Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गंगाप्रसाद अग्रवाल, अजित दळवी यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार

$
0
0

गंगाप्रसाद अग्रवाल, अजित दळवी यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांची पुण्यात घोषणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा मानाचा साहित्य जीवनगौरव ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांना व समाजकार्य जीवनगौरव ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गंगाप्रसाद अग्रवाल (परभणी) यांना गुरुवारी जाहीर झाला. दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे अरविंद गुप्ता यांना देण्यात येणार आहे. एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ नाटककार प्रा. अजित दळवी यांना ‘समाजस्वास्थ्य’ नाटकासाठी रा. शं. दातार नाट्यपुरस्कार जाहीर झाला आहे.

१३ जानेवारी २०१८ रोजी सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे स्मारक सभागृहात सायंकाळी पाच वाजता हिंदू दैनिकाचे माजी संपादक आणि द वायर या वेबनियतकालिकाचे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. साधना ट्रस्टचे विश्वस्त विनोद शिरसाठ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

साहित्य विभागामध्ये दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘सय : माझा कलाप्रवास’ या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला ललित ग्रंथ पुरस्कार दिला जाणार आहे. अजित दळवी यांना ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाच्या लेखनासाठी रा. शं. दातार नाट्यपुरस्कार दिला जाणार आहे. हे तीन पुरस्कार २५ हजार रुपये स्वरूपात आहेत. समाजकार्य विभागात चेतना गाला सिन्हा (म्हसवड) यांना असंघटित कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कामासाठी, रूबिना पटेल (नागपूर) यांना मुस्लिम महिलांमध्ये केलेल्या प्रबोधनासाठी व अरुण जाधव (जामखेड) यांना भटके विमुक्त, दलित या समाजघटकांसाठी केलेल्या संघर्षासाठी गौरविण्यात येणार आहे.

साहित्य पुरस्कारासाठी मुकुंद टाकसाळे (अध्यक्ष), रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ व अतुल देऊळगावकर यांच्या समितीने तसेच समाजकार्य पुरस्कारासाठी विजया चौहान (अध्यक्ष), शशिकांत अहंकारी, सतीश गोगुलवार, राजन इंदुलकर व राजेंद्र बहाळकर यांच्या समितीने काम पाहिले. अमेरिकेतील निवड समितीमध्ये पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांच्यासह शिरीष गुप्ते, शोभा चित्रे, रजनी शेंदुरे, सुनीता धुमाळे, विद्युल्लेखा अकलूजकर, अरुंधती विनोद, शैला विद्वांस व मनीषा केळकर या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ आर्थिक संकटातही कारभाऱ्यांची चैन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुमारे अठरा लाखांचे बिल थकल्यामुळे महापालिकेच्या वाहनांचा रोखलेला इंधन पुरवठा, कर वसुलीत आलेले अपयश या पार्श्वभूमीवरही गुरुवारी महापौर व सभापतींसाठी सुमारे तीस लाख रुपये खर्चून खरेदी केलेली नवी कोरी चारचाकी वाहने पालिकेत आली. या गाड्यांसोबत फोटोसेशन करताना पदाधिकाऱ्यांचे चेहरे रंगले आणि आर्थिक आरिष्ट काही क्षणांपुरते कापरासारखे जळून गेले.

महापौर नंदकुमार घोडेले व स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल सध्या स्वतःची गाडी वापरत आहेत. या दोघांसाठी महापालिका प्रशासनातर्फे गाडी खरेदी करण्याचा प्रस्ताव एक महिन्यापूर्वी मंजूर करण्यात आला होता. महापौरांसाठी टाटा कंपनीची हेक्झा गाडी, तर सभापतींसाठी सुझुकी कंपनीची सियाज गाडी खरेदी करण्याचे ठरविण्यात आले होते. या दोन्हीही गाड्यांची एकत्रित किंमत तीस लाखांच्या घरात आहे. महापालिकेच्या कारभारात महापौर आणि सभापतींचे ‘ट्युनिंग’ चांगलेच जमलेले आहे. दोन्हीही गाड्या एकाच वेळी आणल्यामुळे या ‘ट्युनिंग’ची चर्चा देखील गाड्यांबद्दलच्या चर्चेमध्ये मिसळून गेली. या गाड्या पालिकेच्या आवारात आणल्यानंतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे या गाड्यांबरोबर फोटो सेशन रंगले. त्यानंतर महापौर घोडेले यांनी आपल्या गाडीच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला आणि सभापती बारवाल यांच्यासह सभागृहनेता विकास जैन, शहर अभियंता सखाराम पानझडे यांना फेटफटका मारला.

