Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सिटिझन रिपोर्टर २७ मार्च

$
0
0

मिसारवाडी

..

\Bपायाभूत सुविधा पुरवण्याची गरज

\B

शहरात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आंबेडकरनगर मागील मिसारवाडी या झोपडपट्टी भागात मूलभूत सोयी सुविधांची पुरती वानवा आहे. अंतर्गत पक्के रस्ते नसल्यामुळे विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना चिखल तुडवीत ये जा करावी लागते, तसेच पिण्याचे शुद्ध पाणी, पथदिवे, घंटागाडीचा अभाव यामुळे याठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा प्रकर्षाने अभाव जाणवतो. कचरा घेऊन जाणारी घंटागाडी ही नियमित येत नसल्याने या वसाहतीत गल्लीबोळात कचरा साचतो व कुजतो. त्यावर मोकाट कुत्रे ताव मारताना दिसतात. या भागात पायाभूत सोयीसुविधा देण्याची गरज आहे.

रवींद्र तायडे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रतिक्रिया.. डॉ. पानतावणे यांच्याबाबत

$
0
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारक पर्वाचा वारसा साहित्य आणि सांस्कृतिच्या विश्वात वारसा समृद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न डॉ. पानतावणे यांनी केला. अस्मितादर्शच्या ५० वर्षांच्या इतिहासामध्ये सुवर्ण आणि दलित लेखकांच्या चार-पाच पिढ्या आपल्या लेखन कतृत्वाने प्रकाशात आल्या. डॉ. पानतावणे यांच्या लेखनामुळे बहिष्कृत महाराष्ट्र उजळून निघाला आणि बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक महाराष्ट्र सेक्यूलर बनला.

श्रीपाल सबनिस

…..

डॉ. पानतावणे यांचं आणि अस्मितादर्शचं नातं अतूट आहे. भारतातील सर्व दलित साहित्यामध्ये मराठी साहित्याचा आणि चतुरस्त्र संपादक पानतावणे यांचे स्थान विसरून चालणार नाही. त्यांनी साहित्याच्या चार ते पाच पिढ्या घडविल्या. थोर लेखक, विचारवंत डॉ. पानतावणे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर नितांत श्रद्धा होती. या मूल्यांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ही मूल्य वाढविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर वाणी व लेखनी झिझवली. माझी त्यांना श्रद्धांजली.

लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत एकनाथ रंगमंदिर नुतनीकरणासाठी राहणार सहा महिने बंद

$
0
0

(एकनाथ रंगमंदिराचा फाइल फोटो घ्यावा. मेनलीडच्या शेजारी दोन कॉलम लावता येईल)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संत एकनाथ रंगमंदिर नूतनीकरणासाठी १ एप्रिलपासून सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाच्या खासगीकरणाची निविदा लवकर काढण्याचे आदेश देखील प्रशासनाला देण्यात आले.

संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रंगमंदिराच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याशिवाय महापालिकेने ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. अडीच कोटी रुपये खर्च करून रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. या कामाला १ एप्रिलपासून सुरुवात होईल, असे महापौरांनी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट झाले. नूतनीकरणाच्या कामासाठी संत एकनाथ रंगमंदिर सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

सिडकोमधील संत तुकाराम नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी खासगीकरणाचे टेंडर लवकर काढण्याचे आदेश बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आले. संत तुकाराम नाट्यगृहाच्या खासगीकरणाची निवीदा लवकरच निघेल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकोंडी ‘जागर संवाद’चे सोमवारी आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे औरंगाबाद विभागीय केंद्र व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'कचराकोंडी जागर संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (२ एप्रिल) सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत जेएनईसी महाविद्यालयाच्या आर्यभट्ट सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. मुंबई शहराच्या कचऱ्याच्या प्रश्नावर विविध संस्थांच्या सोबत ज्यांनी काम केले आहे असे ज्येष्ठ अभ्यासक, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शंकर काळे यावेळी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम उपस्थित राहणार आहे. शहरातील नागरिकांनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य बातमी…… (डॉ. गंगाधर पानतावणे निधन)

$
0
0

भीमतारा निखळला

..

विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

....

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अस्मितादर्श'कार, ज्येष्ठ दलित साहित्यिक, पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे (वय ८२) यांचे मंगळवारी (२७ मार्च) पहाटे दोन वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली (निवेदिता, नंदिता) जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी छावणीमधील… स्मशानभूमीत………… शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. पानतावणे हे संबंध महाराष्ट्राला एक विचारवंत लेखक, दलित साहित्याचे अभ्यासक, संपादक म्हणून परिचित होते. गेल्या काही महिन्यांपासून ते मोठ्या आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर माणिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारसाठी नंतर एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अखेर मंगळवारी पहाटे दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचे पार्थिव मिलिंद कॉलेज समोरील 'श्रावस्ती' या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दिवसभर साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहून कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

'अस्तितादर्श` या त्रैमासिकाच्या संपादकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे ग्रंथ त्यांनी संपादन केले होते. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिक म्हणून 'अस्मितादर्श'कडे गंगाधर पानतावणे यांच्यामुळेच पाहिले गेले.

\Bग्रंथसंपदा \B

डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ मध्ये अमेरिकेतील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. 'धम्मचर्चा' 'मूल्यवेध','मुकनायक', 'विद्रोहाचे पाणी पेटले आहे', 'वादळाचे वंशज', 'दलित वैचारिक वाङमय', 'किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड',' साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती', 'साहित्य शोध आणि संवाद' हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुराणवस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण अडकले वाटाघाटीत, तीन महिन्यांपासून मार्ग निघेना

$
0
0

(मेनलीडच्या खाली किंवा शेजारी लावावी. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा फाइल फोटो घेता येईल.)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे प्रकरण मात्र 'वाटाघाटीत' अडकले आहे. वाटाघाटीच्या प्रक्रियेत गेल्या तीन महिन्यांपासून मार्ग निघत नसल्यामुळे नूतनीकरण केव्हा सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय लेबरकॉलनी परिसरात आहे. गेल्या काही वर्षापासून या संग्रहालयाच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात आलेले नाही. पावसाळ्यात वस्तूसंग्रहालयाची दालने गळतात, या प्रकारामुळे वस्तूसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी कल्पना तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी मांडली. केवळ नूतनीकरण न करता वस्तूसंग्रहालयाच्या परिसरात अभ्यासिका करण्याचा प्रस्ताव देखील त्यांच्या काळात मंजूर झाला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकतृत्वावर अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी या ठिकाणी सुसज्ज वाचनालय असावे असा उल्लेख प्रस्तावात करण्यात आला. वस्तूसंग्रहालयाचे नूतनीकरण व वाचनालयाचे बांधकाम यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या कामासाठी एजन्सी निश्चित करून काम सुरू करणे बाकी आहे. महापालिकेची यंत्रणा गेल्या तीन महिन्यांपासून एजन्सीबरोबर वाटाघाटी करण्यात दंग आहे, अद्याप त्यातून मार्ग निघाला नाही. त्यामुळे नूतनीकरणाचे काम रखडले आहे.

जालनारोड वरील महर्षि दयानंद चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरकरण्यात आला होता, पण या चौकात पुतळा उभारण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे पुतळा न उभारता त्याच चौकात बाळासाहेब ठाकरे यांचे म्युरल लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन तयार करण्याचा निर्णय देखील महापालिकेने घेतला होता, त्याचा आढावा मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतला तेव्हा या स्मृतिवनासाठी पीएमसी नियुक्त करण्याचे काम दोन-चार दिवसात होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालू बिलासह दरमहा एक कोटी देण्याची हमी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेने विद्युत बिलाची थकीत एक कोटी, तर चालू बिलाची पूर्ण रक्कम एप्रिलपासून महिन्याला भरण्याची हमी घेतल्यामुळे महावितरणचा दिवाणी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी निकाली काढला. या निर्णयामुळे पालिकेला आता मे महिन्यात बिल भरावे लागणार आहे.

