Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सिडकोत ४० जणांना कुत्र्याचा चावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन-नऊ भागातील एका पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी रात्री दोन तासांत तब्बल ४० जणांना चावा घेतला. त्यात लहान मुले, महिलांची संख्या मोठी आहे. या प्रकाराने दहशत पसरली असून पालिकेच्या पथकाला कुत्रा पकडण्यासाठी बोलाविण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत कुत्र्याचा शोध लागला नाही.

सिडको एन -नऊ पवननगर येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका मुलाला या कुत्र्याने चावा घेतला. तिथून हे कुत्रे सुसाट निघाले. पवननगरच्या पुढील गल्ल्यांमधून शिरून संत ज्ञानेश्वरनगरमध्ये एका लहान मुलाच्या पायाचा लचका तोडला. तिथून पुढे जात आणखी तीन जणांचा चावा घेतला. रायगडनगर परिसरात एका वृद्ध महिलेला चावा घेऊन कुत्र्याने मोर्चा शिवाजीनगर सेक्टर एलमध्ये वळविला. पिसाळलेले कुत्रे या भागात फिरून चावत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. पांढऱ्या रंगाचे कुत्रे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यावरून कुत्र्याचा शोध घेत काही तरुण फिरले. पण हे कुत्रे पुढे अयोध्यानगरात शिरले आणि तिथे काहींना चावले. दरम्यान, नगरसेवक नितीन चित्ते यांनी महापालिकेच्या पथकाला कळवून घटनेचे गांभीर्य सांगितले. रात्री साडेनऊच्या सुमारास पालिकेचे पथक पोचले त्यांनी परिसर पिंजून काढला पण कुत्रा सापडला नाही. श्वानदंशाने जखमी झालेल्या अनेकांनी परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

\Bघाटीत १७ रुग्ण दाखल \B

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या १७ रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) सोमवारी रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आले. यामध्ये किमान आठ ते दहा मुलांचा समावेश आहे. तसेच कमीत कमी तीन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, असेही अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औषधी दुकानाला पाच हजारांचा दंड

0
0

औषधी दुकानाला

पाच हजारांचा दंड

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल महापालिकेच्या पथकाने जवाहर कॉलनी परिसरात एका औषधी दुकानाला पाच हजारांचा दंड ठोठावला.

हेडगेवार रुग्णालय परिसरातील मेहरसिंग नाईक चौकातील ऋषिकेश मेडीकलमधून समोर रस्त्यावरील कचऱ्यात औषधी व अन्य कचरा टाकल्याचे पालिकेच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यावरून पथकाने कारवाई करत संबंधित दुकानाला पाच हजारांचा दंड ठोठावल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार, आत्महत्येप्रकरणी पतीसह एकास अटक, कोठडी

0
0

बलात्कार, आत्महत्येप्रकरणी

पतीसह एकास अटक, कोठडी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परिचितांपैकी एकाने बलात्कार केल्यानंतर तक्रार करुनही पतीने चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह बलात्कार करणाऱ्या आरोपीला रविवारी (२६ मार्च) अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, दोघांना गुरुवारपर्यंत (२९ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. उपाध्ये यांनी दिले.

या प्रकरणी रुक्मिणी जगन्नाथ वाकळे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची बहीण व मृत अर्चना हिचा विवाह आरोपी राजू उर्फ राजेंद्र बाबुराव ठोंबरे (३६, रा. आडगाव, ता. जि. औरंगाबाद) याच्याशी झाला होता व त्यांना दोन मुले आहेत. ३ मार्च २०१८ रोजी अर्चना ही माहेरी आली होती. त्यावेळी, आरोपी शिवाजी लक्ष्मण ठोंबरे (५५, रा. आडगाव) व त्याची पत्नी लंकाबाई हिने अर्चना हिला बोलावून शिवाजीने तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार अर्चना हिने केली होती. मात्र त्याबाबत पतीकडे तक्रार करुनही पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. एवढेच नव्हे तर पतीने तिला बोलणे सोडले होते व जेवणही सोडले होते. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी पतीच्या नावे चिठ्ठी लिहून अर्चना हिने २४ मार्च २०१८ रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी कलम ३७६, ३०६, ३२३, ५०४, ३४ अन्वये करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी पतीसह आरोपी शिवाजीला रविवारी अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, दोन्ही आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहाय्यक सरकारी वकील अर्चना लाटकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुग्धनगरीच्या जागेवर बायोमिथेनचा प्लांट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा शिवारात महापालिकेसाठी देण्यात आलेल्या दुग्धनगरीच्या जागेवर कचऱ्यापासून बायोमिथेनचा प्लांट उभारण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. दुग्धनगरीसाठी असलेले या जागेचे आरक्षण बदलले जाणार असून, बायोमिथेनचा प्लांट सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणून उभारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नवल किशोर राम म्हणाले, 'शहरातील कचऱ्याच्या स्थितीची पाहणी सकाळी महापौरांच्या सोबत केली. यावेळी दुग्धनगरीची जागा देखील पाहिली. या ३० एकरांच्या जागेवर बायोमिथेनचा प्लांट उभारणे शक्य असल्याचे लक्षात आले आहे. जागेचा वापर बदलण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. ते वापरून त्या जमिनीचे आरक्षण बदलले जाईल. बायोमिथेनचा प्लांट पाहण्यासाठी इंदूर, भोपाळला महापालिकेचे पथक जाणार आहे.'

