Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ प्रवाहाच्या विरोधात पोहायला शिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
युवकांनी स्वतःमधील सुप्तगुण ओळखून जिद्दीने मेहनत करावी. कामे करताना अडचणी येतच असतात, त्यावर मात करून पुढे जावे. प्रवाहाच्या विरोधात पोहायला शिकावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेंकर यांनी केले.
निलंगा येथील आक्का फांऊडेशन व पुणे येथील मराठवाडा युवा मंचच्या वतीने आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. या मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इटनकर, पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड, वस्तु व सेवाकर आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, नांदेडचे कार्यकारी अभियंता आनंद बिराजदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्यासह बालाजी जाधव, जब्बार शेख, परमेश्वर हासबे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तीने स्वतःसोबत इतरांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. दुसयाचे कल्याण झाले तर त्यातच आपले हीत आहे. हे करत असताना स्वतःमधील इच्छा शक्ती जागृत ठेवण्याची गरज आहे. याच माध्यमातून करिअर घडू शकते. राजकीय क्षेत्रात पदे मिळवायचे असतील तर प्रवाहाच्या विरोधात पोहायला येणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. करिअर बनवण्यामध्ये निसर्गाकडून ज्या बाबी आपल्याला मिळाल्या त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. नैसर्गिक बाबी म्हणजेच स्वतःचे शरीर हे त्याचे उत्कृष्ट माध्यम आहे. त्या अनुषंगाने करिअर बनविण्यासाठी प्रयत्न करा.’
करिअर घडवित असताना प्रत्येकाने नियोजन केले पाहिजे. आपले भविष्य ठरवित असताना तीन वेगवेगळे प्लॅन बनवून ठेवा. एखादा अपयश झाला तर परत प्लॅननुसार काम करा नव्या शिकण्याची इच्छा कायम ठेवा असेही ते म्हणाले. यापूर्वी काळात जिल्ह्यातील नगर पालिकेच्या माध्यमातून युवकांसाठी एमपीएससी व युपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले. महिलांमध्ये उद्योजकता भरपूर असते. घरातील कामे करताना त्यांचे कौशल्य दिसून येते, हेच कौशल्य इतर क्षेत्रातही वापरण्याची गरज असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक सत्यजीत चौधरी व सूत्रसंचलन शेषेराव ममाळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ठिबक’मुळे उत्पन्नात वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात आता ठिबक सिंचन पद्धती वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. एकट्या तेलंगणामध्ये हा प्रयोग अधिक सक्षमपणे राबवला आणि यशस्वी झाल्याचे मत हैदराबादमधील ‘पीजेटीएसयू’चे उपकुलगुरू डॉ. प्रवीण राव यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

वॉटर अँड लँड मॅनेजेंट इन्स्टिटयूट (वाल्मी) येथे तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी ‘इनोव्हेशन इन इफिशिअंट वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट’ या विषयावर विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात डॉ. राव बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘तेलंगणाने प्रगती केली आहे. ठिबक सिंचनामुळे शेतीउत्पादन सातत्याने वाढत आहे. तिपटीने उत्पादन वाढल्याने राहणीमान उंचावले आहे. असेच प्रयोग देशातील इतर सर्व राज्यात व्हावेत आणि शेती अधिक उत्पादन देणारा उद्योग व्हावा.’

यावेळी अध्यक्षस्थानी ओहिओ स्टेट युनिवर्सिटीचे डॉ. रतनलाल होते. परिसंवादात ‘आयसीआयडी’ डॉ. अविनाश त्यागी, जळगावच्या जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, परभणीचे डॉ. यू. एम. खोडके यांनी विचार मांडले. त्यागी यांनी हवामान बदल यावर सादरीकरण केले. सोमनाथ जाधव यांनी जैन इरिगेशनद्वारे विविध संशोधन आणि ठिबक सिंचनावरील उत्पादनांसंबंधी माहिती दिली. ई-वॉटर कम्प्युटर सोल्युशन सॉफ्टवेअर यावर ऑस्ट्रेलियातील डॉ. कार्ला डेमन यांनी विचार मांडले. पाणी व्यवस्थापन आणि त्यासमोरील आव्हाने यावर राहुरीतील डॉ. सुनील गोरंटीवार यांनी विचार मांडले. डॉ. रतन लाल यांनी सर्वांच्या प्रेझेंटेशनचा आढावा घेत अध्यक्षीय समारोप केला.

परिसंवादात तांत्रिक सेमिनार अधिक
दुसऱ्या दिवशी चार परिसंवाद झाले. हे सर्व परिसंवाद तांत्रिक मुद्यांवर आधारित होते. या सर्व स‌ेमिनारला राज्यासह देशांतील ४००हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. यात विविध संशोधन अहवाल, पॉवर पाइंट प्रेझेंटेशन, सांख्यिकी तुलना आणि विकासावर भर दिला गेला. जल आणि मृदा व्यवस्थापनावर भर द्यावा, असा सूर या परिसंवादातून निघाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला पुन्हा हुडहूडी; पारा पुन्हा घसरणार