महापालिकेने विद्युत बिलाची थकीत २८ कोटींची रक्कम न भरल्यामुळे शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारा दिवाणी अर्ज महावितरणने केला होता. ७ फेब्रुवारी २०१७ रोजी शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यास सशर्त स्थगिती देताना खंडपीठाने घातलेल्या अटींचे महापालिका पालन करीत नाही असा आक्षेप महावितरणने दिवाणी अर्जात घेतला होता.

२०१७ ला थकीत वीज देयकांमुळे खंडित करण्यात आलेला शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्या जनहित याचिकेसह महापालिकेने दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने ७ फेब्रुवारी २०१७ रोजी सशर्त स्थगिती दिली होती. महापालिकेने दहा दिवसांत एक कोटी रुपये जमा करावेत. महावितरणने शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरू करावा, असा आदेश दिला होता. महापालिकेकडे असलेली वीजबिलाच्या थकबाकीपोटी एलबीटीचे २० कोटी २ लाख १८ हजार २५२ रुपये महावितरणने वळते केले आहेत. एलबीटीच्या या २० कोटी रुपयांचे सप्टेंबर २०१४ ते मे २०१७ पर्यंतचे १२ कोटी ४ लाख ३८ हजार २४७ रुपये व्याज महावितरणला माफ करण्याचा ठराव महापालिकेच्या स्थायी समितीने २३ ऑगस्ट २०१७ ला मंजूर केला होता. अतिरिक्त मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी २८ नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाला पत्र लिहून स्थायी समितीने १२ कोटी रुपये व्याज माफ करण्याचा मंजूर केलेला ठराव महापालिकेच्या आर्थिक हिताच्या विरुद्ध असल्यामुळे तो विखंडित करण्याची विनंती केली होती. त्यावरुन नगर विकास खात्याने ३ मार्च २०१८ रोजी स्थायी समितीचा व्याज माफीचा ठराव ३० दिवसांसाठी निलंबित केला आहे.

त्या पार्श्वभूमीवर महावितरणने महापालिकेला नोटीस पाठवून फेब्रुवारी २०१८ पर्यंत शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलाचे थकीत १३ कोटी ६५ लाख, मनपाच्या इतर जोडण्यांचे एक कोटी ७२ लाख, पाण्याच्या बिलाचे १२ कोटी ८२लाख असे एकूण २८ कोटी १९ लाख रुपये आणि शहराचे एक कोटी २९ लाख रुपये त्वरित भरण्याचे सूचित केले आहे. पालिकेच्यावतीने राजेंद्र देशमुख यांनी विद्युत बिलाच्या थकबाकीपोटी आतापर्यंत ३ कोटी ८६ लाख रुपये जमा केल्याचे निवेदन केले. या प्रकरणात महावितरणतर्फे अनिल बजाज, तर महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरांच्या मृत्यू, प्रतीक्षा वैद्यकीय अहवालाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिवरखेडा नांदगीरवाडी जंगल परिसरात मृतावस्थेत आढळून आलेल्या चार मोरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विषबाधेमुळे मृत्यू झाला असावा, अशी चर्चाही होत असताना वन अधिकाऱ्यांनी मात्र उष्मघाताने मृत्यू झाला असावा, अशीच रिघ ओढली आहे. दरम्यान, न्यायवैद्यक प्रयोगशाळेत व्हिसेरा पाठविण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूमागील कारण समजले, असे वन अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

