Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डायरी (३० मार्च २०१८)

$
0
0

डायरी (३० मार्च २०१८)

…....

-अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम.

स्थळ : दक्षिणमुखी हनुमान मंदिर, जे-सेक्टर, मुकुंदवाडी

वेळ : पहाटे ४ पासून

-दत्त उपासना यज्ञ.

स्थळ : यशोमंगल मंगल कार्यालय, उस्मानपुरा

वेळ : सकाळी ८ पासून

- जेएनईसी महाविद्यालयातर्फे स्वयंभू महोत्सव.

स्थळ : आर्यभट्ट सभागृह, महाविद्यालय परिसर

वेळ : सकाळी ११

-मिलिंद महाविद्यालयातर्फे नागसेन महोत्सव.

स्थळ : मिलिंद महाविद्यालय परिसर

वेळ : सायंकाळी ६

-सिद्धा महोत्सवाअंतर्गत संगीत रजनी.

स्थळ : जिल्हा परिषद मैदान, औरंगपुरा

वेळ : सायंकाळी ७

….....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


होमसिटी केबलचे साहित्य चोरल्याने चौघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

होम सिस्टिम केबल नेटवर्कची केबल वायर व जॉइंट बॉक्स चौघांनी पळवल्याची घटना मंगळवारी दुपारी प्रोझोन मॉल ते एपीआय कॉर्नर परिसरात घडली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजेश भद्रा (वय ४५, रा. बोरीवली, मुंबई) या होम सिटीच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली. एका ग्राहकाने मंगळवारी रात्री भद्रा यांना एपीआय कॉर्नर भागात केबल दिसत नसल्याची तक्रार केली. भद्रा; तसेच त्यांचे सहकारी बलराज देशमुख, किरण लखनानी व अजय डांगे यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी प्रोझोन मॉल ते एपीआय कॉर्नर भागात केबल वायर व जॉइंट कपलर बॉक्स चोरीस गेल्याचे आढळून आले. तेथील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार चित्रित झाला आहे. याप्रकरणी भद्रा यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश उमरीकर, प्रवीण गायकवाड, राहुल गायकवाड; तसेच अमोल सनांसे यांच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंदोन परिसरात नीलगायचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चार मोरांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असतानाच एका नीलगायीचा सिंदोन परिसरात निलगायीचा मृतदेह आढळून आला आहे. हा अपघाती मृत्यू असल्याचा दावा वन विभागाकडून केला जात आहे.

सिंदोन, भिंदोन परिसरातील एका शेताच्या बांधावर बुधवारी नीलगाय मृत अवस्थेत आढ‌ळून आली. माहिती मिळताच औरंगाबाद उपविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी एस.बी. तांबे, वनपाल शिवाजी चव्हाण, एच.के. घुसिंगे, एस.बी. चव्हाण, वनरक्षक आर.टी. राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला तर पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. प्रथमदर्शनी अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

यासंदर्भात तांबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या शेतात नीलगायचा मृतदेह आढळून आला आहे, ते जंगल लगत असून शेजारी डोंगर आहे. नीलगाय डोंगर परिसरातून आली आणि शेत परिसरात उभारण्यात आलेल्या संरक्षक कुंपणावर धडकली. यात नीलगायच्या कानाजवळ गंभीर दुखापत झाली आणि त्यातच नीलगायचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांचे वेतनेतर अनुदान जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान शासनाने जाहीर केले आहे. वेतनेतर अनुदानाचा प्रश्न अनेकदा शाळांकडून चर्चिला गेला. अनुदानासाठी शाळांना शासनाने काही निकष घालून दिले आहेत. भौतिक सुविधांची पूर्तता, शिक्षक भरतीसाठी 'सीईटी', 'टीईटी'चे नियम पाळणे आवश्यक असणार आहे.

