Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाड्यासाठी सरकारचा हात मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून ग्रामीण लोकसंख्या, जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, दरडोई उत्पन्नाच्या आधारे निधी देण्यात येतो. त्याचवेळी जिल्ह्यांनी राज्यस्तरीय बैठकीत केलेल्या वाढीव मागणीचाही सरकारकडून विचार केला जातो. मराठवाड्याला गेल्या सात वर्षांत युती सरकारने सर्वाधिक वाढीव दिला असून, २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षांमध्ये मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना सरकारने सढळ हाताने निधी दिला आहे.

साधारणपणे जानेवारी अखेरपर्यंत दरवर्षीप्रमाणे जिल्हा नियोजन समितीमार्फत वर्षभरात करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा तयार करण्यात येऊन त्यास मंजुरी घेऊन आराखडा नियोजन विभागाकडे सादर करण्यात येतो. या शिवाय प्रत्येक विभागात घेण्यात येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये वित्तमंत्र्यांकडे प्रत्येक जिल्ह्याकडून वाढीव निधीची मागणी करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्याकडून प्राप्त प्रस्तावाचा विचार करून राज्य सरकार त्या-त्या जिल्ह्यांच्या मागणीनुसार अतिरिक्त निधी देण्याची तरतूद करण्यात येते, २०११-१२ ते २०१७-१८ या कालावधीत मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षी सर्वाधिक अतिरिक्त निधी देण्यात आला. त्यानंतरच्या वर्षात पुन्हा सरकारने मराठवाड्याच्या वाढीव निधीबाबत हात आखडता घेतला. २०११ ते २०१५ या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यांना केवळ सात ते २१ कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्यात आला होता. या काळात सर्वात कमी २०११-१२ या वर्षी सात कोटी रुपये हिंगोली जिल्ह्याला, तर सर्वाधिक २१ कोटी औरंगाबाद जिल्ह्याला देण्यात आला, मात्र २०१५ ते १७ या कालावधीत जिल्ह्यांनी दिलेल्या मागणी प्रस्तावानंतर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी सरकारने मोठा निधी देत २५ कोटींपासून ७३ कोटींपर्यंतची तरतूद केली. २०१७-१८ या वर्षासाठी जालना, लातूर वगळता इतर जिल्ह्यांना २० कोटींपेक्षा कमी निधीची तरतूद केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावनात्मक फसवेगिरी बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा विकास साधण्यासाठी कुठेही राजकीय अभिनिवेश ठेवता कामा नये. औरंगाबादमधील कचराकोंडी दूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यापुढे भावनात्मक फसवणे बंद करून विकासावर भर दिला पाहिजे, असा टोला भाजप आमदार प्रशांत बंब यांनी लगाविला.

राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काय दिले आहे याची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, राम बुधवंत यांची उपस्थिती होती. आमदार बंब म्हणाले, कचराकोंडीचा प्रश्न आता उद्भवलेला नाही. २० वर्षांपासूनच त्याचे नियोजन केलेले नाही. कचरा निर्मूलनासाठी कायमस्वरुपी उपाययोजना केल्या पाहिजे. भावनात्मक किती दिवस फसवत राहणार, कचराकोंडी दूर होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागेल. पूर्ण कचरा निर्मूलन करण्यासाठी छोटे प्लँट टाकून कार्यान्वित होण्यासाठी आठ ते दहा महिने लागतील. त्यानंतर हा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल. वास्तविक हे नियोजन पूर्वीच होणे आवश्यक होते, असे आमदार बंब म्हणाले.

\B'पिंजळ'च्या माध्यमातून ५० टीएमसी पाणी

\B

राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी पुरेशी तरतूद केल्याचा दावा आमदार बंब यांनी केला. ते म्हणाले, की पर्यटन विकासासाठी तरतूद केली आहे. गोदावरी खोऱ्यात ५० टीएमसी पाणी 'पिंजळ'च्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचा फायदा आपल्याला करून घ्यावा लागेल. सरसकट सर्व शेतकऱ्यांना दोन रुपये किलोने गहू व तीन रुपये किलोने तांदूळ दिला जाणार आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी तरतूद केली आहे. एकूणच यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी बऱ्यापैकी तरतूद केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या सभेवर लग्नतिथीचे सावट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा बुधवारी (१४ मार्च) निश्चित करण्यात आली आहे. अर्थसंकल्प व अन्य विषयांवर होणाऱ्या या सभेदिवशी लग्नतिथी असल्याने सभा पुढे ढकलावी, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व प्रशासनात सोमवारी चर्चा होऊन सभा पुढे ढकलण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १२ मार्च रोजी नियोजित करण्यात आली होती. तीन महिन्याला होणाऱ्या सभेच्या वेळापत्रकानुसार ही सभा होती. मात्र मार्च महिन्यात २७ तारखेपूर्वी अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मुद्दा उपस्थित केला गेला. नियम पाहून तसेच चर्चा करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी १४ मार्च रोजी सभा ठेवण्याचे निश्चित केले. याच सभेत सर्वसाधारण विषय व अर्थसंकल्प असे नियोजन करण्यात आले होते.