टाटा हेक्झामध्ये ‘सेटिंग’ची व्यवस्था
टाटा हेक्झा या गाडीमध्ये ‘सेटिंग’ची व्यवस्था आहे. खराब रस्त्यावरून ही गाडी चालवण्याची वेळ आल्यास सेटिंगमध्ये बदल केला, तर खराब रस्त्याचा त्रास जाणवत नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्याशिवाय आठ एअर बॅग या गाडीला असल्याचेही सांगण्यात आले. खराब रस्त्यांचा घनिष्ट संबंध औरंगाबाद शहराशी असल्यामुळे व आता ‘सेटिंग’च्या गाडीतून महापौर फिरणार असल्यामुळे त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांची जाणीव होणार की नाही, अशी चर्चा लगेचच पालिकेच्या आवारात सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पाणीपट्टी कमी करा; एमआयएमची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील पाणीपट्टी दर कमी करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘एमआयएम’च्या नेत्यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेतला महापालिकेचे विरोधी पक्षनेते फिरोज खान, एमआयएम गटनेते नासेर सिद्दिकी, डॉ. गफ्फार कादरी यांची उपस्थिती होती. यावेळी कादरी म्हणाले, ‘नाशिकमध्ये दरवर्षी पाणीपट्टी १६०० रुपये, पुण्यात १२०० रुपये आहे, मात्र औरंगाबादमध्ये ४०५० रुपये घेतले जाता. समान पाणी वाटप नाही. शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही. तर शहरवासीयांनी महागडे पाणी का खरेदी का करावे. अनेक भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर जगावे लागते. दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. राज्यात सर्वांत महागडे पाणी इथे मिळते. हे थांबवा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला.

जुम्मा आठ दिन
शहरवासीयांच्या समस्या समजण्यासाठी एमआयएमच्या नेत्यांनी दोन वर्षाचा वेळ लागला. असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावेळी एमआयएम नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी हा पक्ष छोटा आहे. पार्टीला येऊन जुम्मा (शुक्रवार) जुम्मा आठ दिन हुए है, अशी प्रतिक्रिया दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षांच्या मुलाचा गॅलरीतून पडून मृत्यू

$
0
0

वाळूज महानगरः बजाजनगर येथील दोन वर्षाचा बालक खेळत असताना घराच्या गॅलरीतून खाली पडल्यामुळे मरण पावला. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
देवांश संतोष शिंदे (रा. शिवगिरा सोसायटी, महादेव मंदिरासमोर, बजाजनगर), असे या मुलाचे नाव आहे. देवांश हा घरात खेळत असताना अचानक गॅलरीत आला व गॅलरीतून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना दुपारी पावणे दोनच्या सुमारास त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक शेवगे हे करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी सहकारी बँकांचे कृषी कर्जदार वंचित

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत नागरी सहकारी बँकांच्या कृषी कर्जदार शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यात आली आहे. न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. एल. अचलिया यांनी गुरुवारी राज्य शासनाला नोटीस बजावली.
बीड जिह्यातील हिंगणी येथील शेतकरी सुवर्णा श्रीराम नाईकवाडे व इतरांनी याचिका दाखल केली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली. १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीतील दीड लाख रुपयांचे कर्ज काही निकषांसह माफ करण्याचा निर्णय यावर्षी २८ जून रोजी घेतला. या योजनेत राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कृषी कर्ज घेणाऱ्यांना माफीचा लाभ मिळणार आहे. पण त्यात नागरी सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेले शेतकरी वंचित राहिले आहेत. सुनावणीअंती खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावली. याचिकाकर्त्याच्यावतीने पी. पी. मोरे यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. अतुल हावळे पाटील, अ‍ॅड. योगेश बोबडे व अ‍ॅड. आशिष शिंदे यांनी सहकार्य केले. सहा आठवड्यानंतर प्रकरणात सुनावणी होणार आहे. या याचिकेची सुनावणी सहा आठवड्यानंतर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा मृत्यू; सिल्लोडमध्ये आरोग्य विभागावर संताप

