Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

थकबाकीदार कोणीही असो कारवाई कराच

$
0
0

औरंगाबाद: औरंगाबाद व जालना जिल्ह्यात थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे थकबाकीदार कोणीही असो त्याचे वीज कनेक्शन कापा, असे आदेश महावितरणचे कार्यकारी संचालक श्रीकांत जलतरे यांनी दिला आहे. थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सक्त कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.

बिल वसुलीसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. औरंगाबाद परिमंडळात घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांडे १९४ कोटी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीज ग्राहकांकडे ६२ कोटी, पथदिव्यांच्या वीज ग्राहकांकडे २६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. महावितरणने शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे. गरज पडल्यास पोलिस बंदोबस्तात कारवाई करावी अशा सूचना जलतरे यांनी दिल्या आहेत. या बैठकीला मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, रतन सोनुले, कैलास हुमणे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा यांच्यासह कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, इतर अधिकारी उपस्थित होते. वीज ग्राहकांना गतिमान सेवा देण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या संकल्पनेतून डॅशबोर्ड तंत्रज्ञान विकासित करण्यात आले आहे. त्यावर कर्मचाऱ्यांना दैनंदिन माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अद्ययावत माहिती मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पित्याकडून मुलीचा विनयभंग

$
0
0

वाळूज महानगर: पित्याने स्वत:च्या मुलीचा वेळोवेळी विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित शांतीलाल धाडीवाल (रा. वडगाव कोल्हाटी ता. औरंगाबाद) असे या नराधम पित्याचे नाव असून, तो एका खासगी कंपनीत काम करतो. तो पत्नी व दोन मुलीसह राहतो. धाडीवाल आपल्या मुलीवर २०१२ पासून अत्याचार करत होता. १७ वर्षीय मुलींवर त्याने राहत्या घरात अनेक वेळा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. ती पुढील शिक्षणासाठी पुणे येथे गेल्यावर त्याच्या दुसऱ्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणे सुरू केले. तिघे पुणे येथे मुलीकडे गेले असता लहान मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराबद्दल माहिती दिली. हा प्रकार आणखी वाढू नये म्हणून मोठ्या मुलीने पुणे येथील पोलिसांत पित्याविरद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. हा गुन्हा वाळूज परिसरात घडल्यामुळे तो वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आरती जाधव करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहयोच्या कामांवर चार हजार मजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मजुरांची कागदावरची संख्या, मस्टर तसेच जॉबकार्डमध्ये घोळ, उशिरा देण्यात येणारी मंजुरी तसेच अपूर्ण कामांमुळे मराठवाड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बदनाम आहे. गेल्या काही दिवसांपासून योजनेच्या कामात पारदर्शकता येत असली तरी जिल्ह्यात सध्या ७३७ कामांवर ४०१९ मजुरांची उपस्थिती आहे.

मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी राबवण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनांच्या कामांना गेल्या काही दिवसांपासून मजूर मिळत नसल्याची स्थिती आकडेवारीवरून दिसते. जिल्ह्यात सध्या विविध यंत्रणांच्या साहाय्याने ७३७ कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ६२१ कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. यातील बहुतांश कामे जलसंधारणांची आहेत. गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने दगा दिला. त्याचा परिणाम शेतीतून अपेक्षित उत्पन्न होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मजुरांच्या हाताला काम मिळणे अवघड झाले असताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयोच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. तरी मजूर संख्येत फारसा बदल होत नाही. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात विविध यंत्रणांची ७३७ कामे सुरू होती. या कामांवर सरासरी चार हजार १९ मजूर आहेत. यात सर्वाधिक कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.