0
0

दिवसा ऊन आणि सूर्य माळवताच थंडी असे वातावरण शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभर शहराचे तापमान स्थिर होते, मात्र रविवारपासून (१७ डिसेंबर) पुन्हा एकदा शहराला हुडहुडी भरली आहे. येत्या दोन, तीन दिवसांत पुन्हा तापमानात मोठी घट होणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले. रविवारी शहराचे किमान तापमान १४ अंश सेल्सियस नोंदवले गेले.
सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका असे काहीसे वातावरण गेल्या आठवड्याभरापासून गायब झाले होते. हवामान अभ्यासकांनुसार उत्तर भारतामध्ये नुकत्याच थंडीला सुरुवात झाली असून येत्या दोन, तीन दिवसांमध्ये शहराचे वाढलेले तापमानात कमी होण्यास सुरुवात होईल व पुन्हा थंडीला सुरुवात होईल. परतीच्या पावसानंतर यंदा थंडीची उशिराने चाहुल लागली. नोव्हेंबर महिन्यात दिवसा ऊन आणि सायंकाळी सूर्य मावळताच थंडीची सुरुवात झाली, मात्र गेल्या काही दिवसांपासून पहाटे पडणारी थंडी गायब होऊन दुपारी उन्हाचा कडाका वाढला होता. रात्रीही अत्यल्प थंडी जाणवत होती, वातावरणात अचानक झालेल्या या बदलांमुळे कानटोपी, स्वेटर, मफलर आता पुन्हा कपाटात ठेवण्याची वेळ आली होती. मात्र, आता पुन्हा तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

तापमानात घट

औरंगाबाद शहरामध्ये नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये किमान तापमान २० ते २१ अंश सेल्यियस दरम्यान होते. त्यानंतर मात्र तापमानात सातत्याने चढ उतार जाणवत होता. मध्यंतरी आलेल्या ओखी वादळामुळे शहरासह मराठवाड्याच्या तापमानात अचानक बदल झाला होता.

पश्चिमी विक्षोपाचे वारे ढगाळ वातावरण घेऊन आले असून त्यामुळे अनेक शहरांमध्ये धुके पसरले आहे. वातावरण स्वच्छ नसल्यामुळे थंडीचा प्रभाव जाणवला नाही. हवामानखात्याच्या माहितीनुसार २१ डिसेंबरपासून हिवाळा सुरू होतो. आता उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये पारा घसरला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये औरंगाबादसह विभागात थंडी वाढण्यास सुरुवात होईल.
-श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक

असे होते तापमान

दिनांक…… किमान तापमान
१२ डिसेंबर…………१६.६
१३ डिसेंबर…………१५.४
१४ डिसेंबर…………..१६.२
१५ डिसेंबर………….१६.२
१६ डिसेंबर………….१५.४
१७ डिसेंबर……………१४.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड तालुक्याची पैसेवारी ५०च्या आत

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड तालुक्याची अंतिम पैसेवारी प्रशासनाने नुकतीच ५०च्या आत काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ही माहिती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली. तालुक्याची नजर पैसेवारी नोव्हेंबर महिन्यात ७२ पैसे काढण्यात आली होती.
तालुक्यात यंदा कमी पाऊस पडल्याने दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. रिमझिम पावसाने खरिपाचे उत्पादन घटले. मका हातून गेला, तर कपाशीची वाढ खुंटली. त्यावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती असताना पैसेवारी ७२ पैसे काढण्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त करण्यात येत होता. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन याबद्दल हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. दरम्यान, काँग्रेसेने तहसील कार्यालयावर काढलेल्या जनआक्रोश मोर्चात हा मुद्दा उपस्थित केला होता. पैसेवारी जास्त असल्याने शासकीय मदत मिळणार नसल्याचा अंदाज होता. काँग्रेसच्या मोर्चानंतर महसूल प्रशासनाने शुक्रवारी सिल्लोड तालुक्याची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा साहित्य परिषदेचे ३९वे साहित्य संमेलन अंबाजोगाईत

0
0

मराठवाडा साहित्य परिषदेचे ३९वे साहित्य संमेलन अंबाजोगाईत
लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार
अध्यक्षस्थानी प्रा. रंगनाथ तिवारी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंबाजोगाई येथे २४ आणि २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद‍्घाटन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (पालवे) यांच्या हस्ते तर खासदार रजनी पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, पद्मश्री ना. धो. महानोर, साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी येथे होणार आहे.
बीड जिल्हा शिक्षण परिषद विभाग व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने अंबाजोगाई येथे २४ आणि २५ डिसेंबर रोजी मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या साहित्य संमेलनाची सुरुवात २४ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी आठला जागरदिंडी (अन्नदाता सुखी भव) ने करण्यात येणार आहे. या जागर दिंडीचा शुभारंभ मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते तर ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर आणि महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुवर्णा खरात, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सकाळी दहा वाजता संमेलनस्थळी आयेाजित करण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष ख्यातनाम साहित्यिक प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री सुरेश धस हे उपस्थित राहणार आहेत.

मराठवाडा साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ सकाळी साडेदहा वाजता आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ सभागृह (बाबासाहेब परांजपे व्यासपीठ) या ठिकाणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी हे राहणार असून या कार्यक्रमास संमेलनाचे मावळते अध्यक्ष माजी खा. प्राचार्य डॉ. जे. एम. वाघमारे, रजनीताई पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, पद्मश्री ना. धो. महानोर हे राहणार असून विशेष उपस्थिती म्हणून आ. जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख, सविताताई गोल्हार (अध्यक्षा, जि.प.बीड), रचना मोदी (नगराध्यक्ष, न.प.अंबाजोगाई), जयश्री मस्के (उपाध्यक्ष, जि.प.बीड), शोभा दरेकर (सभापती, महिला व बालकल्याण, बीड), धनराज निला (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड) हे उपस्थित राहणार आहेत.