खोकडपुरा येथील शासकीय डेअरीच्या जागेवर ड्रायवेस्ट सेंटर तयार केले जाईल, असे त्यांनी सांगितले. सुक्या कचऱ्यात विक्री होणारा आणि विक्री न होणारा कचरा असे दोन भाग आहेत. विकला न जाणाऱ्या सुक्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. ही बाब लक्षात घेऊन अंबुजा सिमेंट या कंपनीशी संपर्क साधला आहे. विकला न जाणारा सुका कचरा या कंपनीत पाठवण्याचे निश्चित झाले आहे. अन्यही काही कंपन्या आमच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले.

शहरातील प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने देखील नियोजन केले जात आहे. या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रकल्प उभारणे, कंपोस्ट पिट तयार करणे, त्यावर शेड बांधणे ही कामे एप्रिल आणि मे महिन्यातच पूर्ण करावी लागतील. त्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे करावी लागणार आहेत, असेही नवल किशोर राम यांनी सांगितले. कचरा जाळण्याचे प्रकार दुर्दैवी आहेत, असे सांगून ते म्हणाले, 'असे प्रकार घडूनयेत याची जबाबदारी झोन अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. गस्ती पथक देखील तयार केले जातील.'

हजार ते दीड हजार टन कचरा रस्त्यावर

शहरात फक्त ७०२ टन कचरा रस्त्यांवर शिल्लक आहे, असे विधान शनिवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले होते. डॉ. सावंत यांच्या विधानावरून टीका देखील झाली. पत्रकारांनी सोमवारी नवल किशोर राम यांना शिल्लक असलेल्या कचऱ्याबद्दल प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, 'सुमारे हजार ते दीड हजार टन कचरा शिल्लक असल्याचे लक्षात येते.' पालकमंत्र्यांचा आकडा व तुमचा आकडा यात तफावत आहे, असे त्यांच्या लक्षात आणून दिले असता नवल किशोर राम यांनी सावरासावर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर जलवाहिनीसाठी होणार नवा करार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीसाठी आता त्या कंपनीबरोबर नव्याने करार केला जाईल, हा करार जनतेच्या हिताचा असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकारांना दिली.

समांतर जलवाहिनी प्रकल्प सुरू व्हावा यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात सोमवारी मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल हे उपस्थित होते. या संदर्भात नवल किशोर राम यांना विचारले असता ते म्हणाले, समांतर जलवाहिनीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाबाहेर तडजोड करण्यासाठी शासनातर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनीसोबत नव्याने करार करावा लागणार आहे. हा करार नागरिकांच्या हिताचा असेल. पाणीपुरवठ्याची सध्याची स्थिती लक्षात घेता समांतर जलवाहिनीचे काम येत्या तीन ते चार वर्षांत पूर्ण होणे गरजेचे आहे. नव्याने होणाऱ्या कराराबद्दल चर्चा करण्यासाठी सोमवारची मंत्रालयातील बैठक होती, असा उल्लेख त्यांनी केला.

जलवाहिनीचे काम ज्या दरावर कंपनीने सोडले, त्याच दरावर कंपनीला आता नव्याने काम करावे लागेल, कोणत्याही परिस्थितीत दर वाढवून दिला जाणार नाही. पाणीपट्टीचा दर महापालिका ठरवेल, त्यात कंपनीला हस्तक्षेप करता येणार नाही, निर्धारित वेळेत कंपनीला मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण करावे लागेल, अशा प्रमुख अटी नवीन करारात राहणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

यंदा पाणीपट्टी वाढीपासून मुक्तता

पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार दरवर्षी वाढ केली जाते. ही वाढ रद्द करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत, तसा प्रस्ताव देखील सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून या प्रस्तावाची अंमलबजावणी होईल का, अशी विचारणा केली असता महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, १ एप्रिल पासून दहा टक्के वाढ रद्द करावीच लागेल. पाणीपट्टीत वाढ करता येणार नाही. आयुक्त नवल किशोर राम यांनी देखील त्याला दुजोरा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

भरधाव टँकरने ट्रॉफिक पोलिसाला चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव घाटानजीकच्या महामार्ग पोलिस चौकी समोर घडली आहे. या घटनेत जागीच मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव अनिल शालिग्राम शिसोदे (वय ५२), असे आहे.