संरक्षित वन क्षेत्र असलेल्या हिवरखेडा परिसरात १७ मार्च रोजी चार मोर मृतावस्थेत आढळले. वन परिक्षेत्र अधिकारी ए. जे. राहाणे, सहाय्यक वन संरक्षक प्रशांत वरुडे, वनरक्षक नाना सोनवणे आदींनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत व्हिसेरा पाठविण्यात आला असून अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही, अशी माहिती राहाणे यांनी दिली. विषबाधेमुळे मृत्यू झाला असावा, अशी चर्चा होत असतानाच अधिकाऱ्यांनी मात्र प्रथमदर्शनी उष्मघातामुळेच मोरांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. वैद्यकीय अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल, असे वन अधिकारी राहाणे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सु. भु. आज पालकसभा

$
0
0

'सभु'त पालकसभा आज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरस्वती भुवन कला व वाणिज्य कॉलेजमध्ये बुधवारी (२८ मार्च) उन्हाळी वर्गास सुरुवातनिमित्त पालकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. भूमकर सभागृहात सकाळी ११ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार असतील. उन्हाळी वर्गाची आवश्यकता, नियमित हजेरीचे महत्व, शैक्षणिक नियोजन यावर चर्चा, मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गंगाधर पानतावणे - प्रतिक्रिया डॉ. नागनाथ कोतापल्ले

$
0
0

डॉ. गंगाधर पानतावणे आणि मी जवळपास १५ वर्ष सहकारी होतो. त्यावेळी त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू पहावयास मिळाले. त्यांचे घर कार्यकर्त्यांसाठी आणि सेवकांसाठी कायम खुले असायचे. ते सतत नव्या नव्या कविंच्या आणि लेखकांच्या शोधात असायचे. दलित साहित्याच्या प्रारंभीच्या काळात अस्तिमादर्शने मोलाची भूमिका वठवलेली आहे. किंबहुना यामुळेच दलित साहित्याची चळवळ वाढली.

- डॉ. नागनाथ कोतापल्ले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी अधिकारांची जाणीव ठेवावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'केवळ एकाच दिवशी सर्व्हे करुन प्रशासकीय यंत्रणा संवेदनशील होणार नाही. यंत्रणेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महिलांनाही त्यांच्या अधिकारांची जाणीव ठेवावली लागणार आहे. अधिकाराची माहिती असल्यास कुणीही टोलवाटोलवी करणार नाही,' असे मत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.

शेती योजनांचा लाभ या विषयावर मंगळवारी (२७ मार्च) महसूल प्रबोधिनी येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य महिला आयोग आणि विभागीय आयुक्तालयाच्या माध्यमातून दोन दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वारसा नोंदी, शेती योजनांचा लाभ, महिलांना अर्थसाह्य या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, वारसा हक्काने आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या नोंदीसंदर्भात फारशा अडचणी येणार नाहीत, यात केवळ वाद असेल तर प्रकरण न्यायालयात जाते. बचत गटाच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर असून याचा फायदाही महिलांनी घेण्याची गरज आहे. तुमच्या अधिकाराच्या बाबतीत तुम्ही जागृत राहणे गरजेचे आहे. विषयाची माहिती असल्यास तुम्हाला कोणताही अधिकारी टोलवाटोलवी करणार नाही. सध्या शेतीमध्ये जास्तीत जास्त महिला काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपायुक्त वर्षा ठाकूर म्हणाल्या की, अनेकदा महिलांवर होणाऱ्या लैगिक अत्याचाराबाबत तक्रारी केल्या जात नाहीत, या बाबत तक्रार करणे गरजेचे आहे. अन्याय सहन करू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दफनभूमीसाठी सुविधा द्या, भाकपचे पालिकेसमोर धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगर येथील नाथजोगी समाजाच्या दफनभूमीमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दफनभूमीत आवश्यक त्या सुविधा देण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयुक्तांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'समर्थनगर भागात सत्तर ते ऐंशी वर्षांपासून नाथजोगी समाजाची दफनभूमी आहे. औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सुमारे २० ते २५ हजार लोकसंख्या या समाजाची आहे, या समाजासाठी समर्थनगरात एकमेव दफनभूमी आहे. दफनभूमीच्या परिसरात झाडेझुडपे वाढलेली आहेत, घाणीचे साम्राज्य आहे, दफनभूमीत शेड नाही, संरक्षक भिंत नाही, पाण्याची व्यवस्था नाही, दिवाबत्तीची सोय नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने सत्तावीस दिवसांपूर्वी या समस्यांबद्दल महापौरांनी भेट घेऊन निवेदन दिले तेव्हा संरक्षण भिंत बांधून देण्याचे, पाण्यासाठी हापसा घेऊन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, पण अद्याप त्याची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भाकपच्या शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली तेव्हा आवश्यक त्या सुविधांसाठी पंचेवीस लाख रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. धरणे आंदोलनात प्रा. राम बाहेती, अश्फाक सलामी, भास्कर लहाने, राहुल बोरकर, किशोर लाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या बांधकाम परवानगीत आता कचरा प्रक्रियेची अट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या बांधकाम परवानगीत आता कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची अट टाकण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या हाऊसिंग सोसायटीमधून दररोज शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निघतो त्या सोसायटींना कचऱ्यावरील प्रक्रियेची सक्ती केली जाणार आहे.

शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचराकोंडीमुळे नागरिकांसह प्रशासन देखील त्रस्त आहे. कचराकोंडीवर उपायशोधण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. पालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी दिली जाते. वैयक्तिक घर बांधणीसह हाऊसिंग सोसायटी, अपार्टमेंटच्या बांधकामाला देखील नगररचना विभागाची परवानगी लागले. बांधकाम परवानगी देताना आता कचऱ्यावरील प्रक्रियेचा मुद्दा तपासून पाहिला जाणार आहे. ज्या हाऊसिंग सोसायटींमधून रोज शंभर किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निघतो त्या हाऊसिंग सोसायटींना कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याची अट टाकूनच यापुढे बांधकाम परवानगी दिली जाणार आहे.

कचरा प्रश्न सुटेपर्यंत सर्व विभागप्रमुखांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना आपली कार्यालये सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात शहर अभियंता सखाराम पानझडे यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त विक्रम मांडुरके यांना विशेष कार्यअधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठी सिंगल. पीईएस इंजिनीअरिंग

$
0
0

पीईएसमध्ये मोफत सीईटी क्रॅश कोर्स

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनीअरिंगच्या सीईटीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पीईएस अभियांत्रिकी कॉलेजतर्फे मोफत सीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा, अभ्यासक्रम, गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषयांचा अभ्यासक्रम याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ५० दिवसांचा हा क्रॅश कोर्स असणार आहे. अभ्यासक्रमासोबत आठवड्याला सराव परीक्षा असणार आहे. माहिती आणि नावनोंदणीसाठी सिव्हील विभागातील प्रा. शिवाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, आयोजक डॉ. राजमहेंद्र सावंत यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटसक्ती मुख्य रस्त्यावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हेल्मेटसक्ती ही गल्ली बोळातून करण्याऐवजी मुख्य रस्त्यावर महत्त्वाची आहे. मात्र नागरिकांनी हेल्मेटला सक्ती न समजता स्वत:च्या सुरक्षेसाठी वापरण्यावर भर द्यावा,' असे आवाहन प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले. शहरातील वाहतूक समस्येबाबत मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत लवकरच एक बैठक घेणार असून या बैठकीत उपाययोजना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शहरात वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. पोलिस आयुक्त भारंबे यांना मुंबई येथील वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. शहरातील वाहतूक समस्येबाबत उपाययोजना राबवण्याबाबत लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये शहरातील नागरिकांशी चर्चा करून देखील त्यांच्याकडून वाहतूक समस्यांची माहिती घेण्यात येणार आहे. मुंबई येथे भारंबे यांनी उपक्रम राबवताना संस्था, संघटनांना तेथील सिग्नल दत्तक दिले होते. हा प्रयोग औरंगाबादमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योजक, व्यापारी, संस्था संघटनांना सामील करून घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडून ट्रॅफिक वॉर्डन तसेच इतर मदत झाल्यास वाहतूक पोलिसांवरील ताण कमी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरात हेल्मेटसक्ती ही गल्ली बोळात करण्याची गरज नाही, मुख्य रस्त्यावर मात्र हेल्मेट वापरले पाहिजे, असे ते म्हणाले.

