Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अभ्यासक्रम बदलासह शिक्षकांना प्रशिक्षणही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शैक्षणिक वर्ष २०१८-१९पासून दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहेत. कृतीयुक्त, उपयोजनात्मक असा हा अभ्यासक्रम असणार आहे. एप्रिलमध्येच विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, शिक्षकांच्या प्रशिक्षणाची प्रक्रियाही सुरूच आहे.

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मागील वर्षी नववीचा अभ्यासक्रम बदलला, परंतु पुस्तके उशिरा आली. तर, यंदा एप्रिलमध्येच पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नवीन अभ्यासक्रम आल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. अनेकदा प्रशिक्षण जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येत होते. तसेच माध्यमनिहाय प्रशिक्षण वेगवेगळे घेतले जाते. यंदा शिक्षकांच्या प्रशिक्षणाचेही एप्रिलमध्येच नियोजन करण्यात आले आहे. त्यासह मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांची प्रशिक्षणे एकत्रच होणार आहेत. मराठी व इंग्रजी माध्यमांची आठ राज्यस्तरीय केंद्र असणार आहेत. उर्दू माध्यमाकरीता दोन राज्यस्तरीय केंद्रे. औरंगाबादमध्ये जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्थेत प्रशिक्षण होणार आहे. ५ ते १७ एप्रिल दरम्यान विषयनिहाय प्रक्रिया होणार आहे. शिक्षकांना प्रारंभी विभागीय. त्यानंतर जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये विद्या प्राधिकरण, बालभारती, शिक्षण संचालनालय, उपसंचालक कार्यालयाचा सहभाग आहे. त्यासाठी समन्वयकांची निवडही करण्यात येणार आहे.

कृतीयुक्त, उपयोजनात्मक

अभ्यासक्रमात आता घोकमपट्टीपेक्षा कृतीयुक्त, उपयोजनात्मकता आणण्यात आली आहे. बदल होत असलेल्या अभ्यासक्रमातील नवनवीन घटक समोर येत आहेत. नववीच्या अभ्यासक्रमबदलाच्या वेळी लक्षात आलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न ही केला जात आहे. औरंगाबाद विभागातून दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखाच्या घरात असते. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेत एप्रिलमध्ये पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचऱ्यापासून गॅस; एक वर्षांत प्रकल्प

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) शासनाने मंजूर केला आहे. या अहवालानुसार २२ कोटी रुपये खर्च करून कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी एक वर्षाचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या डीपीआरनुसार घनकचरा व्यवस्थापनाचे तीन टप्प्यात काम केले जाणार आहे. प्रत्येक टप्प्याचा कालावधी व त्यासाठी लागणारा खर्च याची आखणी देखील शासनाने डीपीआरच्या माध्यमातून करून दिली आहे. डीपीआरच्या माध्यमातून आखून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमामुळे निर्धारित वेळेत कचऱ्याची समस्या सुटेल, असे मानले जात आहे. डीपीआरनुसार काम करण्याचा पहिला टप्पा पंधरा दिवसांच्या मुदतीचा आहे. याकाळात अल्प मुदतीत स्क्रिनिंग मशीन खरेदी करणे, वाहतूक आणि अन्य अत्यावश्यक बाबींची पूर्तता, रोजचा कचरा रोज नष्ट करणे हे काम ठरवण्यात आले आहे. यासाठी तीन कोटी ३९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

दुसरा टप्पा दोन महिने कालावधीचा आहे. दोन महिन्याच्या कालावधीत शेर्डिंग मशीन, बेलिंग मशीन खरेदी, जागोजागी कंपोस्ट पिट बांधणे, शेड उभारणी व अन्य पायाभूत सुविधा महापालिकाला निर्माण करावी लागतील. या कामांसाठी १२ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्याचा कालावधी एक वर्षाचा म्हणजे ३१ मार्च २०१९ पर्यंत देण्यात आला आहे. या काळात कचऱ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करायची आहे. एक वर्षाच्या काळात ३०० टन क्षमतेचा गॅस निर्मिती प्रकल्प उभारावा लागणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी २२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नारेगाव-मांडकी येथे साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कचराडेपोवरील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून तेथे हिरवळ विकसित करणे हे प्रमुख काम पालिकेला करावे लागणार आहे. या कामासाठी ३१ मार्च २०१९ ही मुदत देण्यात आली आहे.


