Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खुनप्रकरणातील आरोपी जेलमध्ये

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पुरात वाहून गेल्याचा बनाव करत तरुणाचा खून करणाऱ्या चार आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक प्रकाश रघुनाथ घुगरे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार मृत कृष्णा एकनाथ कोरडे याच्या अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली होती, मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मृताच्या डोक्याला जखमा आढळल्या होत्या व मृताच्या नातेवाईकांनी घातपाताची शंका उपस्थित केली होती. त्यानंतर तपासामध्ये पोलिसांची दिशाभूल करणारा आरोपी नारायण रतन गरंडवाल, आरोपी राजू तुळशीराम पवार, आरोपी समाधान गणेश कालभिने व आरोपी सुनील रमेश घोगरे यांना १८ डिसेंबर अटक करण्यात आली होती. आरोपींनी षडयंत्र रचून १६ सप्टेंबर २०१७ रोजी कोरडेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींना हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ वैद्यचा तुरुंगातील मुक्काम वाढला

$
0
0


औरंगाबादः विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना गंडा घातल्याप्रकरणातील सहआरोपी अशोक वैद्य याचा नियमित जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी फेटाळला.

या प्रकरणात हडको येथील सचिन सूर्यभान पाचकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपी एन ११ मधील रंजना बाळासाहेब जगदाळे हिने दोन टप्प्यात पाच-पाच लाख असे दहा लाख रुपये घेतले. नोकरीसाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने दहा मे २०१६रोजी विद्यापीठाच्या लेटर पॅडवरील शिपाई व कनिष्ठ लिपिक पदाची निवड यादी दाखविली. तसेच वैद्यकीय तपासणी होऊन महिन्याभरात कामावर रुजू करण्याचे आश्वासन दिले, पण संशय आल्याने पाचकर यांनी चौकशी केली असता आरोपीने बनावट लेटर पॅडवर नियुक्ती लेटर तयार केल्याचे उघड झाले. या प्रकरणात तक्रारीनंतर १४ जून २०१७ रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुह्यातील सहआरोपी अशोक वैद्य याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी त्याच्या जामीनाला विरोध केला. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉम्बच्या अफेवेनंतर बसची तपासणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब आहे, असा संदेश कंट्रोल रूमला मिळाल्यामुळे तातडीने बसची तपासणी करण्यात आली. या मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

शनिवारी दुपारी एका निनावी व्यक्तीने पुण्याकडे निघालेल्या (एमएच ०६ एस ९५८७) या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती कंट्रोल रूमला फोन करून दिली. त्यामुळे या बसला कर्णपुरा येथील मोकळ्या मैदानावर नेऊन प्रवाशांना उतरविण्यात आले. येथे बॉम्ब शोधक नाशक पथकासह पोलिसांनी बसची तपासणी केली. तसेच मध्यवर्ती बस स्थानकाच्या फलाटावर उभी असलेली (एमएच ०६ एस ९४१२) आणि आगारात उभी असलेली शिवनेरी (एमएच ०६ एस ९४३०), पुणे - नागपूरला जाणाऱ्या अश्वमेध बसचीही तपासणी केली. पोलिस उपायुक्त दीपाली घाटे-घाडगे यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. त्यानंतर ही निव्वळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी व अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगिनींच्या संक्रांत उत्सवास सुरुवात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
४५ महिला उद्योगिनींना एकत्र येत सुरू केलेल्या संक्रांत महोत्सवास शनिवारी सुरुवात झाली. ब्राह्मण महिला मंचच्या वतीने एन वन, काळा गणपती मंदिर येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रेसिपी तज्ज्ञ प्रियांका कुलकर्णी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मंचच्या अध्यक्ष विजया कुलकर्णी, जयश्री चौबे, नंदिनी ओपळकर, राजश्री एरंडे, आरती देशपांडे उपस्थित होत्या. प्रियांका कुलकर्णी यांनी महिलांना शुभेच्छा देत खाद्यपदार्थांचे व्यवसायात रूपांतर करता येते असा सल्ला दिला. संक्रातीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचा प्रदर्शनात समावेश असून, घरगुती वस्तूंवर महिलांचा भर दिसला. यामध्ये प्रामुख्याने इमिटेशन ज्वेलरी, थ्रेडची ज्वेलरी व मोत्यांचे दागिने पहायला मिळाले.

विशेषतः थ्रेडच्या दागिन्यांमध्ये झुमके व इतर अँक्सेसरीज अतिशय देखण्या ठरल्या. तसेच हलव्याचे दागिन्यांच्या देखणे प्रकारही महिलांनी सादर केले. याशिवाय स्त्रियांना प्रिय असणाऱ्या साड्यांमध्ये पैठणी, रॉ सिल्क, शिफॉन व डिझायनर कलेक्शनसह सिल्क, कॉटन, जर्दोजीसह डिझायनर कुर्ते व ड्रेस मटेरियलची प्रदर्शनात रेलचेल होती. इतर गृहपयोगी वस्तूंसह गृह सजावटीचे सामान, मोत्यांची तोरणे, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स, होम अॅक्सेसरिजचे चांगले कलेक्शन, संक्रातीच्या अनुषंगाने अँक्रेलिक रांगोळ्या, करंड्याचे प्रकार प्रदर्शनाची शोभा वाढवत होते. लोणची, चटण्या, पीठ यांचा गृहउद्योग करणाऱ्या महिलांनीही लक्ष वेधले होते. पूड चटणी, शेंगदाणा, कराळ, खोबरे, मेथ्या, कडीपत्ता आदी चटण्यांचे प्रकार, मुखवास, कारले, ओली हळद, मिरची आदींचा सुगंध दरवळत होता. विशेष म्हणजे महिलांनी स्मार्ट पाऊल उचलत या वस्तूंची पँकिंग कमीत कमी साइजमध्ये ठेवली. यामुळे ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन पोचवण्यात त्या यशस्वी ठरल्या. कार्यक्रमादरम्यान मंचच्या सदस्या स्वाती राजूरकर यांनी सुनिता भुसारे यांना शिलाई मशीन उद्योगास हातभार म्हणून भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्योती धर्माधिकारी, रंजुषा भाले, संगीता देशपांडे, अनिता इटोलीकर, सीमा नांदापूरकर, कल्पना नागापूरकर आदींनी परिश्रम घेतले. संगीता कागबट्टे यांनी सूत्रसंचालन केले व उज्वला पैठणे यांनी आभार व्यक्त केले.