दुपारी दोन वाजता स्वामी रामानंद तीर्थ सभागृह येथे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी जगदीश कदम हे राहणार असून या संमेलनात मराठवाड्यातील प्रतिथयश कवींचा सहभाग राहणार आहे.
‘संत साहित्याने निर्माण केलेली संस्कारशिलता आजच्या बुवाबाजीने नष्ट केली आहे!’, ‘१९७५ नंतरच्या शिक्षणातून नैतिक मूल्ये गायब झाली आहेत.’ या विषयावरील परिसंवाद, शिक्षकांचे कथाकथन, साहित्यिकांचे कथाकथन, शिक्षकांचे कविसंमेलन यासह सायंकाळी साडेसात वाजता राजेश सरकटे निर्मित ‘चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली’ मराठवाड्यातील मराठी कवीतेचा पहिल्या चारशे वर्षांचा इतिहास उलगडणाऱ्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राजेश सरकटे, वैशाली देशमुख, संगीता भावसार यांचे कविता गायन होणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात सकाळी नऊ वाजता प्रख्यात साहित्यिक चंद्रकांत पाटील, (औरंगाबाद) यांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे. चंद्रकांत पाटील यांची मुलाखत रणधीर शिंदे (कोल्हापूर), आसाराम लोमटे (परभणी), तुषार बोडखे (औरंगाबाद) हे घेणार आहेत. यानंतर ‘ग्रामीण शिक्षण ः समस्या आणि उपाय’ या विषयावरील परिसंवाद आयोजित केला आहे.
या संमेलनाचा समारोप स्वामी रामानंद तीर्थ सभागृह येथे प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रीतम मुंडे, अक्षयकुमार काळे, नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या समारोप कार्यक्रमात लक्ष्मीकांत देशमुख (नवनिर्वाचित अध्यक्ष, ९१ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन, बडोदा) यांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, विनायक मेटे, बदामराव पंडित (माजी मंत्री), राजकिशोर मोदी, रामचंद्र तिरुके (उपाध्यक्ष, जि. प. लातूर), संजय दौंड, विलास सोनवणे, हनुमंत मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमास मराठवाड्यातील साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येन उपस्थित रहावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य विभागाचे सभापती राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष अमर हबीब, कार्यवाह दगडू लोमटे व संयोजन समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमा कोरेगावपासून स्फूर्ती मिळतेः राधिका वेमुला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भीमा कोरेगावच्या लढाईत दलितांनी शौर्य गाजवले, पेशवाई विरोधात लढवलेल्या लढाईपासून स्फूर्ती‌ मिळते, असे प्रतिपादन राधिका वेमुला यांनी केले.
भीमा कोरेगाव लढाईच्या विजयाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा ‌अभियान समितीतर्फे रविवारी निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी राधिका वेमुला बोलत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमासाठी वीरा साथीदार, संजय मोहिते, रमेशभाई खंडागळे, वाजेद कादरी, अॅड. डी. व्ही. खिल्लारे, संघदीप रोडगे आदींची मंचावर उपस्थिती होती.
कधीही घराबाहेर न पडणारी मी, मुलगा रोहितच्या बलिदानानंतर देशाच्या अनेक भागात जाण्याची संधी मिळाली. आज या कार्यक्रमासाठीही मला रोहितची आई म्हणूनच बोलावण्यात आल्याचे राधिका वेमुला यांनी सांगितले. भीमा कोरेगावपासून स्फूर्ती मिळते. आज जे लोक दलित चळवळ कमकुवत असल्याचे म्हणतात, ते आंधळे असून देशातील सर्व बहुजन एकत्र आल्यास आमची संख्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक होते. मुस्लिम, ख्रिश्चन समाजातील दलितांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला दलित संग्राम केला होता, त्यानंतर दुसरा संग्राम पँथर्स तसेच कांशीराम यांनी केला, तर तिसरा संग्राम रोहित वेमुलाने केला. रोहितच्या बलिदानामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली व देशात तरूण नेते निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लढा देण्यासाठी संयम बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राधिका वेमुला यांनी तेलगू भाषेतून केलेल्या भाषणाचे भाषांतर सुदिप्तो मंडल यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी समता कला मंच यांच्या आंबेडकरी विद्रोही शाहिरीने रंगत आणली.

रोहित बलिदान दिन

भीमा कोरेगावच्या युद्धात जसे दलितांना शहीद म्हटले जाते, त्याच प्रमाणे रोहितलाही शहीद संबोधण्यात यावे. तसेच १७ जानेवारीला रोहित बलिदान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करा, शक्य झाल्यास हैदराबादला यावे असे आवाहन राधिका वेमुला यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगे हत्याकांड प्रकरणी धरणे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नितीन आगे हत्याकांड प्रकरणाची उच्च व सुप्रीम कोर्टात जदलगतीने चालविण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष सुटणे हे सरकारी यंत्रणेचे व शासनाचे मोठे अपयश आहे, असे आंदोलकांनी नमूद केले. राजकीय दबावात चौकशी केल्याने खटल्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या का, असा सवाल करत याप्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. निकाल लागेपर्यंत पीडित कुटुंबास संरक्षण द्यावे, अॅट्रासिटी प्रकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कोर्ट असावे, अनुसुचित जाती-जमातीवर होणारे अत्याचाराचे प्रकार पाहता जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. अॅड. जयश्री शिंदे, डॉ. कांचनकुमार भाग्यवंत, सिद्धार्थ शिनगारे, स्वप्निल घुमरे, विशाल राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनाच्या बाबतीत मराठवाड्यावर अन्याय