मिळेल्या माहितीनुसार, मूळ अंमळनेर तालुक्यातील डांगरी येथील रहिवासी व सध्या जळगाव येथील प्रेमनगर येथे राहत असलेले अनिल शिसोदे हे तीन वर्षांपासून चाळीसगाव येथे महामार्ग पोलिस पथकात नेमणुकीस होते. ते सोमवारी सकाळी कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या महामार्ग पोलिस चौकीसमोर सहकारी कर्मचाऱ्यांसह वाहनांची तपासणी करत होत होते. यावेळी धुळ्याकडून औरंगाबादकडे जाणारा एक कंटेनर वेगाने येताना दिसला. त्यांनी कंटेनरला (एन एल ०१ ए बी २५२१) हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु कंटेनरचालकाने तो न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिसोदे हे कंटेनरखाली चिरडून जागीच ठार झाले. त्यानंतर चाळीसगाव घाटाच्या पायथ्याला असलेल्या एका ढाब्यावर कंटेनर सोडून चालक पळून गेला. मृत शिसोदे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज बिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू

0
0

औरंगाबाद : महावितरणकडून वीज बिल शून्य थकबाकीची मोहीम राबविण्यात येत आहे. वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज ग्राहकांना सुटीच्या दिवशीही बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरण प्रादेशिक विभागाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळ कार्यालयांतर्गत महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र २९ व ३० मार्च रोजी सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती महावितरण कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्षपदी बसैये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगबाद

भारतीय जनता पक्ष आध्यात्मिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते दयाराम राजाराम बसैये (बंधू) यांची निवड करण्यात आली आहे. संघटन मंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत बसैये यांना नियुक्तपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, रामभाऊ गावंडे, भाऊ थोरात, किशोर धनायत, संजय खंबायते, सुरेश बनकर, रेखा कुलकर्णी, व्यंकटेश कमळू, आसाराम तळेकर, धनंजय कुलकर्णी, दिलीप पोहेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. गंगाधर पानतावणे यांचं निधन

0
0

औरंगाबाद

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे (वय ८१) यांचं सोमवारी मध्यरात्री दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमधील एमआयटी रुग्णालयात उपचार सुरू होते.

साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गंगाधर पानतावणे यांना गेल्याच आठवड्यात 'पद्मश्री' पुरस्करानं गौरवण्यात आलं होतं. दलित साहित्य आणि दलित चळवळ या विषयांत गंगाधर पानतावणे यांचं भरीव योगदान होतं. गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ साली नागपुरात झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरात झालं. एमएची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी मिळवली. त्यानंतर याच विद्यापीठात म्हणजेच, आताच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले.

वैचारिक लिखाणाबरोबरच समीक्षेच्या प्रांतातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. 'धम्म चर्चा` `मूल्यवेध', 'मूकनायक', 'विद्रोहाचे पाणी पेटले आहे', 'वादळाचे वंशज', 'दलित वैचारिक वाड्मय', 'किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड', साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती', 'साहित्य शोध आणि संवाद' हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे अनंतात विलीन

0
0

पान चार मेनलीड

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यावर मंगळवारी (२७ मार्च) संध्याकाळी सात वाजता छावणीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