उद्या शेवटचा दिवस
प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळीचे लाकडी ठसे, सुगंधी साबण, बुक मार्क, भेटकार्ड अशा कलात्मक वस्तूही महिलांनी आर्वजून ठेवल्या. यावेळी मंचच्या वतीने महिलांची मोफत मेटँबोलिक रिडिंग करण्यात आली. वेलनेस अँडव्हायझर शशीकुमार पाठक यांनी या तपासण्या केल्या व महिलांना आरोग्य सल्लाही दिला. २५ डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री साडे नऊ दरम्यान प्रदर्शन खुले असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारकडून घोषणा नको कृती हवी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बोंडअळी व तुडतुड्या रोगामुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई घोषित केली. यात बागायती कापसाला हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये, तर कोरडवाहूसाठी ३० हजार ८०० रुपये मदत देण्यात येणार आहे. यावर शेतकऱ्यांनी आता सरकारकडून नुसत्या घोषणा नको, तर प्रत्यक्ष कृती करावी, अशी भावना व्यक्त केली.

बोंडअळीमुळे मराठवाड्यातील कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही मोठे आंदोलन केले. सरकारने दखल घेतल्याने आता काहीतरी पदरात पडणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना काहीसा दिलास मिळेल, पण जोपर्यंत प्रत्यक्ष रक्कम हाती पडत नाही तोपर्यंत खऱ्याअर्थाने समाधान होणार नाही. केवळ घोषणा नको, तर सरकारने कृतीवर भर दिला पाहिजे. - संतोष जाधव, माजी सदस्य झेडपी

बोंडअळीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. नगदी पीक हातचे गेल्याने सर्व आर्थिक गणिते बिघडली आहेत. सरकारने थोडीफार का होईना मदत जाहीर केली, पण कर्जमाफी सारखे होऊ नये म्हणजे झाले. तातडीने रक्कम मिळाली तर आलेल्या अडचणी काही प्रमाणात का होईना दूर करता येईल. - विठ्ठल चव्हाण, शेतकरी

जी काही सरकारने मदत घोषित केली ती स्पष्ट नाही. कारण जे मदत मिळणार आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीआरएफ), पीक विमा आणि कापसासाठी कंपन्यांच्या माध्यमातून हि रक्कम मिळेल, असे सांगितले गेले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी पीक विमाच काढलेला नाही. त्यांना किती मदत मिळणार तसेच बियाणे कंपन्या कोर्टात गेल्या, तर सरकार घोषित केलेली सर्व मदतीची रक्कम देणार का, असे अनेक प्रश्न कायम आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातूनच तातडीने मदत करावी. म्हणजे विलंब होणार नाही. - महेश गुजर, नेते, शेतकरी कामगार पक्ष

सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत. अपेक्षा एवढीच की कर्जमाफीच्या अंमलबजावणी जो घोळ सुरू आहे तसा होऊ नये. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीआरएफ), पीक विमा आणि कापसासाठी कंपन्या या माध्यमातून ही नुकसान भरपाई मिळणार असल्याने खरेच ही रक्कम तातडीने हाती येईल का, असा प्रश्न निर्माण होतो. त्यात ज्या शेतकऱ्यांनी कापूस शेतातून काढून टाकला आहे, तेथे पंचनामे कसे करणार. त्यांनाही मदत मिळाली पाहिजे. - जयाजी सूर्यवंशी, शेतकरी नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतज्ञता सोहळ्यात समाजसेवकांचा गौरव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निःस्वार्थपणे समाजसेवा करणाऱ्या ५० सामाजिक कार्यकर्त्यांचा शनिवारी संत मंहतांच्या उपस्थित गौरव करण्यात आला. समन्वय चेतना संवर्धन समारोहतर्फे रामचंद्र नाईक विद्यालयात सायंकाळी या अमृत महोत्सवी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी, भास्करगिरी महाराज, रा. स्व. संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मधू कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी, सहसत्संग प्रमुख महेंद्र नथुराम उर्फ दादा वेदक, देवगिरी प्रांत संघचालक गंगाधरराव पवार, भंते ग्यानजगत महास्थवीर, किशोर व्यास, विशुद्धानंद बोधी महाथेरो, भदंत राहुल बोधीजी, मधुकर गोसावी, सुभद्रा आत्या, भगवान आनंदगडकर महाराज, समारोह समितीचे अध्यक्ष हरविंदसिंग बिंद्रा, कार्यवाह रामदास लहावर, शामराव नाईक यांच्यासह अन्य संत मंहत यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रचारक, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब नाईक यांनी वयाचे ७५ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त केवळ त्यांचाच अमृत महोत्सव न करता समाजात निःस्वार्थपणे समाजसेवा करणाऱ्या ५० ज्येष्ठ व्यक्तींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यात मधू कुलकर्णी, बाळासाहेब नाईक, जगन्नाथ साही, कुलदीपसिग निऱ्ह, डॉ. एम. ए. वाहूळ, पुखराज पगारिया, बापूसाहेब कवठेकर, मालती करंदीकर, डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रल्हाद बारगजे यांच्यासह पन्नास सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विहंग’ शाळेचा ऋणी; रस्ता लवकर करू!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘विशेष मुलांसाठी शिक्षणाचे दार खुले करणाऱ्या विहंग शाळेचे काम कौतुकास्पद आहे. महापौर झाल्यानंतरचा हा माझ्यासाठी ह्रदयस्पर्शी क्षण आहे. या शाळेत बोलावल्याबद्दल मी शाळेचा ऋणी आहे. शाळेचा रस्ता लवकरच करू,’ असे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी दिले.

