Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खरवडकरांवर निलंबनाची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'फेसबुकवर महापालिकेचे सभागृह आणि नगरसेवक यांच्याबद्दल अवमानकारक पोस्ट टाकणाऱ्या महापालिकेच्या नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार जयंत खरवडकर यांना तात्काळ निलंबित करा,' असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले. खरवडकर यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करा, असेही ते म्हणाले.

महापालिकेची सर्वसाधारण सभा नऊ फेब्रुवारी रोजी झाली होती. या सभेत जंयत खरवडकर यांच्या नियुक्तीवरून आणि ते सध्या करीत असलेल्या कामाबद्दल नगरसेवक राजेंद्र जंजाळ, राजगौरव वानखेडे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. खरवडकरांची नियुक्ती, त्यांच्यावतीने न्यायालयात महापालिकेची बाजू मांडणाऱ्या वकिलाची नियुक्ती, महापालिकेच्या पॅनलवर नसल्याची कागदपत्रे जंजाळ यांनी आयुक्तांना सादर केली होती. ही कागदपत्रे तपासून सर्वसाधारण सभेत बाजू मांडण्याची ग्वाही आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली होती. दरम्यानच्या काळात खरवडकर यांनी लोकप्रतिनिधींचा अवमान होईल, अशी शब्दरचना असलेली पोस्ट फेसबुकवर टाकली. या पोस्टसंदर्भात जंजाळ, वानखेडे, माजी महापौर त्र्यंबक तुपे, गजानन मनगटे यांनी आयुक्तांकडे तक्रार करून खरवडकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर आयुक्तांनी खरवडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (१५ फेब्रुवारी) पुन्हा झाली. या सभेत खरवडकर यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट, त्यानंतर त्यांना बजावण्यात आलेली नोटीस, या नोटीसला त्यांनी दिलेले उत्तर याबद्दल वानखेडे, जंजाळ, तुपे यांची चांगलीच चिरफाड केली. खरवडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी या सर्वांनी लावून धरली. एमआयएमचे नगरसेवक गंगाधर ढगे, अय्युब जहागिरदार यांनी खरवडकर यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जंजाळ यांनी खरवडकर यांच्या नियुक्तीबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले. महापौरांनी याबद्दल उपायुक्त रवींद्र निकम यांना खुलासा करण्यास सांगितले. निकम यांनी केलेला खुलासा समाधानकारक नाही, अशा भावना नगरसेवकांनी व्यक्त केल्या. दरम्यान, सभागृहनेते विकास जैन, माजी महापौर भगवान घडमोडे, नगरसेविका सुनीता आऊलवार, उपमहापौर विजय औताडे यांनी देखील खरवडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी केली.

त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी खरवडकर यांना निलंबित करा, असे आदेश प्रशासनाला दिले. खरवडकर यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करणे अभिप्रेत आहे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला स्वच्छतागृहांची कामे आठ मार्चपूर्वी पूर्ण करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलांच्या स्वच्छतागृहांची कामे आठ मार्चपूर्वी पूर्ण करा, अशी आग्रही मागणी नगरसेविकांनी गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. स्वच्छतागृहांच्या बांधकामाबद्दल दोन दिवसांत अहवाल द्या, असे आदेश महापौरांनी दिले.

नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी महिलांच्या स्वच्छतागृहांचा मुद्दा मांडला. गेल्यावर्षी महिला दिनाच्या दिवशी स्वच्छतागृहांचे भूमिपूजन करण्यात आले. अद्याप एकाही स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराचे चार लाख रुपयांचे पेमेंट थकल्यामुळे कंत्राटदार काम करण्यास तयार नाही, असे त्या म्हणाल्या. स्वच्छतागृहांचे बांधकाम तात्काळ सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली. अॅड. माधुरी अदवंत, शिल्पाराणी वाडकर, सीमा खरात यांनी देखील स्वच्छतागृहांचा विषय मांडला. खरात म्हणाल्या, 'एकाही स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही, मग त्यांच्या भूमिपूजनाची घाई का केली. महापालिकेतील स्वच्छतागृहांची अवस्था देखील वाईट आहे.' स्वच्छतागृहांच्या बांधकामाच्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणे तात्काळ हटवा. तोपर्यंत आम्ही सभागृहातून बाहेर जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यावर आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी एका तासातच सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील, असे आश्वासन दिले. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी स्वच्छतागृहांच्या बांधकामाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, 'पाचपैकी तीन स्वच्छतागृहांचे उद्घाटन महिला दिनी करता येईल.' यानंतर प्रशासनाला आदेश देताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'स्वच्छतागृहांसंदर्भात नगरसेविकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला सोबत घेऊन स्वच्छतागृहांच्या ठिकाणांची पाहणी करा व त्याचा अहवाल सादर करा.'