वाहन खरेदीसाठी १० कोटी २२ लाख
कचरा संकलनासाठी वाहन खरेदी करण्यासाठी डीपीआरनुसार दहा कोटी २२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या तरतूदीमधून १३२ टिप्पर्स, ९ कॉम्पॅक्टर्स, २३० हातगाड्या खरेदी केल्या जाणार आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

इतर शासकीय कर्मचाऱ्यापेक्षा एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची आहे. सतत तणावात काम करावे लागत असल्याने कन्नड आगारातील ११२ कर्मचाऱ्यांनी शासनाकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल, विरोधी पक्ष नेत्यांना पाठवले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, तुटपुंजे वेतन, मानसिक तणावामुळे काही एस. टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार मनात डोकावतो, पण कायद्याने आत्महत्या करणे गुन्हा असल्याने ते आत्महत्या करू शकत नाहीत. मागण्यासाठी वारंवार निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने इच्छा मरणाची परवानगी मागत असल्याचे त्यात नमूद केले आहे. एस. टी. महामंडळाचे राज्य शासन कार्यालयात विलीनकरण करून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर वाहतूक निरीक्षक संतोष बैरागी, वाहक व्ही. एस. आदमाने, संदीप बोर्डे, पी. व्ही. गायके, चालक पी. आर. शिंदे, व्ही. एस. जाधव, ए. एस. गायकवाड आदींसह कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयपूरात २१५ हेक्टरवर उद्योगनगरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा औद्योगिक क्षेत्राजवळ डोंगराळ परिसर जयपूर येथे सुमारे २१५ हेक्टरवर नवीन औद्योगिकनगरी उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. समृद्धी महामार्गालगत आणि शेंद्रा एमआयडीसी जवळ हे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र आहे. ग्रामस्थांसह एका व्यक्तीच्या मालकीची सुमारे ५० एकरांहून अधिक शेतजमिन या प्रकल्पासाठी संपादित होईल.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने नुकतीच पूर्व अधिसूचना जारी करत जयपूर हे औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या क्षेत्रासाठी जयपूर परिसरातील कोण कोणते गट नंबर येणार आहेत, यांची सूची जाहीर करण्यात आली असून, जिल्हा प्रशासनामार्फत त्यासंदर्भातील माहितीपत्रक जयपूर ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले. आधी चर्चा होती, पण पत्रक लावल्यानंतर खात्री झाल्याचे बाजार समितीचे संचालक नारायण मते यांनी सांगितले.

बहुतेक भाग हा टेकडा परिसराचा असून, ग्रामस्थांसह एकाच व्यक्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या पाच ते सहा वर्षांत खरेदी व्यवहार झाल्याचेही त्यांनी सांगितले.

असे आहे क्षेत्र

एकूण २१५.८० हेक्टर औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित आहे. हे क्षेत्र शेंद्रा एमआयडीसी आणि डीएमआयसी प्रकल्प जवळ असून, उत्तरेस प्रस्तावित नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे. शेंद्रा एमआयडीसीमुळ‌े रस्ता, पाणी, वीज यासह अन्य पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध होणे शक्य असल्याने जयपूर येथे औद्योगिक क्षेत्र उभारणे सोईचे जाईल, असा दावा एमआयडीसीमार्फत केला जात आहे. दरम्यान, या परिसराचा तांत्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आला असून, उंच टेकड्या वगळून आवश्यक ती जागा औद्योगिक क्षेत्रासाठी निवड होईल, काही ठिकाणी आवश्यतेनुसार कटिंग केली जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. एस. कुलकर्णी यांनी दिली.

या परिसरात गुंतवणूक म्हणून स्थानिकांकडून जमिनी खरेदी केल्या आहेत. प्रकल्प उभारण्याबाबत असे काही ठरविले नव्हते केवळ गुंतवणूक म्हणूनच जमिन खरेदीचे व्यवहार केले आहेत. याठिकाणी औद्योगिक क्षेत्र उभारण्यासंदर्भात शेतकरीच भाष्य अधिक करु शकतील.

- मनीष गांधी, जमिनधारक, जयपूर

मौजे जयपूर येथील जाहीर क्षेत्रातील जमीन भूसंपादन केले जाईल. त्यासाठी प्रथम मोजणीचे काम लवकरच सुरू होईल. त्यानंतर मूल्याकंन प्रक्रिया सुरू होऊन पुढे भूसंपादनची कार्यवाही होईल.