---

टंचाई भागात कामे

---

ग्रामपंचायत यंत्रणेच्या साह्याने सुरू असलेल्या कामांवर सर्वाधिक तीन हजार २३९ मजूर उपस्थिती आहे. यासह जिल्हा परिषदेचा सिंचन विभागाच्या कामावर ८४, वनविभाग ३१३, सामाजिक वनीकरण १४१, कृषी विभागाच्या कामांवर ११३, तसेच रेशीम उद्योग विभागाच्या कामांवर १२० मजुरांची सरासरी उपस्थिती आहे. यामध्ये टंचाईग्रस्त भागात अधिकाधिक जलसंधारणांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्ट मागून २४ हजारांचा गंडा; चोरट्यास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लिफ्ट मागून दुचाकीस्वारास २४ हजारांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला गुरुवारपर्यंत (२२ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले. या प्रकरणी जितेंद्र पांडुरंग भोडे (रा. मालखरे अपार्टमेंट) यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादीनुसार, फिर्यादी हा दोन फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री दुचाकीवरून सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलकडे पुंडलिक नगरमार्गे जात असताना रस्त्यात फिर्यादीला एका व्यक्तीने लिफ्ट मागितली. त्याला फिर्यादीने जयभवानी नगर चौकात सोडले. काही अंतर गेल्यावर फिर्यादीला मोबाइल व खिशातील पाकीट चोरल्याचे लक्षात येताच फिर्यादीने चोरट्याचा शोध घेतला. मात्र चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोख १६ हजार रुपये व मोबाइल असा २३ हजार ९९० रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अटल गुन्हेगार बाळू उर्फ बाळ्या भागाजी मलके (रा. मुकंदनगर, मुकुंदवाडी) याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने दुचाकीस्वारास लुटल्याची कबुली दिली. आरोपीला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकोंडीवरील बैठकीकडे निम्म्या नगरसेवकांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

एरवी सर्वसाधारण सभेत छोट्या छोट्या मुद्दांवरून संपूर्ण सभागृह डोक्यावर घेणाऱ्या नगरसेवकांपैकी निम्म्या नगरसेवकांनी कचराकोंडीवरील बैठकीकडे पाठ फिरवली. पालिकेचे अर्धे सभागृह रिकामेच होते. त्यामुळे नगरसेवकांना कचऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही का अशी चर्चा सुरू झाली.

नारेगाव-मांडकीसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून कचराडेपो विरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे गेल्या पाच दिवसांत कचऱ्याने भरलेली एकही गाडी कचराडेपोवर जाऊ शकली नाही. त्यामुळे शहरात जागोजागी कचरा साचला आहे. मध्यवर्ती जकात नाक्याच्या परिसरात कचऱ्याने भरलेल्या सुमारे ३० गाड्या उभ्या आहेत. यामुळे कचराप्रकरणी आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सर्व नगरसेवकांची विशेष बैठक आयोजित केली होती. पालिकेच्या मुख्य सभागृहात ही बैठक झाली. बैठकीच्या आयोजनाबद्दलचे पत्र शुक्रवारीच सर्व नगरसेवकांपर्यंत पोचवण्यात आले होते.

कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. साचून राहिलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आयोजित केलेल्या विशेष बैठकीला सर्वच्या सर्व ११५ व स्वीकृत पाच असे एकूण १२० नगरसेवक उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीनेच मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. साडे अकरा वाजेची बैठक बारा वाजता सुरू झाली आणि साडेतीन वाजेपर्यंत चालली. बैठकीला सुमारे ५७ नगरसेवकच उपस्थित होते. अन्य नगरसेवक बैठकीला आलेच नाहीत. निम्मे सभागृह रिकामेच होते. यामुळे नगरसेवकांना कचराकोंडीच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही का अशी चर्चा पालिकेत सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची आरोग्य केंद्रे दोन टप्प्यात सुरू राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडीचा परिणाम म्हणून महापालिकेची आरोग्य केंद्रे व दवाखाने दोन टप्प्यात सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेहमी सकाळच्या सत्रात ओपीडीची व्यवस्था करण्यात आली आहे, आता सायंकाळी देखील ओपीडी सुरू राहणार आहे.

