Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बारावीच्या परीक्षार्थींवर काळाचा घाला

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

ट्रक व मोटार सायकलमध्ये झालेल्या अपघातात बारावीच्या दोन परीक्षार्थींचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून, मृत दोघेही मावसभाऊ आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास जालना - भोकरदन रोडवरील कृषी कार्यालयासमोर घडला.

सुनीलसिंह रुपसिंग घुनावत (वय २०), अनिल केसरसिंह घुनावत (वय १८, रा. दोघेही रा. तडेगाववाडी ता. भोकरदन) अशी मृताची नावे आहेत. करण काळूसिंह सुदंरडे हा जखमी झाला आहे. भोकरदन-जालना रस्त्यावर सकाळी दहादरम्यान भोकरदनहून जालन्याकडे जाणारा ट्रक (जीजे-१८ ए-एक्स, १९७७) व तडेगाव (ता. भोकरदन) येथून बारावीच्या परीक्षेसाठी मोटारसायकलची धडक झाली. यामध्ये सुनिलसिंग घुनावत हा जागीच मरण पावला. तर अनिल घुनावत व करण सुदंरडे हे दोघे जखमी झाले. अनिल व करण हे बारावीच्या परीक्षेसाठी भोकरदन येथे येत होते. तर सुनील हा त्यांच्यासोबत येत होता. ट्रक चालकास राजूर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. सुनील व अनिल हे दोघेही सख्खे मावसभाऊ होते. गंभीर जखमी असलेल्या अनिलचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळावर बराच वेळ गर्दी झाली होती. तिघेही तडेगाववाडी येथील रहिवाशी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टीडीआरच्या दोनशे फाइल सहसंचालकांकडे

0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet : @unmeshdMT

औरंगाबाद : विकास हक्क हस्तांतराच्या (टीडीआर) २०० फाइल महापालिकेने अखेर सहसंचालकांकडे चौकशीसाठी पाठवल्या आहेत. आणखी ३१ फाईल सहसंचालकांकडे पाठविणे बाकी आहे. येत्या काही दिवसात या फाइलही चौकशीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती मिळाली आहे.

महापालिकेतील टीडीआर गैरप्रकार 'मटा'ने उघडकीस आणल्यानंतर नगररचना विभागात खळबळ उडाली. टीडीआर गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर राजपूत यांच्यासह नगरसेवक राजगौरव वानखेडे, कैलास गायकवाड, नितीन चित्ते यांनी पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेऊन तत्कालीन आयुक्तांनी नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्यानंतर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी महापालिकेतील 'टीडीआर'बद्दल विधानसभेत प्रश्न विचारला. याप्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, 'उच्चाधिकाऱ्याच्या माध्यमातून टीडीआर घोटाळ्याची चौकशी केली जाईल,' असे आश्वासन दिले होते. २००८ चे २०१७ यादरम्यान देण्यात आलेल्या टीडीआरची चौकशी केली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानुसार राज्य शासनाने नगररचना विभागाच्या सहसंचालकांची नियुक्ती टीडीआरच्या चौकशीसाठी केली. पालिकेच्या नगररचना विभागाने सहसंचालकांकडे २००८ ते २०१७ दरम्यान देण्यात आलेल्या टीडीआरच्या प्रकरणांच्या फाइल द्याव्यात, असे आदेश देखील शासनाने काढले होते. शासनाचे हे आदेश पालिकेच्या यंत्रणेने एक महिना दाबून ठेवले. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यावर दोनशे टीडीआरच्या फाइल १७ फेब्रुवारी रोजी पालिकेने सहसंचालक कार्यालयाच्या स्वाधीन केल्या. २००८ ते २०१७दरम्यान २३१ टीडीआर महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत. त्यापैकी २०० प्रकरणांच्या फाइल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित फाइल विभागीय चौकशीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिवेशनादरम्यान अहवाल

राज्य विधानसभेचे अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सुमारे दीड महिना हे अधिवेशन चालेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; नगररचना विभागाचे सहसंचालक टीडीआर प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वी विधानसभेत सादर करतील. त्यासाठी त्यांना उर्वरित ३१ फाइल देखील पालिकेला पुरवाव्या लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्याव्यवसाय प्रकरणात महिलेचा जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इतर महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास स्वतःची जागा देऊन पैसे उकळणाऱ्या महिला आरोपीचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेख यांनी फेटाळला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजेश्री आढे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आसेफिया कॉलनीतील आरोपी महिला ही स्वतःची जागा इतर महिलांना वेश्यागमनासाठी देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्या ठिकाणी एक पंटरला पाठवून पोलिसांनी छापा मारला आणि पीडित महिलेसह आरोपी महिलेला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यामध्ये 'पीटा'अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महिला आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. पी. काकडे पाटील यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपाचा नियमित जामीन फेटाळला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळीत पंकजांपुढे शिवसेनेचेही आव्हान