$
0
0

म. टा .प्रतिनिधी, सिल्लोड
नुकतीच कुंटुबकल्याण शस्रक्रिया झालेल्या महिलेवर याेग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आराेप नातेवाईकांनी केला. ही घटना गुरवारी घडली, त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी इन कॅमेरा पोस्टमार्टेमसाठी मृतदेह औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये नेला.
उषाबाई नामदेव गव्हाणे (रा. बाेदवड ता.सिल्लाेड) यांच्यावर पानवडाेद प्राथमिक आराेग्य केंद्रात १५ डिसेंबर रोजी कुटुंब कल्याण शस्रक्रिया करण्यात आली होती. शस्रक्रियेनंतर त्यांना १६ डिसेंबर रोजी त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी दवाखान्यात उपचारासाठी काेणीही नसल्याने पतीने उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. ही घटना आराेग्य केंद्राच्या व्यवस्थापनाला समजल्यानंतर त्यांनी सोमवारी उषाबाईस बोलावून घेऊन उपचार सुरू केले. या महिलेस पुन्हा बुधवारी रात्रीपासून त्रास सुरू झाला. त्यातच गुरुवारी (२१ डिसेंबर) रोजी शस्त्रक्रियेचे टाके आराेग्य केंद्रात काढण्यात आले.त् यानंतर उलट्या झाल्याने पुढील उपचारासाठी सिल्लाेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणत असतांना वाटेतच मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. हे समजताच डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने मुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आराेप पती नामदेव गव्हाणे यांनी केला. ही घटना कळताच उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची गर्दी झाली. या प्रकरनी इन कॅमेरा पोस्टमार्टेमसाठी नातलग ठाम राहिले. अखेर याप्रकरणी सत्यता पडताळण्यासाठी दुपारी मृतदेह औरंगाबादला पाठवण्यात आला. या महिलेच्या मागे पती व एक मुलगा, एक मुलगी आहे.

नातलग संतप्त

मृत महिलेवर शस्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्रास सुरू जाला होता. आराेग्य केंद्रात उपचारासाठी कोणी नसल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागले. या महिलेस पाच दिवसांपासून त्रास हाेत असताना त्याकडे आराेग्य केंद्राने दुर्लक्ष केले. वेळीच याेग्य उपचार झाले असते, तर महिलेस जीव गमवावा लागला नसता, अशा भावना नातलगांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाखांपैकी दोन लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य सरकारच्या आदेशानंतर औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात बोंडअळी बाधित कापूस क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत आहेत. या तीन जिल्ह्यांतील १० लाख ४८ हजार ५३८ हेक्टर बाधित क्षेत्रापैकी २ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे करण्यात आले आहेत.
कृषी संहचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, बीड व जालना या जिल्ह्यांत कापसावर बोंडअळीची लागण झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४ लाख ७ हजार हेक्टर, बीड जिल्ह्यात २ लाख ७९ हजार हेक्टर, जालना जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार असे एकूण विभागात कापसाची पेरणी १० लाख ४८ हजार ५३८ हेक्टरवर आहे. हे क्षेत्र हे बोंडअळी बाधित असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. बोंडअळीच्या हल्ल्यामुळे कापूस उत्पादनाला कोट्यवधींचा फटका बसल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून तक्रारी नोंदवल्या आहेत.
या तिन्ही जिल्ह्यात बोंडअळीबाधीत शेतकऱ्यांची संख्या ११ लाख ५५ हजार ११३ आहे. त्यापैकी ३ लाख ८९ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या एकूण २ लाख ९१ हजार ९५६ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. महसूल व कृषी विभागाकडून उर्वरित पंचनामे करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपप्राचार्याची फसवणूक; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील उपप्राचार्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बुधवारी (२० डिसेंबर) अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (२५ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.
याप्रकरणी एमआयटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दीपक विश्वनाथ नेहेते यांनी फिर्याद दिली होती. त्यांनी गारखेडा परिसरातील गुरू गणेशनगर भागामध्ये प्रत्येकी ६०० चौरस मिटरचे दोन प्लॉट अर्जून सरोसे यांच्या मध्यस्थीने खरेदी केले होते. पंधरा दिवसांपूर्वी ते दोन्ही प्लॉटवर तारेचे कुंपण करण्यासाठी गेले असता, संशयित आरोपी सर्जेराव रामभाऊ सावंत (वय ५५, रा. हनुमाननगर, औरंगाबाद) याने कुंपणा टाकण्यास विरोध केला. त्याने हे प्लॉट जयनारायण बाबूराव शिंदे यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले व बनावट कागदपत्रे दाखवली. याप्रकरणी नेहेते यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपीला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात केले असता कागदपत्रे जप्त करणे बाकी आहे, बनावट खरेदीखत व करारनामा कुठून तयार करून घेतला आदींचा तपास करणे बाकी असल्यामुळे पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार

$
0
0

कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार
औरंगाबाद : प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही’ या काव्य संग्रहास वर्ष २०१७ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिल्लीतील रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात गुरुवारी साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांची घोषणा यावेळी करण्यात आली. मराठी कवी श्रीकांत देशमुख लिखित 'बोलावे ते आम्ही ’ या काव्यसंग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली. १ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुजाता देशमुख यांना अनुवादासाठी पुरस्कार
सुजाता देशमुख अनुवादित 'गौहर जान म्हणतात मला 'या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. 'माय नेम इज गौहर जान 'या विक्रम संपथ लिखित इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे. ५० हजार रुपये रोख, ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक संजय पवार, पुष्पा भावे आणि सदानंद मोरे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीआय कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कापूस हमी भावाने खरेदीसाठी परभणी येथे भारतीय कापस निगमचे खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांसह हमाल कामगारांनी मोर्चा गुरुवारी सीसीआयच्या येथील कार्यालयावर मोर्चा काढला.
केंद्र सरकारने कापसाला अत्यंत कमी म्हणजे चार हजार ३५० रुपये हमी भाव जाहीर केलेला आहे. त्यातच बोंडअळीमुळे कापस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे परभणी येथे वर्षानुवर्ष सुरू असलेले खरेदी केंद्र यंदा सीसीआयने सुरू केले नाही. परिणामी बाजारात कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही. बाजारभाव मुद्दाम पाडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे, असे म्हणत मोर्चेकऱ्यांनी तातडीने खरेदी केंद्र सुरू करा, अशी मागणी केली आहे. माथाडी कामगार संयुक्त कृती समितीचे नेते राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चास क्रांतीचौकातून सुरुवात झाली.
भारतीय कापस निगम कंपनी अर्थात सीसीआयमध्ये माथाडी कामगारांना कायदेशीर हक्क मिळालेच पाहिजे, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. सीसीआय व्यवस्थापन शेतकरी व कामगारांची लूट करण्यासाठीच परभणीत कापूस खरेदी केंद्र सुरू करत नाही का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी अधिकाऱ्यास दालनात दमदाटी ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांच्या दालनात घुसलेल्या एका व्यक्तीने दमदाटी केली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापसे या सायंकाळी साडेसातच्या सुमारास दालनात महत्त्वपूर्ण काम करत होत्या. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या दालनात गेला व त्याने कार्यालयीन वेळ झाल्यानंतरही काम करतात, अशी विचारणा करत दमदाटी केल्याचे समजते. हा प्रकार इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी दालनाकडे धाव घेत त्या व्यक्तीस बाहेर काढल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी सीईओ मधुकरराजे अर्दड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सॉ मिल्सचा पाणीपुरवठा बंद करा

$
0
0

सॉ मिल्सचा पाणीपुरवठा बंद करा

राष्ट्रीय हरित लवादाचे महापालिकेला आदेश

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

प्रदूषणात भर टाकणाऱ्या शहरातील आरा मिल्सचा (सॉ मिल्स) पाणीपुरवठा तात्काळ बंद करा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला दिले आहेत. या आदेशानुसार महापालिकेच्या क्षेत्रात असलेल्या ५४ सॉ मिल्सचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई येत्या एक - दोन दिवसात महापालिकेतर्फे केली जाणार आहे.

औरंगाबाद शहर व परिसरातील वाढते प्रदूषण हा आता ऐरणीचा विषय बनला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने देखील या विषयात लक्ष घातले असून प्रदुषण वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या सॉ मिल्सवर कारवाई करण्याचे आदेश या लवादाने महापलिकेला दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लवादाच्या आदेशाची प्रत गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या नावे प्राप्त झाली. सॉ मिल्सचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करा, असा उल्लेख या आदेशात असल्यामुळे आदेशाची प्रत पाणीपुरवठा विभागाकडे कारवाईसाठी पाठवण्यात आली. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हरित लवादाने दिलेल्या आदेशाची प्रत सायंकाळी उशीरा प्राप्त झाली. शहरात ५४ सॉ मिल्स आहेत. वॉर्ड कार्यालयनिहाय या सॉ मिल्सचे वर्गीकरण करण्यात आले आहे. वर्गीकरण केलेल्या सॉ मिल्सची यादी कारवाईसाठी उपअभियंत्यांना दिली जाणार आहे. यादीच्या सोबत पत्र देखील दिले जाणार आहे. यादीमध्ये ज्या सॉ मिल्सचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या सॉ मिल्सचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करा, असे आदेश या पत्राद्वारे उपअभियंत्यांना दिले जाणार आहेत. शुक्रवारपासून ही कारवाई सुरू होईल. पुढील चार - पाच दिवसात सॉ मिल्सचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई पूर्ण केली जाईल. या कारवाईसाठी विशेष मोहीमच राबवावी लागणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावास गतिमंद भावाची किडनी; याचिका फेटाळली