दरम्यान, १४ मार्च रोजी लग्नतिथी असल्याने अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी शंका उपस्थित केली. महत्त्वाच्या सभेसाठी उपस्थित राहण्यास अडचणी येऊ शकतील, त्यासाठी १४ ऐवजी सभा पुढे ढकलावी, अशी मागणी खासगीत सदस्यांनी पदाधिकाऱ्यांकडे केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा ठरलेली सभा पुढे लांबवायची असेल, तर त्याला सभा बोलावून पुढे ढकलणे हा पर्याय असतो. दरम्यान अर्थसंकल्प मांडावयाचा असल्याने याच सभेत सर्व चर्चा होणे आवश्यक आहे. तहकूब सभेमध्ये ऐनवेळचे विषय तसेच महत्त्वाचे ठराव मांडता येत नाहीत. मार्चएंड असल्याने अनेक कामांची मंजुरी, प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहेत. मुळातच ही सभा दीर्घ काळ चालणार आहे. त्यामुळे १४ मार्चची सभा पुढे कशी ढकलायची, असा प्रश्न आहे. सोमवारी पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात बैठक होऊन पुढचे नियोजन होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमबीए’ सीईटीला ७७०२ परीक्षार्थी

$
0
0

औरंगाबाद: व्यवस्थापनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी (एमबीए) शनिवार आणि रविवारी ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात आली. औरंगाबाद विभागात सात हजार ७०२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल १९ मार्च रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर १० आणि ११ मार्च रोजी ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात आली. औरंगाबाद विभागात दहा सेंटरवर ही परीक्षा वेगवेगळ्या सत्रात घेण्यात आली. विभागातून परीक्षेला आठ हजार १३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात दोन दिवात सात हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. दोन दिवसात नोंदणी केलेल्यांपैकी ४३५ विद्यार्थी आले नाहीत. यंदा औरंगाबाद विभागातून परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. मागील तीन-चार वर्षात एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे प्रमाण घटले आहे. यंदा सीईटीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रिक्त जागांचा आकडा कमी दिसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव- औरंगाबाद शिवशाही बस झाली सुरू

$
0
0

औरंगाबाद :

औरंगाबाद-जळगाव मार्गावर शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक तासाला शिवशाही बस सुरू झाल्याने प्रवाशांना वातानुकूलित प्रवास होणार आहे. औरंगाबाद विभागाला आतापर्यत १६ शिवशाही बस मिळाल्या आहेत. यात औरंगाबाद-मुंबई, औरंगाबाद-नागपूर, औरंगाबाद-नाशिक तसेच औरंगाबाद-चंद्रपूर अशा मार्गावर या शिवशाही बस सुरू आहेत. या बससेवेला मिळालेल्या प्रतिसादानंतर अन्य मार्गावरही शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद-जळगाव आणि भुसावळ मार्गावरही शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार तीन बस जळगावहून तर तीन बस औरंगाबादहून सोडण्यात आल्या आहेत. जळगावला जाणारी पहिली बस दररोज पहाटे ५.१५ वाजता निघणार आहे. दर तासाला शिवशाही सोडण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा करणाऱ्यांवरच विल्हेवाटीची जबाबदारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात शासनाने २०१६ मध्ये नियम तयार केले आहेत. त्यानुसार, कचरा निर्माण करणाऱ्यावरच त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन स्वत:पासूनच केले पाहिजे,' असे प्रतिपादन कचरा निर्मूलन व स्वच्छता या विषयातील तज्ज्ञ ज्योती म्हापसेकर यांनी सोमवारी केले.

'मंथन' या संस्थेतर्फे स. भु. शिक्षण संस्थेच्या सभागृहात म्हापसेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे आयोजन ज्ञानप्रकाश मोदानी, प्रदीप पुरंदरे यांनी केले होते. यावेळी बोलताना ज्योती म्हापसेकर म्हणाल्या, कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा असे दोनच नाहीत. पाच ते सहा प्रकारचा कचरा आहे. त्यात प्लास्टिक कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, बांधकाम साहित्य (बिल्डिंग वेस्ट), काचेचा कचरा याचा समावेश होतो. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीची सोपी पद्धत आहे. त्यासाठी यंत्राची गरज नाही. हे काम गृहनिर्माण संस्था करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

एकूण लोकसंख्येच्या एक टक्के लोक कचऱ्यावर जगतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. कचऱ्यावर जगणाऱ्यांना आपण स्वच्छ कचरा दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. हे व्याख्यान ऐकण्यासाठी विविधस्तरातील नागरिकांची उपस्थिती होती.