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिन्यांचे अंदाजपत्रक थांबवू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्ध होणारे पाणी याचे व्यस्त प्रमाण लक्षात घेता मार्च अखेरपर्यंत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम करू नका, असे आदेश महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. आयुक्तांच्या या आदेशाला महापौरांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत छेद दिला. जलवाहिन्या टाकण्याच्या कामांचे अंदाजपत्रक थांबवू नका, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

पाणीपुरवठ्याचा प्रश्न माजी महापौर भगवान घडमोडे यांनी मांडला. विठ्ठलनगर, रामनगर या भागातील पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. सिडको एन-पाच येथील जलकुंभावरून १५ ते १८ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. त्या सर्वच वॉर्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे. पाणी येण्याच्या वेळा निश्चित नाहीत, असे ते म्हणाले. यासंदर्भात तक्रार केली, तर कुणीच दखल घेतनाही, असा उल्लेख त्यांनी केला. उन्हाळ्याच्या दृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन योग्य प्रकारे झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

शिवसेनेचे रेणुकादास (राजू) वैद्य म्हणाले, 'पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करण्यात आली नाही. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प होईल तेव्हा होईल, तोपर्यंत जायकवाडीतून नक्षत्रवाडीपर्यंत मुबलक पाणी आले पाहिजे, असे नियोजन करा. आगामी उन्हाळ्यात त्रास होणार नाही असा पद्धतीने प्रशासनाने काम करावे.' काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, एमआयएमचे जफर बिल्डर यांनीही पाणीपुरवठ्याबद्दलच्या समस्या सभागृहात मांडल्या.

पाण्याच्या ऑडिटचे आदेश

नगरसेवकांच्या भावना लक्षात घेवून महापौर नंदकुमार घोडेले प्रशासनाला आदेश देताना म्हणाले, 'शहरात येणाऱ्या १५५ दशलक्ष लिटर पाण्याचे ऑडिट करा. इतर महापालिकांच्या तुलनेत औरंगाबाद महापालिकेतील पाणीपट्टीची रचना स्पष्ट करा. जलवाहिन्या टाकण्याची अनेक नगरसेवकांची मागणी आहे, त्यामुळे जलवाहिन्या टाकण्याच्या कामाचे अंदाजपत्रक थांबवू नका.'

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सावकारी जोमाने, वर्षभरात १४ कोटीचे कर्ज वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बँकिंगचे जाळे सर्वत्र विणले जात असतानाच जिल्ह्यात मात्र सावकारी व्यवसाय अधिक जोमाने सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत सावकारांची संख्या दुप्पटीने वाढली असून आजघडीला जिल्ह्यात दीडशेच्यावर नोंदणीकृत सावकार आहेत. त्यांनी गेल्या वर्षभरात पावणे आठ हजार नागरिकांना तब्बल १४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले.

सावकारी पाशातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, अवैध सावकारीला आळा बसावा, यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. २०१५ मध्ये सावकारी पाशात अडकेल्या अनेक शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली होती. दुसरीकडे गावपातळीपर्यंत बँकिंग सुविधा पोहचली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेथे बँकेच्या शाखा नाही, तेथे व्यवसाय प्रतिनिधीच्या माध्यमातून काम केले जात आहे. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात सावकरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे वास्तव आहे. कागदोपत्री घोडे फारसे न नाचविता, अडल्या नडलेल्यांना या सावकरांकडून सहजरित्या कर्ज मिळत असल्याने हा व्यवसाय तेजीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात नोंदणीकृत सावकारांची संख्या ७० होती. त्यात आता दुप्पटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या १६४ परवानाधारक सावकार आहेत. तर परवान्याचे नूतनीकरण बाकी असलेल्याची संख्या ४१ आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद तालुक्यातच सावकरांची संख्या अधिक म्हणजे १४५ इतकी आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात (जानेवारी २०१८ अखेर) या सावकारांनी ७ हजार ८८२ लोकांना तब्बल १४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यापैकी ९ कोटी ९० लाखांचे कर्ज हे एकट्या औरंगाबाद तालुक्यात दिल्या गेले तर ३ कोटी ७४ लाख रुपयांचे कर्ज वैजापुरातील पावणे चार हजार लोकांना दिलेले आहे. वैजापुरात केवळ चार सावकार आहेत. साडे सहा कोटी रुपयांचे कर्ज हे तारण स्वरुपात तर उर्वरित कर्ज हे बिगर तारण कर्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जानेवारी २०१८ अखेर सावकारांची संख्या

जिल्हा - नोंदणीकृत सावकारांची संख्या - नूतनीकरण बाकी

औरंगाबाद १४५ ३१

गंगापूर ०१ ०१

वैजापूर ०३ ०१

सिल्लोड ०१ ०६

सोयगाव ०० ००

पैठण १० ०२

कन्नड ०४ ००

फुलंब्री ०० ००

खुलताबाद ०० ००

एकूण १६४ ४१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीच्या याद्या इंग्रजी भाषेतून !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या याद्या इंग्रजी भाषेतून लावण्यात आल्यामुळे लाभार्थांना नावे शोधण्यासाठी दलालांची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे दोन दिवसांत मराठीतून याद्या उपलब्ध करून द्या, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