0
0

बीड :

गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याविरोधात उमेदवार उभा न करणाऱ्या शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र पूर्ण ताकदीने परळीच्या मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. देगलूरचे आमदार व परळी विधानसभेचे शिवसेनेचे निरीक्षक सुभाष साबणे यांनीच याबाबत माहिती दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परळीची जागा लढण्याचा आदेश दिला आहे. 'मातोश्री'वरून हाच संदेश घेऊन मी आलो आहे, असे साबणे यांनी शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत परळी येथे झालेल्या बैठकीत सांगितले. परळी शहरातील भागवत पॅलेसमधील सभागृहात ही बैठक झाली. यावेळी पुढील निवडणुकीच्या व्यूहरचनेवरही विचारमंथन झाले.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा यांनी परळी मतदारसंघातील वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. गेल्या निवडणुकीत चुलत बंधू धनंजय मुंडे यांनीच त्यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. मात्र, पंकजा यांनी हे आव्हान मोडून काढत दणदणीत विजय मिळवला. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंडे भावंडांमध्ये पुन्हा एकदा सरळ लढत पाहायला मिळेल, असे चित्र असताना यात शिवसेनेने एंट्री करायचे ठरवल्याने परळीची लढत तिरंगी आणि रंगतदार होणार आहे.

दरम्यान, पंकजा यांना याबाबत माध्यमांनी विचारले असता, परळीतून आणखी कुणी लढत असेल तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा रुपयांची सर्व नाणी वैध

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहा रुपयांच्या सर्व नाणी वैध असल्याचे मोबाइल संदेश रिझर्व बँकेकडून सर्वांना पाठवले जात आहेत. दहा रुपयांची नाणी बंद होणार किंवा बंद झाली आहेत, याबद्दलच्या अफवा, गैरसमज दूर करण्यासाठी बँकेकडून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे व्यापारी व बँकांकडून नाणी स्वीकारण्याबद्दलची संभ्रमावस्था दूर होण्यास मदत होणार आहे.

दहा रुपयांच्या नाण्यांबद्दल काही महिन्यांपासून अफवा पसरल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सामान्य नागरिकांमध्ये दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरली आहे. शिवाय अनेकांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला होता. या परिस्थितीत रिझर्व बँकेनेच मोबाइलवर संदेश पाठवून खुलासा केला आहे. शहरात काही बँकांच्या रोकड काउंटरवर रिझर्व बँकेच्या निर्देशची प्रत आणि एसएमएसची फोटो कॉपी चिटकवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांच्या प्रश्नांना आपोआपच उत्तर मिळत आहे.

\Bतर मिस कॉल द्या \B

काही दिवसांपासून व्यापारी दहा रुपयांची नाणी घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी रिझर्व बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बँकांकडे येत होत्या. त्याची दखल घेत रिझर्व बँकेने १० रुपयांची १४ डिझाइनची सर्व नाणी वैध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या शिवाय काही शंका असल्यास १४४४० या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही सिटी स्कॅन पुन्हा नादुरुस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) दोन्ही सिटी स्कॅन मशीन बुधवारी रात्रीपासून नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे गोरगरीब व गंभीर रुग्णांचे पुन्हा एकदा हाल होत आहेत. दोन्ही उपकरणे काही अंतराने अचानक नादुरुस्त झाल्याने अनेक रुग्ण बुधवारी ताटकळले. शेवटी अत्यवस्थ रुग्णांना खासगीतून सिटी स्कॅन तपासणी करून घ्यावी लागली. सिटी स्कॅनची सुविधा पूर्ववत होण्यासाठी किती कालावधी लागणार, मागील अनुभवाप्रमाणे महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

घाटीमध्ये ६४ स्लाईस व ६ स्लाईस असे दोन सिटी स्कॅन मशीन आहेत. मात्र रुग्णांची संख्या जास्त असल्याने दोन्ही मशीनवर कायम ताण आहे. त्यातूनच ट्यूब जाणे किंवा इतर तांत्रिक बिघाड होतात. सिटी स्कॅनची दुरुस्ती अत्यंत खर्चिक असल्यामुळे हा प्रश्न घाटी प्रशासनाला नेहमीच भेडसावत असतो. सद्यस्थितीत ६ स्लाईस सिटी स्कॅनची ट्यूब गेली असण्याची शक्यता आहे. इतरही काही बिघाड असू शकतो, अशी शक्यता आहे. तर, ६४ स्लाईस मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असू शकतो, असे सांगितले जात आहे. सात-आठ महिन्यांपूर्वीही ६ स्लाईस मशीनची ट्यूब गेली होती व ४० लाखांच्या ट्यूबसाठी दोन ते अडीच महिने सेवा खंडित होती. त्याचवेळी ६ स्लाईस मशीनचा ताण ६४ स्लाईस मशीनवर येऊन त्याच सुमारास ६४ स्लाईस मशीनही नादुरुस्त झाली होती. दोन्ही मशीन नादुरुस्त होण्याची ही वर्षातील किमान दुसरी वेळ आहे. आताही ६ स्लाईस मशीनची ट्यूब गेली असून, ही ट्यूब 'पेटण्या'साठी पुन्हा किती महिने प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न आहे. 'हायटेन्शन'मुळेही या प्रकारचा बिघाड होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारे वारंवार बिघाड होत असेल, तर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे. अर्थात, ६४ स्लाईस मशीन दोन-तीन दिवसांत दुरुस्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. मात्र ६ स्लाईसच्या ट्यूबसाठी 'डीएमईआर'ला प्रस्ताव पाठवणे, मंजुरी मिळणे व प्रत्यक्षात दुरुस्ती होऊन मशीन रुग्णसेवेत येण्यासाठी किमान महिन्या-दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो, असे संकेत आहेत.

