Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आयुक्तांनी केली रस्त्यांची पाहणी

$
0
0
महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मंगळवारी पैठणगेट, गुलमंडी, दिवाणदेवडी या रस्त्यांची पाहणी केली. पैठणगेट परिसरातील रस्त्यावरची अतिक्रमणे हटवण्याची कारवाई तात्काळ केली जाईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

हवी मुख्यमंत्र्यांची वेळ

$
0
0
समांतर जलवाहिनीच्या ‘पीपीपी’ प्रकल्पाला मान्यता द्यावी, वॉटर बायलॉज मंजूर करा, या मागणीबरोबरच शहरातील रस्त्यांच्या कामाला अनुदान द्या, या मागणीसाठी पालिकेचे पदाधिकारी महापौर कला ओझा यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटणार आहे.

‘समांतर’साठी समन्वय समिती

$
0
0
समांतर जलवाहिनीच्या संदर्भात गुत्तेदार व शासन यांच्यात होणाऱ्या पत्रव्यवहाराबद्दल व योजनेच्या संदर्भात वेळोवेळी होणाऱ्या प्रगतीची माहिती नगरसेवकांपर्यंत पोचवावी यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय पालिकेच्या १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.

आता डिफर्ड पेमेंटचे रस्ते नाहीत

$
0
0
शहरात यापुढे डिफर्ड पेमेंटचे रस्ते होणार नाहीत, असे स्पष्ट संकेत पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वर्धापनदिनी ९ डिसेंबर रोजी शुभेच्छा देण्यासाठी डॉ. कांबळे ‘मटा’च्या कार्यालयात आले होते, या वेळी त्यांनी ‘मटा’तील संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा केली. पालिकेच्या आगामी काळातील काही उपक्रमांबद्दल माहिती दिली.

तरुणाला चौघांनी विष पाजले

$
0
0
तरुणाला जबरदस्तीने विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी रात्री मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन भागात घडला. या घटनेतील अत्यवस्थ तरुणावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून मेडिकल पोलिस चौकीमध्ये नोंद करण्यात आली आहे.

औषध विक्रेत्यांचे ‘बंद’चे हत्यार

$
0
0
कायद्याचा बडगा दाखवून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) औषध व्यावसायिकांस वेठीस धरत आहे, असा आरोप करून औषध विक्रेत्यांनी येत्या सोमवारपासून (१६ डिसेंबर) तीन दिवस शटर डाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कुख्यात गुंड भुऱ्यास दोन वर्ष सक्तमजुरी

$
0
0
चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपये पळवणाऱ्या अट्टल गुन्हेगार भुऱ्याला मुख्य न्यायदंडाधीकारी जी.जी. भालचंद्र यांनी दोन वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेम योजना

$
0
0
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेम योजना लागू झाली असून त्यात दोन लाख रुपयापर्यंतची विम्याची तरतूद करण्यात आली आहे. कामगार व त्याच्या कुंटुबियांना या योजनेचा लाभ मिळणार असून सुमारे तीन हजार नोंदीत कामगारांचे कार्ड कार्यालयात उपलब्ध झाले आहेत.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण

$
0
0
मावसाळा (ता. खुलताबाद) येथील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अखिल भारतीय बौद्ध धम्म ज्ञानसागर प्रसारक मंडळातर्फे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी ‘मनसे’चा रास्ता रोको

$
0
0
सार्वजनिक बांधकाम खात्याकडे महिनाभरापूर्वी केलेल्या मागणीची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी चापानेर येथे रास्ता रोको आंदोलन केले. नायब तहसीलदार प्रमोद जोशी यांच्यामार्फत मिळालेल्या आश्वासन पत्रानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कर्मचा-यांच्या गैरहजेरीबद्दल तक्रार

$
0
0
तालुक्यातील शासकीय कार्यालयातील संबंधित अधिकरी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

नगरसेविकेची अनोखी गांधीगिरी

$
0
0
वॉर्ड इंजिनीअर भेटत नाही, वॉर्डातील साफसफाईकडे लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार करत गांधीनगर वॉर्डच्या नगरसेविका कविता जाधव यांनी पालिकेच्या वॉर्ड ‘ड’ कार्यालयाचे वॉर्ड अधिकारी एस. आर. जरारे यांना हार घालून गांधीगिरी केली.

विकासकामांसाठी शंभर कोटी

$
0
0
पाच वर्षांच्या विकासकामांच्या नियोजनासाठी औरंगाबाद महापालिकेला शंभर कोटी रुपये मिळू शकतील, असे सांगून चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी औरंगाबाद महापालिकेला दिलासा दिला आहे.

कचऱ्याचा प्रश्न भडकणार

$
0
0
वेतन थकल्यामुळे सिडको भागातील बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सफाई मजुरांनी काम बंद केले आहे. त्यामुळे सिडको हडको भागात कचऱ्याचा प्रश्न भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इस्त्रायली अधिका-यांकडून पाहणी

$
0
0
इस्त्रायल देशाचे अधिकारी युरी रोबिन्स्तन (अम्बसे ऑफ इस्रायल) व योनाथन मिलार यांनी हिमायतबाग येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्रास नुकतीच भेट देत पाहणी केली. या केंद्राद्वारे अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, हे केंद्र आदर्श केंद्र ठरावे, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पार्किंग शुल्काला मनसेचा विरोध

$
0
0
शहरातील अनेक महाविद्यालयाच्या वाहन पार्किंगमध्ये विद्यार्थ्यांना दररोज पाच ते दहा रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.

रस्त्यांची दुर्दशा विधिमंडळात

$
0
0
शहरातील पालिकेच्या हद्दीतील रस्त्यांच्या दुर्दशेचा प्रश्न नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे. विधान परिषदेत स्थानिक आमदारांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.

पाण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा

$
0
0
कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचा भीमा-निरा स्थिरीकरण प्रकल्पाशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे तो रद्द झाला तरी कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे काम चालूच राहावे. आमच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केली.

सात दगड खदानी ‘सील’

$
0
0
तालुक्यातील सात दगड खदान, स्टोन क्रशर सील करण्याची धडाकेबाज कारवाई उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांनी केली.

तिसऱ्या जगात’ खळबळ

$
0
0
रुढार्थाने तृतीयपंथी नसणारे; पण ‘तिसरे’ असे सुमारे दोन हजार जण शहरात असून त्यांचे वेगवेगळे ग्रुप कार्यरत आहेत. या मंडळींची एक कम्युनिटीच तयार झाली असून समाज स्वीकारत नसला तरी, छोटेसे जग तयार करून ते आनंद मिळवित आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images