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील सिंचनामध्ये झालेल्या अनुशेषात मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे. दुर्दैवाने याकडे एकही राजकीय पक्ष गांभीर्याने पाहत नाही. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेले तरीही आमचा अनुशेष भरून काढलेला नाही. २० हजार कोटी रुपयांपर्यंत झालेला अनुशेष तत्काळ दूर करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)चे प्रदेशाध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गायकवाड यांनी मराठवाड्याच्या सिंचनाचा विषय अतिशय सविस्तरपणे मांडला. मागास असलेल्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व गुजरात येथील सौराष्ट्र, कच्छ भागासाठी घटनेच्या ३७१ व्या कलमानुसार वैज्ञानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. मराठवाड्याचा अनुशेष मात्र अद्याप भरून काढलेला नाही. १९८३ मध्ये दांडेकर समितीच्या अहवालानुसार अनुशेष ७५१ कोटींवर होता. १९९४ ते २००० मध्ये अनुशेष समितीने दिलेल्या अहवालानुसार, अनुशेष ४००५ कोटींवर पोचला. २०११ मध्ये केळकर समितीच्या नोंदीनुसार १५ हजार ६३१ कोटी, तर २०१७ मध्ये केळकर समितीने दिलेल्या अहवालानुसार मराठवाड्याचा अनुशेष २० हजार कोटींवर पोचला आहे. २०१७ च्या अर्थसंकल्पात सिंचन, आत्महत्या प्रवण क्षेत्रासाठी एकूण ३२१४ कोटी म्हणजे अनुशेषाच्या १२ टक्के तरतूद केली गेली आहे. मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८८ लाख आहे. सिंचन होऊ शकणारे क्षेत्र ५९.३० लाख हेक्टर आहे. आजवर केवळ १०.०१ लाख हेक्टर क्षेत्रातच सिंचन निर्मिती होऊ शकली. २०२८ पर्यंत १४.६४ लाख हेक्टर प्रस्तावित आहे. हे मूळ गरजेच्या २३ टक्के होईल, असे गायकवाड यांनी नमूद केले.
शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी या विषयावर सगळीकडे बोलले जाते, पण प्रत्यक्ष काम करणाऱ्या शेतमजुरांच्या आत्महत्या किंवा कर्जमाफीच्या वाट्याचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. २० हजार कोटींपर्यंत असलेला अनुशेष तत्काळ दूर करावा, ८.६० लाख हेक्टर सिंचन अनुशेष तत्काळ दूर करावा, शेतकरी कर्जमाफी व अन्य सरकारी लाभांमध्ये शेजमजुरांना वाटा निश्चित करावा आदी ठराव गायकवाड यांनी सर्वसाधारण सभेत मांडले. त्यास सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.

यामुळेच विकास खुंटला

सिंचन क्षेत्राचा २० टक्के अनुशेष व १५६३१ कोटी रुपयांचा भौतिक निधीचा अनुशेष हेच विकास न होण्याचे मुख्य कारण आहे. शेतकरी आत्महत्येचे सर्वात जास्त प्रमाण असण्याचे कारणही हेच असल्याचे रमेश गायकवाड यांनी सभागृहात सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मातंग समाजाचे सर्व प्रश्न सोडविणार-बागडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मातंग समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढण्यास प्राधान्य देईल. मातंग समाजाच्या तरुणांनी शिक्षण घेऊन उच्चपदे काबीज करावी आणि समाजाचा विकास करावा, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी येथे केले.
महापालिकेच्या वतीने २५ लाख रुपये खर्च करून लेबर कॉलनी परिसरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्‍घाटन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, रिपाईंचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम, जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, राजू शिंदे, विजय मगरे, श्रावण गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती.
सावे, कदम, ठोकळ यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. सोहळ्यासाठी विलास सौदागर, रमेश चांदणे, कमलेश चांदणे, रवी चांदणे, सूरज पाखरे, सुमित भटकर, हडसन काळे, नितीन दाभाडे, अण्णा वाघुले, महेंद्र तुपे, प्रशांत मनोहर आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांकडूनच अडवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेन्शनधारकांना त्यांचे सर्व कायदेशीर व हक्काचे लाभ तात्काळ मिळायला पाहिजेत, यामध्ये दुमत नाही, मात्र हे लाभ मिळू न देण्यासाठी कोणीही कुणाचेही हात बांधलेले नाहीत. खरे म्हणजे पेन्शनरांना त्यांचे हक्काचे लाभ तात्काळ मिळण्यात भविष्यातील पेन्शनधारक म्हणजेच सध्याचे अधिकारी-कर्मचारी हेच अडथळा आणतात, तर पेन्शन वाढवण्यात मंत्रालयात असलेले भविष्यातील पेन्शनधारक म्हणजेच सचिव हेच अडथळा ठरतात. त्यामुळे अशा ‘भविष्यातील पेन्शनधारकां’चे आधी प्रबोधन होणे खूप गरजेजे आहे, असा टोला विभानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ‘पेन्शन डे’निमित्त लगावला.

‘औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन’तर्फे रविवारी (१७ डिसेंबर) यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे. बी. चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष वसंत सबनीस, कार्याध्यक्ष के. जी. शेरे पाटील, मराठवाडा अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी, दिलीप खोत, व्ही. जी. सलगरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

हरिभाऊ बागडे म्हणाले, ‘आपल्या देशात १८७६पासून म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वीपासून ‘पेन्शन अॅक्ट’ आहे. त्यामुळे ज्या दिवशी अधिकारी-कर्मचारी निवृत्त होईल, त्याच दिवशी त्याला त्याचे सर्व लाभ मिळाले पाहिजे यात शंका नाही, मात्र हे लाभ मिळून देण्यात अडथळा आणतो तोदेखील सरकारी अधिकारी-कर्मचारीच असतो आणि आपणदेखील एके दिवशी पेन्शनधारक होणार आहोत, ही जाणीव नसल्यामुळेच तो पेन्शनधारकांना विविध लाभ तात्काळ मिळून देण्यात अडथळा आणत असतो. तसेच ज्या ज्या वेळी केंद्राच्या धर्तीवर पेन्शनमध्ये वाढ करण्याचा विषय निघतो, त्या त्या वेळी मंत्रालयात बसलेला सचिव, जोसुद्धा भविष्यातला पेन्शनधारक असतो तो पेन्शनवाढीसाठी सकारात्मक नसतो आणि उत्पन-खर्चाची वजाबाकी करुन पेन्शनमध्ये वाढ करणे कसे शक्य नाही, हे तो पटवून देत असतो. त्यामुळे अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.’