अस्मितादर्शकार म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेले आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक डॉ. पानतावणे यांचे मंगळवारी (दि. २७)पहाटे २ वाजता निधन झाले होते. त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रावस्ती या नागसेनवनमधील पानतावणे यांच्या निवासस्थानापासून फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. याआधी पोलिस दलाने निवासस्थानामध्ये तिरंग्यात त्यांचे पार्थिव ठेवले व मानवंदना दिली. ट्रकवर डॉ. पानतावणे यांचे मोठे बॅनर (कटआऊट) लावण्यात आले होते. यानंतर बुद्धवंदनेची धून वाजवून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. नागसेनवन, चर्चरोड, छावणी चौक, नेहरू चौक, छावणी हॉस्पिटल, आयकर भवन मार्ग याद्वारे छावणीतील स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव आणण्यात आले. पार्थिव स्मशानभूमीत आल्यावर समता सेवा दलाच्या सैनिकांनी आधी आदरांजली वाहिली. यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारच्या वतीने, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी राज्य शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिस प्रशासनातील विशेष दलाने बंदुकीच्या २१ फैरी देत पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांना सलामी दिली. पोलिस बँडद्वारे अंत्यसंस्कारास वाजवण्यात येणारी धून वाजवण्यात आली. शासकीय सोपस्कार झाल्यानंतर बुद्धवंदना म्हणण्यात आली. यानंतर पानतावणे यांच्या मुली नंदिनी आणि निवेदिता यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी अंत्यसंस्काराच्या चौथऱ्यावर पानतावणे यांचे जावई, नातवंडे, अजय आठवले व कुटूंबिय उपस्थित होते.

आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक हरपला- आठवले

'पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे हे आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक होते. त्यांच्याकडून मी वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांच्या कार्याचा तो गौरव होता. त्यांचे योगदान आंबेडकरी चळवळ कायम लक्षात ठेवेल. वैचारिक चळवळ पोरकी झाली आहे. त्यांना भारत सरकारतर्फे, माझ्यातर्फे आणि आंबेडकरी जनतेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉ. गंगाधर पानतावणे यांना श्रद्धांजली वाहिली. रावसाहेब कसबे म्हणाले, 'चाळीस वर्षांपासून माझ्या आयुष्यात त्यांचे मोलाचे स्थान होते. त्यांनी तीन साहित्याच्या पिढ्या घडवून मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळे साहित्य परदेशात गेले. उद्याचे समीक्षक, साहित्यिक त्यांना, त्यांच्या योगदानाला कायम लक्षात ठेवतील. यानंतर राज्यसरकारतर्फे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, आमदार विक्रम काळे, मसापचे कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह काही मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करत डॉ. पानतावणे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मान्यवरांची उपस्थिती

महापौर नंदकुमार घोडले, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, डीसीपी ठाकरे, डीसीपी मुंडे, कोळेकर, आमदार विक्रम काळे, आंबेडकरी चळवळीतील बाबुराव कदम, मिलिंद शेळके, कौतिकराव ठाले पाटील, रा. स्व. संघाचे दिवाकर कुलकर्णी, समरसता मंचचे रमेश पांडव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनमोहन ओबेरॉय, ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे, अशोक तेजनकर, विद्यापीठाचे कुलगुरू बाळू चोपडे, रतन पांडागळे, विजय मगरे, गंगाधर गाढे, बी. एच. गायकवाड, संजय गायकवाड, माणिक सावन्त, शकुंतला धांडे, जालिंदर शेडगे, विलास वैद्य, पंकज भारसाखले, वैशाली प्रधान, विलास कटारे, कल्याण काळे, द्वारकाभाऊ पाथरीकर, इंद्रजित आलटे, अणासाहेब खंदारे, विजय बोराडे यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षिणक, क्षेत्रातील शहरातील व राज्यातील हजारो मान्यवर आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला शिक्षक परिषद

0
0

राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद गुरुवारपासून

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील कला शिक्षकांची राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद २९ व ३० मार्च रोजी बीड येथे होणार आहे. कला विषय, विषय शिक्षकांच्या अडचणी त्यांचे प्रश्न यावर परिषदेत दोन दिवस चर्चा होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून दीडशे शिक्षक परिषदेला जाणार आहेत.

जिल्ह्यातील कला शिक्षकांची कार्यशाळा यशवंत कला महाविद्यालयात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलाध्यापक महामंडळाचे विभागीय उपाध्यक्ष विश्वनाथ ससे, सरचिटणीस एम. ए. कादरी, जिल्हाध्यक्ष विजयकुमार गोसावी, सहसरचिटणीस राजेंद्र वाळके, व्ही. एस. पैठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातून दीडशेपेक्षा अधिक शिक्षक सहभागी होणार आहे. परिषदेत कलाभूषण, कलातपस्वी अशा विशेष पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील कला शिक्षक सहभागी होणार असून विविध सत्रामध्ये प्रश्नावर चर्चा, मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद जिल्हा कलाध्यापक संघाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी धर्मराज खैरनार, सचिन भोरे, मोहसीन अन्वर, दिनेश कुलकर्णी, विनोद गरड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विपुल तिळवे तर आभार संदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप वाढे, नितीन वेताळ, योगेश लंके, राहुल नरवडे, बी. व्ही. ठाकरे, अनिल साबळे, दत्तात्रय आडपे, एस. एस. पुठ्ठेवाड, पार्वती पाटील आदींनी परिश्रम घेतले.