बीड बाय पासवरील विशेष मुलांच्या विहंग शाळेला महापौरांनी भेट दिली व पालकांच्या समस्या ऐकून घेतल्या. सावित्रीबाई फुले एकात्मिक समाज मंडळाचे कार्यवाहक सुहास आजगावकर, विहंग टीमचे सदस्य राजगोपाल करवा, विहंगच्या संचालिका आदिती शार्दूल उपस्थित होत्या. ‘विहंग’विषयी माहिती देताना शार्दूल यांनी सांगितले, ‘२०११मध्ये चार विशेष मुलांपासून विहंगने सुरुवात केली व आज शाळेत ५० विशेष मुले एकात्मिक शिक्षण पद्धतीवर आधारित अभ्यासक्रम शिकतात. शासनाची ओपन स्कूलिंगही विहंगमध्ये सुरू असून याद्वारे विशेष मूल सामान्य शाळेप्रमाणेच सहावीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकतात. याशिवाय पालकांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम 'संगोपन' शाळेमार्फत सुरू आहे. यानंतर पालकांनी मनोगत व्यक्त केले व शाळेसमोरच्या रस्त्याचा मुलांना किती त्रास होतो याचा पाढाच वाचवून दाखवला. आमची मुलही शाळेत जातील, शिकतील असा विश्वास आम्हाला विहंगने दिला, पण शाळेकडे येणारा रस्ता म्हणजे आमच्यासाठी आव्हान असते. या रस्त्यावरून मुलांना घेऊन येताना मूल प्रचंड चिडतात, गोंधळ करतात. कधी घाबरतात. पावसाळ्यात तर शाळा व पालकांसमोर मोठे आव्हान असते. या रस्त्याविषयी शासन दरबारी तक्रारी केल्या, मात्र अजूनही रस्ता तसाच आहे. आपण तरी या रस्त्याचे काम मनावर घ्यावे, अशी विनंती केली. महापौरांनी हे काम लवकर करू, असे आश्वासन दिले.

विशेष म्हणजे ‘मटा’नेही या रस्त्याच्या दुरवस्थेविषयी वेळोवेळी वृत्त दिले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिता जोशी, अर्पणा वैद्य, शीला रामदासी, करुणा राजपूत, वंदना चाबुकस्वार, दिशा शास्त्री, कल्पना फड यांच्यासह त्रिष्णा माळी आदींनी परिश्रम घेतले. पालकांतर्फे अमर टवाणी, नमिता जोशी, प्रतीक्षा ससाणे, श्रीकृष्ण सुतवणे व कल्याण पारगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. वैभवी चांदोडकर यांनी सूत्रसंचालन केले.

आठवड्याच्या आत शाळेला भेट देणार
महापौर म्हणाले, ‘सर्व पालक माझ्याकडे अपक्षेने पाहत आहेत. या कामात प्रशासकीय अडचणी असल्या तरी पालिकेची टीम आठवड्याच्या आत शाळेला भेट देईल. लवकरात लवकर हा रस्ता सुकर करण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे. मला इतके दिवस या विषयाचे गांभीर्य ठावूक नव्हते, पण आता त्या संवेदना समजल्या. विहंगने सार्वजनिक ठिकाणी विशेष मुलांना सहज प्रवेश व मूलभूत सुविधांविषयी पालिकेस मदत मागितली. महिला व बालविकास विभागाच्या मार्फत याविषयी काही निश्चित उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचा रास्ता रोको

$
0
0


परभणी: केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करत माजी खासदार तुकाराम रेंगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी (२३डिसेंबर) पालमच्या राज्य महामार्गावर एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य समशेर वरपुडकर, तालुकाध्यक्ष गुलाबराव सिरस्कर, अकबर पठाण, माधव फाजगे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.
पालमच्या प्रमुख राज्य महामार्गावरील मुख्य चौकात तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सामान्य जनता कशा प्रकारे त्रस्त असल्याचा आरोप केला. तर भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्याने. भाजपा सत्तेत आली त्यात ‘अच्छे दिन आनेवाले है’ पासून ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशा वेगवेगवेगळ्या जाहिराती करून जनतेची दिशाभूल केल्याचा टीका केली.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागसेन भेरजे यांनी सरकारच्या धोरणा विरोधात टीका केली. यावेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कापूस व सोयाबीन या पिकांना हेक्टरी २५ हजार रूपये अनुदान द्यावे, तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा मंजुर करत तत्काळ त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावा, वीजतोडणी तत्काळ थांबवावी, सरसकट वीजबिल माफ करावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला ३ हजार रुपये टन भाव द्यावा, आदीं विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार कदम यांना देण्यात आले.
या रस्ता रोको दरम्यान महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधानपरिषदेसाठी मातब्बरांची मोर्चेबांधणी