नवीन उपकरणांची प्रतीक्षा

जिल्हा नियोजन मंडळाच्या (डीपीसी) अलीकडेच झालेल्या बैठकीत नवीन १२८ स्लाईस सिटी स्कॅन मशीनच्या खरेदीसाठी निधी मंजूर झाला आहे. शिर्डी संस्थानमधून 'थ्री टेस्ला एमआरआय' मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही नवीन उपकरणे प्रत्यक्ष उपलब्ध होण्यासाठी किमान काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

६ स्लाईस सिटी स्कॅनच्या ट्यूबसाठी ४० लाखांचा प्रस्ताव 'डीएमईआर'ला पाठवणे विचाराधीन आहे. सिटी स्कॅन दुरुस्त होईपर्यंत घाटीतील गंभीर व तातडीच्या रुग्णांचे सिटी स्कॅन खासगीमध्ये करुन घेण्यात येणार आहे. त्यासाठी घाटीच्या निर्धारित शुल्कांमध्ये ही तपासणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

घाटीने आम्हाला तसे अधिकृत पत्र दिल्यास आम्ही घाटीतील रुग्णांची तपासणी तात्पुरत्या कालावधीपर्यंत नक्कीच करुन देऊ शकतो. तशी मागणी पुढे आल्यानंतर कुठे तपासणी केली जाऊ शकते, याचा विचार केला जाईल व गोरगरीब रुग्णांची सोय करण्याचा प्रयत्न असेल.

- डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, राज्य सचिव, क्ष-किरण संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील तीन हजार ग्राहकांची वीज खंडित

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शून्य थकबाकी मोहिमेत महावितरणने मंगळवारपर्यंत पाच हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. महावितरणचे कर्मचारी दारोदार फिरून कारवाई करत असून पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्र होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

औरंगाबाद व जालना जिल्यांत तीन हजार ७९ कोटी रुपयांची विद्युत मागणी आहे. सध्या एकूण मागणीच्या तुलनेत ३९९ कोटी रुपयांची येत आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतून ३७८ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी शून्य थकबाकी मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम औरंगाबाद शहरातही सुरू आहे. एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले ९४१ वीज ग्राहक शहरात आहेत. त्यांच्याकडे १८ कोटी ८० लाख रुपये थकीत असून त्यापैकी १८० वीज ग्राहकांनी एक कोटी ८२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यापैकी ३८१ वीज ग्राहकांचा पुरवठा तात्पुरता, तर १३१ वीज ग्राहकांचा पुरवठा कायमचा खंडित करण्यात आला आहे.

पाच हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या तीन हजार १९ वीज ग्राहकांकडे चार कोटी तीन लाख रुपये थकित आहेत. त्यांच्यापैकी १२१ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमचा खंडित केला आहे. दरम्यान, ही कारवाई सुरू झाल्यानंतर ३,३३२ वीज ग्राहकांनी दोन कोटी आठ लाख रुपयांची थकबाकी भरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील महामंडळाचा फक्त २९ जणांना आधार

0
0

औरंगाबाद: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेचा गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील केवळ २९ जणांनाच प्रत्यक्ष लाभ झाला आहे. या योजनेचे उद्दिष्ट ११५० लाभधारकांचे होते.