कचराकोंडीमुळे शहरात विविध ठिकाणी कचरा साचलेला आहे. त्यातून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत नसल्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता लक्षात घेऊन महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्व आरोग्यकेंद्रे व दवाखाने दोन टप्प्यात सुरू ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. नेहमी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ओपीडी सुरू असते. आता कचऱ्याचा प्रश्न सुटेपर्यंत सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत ओपीडी सुरू ठेवण्याची सूचना त्यांनी केली. आवश्यक ती औषधी आरोग्य केंद्र व दवाखान्यांमध्ये ठेवा, असे ते म्हणाले.

साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली असून त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून दोन लाख मास्क खरेदी करण्याचा निर्णय देखील घेतला असल्याचे महापौरांनी सांगितले. खरेदी करण्यात आलेले मास्क संवेदनशील भागात वितरित केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९०० कोटींची जमीन बाजार समितीचीच

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचा अर्ज मंजूर करत जिल्हाधिकारी, तत्कालीन महसूलमंत्री व मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुण मिश्रा व न्या. अमिताव रॉय यांनी रद्द केले. बाजारभावानुसार या २३ एकर जागेची किमंत अंदाजे ९०० कोटी रुपयांवर आहे.

बाजार समितीसाठी संपादित गट क्रमांक १०, १२ व १३चा जुना भूसंपादन अवॉर्ड तत्कालीन महसूलमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला होता. त्याविरोधातील समितीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. याविषयीच्या विशेष अनुमती अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. जळगाव रोडकडून मार्केट परिसराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ही जमीन आहे. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बाजार समितीसाठी संपादित करण्यात आलेली गट क्रमांक १३मधील जागेसंबंधीचा वाद २००१पासून प्रलंबित होता. श्रीनिवास खटोड व इतर पाच जणांची संपादनातून ही जमीन वगळण्याचा अर्ज प्रलंबित होता.

याविरोधात समितीने याचिका दाखल केली असता, त्या फेटाळण्यात आल्या. त्याविरुद्ध बाजार समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. दरम्यान, मंगळवारी सुनावणी झाली असता, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी व उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात आला; तसेच संपादन वैध ठरविण्यात आले. समितीच्यावतीने सुधांशू चौधरी व सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द

याप्रकरणी मंत्रालयात १४ ऑॅगस्ट २०१४ रोजी सुनावणी झाली असता, मंत्र्यांनी नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २४ (२), (७) प्रमाणे जुना भूसंपादन अवॉर्ड रद्द केला. त्या नाराजीने बाजार समितीने सचिवांमार्फत याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. चिरंजीवलाल बजाज व इतरांनी तत्कालिन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांच्याकडे गट क्रमांक १० व १२संबंधी प्रकरण दाखल केले. नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २४ (२)नुसार हे प्रकरण रद्द करावे, अशी मागणी केली. वीरेंद्रसिंग यांनी २६ जून २०१५ रोजी जुन्या कायद्यानुसार संपादित केलेली जमीन नवीन कायद्यानुसार रद्द झाल्याचे जाहीर केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चात सहभागी झालात तर शिस्तभंगाची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ही शासन मान्यताप्राप्त नाही, अशा संघटनेद्वारे आयोजित महामोर्चात कार्यालयीन वेळेत सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश शासनाने काढले आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात २२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मंत्रालयावर महामोर्चा नेणार असल्याची नोटीस शासनाला दिली आहे. या महामोर्चामध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. शासकीय कर्मचाऱ्याने कोणत्याही संप, निदर्शनामध्ये सहभागी होऊ नये असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मान्यताप्राप्त नसलेल्या संघटनेद्वारे आयोजित महामोर्चात कार्यालयीन वेळेत सहभागी होणे ही कृती नियमाचा भंग करणारी ठरेल व कर्मचारी शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरेल असे आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार जलील यांचा आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात पाच वर्षांपूर्वी २०० खाटांचे जिल्हा महिला व बाल रुग्णालय मंजूर झाले; परंतु जागेचे कारण देत अखंड टोलवाटोलवी करण्यात येत असलेले रुग्णालय सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी विधानसभेत आंदोलन करण्याचा इशारा आमदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ९ मार्चपर्यंत प्रशासनाने रुग्णालयासाठी जागा दिली नाही तर अर्थमंत्र्यांच्या बजेटच्या भाषणादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