कंपन्यांचीही जबाबदारी

'२०१६ च्या कायद्यानुसार कचरा जाळणे हा गुन्हा आहे, सॅनिटरी नॅपकीन, डायपरची निर्मिती इको फ्रेंडली करा, असे या कायद्यात नमूद केले आहे. त्यासाठी संबंधित कंपन्यांना तीन वर्षांचा अवधी दिला आहे. त्यामुळे आता या कंपन्यांवर जास्तीची जबाबदारी आली आहे,' याकडे ज्योती म्हापसेकर लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर परिसरात बारा एकर जागेचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी प्रधान सचिवांनी दिलेल्या पंचसूत्रीनुसार उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. कचऱ्यावर प्रभागातच प्रक्रिया करण्यासोबतच शहर परिसरात १२ एकर जागेचा शोध सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, शासनाकडून प्रत्येक प्रभागासाठी नियुक्त केलेले अधिकारी उपस्थित होते.

या विषयी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक प्रभागात अंदाजे एक ते दीड एकर जागा लागणार आहे. महापालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागात जागा शोधल्या असून शहर परिसरात १० ते १२ एकर जागेचा शोध घेण्यात येत आहे. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा विचार आहे. सध्या प्रभाग दोन आणि तीन मध्ये जागेची अडचण आहे. इतर प्रभागांमध्ये जागा मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ. भापकर म्हणाले की, बैठकीत गेल्या दोन दिवसांमध्ये केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. शहरातील ९ प्रभाग व रस्त्यांवर असा एकूण तीन हजार टन कचरा आहे. प्रभागातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. येत्या दोन दिवसांत शिल्लक कचऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी प्रक्रिया केली जाईल. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य केले आहे. आता त्यांनी ओला व सुका अशी वर्गवारी करून ओल्या कचऱ्याचे सेंद्रीय खत करण्याचे प्रयत्न करावेत. तसेच शेतकऱ्यांनी शहरातील ओला कचरा घेऊन जावा, त्यांना खतप्रक्रियेची शास्त्रशुद्ध माहिती देण्यात येईल, अशी माहिती डॉ. भापकर यांनी दिली.

हॉटेलचालकांना इशारा

हॉटेलचालकांनी कचरा बाहेर न टाकता त्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावाव. रस्ता, दुभाजक तसेच इतरत्र कचरा टाकल्यास कारवाई करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले. शहरातील चिकनवेस्ट हे अलाना कंपनी उचलणार असून प्लास्टिक कचरा उचलून त्यावर प्रक्रिया करण्यास एस. ए. कंपनीने तयारी दाखवली आहे. या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

मध्यवर्ती शहरात अडचण

शहराच्या मध्यवर्ती भागातील दोन प्रभागामध्ये जागेअभावी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अडचण येत आहेत. शहरातील १५० ते २०० ठिकाणी पत्र्याचे चौकोन करून तेथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस हजारांसाठी तरुणाचे अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'उसने घेतलेले तीस हजार रुपये परत देतो', असे सांगत तरुणाचे अपहरण केल्याची घटना सायंकाळी साडेपाच वाजता पुंडलिकनगर भागात घडली आहे. याप्रकरणी परळीच्या संशयित आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी किसन सखाराम उदावंत (रा. पुंडलीकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. उदावंत यांचा मुलगा सुरेश याने परळीतील पदमराज गुट्टे नावाच्या व्यक्तीला तीस हजार रुपये उधार दिले होते. या पैशासाठी सुरेशने गुट्टे यांच्याकडे तगादा लावला होता. शनिवारी गुट्टे तीन अनोळखी साथीदारासह चारचाकी वाहन घेऊन शहरात आला. पुंडलिकनगर येथील ऋतुजा बारसमोर त्याने सुरेशची भेट घेतली. तीस हजार रुपये देतो असे सांगत त्यांनी सुरेशला कारमध्ये बळजबरी बसवत सोबत नेले. दोन दिवसानंतरही सुरेश घरी आला नसल्याने किसन उदावंत यांनी रविवारी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून संशयित आरोपी पदमराज गुट्टे यांच्यासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जमादार दिनेश बन तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचऱ्यापासून वीजनिर्मिती; प्रस्ताव मागवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचे महापालिकेने ठरविले असून, प्रकल्प उभारणीकरिता कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. येत्या सोमवारपर्यंत (१९ मार्च) प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याने महापालिकेने ७ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कोरियाच्या च्युसन रिफरेकर्स इंजिनीअरिंग कंपनीने प्रस्ताव दिला होता. त्याआधारे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. पण, केवळ एकाच कंपनीचा विचार करण्यापेक्षा विविध कंपन्यांचे प्रस्ताव मागवण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने सोमवारी वीजनिर्मितीच्या क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत.

चौदा महिन्यांची मुदत

'डीबुट' तत्वावर (डिझाईन बिल्ट ओन ऑपरेटर ट्रान्सपोर्ट) प्रकल्प उभारू इच्छिणाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावेत. तीस वर्षांचा विचार करून वीजनिर्मिती प्रकल्पाचे नियोजन असावे, सुरुवातीला ४५० मेट्रिक टनाचा वीजनिर्मिती प्रकल्प असावा, प्रकल्प उभारण्यासाठी १४ महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे.