\Bदंगा काबू पथक तयार

\B

मिटमिटा येथील दंगलीनंतर मिलिंद भारंबे यांनी पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मिटमिटा येथील दंगलीमध्ये अनेक पोलिस कर्मचारी, अधिकारी जखमी झाले होते. आयुक्त भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर या पद्धतीचा दंगलग्रस्त परिस्थिती काबूत आणण्यासाठी स्वंतत्र दंगा काबू पथक निर्माण करण्याचे आदेश दिले होते. त्यात १७५ तरुण पोलिसांचा समावेश आहे. या पथकाचे प्रशिक्षण सुरू असून त्यांचा गणवेश देखील वेगळा देण्यात आला आहे. या पथकाला लवकरच गोळीबाराचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयुक्त भारंबे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. रमा मराठे यांचे व्याख्यान

$
0
0

जीवनशैलीची 'पंचसूत्री' जपा

डॉ. मराठे यांचे प्रतिपादन

म. टा प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिकदृष्ट्या समृद्ध असणे म्हणजे उत्तम जीवनशैली नव्हे. सर्व सुखसोयी, संधी-सुविधा मिळूनही माणूस वैफल्यग्रस्त आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी वेळ, श्रम, पैसा याचं गणित साधणं, भावनिक व सामाजिक बुद्धांक उच्चतम असणे, जीवन विषय भान, ज्ञान आणि विवेकनिष्ठ तत्वज्ञान, आत्मविष्कार आणि आरोग्य, कल्पकता व सजृनशीलता ही पंचसूत्री महत्त्वाची ठरते, तुमची जीवनशैली बदलते, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रमा मराठे यांनी आज केले.

'लाईफ स्टाईल' या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक राम भोगले, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, साकेत प्रकाशनच्या आशा भांड, 'महाराष्ट्र टाइम्स'चे सहायक वरिष्ठ संपादक प्रमोद माने यांची प्रमुख उपस्थिती होती. साकेत प्रकाशनच्या या कार्यक्रमाचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर होता. यावेळी लेखिका डॉ. मराठे पुढे म्हणाल्या की, 'एकविसाव्या शतकात जग वेगाने जग बदलत आहे. समस्या आणि संधी दोन्ही झपाट्याने वाढत आहेत. जगण्याचे, जीवनशैलीचे निकष बदलले. लाईफ स्टाइल सुपरफास्ट वेगाने बदलते आहे. ८० टक्के आजार हे जीवन पद्धतीमुळे होत असल्याचे समोर येत आहेत. सर्व सुखसोयी मिळूनही, संधी सुविधा असूनही वैफल्यग्रस्तता वाढते आहे. दोन पिढ्यातील अंतर बदलले, मतमंतातरे वाढली, नात्यातील गुंता वाढला. जुने उपाय उपयोगाचे राहिले नाहीत. प्रश्न व समस्या वाढल्या. अशावेळी चांगल्या जीवनशैलीसाठी अनेकजन प्रयत्न करतात. तुमची जीवनशैली ठरविण्याचा अधिकार, स्वातंत्र तुम्हालाच आहे. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असली तरी, इतरांच्या जीवनशैलीकडे बघून आपली तशी असावी असे अनेकांना वाटते. आपली जीवनशैली कशी असावी, यासाठी तसे नियोजन करणे महत्वाचे असते. चांगली 'जीवनशैली' हवी असेल तर, स्वत:तील क्षमता, आवड ठरवून तसे करिअर निवडणे गरजेचे आहे. आत्माविष्कार ही मूलभूत गोष्ट आहे. ज्याची जीवनशैली चांगली त्याला आत्मविष्कार झाला. आयुष्याचं सोनं करणाऱ्या जीवनशैलीचे पाच गुणसूत्र कोणते असे मला विचाराल तर, श्रम, पैसा याचं गणित साधणं, भावनिक व सामाजिक बुद्धांक उच्चतम असणे, जीवन विषय भान, ज्ञान आणि विवेकनिष्ठ तत्वज्ञान, आत्मविष्कार आणि आरोग्य आणि कल्पकता, सजृनशिलता ही पंचसूत्री आहे. प्रत्येकात एक सुपरस्टार लपलेला आहे, पंरतु स्वत:तील तो सुपरस्टार ओळखता यायला हवा, असेही त्या म्हणाल्या. उद्योजक राम भोगले यावेळी म्हणाले, 'माझ्या दृष्टीने यश म्हणजे आपण जे करत असतो त्याचा आनंद पुरेपूर उपभोगता येणे आणि स्वत:च्या आयुष्याबाबत समाधानी असणे, हे होय'. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार सारंग टाळकळकर यांनी मानले. कार्यक्रमास साकेत प्रकाशनचे साकेत भांड, प्रतिमा भांड, उपजिल्हाधिकारी, साहित्यिक अंजली धानोरकर, ज्येष्ठ साहित्यिक छाया महाजन, उपायुक्त वर्षा ठाकूर आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू डॉ. चोपडेंच्या कामकाजाची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजाची चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढले आहेत.

