Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘मराठा कुणबी जाती ओबीसींमधून वगळा’

0
0
ओबीसी प्रवर्गातून मराठा कुणबी व कुणबी मराठा या जाती वगळाव्यात, अशी मागणी ओबीसी हक्क परिषदेने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या जातींमुळे कुणबी जातीवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पोलिसच देतात सर्वाधिक ‘माहिती’

0
0
‘माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत सर्वाधिक उत्तरे पोलिस विभागाकडून देण्यात येतात,’ असे प्रतिपादन औरंगाबाद खंडपीठाचे माहिती आयुक्त बी. बी. देशपांडे यांनी केले. माहितीचा अधिकार कायदा या विषयावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कार्यशाळेचा बुधवारी पोलिस आयुक्तालयात समारोप करण्यात आला.

२१ टीएमसी पाण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा

0
0
कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचा भीमा-निरा स्थिरीकरण प्रकल्पाशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे तो रद्द झाला तरी कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे काम चालूच राहावे.

कापूसचोरांची टोळी गजाआड

0
0
जीनिंग फॅक्टरीतून कापसांच्या गाठी चोरणाऱ्या पाच आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे अकरा लाख रुपये किंमतीचा कापसांच्या गाठी जप्त करण्यात आल्या आहे.

पालिका कर्मचाऱ्यांसाठीचे क्वार्टर्स ‘हरवले’

0
0
कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांबद्दल पालिकेचे प्रशासनच अनभिज्ञ असल्याची माहिती हाती आली आहे. निवासस्थानांचे भाडे तर वसूल होत नाहीच, पण कोणत्या निवासस्थानात कोणता कर्मचारी राहतो याची माहितीही पालिकेकडे नाही.

बॉडी बिल्डर स्पर्धा जिंकल्याने मारहाण

0
0
बॉडी बिल्डरची स्पर्धा जिंकल्याचा राग मनात ठेवून प्रतिस्पर्धकाने विजेत्याला फायटरने मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी औरंगपुरा भागात घडला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळाकडे थकले दीड कोटी

0
0
चिकलठाणा विमानतळाकडे तब्बल दीड कोटींचा अकृषक कर (एनए टॅक्स) थकला आहे. त्याच्या वसुलीसाठी तहसील प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

मिटमिट ये‌थील बेघरांचा मोर्चा

0
0
मिटमिटा येथील अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेघरांना जमीन देण्याची मागणी केली. क्रांतीसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज सेवा मित्र मंडळातर्फे क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात आला.

ओबीसींच्या जनगणनेसाठी नकाराधिकाराचा इशारा

0
0
महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीने ओबीसींच्या जनगणना जाहीर करण्याच्या मागणीसाठी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नकाराधिकार वापरण्याचा इशारा दिला आहे.

कामगारांची सुरक्षा वाऱ्यावरच

0
0
गेल्या महिन्याभरात औद्योगिक क्षेत्रात झालेल्या दोन भीषण अपघातामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या अकरा महिन्यात तब्बल नऊ कामगारांना आपला जीव गमावावा लागला असून कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक प्रयत्न व्हावेत, अशी मागणी कामगार नेत्यांनी व्यक्त केली आहे.

पावसाने उत्पादन घटले

0
0
काही दिवसांपूर्वी हेलेन वादळामुळे मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडला होता. या पावसामुळे रब्बी पीक आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. मडी वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी फळबागांना वारा प्रतिबंधक कुंपण घालण्याची सूचना कृषीतज्ज्ञांनी केली आहे.

मुंडेंचा वाढदिवस साजरा

0
0
खासदार गोपीनाथ मुंडे यांचा ६४ वा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यानी विविध उपक्रमाने साजरा केला. लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरला अभिषेक, सुरतशहावली दर्ग्यावर चादर चढवणे, शिवाजी चौकातील मजूरअड्डयावर नमो टी पार्टीचे आयोजन करुन उपस्थित कामगाराच्या उपस्थितीत जेष्ठ कार्यकर्ते जितेश चापसी यांच्या हस्ते केक कापून चहाचे वाटप करण्यात आले.

कांद्याचा लिलाव बंद पाडला

0
0
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नागपूर-मुंबई महामार्गावरील कांदा मार्केटमध्ये गुरुवारी व्यापाऱ्यांनी कांद्याच्या दरात घसरण केल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकऱ्यांनी गदारोळ घालत कांद्याचे लिलाव बंद केले.

ओवेसींची परळीत होणार सभा

0
0
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून मराठवाड्यातील मुस्लिमबहुल संघात आत्तापासून ताकद वाढवण्याचा प्रयत्न पक्षाकडून होतो आहे.

पगाराचे पैसे, नवी गाडी जळाली

0
0
‘साहेब आजच पगार झाला होता. पगाराचे पैसे असलेले कपडे कारखान्यामध्ये टांगून ठेवले होते. कपडे, पगाराचे पैसे व नवी कोरी मोटारसायकल आगीमध्ये जळाली हो...’ असे सांगताना कारखान्यामधील कामगार अरुण खाडेचा चेहरा रडवेला झाला होता. या आगीमध्ये त्याच्यासह इतर कामगारांचे बरेच नुकसान झाले असल्याचे दिसून आले.

मेण कारखान्यात भीषण आग

0
0
मेणाच्या कारखान्यास भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी शेंद्रा एमआयडीसी भागात घडली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. सुदैवाने कारखान्यामध्ये काम करणारे दहा कर्मचारी सुखरुप बचावले असून, आगीचे कारण समजू शकले नाही.

आठ हजारांची लाच घेताना

0
0
वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी आठ हजाराची लाच घेणाऱ्या उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. गुरुवारी सकाळी कोर्टाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.

हातकडीसह पळालेला आरोपी मुंबईला?

0
0
उस्मानपुरा पोलिस ठाण्यातून बुधवारी मध्यरात्री हातकडीसह पलायन केलेला आरोपी मुंबई येथे सासूरवाडीला असल्याची खात्रीलायक माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली आहे. त्याला परत आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

अश्लील मेसेज पाठवून विनयभंग

0
0
रोजेबाग परिसरातील एका २३ वर्षाच्या महिलेचा एका तरुणाने पाठलाग करीत तसेच वारंवार अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पायरेटेड सॉफ्टवेअर वापरल्याप्रकरणी गुन्हा

0
0
सिडको भागातील अभिषेक अॅड्सच्या संचालकाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरल कंपनीच्या पायरेटेड सॉफ्टवेअर वापरल्याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images