कोट..

परिषदेत रिक्तपदे न भरणे, संचमान्यतेत विशेष शिक्षक म्हणून वगळणे, अंशकालीन शिक्षकांना अत्यल्प मानधन देणे अशा विविध प्रश्नावर दोन दिवस चर्चा होणार आहे. कला, क्रीडाच्या तासिका कमी करण्यात आल्याने दोन-तीन महिने संघर्ष करावा लागला. त्यानंतर पूर्ववत तासिका झाल्या.

विश्वनाथ ससे,

विभागीय उपाध्यक्ष,

राज्य कलाध्यापक संघ महामंडळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल बातम्या क्राईम

0
0

जेष्ठ नागरिक महिलेला मारहाण

...

औरंगाबाद: दुचाकी रस्त्यात उभी केल्याबाबत विचारणा केली असता साबीया सुलताना शफीयोद्दीन (वय ६० रा. चेलीपुरा) यांना तिघांनी मारहाण केली. रविवारी रात्री साडेदहा वाजता चेलीपुरा चौकात हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित आरोपी वसीम, वाजेद व अझहर विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...

\Bकारच्या गेटमुळे दुचाकीस्वार जखमी\B

कारचालकाने अचानक दरवाजा उघडल्याने पाठीमागून येत असलेला दुचाकीस्वार गोकुळ पंडितराव खांडरे (रा. नारळीबाग) हे जखमी झाले. सोमवारी रात्री आठ वाजता नारळीबाग येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...

\Bपोलिसांच्या घरात घुसून तोडफोड\B

भास्कर माधवराव लगड (वय ४९ रा. सुंदरनगर, नागेश्वरवाडी) यांच्या घरात घुसून दोघांनी तोडफोड करीत सामानाची नासधूस केली. सोमवारी दुपारी अडीच वाजता नागेश्वरवाडी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित आरोपी श्रीहरी कारभारी काळे वय अरुण कारभारी काळे रा. घोडेगाव, ता. खुलताबाद यांच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...

\Bदुचाकीची चोरी \B

सुनिल गुलाबराव कदम (वय ३४ रा. शिवशंकर कॉलनी) यांची दुचाकी चोरट्यानी घरासमोरून लंपास केली. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्तांच्या जीपीएस मॅपिंगला मिळाली परवानगी, आता प्रतीक्षा टेंडरची

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील मालमत्तांच्या जीआयएस (ग्लोबल इन्फरमेशन सिस्टीम) मॅपिंगला शासनाने परवानगी दिली आहे. परवानगीचे पत्र मंगळवारी महापालिकेला प्राप्त झाले. त्यामुळे जीआयएस मॅपिंगच्या कामाचे टेंडर महापालिका केव्हा काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी जीआयएस यंत्रणेव्दारे खासगीकरणातून काम करण्याची परवानगी महापालिकेने शासनाकडे मागितली होती. शासनाने ही परवानगी सुरुवातीला नाकारली होती. शासनाच्या स्तरावर एजन्सी निश्चित करण्यात येणार असून त्या आधारेच जीआयएस मॅपिंग करा, असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया ठप्प झाली होती. कचराकोंडीच्या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर औरंगाबादेत आल्या होत्या. त्यावेळी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मालमत्तांच्या जीआयएस मॅपिंगचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला व महापालिकेला जीआयएस मॅपिंग करण्याची परवानगी द्या, अशी विनंती केली होती. म्हैसकर यांनी ही विनंती मान्य करून तसे आदेश लवकरच काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जीआयएस मॅपिंगबद्दलचे आदेश मंगळवारी महापालिकेला प्राप्त झाले. या आदेशानुसार महापालिकेला टेंडर काढून मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करावे लागणार आहे.

महापालिकेच्या रेकॉर्डवर सध्या एक लाख ८५ हजार मालमत्तांची नोंद आहे. सुमारे दोन लाख मालमत्ता पालिकेच्या रेकॉर्डवर नाहीत. त्याशिवाय दोन दशकांपासून मालमत्तांचे फेरसर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे मालमत्ता करापासूनच्या उत्पन्नात वाढ होत नाही. रेकॉर्डवर नसलेल्या मालमत्तांना कर आकारणी व्हावी, फेरसर्वेक्षण झालेल्या न झालेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण व्हावे या उद्देशाने जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी - ओडीएफ प्लस कार्यशाळा

0
0

ओडीएफ प्लससाठी

पुढाकार घेण्याची गरज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामपंचायतीतील बांधकाम केलेल्या शौचालयाचा वापर ग्रामस्थांनी नियमित करण्यासाठी ग्रामपंचायतीमधील सर्व घटकांनी प्रयत्नशील असावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी केले.