$
0
0

sachin.waghmare@timesgroup.com
लातूर, बीड, उस्मानाबादच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत जून २०१८ मध्ये संपणार असल्याने या निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार दिलीप देशमुख यांनी या मतदारसंघातून हॅटट्रिक केल्यानंतर यावेळेस मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने काँग्रेसला ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडावी लागणार असे दिसते. दुसरीकडे भाजपचे संख्याबळात लक्षणीय वाढ झाल्याने यावर्षीच्या निवडणुकीत चुरस असणार आहे.
१९९४ साली काँग्रेसचे नरेंद्र बोरगावकर या ठिकाणी निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होता. मात्र, २००० सालच्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे बलाबल राष्ट्रवादीपेक्षा अधिक असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही जागा काँग्रेसच्या पदरात पाडून घेतली. २००० साली त्यांनी त्यांचे बंधू दिलीप देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी देऊन बिनविरोध निवडून आणले. त्यावेळेस विरोधातील शिवसेनेच्या उमेदवाराने नाट्यमयरित्या रिंगणातून माघार घेतली होती.
२००६ सालच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या दिलीप देशमुख यांनी बाजी मारली त्यांनी या निवडणुकीत भाजपच्या संजय निंबाळकर यांचा पराभव केला. तर २०१२ सालच्या निवडणुकीत दिलीप देशमुख यांनी हॅटट्रिक करत भाजपचे सुधीर धुत्तेकर यांना धूळ चारली. मात्र, गेल्या तीन निवडणुकीत दिवंगत नेते विलासराव देशमुख त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने त्यांना हॅटट्रिक करता आली.
यावेळेस मात्र, चित्र वेगळे असणार आहे. काँग्रेसचे संख्याबळ खूपच कमी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवर दावा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुळजापूर तालुक्यातील उद्योजक अशोक जगदाळे इच्छूक आहेत. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी असलेले संबध पाहता त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यासोबतच जीवन गोरे यांचे नाव चर्चेत आहे. बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडीत हे त्यांची मुदत संपत असल्याने या जागेसाठी इच्छूक आहेत. बीडमधून पंडीत सोबतच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे विधानपरिषदेवर असल्याने यावेळेस उस्मानाबाद जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता अधिक आहे.
दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असून बीडचे माजी मंत्री सुरेश धस, रमेश आडसकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे लातूर जिल्हा परिषद, लातूर महापालिकेत यश संपादन केल्याबद्दल लातूरला संधी देण्याचे ठरले तर रमेश कराड यांचे नाव चर्चेत आहे. उस्मानाबादमधून भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर विधानपरिषदचे सदस्य असल्याने उस्मानाबादला संधी मिळण्याची शक्यता कमी असून मिळाली तर ज्येष्ठ नेते मिलींद पाटील, सुधीर पाटील यांचा विचार होऊ शकतो.
काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले अथवा ही जागा त्यांच्या वाट्याला आली तर पुन्हा दिलीप देशमुख हेच उमेदवार असण्याची शक्यता आधिक आहे. या परिस्थितीत शिवसेनेचे संख्याबळ कमी असल्याने शिवसेना निवडणूक लढवेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार का ? अन जागा कोणाला सुटणार ? यावर सर्व काही अवलंबून आहे. आघाडी झाल्यास त्यांना सहज विजय मिळवता येईल.

तर राष्ट्र्वादी काँग्रेसचे पारडे जड
सर्वच पक्षाने स्वबळ आजमाविण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसच पारडे जड असणार आहे. त्यांचे सध्याचे बलाबल २७९ असून बीडच्या काकू-नाना विकास आघाडीने पाठ‌िंबा दिल्यास त्यांचे संख्याबळ २३ ने वाढणार आहे. त्य‌ाशिवाय काही अपक्षांची जुळवा-जुळव करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी मातब्बर उमेदवार लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
अंबाजोगाई येथील ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी सकाळी दहा वाजता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पकंजा मुंडे-पालवे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून आद्यकवी मुकूंदराज साहित्य नगरी साहित्यकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनास संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यक प्रा. रंगनाथ तिवारी, मावळते संमेलनाध्यक्ष व माजी खासदार प्राचार्य डॉ. जनार्धन वाघमारे, खासदार रजनी पाटील, कवी पद्मश्री ना. धो. महानोर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री सुरेश धस, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, आमदार जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मण पवार, आर.टी.देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा साविता गोल्हार, अंबाजेागाईच्या नगराध्यक्षा रचना मोदी, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री मस्के, महिला व बालकल्याण विभागाचे सभापती शोभा दरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला हे उपस्थितीत राहणार आहेत.
या सोहळ्यात साहित्य संमेलनाच्य निमित्ताने काढण्यात आलेल्या ‘वाटचाल’ या स्मरणिका, मसापचे मुखपत्र प्रतिष्ठानचे ‘संत कवी विष्णुदास’ विशेषांक आणि वि. अं. कानोले लिखित ‘मुकूंदराजाची अंबानगरी कोणती ?’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या मुख्य सोहळयाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठावाडा साहित्य संमेलनाचे कार्यवाह दगडू लोमटे करणार आहेत. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीराज माने तर आभार वैशाली जोशी या मानणार आहेत.
संमेलनाची सुरुवात सकाळी आठ वाजता जागर दिंडीने (अन्नदाता सुखी भव) करण्यात येणार असून या जागर दिंडीचे उद्घाटन मसापचे प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे करणार आहेत. या वेळी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर तर शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव सुवर्णा खरात उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या आद्यकवी मुकूंदराज साहित्य नगरीतील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता संमेलनाचे मावळते अध्यक्ष माजी खासदार डॉ. जर्नाधन वाघमारे यांच्या हस्ते करण्यात येणार असून या वेळी माजी मंत्री सुरेश धस हे उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेश देशमुख उपाध्यक्ष अमर हबीब, कार्यवाह दगडू लोमटे यांनी केले आहे.