- शशीकांत हदगल, उपविभागीय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ भूखंडधारकांना एमआयडीसीची नोटीस

0
0

औरंगाबाद: परतूर औद्योगिक वसाहतीत भूखंड घेतल्यावर ते विकसित न करणाऱ्या आठ भूखंडधारकांच्या जागा परत घेण्यासाठी एमआयडीसीने नोटीस बजवली आहे. बुधवारी बोलविलेल्या बैठकीत परतूर एमआयडीसीतील भूखंडधारकांच्या समस्याही जाणून घेण्यात आल्याची माहिती विभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी दिली.

परतूर औद्योगिक वसाहतीत ४२ भूखंड आहेत. त्यातील अवघ्या १३ भूखंडधारकांनी आपल्या कारखान्यांचे नकाशे एमआयडीसीकडून मंजूर करून घेतले आहेत. पण त्यातील अनेकांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली नाही. भूखंड ताब्यात घेऊन चार वर्षे उलटली असली तरी त्या ठिकाणी साधी वीटही अनेक भूखंडधारकांनी लावलेली नाही. या सगळ्या भूखंडधारकांची बैठक औरंगाबादेतील विभागीय अधिकारी कार्यालयात सोहम वायाळ यांनी बोलवली होती. या बैठकीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यावर औरंगाबादेतून भूखंडांवर बांधकाम करण्याची मुदत संपलेल्या आठ जणांना भूखंड परत घेण्याबाबात नोटीस देण्यात आल्या. ज्यांचा कालावधी कमी राहिला आहे अशा भूखंडधारकांनाही काम सुरू करण्यासाठीची नोटीस देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याच्या निविदा पुन्हा काढण्याची मागणी

0
0

औरंगाबाद : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा डीएसआर दर सुमारे १५ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांच्या निविदा पुन्हा काढा. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान टळेल, अशी मागणी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, डीएसआर कमी झाल्यामुळे किरकोळ कामाच्या फाइल परत पाठवल्या जात आहेत. असे असताना रस्त्यांच्या कामांनाही हाच निकष लावण्यात यावा. दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा पुन्हा काढण्यात याव्यात, त्यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान टळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी येईना; कार्यकर्त्याचा आरोप

0
0

औरंगाबाद: घंटागाडी बंद असल्याने वॉर्ड क्रमांक ८० सिडको एन ३, ४ मध्ये कचराकोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप येथील नागरिक राहुल इंगळे यांनी केला. गेल्या २० दिवसापासून वॉर्डातील सूर्या पार्कसह इतर परिसरात घंटागाडी आली नाही. परिणामी कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. सर्वांनाच घरात कॉम्पोस्टिंग करता येणे शक्य नाही. त्यामुळे परिसरातील मोकळ्या जागेत कचरा टाकला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असून याकडे लक्ष दिल जावे, अशी मागणी त्यांनी केली. एन ३ परिसरात पार्क केलेल्या ट्रकमागे बुधवारी रात्री काही लोक कचरा टाकत होते. तेथे स्वच्छता मोहीम घेत जनजागृती केली, परिसरातही जनजागृतीवर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांस सुनावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडीतून मार्ग काढण्यासाठी प्लास्टिक बंदीचा पर्याय कठोरपणे अंमलात आणण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत व्यापारी आणि अधिकारी यांच्यात खडाजंगी झाली. 'आता आमचा संयम सुटला आहे. सरसकट प्लास्टिक बंदीचा विचार करू नका, आमच्याकडे असलेल्या स्टॉकचे काय करायचे,' अशी विचारणा व्यापाऱ्यांनी केली. पण, त्यांना इशारा देताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, तुम्हाला संयम ठेवावाच लागेल. आम्हाला खूप अधिकार आहेत, असे सुनावले. वाद नको म्हणून ही बैठक बोलावल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

घनकचरा व्यवस्थापनात प्लास्टिक ही मोठी समस्या असून शासनाच्या निर्णयानुसार प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य सभागृहात व्यापारी, अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलिस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्यासह पालिका पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी व्यापाऱ्यांनी सरसकट प्लास्टिक बंदीला आक्षेप घेतला. आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, पण प्लास्टिक बंदीचा विचार करू नका, आमच्याकडील स्टॉकचे काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कायद्याचा आधार घेवून दहशत निर्माण करणे अयोग्य असल्याचे मत काहीजणांनी व्यक्त केले. कचराकोंडीमुळे आमचा संयम सुटला आहे, नेमकेपणाने काही तरी करा, असे आवाहन व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी केले.