डॉ. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात अनेक संघटना, व्यक्ती यांच्या तक्रारी कुलपतींकडे, तसेच शासनाकडे प्राप्त झाल्यामुळे राज्यपालांच्या निर्देशासानुसार सर्व तक्रारींचा पडताळा करून प्राथमिक अहवाल मागवण्यात येणार आहे. तक्रारीसंदर्भात चौकशी करण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त कुलगुरु डॉ. एस. एफ. पाटील यांची नियुक्ती केली आहे. चौकशी अधिकाऱ्यांना संबंधितांचा जाब-जबाब नोंदवता येणार असून चौकशीसाठी आवश्यक ते दस्तावेज, कागदपत्र उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या कुलसचिवांची राहणार आहे. डॉ. एस. एफ. पाटील यांनी चौकशी करून सदर अहवाल थेट शासनाकडे द्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

\Bघोटाळ्यांचाही आरोप

\B

चोपडे यांनी विद्यापीठात बेकायदा नेमणुका केल्या, बेकायदा खरेदी, संशोधन पेपरप्रसिद्धीत घोटाळा केल्याचा आरोप आहे. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेतही करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगनाथबुवांच्या वंशजांकडे सालपाळी देण्याचे आदेश

$
0
0

रंगनाथबुवांच्या वंशजांकडे सालपाळी देण्याचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील नाथवंशजांनी सालपाळीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल दिवाणी अर्जात रंगनाथबुवा गोसावी यांचे वंशज हरी पंडित गोसावी व इतरांकडे या २९ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता सालपाळी देण्याचे आदेश न्या. रविंद्र घुगे यांनी दिले.