शासनाने सरसकट कर्जमाफी दिली नाही, आधीच फसव्या ठरलेल्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थिंच्या याद्या इंग्रजी भाषेतून लावण्यात आल्याने शेतकरी गोंधळले आहेत. दरम्यान, आमदार सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व बँक प्रशासनाला निवेदन देऊन इंग्रजी भाषेतील याद्यांची होळी केली. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, तालुकाध्यक्ष देवीदास लोखंडे, सिल्लोड बाजार समिती सभापती रामदास पालोदकर, बाजार समिती संचालक देवीदास गव्हाणे, फुलंब्री बाजार समिती सभापती संदीप बोरसे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मराठीची अवहेलना

'राज्याची राजभाषा मराठी व शासकीय कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य असताना इंग्रजी भाषेतून याद्या का लावल्या,' असा सवाल आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात भाजप सरकारकडून होणारी मराठी भाषेची अवहेलना सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’ने थांबविले स्मार्ट कार्डाचे बिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट कार्ड स्वरुपात वाहनांचे आरसी बुक तयार करून देण्यासाठी नेमण्यात आलेल्या संस्थेने कराराप्रमाणे वाढीव कर्मचारी व यंत्रसामुग्री उपलब्धतता करून दिली नाही. त्याचा फटका ग्राहकांना बसत असल्यामुळे आरटीओ विभागाने या एजन्सीचे बिल थांबविले आहे.

वाहन नोंदणी पत्र (आरसी बुक) स्मार्ट कार्डमध्ये रुपांतरित करून देण्याचे काम रोज मार्टा कंपनीकडे दोन महिन्यांपूर्वी सोपविले. संबंधित एजन्सीच्या कामाबाबत तक्रारी वाढल्या आहे. या एजन्सीकडे मनुष्यबळ अपुरे आहे. स्कॅन करण्यासठी स्कॅनर मशीन नाही. यामुळे १५ हजार वाहनांची कागदपत्रे स्कॅन करण्याचे काम थांबले आहे. शिवाय कोऱ्या स्मार्ट कार्डाचा पुरवठाही पुरेशा प्रमाणात होत नाही. यामुळे आरसी बुकची स्मार्ट कार्डामध्ये प्रिटिंग करण्याचे काम थांबले आहे. मागील आठवड्यात चार हजारांवर आरसी बुकचे प्रिटिंग प्रलंबित होते. संबंधित एजन्सीच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने संबंधित एजन्सीला तीन वेळे कारणे दाखवा नोटीस बजाविल्या होत्या. त्याचे समाधानकारक नव्हते. म्हणून कंपनीचे बिल एक फेब्रुवारीपासून थांबविण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश खर्राडे यांनी दिली.

दोन लाख बाकी

औरंगाबाद आरटीओ कार्यालयातर्फे ग्राहकांकडून स्मार्ट कार्डासाठी दोनशे रुपयांपर्यंत घेतले जातात. त्यातील एका कार्डासाठी ५० रुपये संबंधित एजन्सीला देण्यात येत आहेत. सुमारे चार ते साडेचार हजार स्मार्ट कार्ड तयार करणे बाकी आहे. त्यामुळे कंपनीचे सुमारे दोन लाख रुपयांचे बिल दिलेले नाही, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या अॅपमध्ये नोंदविल्या २५० फेऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइलवरून एसटीचे तिकीट घेण्यासाठी 'एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन अॅप'ची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली, मात्र त्यामध्ये औरंगाबाद विभागाच्या बस फेऱ्या फार कमी होत्या. यासंदर्भात महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर अॅपमध्ये विभागातील २५० गाड्यांच्या फेऱ्या नोंदविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २०१६मध्ये प्रवाशांसाठी अॅप सुरू केले. त्यावर दोन वर्षांनंतरही गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसादही अल्पच होता. अॅपवर औरंगाबाद विभागातील उपलब्ध गाड्यांची संख्या कमी असल्याबाबत 'मटा'ने बातमी प्रसिद्ध केली होती. औरंगाबाद ते जळगाव मार्गावरील फक्त दोन ते तीन गाड्यांची नोंद अॅपवर देण्यात आली होती. ही बातमी प्रकाशित केल्यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद विभागातील महत्त्वाच्या मार्गांवरील गाड्यांच्या फेऱ्या अॅपवर नोंदविण्यास सुरवात केली. औरंगाबाद विभागातील नाशिक, जळगाव, पुणे, मुंबई, नागपूर, लातूर यांसह अन्य मार्गांवरील अनेक गाड्यांच्या २५० फेऱ्यांची नोंद एमएसआरटीसीच्या अॅपवर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अॅपच्या माध्यमातून तिकीट घेता येणार आहे.