नऊ यंत्र खरेदीचा प्रस्ताव

राज्याच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत झालेल्या शुक्रवारी बैठकीत राज्य शासनाच्या जेएम पोर्टलद्वारे निविदा न काढता कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र खरेदीची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार, शहरातील नऊ प्रभागात नऊ यंत्र खरेदी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून महापालिकेने नगरविकास खात्याकडे परवानगी मागणारे पत्र सोमवारी पाठवण्यात आले. त्यावर मंगळवारी सायंकाळपर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर यंत्र खरेदीची ऑर्डर दिली जाणार आहे. एका यंत्राची क्षमता पाच टनाची असणार आहे.

ठाणे आणि मुंबईमध्ये काही कंपन्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे प्रकल्प यशस्वीपणे चालवले आहेत. त्याच धर्तीवर औरंगाबादेतील प्रकल्प असावा.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०० कोटींवर टांगती तलवार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्ते विकासासाठी मंजूर केलेल्या १०० कोटींच्या निधीवर पुन्हा एकदा टांगती तलवार आहे. केवळ आमदारांनी विनंती केल्यामुळे हे अनुदान शासनदरबारी परत जाता जाता वाचले. आता नगरविकास खात्याने मार्च अखेरपर्यंत वाट पाहण्याची तयारी दाखवली असून, या कामांचे टेंडर निश्चित करून वर्कऑर्डर देण्यासाठी महापालिकेकडे फक्त १९ दिवस शिल्लक आहेत.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटींचे विशेष अनुदान मंजूर केले. जून २०१७ मध्ये अनुदान मंजुरीचे पत्र पालिकेला मिळाले. तेव्हापासून आतापर्यंत महापालिकेला रस्त्यांची कामे सुरू करता आली नाहीत. रस्त्यांच्या कामांचे टेंडर मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे, पण त्यावरही निर्णय झालेला नाही. महापालिकेने हे अनुदान मार्च अखेरपर्यंत खर्च केले नाही किंवा मार्च अखेर पर्यंत कंत्राटदाराला वर्कऑर्डर दिली नाही, तर शासनातर्फे रद्द केले जाऊ शकते. त्यानुसार राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने तयारी देखील सुरू केली आहे. रस्त्यांची कामे सुरू न झाल्यामुळे व कंत्राटदाराला वर्कऑर्डर न दिल्यामुळे शंभर कोटी परत का घेण्यात येऊ नयेत, असे पत्र महापालिकेच्या नावे पाठवण्याची तयारी नगरविकास खात्याने काही दिवसांपूर्वी केली होती, परंतु याची माहिती आमदार अतुल सावे यांना कळाली व त्यांनी धावपळ करून नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसे पत्र पालिकेच्या नावे पाठवू नका, टेंडर प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असे सांगितले. त्यामुळे निधी परत घेण्याबद्दलचे पत्र नगरविकास खात्याने अद्याप पाठवले नाही. आता ३१ मार्च पर्यंत रस्त्यांची कामे मार्गी लागली नाही, तर शंभर कोटींचा निधी शासन परत घेणार आहे.

...तर निधी जाणार

याबाबत आमदार अतुल सावे म्हणाले, 'महापालिकेने रस्त्यांची कामे सुरू न केल्यामुळे शंभर कोटींचे अनुदान रद्द करण्याबद्दलचे पत्र देण्याची तयारी नगरविकास खात्याने केली होती. मी विनंती करून ते पत्र थांबवले आहे. परंतु ३१ मार्च पर्यंत रस्त्यांच्या कामाची वर्कऑर्डर महापालिकेने कंत्राटदारांना दिली नाही, तर शंभर कोटींचे अनुदान निश्चितपणे रद्द होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक बलात्कार; आरोपीच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्तीसगड येथील तरुणीला नोकरीच्या आमिषाने शहरात आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील महिला आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये १९ मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

बिलासपूर येथील २० वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून शहरात आणून १७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत तिला डांबून सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिने गुरुवारी पळ काढला, तिचा पाठलाग करताना आरोपी विलास हुमणे (रा. गारखेडा) याला नागरिकांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी आरोपी विलास हुमणे याची आधी पोलिस कोठडीमध्ये व नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अनिता उर्फ अन्नू रमेश बनसोडे (२८, रा. पुंडलिकनगर) हिला ७ मार्च रोजी अटक करून २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला कोर्टात हजर केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचा पाणीपुरवठा बंद करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून औरंगाबाद, जालना आणि पैठण शहरासाठी उचललेल्या पाण्याची लाखो रुपयांची थकबाकी आहे. औरंगाबाद शहराची तब्बल साडेआठ कोटी रूपये थकबाकी असल्यामुळे भरणा न केल्यास टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद करण्यात येईल अशी नोटीस पाटबंधारे कार्यालयाने बजावली आहे.