त्यावर व्यापाऱ्यांना इशारा देताना जिल्हाधिकारी म्हणाले, तुम्हाला संयम ठेवावाच लागेल आणि पालिका व पर्यायाने शहराला मदत करावीच लागेल. शासनाकडे खूप अधिकार आहेत, पण वाद नको, सामंजस्याने काम झाले पाहिजे म्हणून ही बैठक बोलावली आहे. तुम्हा सर्वांना पालिकेस सहकार्य करावेच लागेल. शासनाकडून मंजूर झालेल्या डीपीआरची माहिती त्यांनी व्यापाऱ्यांना दिली. ते म्हणाले, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी कंपोस्ट पिट तयार केले जात आहेत. यामुळे आरोग्यावर परिणाम होणार नाही. एकमेकांना सहकार्य करून हा प्रश्न सोडवायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सहकार्याची भूमिका स्पष्ट केली. आम्ही व्यापाऱ्यांना शिस्त पाळण्यास सांगू, पण, धाकदपटशा करू नका, तुमचे राजकारण तुमच्या जवळच ठेवा असे त्यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना सुनावले. प्रफुल्ल मालाणी यांनी देखील सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. महापौर घोडेले यांनी प्रास्ताविक केले. उपमहापौर विजय औताडे यांनी आभार मानले.

व्यापारी महासंघातर्फे रिक्षा

व्यापारी महासंघातर्फे महापालिकेला पाच रिक्षा भेट देण्यात आल्या. कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी या रिक्षा वापरा असे यावेळी सांगण्यात आले. रिक्षा दिल्याबद्दल महापौरांनी महासंघाचे आभार मानले. घनकचरा व्यवस्थापनाच्या संपूर्ण अभियानात सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेडिकल वेस्ट कचऱ्यात, हॉस्पिटलला दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बुधवारी हॉटेल, रसवंतीचालकांची बैठक घेण्यात आली. त्यापूर्वी 'आयएमए'च्या माध्यमातून डॉक्टरांसोबत चर्चा केली. कायदा मोडल्यास दंड आकारणीचा इशारा महापालिकेने दिला होता. त्यानुसार, गुरुवारी सहारा हॉस्पिटलला दहा हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला.

हॉस्पिटलमधून निघणारे मेडिकल वेस्ट स्वतंत्रपणे जमा करून ठरवलेल्या पद्धतीनुसार विल्हेवाट लावावी, असे आवाहन पालिकेने केले होते. झोन क्रमांक ३ चे झोन अधिकारी दीपक जोशी पथकासह गुरुवारी सकाळी पाहणी करताना मध्यवर्ती जकात नाक्याजवळील सहारा हॉस्पिटलचे मेडिकल वेस्ट रस्त्यावरील कचऱ्यात टाकल्याचे दिसले. त्यात सुया, कापूस आदी साहित्य होते. जोशी यांनी अधिक चौकशी केली असता हे साहित्य सहारा हॉस्पिटलचेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या हॉस्पिटलकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

गुन्हे दाखल करणार

घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६ नुसार हॉस्पिटलचा कचरा महापालिकेकडे देताच येत नाही. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी लागते. परंतु, सहारा हॉस्पिटलने तो महापालिकेच्या जागेवर टाकला. यापुढे असे प्रकार आढळले, तर संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात येतील, असा इशारा पालिकेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट आधारकार्ड बनवणारे अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड बनविणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. महंमद हबीब महंमद हनीफ (बारापुल्ला गेट), सय्यद हमीद सय्यद हबीब(मुजफ्फरनगर), पूनमचंद दिगंबरसा गणोरकर (हडको एन-१२) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहेत. हडकोमधील एन-१३ भागातील आधार सेंटरवर कारवाई करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

हे तिघे दोन वर्षांपासून सोबत काम करत होते. तिघे जण बनावट कार्ड बनवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली. त्यावरून पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी आधार मल्टि सर्व्हीसेसवर छापा मारला. यावेळी पोलिसांनी सुमारे पिवळ्या, केशरी रंगाचे सुमारे ५५ रेशनकार्ड, १९ आधारकार्ड लॅपटॉप, संगणक, कलर प्रिंटर, फोटोपेपर, आयकॉनिक स्टिकर आदी साहित्य जप्त केले. आयकॉनिक स्टिकर कोठून मिळवले याचा तपास पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन तलाख कायद्याच्या विरोधात मुस्लीम महिलांचा मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन तलाखचा निर्णय मागे घ्यावा तसेच शरीयतमधील हस्तक्षेप थांबवावा या मागणीसाठी मुस्लिम महिला मोर्चा कृती समिती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने शुक्रवारी दुपारी भव्य मोर्चा काढण्यात आला. आमखास मैदानापासून निघालेला या मोर्चाचा विभागीय आयुक्तलयाजवळ समारोप झाला.