अॅपचा असा करा वापर

अँड्राइड मोबाइलसाठी गुगल प्ले स्टोअरवरून एमएसआरटीसी अॅप डाउनलोड करावा लागेल. या अॅपवर आवश्यक वैयक्तिक माहिती नोंदविल्यावर लॉग इन करावे लागले. यानंतर प्रवाशांना कोठे जायचे आहे, कोणत्या वेळेवर कोणती गाडी उपलब्ध आहे, याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना ऑनलाइन पद्धतीने पैसे भरून सीट आरक्षित करता येईल. त्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबीट कार्ड वापरण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

औरंगाबाद विभागात प्रवाशांकडून ऑनलाइन तिकीट खरेदी; तसेच बसस्थानकावर स्वाइप मशीनचा उपयोग वाढलेला आहे. यामुळे मोबाईल अॅपवर गाड्यांची संख्या वाढवून प्रवाशांना सुविधा देण्याची गरज होती. प्रवाशांच्या सुविधांसाठी फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईच्या ब्रेनडेड रुग्णावर यकृत प्रत्यारोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नागपूर येथे ब्रेनडेड घोषित केलेल्या मुंबईतील रुग्णाला शहरातील एमजीएम रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यकृत प्रत्यारोपण करण्याची ही मराठवाड्यातील दुसरी घटना आहे़ तीन महिन्यांच्या कालावधीनंतर दुसऱ्यांदा एमजीएममध्ये यकृत प्रत्यारोपण करण्यात येत आहे,' अशी माहिती रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

डॉ. सूर्यवंशी म्हणाले, 'नागपूर येथील ५२ वर्षीय रुग्णांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यास शुक्रवारी ब्रेनडेड घोषित केले़ त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली़ त्यानंतर प्रत्यारोपण समितीने रुग्णाची चाचणी व गरजूंची यादी तपासून मूत्रपिंड (किडनी) नागपूर येथील रूग्णासाठी, हृदय चेन्नईतील फोर्टिस हॉस्पिटल तर यकृत एमजीएम रूग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील ६९ वर्षीय रुग्णाला यकृताची गरज होती़ प्रत्यारोपणासंदर्भातील संपूर्ण चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या रुग्णावर यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला़ ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई येथील डॉक्टरांच्या टिमने नागपूर येथून चॉर्टर विमानाने औरंगाबादेत शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास यकृत आणले़ विमानतळापासून हॉस्पिटलपर्यंत ग्रीन कॉरिडॉर लावण्यात आले.'

पाच तास विलंब

नागपूरहून औरंगाबादेत यकृत येण्यापूर्वी डॉ़ प्रवीण सूर्यवंशी व त्यांच्या टिमने मुंबईतील रुग्णाचे यकृत काढले होते़ यकृत येताच डॉ़ सूर्यवंशी यांच्यासह डॉ़ रवी मोहका, डॉ़ प्रशांत राव, डॉ़ नारायण सानप, डॉ़ अमोल, डॉ़ नागेश जंबुरे यांनी प्रत्यारोपणासाठी सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत प्रत्यारोपण सुरूच होते़ मुंबईत चार्टर फ्लाइट वेळेवर मिळाले नाही, त्यामुळे दिल्लीहून चार्टर फ्लाइट मागविण्यात आले. त्यामुळे आठ लाखांचा खर्च अधिक आला आणि प्रत्यारोपणासाठी पाच तास विलंब झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाड्या परत पाठवल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाने गोठ्यासाठी दिलेल्या जागेवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाड्या नागरिकांनी विरोध करून परत पाठवल्या. चिकलठणा शिवारात ही घटना घडली. दरम्यान स्मृतिवन उद्यानासह विविध वॉर्डात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर पालिकेने कचरा टाकला, तरीही सत्तर टक्के कचरा शिल्लक राहिला आहे.

मांडकी - नारेगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास तेथील नागरिकांनी विरोध केल्यानंतर महापालिकेने बाभूळगावचा पर्याय तपासून पाहिला, परंतु तेथे देखील विरोध झाला. मिटमिटा शिवारातील सफारी पार्कच्या जागेवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाड्यांना मिटमिटा, पडेगाववासियांनी विरोध केला. त्यामुळे महापालिकेने शनिवारी नवीन शक्कल लढवली. शासनाने जनावरांच्या गोठ्यासाठी महापालिकेला चिकलठाणा शिवारात गट क्रमांक २३१मध्ये २४ एकर जागा दिली आहे. सध्या ही जागा रिकामीच आहे. या जागेवर कचरा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कचऱ्याने भरलेल्या गाड्या चिकलठाणाच्या दिशेने पाठवण्यात आल्या. नागरिकांनी याची माहिती मिळताच त्यांनी एकत्र येत कचऱ्याच्या गाड्या अडवल्या व आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे पालिका प्रशासनाला गाड्या माघारी वळवाव्या लागल्या. त्यानंतर वॉर्ड कार्यालय निहाय वेगवेगळ्या ठिकाणी कचरा टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यात प्रामुख्याने मोकळ्या जागांना प्राधान्य देण्यात आले. हर्सूल तलावाच्या शेजारील स्मृतिवन उद्यानातही कचरा टाकण्यात आला. शहागंज मधील बसस्टँडच्या जागेत, बायजीपुरा येथील गिरणीच्या मोकळ्या जागेत, संजयनगर येथील बेघर लोकांसाठीच्या मोकळ्या जागेत कचरा टाकण्यात आला.