आर्थिक दुर्बल घटकातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. महामंडळाची २५ हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्याची थेट कर्ज योजना २००९ मध्ये बंद झाली आहे. बीज भांडवल कर्ज योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. २०१४-१५ ते २०१७-१८ या चार वर्षात ११५० लाभार्थिंचे उद्दिष्ट होते. त्यासाठी केवळ ११५ बेरोजगारांनी अर्ज केले. त्यापैकी केवळ २९ जणांचा योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. ६६ प्रकरणे बँकेकडे प्रलंबित असून २० प्रकरणे बँकांने नामंजूर करून परत पाठवली आहेत. ही परिस्थिती पाहता योजना सर्वसामान्य पर्यंत पोहचली की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची अट, जामीनदार न मिळणे, सर्व पूर्तता करूनही अनेकदा बँकाकडून होणारी अडवणूक आदी कारणांमुळे चांगली योजनेचे अपेक्षित फलित होत नसल्याची चर्चा आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीत सलाईनचा तुटवडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी हॉस्पिटलमध्ये औषधे, वैद्यकीय साहित्यापाठोपाठ आता सलाईनचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. बहुतांश रुग्णांना सलाईनसह औषधी-साहित्य विकत घेण्याची वेळ येत आहे. गरजेपेक्षा अत्यल्प पुरवठा होत असल्याने बहुतांश वॉर्ड, विभागांमध्ये कमी-जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे. कित्येक महिन्यांपासून औषधांची स्थिती गंभीर असताना राज्य सरकारकडून काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) हे मराठवाड्यातील सर्वांत मोठे रुग्णालय आहे. या हॉस्पिटलमध्ये मराठवाडा, विदर्भ, खान्देशातील तब्बल १२ ते १४ जिल्ह्यातील रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. येथील दररोजची ओपीडी अडीच ते तीन हजार रुग्णांची आहे, कधीही हजार-दीड हजार रुग्ण दाखल असतात. स्त्रीरोग विभागामध्ये दररोज ५० ते ७० प्रसुती होतात. यावरून रुग्णांची संख्या व हॉस्पिटलवरील रुग्णांचा विश्वास स्पष्ट होतो. मात्र गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सर्वप्रकारची दैनंदिन व महत्त्वाची औषधे, प्रतिजैविकांबरोबरच वैद्यकीय साहित्याचा तुटवडा आहे. गेल्या आठवड्यापासून सलाईनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत ग्लोज आहेत, तर कॉटन नाही आणि कॉटन आहे, तर बँडेज नाही, अशी स्थिती आहे. सिरिंज, प्लास्टर व इतर वैद्यकीय साहित्याची स्थितीही वेगळी नाही.

\Bइतर मेडिकल कॉलेजांमध्येही तुटवडा\B

केवळ घाटीमध्ये नव्हे, तर राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये औषधांची स्थिती कमी-अधिक प्रमाणात अशीच आहे. राज्यातील औषध-साहित्याची एकत्रित खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही समस्या गंभीर झाल्याचे सांगण्यात आले. 'हाफकिन'मार्फत सर्व शासकीय मेडिकल कॉलेजांमध्ये पुरवठा होणे अपेक्षित आहे. पण, हा पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. श्वानदंशावरील 'अँटी रेबिज व्हॅक्सिन'चा (एआरव्ही) पुरवठा एक वर्षापासून विस्कळीत झाला आहे. जिथे शंभर इंजेक्शन लागतात, तिथे १०-२० इंजेक्शनचा पुरवठा होतो, अशी स्थिती आहे.

\Bउपकरणेदेखील 'व्हेंटिलेटर'वर\B

घाटीतील अनेक उपकरणांची स्थितीदेखील चिंताजनक आहे. 'व्हेंटिलेटर'सह इतर अनेक महत्त्वाची उपकरणे नादुरुस्त आहेत. डिफिब्रिलेटर, सी-आर्म, डायलिलिस मशीन यासारखी कितीतरी महत्त्वाची उपकरणे गरजेपेक्षा कमी आहेत. सिटी स्कॅन सारखे महत्त्वाचे उपकरण वारंवार नादुरुस्त होत आहे. उपकरणांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.

'हाफकिन'मार्फत महिन्याभरामध्ये औषधी-साहित्याचा पुरवठा सुरळीत होईल. मात्र तोपर्यंत स्थानिक खरेदी करा व रुग्णांची हेळसांड होऊ देऊ नका, अशा स्पष्ट लेखी सूचना पूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे मेडिकल कॉलेजांनी खबरदारी घेणे अपेक्षित होते.

डॉ. सुरेश बारपांडे, सहसंचालक, डीएमईआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेटवस्तूचे आमिष, चाळीस हजारांचा गंडा