२०१३ मध्ये महिला रुग्णालय मंजूर करण्यात आले. मात्र रुग्णालयासाठी अद्यापपर्यंत जमिनीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. या संदर्भात आमदार जलील यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल केली आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांमध्येही जलील यांनी हा प्रश्न वारंवार उपस्थित केला आहे. मागच्या महिन्यात पालकमंत्री डॉ. दीपक सावंत व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत आमदार जलील यांनी हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला होता. त्यावेळी जमिनीबाबत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही टोलवाटोलवी होत असल्याबद्दल आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे जलील यांनी कळविले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका क्षेत्रात आजपासून प्लास्टिक बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या क्षेत्रात बुधवारपासून प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहेत.

कचराकोंडीवर मार्ग काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत काही नगरसेवकांनी सूचना केल्या. त्यात भाजपच्या नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी प्लास्टिक बंदीचा विषय मांडला. त्या म्हणाल्या, 'रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचा समावेश जास्त असतो. कॅरिबॅगसह विविध प्रकारचा प्लास्टिकचा कचरा आढळून येतो. पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्लास्टिक वापरावर बंदी आणली होती. आता प्लास्टिकचा वापर मुक्तपणे होत असल्याचे चित्र आहे. कॅरिबॅगसह प्लास्टिक वापरावर तात्काळ बंदी घाला, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल.'

अॅड. अदवंत यांनी केलेली सूचना महापौरांनी गांभीर्याने घेतली. प्लास्टिक बंदीबाबत तात्काळ परिपत्रक काढा, असे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. उद्यापासून कायद्यानुसार प्लास्टिक बंदीची कारवाई काटेकोरपणे करा, असे आदेश त्यांनी दिले. महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवारपासून पालिका प्रशासनातर्फे प्लास्टिकबंदीची कारवाई केली जाईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंटणखाना पोलिसांनी केला उद्धवस्त

$
0
0

औरंगाबाद: एका मुलीच्या सहाय्याने शरीर विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड मारून या प्रकरणी एका महिलेला अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेगमपुरा भागात एका महिलेने आपल्या आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना सुरू केला होता. ही महिला मुलीला ग्राहक पुरवून वेश्यागमनासाठी जागा उपलब्ध करून देत होती. या बाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी तिला अटक केली. या प्रकरणात त्या महिला आरोपीवर मुलीस अनैतिक व्यापार प्रेरित केल्याबद्दल बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बेगमपुरा येथील पोलिस निरीक्षक राजश्री आडे आणि पोलिस उपनिरीक्षक शेख शमा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये २ हजार कोटींची गुंतवणूक?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबईत काल झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र हा औद्यागिक गुंतवणुकीविषयीचा महाकुंभ यशस्वी झाला. राज्यातील एकूण गुंतवणुकीपैकी २ हजार कोटींची गुंतवणूक ऑरिक, शेंद्रा, लातूर, नांदेड आदी भागात होणार आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये एकूण चार हजारहून अधिक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. तीन दिवसांमध्ये उद्योगवाढ, विस्तारीकरण आणि नवीन गुंतवणूक यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आले असल्याने महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र हे उद्योजकांसाठीचे पहिल्या पसंतीचे राज्य असून गेल्या वर्षी देशाच्या परकीय थेट गुंतवणुकीपैकी महाराष्ट्रात एकूण ५१ टक्के गुंतवणूक आली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि इज ऑफ डुईंग बिझनेस यामधील सुलभता यामुळे अधिकाधिक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करतील असा विश्वास आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