त्याचवेळी सात लाख ३६ हजार निवृत्तांची २४ हजार ३७० कोटी रुपये इतकी पेन्शन, १७-१८ लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ८० हजार कोटी रुपये इतके वेतन, तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे द्यावी लागलेली ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम (यातील २० हजार कोटींची रक्कम कालच शेतकऱ्यांच्या खात्यावर पडली आहे), या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे प्राध्यान्यक्रम बदलतात. तरीदेखील पेन्शनधारकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, केंद्राच्या धर्तीवर राज्यातील पेन्शनधारकांचे निवृत्तवेतन वाढवण्यासाठी वित्त विभागाकडे निश्चितपणे पाठपुरावा करू, असे आश्वासन देत, येत्या एक-दोन वर्षांत सातवा वेतन आयोग पेन्शनधारकांना लागू होईल, असेही बागडे यांनी सूचित केले. यावेळी संघटनेसाठी योगदान देणारे हरिश्चंद्रराव जोशी स्मृती पुरस्कारांचेही वितरण झाले.

आता कुणीच राहात नाही गावात
पूर्वी जिथे नोकरी होती, तिथेच अधिकारी-कर्मचारी राहात होते व त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याचा गावाला मोठा उपयोग होत होता व गावाचा विकास होत होता. बहुतेक शिक्षक गावातच राहात होते व लोकांची पत्रे वाचून दाखवण्यासापासून ते विद्यार्थी घडवण्यापर्यंतची फार मोठी भूमिका शिक्षक पार पाडत होता. त्यामुळेच अनेक पिढ्या व असंख्य विद्यार्थी घडले. आता मात्र फार कमी शिक्षक-कर्मचारी गावात राहतात, अशी खंत व्यक्त करीत उत्तम मानसिकतेमुळेच समाज घडतो व देश पुढे जातो, हे लक्षात घ्यावे, असेही बागडे यांनी बोलून दाखवले.

वयानुसार पेन्शन वाढवा
पेन्शनरांच्या मागण्यांसाठी कोर्टात जावे लागले, ही दुर्दैवी बाब असल्याची खंत संघटनेचे कार्याध्यक्ष के. जी. शेरे पाटील यांनी बोलून दाखविली, तर पेन्शनरांना सढळ हाताने सहावा वेतन आयोग दिला नाही, अशी टीका करतानाच वय वाढेल तशी पेन्शन वाढावी, अशी अपेक्षा अॅड. सलगरे यांनी व्यक्त केली. पेन्शनरांना ४४ महिन्यांचा ‘डीए’ मिळालाच पाहिजे व १०-१५ तारखेला होणारी पेन्शन एक तारखेला व्हावी, अशी अपेक्षा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

0
0

पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य संमेलन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंबड येथे ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य संमेलनानिमित्त वाङ्मयीन पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कार स्पर्धेत लेखक आपले प्रकाशित झालेले साहित्य- काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, बालसाहित्य, समीक्षा लेखन, वैचारिक साहित्य, शैक्षणिक साहित्य यापैकी कोणत्याही वाङ्मय प्रकारातील पुस्तके पुरस्कारासाठी पाठवू शकतात. लेखकांनी पुस्तके पाठविताना पुस्तकाच्या दोन प्रती, अल्पपरीचय, १ पासपोर्ट फोटो पाठवणे आवश्यक राहील. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे राहणार आहे. प्रत्येक साहित्य लेखन प्रकाराचे सहभागी प्रमाणपत्र आणि अभिप्राय लेखकांना कळविण्यात येणार आहे. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०१७ अशी आहे. पुरस्काराचे वितरण अंबड येथे ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. लेखकांनी त्यांचे साहित्य भारतभूषण शास्त्री, आचार्य भानुकवी प्रतिष्ठान, पंचकृष्ण आश्रम, ठाकूर नगर, अंबड ता.अंबड जि. जालना येथे पाठवावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस्ट्रो चौकशीसाठी ‘तारीख पे तारीख’