जायकवाडी पाटबंधारे कार्यालयाने थकीत पाणीपट्टी वसुलीबाबत वारंवार पत्रव्यवहार करुन तसेच प्रत्यक्ष भेटूनही औरंगाबाद महापालिका, जालना नगरपालिका आणि पैठण नगर परिषद यांनी पाण्याची थकबाकी फेब्रुवारी अखेपर्यंत औरंगाबाद महापालिकेकडे साडेआठ कोटी रुपये, जालना एक कोटी ७१ लाख रुपये आणि पैठण नगर परिषदेकडे ७३ लाख रुपये थकबाकी आहे. पाणीपट्टी वसुलीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आणि शासनाकडून वारंवार विचारणा होत असल्याने थकबाकी तत्काळ भरावी. अन्यथा, बिगर सिंचन योजनेचा जायकवाडी जलाशयातून सुरू असलेला पाणीपुरवठा महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ९७ (१) व कलम ४५ (ज) अन्वये टप्प्याटप्प्याने बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असे पाटबंधारे कार्यालयाने पाठवलेल्या नोटीशीत म्हटले आहे. येत्या १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दोन तास पाणी उपसा बंद करण्यात येणार आहे. २० मार्चला चार तास, २१ मार्च रोजी सहा तास, २२ मार्च रोजी आठ तास आणि २३ मार्च रोजी पूर्णपणे पाणी उपसा बंद करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. औरंगाबाद मनपा, जालना नगरपालिका आणि पैठण नगरपरिषदेने पाणीपट्टी न भरल्यामुळे होणारा पाणी पुरवठा नियमानुसार बंद केल्यास शहरातील नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीस संबंधित मनपा, नगरपरिषद जबाबदार राहील असे विभागाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस्ट्रोच्या दोषींवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी परिसरात दुषित पाण्यामुळे नोव्हेंबर महिन्यात गॅस्ट्रोचा उद्रेक होऊन तब्बल १२ ते १५ हजार नागरिकांना जबर फटका बसला. या प्रकरणी दोषींवर सात दिवसांच्या आत कारवाई करा, असे स्पष्ट आदेश परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांनी मुख्य कार्य अधिकारी विजयकुमार नायर यांना छावणी परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत दिले. त्याचवेळी नऊ सदस्यांची समिती नेमून छावणीतील नोंदणी नसलेले खासगी हॉस्पिटल-क्लिनिकसह सर्व प्रकारच्या अनधिकृत प्रकारांबाबत दोन ते तीन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

या बैठकीला ब्रिगेडिअर पात्रा यांच्यासह कर्नल शर्मा, कर्नल दीपकुमार राणा, कर्नल लांबा, मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, उपाध्यक्ष संजय गारोल, नगरसेवक किशोर कच्छवाह, नगरसेवक प्रशांत तारगे, नगरसेवक रफत बेग, नगरसेवक शेख हनीफ, नगरसेविका प्रतिभासिंग काकस आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी गॅस्ट्रो उद्रेकाला दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कुठल्याही परिस्थितीत कारवाई करा, असे सुस्पष्ट आदेश अध्यक्षांनी दिले. त्याचवेळी छावणीतील अनधिकृत हॉस्पिटल-क्लिनिकविरुद्ध यापूर्वी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, उपाध्यक्षांसह सात निवडून आलेले सदस्य व दोन नियुक्त सदस्य अशा नऊ सदस्यांची समिती नेमून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. छावणी परिसरातील गैरप्रकारांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. जेनेरिक औषधांचे दुकान सुरू करण्याची परवानगी परिषदेकडे मागण्यात आली असून, याबाबत नेमकी गरज लक्षात घेऊन समितीने मत मांडावे, असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

बैठकीत शाळांसमोर स्पीडब्रेकर तयार करण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली असता, संबंधित शासकीय विभागांची परवानगी घेण्याचे आदेशही देण्यात आले. छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी रुग्णांवर उपचार न करता थेट घाटीत पाठवले जाते, असा आरोप नगरसेवक रफत बेग यांनी केला. त्यावर रुग्णालयाचा तीन महिन्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही अध्यक्षांनी दिले.

उपाध्यक्षांचा राजीनामा

याच बैठकीत परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. यापुढील काळात नगरसेवक प्रशांत तारगे हे परिषदेचे उपाध्यक्ष होतील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपल्या उपाध्यक्षपदाच्या काळात सीईओंनी छावणीच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच एकूणच विकासाच्या दृष्टीकोनातून साथ दिली नाही, असा आरोप केला. यापुढे तरी त्यांनी विकासासाठी साथ द्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली.

आतातरी होणार का कारवाई?