राज्यातील शाळांना सोयीसुविधा, डागडुजी, शैक्षणिक साहित्यासाठी शिक्षकेतर अनुदान २००४ पासून मिळत नव्हते. २०१३नंतर याची चर्चा झाल्याने काही अंशी वेतनेतर अनुदान मिळाले. पण, ते अत्यंत तुटपुंजे असल्याने राज्यातील शाळा व्यवस्थापनांकडून नाराजी व्यक्त होत होती. यानंतर आता शाळांना वेतनेतर अनुदानापोटी १८५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले. हा निधी जिल्हानिहाय मंजूर करण्यात आला आहे. शाळानिहाय निधी वितरणाचा अहवालही त्यासाठी शिक्षण विभागाला एप्रिलपर्यंत द्यायचा आहे. अनुदानात चार टक्के वेतनेतर अनुदान व इमारत भाडे, देखभालीसाठी एक टक्का अनुदान, असे एकूण पाच टक्के अनुदान आहे. शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने राज्यातील अनुदानित शाळांनी आंदोलन केले होते. वेतनेतर अनुदान जुन्या पद्धतीने देऊ नये, अशी मागणी होती.

\B 'अटी'वर असेल नजर

\B

शासनाने अनुदानासह शाळांना अटी घातल्या आहेत. पहिली अट 'आरटीई' अंतर्गत भौतिक सोयीसुविधांची पूर्तता पूर्ण करणे, खासगी अनुदानित शाळांसाठी शासनाने केंद्रीय भरती पूर्व परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा लागू केल्यानंतर त्यानुसार शिक्षक भरती करणे आवश्यक आहे. २००४-०५ ते २०१२-१३ या कालावधीकरिता वेतनेतर अनुदानाची थकबाकी अनुज्ञेय नाही. या अटी घातल्या आहेत. त्यांची शहानिशा करूनच अनुदान वितरित करणे शिक्षण विभागाला बंधनकारक आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल तसेच उपयोगिता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

\Bमाध्यमनिहाय शाळा\B

\Bमराठी २२०८३

उर्दू……… २७८९

हिंदी ………४६\B

\Bमराठवाड्यातील एकूण शाळा..२९५८५

अनुदानित शाळा……………….११६९७\B

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावीर जयंती उत्साहात साजरी (एकत्र सर्व बातमी )

$
0
0

मिलकर बोलो जय महावीर

महावीर जयंती उत्साहात साजरी, मिरवणुकीतून सामाजिक संदेशाचे दर्शन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगाला 'जिओ और जिने दो'चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती औरंगाबादेत गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीतून जैनबांधवांनी सामाजिक एकोपा, अहिंसा, पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा, बेटी बचाव, शाकाहार याबाबत जनजागृती केली. सजीव, निर्जिव देखाव्यातून समाजजागृतीचे दर्शन घडवीत, पारंपारिक ढोल ताशा, लेझीम पथकांच्या सादरीकरणाने शहरवासीयांची मने जिंकली.

सकल जैन समाजातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादेत महावीर जयंतीचा उत्सव एकत्रितपणे साजरा केला जातो. गुरुवारी सकाळी सिडको एन तीन येथून १०८ कारची फेरी काढण्यात आली. ही फेरी महावीरचौकात पोचली. तिथे धर्मध्वजवंदन करण्यात आले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, आमदार सुभाष झांबड, जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया, महावीर पाटणी, प्रशांत देसरडा, विकास जैन, रवींद्र मुगदिया आदींसह पदाधिकारी व सकल जैन समाजाचे मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर उत्तमचंद ठोळे छात्रालय व गुरुगणेश नगर येथे परंपरेप्रमाणे धर्मध्वजवंदन झाले.