$
0
0

दोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्टर भावाला गतिमंद भावाची किडनी देण्याची परवानगी मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी गुरुवारी फेटाळली.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील डॉक्टरच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत. त्यांच्या एका भावाच्या किडन्या डॉक्टरशी जुळतात. म्हणून पवार कुटुंब औरंगाबादला बजाज रुग्णालयात आले आहेत. त्यांच्या वडिलांचे वय ७० वर्षे आहे. त्यामुळे ते किडनी देऊ शकत नाहीत. एक शिक्षक असलेल्या भावाचा रक्तगट जुळत नाही, बहिणीला लहानपणीच आईने किडनी दिलेली आहे. तिच्याही किडन्या निकामी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा एक भाऊ जो गतिमंद आहे, त्याचा रक्तगट आणि किडनी डॉ. पवार यांच्याशी जुळतात. त्यांच्यावर कमलनयन बजाज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथील कमिटी फॉर आॅर्गन ट्रान्सप्लांटने, ‘ह्यूमन आॅर्गन अँड टिशू ट्रान्सप्लांट अ‍ॅक्ट १९९४ च्या कलम ९ (१)’ अन्वये दाता गतिमंद असल्याने त्याच्या अवयवांचे दान करता येत नाही, असा निवडा दिला.
त्यामुळे डॉक्टरांच्या वडिलांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. किडनीदाता गतिमंद भाऊ स्वत: निर्णय घेण्यास सक्षम आहे का, याच्या परिणामांची त्याला जाणीव आहे का, या बाबींची मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विनय बाऱ्हाळे यांच्याकरवी तपासणी करण्याचे आणि त्यांचे त्याबाबतचे मत १४ डिसेंबरपर्यंत खंडपीठात दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. त्यानुसार ते खंडपीठात सादर करण्यात आले होते. किडनीदाता निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे असल्याचे प्रभाकर के. जोशी यांनी सांगितले. त्याला न्यायमुर्तींच्या दालनात हजर केले असता त्याच्याशी संवाद साधल्यानंतर तो सक्षम नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले होते. निकालासाठी राखून ठेवलेली ही याचिका शुक्रवारी फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्यातर्फे प्रभाकर के. जोशी, अरविंद आर. जोशी आणि व्ही. पी. गोलेवार, कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे लहरीमनोहर डी. वकील, तर शासनातर्फे सरकारी वकील स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी अपघात विभागाची ‘ओटी’ सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अपघात विभागाची ‘मायनर ओटी’ दीर्घ खंडानंतर पुन्हा एकदा सुरू झाली असून, गेल्या पावणे दोन महिन्यात १७९ छोट्या प्रक्रिया-शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ही ‘ओटी’ सुरू झाल्यामुळे छोट्या-छोट्या प्रक्रिया-शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना शल्यचिकित्साशास्त्र विभागात नेण्याची गरज राहिलेली नाही. परिणामी, रुग्णांची प्रतीक्षा कमी होऊन अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची मोठी सोय झाली आहे.

घाटीच्या अपघात विभागालगतच ही ‘मायनर ओटी’ आहे; परंतु विविध कारणांमुळे ती अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक रुग्णाला शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या ‘ओटी’मध्ये न्यावे लागत होते. त्यामुळे वेळ जात होता व शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या ‘ओटी’मध्ये एखादी मोठी शस्त्रक्रिया सुरू असल्यास अनेकदा रुग्णांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहात नसे. आता अपघात विभागाची ‘ओटी’ सुरू झाल्यामुळे अशा रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी तसेच छोट्या क्रिया-प्रक्रिया-शस्त्रक्रिया करण्याची मोठी सोय झाली आहे. त्याचवेळी अपघात विभागामध्ये आलेल्या गंभीर रुग्णांवर तात्काळ मलमपट्टी करण्यासाठीदेखील या ‘मायनर ओटी’चा उपयोग होत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही ‘ओटी’ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आणि सर्व प्रयत्नानंतर एकदाची ‘ओटी’ सुरू झाली. २८ सप्टेंबर रोजी ही ‘ओटी’ सज्ज झाली असली तरी एक नोव्हेंबरपासून या ‘ओटी’मध्ये शस्त्रक्रिया सुरू झाल्या. नोव्हेंबरमध्ये ८०, तर डिसेंबरमध्ये आतापर्यंत ९९ शस्त्रक्रिया झाल्या. या ‘मायनर ओटी’मुळेच रुग्णांना जंतुसंसर्गाची शक्यता कमी झाली आहे.