२४ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता शिक्षकांच्या कथाकथनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वि.भा. सोळुंके (आष्टी) हे राहणार असून यामध्ये मधुकर बैरागी (गेवराई), परसुराम सोंडगे (पाटोदा), गोरख शेंद्रे (अंबाजोगाई), रामदीप डाके (माजलगांव), कविता पांडे (अंबाजोगाई), भागवत सोनवणे (केज) आणि विवेक गंगणे (अंबाजोगाई) हे सहभाग घेणार आहेत. याच व्यासपीठावर दुपारी ४ वाजता शिक्षकांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगांवकर हे राहणार आहेत.

जागर दिंडीतून देणार संदेश
या साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष तथा किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांच्या संकल्पनेतून या जागर दिंडीत महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण देशातील शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ ‘अन्नदाता सुखी भव’ हा संदेश या जागर दिंडीतून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानाने काढली काकूची धिंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
पत्नीची बदनामी करत असल्याचा आरोप करत, एका जवानाने काकूची गळ्यात चप्पल घालून धिंड काढली. हा प्रकार शुक्रवारी रात्री उस्मानाबाद जिल्ह्यातील आलूर (ता. उमरगा) येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी लष्करात जवान असून, पिडित महिला त्याची सख्खी काकू आहे. त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होते. यातच, काकू पत्नीची गावात बदनामी करत असल्याचा आरोपीला संशय होता. त्या रागातून त्याने या महिलेला जबर मारहाण केली. त्यानंतर गळ्यात चपलेचा हार घालत गावातून धिंड काढली. विशेष म्हणजे हा प्रकार गावात सुरू असताना अनेकांनी महिलेचे फोटो काढले. मात्र, तिची सुटका करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. ही गोष्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित महिलेवर उमरगा येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, तिचे कुटुंब या घटनेनंतर दहशतीखाली आहे. मुरूम पोलिस ठाण्यात या प्रकरणी चार जणांवर गुन्हा नोंद केला आहे. ‘या प्रकरणातील आरोपी लष्करात जवान असून, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडूनही पुढील कारवाई करण्यात येत आहे,’ अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली
##############

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहे बांधण्यास नकार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकीकडे महापौर - सभापतींच्या गाड्यांसाठी चक्क तीस लाख रुपये खर्च करणाऱ्या पालिका प्रशासनाने स्वच्छतागृहांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या चार लाखांच्या बिलासाठी मात्र गेल्या पाच महिन्यांपासून झुलवत ठेवले आहे. त्यामुळे कंत्राटदाराने आक्रमक पवित्रा घेत महिलांसाठीची स्वच्छतागृहे बांधण्यास नकार दिला आहे.

महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यानुसार शहरात पाच ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पैठणगेट, बीबी - का - मकबरा, औरंगपुरा, बोटॅनिकल गार्डन आणि ज्युबलीपार्क ही ठिकाणे त्यासाठी निवडण्यात आली. यापैकी मकबऱ्याच्या परिसरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी महापालिकेला पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. त्यामुळे या ठिकाणचे काम सुरू होऊ शकले नाही. पैठणगेट, औरंगपुरा, ज्युबलीपार्क येथील काम देखील सुरू झालेले नाही. बोटॅनिकल गार्डन येथे स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू करण्यात आले, पण ते अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले. महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांच्या संदर्भात सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविकांनी अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले, पण काम सुरू असल्याचे उत्तर प्रशासनातर्फे देण्यात आले. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला तेव्हा बिल थकल्यामुळे कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला.

थकलेल्या बिलाबद्दल ‘मटा’ प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता महापालिकेने स्वच्छतागृहांच्या बांधकामाचे कंत्राट आधार फाउंडेशन या संस्थेला दिल्याचे कळाले. या संस्थेचे चार लाख रुपयांचे बिल पाच महिन्यांपासून प्रलंबित आहे. नगरसेविका वारंवार महिलांच्या स्वच्छतागृहांबद्दल प्रश्न उपस्थित करीत असताना अधिकारी मात्र बिल प्रलंबित ठेवून या प्रश्नाला बगल देत असल्याचे चित्र आहे.