महावीर जयंतीनिमित्त असलेले मुख्य आकर्षण म्हणजे मिरवणूक. पैठण गेट येथून मिरवणुकीला सकाळी प्रारंभ झाला. आचार्य कुशाग्रनंदी महाराज, पुनीतसागर महाराज, आगमसागर महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. औरंगाबादमधील महावीर जयंती उत्सव पाहण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणी समाजबांधवांमध्ये असलेला एकोपा वाखाखण्याजोगा आहे. तो कायम ठेवावा. भगवान महावीरांनी दिलेल्या संदेशाची आपण अंमलबजावणी करावी, असे आवाहन कुशाग्रनंदी महाराज यांनी मार्गदर्शन करताना केले. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, डॉ. कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापौर त्र्यंबक तुपे, बसवराज मंगरुळे, दयाराम बसैये, अनिल मकरिये, प्रशांत देसरडा, विकास जैन, सुरेंद्र कुलकर्णी, समीर राजूरकर, नगरसेवक नितीन चित्ते, किर्ती शिंदे, गोपाल कुलकर्णी, महेश माळवतकर, मनीषा भन्साळी, जयश्री वाडकर, जीएसए अन्सारी आदींची मिरवणुकीत उपस्थिती होती. मुलींचे लेझीम पथक, ढोला ताशा पथक विशेष आकर्षण ठरले.

पैठणगेट, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, शहागंज मार्गावरून मिरवणूक निघाली. मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी मार्गावर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांनी स्वागतफलक उभारले होते. चौकाचौकात पिण्याचे पाणी, सरबत, खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. समितीने जाहीर केल्यामुळे प्लास्टिकमुक्त मिरवणुकीचे दर्शन या मार्गावरून झाले. मिरवणुकीनंतर सकल जैन समाजातर्फे सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. आमदार सुभाष झांबड यांच्यावतीने वृक्ष भेट देण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महाप्रसादाच्या ठिकाणी करण्यात आले. ३०० जणांनी रक्तदान केले. वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मिरवणूक मार्गाची स्वच्छता करण्यात आली. उत्सवासाठी समितीचे मुकेश राहुजी, भारती बागरेचा, अनिल संचेती, करुणा राहुजी, मिठालाल कांकरिया, रमेश घोडके, भावना सेठिया, राजेश मुथा, निलेश पहाडे, मंगला गोसावी, मधू जैन, मंजू पाटणी, नरेंद्र अजमेरा, मंगला पारख, कविता अजमेरा, विलास राहुजी, संजय संचेती, रवी मुगदिया, अनिल संचेती, प्रवीण भंडारी, कल्पेश गांधी, विकास रायमाने, पियुष कासलीवाल, संतोष पापडीवाल, संजय सुराणा, अंकुर साहूजी, रवी लोढा, मीना पापडीवाल, वासंती काळे आदींसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

………….

चौकट क्रमांक एक

…………….

महावीर रसोईघर गाडीचे लोकार्पण

महावीर जयंतीनिमित्ताने सकल जैन समाज समितीतर्फे महावीर रसोई घर गाडीचे लोकार्पण करण्यात आले. ही गाडी ३६५ दिवस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातातील रूग्णांना अन्नदान करणार आहे. अजित अलर्ट ग्रुपचे व्यवस्थापन राहणार असून रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना दररोज भाजी, पोळी, वरण, भात मोफत दिले जाईल.

………..

चौकट क्रमांक दोन

………….

कार मिरवणुकीतून सामाजिक संदेश

……….

सिडकोतील ज्युनिअर रॉयल जैन ग्रुपच्या वतीने १०८ कारची मिरवणूक काढण्यात आली. त्यातून कचरा व्यवस्थापन, क्लीन सिटी-ग्रीन सिटी, साक्षरता, वाहतूक व्यवस्थापन, वीज वाचवा, पाणी वाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, जैन धर्माची शिकवण, जैन साधू संतांची शिकवण, भगवान महावीर यांचे विचार यांची शिकवण संदर्भात घोषवाक्य ठेवण्यात आले होते. त्यातून सामाजिक संदेश देण्यात आला.

…….

चौकट क्रमांक तीन

………………

सामाजिक देखावे ठरले आकर्षण

……….