रविवारची सुटी रद्द

शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्यामुळे वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, सफाईचे काम करणारे कर्मचारी यांची रविवारची सुटी रद्द करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत. कचरा प्रश्नातून मार्ग निघाल्यावर बदली सुटी देऊ असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरव मोदीवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने नीरव मोदी याने गोरगरिबांच्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

पंजाब नॅशनल बँकेच्या साडेअकरा हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शनिवारी पंजाब नॅशनल बँकेसमोर निदर्शने केली. उच्च शिक्षण घेऊन नोकरी नसल्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणी उद्योग उभारण्याचे स्वप्न बघतात. बँका त्यांना कर्ज नाकारतात. मात्र, पंतप्रधानाशी निगडीत निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यासारख्या व्यक्तींना बँका कोट्यवधी रुपये कर्ज देतात. या प्रकाराचा निषेध करीत आंदोलकांनी निरव मोदी याला कडक शिक्षा करण्याची मागणी करीत जोरदार निदर्शने केली. आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अनुपमा पाथ्रीकर, शहराध्यक्ष मेहराज पटेल, दत्ता भांगे, मयूर सोनवणे, कय्यूम शेख, अक्षय पाटील, सविता मातेरे, निर्मला बडक, भाग्यश्री राजपूत, सरताज शेख, सुभद्रा जाधव आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना मारहाण का करता ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेवराई (तांडा) येथील डॉ. वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेजातील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी चौकशी केली. कॉलेजचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांना शनिवारी विभागात बोलावून शिवणकर यांनी घडलेला प्रकार ऐकला. दोघांचे लेखी जबाब घेतले असून कारवाईचा अहवाल संस्थेला पाठवण्यात येणार आहे.

डॉ. वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेजातील द्वितीय वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांना प्राचार्य विकास राजूरकर यांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 'फार्मासिटीक्स' विषयाचे प्रात्यक्षिक न करता विद्यार्थी मैदानावर बसल्यामुळे प्राचार्य राजूरकर यांनी तिघांना केबिनमध्ये बोलावून मारहाण केली. लॅबमध्ये संबंधित विषयाचे प्रा. विनायक मुंडे आले नसल्यामुळे मैदानावर बसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. चापट -बुक्क्याने मारहाण केल्यामुळे एका विद्यार्थ्याचे नाक फुटले, तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी घटनेची तातडीने दखल घेतली. घटनाक्रमाचा अहवाल घेऊन प्राचार्य राजूरकर यांना कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. या चौकशी दरम्यान पीडित विद्यार्थी उपस्थित होते. दोघांचे म्हणणे ऐकल्यानंतर शिवणकर यांनी लेखी जबाब घेतला. या चौकशीतही मारहाण केली नसल्याचे प्राचार्य राजूरकर यांनी सांगितले. मात्र विद्यार्थी खोटे बोलणार नाहीत. केवळ तास बुडवला म्हणून विद्यार्थ्यांना बुटाने मारणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना मारहाण का करता' असा सवाल शिवणकर यांनी प्राचार्यांना केला. यावेळी पीडित विद्यार्थ्यांनी अॅप्रनवरील रक्ताचे डाग दाखवले. 'प्राचार्यांची नियुक्ती संबंधित संस्थेने केली असून संस्थेला कारवाईचा अधिकार आहे. चौकशी अहवाल संस्थेकडे पाठवणार आहे. घडलेला प्रकार वाईट आहे' असे डॉ. शिवणकर यांनी 'मटा'ला सांगितले.

'अभाविप'चे निवेदन

डॉ. वेदप्रकाश पाटील कॉलेजचे संबंधित विद्यार्थी व प्राचार्य यांचा चौकशी सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी संघटनेने डॉ. शिवणकर यांना निवेदन देण्यात आले. प्राचार्यांवर कडक कारवाई करावी, विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये असे निवेदनात म्हटेल आहे. अन्यथा, संघटना तीव्र आंदोलन करील असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा संयोजक गोविंद देशपांडे, भानुदास दोबाले, गजानन वाबळे, सुबोध सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोसाठी दोन महिन्यांचा वेळ द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कचरा डेपो प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा वेळ द्या. यापेक्षा जास्त अवधी लागणार नाही. आम्ही सर्व तयारी केली आहे,' असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी गावकऱ्यांना केले.