दुपारी साडेतीन वाजता शांततेत हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या महिलांनी दिलेल्या निवेदनामध्ये मुस्लिम समाजात तलाकचे प्रमाण कमी असताना राजकीय फायद्यासाठी काही महिलांना पुढे करून हा कायदा करण्यात आला आहे. मुस्लिम महिलांच्या अनेक समस्या आहेत, सच्चर समितीने मुस्लिम महिलांसाठी अनेक शिफारशी केल्या आहेत, त्या सरकार का लागू करत नाही असा आरोप करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तालयाजवळ सभा घेतल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी माहिती मोर्चाच्या समन्वयक फहीमुन्निसा बेगम, शाकेरा खानम, शाहिस्ता कादरी, शबाना आईमी, कमर सुलताना, समीना बानो, मुब्ब्शिरा फिरदौस, कादरी माहरुख, फातेमा फिरदोस, मेहराज पटेल यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला मोठ्या संख्येनी सहभागी होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याची विल्हेवाट किती दिवसात लावणार?

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील कचऱ्याची किती दिवसांत विल्हेवाट लावणार आहात? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाचे न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भूषण यांनी राज्य शासन व औरंगाबाद पालिकेकडे केली आहे. नारेगाव डेपोत कचरा टाकण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट आहे. या याचिकेची सुनावणी २८ मार्चला होणार आहे.

नारेगाव-मांडकी येथे यापुढे कोणताही कचरा टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायमस्वरुपी मनाई केली असून, या ठिकाणी सध्या असलेल्या कचऱ्यावर योग्य त्या शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून एका वर्षात येथील जमीन पूर्ववत करण्याचे; तसेच या ठिकाणी कचरा न टाकण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या २००३मधील आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कारण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी नऊ मार्च रोजी दिले होते. या आदेशाला पालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

नारेगाव-मांडकी येथील कचरा प्रश्नावर राज्याच्या मुख्य सचिवांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल केले असून, कालबद्ध कार्यक्रम सादर केलेला आहे. येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता महापालिका बांधिल असून, हा प्रकल्प उभारण्याकरिता काही कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे काही दिवस नारेगाव येथे प्रक्रियाकरिता कचरा टाकण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पालिकेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. नारेगाव येथे कचरा डम्पिंग करता येणार नाही व कायद्यानुसार त्याला परवानगी देता येणार नाही, असे म्हणणे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुनावणीदरम्यान मांडले. पालिकेच्यावतीने मुकुल रोहोतगी, जयंत भूषण, तर नारेगाव ग्रामस्थांच्यावतीने प्रज्ञा तळेकर, अतुल डख आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मुकेश वर्मा यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कष्टकऱ्यांच्या तोंडाचा घास काढू नका’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असेल तर 'ई-नाम' प्रणाली सुरू करावी, पण कष्टकरांच्या तोंडचा घास काढून घेऊ नका, असे मत हमाल-मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांनी व्यक्त केले.

'ई-नाम'मुळे निर्माण झालेल्या प्रश्नावर बाजारसमिती जाधववाडीत नुकतेच ठिय्या आंदोलन केले. यावेळी लोमटे बोलत होते. ई-नाम प्रणालीमुळे हमाल, मापाडी व महिला कामगारांना रोजगारस मुकावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून जाधववाडी येथील सर्व हमाल, कष्टकऱ्यांनी बाजारसमिती समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी 'ई-नाम' प्रणाली सर्व आडत दुकानावर सुरू करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी देविदास कीर्तीशाही, देवचंद आल्हाट यांचीही भाषणे झाली. यावेळी शेख नन्हू, उत्तम साळवे, उत्तम नरवडे, शेख अक्रम, शेख युनूस, शेख, याकूब, सोमीनाथ आडे, विलास खिल्लारे, शेख हसन, मदन गायकवाड, राहुल घाटे, नितीन मनोहर, रवी अंभोरे, प्रकाश कोठाळे, शेख वसीम, शकुंतलाबाई प्रधान, पुनाबाई हिवराळे, गंगूबाई जाधव, जमनाबाई मनोहर आदींची उपस्थिती होती.