तेरणा स्वाध्याय मंडळातर्पे जैन धर्म, आत्मधर्म आहे. याची माहिती देणारा देखावा सादर करण्यात आला. जैन श्वेतांबर तेरापंथ सभेच्या वतीने सर्वधर्मसमभाव अहिंसा यात्रा, वर्धमान रेसिडेन्सी चे ढोलताशा पथक व जैन कल्चर ऑफ इंडियाचे सादरीकरण सर्वांची दाद देऊन गेले. शांतीनाथ अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळाने भूमिश्री संपन्नकिर्ती महाराजांच्या जीवनचरित्राची महती सांगणारा निर्जिव देखावा सादर केला होता. भारतीय जैन संघटनेने पाणीबचावचा संदेश दिला. जोहरीवाडा येथील संस्कार महिला मंडळाने भगवंतांचा जन्मोत्सव, सुमतीसागर पाठशाळा, राजाबाजार यांनी चारगतीवर आधारित संदेश देणारा देखावा मिरवणुकीत सादर केला. पी. यू. जैन विद्यालयाने ओला व सुका कचरा विलगीकरण कसे करावे ? याची माहिती दिली. शिवाजीनगर येथील भगवान मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने तीर्थ, राजाबाजार येथील मंडळाने बाहुबली महामस्तकाभिषेक, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर विष्णूनगर यांच्यावतीने शेषनाग अभिषेक, कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल जैन मंदिर सिडको एन नऊ यांनी इंडिया को भारत बनाना है या धर्तीवर देखावा सादर केला. दहेगाव बंगला (ता.गंगापूर) येथील हातमाग प्रशिक्षण केंद्र, चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर हडको यांनी 'अहिंसा व भारत' जैन समाजाचे योगदान हा देखावा सादर केला. कुलस्वामिनी प्रतिष्ठानने शुद्ध आहार शाकाहारचा संदेश दिला. चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जयभवानीनगर यांनी नियोजित मंदिराची प्रतिकृती देखाव्यातून सादर केली. कल्पतरू कुंथूनाथ खंडेलवाल दिगंबर जिनालय बालाजीनगर यांनी पंचकल्याणक महोत्सवाचा देखावा सादर केला. अरिहंतनगर येथील भाविकांनी राजस्थानी नृत्य सादर केले. भगवान महावीर जिनालय, सुराणानगर यांनी सजीव देखावा साकारला होता.

…….

चौकट क्रमांक चार

………….

मिरवणूक मार्गावर खाद्यपदार्थ

………..

मिरवणूक मार्गावर भाविकांसाठी चॉकलेट, सरबत, राजगिरा लाडू, चिक्की, आवळा, थंडाई, बिस्किट आदी खाद्यपदार्थ विविध संस्था, संघटना, संयोजकांच्या वतीने ठेवण्यात आले होते.

……..

चौकट क्रमांक पाच

……………….

मिरवणुकीतील घोषणा

………………………………

महावीरका क्या संदेश- जियो और जिने दो

क्या कहते है वीर भगवान - करो स्वयं अपना कल्याण

तन को करता कौन खराब - अंडा, मांस और शराब

रामराज्य को लाना है - शाकाहार अपनाना है

अहिंसामयी धर्म की जय हो जय हो

माँ का बेटा कैसा हो - भगवान महावीर जैसा हो

वाणी को वीणा बनाओ - जैन धर्म को सब अपनाओ

पुण्य पाप तो कर्म है - वीतरागता धर्म है

जैन धर्म के मीठे बोल - सत्य अहिंसा है अनमोल

महावीर के संदेशो को जीवन मे अपनायेंगे

.....

चौकट क्रमांक सहा

……......

२१ मशीन भेट

…........

सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त महापालिकेला सॅनिटरी नॅपकीन नष्ट करणाऱ्या २१ मशीन भेट म्हणून दिल्या. शहरात सध्या कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. त्यादृष्टीने सॅनिटरी नॅपकिन बायोवेस्टची अडचण दूर व्हावी, यासाठी पालिकेला सॅनिटरी नॅपकीन नष्ट करणाऱ्या २१ मशीन भेट दिल्या. एका मशीनची किंमत २० हजार रुपये आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सकल जैन समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रेल्वेस्टेशन जैन श्रीसंघ, डीकेएमएम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, सिडको रॉयल ग्रुप, तेजस्विनी ग्रुप, सखी मंच महिला ग्रुप, जैनम महिला मंच, रॉयल लायन्स क्लब, रविंद्र खिंवसरा, ए.एम.पी. इन्फ्रा ग्रुप, श्री महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी, सकल जैन ब्लू बेल परिवार, साई सिद्धांत असोसिएटस, प्रसादकुमार कुंकळोल, के. के. व्हेंचर्स, पी. यू. जैन हॉस्टेल, ओसवाल जैन ट्रस्ट, सकल जैन समाज औरंगाबाद ए व बी आदींनी आर्थिक मदत केली. जन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मशीन महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