0
0

गॅस्ट्रो चौकशीसाठी ‘तारीख पे तारीख’
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीतील तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना गॅस्ट्रोचा फटका सोसावा लागल्याप्रकरणी तातडीने चौकशी करून चार डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश परिषदेचे पूर्वीचे अध्यक्ष ब्रिगेडिअर अनुराग वीज यांनी २४ नोव्हेंबरच्या बैठकीत दिले होते. मात्र, अहवाल सोडाच, साधी चौकशीदेखील आतापर्यंत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असतानादेखील छावणी परिषद आपल्याच धुंदीत मग्न असल्याचे दिसून येत आहे. छावणी परिसरात दुषित पाण्यामुळे तब्बल सहा हजार नागरिकांना छावणी परिषदेच्या रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. त्याचबरोबर तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. खाम नदीतून आलेल्या पाईपलाईनच्या लिकेजमधून पाणी दुषित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २४ नोव्हेंबरच्या परिषदेच्या बैठकीत गॅस्ट्रो प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती तातडीने नेमण्यात आली होती. तसेच ४ डिसेंबरपर्यंत समितीने अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष ब्रिगेडिअर विज यांनी दिले होते. मात्र वेगवेगळी कारणे देत या प्रकरणाची चौकशी अद्यापपर्यंत झालेली नाही. या समितीतील दोन नियुक्त सदस्य व सीईओ उपलब्ध नसल्याचे कारण देत समितीची बैठक १२ डिसेंबरला ठेवण्यात आली असल्याचे परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी मागेच स्पष्ट केले होते. मात्र १२ डिसेंबर रोजीदेखील बैठक झालीच नाही. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे हिवाळी अधिवेशनात जाहीर करुन टाकले. दुर्दैवाने एवढे घडूनही चौकशीला अद्याप काही मुहूर्त लागलेला नाही.
आता, २० डिसेंबरला पाणी पुरवठा व सॅनिटरी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, असे उपाध्यक्ष गारोल म्हणतात. त्यानंतरच्या दोन-तीन दिवसांत विशेष बैठक बोलावून दोषींवरील कारवाईबाबत प्रस्ताव सादर होऊन कारवाई निश्चितपणे केली जाईल, असेही गारोल यांनी ‘मटा’ला सांगितले.
पाइपलाइनची वर्कऑर्डर निघाली?
गॅस्ट्रोच्या चौकशीबरोबरच नवीन जलवाहिनीचे कामदेखील रखडलेले आहे. २४ नोव्हेंबरच्या बैठकीतच एक डिसेंबरपर्यंत कर्णपुरा नाका ते छावणीपर्यंतच्या नवीन जलवाहिनेचे काम सुरू करण्याचे आदेश तत्कालिन अध्यक्ष विज यांनी दिले होते. त्यासाठी ४० लाखांचा निधीही तात्काळ मंजूर करण्यात आला. मात्र या जलवाहिनीचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. आता, या कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली असून, पाईपची ऑर्डर देण्यात आली आहे. आठ दिवसांत हे पाईप उपलब्ध होतील, असेही गारोल यांनी सांगितले. टोलनाका तसेच विक्री मार्केटच्या निविदा काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या बुधवारी समितीमार्फत संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन त्यानंतरच्या काही दिवसात विशेष बैठक बोलावून दोषींवरील कारवाईबाबत विचारविनिमय होणार आहे. दोषींवर ८ ते १० दिवसांत निश्चितपणे कारवाई होईल.
– संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानपुरा चौकातही बेशिस्त वाहतूक

0
0

उस्मानपुरा चौकातही बेशिस्त वाहतूक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर पोलिस आयुक्त व उपायुक्तांच्या प्रयत्नामुळे जालना रोडवर वाहतुकीला शिस्त लावण्यामध्ये यश येत आहे. शहरातील उस्मानपुरा हा चौक देखील महत्त्वाचा व वर्दळीचा आहे. या ठिकाणी बेशिस्त वाहनधारकामुळे अनेकवेळा वाहतूक खोळंबते. किरकोळ अपघात या चौकात सातत्यने होत असतात. या चौकातील बेशिस्त वाहतुकीला देखील शिस्त लावण्याची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याचे दिसून येत आहे.
क्रांतीचौक ते रेल्वे स्टेशन या मार्गाचे रुंदीकरण होऊन हा मार्ग प्रशस्त झाला आहे. क्रांतीचौकानंतर काही अंतरावरच उस्मानपुरा चौक आहे. अत्यंत वर्दळीचा हा चौक आहे. या चौकातून एक मार्ग संत एकनाथ रंग मंदिराकडे, एक मार्ग पीरबाजारकडे तर एक मार्ग रेल्वे स्टेशनकडे जातो. या चौकाच्या मधोमध सौंदर्यबेट आहे. या बेटाच्या दोन्ही बाजूने वाहनधारक वाहने वळवितात. यामुळे जास्त गोंधळ निर्माण होतो. वळण घेणाऱ्या वाहनधारकाला कोठे जायचे आहे हे समजत नसल्याने दुसरे वाहनधारक देखील संभ्रमात पडतात. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या तिजोरीत ३३ कोटी रुपये पडून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत यंदाच्या आर्थिक वर्षात अनेक योजनांना अंमलबजावणीला सुरुवातच झालेली नाही. झेडपीला मिळालेला बहुतांश निधी तिजोरीत पडून आहे. पुढच्या तीन महिन्यात याचे नियोजन कसे होणार ? याबाबत पदाधिकारी व प्रशासन दोघांकडेही उत्तर नाही. त्यामुळे ३३ कोटी रुपयांचे नियोजन तीन महिन्यात कसे करायचे, हे मोठे आ‍व्हान जिल्हा परिषदेसमोर आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना राज्य सरकार, जिल्हा नियोजन समितीकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी ठराविक निधी मिळतो. शिवाय जिल्हा परिषद उपकरातूनही अनेक योजना राबविल्या जातात. बांधकाम, सिंचन, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन आदी विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या तसेच समाजपयोगी योजना राबविल्या जातात. यासाठी योजनांची निश्चिती करणे, त्यासाठी बजेटची निश्चिती करणे, लाभार्थी यादी निवडण्यासाठी योग्य पद्धतीने प्रस्ताव मागविणे अशी पद्धत असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम विभागाचे यंदा योग्य नियोजन न झाल्याने नऊ कोटी १८ लाख रुपये अद्याप अखर्चित आहेत. मार्च २०१८ पर्यंत या निधीचा विनियोग करणे क्रमप्राप्त आहे.
आरोग्य विभागाचा आकडा चार कोटी १२ लाखांच्या घरात आहे. बांधकाम विभागांतर्गतची रस्त्यांची कामे करण्यासाठी यंदा राज्य सरकारने पीसीआर इंडेक्स बंधनकारक केला आहे. मात्र सहा महिन्यांपासून त्याला गती दिलेली नाही. त्यामुळे हा निधी अखर्चित राहतो की काय, अशी भीती आहे.
कृषी व पशुसंवर्धन विभागाचे नियोजन पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तीर्थ क्षेत्र विकासाच्या कामांची यादी पालकमंत्र्यांकडून प्राप्‍त झालेली आहे. सिंचन विभागाची बातच न्यारी आहे. या विभागाचे कित्येक वर्षांचे दायित्व आहे. त्यामुळे त्यांना यंदा काय नियोजन करायचे असा प्रश्न आहे. पाणीपुरवठा विभागाकडून शेवटच्या टप्प्यात निधी खर्च केला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एकूणच सर्व विभागांच्या निधीची गोळाबेरीज केली तर तो आकडा ३३ कोटींपर्यंत जातो.