संत तुकाराम नाट्यगृहात मंगळवारी जिल्हा परिषदेच्या वतीने हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीसाठी ओडीएफ प्लस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष केशवराव ,तायडे, बांधकाम सभापती विलास भुमरे, झेडपी सदस्य रमेश गायकवाड, अक्षय जायभाय, रमेश पवार आदी उपस्थित होते.

हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींनी यापुढे ओडीएफ प्लससाठी अग्रेसर राहून आपली ग्रामपंचायत सशक्त बनवावी, ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करावे, असे आवाहन अध्यक्षांनी केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत पातळीवर ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन दररोज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

व्याख्याते गणेश शिंदे यांनी ग्रामविकासासाठी ग्रामसेवकांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. शाश्वत विकासाकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामस्थांशी भावनिक संवाद साधल्यास विकास सहजगत्या शक्य होईल व गावात युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. विजयकुमार सावंत, एस. बी. कहाटे, अशोक बाविस्कर, आर. एम. भालेराव, के. टी. जाधव यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले. राजू सोनवणे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

0
0

पैठण: ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राजेंद्र उत्तमराव डहाळे (वय ५८, रा. मस्तगड, जालना) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. हा अपघात पैठण-पाचोड रस्त्यावरील रहाटगाव फाट्याजवळ मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास झाला. डहाळे हे दुचाकीवरून (एम एच १६, ए के १८६८) जालन्याहून पैठणमार्गे नगरला जात होते. यावेळी पैठण-पाचोड रस्त्यावरील म्हस्के पोल्ट्री फार्मसमोर त्यांच्या दुचाकीची विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालट्रकसोबत (एम एच २०, एन ३६४७) धडक झाली. अपघाताची पैठण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचऱ्याचा निचरा कसा केला ?पालिकेला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश

0
0

कचऱ्याचा निचरा कसा केला? पालिकेला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश

अहवाल सादर करा, पालिकेला निर्देश

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महानगरपालिकेने ७ मार्च ते आजपर्यंत शहरात साठलेल्या किती कचऱ्यावर, कुठे आणि कशा पद्धतीने प्रक्रिया केली या संदर्भात सविस्तर तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी मंगळवारी दिले. याशिवाय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात साठलेल्या कचऱ्याची महानगरपालिका कशा पद्धतीने विल्हेवाट लावते आहे, याची जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून त्याचा अहवाल खंडपीठात सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी झालेल्या सुनावणीत मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांच्या वतीने अतिरिक्त शपथपत्र सादर करण्यात येऊन, शहरातील कचरा विलगीकरणाशी प्रक्रियेसंदर्भात महापालिकेने दिलेली आकडेवारी आणि रंगविलेले चित्र अत्यंत विसंगत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे खंडपीठाचे निदर्शनास आणून दिले. महापालिकेच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले आहे की, शहरात अनेक ठिकाणी खड्डे खोदून त्यात कंपोस्टिंग केले जात आहे, परंतु प्रत्यक्षात अशा खड्ड्यांमधून ओला आणि सुका असा दोन्ही प्रकारचा कचरा पुरला जातो आहे. अशा ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याची विनंती देवदत्त पालोदकर यांनी केली.

याशिवाय शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळला जात असून, त्यालाही नागरिकांनाच जबाबदार धरले जाते आहे. मात्र, शहरात एक महिन्यापासून नियमित कचरा गोळाच केला गेलेला नसल्याने नागरिकांना जबाबदार धरता येणार नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र खरेदीसंदर्भातही कारवाई झालेली नाही, असेही न्यायालयात सांगण्यात आले. पालोदकर यांनी यावेळी, कचरा, त्यामुळे झालेली दुरवस्था याचे विदारक चित्र मांडणाऱ्या बातम्यांची विविध वर्तमानपत्रांतील कात्रणे खंडपीठात सादर केली.