………………..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप पदाधिकाऱ्यांचा महामेळाव्यासाठी बैठकांवर जोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे सहा एप्रिल रोजी आयोजित भाजपच्या महामेळाव्यासाठी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. महामेळाव्यासाठी कार्यकर्ते, नागरिकांना आणण्याचे उद्दिष्ट प्रदेशाध्यक्षांनी दिले असून, ते गाठण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सध्या बैठकांवर जोर दिला आहे.

मुंबई येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भाजपचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित राहणार असून, महामेळाव्यानिमित्त आपली शक्ती दाखविण्याचे नियोजन भाजपने आखले आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख नेतेमंडळांनी विभागावर बैठका घेऊन शहर, जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना 'टार्गेट' दिले आहेत.

शहर आणि ग्रामीण मिळून किमान पाच हजार कार्यकर्ते मेळाव्याला हजर असावेत, असे निर्देश देण्यात आले आहे. हे 'टार्गेट' पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांसह शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कामाला लागले आहे. विविध आघाड्यांच्या बैठका सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, शहरातून पाच हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते, नागरिक मेळाव्याला येतील, असे नियोजन सुरू आहे. पदाधिकारी, नगरसेवकांसह ज्यांना शक्य आहे, त्यांनी वाहनांची व्यवस्था केली असून, उर्वरित कार्यकर्त्यांसाठी खास रेल्वेची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेएनईसी’मध्ये आजपासून ‘स्वयंभू’ महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी कॉलेजमध्ये 'स्वयंभू-२०१८' टेक्निकल महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

कॉलेजच्या सभागृहात होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला उद्योजक मैथिली तांबोळकर, अभियंते विवेक भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महोत्सवात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांच्या प्रोजेक्ट कॉम्पीटिशन, लॅन गेमिंग, सर्किट मेकिंग, पेपर प्रेझेंटेशन, रोबो रेस, ऑटोकॅड, लेथ वोर, लेवलिंग मास्टर, कार्ट फेस्ट, वेब वॉर आदी स्पर्धां रंगणार आहेत. शिकलेल्या संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा यासाठी या स्पर्धा मार्गदर्शक ठरतात. महोत्सवात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्पर्धांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, उपप्राचार्य डॉ. विजया मुसांडे, संयोजिका प्रा. परमिंदर कौर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवाईसेवेत गुजरातचा आदर्श घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुजरातमधील सुरत शहरात तीन वर्षांपूर्वी दोन विमानसेवा सुरू होत्या. सध्या त्यांची संख्या २७पर्यंत पोचली आहे. तेथील व्यापारी, उद्योजकांसह राज्य शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. औरंगाबादसारख्या शहरातील विमानतळाबाबत राज्य शासनाने; तसेच स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास विमानतळाचा विकास अधिक वेगाने होईल, असे पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक केशव शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विमानतळावरील ध्वजवंदनासाठी ते आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या विविध निर्णयामुळे विमान प्रवाशांच्या संख्येत २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. शासनाच्या धोरणामुळे अडगळीत पडलेल्या अनेक विमानतळावरून विमान सेवा सुरू झाल्या आहेत. 'सर्वसामान्यांना विमान प्रवास' या पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेला आता मूर्त स्वरूप येत आहे. औरंगाबाद शहरात डीएमआयसी प्रकल्प येत आहे. शिवाय या ठिकाणी औद्योगिक विकास चांगला झालेला आहे. या शहरात विमान कंपन्या का वाढत नाहीत, याचा विचार करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले,'अनेक कंपन्या मुंबई आणि दिल्लीसाठी विमान देण्याबाबत प्रस्ताव देत असतात. प्रवाशांची गरज आहे, मात्र त्या ठिकाणी विमानाची असलेली संख्या पाहता, छोट्या विमानाला मोठ्या विमानतळावर जागा मिळेल का, याबाबत शंका उपस्थितीत केली. उड्डाण योजनेचा अनेक छोट्या शहरांना फायदा होत आहे. मग औरंगाबाद मागे का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला. सध्या कंपन्यांकडे विमाने नाहीत. देशात ४७६ विमान उडत आहेत. ही संख्येत येत्या काही वर्षांत ९०० विमानाची भर पडणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षांत औरंगाबादकरांनी काहीही केले नाही तरीही विमान सेवा वाढणार आहे, पण सुरतमध्ये उद्योजक, पर्यटन संस्था; तसेच राज्य शासनाने विमान कंपन्यांना हमी दिल्यानंतर तेथे विमान सेवा सुरू झाली आहे. असे प्रयत्न औरंगाबादकरांनी; तसेच महाराष्ट्र शासनाने केल्यास निश्चित हवाईसेवेचा विकास लवकर होऊ शकेल.'