व्यापारी व संघटनांचा पाठिंबा

हमाल, मापाडींच्या ठिय्या आंदोलनास जाधववाडीतील व्यापारी व त्यांच्या संघटनांनीही पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी व्यापारी तेथे आले आणि पाठिंबा दिला यावेळी हरिश पवार, प्रशांत सोकिया, भरत कुमार पारस, नरेंद्र कुमार पारस, गोविंद सेठ, प्रफुल्ल पाटणी आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन परीक्षेत मोबाइलद्वारे केली कॉपी

0
0

औरंगाबाद: केंद्रीय भरती बोर्डाच्या (सेंट्रल स्टाफ सिलेक्शन बोर्ड) ऑनलाइन परीक्षेत मोबाइल आणि मायक्रो डिव्हाईसचा वापर करून कॉपी करणाऱ्या उमेदवारास अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पठाण यांच्यासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सुमित राजमल सिंह (रा. हरियाणा)असे आरोपी उमेदवाराचे नाव आहे. केंद्रीय स्टाफ सलेक्शन मंडळाच्यावतीने विविध पदासाठी शुक्रवारी दुपारी देशभर ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. हरियाणा राज्यातील सुमितचे परीक्षा केंद्र म्हणून औरंगाबादेतील सीसी टेक्नॉलॉजी ही संस्था होती. शहरातील केंद्रावर परीक्षा देत असताना मायक्रो डिव्हाइस आणि मोबाइल वापरून तो कॉपी करीत असल्याचे पर्यवेक्षक संदीप गायकवाड यांच्या लक्षात आले. प्रकरणात त्याच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमप्रकरणातून चिरडले; जायभायेला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रेमप्रकरणातून दुचाकीस्वार तरुणाचा भररस्त्यावर कारखाली चिरडून खून केल्याप्रकरणी आणखी तिघे बेपत्ता असून प्रकरणात कारचालक आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये (२३, रा जयभवानी नगर, औरंगाबाद) यास प्रथम वर्गन्यायदंडाधिकारी ए. ए. पठाण यांनी २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संकेत संजय कुलकर्णी (१९, मूळ रा. पाथरी, परभणी, ह. मु. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

संकेत जायभाये आणि संकेत कुलकर्णी हे दोन वर्षांपूर्वी एन-३, सिडकोतील छत्रपती कॉलेजमध्ये सोबत शिक्षण घ्यायचे. दोघांचेही एकाच मैत्रिणीबरोबर एकतर्फी प्रेम प्रकरण चालू आहे. या तरुणीवरुन त्यांच्यात वाद सुरू झाला. अधुन-मधून त्यांच्यात खटके उडायचे. दरम्यान, २३ मार्च रोजी संकेत जायभाये याने संकेत कुलकर्णीला भेटायला बोलावले. कुलकर्णी दुचाकीवर मित्रांना घेऊन एन-२ मैदानाच्या पाठीमागील गेटजवळ आला. तेथे संकेत जायभाये कार घेऊन आला. त्याच्यासोबतही काही मित्र होते. मैदानाजवळच त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पळापळ झाल्यावर संकेत कुलकर्णी याने मित्राला घेऊन दुचाकी ठाकरे नगरकडे नेली. त्याचवेळी संकेत जायभाये याने पाठीमागून कार सुसाट नेत दुचाकीला उडवले. कारच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या संकेत, शुभम आणि विजय यांना चिरडले. यातला संकेत कुलकर्णी कारखाली चिरडला गेला. तर शुभम आणि विजय बाजूला पडले. त्यामुळे यात उपचारादरम्यान संकेतचा जीव गेला होता.

---

तिघांचा शोध सुरू

---

या प्रकरणात आरोपीस अटक केली असून, आरोपीचे साथीदार विजय जोक, उमेर पटेल, संकेत माच्चे हे गुन्हा घडल्यापासून बेपत्ता आहेत.

त्यांच्या शोध घेण्यासाठी, इतर साथीदारांना अटक करण्यासाठी आरोपीस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी केली असता न्यायालयाने ती मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रृती भागवत तपासासाठी सीआयडीला दोन महिन्यांची मुदत

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

श्रृती भागवत खून खटल्यातील तपास पूर्ण करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी ) आणखी दोन महिन्यांची मुदत औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे.