नियोजन कोण करणार ?

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केवळ नियोजन करावे, अशी मागणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केली, पण नियोजन करणार कोण, असा प्रश्न आहे. पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जर डिसेंबरअखेर सर्व योजनांचे नियोजन एकत्र बसून केले तरच काही प्रमाणात पुढील तीन महिन्यात निधी खर्च होणार आहे, अन्यथा मोठ्या प्रमाणावर निधी परत जाण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौणखनिज खोदण्यास परवानगी आवश्यक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हाधिकारी कोणतेही गौणखनिज, माती, मुरूम, दगड वाळूचे उत्खनन, वाहतूक सरकारला रॉयल्टी भरूनच उत्खनन करणे नियमाने बंधनकारक आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
विनापरवानगी उत्खनन करणे बेकायदा असून असे अनाधिकृत उत्खनन, वाहतूक केल्याचे आढळल्यास संबंधिताविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त करून लिलाव करण्यात येईल. त्यामुळे कोणीही अनाधिकृत उत्खनन व वाहतूक करू नये. तसेच बांधकामांसाठी गौणखनिज विकत घेणाऱ्यांनी रॉयल्टी पास जवळ बाळगावा व साठा तपासणीसाठी महसूल विभागाचे पथक आल्यास बिल अथवा पावती दाखवावी, बांधकाम साहित्य पुरवठादारांनी सुद्धा गौणखनिज साठा व विक्रीसाठी नियमानुसार परवाना ठेवणे, खरेदी केलेल्या मालाची नोंदवही ठेवणे, वाहतूक पास ठेवणे, याचा हिशेब ठेवणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन करावे व कोठेही अनाधिकृत साठा करणे व विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील याची नोंद घ्यावी. याबाबत कोणाचीही तक्रार असल्यास तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलादारांकडे तक्रार करावी, असे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डेंटल’मध्ये लवकरच दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय दंत महाविद्यालयामध्ये दोन नवीन विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अखेर मान्यता दिली असून, २०१८-१९मध्ये दोन्ही विषयांमध्ये प्रत्येकी तीन जागांवर प्रवेश खुला होणार आहे. त्याचवेळी आणखी एका पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये दोन जागा वाढवण्याची परवानगीदेखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या संबंधीचे पत्र केंद्रीय मंत्रालयाने १४ डिसेंबर रोजी काढण्यात आले आहे.

शासकीय दंत महाविद्यालयामध्ये कृत्रिमदंतशास्त्र (प्रोस्थोडोटिक्स) या विषयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडीएस) तीन जागा पूर्वीपासून सुरू आहेत. या विषयात दोन जागा वाढवण्यास मान्यता देण्यात आली असून, आता या विषयात पाच विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये आता मुखशल्यशास्त्र (ओरल अँड मॅक्सिलोफेशिअल सर्जरी) व दंतव्यंगोपचारशास्त्र (ऑर्थोडोटिक्स व डेन्टोफेशिअल ऑर्थोपेडिक्स) या नवीन विषयांमध्ये नव्याने पीजी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या दोन्ही विषयांमध्ये तीन-तीन जागांना मान्यता देण्यात आली असून, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात हे पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना खुले होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या विषयांना मान्यता दिल्यामुळे आता पुढील अपेक्षित कार्यवाही विद्यापीठाकडून होणार आहे.