एव्हिएशन पॉलिसी तयार करणारे महाराष्ट्र देशभरातील पहिला राज्य होते, मात्र सध्या पॉलिसीचा विचार राज्यात होत नाही. म्हणून गुजरात पुढे असल्याचे मतही त्यांनी मांडले.

………

हेलिकॅप्टर सेवेला हरकत नसावी

विमान सेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिले जात आहे. औरंगाबादहून पर्यटनासाठी किंवा एका शहरातून दुसऱ्या शहराला जाण्यासाठी हेलिकॅप्टरचाही पर्याय चांगला आहे. यामुळे औरंगाबाद ते अजिंठा, वेरूळ, शिर्डी, नाशिक, जळगाव अशी सेवा सुरू करण्यास संबंधित कंपन्यांनी हरकत नसावी, असेही मत केशव शर्मा यांनी मांडले.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीपी: ज्योती वाणी, औरंगाबाद

डीपी - सूरज शिंदे, परभणी

‘हेडगेवार’च्या दंत विभागास राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद : 'इंटरनॅशनल रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लाइफ अँड हेल्थ सायन्सेस' व 'स्माइलनेशन'च्या वतीने शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दंतरोग विभागाला राष्ट्रीय पातळीवरील 'इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्ड'ने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे दंतरोग विभागाला तीन वेगवेगळ्या विभागात पुरस्कार मिळाले. दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात तिन्ही पुरस्कारांचे वितरण झाले. या सोहळ्यामध्ये दंत विभागास 'बेस्ट क्लिनिक ऑफ दि इयर'ने (मल्टिपलचेअर) सन्मानित करण्यात आले. तसेच विभागप्रमुख डॉ. अभिजित चपळगावकर यांना 'बेस्ट प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट' व 'डेंटल लिडरशिप अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्याला पद्मश्री मिल्खासिंग व केंद्रीय मंत्री हरिभाऊ चौधरी आदींची उपस्थिती होती. डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने डॉ. चपळगावकर, अमर विसपुते व गणेश चोले यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकेतच्या फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी रविवारी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संकेत कुलकर्णीच्या आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीकरीता रविवारी दुपारी कामगार चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात सिडको एन २ भागात फलक लावले आहेत. दरम्यान, आरोपी संकेत जायभायेचे तीन तीन साथीदार आठवडा उलटला तरी पोलिसांच्या सापडलेले नाहीत. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसोबतच इतर पुरावे जमा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