कचरा डेपोच्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त यशस्वी यादव मांडकी चौफुलीवर दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी म्हणाले, 'कचरा डेपो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक तो आराखडा तयार करून आम्ही चर्चेसाठी आलो आहोत. कचरा टाकण्यासाठी कुठेच जागा नाही. या प्रश्नाबद्दल महापालिका उदासीन नाही. याच प्रश्नाला त्यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे. पालिका आयुक्तपदाची सुत्रे एक महिन्यासाठी माझ्याकडे होती. त्यावेळी देखील कचरा डेपो आणि कचरा या विषयावर गांभीर्याने चर्चा होत होती. स्मार्ट सिटी प्रकल्पातून कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रक्रियेला दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. तुम्ही चाळीस वर्ष चार महिने कचरा डेपोचा त्रास सहन केलात. आता आणखी दोन महिने सहन करा,' असे आवाहन त्यांनी केले.

निर्णय घ्या अन् कळवा

पोलिस आयुक्त म्हणाले, 'स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीमध्ये आम्ही सर्वजण संचालक आहोत. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीन खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.' महापालिका आयुक्तांनी देखील गावकऱ्यांना आवाहन केले. 'कचरा डेपो हटविण्याची व कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी आयुक्त म्हणून माझ्यावरच आहे. ही जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडीन. गावकऱ्यांना त्रास होऊ देणार नाही,' अशी ग्वाही त्यांनी दिली. तिन्हीही सनदी अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतरही गावकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तेव्हा जिल्हाधिकारी म्हणाले, 'आम्ही आमचा प्रस्ताव तुमच्या समोर ठेवला आहे. तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि आम्हाला कळवा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचा धर्मा पाटील करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिका यंत्रणा काहीच काम करू शकत नाही. कचरा डेपो त्यांच्याकडून हटवला जाणे शक्य नाही. आम्ही दोन महिने वाढवून दिले तरी त्यांच्याकडून काहीच होऊ शकणार नाही. त्यामुळे आमचा अंत पाहू नका. आमचा धर्मा पाटील करू नका,' असा निर्वाणीचा इशारा देत गावकऱ्यांनी मध्यस्ती करण्यासाठी आलेले जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांना परत पाठवले.

नारेगाव - मांडकी शिवारातील कचरा डेपो हटविण्याच्या संदर्भात मांडकी चौफुलीवर सुमारे वीस गावांच्या गावकऱ्यांनी शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक राजू शिंदे सकाळी मांडकी चौफुली येथे जावून आले, पण त्यांना गावकऱ्यांनी दाद लागू दिली नाही. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त यशस्वी यादव देखील आले. यावेळी गावकऱ्यांनी आपला विरोध कायमच असल्याचे ठणकावून सांगितले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे पुंडलिक अंभोरे म्हणाले, 'आम्ही दोन महिन्यांचा वेळ वाढवून देणार नाही. जोपर्यंत कचरा डेपोचा प्रश्न सुटणार नाही तोर्पयंत आंदोलन सुरूच राहील. आमचा अंत पाहू नका. या आंदोलनात ज्या दिवशी आम्ही कमी पडू त्या दिवशी शासनाला सांगून आम्ही आमच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊ आणि जळालेल्या स्थितीत तुमच्या मागे पळू.' गावकऱ्यांनी देखील यावेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. डॉ. बेग, डॉ. विजय डक यांनीही मनोगत व्यक्त करताना आंदोलनातून आता माघार नाही असा इशारा दिला. काही महिलांनी देखील व्यथा मांडल्या. कचराडेपोमुळे आरोग्य धोक्यात तर आले आहेच, पण कचरा डेपोवर वावरणाऱ्या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे, असे महिला म्हणाल्या.

पालिकेत कमिशनची भाषा चालते

'आयुक्तांचे काही चुकत नाही. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत, पण महापालिका प्रशासनाची काम करण्याची पद्धत चुकीची आहे. कामापेक्षा त्यांना कमिशन महत्वाचे वाटते. महापालिकेत फक्त कमिशनचीच भाषा चालते. 'हमारा बोलो' असे ते म्हणतात. त्यामुळे शहरात कोणतीच कामे होत नाहीत. झरेकियांनी शहरासाठी जायकवाडीहून पाइप लाइन टाकली. एमआयडीसी आणले. सिडको आणले. गेल्या पंचेवीस - तीस वर्षांपासून महापालिकेत सत्ता असणाऱ्यांनी काहीच केले नाही. एकही योजना त्यांच्याकडून यशस्वी झाली नाही, त्याचे कारण म्हणजे कमिशन,' अशा शब्दांत पालिका आयुक्तांच्या समक्ष गावकऱ्यांनी टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीची छेड; आरोपीला सहा महिने शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

भावसिंगपुरा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या मिलिंद भाऊसाहेब दोंधे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णीक यांनी दोषी ठरवून सहा महिने कारवासाची शिक्षा ठोठावली.

