Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एमआयडीसीतल भूखंडांचे दर वाढवावेत

$
0
0
वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसातीतील भूखंडाचे दर वाढवावेत, अशी मागणी उद्योगक्रांती उद्योजक संघातर्फे करण्यात आली आहे.

पालिकेत उपस्थितीची अधिकाऱ्यांना सक्ती करा

$
0
0
‘अधिकारी दुपारनंतर पालिकेत उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची कुचंबना होते. सर्वच अधिकाऱ्यांनी दुपारी तीन ते पाच या वेळात पालिकेत उपस्थित राहण्याची सक्ती करा,’ अशी मागणी नगरसेवक समीर राजूरकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

हृदयरोग्यांवर कुठल्याही शस्त्रक्रियेविना उपचार

$
0
0
संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही माधवबागने निर्माण केलेली उपचारपद्धती आहे. याद्वारे हृदयरोग्यांवर कुठल्याही शस्त्रक्रियेविना उपचार करता येतात. ब्रिटीश जर्नल ऑफ मेडिसीन अँड मेडिकल रिसर्चने या उपचारपद्धतीची प्रशंसा केली असून या उपचाराचा जागतिक पातळीवर स्वीकार करण्यात आला आहे

औरंगाबादमध्ये 'आप'चा मेळावा

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीची राज्यातील राजकीय दिशा ठरविण्यासाठी आम आदमी पार्टीचा दोन दिवसांचा मेळावा २२ तारखेपासून औरंगाबाद शहरात होणार आहे.

इलेक्ट्रोपाथ सर्व्हिसेसच्या बिलांतील त्रुटींची चौकशी

$
0
0
वैजापूरचे आमदार आर. एम. वाणी यांनी महावितरणची कंत्राटदार मे. इलेक्ट्रोपाथ सर्व्हिसेस प्रा. लि. ने जिल्ह्यात कामे न करता बिले उचलल्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मांडला होता.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा

$
0
0
विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सहा जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघाने दिला आहे.

देवगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढाकार

$
0
0
दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर यात्रेकरू कर आकारण्यास जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

शेंद्य्रातील अग्नितांडव सात तासांनंतर शांत

$
0
0
शेंद्रा येथे मेणाच्या कारखान्याला लागलेली आग रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या साठी लाखो लिटर पाणी व हजारो लिटर फोमचा वापर करण्यात आला.

मुस्लिम समाजाला आठ टक्के आरक्षण हवेच

$
0
0
‘देशासह राज्यातील मुस्लिम समाज अविकसित आहे. राज्यातील ७० ते ८० टक्के मुस्लिम समाज झोपडपट्टीत राहतो. यांपैकी फक्त दोन टक्के जणच उच्च शिक्षण घेत आहे.

दुरुस्तीच्या कामांमुळे दिवसभर ‘बत्ती गुल’

$
0
0
महापारेषणने तातडीच्या दुरुस्त्या काढल्यामुळे शुक्रवारी दिवसभर संपूर्ण औरंगाबाद शहरात वीज पुरवठा झाला नाही.

सिल्लेखान्यातील कचरा दोन वेळा उचला

$
0
0
अजबनगर, सिल्लेखाना येथील कचरा दिवसातून दोन वेळा उचला, असे आदेश महापौर कला ओझा यांनी शुक्रवारी पालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले. महापौर कला ओझा यांनी आज शुक्रवारी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

लॉटरीला मिळालेल्या ‘सवलतीं’ची चौकशी करा

$
0
0
लॉटरीवर ‘एलबीटी’ (स्थानिक संस्था कर) का वसूल करण्यात आला नाही, याची चौकशी करा, अशी मागणी उपमहापौर संजय जोशी यांनी केली आहे. लॉटरीवर ‘एलबीटी’ वसूल करण्यास बंदी येईपर्यंतच्या काळातील एलबीटी पालिकेने वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अण्णांच्या पाठिंब्याला गळती

$
0
0
अण्णा हजारे यांच्या पाठिंब्यालाही औरंगाबादमध्ये ओहटी लागली असून जिल्हाधिकारी कार्यालयावरील धरणे आंदोलनात अगदी मोजकेच लोक सामील होत आहेत. २०१० मध्ये सोशल मीडियावर दिसणारा उत्साह यावेळी अजिबात दिसत नाही.

डीटीएड, बीएडधारकांची उद्या ‘परीक्षा’

$
0
0
शिक्षक भरतीसाठीची ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) येत्या रविवारी होत आहे. ‘टीईटी’ बंधनकारक करण्यात आल्यानंतर प्रथमच ही परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सूकता आहे.

सावत्र भावाचा खून : तिघा जणांना जन्मठेप

$
0
0
शेतातील बांधाच्या कारणावरुन सावत्र भावाचा खून केल्याप्रकरणी पालखेड (ता. वैजापूर) येथील दोन भावांसह एकाच कुटुंबातील तिघांना वैजापूर सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

व्यापारी गाळ्यांच्या कामाला विरोध

$
0
0
वैजापूर तालुक्यातील नादी येथे मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व्यापारी गाळ्यांच्या कामास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. नादी ग्रामपंचायतीने गावठाणाबाहेरील तहसीलच्या जागेवर गट क्रमांक एकमध्ये काम सुरू केले आहे.

भाजपच्या अध्यक्षाची निवड ठरली औटघटकेची

$
0
0
भाजपच्या लातूर जिल्हा शहर अध्यक्षपदी मुंडे समर्थक सुधीर धुत्तेकर यांची निवड झाल्याचे पत्रक प्रसिध्दीला दिले. त्यानंतर अवघ्या एक तासातच तावडे-गडकरी गटाचे जिल्हा अध्यक्ष नागनाथ निडवदी यांनी सर्व निवडीला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडवणीस यांनी स्थगिती दिली असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले.

लातूरमध्ये एकता दौडचे आयोजन

कोरडवाहू अभियानाला ‘रब्बी’त वेग

$
0
0
कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासासाठी सुरू झालेल्या राज्यस्तरीय कोरडवाहू अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून रब्बी पिकांच्या भरघोस उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. राज्यातील ३४७ गावात हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

कर्मचा-यांतील प्रमोशनचा वाद अद्यापही मिटेना

$
0
0
प्रमोशनच्या प्रमाणावरून महसूल कर्मचारी आणि तलाठी यांच्यात सुरू असलेला वाद अद्यापही मिटलेला नाही. या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. आता सचिवस्तरावर या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images