वाढदिवसाचा खर्च साहित्यावर
अनेकजण आपल्या वाढदिवसानिमित्त घाटीतील रुग्णांना मिष्टान्न किंवा खाद्यपदार्थ वाटतात. अशाच प्रसंगी प्रवीण अहिरे नामक मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी रुग्णांना भोजन देण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनवणे यांच्याकडे परवानगी मागितली, मात्र खाद्यपदार्थ वाटणारे बरेच आहेत, त्यापेक्षा ‘मायनर ओटी’साठी गरजेचे वैद्यकीय साहित्य देण्याची कल्पना डॉ. सोनवणे यांनी प्रवीणच्या वडिलांसमोर मांडली आणि ती त्यांनी तात्काळ स्वीकारत सहा हजारांचे वैद्यकीय साहित्य ‘ओटी’ला दिले. देणगीस्वरुपात देण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्यामुळे सर्वच रुग्णांची मोठी सोय झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...फक्त ख्रिसमसची प्रतीक्षा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औैरंगाबाद
डिसेंबरच्या सुरुवातीपासून वेध लागलेला ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला असून, बाजारपेठेतली दुकाने केक, सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, चॉकलेट, गिफ्ट, यांनी सजली आहेत.

निराला बाजार, गुलमंडीसह शहरातील मॉलमध्ये विविध प्रकारांच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. सांता टोपी, बेल्स, कॅडल, ख्रिसमस ट्री, गिफ्ट पॅकेज यासह सजावटीचे साहित्यांना मोठी मागणी आहे. कालानुरूप ग्रिटिंग कार्डची मागणी कमी झाली असली तरी ख्रिसमस ग्रिटिंग्जना अजूनही मागणी आहे.

जालना रोडसह शहरातील विविध भागात सांता टोपी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यांच्याजवळील आकर्षक कॅंडलला मागणी आहेत. यात फ्लोटिंग कॅंडल, डेकोरेटिव्ह कॅंडल, सुवासिक, चंदनयुक्त कॅंडल, जेलिटेप, स्टॅण्ड विथ कॅंडल, हार्डशेप, लायटिंग कॅंडलही उपलब्ध आहेत.

ख्रिसमस सणात कॅंडलला विशेष महत्त्व असल्याने त्यास चांगली मागणी असल्याचे निराला बाजार येथील व्यापारी दौलत नांगरे यांनी सांगितले. ख्रिसमस ट्रीलाही मोठी मागणी आहे. यासह मदर मेरी, जीझस, सांताक्लॉज अशा विविध आकाराच्या आकर्षक मूर्तींना विशेष मागणी आहे.

चॉकलेट, केकला मागणी
आकर्षक पॅकिंग केलेले चॉकलेटस् बाजारात दाखल झाली असून, त्यांची मागणी वाढली आहे. तसेच ड्रायफ्रूटस्, मिठाई आदींबरोबरच केकला चांगली मागणी असल्याचे औरंगपुरा येथील व्यापारी सांगत आहेत.

असे आहेत दर
- टोप्या १० ते ५० रुपये
- ग्रिटिंग ५० ते ३०० रुपये
- कॅँडल ५० ते ५०० रुपये
- बेल्स २० ते ६०० रुपये
- ट्री ४०० ते १००० रुपये
- फ्रेम, हार ५० ते ७०० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लॉट विक्रीत केली चौदा लाखांची फसवणूक