...तर अवमान याचिका
दरम्यान, महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. तरीही या प्रकरणात महापालिका प्रशासन गंभीर नाही. आठ मार्चपर्यंत स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण न झाल्यास हायकोर्टात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमोहनसिंगांच्या भेटीला सत्तार, औताडे, काळे मुकले

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे शनिवारी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान ‘एसपीजी’च्या यादीत नाव नसल्याने जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार, सेवादल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे आणि माजी आमदार, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांना विमानतळात जाता आले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मनमोहनसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त शनिवारी दुपारी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग चिकलठाणा विमानतळावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आमदार अब्दुल सत्तार, विलास औताडे, डॉ. कल्याण काळे विमानतळावर पोचले. सुरक्षेच्या कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत, एसपी ऑफिस आणि तिथून ‘एसपीजी’कडे यादी पाठवावी लागते. दिल्लीतून मंजूर झालेली यादी विमानतळावर येते आणि त्यात नावे असलेल्यांनाच आत प्रवेश दिला जातो. या तिघांची नावे एसपीजीकडे आलेल्या यादीमध्ये नव्हती. त्यामुळे या तिघांना विमानतळावर प्रवेश मिळाला नाही.
काँग्रेसमधील प्रथेप्रमाणे जिल्हाध्यक्षांकडून जिल्ह्यातील नेत्यांची नावे, शहराध्यक्षांकडून शहरातील नेत्यांची नावे तसेच अन्य फ्रंटल संघटनांच्या प्रमुखांनी आपापली नावे जिल्हाधिकारी कार्यालयात कळवावी लागतात. तिथून याद्या एसपी ऑफिसला जातात, तिथून एसपीजी कार्यालयाकडे पाठवून त्यास मंजुरी मिळते. शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी त्यांची यादी पाठविली होती. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात असल्यामुळे जिल्ह्याची स्वतंत्र यादी कदाचित दिलीच गेली नाही. त्यामुळे सत्तार आणि काळे यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांचा पास एसपी ऑफिसमधून काढला गेला. पण त्यास एसपीजीची मंजुरी नसल्याने त्यांनाही प्रवेश मिळाला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळशीतील फार्म हाउसमध्ये पर्यटकांना मारहाण

$
0
0

औरंगाबादः पळशीतील रामेश्वर पॅसिफिक नेचर अ‍ॅडव्हेन्चर पार्कमधे जेवणासाठी गेलेल्या सिडको, एन-४ मधील ११ कुटुंबियांना फार्म हाउसच्या मालकासह गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. ही गंभीर घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. यावेळी महिला आणि मुलींना देखील गावकऱ्यांसह फार्म हाउसच्या मालकाने अमानुषपणे मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सलग तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक शहराबाहेर जात आहेत. दररोजच्या दगदगीतून सुटका करून घेण्यासाठी पर्यटनस्थळ, फार्महाउसवर गर्दी आहे. सिडकोतील अमेय देवरे (वय २६) यांनी अकरा कुटुंबियांसह जेवणाची ऑर्डर पळशी येथील रामेश्वर पॅसिफिक नेचर अ‍ॅडव्हेन्चर पार्क येथे बुक केली होती. त्यासाठीची अागाऊ रक्कमही देण्यात आली होती. हे कुटुंब सकाळी ११ वाजता रामेश्वर पळसकर यांच्या फार्म हाउसवर गेले. जेवणाची वेळ झाल्यानंतरही सुविधा नीट मिळत नसल्याने या कुटुंबांचा पळसकरांसोबत वाद झाला. त्यामुळे पळसकरसह नोकरांनी या कुटुंबातील महिला व मुलींना बेदम मारहाण केली. त्यात गावकऱ्यांनीही उडी घेतली. गावातील काही नागरिकांनी देखील या कुटुंबांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यामुळे पळशीमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला. काहींनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद सुटला. दरम्यान, याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी देवरे यांनी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी तक्रार नोंदवून घेत ती फुलंब्री पोलिस ठाण्यात वर्ग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मार्गावर शिवशाही बस औरंगाबादमधून सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद बस स्‍थानकावरून बोरिवली, नागपूर आणि कोल्हापूरसाठी शिवशाही बस रविवारी (२४ डिसेंबर) सोडण्यात आल्या. पहिल्या दिवशी निघालेल्या शिवशाही बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व बस फुल्ल झाल्या होत्या. याशिवाय सिडको बस स्‍थानकाहून अकोलासाठी सोडण्यात आलेल्या शिवशाही बसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
औरंगाबाद मध्यवर्ती बस स्‍थानकाला नऊ शिवशाही बस महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. या बस मिळाल्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी या बस रविवारी सोडण्यात आल्या. औरंगाबाद बोरिवलीसाठी जाणाऱ्या बसचे उद्‍घाटन महापौर नंद कुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. या बसमध्ये ४५ प्रवाशी होते. यानंतर ६ वाजता औरंगाबादहून नागपूरला जाणाऱ्या शिवशाही बसचे उद्‍घाटन विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय औरंगाबाद-मुंबई शिवशाही बस रात्री आठ वाजेच्या दरम्यान सोडण्यात आली. तसेच सिडको बस स्‍थानकातून अकोलाकडे जाणारी बस रात्री आठ वाजता सोडण्यात आली.
सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने बस स्‍थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली होती. बस स्‍थानकावर आलेल्या प्रवाशांना एसटीच्या मालकीच्या शिवशाही बसमधून प्रथमच आरामदायी प्रवास करण्याचा योग आला. औरंगाबादहून बोरिवली, नागपूर, मुंबई, कोल्हापूर आणि अकोला मार्गावर शिवशाही सोडण्यात आली आहे. तर बोरिवली, नागपूर, मुंबई, अकोलाकडून औरंगाबादकडे येणाऱ्या शिवशाही बसही त्या त्या ठिकाणाहून आजच औरंगाबादकडे सोडण्यात आल्या.