कुशल मनुष्यबळ, बुद्धी याचा वापर वाढविण्यासाठी आगामी काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात येणार आहे. राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी राज्य शासनाने वेगवेगळी १३ नवीन धोरणे जाहीर केली आहेत. यात लॉजिस्टिक पार्क, वस्त्रोद्योग धोरण, फिन्टेक पॉलीसी, स्टार्ट अप पॉलिसी यांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून औरंगाबाद, नागपूर आणि अहमदनगर येथे अद्ययावत औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. याशिवाय उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या एकत्रितपणे मिळाव्यात यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस यावर भर देण्यात येत आहे. आज महाराष्ट्र राज्य स्टार्ट अप धोरणाला प्रोत्साहन देत असून यामुळे राज्यात नवीन रोजगार निर्माण होणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक बंदी कागदोपत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलेली प्लास्टिक बंदीची घोषणा महापालिकेच्या प्रशासनाने कागदोपत्रीच असल्याचे आपल्या कृतीतून स्पष्ट केले. बाजारपेठांमध्ये जाऊन जप्तीची कारवाई करण्यापेक्षा प्लास्टिक बंदीची कारवाई करण्याचे लेखी आदेश विविध विभागात पाठवण्यात आले.

कचराकोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापौरांनी मंगळवारी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. याबैठकीत भाजपच्या नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी प्लास्टिक बंदीचा मुद्दा मांडला. प्लास्टिक बंदी केली तर मोठा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल, असे त्या म्हणाल्या होत्या. महापौर घोडेले यांनी लगेचच प्लास्टिक बंदीचे आदेश दिले. बुधवारपासून कारवाई सुरू करा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांनी मात्र महापौरांचे आदेश कागदोपत्रीच घेतले. प्रत्यक्ष कोणतीच कारवाई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. प्लास्टिक बंदीचे काम आरोग्य विभागाचे की घनकचरा विभागाचे असा प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. प्लास्टिक बंदीबाबतचे लेखी आदेश बुधवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडूळ विक्रीच्या तयारीतील दोघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल ६० लाखांच्या दोन मांडुळांची विक्री मुंबईच्या टोळीला करण्याच्या तयारीत असलेल्या दोघा आरोपींचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेख यांनी फेटाळला.

या प्रकरणी आरोपी दीपक सोमीनाथ मोरे व आरोपी सुनील वाडीलाल चव्हाण (दोघे रा. वडगाव) यांनी वडगाव एमआयडीसी शिवाराच्या जंगलामध्ये तीन दिवसांत दोन मांडूळ पकडून आरोपी त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून दोन्ही आरोपींना शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास अहमदनगर रोडवरील सुंदर आर्केडजवळ अटक केली होती. या प्रकरणी दोघांना कोर्टात हजर करण्यात आले असता, दोघांना आधी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात येऊन नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, प्रकरण गंभीर असून आरोपींनी मांडूळ कुठून आणले, त्यांची विक्री नेमकी कुणाला केली जाणार होती व नेमक्या कुठल्या कारणासाठी मांडुळांचा वापर होणार होता, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का आदी बाबींचा तपास होणे बाकी आहे. तसेच आरोपींना जामीन मंजूर केला तर आरोपी पुरावा नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील योगेश तुपे पाटील यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकोंडी प्रकरणी बागडेंनी डागली सेनेवर तोफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराडेपोच्या विरोधात आंदोलन करणारे शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील मित्र आहेत, जिल्हा परिषदेत कुणाबरोबर युती केली ते त्यांनी तपासून पहावे, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. महापालिकेत भाजप शिवसेनेच्या सोबतच आहे, असे ते म्हणाले.