$
0
0


औरंगाबादः दुसऱ्याचे प्लॉट व बनावट खरेदीखत करून देत नागरिकांची साडेतेरा लाखांची फसवणूक केल्याची घटना २९ मे २०१५ रोजी हायकोर्ट व जटवाडा परिसरात घडली. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद लाल सय्यद हबीब (रा. सावंगी, हर्सूल) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. सय्यद लाल यांची २०१५मध्ये शेख मुजीब शेख सुभान (रा. सादातनगर), शेख मुश्ताक शेख मुनाफ (रा. रहेमानिया कॉलनी) आणि शेख साहेबलाल शेख हसन (रा. बाबर कॉलनी) यांच्यासोबत सोबत ओळख झाली. आरोपींनी ओळख वाढवत सय्यद लाल यांचा विश्वास संपादन केला. सय्यद लाल यांना त्यांनी प्लॉट खरेदी करण्यासंदर्भात गळ घातली. दुसऱ्याच व्यक्तीचे प्लॉट त्यांनी लाल यांना दाखवले. या प्लॉटचे बनावट खरेदीखत करून दिले. या प्लॉट खरेदीपोटी त्यांनी लाल यांच्याकडून वेळोवेळी साडेतेरा लाख रुपये घेतले. काही दिवसानंतर हा प्रकार लाल यांच्या निदर्शनास आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने लाल यांनी तिन्ही आरोपीकडे पैशासाठी पाठपुरावा केला, मात्र आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी लाल यांनी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्याकडे दाद मागितली. डॉ. धाटे घाडगे यांच्या आदेशाने या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी वाहनधारकाचा वाहतूक शाखेत गोंधळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मद्यपी वाहनधारकाने पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून वाहतूक शाखेच्या टेबलावरील काच फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच तेथील पोलिसावर देखील काचेच्या तुकड्याने हल्ला केला. छावणी वाहतूक शाखेमध्ये बुधवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, आत्महत्येचा प्रयत्न आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

छावणी वाहतूक शाखेचे पीएसआय तुषार मुरलीधर देवरे हे त्यांच्या सहकाऱ्यासह छावणी भागात ड्रंक अँड ड्राइव्हची मोहीम राबवत होते. यावेळी बाळकृष्ण सांडू शेजुळ (रा. भुमे आडगाव, ता. फुलंब्री, सध्या मुक्काम फुलेनगर, पंढरपूर) याला कारवाईसाठी थांबवण्यात आले. यावेळी आपल्यावर कारवाई करू नये म्हणून शेजुळ याने सार्वजनिक ‌ठिकाणी गोंधळ घातला. वाहतूक शाखेच्या ठाणे अंमलदाराच्या टेबलावरील काच फोडला. फुटलेल्या काचेने त्याने स्वतःच्या अंगावरील शर्ट फाडून घेत जखम करून घेतली. तसेच देवरे यांचे सहकारी टाकसाळे यांच्यावर देखील काचेच्या तुकड्याने वार करीत जखमी केले. याप्रकरणी देवरे यांच्या तक्रारीवरून आरोपी शेजुळविरुद्ध पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, आत्महत्येचा प्रयत्न, मारहाण करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीएसआय शेख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजूर कंत्राटाचा पालिकेत ‘घाट’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काही माजी पदाधिकारी पाठिशी असलेल्या संस्थेला मजूर पुरविण्याचे कंत्राट देण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला असून, रात्रीच्या वेळी साफसफाई करण्याच्या नावाखाली या मजुरांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी स्थायी समितीच्या सभापतींनी विशेषाधिकार वापरून कंत्राट मंजूर करावे, असा प्रयत्न केला जात आहे.

शहराच्या पुंडलिकनगर भागातील सर्वज्ञ एजन्सीला पन्नास सफाई मजूर देण्याचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाने शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला आहे. या एजन्सीच्या पाठिशी महापालिकेशी संबंधित असलेले काही माजी पदाधिकारी आहेत. त्यांची नावे रेकॉर्डवर नसली तरी महापालिकेत त्यांच्या नावाची चर्चा उघडपणे सुरू आहे. महापालिकेच्या कामगार विभागाने जय बजरंग सर्व्हिसेस या संस्थेला ११ महिन्यांसाठी मजूर पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. एका मजुराला एका महिन्यासाठी १३,९५० रुपये वेतन यानुसार मजूर पुरविण्याचे कंत्राट या एजन्सीबरोबर मान्य करण्यात आले आहे. याच एजन्सीच्या अटी - शर्तींनुसार सर्वज्ञ एजन्सीकडून पन्नास मजूर नियुक्त करण्याचा हा प्रस्ताव आहे. प्रस्तावात स्वच्छ सर्वेक्षण, रात्रीच्या वेळी करावयाची झाडझूड याचा उल्लेख करण्यात आला आहे.

महापौरांनी शहरामध्ये नाइट स्विपिंग सुरू करावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०१८मध्ये नाइट स्विपिंगसाठी गुणांकन आहे. त्यासाठी खासगी मजूर लागणार आहेत. या बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील प्रकरण ५ (२) (२) स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

सभापतींच्या निर्णयाकडे लक्ष
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ (२) (२) हे प्रकरण स्थायी समितीच्या सभापतींनी आपतकालीन परिस्थितीत वापरले पाहिजे. मजुरांची नियुक्ती हा विषय आपतकालीन होऊ शकत नाही. त्यामुळे सभापती काय निर्णय घेणार, याकडे पालिकेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होर्डिंगबहाद्दरांना पोलिसांचे अभय

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या पाच वर्षांत पोलिसांच्या धाकाने शहरात एकही पोस्टर, होर्डिंग विनापरवानगी लागत नव्हते, मात्र सध्या पोलिसांचे दुर्लक्ष आणि अभयामुळे सवंग प्रसिद्धीसाठी सटरफटर कार्यकर्ते देखील होर्डिंग लावून शहराचे विद्रुपीकरण करत आहेत.