0
0

औरंगाबाद: विदेशातून भेटवस्तू पाठवण्याचे आमिष दाखवत एका महिलने वकिलाची चाळीस हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन घडला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप नरसिंह शिंदे (वय ३२ रा. बाळापूर शिवार) हे व्यवसायाने वकील आहेत. शिंदे यांची फेसबुकवर दिल्लीतील एका महिलेसोबत ओळख झाली होती. या महिलेने त्याना विदेशातून किंमती वस्तूचे गिफ्ट पाठवते त्यासाठी चार्जेस लागतील, असे आमिष दाखवले. शिंदे यांनी या गोष्टीला होकार कळवला. यानंतर कस्टमर चार्जेसच्या नावााखाली या महिलेने त्यांना तिच्या बँक खात्यामध्ये ४० हजार पाचशे रुपये भरावयास सांगीतले. शिंदे यांनी ही रक्कम भरली होती. यानंतर या महिलेने भेटवस्तू न पाठवता त्यांना उत्तर देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शिंदे यानी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी महिलेविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक श्रीकांत परोपकारी हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच तोळ्याचे दागिने छावणीतून लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पतंजली'मधून आल्याची थाप मारीत दोन भामट्यांनी जेष्ठ महिलेचे अडीच तोळ्याचे दागिने लंपास केले. त्यांनी दागिने उजळून देण्याचा बहाणा करत हातचलाखीने हा प्रकार केला. हा प्रकार बुधवारी गवळीपुरा, छावणी भागात घडला असून छावणी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गवळीपुरा भागात उमाबाई श्यामलाल खांडेकर (वय ६०) यांच्या घरी बुधवारी सकाळी दहा वाजता दुचाकीवर दोन तरूण आले. आम्ही 'पतंजली'मधून आलो आहोत. सोन्याचे दागिने उजळून देणारी पावडर आणली आहे. ती कशी वापरायची हे तुम्हाला दाखवतो असे सांगत दागिन्याची मागणी केली. उमाबाई यांनी त्यांचे व त्यांच्या सुनेची साखळी, अंगठी, कानातले आदी अडीच तोळ्याचे दागिने त्या दोघांना दिले. यावेळी त्यांनी एका डब्यात हळद मिसळून व लाल पाणी करीत हे दागिने त्यात ठेवण्याचा बहाणा करीत हातचलाखीने दागिने लांबवले. यानंतर हा डब्बा उमाबाईना देत थोड्या वेळाने दागिने काढायचे सांगितले. उमाबाई यांनी थोड्या वेळाने पाहिले असता त्यांना दागिने नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी दोन्ही अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक मिरधे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारी पार्कच्या जागेवरही विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, मिटमिटा/औरंगाबाद

कचरा डेपोसाठी मिटमिटा शिवारातील सफारी पार्कची जागा पाहण्यासाठी गेलेल्या महापालिका आयुक्तांसमोर नागरिकांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. हातात रॉकेलची कॅन घेवून एक युवक आला होता. त्याला अन्य नागरिकांनी समजावले.

नारेगाव - मांडकीच्या कचरा डेपोवर तेथील नागरिक कचरा टाकू देणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यामुळे महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर शनिवारी सकाळीच मिटमिटा येथील सफारी पार्कच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले. त्यांच्या बरोबर महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी देखील होते. कचरा डेपोसाठी जागा पाहण्यास आयुक्त व अन्य अधिकारी आले आहेत, याची माहिती कळताच मिटमिटा आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी सफारी पार्कच्या जागेवर कचरा टाकण्यास तीव्र विरोध केला. आयुक्तांना उद्देशून नागरिक म्हणाले, 'परिसरात दोन तलाव आहेत, त्याचे पाणी आम्हाला मिळते. कचऱ्यामुळे तलावातील पाणी दूषित होईल. त्यामुळे या परिसरात कचरा टाकू नका, कचरा टाकण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन करू.' नागरिकांचा विरोध असेल तर आम्ही काहीही करणार नाही असे सांगून आयुक्त माघारी परतले. नगरसेवक रावसाहेब आमले यांनी आयुक्तांना मिटमिटा शाळेला भेट देण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करून आयुक्तांनी शाळेला भेट दिली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीने त्यांचे स्वागत केले. यावेळी लक्षमण बनकर, अजबराव मुळे, बबनराव मुळे, गंगाधर चव्हाण, आण्णासाहेब वाकळे, साईनाथ जाधव, उमेश चव्हाण, दिगंबर बनकर आदी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बसप’ राज्यातील सर्व जागा लढविणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी उत्तरप्रदेशमध्ये लोककल्याणकारी राज्य निर्माण करून देशासमोर संदेश दिला. त्याच धर्तीवर आम्ही महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढविणार आहोत. राज्यातील जनतेला आमचा पर्याय निश्चितच पसंतीस उतरेल,' असा विश्वास 'बसप'चे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्क केला.