यावर खंडपीठाने प्रतिवादींना म्हणणे मांडण्यास सांगितले. राज्य शासनाच्या वतीने अमरजितसिंह गिरासे यांनी सांगितले, की राज्य शासनाने १०.३६ कोटी रुपये २२ मार्चला महानगरपालिकेच्या खात्यात वर्ग केले आहेत. शासनाकडून वितरित करण्यात आलेला आणि येणार असलेला निधी स्वतंत्र खात्यात ठेवण्याच्या सूचना महानगरपालिकेला देण्यात आलेल्या आहेत. शहरात साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना काही समाजकंटक आगी लावत असल्याने, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधासाठी पोलिस पथक पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या वतीने राजेंद्र देशमुख यांनी सांगितले की, शहरातील नऊही झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्यात येत आहे. पूर्वी ३५ ठिकाणी हे काम चालायचे ते आता ११२ ठिकाणी सुरू झाले असल्याचे सांगत त्यांनी, त्या जागांची यादीही सादर केली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता शासनाच्या जी. एम. पोर्टलमार्फत यंत्र खरेदीसाठी नोंदणी करण्यात आलेली आहे. अंबुजा सिमेंट कंपनीशी संपर्क करण्यात आलेला असून, ते शहरातील कचरा नेणार आहेत. याशिवाय रस्ता दुभाजकांवर असलेला कचरा उचलण्यासाठी नाशिकच्या एका कंपनीला पाचारण करण्यात आलेले आहे. शहरात घरोघर रोज जाऊन कचरा उचलला जात नाही, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले असता, महापालिकेच्या वतीने तसा तो उचलण्यात येईल असे सांगितले. कचरा समस्येच्या निपटाऱ्याकरिता राज्य शासन संपूर्ण पैसे पुरवित आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून विजयकुमार सपकाळ यांनी, राज्य शासनच महापालिका का चालवत नाही, असा युक्तीवाद केला.

यावर खंडपीठाने महापालिकेचे शपथपत्र रेकॉर्डवर घेत, ७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील किती कचऱ्यावर कुठे आणि कशी प्रक्रिया केली याबाबत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी ३ एप्रिल २०१८ रोजी ठेवली. मंगळवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने विजयकुमार सपकाळ, चंद्रकांत थोरात, प्रज्ञा तळेकर, मूळ याचिकाकर्त्यांतर्फे पालोदकर, केंद्र शासनातर्फे संजीव देशपांडे, राज्य शासनातर्फे अमरजितसिंह गिरासे, महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उत्तम बोदर यांनी काम पाहिले.

चौकट

शहरात कचरा जाळला जात असल्याच्या बाबीवर खंडपीठात चर्चा सुरू असताना शासनाच्या वतीने गिरासे यांनी सांगितले की, शहरातील कचऱ्याच्या ढिगांना आगी लावल्या जाऊ नयेत याकरिता लक्ष ठेवणे आणि प्रतिबंधासाठी पथक नेमण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश देण्यात येतील. शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना महापालिकेचे कर्मचारीच आगी लावत असून तसे व्हिडिओ शुटिंगदेखील उपलब्ध असल्याचे चंद्रकांत थोरात यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. पानतावणे प्रतिक्रिया

0
0

(डॉ. पानतावणे प्रतिक्रिया )

…....

एक व्यासंगी शिक्षक, साक्षेपी संपादक आणि दलित साहित्याचे भाष्यकार म्हणून गुरुवर्य डॉ. पानतावणे सर हे परिचित होते. गेली ५० वर्षे तळागळातील नवीन लेखकांसाठी सरांनी अस्मितादर्श साहित्य चळवळ सातत्यपूर्णरित्या चालविली. त्यातून मराठी साहित्याला अनेक चांगले लेखक मिळाले. एक शिक्षक म्हणून त्यांचा वकूब खूप मोठा होता. अशा शिक्षकाचा विद्यार्थी होण्याचा सन्मान मला मिळाला, याचा मला अभिमान वाटतो.

- प्रा. दासू वैद्य

….....

आंबेडकरी चळवळीतील देदिप्यमान तारा आज निखळला. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतून आंबेडकरी जनतेला राजकीय भान दिले. 'अस्मितादर्श' हे आयुध जनतेच्या हाती दिले आणि त्यातून आंबेडकरी नवतरुण अन्याय-अत्याचाराविरुद्ध लेखणी झिजवू लागले.

-प्रा. डॉ. विरा राठोड

…....