पाच वर्षांपूर्वी तथाकथित भाऊ दादांच्या वाढदिवसानिमित्त बळजबरीने जाहिरात एजन्सीच्या फलकावर होर्डिंग लावण्यात येत होते. तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी या गोष्टीची दखल घेत शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अशा होर्डिंगवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतली. हाच पायंडा त्यांच्यानंतर आलेले पोलिस आयुक्त राजेंद्रसिंग व अमितेशकुमार यांच्या कालावधीत देखील कायम राहिला. सध्या मात्र शहरात तशी परिस्थिती राहिली नसल्याचे दिसून येत आहे. गल्लीबोळात किरकोळ भाऊ, दादा म्हणून ओळख असलेले व स्वंयघोषित युवा कार्यकर्ते म्हणून मिरवून घेणाऱ्या मंडळींचे होर्डिंग आता जागोजागी दिसून येत आहेत. कोणतीही सामाजिक ओळख नसलेल्या या तरुणांची सवंग प्रसिद्धी करणारे फलक अवघ्या तीनशे ते पाचशे रुपयात करून मिळत आहेत. शहरात कोणत्याही ठिकाणी होर्डिंग लावायचे असल्यास महापालिका प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. तसेच तसेच या होर्डिंगमुळे वाहतुकीला अडचण येणार नाही, याची दक्षता देखील घेणे गरजेचे आहे. असे असताना ही फुकटी मंडळी बिनधास्त होर्डिंग लावून प्रसिद्धी करताना दिसत आहेत. या होर्डिंगकडे पालिका तसेच पोलिसांचे देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे.

वादाचे कारण
अनेक ठिकाणी चौकात होर्डिंग लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद होतात. सूतगिरणी चौकात महिनाभरापूर्वी असे वाद झाले होते. जवाहरनगर पोलिसांनी पुढाकार घेऊन हे होर्डिंग हटवत दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड - अमृतसर विमानसेवा २३ डिसेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगाच्या पाठीवरून अमृतसरला आलेल्या शीख बांधवांना थेट हुजूर साहिब नांदेड यांच्या गुरूद्वाराला येता यावे यासाठी एअर इंडिया विमानाने अमृतसर - नांदेड - अमृतसर या मार्गावर विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ डिसेंबरला अमृतसरहून पहिले विमान नांदेडला लॅँड होणार आहे. हे विमान नांदेड ते अमृतसरसाठीही जाणार असल्याची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली.

पंजाब मधील अमृतसर येथील गोल्डन टेम्पलला जगभरातून शीख भाविक येत असतात. अमृतसर येथे आलेल्यांना नांदेडच्या हुजूर ‌साहिब गुरूद्वाराचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेतून प्रवास करावा लागत होता. अमृतसरला येणाऱ्या भाविकांसाठी अमृतसर नांदेड थेट विमान सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती. यानुसार एअर इंडियाने विमान सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. नांदेड येथील एअर पोर्टच्या धावपट्टीच्या कामामुळे ही सेवा सुरू झालेली नव्हती. अखेर धावपट्टीचे काम संपताच नांदेड अमृतसर या शहरांना जोडण्यासाठी १८० आसन क्षमतेचे विमान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई - अमृतसर - नांदेड - अमृतसर अशा मार्गावर ए‌अर इंडियाचे विमान जाणार आहे. अमृतसर ते नांदेड या मार्गावर आठवड्यातून शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस विमान चालविण्यात येणार आहे. अमृतसरहून नांदेडसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी १०.३० वाजता टेकऑफ होईल. नांदेडला हे विमान दुपारी एकच्या दरम्यान पोहोचेल. दुपारी दीड वाजता नांदेडहून हे विमान अमृतसरकडे रवाना होणार आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या सुत्रांनी दिली.



एअर इंडिया कंपनीच्या वतीने नांदेड अमृतसर ही विशेष विमान सुरू केली आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राऊंड ट्रीपसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे. नांदेड - अमृतसर - नांदेड विमान प्रवासासाठी ८ हजार ८९९ रुपये प्रती प्रवासी विशेष ऑफर देण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images