याप्रसंगी प्रदेश सचिव जयाताई राजकुंदन, प्रभारी प्रा. डॉ. ना. तु. खंदारे, कोषाध्यक्ष नदीम चौधरी, जिल्हाध्यक्ष किशोर म्हस्के, नगरसेवक राहुल सोनवणे आदींची उपस्थिती होती. साखरे म्हणाले, ' गेल्या महिन्यापासून आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर आहोत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बहुजन समाज पक्षाची ताकद, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि चाचपणी करत आहोत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बांधणी सुरू केली आहे. ओबीसी, मुस्लिम समाजाला एकत्र आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकार सत्तेत येताना अनेक आश्वासने दिली गेली, पण मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही नुसती आश्वासने दिली. शेतकरी, कामगार, कष्टकरी त्रस्त आहेत. वेगळ्या विदर्भाचा आग्रह धरणारे भाजप आता गप्प आहे. काँग्रेस सत्तेत असताना या मुद्यावर चुप्पी साधून होते. आता काँग्रेस वेगळ्या विदर्भाचे गाजर दाखवित आहे. एकूण भाजप व काँग्रेस म्हणजे काका पुतण्याचे सरकार आहे. शेतकरी मंत्रालयात जाऊन आत्महत्या करत आहेत, यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय ?. राज्यात २०१९ मध्ये आम्ही जर सत्तेत आलो तर विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि कोकण असे चार राज्य निर्माण करू,' असे आश्वासन त्यांनी दिले.

भाजप आणि काँग्रेसचे सरकार म्हणजे काका पुतण्याचे सरकार आहे. यांनी कायम आश्वासने दिली, पण त्याची अंमलबजावणी केली नाही. केंद्र व राज्यातील सरकारच्या थापांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. काँग्रेस सत्तेत असतानाही अशीच परिस्थिती होती.

- सुरेश साखरे, प्रदेशाध्यक्ष, बसप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘करा’विरोधात उद्योजक आंदोलन छेडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यामुळे सद्यस्थितीत उद्योजकांचा छळ होत आहे. हा छळ वेळीच थांबविला नाही तर शेतकऱ्यांसारखे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय मराठवाड्यातील औद्योगिक संघटनांनी घेतला आहे. एक खिडकी योजना दिली नाही, तर उद्योग अन्य राज्यात हलवू, असा इशारा उद्योजकांनी दिल्यामुळे सरकारसमोर नवीन संकट उभे राहणार आहे.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ), चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) आणि वाळूज इंडस्ट्रिअल असोसिएशन (डब्ल्यूआयए) या औद्योगिक संघटनांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. सीएमआयएचे प्रसाद कोकीळ, मासिआचे सुनील किर्दक, डब्ल्यूआयएचे वसंत वाघमारे, राहुल मोगले, हर्षवर्धन जैन आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यांतर्गत करण्यात येणाऱ्या अवाजवी कर वसुलीला चाप लावावी, अशी मागणी करण्यात आली. '२०११पर्यंत बांधकाम असलेल्या जागेसाठी एक रुपया प्रति चौरस फूट आणि खुल्या जागांसाठी तो २० पैसे एवढा असताना फक्त सात वर्षांत हा कर लाखोंच्या घरात कसा जातो ?' असा सवाल किर्दक यांनी केला. 'वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीला दीड लाख रुपये कराची नोटीस बजावली. त्या कंपनीत असलेल्या मालाची मोजणी न करता ग्रामपंचायतीने या उद्योगाचे कम्प्युटर एका ट्रॅक्टरमध्ये भरून नेले. ज्यांची किंमत २५ लाखांची होती,' अशी धक्कादायक माहिती सुनील किर्दक यांनी दिली.

'आमची कर देण्याची तयारी आहे, पण त्यात सुसूत्रता असावी आणि कायद्यात तरतूद असताना करावर कोणतीही तडजोड केली जात नाही, त्याउपर नियमांची पायमल्ली करुन अक्षरश: मद्यपी वसुलीसाठी येतात आणि कोणत्याही वस्तूची मोजणी न करता त्या वस्तू बिनधास्त उचलून नेतात. राज्य सरकारने याबाबत ठोस पाऊल उचलले पाहिजे आणि आमची जाचातून सुटका करावी अन्यथा आम्ही आंदोलन हाती घेऊ,' असा इशारा किर्दक यांनी दिला.

उत्पादने रस्त्यावर फेकू

'कर देण्यास आम्ही तयार असताना आमच्याच कंपनीत येत गळचेपी करणे कुठल्या कायद्यात बसते,' असा सवाल वसंत वाघमारे यांनी केला. 'शेतकऱ्यांनी रस्त्यावर माल फेकला तसेच आमची उत्पादने रस्त्यावर फेकू,' असा इशारा 'सीएमआयए'चे कोकीळ यांनी दिला. ग्रामपंचायत करात सुसूत्रता असावी, एमआयडीसीकडे कर जमा करण्याची आमची तयारी आहे, ग्रामपंचायतींच्या अरेरावीला लगाम घालावा, एक खिडकी योजना देण्यावी, जप्तीत नियमावली पाळली जावी, आदी मागण्या उद्योजकांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवानिवृत्तीनंतर चौकशी नाही; मॅटचा निर्वाळा

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

अर्जदाराला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या(मॅट) औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. त्याच्याविरोधातील आरोपाप्रकरणी सेवानिवृत्तीनंतर चौकशी करता येणार नाही, असा आदेश मॅटचे चेअरमन न्या. अंबादास जोशी यांनी दिला.