आंबेडकरी विचारवंत डॉ. पानतावणे यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. आयुष्यभर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. महापालिकेतर्फे त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

- नंदकुमार घोडेले, महापौर

….....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट आधार-रेशनकार्ड; पाचव्या आरोपीस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट आधारकार्ड, रेशनकार्डप्रकरणी पाचव्या आरोपीला सोमवारी (२६ मार्च) अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात केले असता, २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी दिले. सेवानिवृत्त कर्मचारी रमेश सूर्यकांतराव कुलकर्णी (६०), असे त्याचे नाव आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेचा पोलिस कॉन्स्टेबल अश्रफ नवाब सैय्यद यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी हडकोतील एन-१३ परिसरातील आधार सेंटरवर कारवाई करुन सैय्यद हमीद सैय्यद हबीब (४५, रा. मुजफ्फरनगर, हडको), शेख मोहम्मद हबीब मोहम्मद हनीफ (२८, रा. कोतवालपुरा) व पूनमचंद दिगंबरसा गणोरकर-सावजी (५३, रा. हडको) यांना गुरुवारी (२२ मार्च) अटक करण्यात आली होती. त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, तिन्ही आरोपींनी ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, याच प्रकरणात रोशनबी शेख सलीम (४५, रा. चेलीपुरा) हिला शनिवारी (२४ मार्च) अटक करुन रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, तिला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीदरम्यान तिने दिलेल्या माहितीनुसार, शासकीय मुद्रणालयातील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश सूर्यकांतराव कुलकर्णी (६०) याला सोमवारी अटक करुन मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, केशरी व पिवळ्या रंगाच्या कार्डांसाठी राजमुद्रा व महाराष्ट्र शासनाने छापलेले कव्हर आरोपी आणून देत होता. असे कव्हर आरोपीने कुणाकुणाला दिले व आर्थिक व्यवहार किती झाले, याचा सखोल तपास करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. पी. काकडे पाटील यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला दोन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी (२८ मार्च २०१८)

0
0

डायरी (२८ मार्च २०१८)

…....

-अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम.

स्थळ : दक्षिणमुखी हनुमान मंदिर, जे-सेक्टर, मुकुंदवाडी

वेळ : पहाटे ४ पासून

-स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे पालक सभा.

स्थळ : भूमकर सभागृह, महाविद्यालय

वेळ : सकाळी ११

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे नाट्यमहोत्सव: नाटकः चाहूल

स्थळ : विद्यापीठाचे नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६

-सिद्धा महोत्सवाअंतर्गत भावगीत तसेच सुफी गीतांचा कार्यक्रम.

स्थळ : जिल्हा परिषद मैदान, औरंगपुरा

वेळ : सायंकाळी ७

-गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्यात गोविंद सन्मान पुरस्काराचे वितरण, व्याख्यान.

स्थळ : कलश मंगळ कार्यालय, उस्मानपुरा

वेळ : सायंकाळी ७

….....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे निधन प्रतिक्रिया (जोड)

0
0

गंगाधर पानतावणे यांच्या निधनामुळे दलित साहित्याच्या निर्मितीचे अस्मिता पर्व संपले आहे. निष्ठेने व नि:स्वार्थ बुद्धीने दलित साहित्यिकांच्या तीन पिढ्या घडविण्यात सरांनी स्वत:ला वाहून घेतले होते. त्यांचे निधन म्हणजे दलित साहित्याची फार मोठी हानी आहे. लौकिक जीवनात ते माझे व मित्र व मार्गदर्शक होते.

प्रा. डॉ. दत्ता भगत

-

दलित साहित्याच्या जडणघडणीत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांचा मोठा वाटा आहे. ते मराठी दलित साहित्यातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते. दलित साहित्य व दलित साहित्याच्या चळवळीत त्यांचा मोठा वाटा होता. अस्मितादर्शच्या माध्यमातून ५० वर्ष साहित्य संमेलन भरवण्याची परंपरा त्यांनी चालवली हे आश्चर्य आहे.

प्रा. वासुदेव मुलाटे.

-

आंबेडकरी चळवळ व आंबेडकरी साहित्य चळवळ याच्यातील मर्मज्ञ विश्लेषक म्हणून डॉ. पानतावणे इतिहासात ओळखले जातील. त्यांच्या निधनामुळे दलित साहित्याच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. प्रा. पानतावणे हे महाराष्ट्रातील एक मान्यवर व्यासंगी अभ्यासक लेखक होते. वैचारिक दिशा देणारे व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरवले आहे.

प्रा. अविनास डोळस.

-

डॉ. पानतावणे मराठीमधील ज्येष्ठ विचारवंत, लेखक, समीक्षक होते. त्यांच्या जाण्याने आपण ज्येष्ठ विचारवंताला मुकलो आहोत. ते साकेत प्रकाशनचे महत्वाचे लेखक होते. आमच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपले दोन ग्रंथ देऊन मदत केली होती. अन्य लेखकांची पुस्तकेही त्यांनी मिळवून दिली होती. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आम्ही प्रकाशन क्षेत्रात उभे राहू शकलो.

बाबा भांड (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images