परिषदेच्या २४ नोव्हेंबरच्या बैठकीत तत्कालिन अध्यक्ष अनुराग विज यांनी समिती नेमून गॅस्ट्रो प्रकरणाची चौकशी करण्याचे व अहवाल बैठकीत सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र ही चौकशी किरीतरी दिवस रखडली आणि त्यानंतर तब्बल तीन महिने लोटले तरी अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आतातरी कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्णाकडून महिला डॉक्टरला मारहाण

$
0
0

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (घाटी) सोमवारी रात्री ११ वाजेदरम्यान एका मनोरुग्णाने महिला निवासी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. मनोरुग्ण असल्याने तसेच रुग्णाच्या कुटुंबियांनी माफीनामा लिहून दिल्याने हे प्रकरण सामोपचाराने मिटले. दारुच्या व्यसनाने स्वादूपिंडाचा आजार जडलेल्या एका रुग्णाला सर्जरी वॉर्डात उपचार सुरू होते. त्याला सलाईन लावताना तो जोरजोराने हातपाय आपटत होता. त्याला समजाविण्यास गेलेल्या महिला निवासी डॉक्टरला त्याने थापड मारली. यामुळे गोंधळ उडाला. मात्र, सदर रुग्ण मनोरुग्ण असल्याने तसेच कुटुंबियांनी माफीनामा लिहून दिल्याने सदर प्रकरण मिटविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौर संच बसवून मन:स्ताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सौर उर्जेवर वीजनिर्मिती संच बसवल्यानंतर महावितरणकडे संपर्क करून रितसर 'नेट मिटर' बसवल्यानंतरही महावितरणने एका ग्राहकाला सरासरी वीज वापराचे तब्बल एक लाख ६१ हजार रुपयांचे बिल दिले आहे. त्याबद्दल दाद मिळत नसल्याने वीज ग्राहक गाऱ्हाणे मंचात प्रकरण दाखल करण्यात आले. मंचाने हे बिल रद्द करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.

विश्वभारती कॉलनीतील रहिवासी डॉ. ज्योती दीपक गयाळ यांनी स्वतःच्या घरावर पाच केडब्लू क्षमतेची सौर यंत्रणा बसवली आहे. त्यासाठी महावितरणची मान्याता घेऊन 'नेट मिटर' खरेदी केले. त्याची चाचणी महावितरणच्या संबंधित विभागाकडून करून घेण्यात आली. सौर उर्जा संच बसवल्याने वीजबिल कमी होईल, या अपेक्षेला तडा गेला. महावितरणने त्यांना मे २०१७ ते ऑगस्ट २०१७ या चार महिन्यांचे सरासरी वीज वापर दाखलवत ९०७१ युनिटचे एक लाख ६१ हजार ५३० रुपयांचे बिल हातात ठेवले. त्यात 'नेट मिटर'चा उल्लेखही नव्हता. डॉ. गयाळ यांनी महावितरणकडे अनेक वेळा तक्रार करून बिल दुरुस्त करून मागितले. पण, त्यांची दखल न घेता थकबाकी दाखवून नोटीस न देता वीजपुरवठा तोडला. चूक बिलाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा जोडण्यात आला.

डॉ. गयाळ यांनी ग्राहक प्रतिनिधी हेमंत कापडिया यांच्या मार्फत महावितरणच्या वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचात तक्रार दाखल केली. येथे बाजू मांडताना कापडिया यांनी, सौर वीजनिर्मितीची मोजणी न करता, तसेच जुन्या मीटरनुसार आकारलेले बिल चूक असल्याचे मंचाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तक्रारीपूर्वी भरलेली रक्कम बिलात वळती न करता धनादेशाद्वारे परत करण्याची विनंती केली.

पाच हजारांची नुकसान भरपाई

मंचाने दोन्ही बाजूकडून दाखल कागदपत्रे व बाजून ऐकून ते वीजबिल रद्द केले. या वीज ग्राहकाने भरलेली अतिरिक्त रक्कम एक लाख ३५ हजार ३३० रुपये व्याजासह धनादेशाद्वारे परत करण्याचे आदेश दिले. शिवाय मिटरची योग्य नोंद न घेता चूक बिल आकारणी, नोटीस न देता वीज पुरवठा तोडल्याबदद्ल पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिला. याशिवाय सौर नेट मीटर ग्राहकाने खरेदी केलेले असल्याने त्याची रक्कम परत करण्याचे आदेश दिले. हा आदेश मंचाचे अध्यक्ष शोभा वर्मा, सचिव काकडे व सदस्य विलास काबरा यांच्या समितीने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवना येथे विहिरीतून मौल्यावान दगड जप्त

$
0
0

सिल्लोड: शिवना येथे विहीर खोदकाम करताना सापडलेले मौल्यवान चमकदार दगड हस्तगत करण्यात तहसील कार्यालयाच्या चौकशी पथकाला मंगळवारी यश आले. या पथकाने दगड जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले आहेत. कौसाबाई एकनाथ काळे यांच्या शेतात विहीर खोदकाम करताना मौल्यवान दगड सापडल्याची माहिती पसरली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी एम. जी काझी व डी. जे. जरारे यांनी केलेल्या पंचनाम्यात दगड आढळले नसल्याचे म्हटले होते. मात्र, तहसीलदार सौरभ कटारिया यांनी स्थापन केलेल्या सहा जणांच्या चौकशी पथकाने मंगळवारी जाऊन पाहणी करून दगड जप्त केले. संबंधित शेतकऱ्यास खोदकाम करू नये, खोदकामातील गौण खनिज विक्री न करण्याची नोटीस दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा, याचिका फेटाळली

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. के. सोनवणे यांनी निकाली काढली.