अर्जदार कृष्णा गुलाब जाधव हे ३१ मे २०१४ रोजी जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावरून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्याच दिवशी त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले होते. सात सप्टेंबर २०१५ रोजी कृषी विभागाच्या सचिवांनी त्यांची चौकशी प्रस्तावित केली होती. अर्जदार २००८ ते २०१३ या काळात सहाय्यक प्रशासन अधिकारी असताना त्यांनी अनियमितता केली तसेच नियमबाह्यपणे स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना सेवेत समावेश केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांनी मॅटच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले होते. यापूर्वीच्या सुनावणीत खंडपीठाने अर्जदाराविरोधातील आरोपपत्र रद्द केले होते. तर नुकत्याच झालेल्या सुनावणीत अर्जदाराविरोधात सेवानिवृत्तीच्या चार वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या आरोपाप्रकरणी सेवानिवृत्तीनंतर चौकशी करता येणार नाही असा आदेश दिला. अर्जदाराची बाजू काकासाहेब जाधव यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माथाडी कामगारांचे आंदोलन सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

थकीत पगारासह अन्य मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माथाडी कामगार गेल्या पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन करत आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असा इशारा मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही यांनी दिला आहे.

शासकीय गोदामात काम करणाऱ्या माथाडी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी २० फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पगार नियमित मिळावा, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, पगार थकविणाऱ्या मजूर संस्थेचे परवाने रद्द करा, यासह अन्य मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, या आंदोलनास पाठिंबा म्हणून लेबर युनियनतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने करण्यात येणार होती, पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याप्रश्नी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आल्याचे कीर्तीशाही यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रयत क्रांती संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी टीव्ही सेंटर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

राज्याचे कृषी, पणन व स्वच्छता मंत्री तथा सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माढा मतदारसंघात हल्ला केला. या हल्ल्याचे पडसाद औरंगाबादेत उमटले आहेत. सदाभाऊंनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांच्यावर झालेल्या हल्लाचा निषेध करत खासदार शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन केले. शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना आवर घालवा, अन्यथा मराठवाड्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. जिल्हाध्यक्ष विनायक भानुसे पाटील, सतीश शिंदे, विनायक तांगडे, सतीश साळुंखे, राम भानुसे, अमजद शेख, समाधान फुले, अनिल शेळके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याआडून बागडेंचे राजकारण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नारेगाव - मांडकी येथील कचरा डेपोआडून फुलंब्री मतदारसंघाचे आमदार व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राजकारण करीत आहेत,' असा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. 'या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत,' असा इशाराही त्यांनी दिला.

कचरा डेपोविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी चर्चा करून परतल्यानंतर सुभेदारी विश्रामगृहात खैरे पत्रकारांशी बोलत होते. खैरे म्हणाले, 'जालना - फुलंब्री मतदारसंघाचे हे राजकारण आहे. बागडे यांनी त्यात पुढाकार घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करायची नाही असे त्यांनी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त देखील काहीच करायला तयार नाहीत. कचरा डेपोवरून जे घडत आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना सगळे सांगणार आहे. औरंगाबाद शहराच्या सुधारित विकास आराखड्याचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले, तेव्हा 'ग्रीन'चे मोठ्या प्रमाणावर 'यलो' करण्यात आले. 'यलो' केलेल्या जमिनीला चांगला भाव मिळावा म्हणून हे आंदोलन उचकवून दिले आहे. यात काही विद्यमान तर काही माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आहेत, या सर्वांनी मिळून शहराला वेठीस धरण्याचे काम केले आहे. कचरा डेपोच्या विरोधातील आंदोलनाची स्थिती महापालिका प्रशासनामुळे निर्माण झाली आहे. नागरिकांनी चार महिन्यांचा वेळ महापालिकेला दिला होता, पण त्यांनी चार महिन्यात काहीच केले नाही. पर्यायी जागा न शोधल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे,' असा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेचा महापौर आहे म्हणून भाजप सहकार्य करायला तयार नाही, मात्र भाजपचा उपमहापौर देखील आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. नुसता विरोध केला जात आहे. पर्याय काढण्यास कुणीच तयार नाही. सफारी पार्कच्या जागेवरही विरोध झाला.

- चंद्रकांत खैरे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कचरा डेपोविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांची भाषा चुकीची आहे. त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, अन्यथा नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल,' असा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला आहे.

आंदोलन सुरू झाल्यापासून पाच-सहा वेळा घोडेले आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी मांडकी चौफुलीवर जावून आले. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना महापौर म्हणाले, 'मांडकी व परिसरातील नागरिकांनी चाळीस वर्ष कचरा डेपोचा त्रास सहन केला. त्यांच्या सहनशिलतेला सलामच केला पाहिजे. त्यांना आणखी त्रास देण्याची आमची भूमिका नाही, पण पर्यायी व्यवस्था करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तेवढा वेळ त्यांनी द्यावा हीच आमची मागणी आहे.'