शिवशाहीची वेळ व प्रवास भाडे

औरंगाबाद ते बोरीवली १७.३० ६०१
औरंगाबाद ते नागपूर १८.०० ७९८
औरंगाबाद ते मुंबई २०.१५ ६०१
औरंगाबाद ते कोल्हापूर २१.०० ७३२
औरंगाबाद ते अकोला ८.०० ४०४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट कागदपत्राद्वारे घराची विक्री; गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घराची बनावट कागदपत्रे तयार करीत तोतया महिला मालक दाखवून आठ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीवर जावयाचे अपहरण केल्याप्रकरणी बेगमपुरा सिटीचौक पोलिस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शेख मोबीन जान मोहम्मद शेख (रा. हर्सूल) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. या प्रकरणात आरोपी शेख मुश्ताक शेख मुनाफ (रा. रशिदपुरा), शेख इरशाद शेख हबीब (रा. किराडपुरा) यांच्यासह एका महिलेने २७ जून २०१७ रोजी कट रचला. मनपा कार्यालयासमोरील डायमंड फक्शन हॉल येथे हा प्रकार घडला. हर्सूल येथील सर्वे क्रमांक २२५-३-२ मधील प्लॉट क्रमांक ६५ या घराची बनावट कागदपत्रे तिघांनी तयार केली. घराच्या मालकीणीच्या जागेवर शेख मुश्ताकच्या भावजयीला उभे करण्यात आले. यानंतर या घराची विक्री शेख मोबीन यांना आठ लाखांत करण्यात आली. हा प्रकार नुकताच शेख मोबीन यांच्या निदर्शनास आला. त्यांनी शनिवारी सिटीचौक पोलिस ठाणे गाठून तिन्ही आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीएसआय बांगर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅचवर्कमुळे रस्ता बनला धोकादायक

$
0
0

पॅचवर्कमुळे रस्ता बनला धोकादायक
बजरंग चौक ते आझाद चौक रस्त्यावर वाहने चालविणे अवघड; ‘भूमिगत’ लावली सिडकोच्या रस्‍त्यांची वाट
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
शहरातील महत्त्वाच्या रस्‍त्यांपैकी एक असलेला आझाद चौक ते बजरंग चौक हा रस्ता वाहन धारकांसाठी धोकादायक बनला आहे. रस्‍त्याच्या अर्ध्याच भागावर पॅचवर्क करण्यात आले आहे. त्यामुळे एका भागात उंचवटा तर दुसरा भाग खाली अशी रस्त्याची अवस्था झाली आहे.
सिडकोत भूमिगत गटार योजनेची कामे करताना रस्ते उखडले गेले. त्यानंतर पुन्हा ते तयार करताना मात्र अर्धवट तयार झाला आहेत. बजरंग चौक ते आझाद चौक रस्त्याची तीच गत झाली आहे. भूमिगत गटार योजनेंतर्गत बजरंग चौक ते आझाद चौक दरम्यानच्या उद्यानासमोराचा रस्ता पूर्णतः खोदण्यात आला होता. याशिवाय माता मंदिराकडून अविष्कार चौकाकडे जाणारा रस्ताही खोदण्यात आला होता.
भूमिगत गटारीचे काम पूर्ण करताना हा रस्ता पूर्ण खराब झाला. जागोजागी मोठे खड्डे झाले. भूमिगतचे काम झाल्यावर त्याच कंत्राटदाराने रस्ता बांधण्याची अट पालिकेने टाकलेली आहे. मात्र, कंत्राटदाराने खोदलेला रस्ता बांधताना एकाच बाजूचा बांधून दिला आहे. बजरंग चौक ते आझाद चौकादरम्यानच्या रस्त्याचे अर्धेच डांबरीकरण झालेले आहे. अर्धा रस्ता खराब आणि अर्धा रस्ता डांबरीकरण अशी अवस्था येथे झाली आहे. आझाद चौकाकडून जाणारी वाहने या चांगल्या रस्त्यावरून जात आहेत. मात्र, खड्डे चुकविण्यासाठी बजरंग चौकाकडून येणारी वाहनेही अनेकदा याच अर्ध्या डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरून जात आहेत. एकाज बाजूने दोन्हीकडील वाहने जात असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. एका बाजूला उंचवटा झाल्यानेही वाहने चालविणे अवघड झाले आहे.
अर्धवट तयार झालेला हा रस्ता लवकरात लवकर पूर्णतः चांगला करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

भूमिगत गटार योजनेत हा रस्ता उखडलेला होता. त्या कंत्राटदाराने अर्ध्याच रस्‍त्याचे पॅचवर्क केले आहे. पूर्ण रस्त्याचे पॅचवर्क करण्याबाबत मी महापालिककडे पाठपुरावा करीत आहे. सिडकोमधील अन्य रस्‍त्यांचीही अवस्‍था भूमिगतमुळे वाईट झालेली आहे. आगामी आठ दिवसांत हा रस्ता चांगला करण्याचा इशारा दिला असून तसे न झाल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय मार्ग राहणार नाही.
शिवाजी दांडगे, नगरसेवक, गुलमोहर कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषा अभिजातच

$
0
0

मराठी भाषा अभिजातच

प्रा. रंगनाथ तिवारी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, अंबाजोगाई

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या भाषेला अभिजाततेची मान्यता देणारे तुम्ही कोण ? ज्ञानेश्वरी, पासोडी, गाथा हे साहित्य जगातील क्लासिकल साहित्य आहे. मराठी भाषा अभिजात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही असे प्रतिपादन ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांनी केले. अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