मैत्रीणीशी बोलत असल्याच्या वादातून गेल्या शुक्रवारी ए २, ठाकरेनगर परिसरात संकेत कुलकर्णी या विद्यार्थ्याची कारखाली चिरडून निघृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात मुकुंदवाडी पोलिसांनी कारचालक संकेत जायभायेला अटक केली आहे. त्याचे साथीदार विजय जौक, उमर पटेल व संकेत मचे हे पसार आहेत. सिडको एन २ परिसरातील नागरिकांनी या भ्याड हत्येचा निषेध व्यक्त केला आहे. 'तुम्ही आम्ही सर्वजण' असे आयोजन करीत रविवारी मोर्चाचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्डधारकाला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कार्ड रिन्यू कराण्याची थाप मारत माहिती मिळवून बजाज फायनान्सच्या कार्डधारकाला ऑनलाइन एक लाख ४६ हजाराचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी बेगमपुरा भागात घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कदीर पठाण इसाक पठाण (वय ४७, रा. लालमंडी, बेगमपुरा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पठाण यांच्याकडे बजाज फायनान्स कंपनीचे ईएमआय कार्ड आहे. त्यांच्या मोबाइसलवर सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास अनोळखी मोबाइल क्रमांकावरून संवाद साधण्यात आला. समोरील व्यक्तीने, बजाज फायनान्स कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगीतले. 'तुमचे कार्ड एक्स्पायर होणार असून, ते रिन्यू करण्यासाठी तुमचे नाव व जन्म तारीख सांगा,' असे समोरचा व्यक्ती म्हणाला. पठाण यांना ही बाब खरी वाटल्याने त्यांनी माहिती दिली. यानंतर त्यांच्या मोबाइलवर 'ओटीपी'चा संदेश आला. या व्यक्तीने पुन्हा कॉल करून हा ओटीपी क्रमांक विचारला. पठाण यांनी त्यांना क्रमांक सांगितला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून वेळोवेळी ऑनलाइन खरेदी करण्यात आली. या आरोपीने चार वेळेस त्यांच्या खात्यातून एक लाख ४६ हजार रुपयांची खरेदी केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा या आरोपीचा फोन आल्याने पठाण यांना संशय आला. त्यांनी बजाज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली; तसेच त्यांच्या खात्याचे स्टेटमेंट मिळवले. यामध्ये ५२ हजारांची खरेदी झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पठाण यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक राजश्री आडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्याच्या अभय योजनेला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केलेल्या अभय योजनेला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी नागरिकांचे अर्ज प्राप्त होत असून, एकाच दिवसात सुमारे अडीचशे अर्ज निकाली काढण्यात आले आहे. अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर ३१ मार्चनंतर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेतर्फे नेहमीच अभय योजना जाहीर करण्यात येते, पण या योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. गेल्या महिन्यात या योजनेचा आढावा घेण्यात आला, तेव्हा वर्षभरात फक्त आठ नळ कनेक्शन्स अधिकृत झाल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली. त्यानंतर पुन्हा अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली. आता ही योजना ३१ मार्चपर्यंत राबवली जाणार आहे. अभय योजनेसंदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यापक माहिती दिल्यानंतर नागरिकांनी यावेळी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.

यासंदर्भात माहिती देताना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल म्हणाले, 'अभय योजनेंतर्गत नळ कनेक्शन अधिकृत करण्याबद्दलचे २५० अर्ज बुधवारी निकाली काढण्यात आले. प्रत्येक नळ कनेक्शन अधिकृतच असले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'

अभय योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. या मुदतीत नागरिकांनी नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. या मुदतीनंतर अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा चहेल यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनी टाकण्यावरून शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पुंडलिकनगरातील घटना, एमजेपीचा अभिप्राय मागवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जलवाहिनी टाकण्याच्या कामावरून पुंडलिकनगरच्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी संघर्ष झाला. संतापलेल्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. प्रकरण ताणले जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यात मार्ग काढून जलवाहिनी टाकण्याबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अभिप्राय मागवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सिडको एन ४ भागासाठी जलवाहिनी टाकण्याचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. पुंडलिकनगर येथील जलकुंभापासून सिडको एन चार भागासाठी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पथक जलकुंभाच्या परिसरात दाखल झाली. पाचशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले जाणार होते. ही माहिती मिळताच पुंडलिकनगर भागातील शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्ते जलकुंभाच्या परिसरात जमा झाले. त्यात नगरसेवक गजानन मनगटे, मीना गायके, राष्ट्रवादी काँग्रसच्या ज्योती मोरे यांचा समावेश होता. त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते देखील होते. जलवाहिनी टाकण्याच्या कामावर कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल नजर ठेवून होते. नगरसेवक व कार्यकर्त्यांनी चहेल यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. एखाद्या भागासाठी ५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कशासाठी टाकला. आवश्यकतेनुसार जलवाहिनी टाका, अशी त्यांनी मागणी होती. ५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली तर पुंडलिकनगरसह आजुबाजुच्या परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत होईल, असे या सर्वांचे म्हणणे होते, पण चहेल त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थिती नव्हते. त्यामुळे नगरसेवक व चहेल यांच्यात टोकाचा वाद झाला. चहले यांनी फोन करून पोलिस बंदोबस्त मागवला. चहल यांच्या मदतीला पोलिस आल्यानंतर जलवाहिनी टाकण्याचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, पण विरोधामुळे त्यांना ते शक्य झाले नाही.