भावसिंगपुरा परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी शाळेत जाताना तिचा कायम पाठलाग करून मिलिंद सहा महिने त्रास देत होता. त्या मुलीस शाळेबाहेर थांबवून प्रेम करण्यासाठी गळ घालत होता. आठ डिसेंबर २०१५ रोजी मुलीच्या मोबाइलवर अश्लिल मेसेज पाठवला. कोणाचा नंबर आहे हे जाणून घेण्यासाठी त्यामुलीने कॉल केला असता तो मोबाइल मिलिंदचा असल्याचे समोर आले. त्याला समज देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ही तो पाठलाग करून मुलीची छेड काढत असल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने छावणी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरुन मिलिंद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णीक यांच्या समोर झाली. सहाय्यक लोकअभियोक्ता अरविंद बागुल यांनी चार साक्षीदार तपासले. न्यायालयाने मिलिंदला दोषी ठरवून सहा महिने कारवासाची शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड ठोठवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८४ लाखांचा गैरव्यवहार; तिघांची हर्सूलला रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

लातूर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मल्टी स्टेट कॉ. ऑप क्रेडिट सोसायटीत ८४ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. चेअरमन प्रमोद बालाजी निमसे आणि गणेश थोरात आणि जयपालदास गिरधारीलाल साहित्या अशी त्यांची नावे आहेत.

आरोपींविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात सोसायटीच्या संचालक मंडळावर ८४ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. जळगाव येथील व्यापारी जयपालदास गिरधारीलाल साहित्या यांनी याप्रकरणी ११ फेब्रवारी रोजी तक्रार दाखल केली होती. डीडी काढण्यासाठी दिलेल्या ८४ लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी साहित्या यांच्याविरुद्ध सोसायटीच्या संचालक मंडळामधील चंद्रकांत बदकुलवार, रवींद्र जाधव, विजय त्रिंबक केंद्रे, भुजंग पवार, प्रमोद बालाजी निमसे, गणेश थोरात यांच्यासह सोसायटीचे इतर सदस्य व संचालकाविरुद्ध फसवणूक, अपहार, कट रचणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोसायटीचे सरव्यवस्थापक चंद्रकांत बदकुलवार यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी नगर येथून चेअरमन प्रमोद बालाजी निमसे आणि गणेश थोरात यांना अटक आली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एस. एम. जोधळे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आगार प्रमुखांचे कार्यालय सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कराचे तब्बल चार लाख रुपये थकविल्याने महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली पथकाने शनिवारी एसटी महामंडळाच्या आगार क्रमांक दोनच्या कार्यालयाला सकाळी साडेअकरा वाजता टाळे ठोकले.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात हे कार्यालय आहे. आज सकाळी महापालिकेच्या पथकाने अचानक ही धडाकेबाज कारवाई केल्याने कार्यालयातील कर्मचारी गोंधळून गेले. कारवाईची माहिती विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर विभागीय स्थापत्य अधिकारी मीनल मोरे यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठून महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांशी चर्चा केली. तसेच एसटीच्या वरिष्ठांनी फोनवरून संपर्क साधला. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत मंगळवारी कर भरण्याची हामी दिली. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी आगारात येऊन कार्यालयाचे सील काढले व आगार कार्यालयातील खोळंबलेले कामकाज पूर्ववत सुरू झाले. महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकांचे कार्यालय तब्बल दीड तासापेक्षा जास्त वेळ बंद होते.

गेंदा भवनाला टाळे

मालमत्ता करापोटी महापालिकेची एसटी महामंडळाकडे चार लाख १५ हजार २७९ रुपयांची थकबाकी आहे. पालिकेने वेळोवेळी पाठपुरावा करूनही एसटीने कराचा भरणा केला नव्हता. याप्रकरणी एसटी अधिकाऱ्यांनी एवढा कर नसल्याचे सांगत सावरासावर केली. दरम्यान, २२ लाख मालमत्ता कर थकल्याप्रकरणी महापालिकेचे वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी सराफा भागातील गेंदा भवनालाही सील ठोकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मंदिर बांधण्यास जाईल: साध्वी प्रज्ञासिंह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बाबरी तोडने गई थी, अब मंदिर बनाने जाऊंगी... और मंदिर जरूर बनेगा और वही बनेगा… मोदीजीचे नेतृत्व में देश वैभव के पथपें है... राष्ट्र का अभ्युदय हो रहा है... काँग्रेसने षडयंत्रसे जेलमें डाला.. अब कॅन्सरकी ट्रिटमेंट शुरू है और जल्दीही ठिक हो जाऊंगी,' असे वक्तव्य मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले. दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि अजूनही उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवजयंतीनिमित्त सोमवारी (१९) शहरात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या शहरात आल्या असता त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. मॅडम म्हणू नका, साध्वी म्हणा, असे सुरुवातीलाच सांगून त्यांनी कॅन्सरचे उपचार सुरू असल्याचे सांगितले. अलीकडेच दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामध्ये एका मोठ्या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. अजूनही उपचार सुरू आहेत व प्रकृती पाहिजे तशी ठिक नाही. काँग्रेसने षढयंत्र करुन जेलमध्ये टाकले, अन्याय केला. त्या अन्यायाचा शरीरावर परिणाम झाला. मात्र मनावर अजिबात परिणाम झाला नाही आणि आता लवकर प्रकृती चांगली होईल, असेही त्या म्हणाल्या. अलीकडे भगवा दहशतवाद वाढत असल्याच्या आरोपांबाबत छेडले असता, निधर्मीवाद्यांसाठी हा भगवा दहशतवाद असू शकतो, माझ्यासाठी नाही. मी तर सन्यासी आहे, माझ्या कोणत्याच अपेक्षा-आकांक्षा-महत्वाकांक्षा नाहीत. केवळ देशाला वैभवशाली करण्याचा ध्यास आहे, असे साध्वी म्हणाल्या. तुमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे म्हटले जात आहे, या प्रश्नावर त्यांनी दुर्लक्षाचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले.