'चाळीस वर्ष त्या ठिकाणी कचरा पडत होता, आणखी चार - पाच महिने त्याच ठिकाणी कचरा पडला तर काय हरकत आहे. साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची महापालिकेची तयारी आहे. त्यादृष्टीने आम्ही तयारी देखील केली आहे. केलेली तयारी दृष्य स्वरूपात येण्यास चार - पाच महिने लागतील तेवढा वेळ त्या नागरिकांनी दिला पाहिजे, पण त्यांची भाषा चुकीची आहे. त्यामुळे नाईलाजाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.'

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग करा, २० वर्षांचे बोनस आयुष्य जगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

योगशिवाय जीवन अर्धवट आहे, हे जेव्हा लक्षात येईल, तेव्हा रुग्णालयातील रांगा कमी होतील, वार्धक्य सुखी होईल, कमावलेला पैसा-'एफडी'तील रक्कम रुग्णालयांमध्ये खर्च होणार नाही. योगमुळे स्वतःचे जीवन सुखी होईलच; पण अख्खा समाज सुखी होण्यासाठी हातभारही लावता येईल. जीममुळे शरीर फिट राहील, पण मनःशांती, ईश्वरीय प्राप्ती ही योगमुळेच शक्य आहे. त्यामुळेच मी म्हणतो, योग करा आणि २० वर्षांचे हमखास बोनस आयुष्य जगा, अशा शब्दांत भारतीय योग संस्थानचे महामंत्री देसराजजी गुप्ता यांनी आवाहन केले.

भारतीय योग संस्थानच्या शहर शाखेच्या वतीने रविवारी तापडिया नाट्य मंदिरात 'आजची जीवनशैली व योग' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे डॉ. उत्तम काळवणे, भाऊ सुरडकर, संजय औरंगाबादकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. देसराजजी गुप्ता म्हणाले, योग ही भारतातील ऋषी-मुनींची व अस्सल भारतीय संस्कृतीची देण आहे. परंतु ४०-५० वर्षांपूर्वी योगचे नाव कधी ऐकायलाही मिळत नव्हते की कोणाच्या तोंडीही नव्हते. मुळात त्याकाळी योगचा प्रचार-प्रसारही नव्हता. आज मात्र रेल्वेत, पार्कांमध्ये व अगदी रस्त्यावरही प्राणायम केला जातो. हे जसे खरे आहे, तसे हेही खरे आहे की ४०-५० वर्षांपूर्वी पिझ्झा, बर्गर, नुडल्सही नव्हते. कारच काय मोटारसायकलीही नव्हत्या व होती फक्त सायकल. त्यामुळे कुठेही जाण्यासाठी पायी नाहीतर सायकल, हेच साधन होते आणि मुळात आयुष्य खूप सहज-साधे-सोपे होते. त्याकाळी संध्याकाळी सहा-साडेसहाला जेवण केले जाई व अंधार पडला की लोक झोपी जात आणि पहाटे ४-५ वाजता ब्रह्ममुहुर्तावर लोक उठत होते. हे सहज-साधे-सोपे जीवन म्हणजेच तर योग आहे. त्यामुळेच त्यांना वेगळा योग करवा लागला नाही, जो आज नाईलाज म्हणून करावा लागतो तो केवळ चुकीच्या जीवनशैलीमुळे. आज संध्याकाळी नव्हे तर रात्री ११ वाजता जेवण केले जाते व लोक चक्क निशाचर झाले आहेत. आहारही सात्विक राहिलेला नाही. त्यामुळेच शरीराची एखादी व्यवस्था नादुरुस्त होऊन तर त्याचा परिणाम दुसऱ्या व्यवस्थांवर झाल्याशिवाय राहात नाही. मधुमेह-रक्तदाब हासुद्धा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे. अगदी झोप येण्यासाठी गोळ्या-औषधे घेण्याची वेळ येत आहे. मुळात मन शांत नसेल तर झोप येणार कुठून? योगमुळे इंद्रिय काबुत येतातच; पण योगमुळे जीवनशैली सुधारण्यासही मदत होते.

\Bरडत जगायचे का हसत-हसत?\B

प्रत्येकाच्याच वाट्याला वार्धक्य येणार आहे. त्यामुळेच बिछान्यावर व्हिव्हळत पडून नातवंडाला पाणी मागण्यापेक्षा योगद्वारे स्वतःला ठणठणीत ठेऊन स्वतः हाताने पाणी घेऊन नातवंडालाही पाणी देण्याची धमक योगमुळेच शक्य आहे, असेही देसराजजी गुप्ता म्हणाले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images