Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

झालर संघर्ष समितीची 'आम आदमी'कडे धाव

$
0
0
झालर क्षेत्रातील बाधितांच्या समस्यांची दखल सिडको घेत नसल्यामुळे, औरंगाबाद झालर किसान संघर्ष समिती आम आदमी पक्षाकडे धाव घेणार आहे. सिडको कार्यालयासमोर रविवारी झालेल्या बैठकीत सुनावणी समिती स्थळ पाहणी करीत नसल्याचा आरोप करण्यात आला.

हुश्श, एकदाची 'टीईटी' झाली!

$
0
0
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणारी आणि ‘सीईटी’ अणं पुढे केव्हा होईल याचा नसलेली स्पष्टता. यात आज झालेल्या ‘टीईटी’ला डीटीएड, बीएडधारकांचा उत्साह दिसून आला. दहावी-बारावी परीक्षेला ज्या उत्साहात विद्यार्थी सहभागी असतात अशाच प्रकारे भावी शिक्षक देखील रविवारी विद्यार्थी म्हणून परीक्षेला हजर होते.

‘करारपत्रात भूखंडाची अट टाकली पाहिजे’

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोरसाठी जमीन संपादित करताना विकसित भूखंड शेतकऱ्यांना देण्याची अट करारपत्रात समाविष्ट करण्यात यावी, असे मत सुप्रीम कोर्टातील वकिल युवराज बारहाते यांनी रविवारी (१५ डिसेंबर) बिडकीन येथे व्यक्त केले.

‘बिबी का मकब-या’ला आले ५ हजार पर्यटक

$
0
0
सलग दोन दिवसांची सुट्टीमध्ये ऐतिहासिक ठिकाणांकडे पर्यटकांनी आपला मोर्चा वळवला आहे. स्थानिक पर्यटकांबरोबरच देश आणि विदेशातून बिबी का मकबरा, वेरूळ आणि पाणचक्कीवरही येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीचे आल्यामुळे कुटुंबासह लोक पर्यटनाला निघाले आहेत. तसेच, हिवाळी सुट्ट्यांमुळे विविध ठिकाणी पर्यटकांची शहरात रेलचेल वाढली आहे.

हक्काच्या पाण्यासाठी राज्यपालांना साकडे

$
0
0
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळत नाही. या प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीने राज्यपाल के. शंकरनारायणन यांना केली आहे.

विविध घटनांमध्ये दोघे बेपत्ता

$
0
0
दोन विविध घटनांमध्ये दाने नागरिक घरातून निघून गेल्याच्या घटना पुंडलिकनगर व लक्ष्मी कॉलनी येथे घडल्या. या प्रकरणी सबंधीत पोलिस ठाण्यामध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. धनंजय छगन जाधव (वय ५२ रा. पुंडलीकनगर) हे वाळूज भागात बीएसएनएलचे तांत्रिक कर्मचारी आहेत.

नगरसोल-औरंगाबाद रेल्वे धावणार वेगाने

$
0
0
दौलताबाद-रोटेगाव रेल्वे स्लीपर बदलण्याचे काम पुन्हा सुरू होणार असून रोटेगाव ते नगरसोल मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचा वेग वाढेल. रेल्वे स्लीपर संपल्यामुळे मागील दीड महिन्यांपासून रेल्वे रूळाचे काम थांबले होते.

थंडी आली मुक्कामी

$
0
0
डिसेंबर महिन्याच्या मध्यावर थंडी मुक्कामी आली असून पौर्णिमेनंतर पारा आणखी घसरण्याचा अंदाज आहे. एका आठवड्यापासून थंडीचा जोर वाढला असून तीन दिवसांपासून पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे.

'वक्फ'चे कर्मचारी करणार लेखणी बंद

$
0
0
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावी; तसेच मंडळाचा वाढता कारभार लक्षात घेऊन या विभागात भरती प्रक्रिया राबविण्याची कारवाई करावी, या मागणीसाठी राज्य वक्फ मंडळ कर्मचारी संघटनेने लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

‘केमिस्टच्या संपात सहभागी नाही’

$
0
0
सरकारच्या जाचक अटींविरोधात संपाचे हत्यार पुकारलेल्या केमिस्टांपासून लांब राहणार असल्याचे ‘ऑल महाराष्ट्र केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर असोसिएशन’चे विलास काबरा यांनी सांगितले. काबरा म्हणाले, ‘औषध विक्री हा १०० टक्के धंदा नसून सामाजिक बांधिलकी ठेवून केली जाणारी लोकसेवा आहे.

नव्या पर्यायाने महागाई रोखावी!

$
0
0
‘आम्ही सत्तेत आल्यानंतर भाजीपाला-अन्नधान्याचे भाव कमी करू, असा दावा दिल्लीतील राजकीय पक्षाने केला आहे. महागाई रोखताना उत्पादक शेतकऱ्याचा त्यांनी विचार केला का, असा प्रश्न पडतो. जनतेने स्वीकारलेल्या या नव्या पर्यायाकडे एकदा सत्ता देऊनच टाका आणि परिणाम बघा,’ या शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘आम आदमी पार्टी’वर परखड टीका केली.

रस्त्यांची १०० कोटींची कामे ठप्प

$
0
0
गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या कामांची रक्कम मिळत नसल्याने कंत्राटदारांनी रस्त्यांच्या कामावर दोन महिन्यांपासून बहिष्कार टाकला आहे. या बहिष्कारामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर कोटी रुपयांची रस्त्यांची कामे थांबली आहेत.

सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद

$
0
0
सराईत दरोडेखोरांच्या टोळीतील तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून मंगळसुत्रासह सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

‘नवजीवन’तर्फे जागतिक मतिमंद दिन

$
0
0
जागतिक मतिमंद दिवसाच्या निमित्ताने मतिमंदांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत नवजीवन पालक संघच्या वतीने मतिमंद मुले व त्यांच्या पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. झकेरिया कॅम्पसमध्ये ‘हरित परिषद’

$
0
0
संतुलीत पर्यावरणाबाबत अनेक शैक्षणिक संस्था काम करतात. परंतु प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट बाबत फारसा विचार होत नाही. हे लक्षात घेत पर्यावरण प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटबाबत डॉ. रफीक झकेरिया कॅम्पसमध्ये तीन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषद होत आहे.

सामाजिक अर्थव्यवस्थेची बाबासाहेबांकडून पायाभरणी

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे दृष्टे अर्थशास्त्रज्ञ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हो‌ते, यामुळेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे होणार लेखन

$
0
0
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे लेखन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर केले आहे.

‘वास्तूमध्ये लँडस्केपची भूमिका महत्त्वाची’

$
0
0
द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, औरंगाबादच्या वतीने शनिवारी ‘लँडस्केप आर्किटेक्चर’ या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.

एसटी कर्मचाऱ्यांनाही टार्गेट

$
0
0
एसटी महामंडळाला तोटयातून बाहेर आणण्यासाठी विविध उपक्रम एसटी महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. यातच आता आगामी दोन महिन्यात दहा हजार पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात साखळीचोरांचा पुन्हा धुमाकूळ

$
0
0
शहरात मंगळसूत्र चोरांनी सोमवारी पुन्हा डोके वर काढले. दोन विविध घटनांमध्ये दोन मंगळसूत्रे चोरांनी पळवली. बीड बायपास भागातून भाविक महिलेचे, तर ज्योतीनगर भागातून एका महिलेचे मंगळसूत्र पळवण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images