महापालिकेत शिवसेनेचा महापौर असल्यामुळे कचराडेपोच्या आंदोलनातून मार्ग काढण्याच्या भूमिकेपासून भाजप नेते बागडे यांनी पाठ फिरवली आहे. शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रकार भाजपतर्फे केला जात आहे, असे बोलले जात आहे. या संदर्भात 'मटा'शी बोलताना बागडे म्हणाले, चार महिन्यांपूर्वी कचराडेपो विरोधी आंदोलन सुरू झाले तेव्हा भाजपचे भगवान घडमोडे महापौर होते, त्यांचे महापौरपदाचे चारच दिवस शिल्लक राहिले होते, त्यावेळी मी मध्यस्थी केली. आंदोलन करणाऱ्यांची समजूत काढली व त्यांच्याकडून तीन महिन्यांचा वेळ मागून घेतला. तीन महिन्यांत कचराडेपोचा प्रश्न सोडवण्याबाबत महापालिका उपाययोजना करेल, असे आश्वासन घडमोडे यांनी दिले होते. घडमोडे यांच्यानंतर शिवसेनेचे नंदकुमार घोडेले महापौर होणार होते, त्यामुळे त्यांनाही आंदोलनकर्त्यांच्या समोर बोलायला लावले होते, त्यांनीही तीन महिन्यांत मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. आश्वासन दिल्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाने कोणतीच हालचाल केली नाही, निर्णय घेतला नाही, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मशीन्स खरेदी केले नाहीत, त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्वास उडाला आणि त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले.

कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे ही बाब खरी आहे, असा उल्लेख करून बागडे म्हणाले, हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने हालचाल केली असती आणि त्यांची हालचाल नागरिकांच्या लक्षात आली असती तर त्या नागरिकांनी आणखी काही दिवस त्रास सहन केला असता, पण चार महिन्यांत तसे काहीच घडले नाही. अजूनही महापालिकेने हालचाल करावी, मशीन्स खरेदीचे टेंडर काढावे, महापालिकेचे प्रयत्न सकारात्मक आहेत, असे त्या भागातील नागरिकांना वाटले तर ते महापालिकेला आजही मदत करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामुहित कॉपी; एका बाकावर दोन परीक्षार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका परीक्षाकक्षात २५ विद्यार्थी, एका पाकिटात २५ प्रश्नपत्रिका आणि एका बाकावर एकच विद्यार्थी असे नियमांना परीक्षा केंद्रांनी अक्षरश: केराची टोपली दाखिवली. शहरापासून हाकेच्या आंतरावर असलेल्या वरूड येथील श्री जुन्नेश्वर विद्यालय येथे एका बाकेवर दोन-दोन परीक्षार्थी, तर कुंभेफळ येथील महारुद्र कनिष्ठ महाविद्यालयात चक्क शिक्षकच उत्तरे सांगत होते. श्री जुन्नेश्वर विद्यालय विधारसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, तर महारुद्र संस्था काँग्रेसचे केशवराव औताडे यांच्याशी संबंधित आहे.

बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. कॉपीमुक्त अभियानासह यंदा मंडळाने परीक्षेच्या रचनेत नवे बदल आणले. हे सगळे बदल केवळ मंडळ कार्यालयापुरतेच ठरले. शहरापासून हाकेच्या आंतरावर असलेल्या वरूड काजी, कुंभेफळसारख्या केंद्रावर कॉपीसह, नियमांना बगल देण्याचे समोर आले. २५ विद्यार्थ्याचा एक कक्ष हे चित्र एकाद्याच हॉल पुरते होते. बहुतांशी हॉलमध्ये बैठक व्यवस्था विस्कळीत होती. एका बाकावर एक नाहीतर, दोन ते तीन विद्यार्थी बसून पेपर सोडवित होते. त्यामुळे कॉपीमुक्तीसह नवे नियम बिनकामाचे ठरल्याचे समोर आले. विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याशी संबंधित असलेल्या श्री जुन्नेश्वर विद्यालयात चक्क एका बाकेवर दोन-दोन विद्यार्थी बसलेले होते. कुंभेफळ येथील महारुद्र शाळेत 'मटा' प्रतिनिधीने भेट दिली तेव्हा एका हॉलमध्ये चक्क शिक्षकच विद्यार्थ्याला उत्तरे सांगत होते. ही संस्था काँग्रेसचे वरिष्ठ नेते केशवराव औताडे यांची आहे.