‘फेलोशिप’ला १०-१० जागा
शासकीय दंत महाविद्यालयामध्ये याच वर्षापासून ‘इम्प्लांटोलॉजी’ व ‘मायक्रोडेन्टिस्ट्री’ या विषयांमध्ये फेलोशिप अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी दहा-दहा जागा उपलब्ध असून, ‘बीडीएस’नंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून चौकशी सुरू असल्याचे समजते. त्याचप्रमाणे कृत्रिमदंतशास्त्र या विषयामध्ये ‘पीएच’डी अभ्यासक्रमालाही मागेच मान्यता मिळाली असून, दोन विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हशीच्या मृतदेहमुळे रेल्वेला तासभर उशीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संग्रामनगर रेल्वे गेटजवळ रेल्वेने एका म्हशीस उडविले. या धडकेमुळे मृत्युमुखी पडलेल्या म्हशीचा मृतदेह लोहमार्गावर पडून होता. त्यामुळे नांदेड-पुणे पॅसेंजर रेल्वेला तब्बल एक तास उशीर झाला.
औरंगाबादहून नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वेने सकाळी साडेसातच्या सुमारास जुन्या संग्रामनगर रेल्वे गेटजवळ एका म्हशीस धडक दिली. धडकेने म्हशीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह लोहमार्गावर पडून होता. सकाळी फिरायला जाणाऱ्या काही नागरिकांना ही बाब लक्षात आली. प्रसंगावधानता राखून काही सूज्ञ नागरिकांना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, परंतु त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. उस्मानपुरा पोलिसांना माहिती द्यावी, असे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची पंढरीनाथ गोर्डे यांनी दिली. दरम्यान, म्हशीचा म्हशीच्या मृतदेहाची उंची रेल्वे रूळापेक्षा दोन फूट अधिक होती. त्यामुळे तेथून रेल्वे जाणे शक्य नव्हते. या उंचीमुळे रेल्वे अपघाताची शक्यता होती.
तेथे सकाळी नांदेडकडून पुण्याकडे जाणारी पॅसेंजर आली. म्हशीच्या मृतदेहाचा अडथळा असल्याने रेल्वे थांबविण्यात आली. शेवटी मजुरांच्या मदतीने रुळावरून मृतदेह हटविण्यात आला. हे काम तासभर सुरू होते. मृतदेह बाजुला केल्यानंतर रेल्वे पुढे जाऊ शकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत दररोज वेळेवर पाणी द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हजारो रुग्णांसाठी आशास्थान असलेल्या घाटी रुग्णालयात दररोज वेळेवर आणि पुरेसे पाणी पुरवा, महिन्यातून दोनवेळा ड्रेनेजलाइन स्वच्छ करा, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी केली. घाटीतील रखडलेल्या कामांचा आढावा खासदार खैरे यांनी एका बैठकत घेतला. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बहुतांश अडचणी तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वसतिगृहासाठी दोन कोटींचे फर्निचर, विविध बांधकामे, सुरक्षा भिंत तसेच अन्य कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीली महापौर नंदकुमार घोडेले, उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य आधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, पॅथोलॉजी विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू, रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर यांची उपस्थिती होती. घाटी परिसरात सोमवारपासून सुरळीत पाणीपुरवठा करा, कचरा वेळेवर उचला, असे खासदारांनी सांगितले. महापौर घोडेले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना करून याची अंमलबजावणी सोमवारपासून झाली पाहिजे, असे आदेश दिले. महिन्यातून दोन वेळा ड्रेनेजलाइनची स्वच्छता करावी, असेही घोडेले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संत जगनाडेंकडून पंचम वेदाचे रक्षण’

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
‘संतश्रेष्ठ जगनाडे महाराज यांनी पंचम वेदाचे रक्षण केले आहे. त्यामुळे त्यांचे कार्य सर्वांसाठी अद्वितीय आहे,’ असे प्रतिपादन हभप बाळकृष्ण महाराज सुरासे यांनी केले.
संतश्रेष्ठ जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीतर्फे शिवराई रस्त्यावरील संताजी लॉन्सच्या नियोजित जागेवर प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संताजी युवा ग्रुपतर्फे छापण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे महाराजांनी प्रकाशन केले. संताजी महाराजांच्या या अद्वितीय कार्यामुळेच संत तुकाराम महाराजांना वैकुंठातून यावे लागले होते, असे महाराजांनी सांगितले. प्रारंभी संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे कमलेश आंबेकर व दत्ता रोजेकर, गोकुळ भुजबळ यांनी पूजन केले. धोंडिरामसिंह राजपूत यांनी आभार मानले. अध्यक्ष सीताराम व्यवहारे, दत्ता रोजेकर, कमलेश आंबेकर, भानुदास धामणे, दीपक बरकसे, पोलिस उपनिरीक्षक नारायण घुगे यांनी महाराजांचे पूजन केले. या कार्यक्रमात गोकुळ भुजबळ, प्रमोद राऊत, अशोक साळुंके, विनोद महाले, अमोल धामणे, लहू धामणे, अरूण आंबेकर, बबन क्षीरसागर, संदेश क्षीरसागर, संजय उचित, राम उचित, रामदास रत्नपारखी, प्रशांत क्षीरसागर, पंढरीनाथ शेलार, गणेश महापुरे, शोभा भुजबळ, जीजाबाई गायकवाड, रुख्मन गायकवाड, सीता गायकवाड, सुरेखा त्रिभुवन, साधना धामणे यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचार्य नाईकवाडे यांना नियमानुसार पगार द्या

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
पंडित जवाहरलाल नेहरु प्राचार्य डॉ. अशोक भाऊराव नाईकवाडे यांच्या पगाराची बिले संस्थेने दाखल करावीत. संबंधितांनी त्या बिलांवर पुढील कार्यवाही करून डॉ. नाईकवाडे यांना नियमानुसार पगार देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिला आहे.

संस्थेने एक जून २०१५ रोजी डॉ. नाईकवाडे यांची प्राचार्यपदी नियुक्ती केली होती. विद्यापीठाने २३ सप्टेबर २०१५ रोजी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती. दरम्यान, ‘मुप्टा’ संघटनेच्या तक्रारीवरून उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी डॉ. नाईकवाडे यांच्या प्राचार्यपदी नियुक्तीसंदर्भात चौकशीसाठी डॉ. एस. जी. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. विद्यापीठाच्या मान्यतेवरून सहसंचालकांनी डॉ. नाईकवाडे यांचे नाव ‘आॅनलाइन’ प्रक्रियेत समाविष्ट करण्याची परवानगी दिली होती.

दरम्यान, डॉ. नाईकवाडे यांची नियुक्ती नियमानुसार झाल्याचा अहवाल समितीने दिला होता. या बाबी सुनावणीच्यावेळी खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यावरून खंडपीठाने आदेश दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे प्रदीप देशमुख, योगेश पी. देशमुख यांनी काम पाहिले. संस्थेतर्फे विजय साकोळकर, विद्यापीठातर्फे सिद्धेश्वर एस. ठोंबरे आणि शासनातर्फे एस. डब्ल्यू. मुंडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images