सीआयडीकडे प्रकरण देऊन आता एक वर्षाचा कालावधी झाला आहे. या प्रकरणात तपास करणारी संस्था सकरात्मक उत्तर देऊन आदेशाचे पालन केले जाईल, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे(सीआयडी ) विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी श्रृती भागवत खून खटल्यातील तपासासंबंधीचे आठवड्यात शपथपत्र खंडपीठात दाखल करावे. शपथपत्र समाधानकारक न वाटल्यास त्यांना व्यक्तीश: खंडपीठात उपस्थित राहावे लागेल, असे आदेश न्या. प्रसन्ना वराळे व न्या. विभा कंकणवाडी यांनी गेल्या सुनावणीच्या वेळी दिले होते. अंमलबजावणी कशी करतात, तपास कशा पद्धतीने करणार असल्याचा खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विहित कालावधीत आपण कुठल्यातरी लॉजिकल एंडला पोहोचलो नाही तर अशा तपास एजन्सीवर विश्वास शिल्लक राहणार नसल्याचे ताशेरे खंडपीठाने ओढले होते .

श्रुती भागवत खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाकडे (सीआयडी) वर्ग करावा, सीआयडीच्या औरंगाबाद पोलिस अधिक्षकांच्या अधिपत्याखाली सहा महिन्यात तपास पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ एप्रिल १७ रोजी दिले होते. न्या. संभाजी शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांनी एप्रिलमध्ये दिलेल्या आदेशात नमूद केले होते की, प्रकरण २०१२ मध्ये घडलेले असल्याने जलदगतीने तपास संपवून १० ऑक्टोंबर २०१७ रोजी आदेश पूर्ततेचा अहवाल खंडपीठात सादर करावा. तपासासंबंधी गुन्ह्ये अन्वेषन विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक पुणे यांनी सातत्याने लक्ष ठेवावे, असेही आदेशात नमूद केले होते.

खंडपीठाने सीआयडीला १० ऑक्टोबर २०१७ रोजी तीन महिन्यांचा वेळ तपासासाठी दिला होता. त्याची मुदत १० जानेवारीला संपली होती. तेव्हा काही मुद्यांवर तपास सुरू असल्याचे खंडपीठात सांगण्यात आले. त्या अनुषंगाने तपास करीत असल्याचे सांगितल्यावर खंडपीठाने १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सुनावणी ठेवली होती. पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्यावतीने अहवाल सादर केला. सुनावणीप्रसंगी खंडपीठाने तपासाच्या गतीवर असमाधान व्यक्त केले. आणि सीआयडीला शेवटची संधी १५ मार्चपर्यंत देण्यात आली. सकारात्मक दृष्टीने तपास करून काहीतरी ठोस पुरावा गोळा करून दाखवा असेही बजावले होते.

इंच भरही बदल नाही

१५ मार्च २०१८ रोजी अहवाल सादर केल्यानंतर तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. सीआयडीच्या कृतीत एक इंचभरही बदल आढळून आला नाही. लवकरात लवकर लॉजिकल एंडला येण्याचे सांगितले होते, परंतु कुठेच असा प्रकार जाणवत नसल्याचे खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणात सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी शपथपत्र दाखल केले. तपासासाठी दोन महिन्यांचा अवधी द्यावा, अशी विनंती शपथपत्रात करण्यात आली. ही विनंती कोर्टाने मान्य केली. याचिकाकर्त्याच्या वतीने अभयसिंह भोसले तर शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील किशोर होके - पाटील यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल हेडफोनमधून परीक्षेत केली कॉपी

0
0

औरंगाबाद:ऑनलाइन परीक्षेत मोबाइलचा हेडफोन लावून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. सुमित राजमल सिंह (रा. शामलो कलाण, जिंद, हरियाणा) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सुमित २३ मार्च रोजी सातारा भागातील गॅलक्सी कॉर्नर येथे ऑनलाइन परीक्षा देत होता. यावेळी गळ्यात काळ्या रंगाची गोल वायर, व शर्टाच्या आतून पाठीमागे पांढऱ्या रंगाचा वापरचा हेडफोन टाकून कानात मायक्रो डीव्हाइस लावून तो पेपर सोडवत होता. या विद्यार्थ्याला संदीप गायकवाड यांनी पाहिले व अटक केली. याप्रकरणात गायकवाड याच्या फिर्यादीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५० सिटी बसचा मार्ग मोकळा