२८ भरारी पथके गेली कोठे

इंग्रजीच्या पेपरमध्ये कॉपीप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. मंडळाने विभागातील पथकांकडून अहवाल घेतल्यानंतर ही माहिती दिली. शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेसाठी तब्बल २८ पथके नेमली आहेत. त्यात उपसंचालकस्तरापासून शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी यांचा समावेश भरारी पथकांमध्ये आहे, तर पहिल्या दिवशी औरंगाबाद जवळच्या केंद्रावरही कॉपीचे प्रकार सर्रास सुरू होते. अनेक केंद्रावर भरारी पथक पोचलेच नसल्याचे समोर आले. त्यामुळे ही पथके गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

श्री जुन्नेश्वर विद्यालय, वरूड : ५२४

महारुद्र महाविद्यालय, कुंभेफळ… : ३४८

आमच्याकडे क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी मंडळाने दिले. आणखी २५ विद्यार्थी दिले जात होते. आम्ही विरोध केला. त्यांना सांगूनही त्यांनी जास्तीचे विद्यार्थी दिले, तरीही आम्ही चांगल्या पद्धतीने आसन व्यवस्था केली आहे.

- एस. जी. गायकवाड, केंद्रप्रमुख, जुन्नेश्वर विद्यालय.

आमच्या केंद्रावर जवळपासच्या शाळा जोडलेल्या आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. दोन हॉलमध्येच काहीसे विद्यार्थी तसे आहेत. अधिकच्या खोल्याही परीक्षेसाठी आम्ही खुल्या करून घेतल्या.

- एफ. एन. वाघचौरे, केंद्रप्रमुख, महारुद्र कनिष्ठ महाविद्यालय

एका बाकावर एकच परीक्षार्थी अशा स्पष्ट सुचना केंद्रांना देण्यात आल्या. सुचनांची अमंलबजावणी योग्य प्रकारे झाल्याचे मला सांगण्यात आले आहे. कोठे तसे असेल तर, त्याबाबत चौकशी करण्यात येईल.

सुगधा पुन्ने,

विभागीय सचिव,

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी क्रांती योजना अर्जासाठी मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी येत्या २६ फेब्रुवारीरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावर अर्ज दाखल करावे,' असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी केले आहे.

योजनेत तीन पॅकेज देण्यात आले असून, त्यापैकी कोणत्याही एका पॅकेजचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. पॅकेज एकमध्ये नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग आहे. पॅकेज दोनमध्ये जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, तर पॅकेज क्रमांक तीनमध्ये शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच याचा समावेश आहे. अर्जदार शेतकऱ्यांच्या नावे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर शेतजमीन असावी. तो अनुसूचित जमातीचा असावा, आदी अटी या योजनेसाठी आहेत.

असे मिळेल अनुदान

नवीन विहीर - २ लाख ५०

शेततळे - १ लाख

ठिंबक सिंचन - ५० हजार

विहीर दुरुस्ती - ५० हजार

तुषार सिंचन - २५ हजार रुपये

इनवेल बोअरिंग - २० हजार

वीज जोडणी - १० हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात हिमरत गँगचा म्होरक्या गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सटाणा तालुक्यात १३ लाखांच्या दरोड्यातील पसार सूत्रधार हिमरत मोहनसिंग चव्हाण याला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी मुकुंदवाडी भागात बेड्या ठोकल्या. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी तेलदर शिवारात हा दरोडा पडला होता. याप्रकरणी चार आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे.

सटाणा तालुक्यातील तेलदर शिवारात सुशीला केवळ खैरनार यांच्या घरी नऊ चोरट्यांनी लाकडी दरवाजा तोडून दरोडा टाकला होता. सुशीलाबाई व त्यांच्या पतीला बेदम मारहाण केली होती. चोरट्यांनी या दरोड्यात रोख तीन लाख रुपये, दहा लाखांचे दागिने व एक मोबाइल लंपास केला होता. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. सटाणा पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. टोळीचा सूत्रधार हिमरत मोहनसिंग चव्हाण (रा. आसेगाव, ता. गंगापूर) हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. आरोपी चव्हाण हा मुकुंदवाडी भागात बुधवारी सकाळी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून तेथील इच्छामणी ढाब्याजवळ सापळा रचून हिरामणला अटक करण्यात आली. ही कारवाई पीएसआय योगेश धोंडे, जमादार रामदास गायकवाड, संतोष गायकवाड, बापूराव बावस्कर, आनंद वाहूळ, विकास गायकवाड, रितेश जाधव व अनिल थोरे यांनी केली.