तोगडियांच्या प्रश्नावर मौन

मागच्या आठवड्यात विहिंपचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया शहरात आले होते, आता या आठवड्यात आपण आला आहात, यामागे काही सूत्र आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्याच्या घडामोडींबद्दल मी अनभिज्ञ आहे व त्यामुळे त्यावर काही सांगू शकणार नाही. मोदी सरकारची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छिंदमविरुद्ध सिल्लोडमध्ये गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अहमदनगरच्या भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे काँग्रेसकडून दहन करण्यात आले. हे आंदोलन आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली झाले. दरम्यान, शिवप्रेमींच्या तक्रारीवरून छिंदम यांच्यावर शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तहसील कार्यालयासमोर झालेल्या निषेध आंदोलनाला तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. छिंदम यांच्यावर गुन्हा दाखल करून शिक्षा द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन तहसील कार्यालय व शहर पोलिसांना देण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती रामदास पालोदकर, नगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

छिंदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शनिवारी रात्री मोट्या प्रमाणावर शिवप्रेमी दाखल झाले. पण, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे भाजप नगरसेवक सुनील मिरकर यांच्यासह इतरांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. शिवप्रेमींच्या दबावामुळे पोलिसांनी छिंदम यांच्याविरोधात स्वप्नील विनायक सिनगारे यांची फिर्याद घेऊन गुन्हा दखल केला. यावेळी रवी गायकवाड, संतोष गाडेकर, अरूण राठोड, योगेश सोनवने,नारायण पुरी आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावपट्टीचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद विमानतळावरून विविध कंपन्यांकडून विमान सेवा सुरू करण्याचे प्रस्ताव आले आहेत. मात्र, सध्या धावपट्टी अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने विमान सेवांचे विस्तारीकरणाला ३१ मे नंतरच मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

औरंगाबाद विमानतळावरील धावपट्टीचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. यामुळे विमानाच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. हैदराबाद येथून दुपारी येणारे ट्रु जेटचे विमान सध्या संध्याकाळी साडे सात वाजता येत आहे. एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाचीही वेळ बदलली आहे. सध्या विमानतळाचे एअर टर्मिनलही सकाळी जेट एअरवेजचे विमान उड्डाणानंतर दुपारी चार वाजेपर्यंत बंद ठेवले जात आहे. या काळात धावपट्टी अद्ययावत करण्याचे काम केले जात आहे.

विमानतळ प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे धावपट्टी अद्ययावत केली जात आहे. हे काम सप्टेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आले. धावपट्टीच्या मजबुतीकरणासह इतर कामे केली जात आहेत. हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण केले जाईल, त्यानंतरच नवीन विमान सेवांच्या प्रस्तावांवर विचार होईल, असे सांगण्यात आले.

धावपट्टी मजबुतीकरणाचे काम सध्या सुरू असून ते पूर्ण करण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर विमानाच्या वेळापत्रकाचे नियोजन मागणी आल्यानंतर केले जाईल.

-डी. जी. साळवे, संचालक, विमानतळ प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खबऱ्या असल्याचा संशय, एकास जाळण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी एकाच्या अंगावर रॉकेल ओतुन जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना उपळी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही तक्रार रामकिसन देवमन कोटिये (रा. उपळी) यांनी दिली आहे. या तक्रारीनुसार, ते मंगळवारी सायंकाळी पत्नीसोबत घरी जात होते. त्यावेळी रस्त्यामध्ये संशयित आरोपींनी दुचाकी अडवून तू पोलिसांना आमच्या ट्रॅक्टरचे लोकेशन का देतो, अशी विचारणा केली. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून संशयित आरोपी श्रावण शिंदे याने बाटलीमध्ये आणलेले रॉकेल रामकिसन यांच्या अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या शिवाय शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हणले आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी श्रावण शिवाजी शिंदे, समाधान शिवाजी शिंदे, अंजना शिंदे, जिजाबाई शिवाजी शिंदे (रा. सर्व उपळी)यांच्या विरोधात अॅट्रासिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी श्रावण शिवाजी शिंदे व समाधान शिवाजी शिंदे यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>