विश्वास रमेश पारधे यांनी या वेळी व्यक्त केला. खासदार सचिन तेंडुलकर यांना या किल्ल्याच्या भेटीसाठी घेऊन येण्याचे आश्वासनही रमेश पारधे यांनी यावेळी भरत जैन यांना दिले. यावेळी युनिटी मल्टिकॉन्सचे जनसंपर्क अधिकारी अनिल विपत, नकलाकार अंबादास कनकट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. रमेश पारधे यांनी यावेळी येथे करण्यात आलेल्या बोटिंगसहित विविध सोयी-सुविधा, साहसी क्रीडा प्रकार आदी मनोरंजन व्यवस्थेचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याचा चेहरा दोन वर्षांत बदलेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वातंत्र्यापासून कधी दिला गेला नव्हता. एवढा निधी आम्ही गेल्या तीन वर्षांत विविध विभागांना दिला आहे. काही ठिकाणी त्याचे रिझल्ट दिसत आहेत. मराठवाड्यातील काही योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन पुढील दोन वर्षांत चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केला.

अॅड. श्रीकांत अदवंत यांच्या घरी पाटील यांनी नुकतीच शहरातील तरुण उद्योजक, व्यावसायिकांशी चर्चा केली. ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष उमेश दाशरथी, उद्योजक विवेक देशपांडे, किशोर शितोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.

तरुणांच्या ग्रुपने एकत्र येऊन शहरातील विविध क्षेत्रांत पुढाकार घेऊन काही काम सुरू केले आहे. त्याची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे देण्यात आली. शहरात काँक्रिट रोड, जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, कृषी आधारित कंपन्या आहेत. भविष्यात डीएमआयसी, ऑरिक सिटी, स्मार्ट सिटी, ड्राय पोर्ट, स्कूल ऑफ आर्किटेक्चर होणार आहे. मराठवाड्यात मोठे पोटॅन्शिअल असूनही अनेक प्रकल्प विदर्भात गेल्याची खंत तरुणांनी बोलून दाखविली. त्यावर पाटील म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्रातील नेतेमंडळी सक्षम होती त्यामुळे तिकडे आजवर विकास झाला. आता विदर्भाचे पारडे जरा जड आहे. मराठवाड्यातील राजकीय मंडळींनी ठरविले की इथेही अनेक गोष्टी येणे अवघड नाही. मराठवाडा विकास मंडळ सक्षम करावे, पायाभूत सुविधा अधिक पुरवाव्यात, रस्त्यांचे जाळे अधिक सक्षमपणे विणले जावे, पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशा सूचना युवकांनी केल्या. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तुमच्या मनात काय आहे ते कागदावर उतरवा आणि माझ्या कार्यालयाकडे पाठवा. तुमच्या सूचनांचा निश्चितपणे विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

सहभागी झालेले युवक
हरिष अदवंत, रोहित दाशरथी, सौरभ भोगले, हर्षल नहार, राधिका दाशरथी, मैथिली तांबोळकर, मिहीर वैद्य, अद्वैत कंक, नितीन गुप्ता, अर्जुनसिंग पवार, सुयोग माछर, केतकी कोकिळ, पुष्कर राळेगणकर, विपुल अग्रवाल, मिहीर सौंदलगीकर, आशुतोष सोहोनी, रायठठ्ठा, ललवाणी, सुमीत जरीपटके, समीर केळकर, गौरी मिराशी, कुणाल पारटकर, हृषिकेश तावडे, सृष्टी देशमुख, भावेश वगडिया, कुणाल बुऱ्हाडे, निखिल खिंवसरा, दिव्या रायठठ्ठा, कोकिळ, स्नेहल सौंदलगीकर, ज्योत्स्ना डोडल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंठेवारी विभागात फायलींचे ढीग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विभागप्रमुख काढून घेतल्यामुळे गुंठेवारी विभागाचे काम बंद पडले आहे. विभागात फायलींचे ढीग लागले असून, त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट होऊ लागली आहे. फाइल कधी निकाली निघणार आणि घरे नियमित केव्हा होणार याबद्दल अधिकृतपणे बोलण्यास कुणीच तयार नाही.

महापालिकेच्या हद्दीत गुंठेवारीच्या वसाहती मोठ्या प्रमाणावर आहेत. ११५पैकी तब्बल ५० वॉर्ड गुंठेवारीअंतर्गत आहेत. या वसाहतींत ८० हजारांपेक्षा जास्त घरे आहेत. ही घरे नियमित करण्यासाठी महापालिकेने गुंठेवारी कक्ष उभारला आहे, परंतु एक वर्षापासून हा कक्ष कार्यरत नसल्याचे चित्र आहे. गुंठेवारी विभागाला एक प्रमुख अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. त्यांच्या हाताखाली आवश्यक कर्मचारीवर्ग देखील देण्यात आला होता, परंतु एक वर्षापासून गुंठेवारी विभागाला कुणीही प्रमुख अधिकारी राहिलेला नाही. नगररचना विभागात काम करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांना शहरातील गुंठेवारीचे विभाग वाटून देण्यात आले आहेत. गुंठेवारीअंतर्गत घरे नियमित करण्यासंदर्भात नागरिकांनी सादर केलेल्या फाइल निकाली काढण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांवर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या अभियंत्यांचे लक्ष गुंठेवारी विभागापेक्षा नगररचना विभागातच अधिक आहे. बांधकाम परवाने, भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ‘प्रतिसाद’ देताना त्यांना गुंठेवारी विभागासाठी वेळ देता येत नाही. गुंठेवारी विभागात तीन सबओर्सिअर व एक ट्रेसरची नियुक्ती करण्यात आली आहे. सबओर्सिअर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली अतिक्रमण हटाव विभागात करण्यात आली आहे. त्यामुळे गुंठेवारी भागात जाऊन घरे नियमित करून घेण्यासाठीची शिबिरे देखील बंद पडली आहेत. गेल्या सुमारे आठ - दहा महिन्यांत गुंठेवारी भागात शिबिरांचे आयोजन झालेले नाही. शिबिरांचे आयोजन करा, अशी मागणी नगरसेवकांची असते, पण शिबिरांचे आयोजन करणारे कर्मचारीच या विभागात कार्यरत नसल्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.

गुंठेवारी विभागात ५००हून अधिक फाइल प्रलंबित आहेत. याशिवाय विविध वॉर्ड कार्यालयांमध्ये देखील फायलींचे ढीग लागलेले आहेत. फायली निकाली निघत नसल्यामुळे घरे नियमित होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुंठेवारी विभागाचे काम विस्कळित झाले आहे ही बाब खरी आहे. प्रशासनाने या विभागातील काही अनुभवी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याचा परिणाम कामावर होत आहे. गुंठेवारीअंतर्गत घरे नियमित करण्यासाठी शहराच्या विविध भागात शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी आहे. हा विभाग सक्षम करण्यासाठी मी स्वतः लक्ष देणार आहे.
- गजानन बारवाल, स्थायी समिती सभापती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images