---

प्रत्यक्ष सहभाग नाही

---

हिमरत चव्हाण हा टोळीचा सूत्रधार आणि दरोड्यातील मास्टर माइंड आहे. तरुण दरोडेखोरांना एकत्रित आणून तो त्यांच्याकडून गुन्हा करून घ्यायचा. ज्या ठिकाणी दरोडा घालायचा त्या ठिकाणी तो स्वत: जायचा, मात्र गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायचा नाही, अशी याची कार्यपद्धती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील सेंट्रल लॅब सुरू होण्याची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सेंट्रल लॅब सुरू होण्यास अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. २५ लाखांपेक्षा जास्त खर्च झालेली ही लॅब सुरू तरी कधी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री या तिन्ही विषयांची प्रयोगशाळा एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टीने बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) गरजेनुसार बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र बांधकामाला अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त कालावधी लागला. त्यामुळे एकाच छताखालील तिन्ही प्रयोगशाळा सुरू होण्याविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका घेण्यात येत होत्या. या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांना विचारले असता, ते म्हणाले, प्रयोगशाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रयोगशाळेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर तिन्ही प्रयोगशाळा एकाच ठिकाणी सुरू होतील आणि रुग्णांना तिन्ही प्रयोगशाळांचे रिपोर्ट एकाच ठिकाणी मिळतील, असे डॉ. सोनवणे म्हणाले.

\B

पेपरलेस प्रयोगशाळा \B

सध्या या प्रयोगशाळेला 'एमएमआयएस'शी जोडले जात असून, संपूर्ण प्रयोगशाळा ही पेपरलेस होणार आहे. रुग्णांचे सर्व रिपोर्ट हे घाटीतील डॉक्टरांना ऑनलाईन उपलब्ध होतील. रुग्णाच्या क्रमांकावर त्याचे सर्व प्रकारचे रिपोर्ट एका क्लिकवर उपलब्ध होतील, असेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंझाने फसवल्याच्या आणखी तक्रारी दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उपकुलसचिव ईश्वर मंझा याने नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या दोघांनी बुधवारी गुन्हे शाखेत धाव घेतली. बिडकीन व नांदेड येथील या तक्रारदारांचे जबाब घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या दोघांची २८ लाखांची फसवणूक झाली आहे. दरम्यान, बुधवारी मंझा याच्या ईटखेडा येथील घराची आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने झडती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव ईश्वर मंझा सध्या फसवणुकीच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात पोलिस कोठडीत आहे. माणिकराव चव्हाण या तरुणाला विद्यापिठात सहायक कारकून या पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत त्याची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मंझा याच्या अटकेतेच वृत्त वाचल्यानंतर त्याने फसवणूक केलेले इतर तरुण देखील तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत आहेत. बिडकीन येथील हिरालाल चव्हाण आणि नांदेड येथील धनंजय कुटुंरकर यांनी बुधवारी सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांची भेट घेतली. चव्हाण यांच्या सहा नातेवाईकांना विद्यापीठात विविध पदांवर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून साडेसोळा लाख रुपये व कुंटूरकर यांच्या नातेवाईकाला वरिष्ठ प्राध्यापक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून सव्वाअकरा लाख रुपये घेतल्याची तक्रार त्यांनी केली. चव्हाण व कुंटूरकर यांचे जबाब घेण्याचे काम सुरू असून, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंझाच्या ईटखेडा येथील घराची झडती घेतली. तेथे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.



भावाचाही शोध सुरू

ईश्वर मंझा याचा भाऊ संजय मंझा याच्यावरही एका प्रकरणात लोकन्यायालयाचे अटक वॉरंट आहे. गेल्या एक वर्षापासून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती एसीपी रामेश्वर थोरात यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images