अंबाजोगाई (जि. बीड.) येथे ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे रविवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उद्घाटन केले. यावेळी मंचावर खासदार रजनी पाटील, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार सुरेश धस, रमेश आडसकर, मसापचे अध्यक्ष कौतकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे, प्रा. किरण सगर, दगडू लोमटे आदी उपस्थित होते. आपल्या वाटचालीचा आणि सभोवतालच्या परिस्थितीवर संमेलनाध्यक्ष तिवारी यांनी भाष्य केले. स्वाभिमानाने जगणारे विद्यार्थी भेटले. या आठवणी माझ्या जगण्याचा आधार झाल्या आहेत. सध्या माणसं विवेकाने वागत नसल्यामुळे आपल्या विवेकसिंधूचे काय होणार असा प्रश्न पडतो. मराठी भाषा अभिजात असून तिला वेगळा दर्जा जाहीर करून काही साध्य होणार नाही असे तिवारी म्हणाले. एखाद्या विचाराला समाजासमोर मांडणे सोपी कला नाही. आपल्या मराठवाड्यात मोठे साहित्यिक असताना नवीन पिढीचा साहित्याशी का संबंध नाही असा प्रश्न पडतो. हा मंच राजकारणासाठी नसून इथे साहित्यावर बोलणे अपेक्षित आहे असे पंकजा म्हणाल्या. यावेळी वाटचाल स्मरणिका, प्रतिष्ठान अंक आणि विवेकसिंधू विशेषांकाचे मान्यवरांनी प्रकाशन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दगडू लोमटे यांनी केले, तर वैशाली गोस्वामी यांनी आभार मानले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूबंदी मोहिमेला धक्का; महिलांचा हिरमोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील शिऊर येथील सरकारमान्य दारूचे दुकान हद्दपार करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी महिलांसह पुरुषांनी केलेल्या सह्यांची पडताळणी रविवारी करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मोहिमेत सहा प्रभागातील सह्या केलेल्या २२२९ मतदारांपैकी केवळ ७५१ मतदारांनीच हजेरी लावत स्वाक्षरीची नोंद केली. यामुळे दारूबंदीसाठी झटणाऱ्या महिलांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या शिऊर येथील सरकारमान्य देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी दारुड्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी चार वर्षांपूर्वी एकजूट करत एल्गार पुकारला होता. त्यासाठी २०१३ मध्ये विशेष ग्रामसभा घेत व्यथा मांडण्यात आल्या. मात्र, पुरेशा संख्याबळाऐवजी दारूबंदीचा प्रयोग अपयशी ठरला होता. त्यानंतर २ मे २०१७ रोजी त्रस्त महिलांनी पुन्हा आवाज उठवत देशी दारूचे दुकान फोडून उद्‍ध्वस्त करत संताप व्यक्त केला होता. तेव्हापासून दारूबंदीविरुद्ध पुन्हा मोहीम उघडण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गावात सह्यांची मोहीम घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना २७६१ सह्यांचे निवेदन देण्यात आले होते. निवेदनात नमूद नावाप्रमाणे उर्वरित २२१९ मतदारांसाठी मतदारयादीनुसार रविवारी सकाळी १० ते ५ यावेळेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सह्यांची पडताळणी केली. यात २०५३ मतदारांनी नोंद करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ६५१ मतदारांनीच स्वाक्षरीची नोंद केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे, सरपंच नितीन चुडीवाल, उपसरपंच जाकेर सय्यद,नंदू जाधव, नवनाथ आढाव, गिरीश भावसार, बबन जाधव, माजी सरपंच चंद्रशेखर खांडगौरे, निलेश देशमुख, भाऊसाहेब काळे, सुशील देशमुख, विवेक जाधव, नितीन भावसार, रईस शेख, बाळा जाधव, रवी जानोसे हे तळ ठोकून होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक धंनजय फराटे, फौजदार आनंद पाटोळे, रोहिदास तांदळे, पी. आर. जाधव आदींनी बंदोबस्त ठेवला.
ही स्वाक्षरी पडताळणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शरद फटांगडे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. त्यांना प्रकाश जयवंत, जावेद कुरेशी, के. पी. जाधव, गणेश पवार, सुशील चव्हाण, बाळासाहेब नवले, राहुल रोकडे आणि ३५ कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यातील खड्डा बनला धोकादायक

$
0
0

रस्त्यातील खड्डा बनला धोकादायक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगपुरा ते निराला बाजार रोडवर गेल्या आठ दिवसांपासून मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा नंतर माती टाकून बुजविण्यात आला आहे. या खड्ड्यावर कोणी आदळू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड्स देखील टाकले आहेत. हा धोकादायक खड्डा बुजवण्याची नागरिकांची मागणी आहे.
महात्मा फुले चौक ते निराला बाजार हा शहरातील महत्त्वाचा मार्ग आहे. एसी कॉलेजला जाण्यासाठी देखील हाच मार्ग आहे. या ठिकाणी एसबी कॉलनीकडे जाणाऱ्या चौकातच आठ दिवसांपूर्वी खड्डा खोदण्यात आला होता. थातूरमातूर पद्धतीने या खड्ड्यात आता माती टाकण्यात आली आहे. या मार्गावर विद्यार्थ्यांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर होते. या खड्ड्यामुळे या ठिकाणी दररोज किरकोळ अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड्स उभे केले आहेत. दिवसा हे बॅरिकेड्स दिसतात. रात्री मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनधारकाला हे बॅरिकेड्स दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. हा खड्डा योग्य पद्धतीने बुजवण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images