ही सालपाळी २९ मार्च २०१९ पर्यंत, मराठी महिन्यानुसार पुढील फाल्गुन नवमीपर्यंत याचिकाकर्त्यांकडे राहील. त्यानंतर त्यांनी पुन्हा रघुनाथबुवा गोसावी यांच्याकडे सालपाळी सोपवावी. अर्जदार हरी पंडित गोसावी यांनी वर्षभरातील उत्पन्नाचा योग्य वापर करण्यासंदर्भातील शपथपत्र १० एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले. रघुनाथबुवा गोसावी यांना खंडपीठाने १० मार्च २०१८ पर्यंत दोन्ही मंदिराचा कारभार सोपविला होता. त्याप्रमाणे त्यांच्याकडे या १० मार्चपर्यंत सालपाळी होती. त्यानंतर रंगनाथ बुवा यांच्या वंशज व इतरांकडे सालपाळी सोपविणे आवश्यक होते, पण रघुनाथबुवा गोसावी यांनी सालपाळी सोपविण्यास नकार दिल्याने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत सदर दिवाणी अर्ज सादर करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर तपासणीसाठी अधिकाऱ्यांचे पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला असताना टँकरची संख्या २३१वर पोचली आहे. सध्या टँकर सुरू असलेल्या गावांत खरंच टँकरची गरज आहे काय, तसेच या गावाची पाण्याबाबतची सद्यस्थिती तपासण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. जिल्ह्यात टँकरलॉबीची सक्रिय झाल्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पथक नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकात फुलंब्री तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, सिल्लोड तालुका श्रीमंत हारकर, गंगापूर तालुका भाऊसाहेब जाधव, तर खुलताबाद तालुक्यात सुरू असलेल्या टँकर तपासणीसाठी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकाने टँकर मंजूर असलेल्या गावांची लोकसंख्या, तेथील पाणीपुरवठ्याची उपलब्‍ध साधने व स्थिती, त्याद्वारे रोज होणारा पाणीपुरवठा, टंचाईग्रस्त गावांमध्ये सध्या उपलबध असलेल्या इतर स्‍त्रोतापासून पाणी मिळत असल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा गरजेचा आहे काय, तसेच पेयजल, टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांमध्ये पाणीपुरवठा करण्याव्यतिरिक्त अन्य उपाययोजना घेणे शक्य आहे काय याबाबत गावनिहाय स्थळपाहणी तपासणी अहवाल सादर करणार आहे. तसेच टँकर सुरू ठेवणे आवश्यक आहे काय याचा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत.

\Bजलयुक्त गावांमध्येही टँकर \B

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू आहे. या योजनेवर कोट्यवधी रुपयेही खर्च करण्यात आले. त्यानंतरही जलयुक्त झालेल्या गावांमध्ये प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले. २०१५-१६ या वर्षामध्ये जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २२८ गावात अभियानाची कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यापैकी गेल्यावर्षी ५५ तर यंदा तब्बल ४३ गावांमध्ये टँकर सुरू आहेत.

तालुकानिहाय टँकर

तालुका.......... गावे.............. टँकर

औरंगाबाद........१६................२६

फुलंब्री..............३३.............४७

गंगापूर..............७६...............८०

वैजापूर............१६...............१७

खुलताबाद..........१२.............१०

कन्नड..............११............०९

सिल्लोड...........२६............४२

एकूण............१९०.............२३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समिती सभापतींची चार एप्रिलला निवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक चार एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम सचिव विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीचे आठ सदस्य देखील निवृत्त होत आहेत. एक मे रोजी त्यांची स्थायी समितीमधील मुदत संपत आहे.

महापालिकेचे नऊ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागाची एक समिती असून त्याचा सभापती निवडला जातो. सभापती निवडीसाठी चार एप्रिल रोजी निवडणूक ठेवण्यात आली आहे. यासाठी दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज वितरित केले जातील. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख तीन एप्रिल आहे आणि चार एप्रिलला मतदान होणार आहे. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून त्यापैकी आठ सदस्य एक मे रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सभापती गजानन बारवाल यांच्यासह कीर्ती शिंदे (अपक्ष), मनीषा मुंडे, राजगौरव वानखेडे (भाजप), सोहेल शकील शेख (काँग्रेस), अजीम अहेमद रफिक, संगीता वाघुले (एमआयएम), सीताराम सुरे (शिवसेना) यांचा समावेश आहे. स्थायी समितीमधून निवृत्त होण्यापूर्वी काही महत्त्वाचे निर्णय व्हावेत असा प्रयत्न केला जात आहे. त्यात प्रामुख्याने दीडशे कोटींच्या रस्त्यांची निविदा, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खरेदी करावयाच्या मशीन्सची निविदा मंजूर करण्याचा विषय सध्या चर्चेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images