0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

औरंगाबाद: अखेर औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा सिटी बसची निविदा काढली असून, त्यासाठी इच्छुक कंत्राटदारांकडून प्रस्ताव मागविले आहेत. दोन वर्षांत दीडशे सिटी बसेस सुरू करायच्या असून, त्या दृष्टीने प्रस्ताव सादर करा, असे 'इओआय' अर्थातच 'एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट'मध्ये नमूद केले आहे. त्यामुळे बस खरेदी प्रक्रिया वेगाने सुरू होईल, असे मानले जात आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून सिटी बस सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या स्पेशल पर्पज व्हेइकलच्या (एसपीव्ही) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास सिटी बस खरेदी करून त्या खासगी ऑपरेटरच्या माध्यमातून चालवण्याचे देखील ठरविण्यात आले. या निर्णयाला एसपीव्हीचे मुख्याधिकारी तथा मेण्टॉर सुनील पोरवाल यांनी इतिवृत्ताच्या रुपाने मान्यता दिली. त्यानंतर महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून २३ मार्च रोजी 'इओआय' प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, 'सध्या शहरात सुमारे २५ हजार रिक्षा चालतात. त्याशिवाय एसटी महामंडळातर्फे ३० सिटी बसेस देखील चालवण्यात येतात. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पुढील दोन वर्षात औरंगाबाद शहरात १५० सिटी बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. साठ मार्गांवर या बसेस चालतील. स्मार्ट सिटी प्रकल्पाचाच हा एक भाग असून मिनी बसेस, मध्यम आकाराच्या बसेस आणि स्टँडर्ड आकाराच्या बसेस चालवण्याचे नियोजन आहे. यापैकी काही बसेस शहरातील पर्यटन स्थळांसाठी राखीव ठेवल्या जातील.

बसस्टॉप, बसडेपो, पॅसेंजर इन्फरमेशन सिस्टीम, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम या यंत्रणा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारल्या जाणार आहेत. या संपूर्ण यंत्रणेच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्ससाठी इच्छुक कंत्राटदाराकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. इच्छुक कंत्राटदारांनी त्यांच्या प्रस्तावाचे सादरीकरण पाच एप्रिल रोजी एसपीव्हीच्या संचालकांसमोर करायचे आहे. प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्याची शेवटची तारीख दहा एप्रिल देण्यात आली आहे. ऑपरेशन आणि मेंटेनन्सचा कंत्राटदार निश्चित झाल्यावर बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

ई - रिक्षा, कचराकुंड्या अडकल्या

सिटी बस बरोबरच कचरा वाहतुकीसाठी २५ ई - रिक्षा आणि २४० लिटर क्षमतेच्या एक हजार कचराकुंड्या खरेदी करण्यास देखील स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीने मंजुरी दिली आहे. एसपीव्हीच्या ज्या बैठकीत ही मंजुरी मिळाली त्या बैठकीवेळी डी. एम. मुगळीकर एसपीव्हीचे मुख्याधिकारी होते. आता त्यांची बदली झाली आहे. सध्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम मुख्याधिकारी आहेत. ई - रिक्षा आणि कचराकुंड्यांची खरेदी शासनाच्या पोर्टल मार्फत केली जाणार आहे. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी गरजेची आहे. मुगळीकर स्वाक्षरी करणार की नवल किशोर राम स्वाक्षरी करणार या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ही खरेदी अडकली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हैदराबाद-अजमेर रेल्वे; जयपूरपर्यंत विस्तार

0
0

औरंगाबाद: हैदराबाद -अजमेर या अकोलामार्गे जाणाऱ्या द्विसाप्ताहिक रेल्वेचा जयपूरपर्यंत विस्तारत करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी दोन एप्रिल रोजी हैदराबाद येथून जयपूरकडे निघणार आहे. विस्तारित रेल्वे चार एप्रिलपासून जयपूर येथून सुटेल. पूर्वी रेल्वे पूर्वी हैदराबाद येथून सोमवार आणि बुधवारी रात्री साडेनऊ वाजता सुटत होती. आता दोन एप्रिलपासून सोमवार आणि बुधवारी याच दिवशी रात्री ११.३५ वाजता ही गाडी सुटणार आहे. तर रेल्वे अजमेर येथून सकाळी ३.१५ वाजता सुटेल आणि जयपूर येथे सकाळी ०६.०५ वाजता पोहोचेल. जयपूर येथून ही गाडी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी बुधवार आणि शुक्रवारी सुटेल. अजमेर ते हैदराबाद दरम्यान वेळा पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम मंदिरातून सोनसाखळी चोरी

0
0

औरंगाबाद: राम नवमीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेची साखळी चोराने लांबवली. ही घटना रविवारी (२५ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास समर्थनगर येथील राम मंदिरात घडली. सर्जुबाई मदनलाल धुत (वय ८५) रा. महावीरचौक, बाबा पेट्रोल पंपासमोर या राम नवमीनिमित्त कुटुंबासह गेल्या होत्या. दर्शन रांगेत उभ्या असताना त्यांची एक तोळ्याची सोन्याची साखळी चोरीस गेली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images