सचिन रतन शिंदे व इतरांनी ही याचिका दाखल केली होती. स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखालील समितीत विद्यापीठाचे रजिस्टार, कार्यकारी अभियंता व इतर सदस्यांचा समावेश आहे. या समितीने दोन मे २०१७ रोजीच्या राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे पुतळा उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरात पुतळा उभारण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पुतळा उभारण्यासाठी पूर्व परवानगी मिळावी म्हणून अर्जही देण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचिकाकर्ते हे विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी खंडपीठाच्या आदेशानुसार जमा केलेले एक लाख रुपये त्यांना विनाशर्त परत करण्याचेही आदेशात म्हटले आहे. सरकारची बाजू एस. बी. यावलकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑरिक’ची कामे सुसाट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑरिक अर्थात स्मार्ट इंडस्ट्रिअल सिटीच्या पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असून अंतर्गत रस्ते, पाणी, रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. मुख्य रस्त्याचे डांबरीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षात 'ऑरिक'मध्ये ५० किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले. इलेक्ट्रिकल केबल खंदक, रेल्वे उड्डाणपूल, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, पाणी पुनर्वापर प्रकल्पाची कामे सुरू आहेत. जालना रस्त्याशी ऑरिकला थेट जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे कामही वेगाने सुरू असून आता केवळ आठवड्यातून अर्धा दिवस ते बंद ठेवले जात आहे. डिसेंबर २०१८ची डेडलाइन पाळता यावी यासाठी या कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. हा पुल खुला झाल्यावर ऑरिकला शेंद्रा एमआयडीसीसह थेट औरंगाबाद - जालना महामार्गाशी जोडले जाणार आहे. सेक्चर पाच आणि ह्योसंगच्या भूखंडाला जोडणारे रस्ते यात प्राधान्याने तयार केले जाणार आहेत. जुन्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडून सध्या ऑरिकमध्ये येणाऱ्या वाहनांचा राबता आहे. सध्या हा रस्ता कच्चा असून त्याच्या डांबरी करणाचे काम 'एआयटीएल'ने काम सुरू केले आहे. 'ऑरिक'चे प्रशासन चालवण्यासाठी उभारण्यात येणारी इमारत अर्थात ऑरिक हॉलचे काम एप्रिल-मे २०१९पर्यंत पूर्ण होईल. या इमारतीच्या पाच मजल्यांचे स्लॅब वेळेत पूर्ण झाले आहेत. डिसेंबर २०१८ पर्यंत बांधकाम पूर्ण करून इंटिरियरचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात येईल. आगामी एप्रिल किंवा मे २०१९मध्ये ऑरिक हॉलमधून या औद्योगिक वसाहतीचा कारभार चालवला जाण्याची शक्यता आहे.

---

\Bपाण्याचे टाक्यांचे काम सुरू; ४१ हजार लिटरची क्षमता

---

\Bपॅकेज एक अंतर्गतच्या कामात पिण्याच्या पाण्यासाठी १९ हजार ८०० लिटरची क्षमतेच्या भूमिगत टाक्या बांधल्या जाणार आहेत. जमिनीवर २१ हजार लिटर क्षमतेच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. या दोन्ही कामांच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून, सध्या कॉलम बांधणे सुरू आहे. यातून सुमारे ६१ किलोमीटर पर्यंतच्या ऑरिक सिटीची पाण्याची गरज पूर्ण होणार आहे. पाण्याच्या पुनर्वापराचे ४८ पैकी १६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. शेंद्रा वसाहतीला जालना रस्त्याशी जोडणाऱ्या दुसऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील ३६ पैकी ३२ पिलर्सचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय १० पिलर्स कॅपही बसवण्यात आले आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनसाठी ऑल पॅनलचे कामही पूर्णत्वाकडे गेले आहे. रेल्वेच्या छोट्या पुलाचे कामही ए-१ रोडवर सुरू झाले आहे. दुसरा रेल्वे उड्डाणपुलही प्रगतीपथावर आहे. यात १८ पैकी १३ पिलर्सचे काम पूर्ण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुराने दमा चौपट वाढणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात जागोजागी कचरा साचलेला असतानाच मागच्या आठ-दहा दिवसांपासून सर्रास कचरा जाळण्यात येत आहे. परिणामी, जवळजवळ प्रत्येक कॉलनी-सोसायट्यांमध्ये, वस्त्यांमध्ये धुरच धूर दिसून येत आहे आणि त्यामुळेच येत्या काही दिवसांत दमा असणाऱ्यांचा तसेच लहान मुले व वृद्धांचा त्रास दुपटीने-चौपटीने वाढणार असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कचरा जाळणे तातडीने थांबवा, असे कळकळीचे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे.

शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न अतिगंभीर बनलेला असतानाच जागोजागी साचलेला कचरा दिसून येत आहे. कुठे जास्त, तर कुठे कमी एवढाच काय तो फरक उरला आहे. त्यातही मागच्या आठ दिवसांपासून कचरा वाट्टेल त्या पद्धतीने व वाट्टेल तिथे जाळला जात आहे. जागोजागी साचलेला व जळणारा कचरा, हे आता शहरवासियांसाठी काही नवीन चित्र राहिलेले नाही. त्याचवेळी कचरा जळताना निघणारा धूर हा कचरा जळणे थांबले तरी कितीतरी तास निघतच राहतो. सद्यस्थितीत शहराच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात धुरच धूर दिसून येत आहे. अनेक कॉलन्यांमध्ये, वस्त्यांमध्ये चक्क दिवस-रात्र जळणारा कचरा व धूर दिसून येत आहे. ही स्थिती अशीच सुरू राहिली, तर येत्या काही दिवसांत दम्याच्या रुग्णांमध्ये उल्लेखनीय वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच दमा असणाऱ्या रुग्णांचा त्रासही दुपटी-चौपटीने वाढू शकतो. अनेकांना दम्याचा अटॅकही येऊ शकतो, असा इशारा श्वसनविकार, छातीविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पापीनवार म्हणाले. आजच्या घडीला धुरामुळे रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली, असे फारसे चित्र नसले तरी नजिकच्या काळात ही संख्या नक्कीच दुपटीने वाढू शकते, अशी भीती ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बर्दापूरकर यांनी व्यक्त केली. सद्यस्थितीत कचऱ्यामुळे व कचऱ्याच्या धुरामुळे प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे, यात काही शंका नाही. कचऱ्याच्या केवळ वासामुळे किंवा दुर्गंधीमुळेही दमा असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो किंवा वाढू शकतो. कचऱ्याच्या सततच्या धुरामुळे भविष्यात 'सीओपीडी' हा दम्याचा गंभीर आजारही होऊ शकतो. कमालीच्या प्रदुषणामुळेच दिल्लीमध्ये मुलांमधील दम्याचे प्रमाण २५ टक्क्यांवर गेले होते व शाळा बंद ठेवण्याची वेळ आली होती, असेही डॉ. बर्दापूरकर म्हणाले.

अतिघातक घटक

कचऱ्याच्या धुरामध्येही बिडी-सिगारेटप्रमाणेच घातक व विषारी घटक असतात. कचऱ्याच्या धुरामध्येही कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड असे अनेक विषारी घटक असतात. त्यामुळे नागरिकांनी कचरा जाळणे तातडीने बंद करावे, असे आवाहनही डॉ. बर्दापूरकर यांनी यानिमित्ताने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ काढा ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्व चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी. पेन्शन आणि पीएफ काढण्याची सर्व कामे आता ऑनलाइन झाल्याने तुम्हाला भविष्य निर्वाह कार्यालयात जाण्याची आवश्कता नाही. केवळ डेथ क्लेमसंदर्भाचे अर्जच आता पीएफ कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार आहेत.

मराठवाड्यातील सुमारे १८ लाख ६२ हजारांपेक्षा जास्त कामगार सध्या पीएफच्या कक्षेत आहेत. पेन्शर्सची संख्याही हजारोंच्या घरात आहे. पेन्शन, पीएफसंदर्भातील कामकाजानिमित्त येथील क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांची नेहमीच गर्दी होते. त्यामुळे या पेन्शर्न्स आणि पीएफ धारकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी भविष्य निर्वाह निधी विभागाने नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यामातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. उमंग मोबाइल अॅप त्याचाच एक भाग असून, याद्वारे पीफधारक क्लेम (दावा) दाखल करू शकतात. तसेच पासबूक बघणे, पीएफ काढणे, ट्रान्सफर करणे, बॅलेन्स तपासणी, दाव्यांची पडताळणी करणे यासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

पीएफ विभागाने आता देशभरातील १२३ क्षेत्रीय कार्यालये केंद्रीय सर्व्हरला जोडली आहेत. त्यामुळे आता पीएफ किंवा पेन्शन संबधीची सर्व कामे ऑनलाइन झाली आहेत. काम अधिक गतिमान झाले असून पीएफ, पेन्शन संबधीचे अर्जही ऑनलाइन पद्धतीनेच दाखल करता येणे शक्य झाले आहे. याचा कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा.

- एच. एम. वारसी, आयुक्त, भविष्य निर्वाह निधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images