जलवाहिनीच्या प्रश्नाबद्दल महापौरांनी महापालिकेत बैठक आयोजित केली आहे, असे चहल यांनी नगरसेवकांना सांगितले. त्यामुळे मनगटे यांच्यासह काहीजण महापालिकेत पोचले, परंतु तेथे महापौर नव्हते. दरम्यानच्या काळात भाजप नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत जलकुंभाच्या परिसरात दाखल झाल्या, त्यांच्याबरोबर कार्यकर्ते देखील होते. इतक्यात मनगटे यांचे महापालिकेतून पुन्हा जलकुंभाच्या परिसरात आगमन झाले. त्यानंतर वादाची धार वाढली. पोलिसांची जास्तीची कुमक देखील दाखल झाली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली.

'एमजेपी'च्या अभिप्रायानंतर काम

वादाची माहिती मिळाल्यावर महापौर नंदकुमार घोडेले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चहल यांच्याशी चर्चा केली. पाचशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची काहीच गरज नाही, असे ते सांगत होते. यातून मार्ग काढण्यासाठी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी महापौरांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी पाचशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा (एमजेपी) अभिप्राय मागवा, अशी सूचना केली. अभिप्राय प्राप्त झाल्यावर जलवाहिनी टाकण्याच्या कामाबद्दलल निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर जलवाहिनी टाकण्याचे काम बंद करण्यात आले, कार्यकर्तेही रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नारेगाव नव्हे, आता दुग्धनगरीत कचरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा शिवारातील दुग्धनगरीच्या जागेवर कचऱ्यावरील प्रक्रिया करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखालील संनियंत्रण समितीने गुरुवारी घेतला. यामुळे नारेगाव-मांडकी येथील कचरा डेपोत कचरा टाकण्याचा पर्याय कायमचा बंद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रक्रियेसाठीची आवश्यक यंत्रसामुग्रीची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे पथक पुढील आठवड्यात इंदूरचा दौरा करणार आहे.

शहरातील कचरा कुठे टाकायचा याचा निर्णय संनियंत्रण समितीने निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला डॉ. भापकर यांच्यासह जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती नवल किशोर राम यांनी दिली. ते म्हणाले, चिकलठाणा येथे शासनाने महापालिकेला ३५ एकर जागा दुग्धनगरीसाठी दिली आहे. या जागेपैकी पाच एकरवर कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याचे ठरले आहे. पाच पैकी तीन एकरमध्ये ओल्या कचऱ्यावर, तर दोन एकरामध्ये सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक यंत्रणा लगेचच उभारली जाणार आहे. शहराच्या बहुतेक वॉर्डांमध्ये कंपोस्ट पिटच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. जुन्या शहरात यासाठी जागा नाही. त्यामुळे प्रामुख्याने जुन्या शहरातील कचरा दुग्धनगरीच्या जागेवर नेला जाणार आहे. शहरात दररोज जमा होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी दीडशे टन कचरा दुग्धनगरीच्या जागेवर जाईल, असा अंदाज आहे. त्यापैकी शंभर टन ओला, तर पन्नास टन कचरा सुका असेल. या दोन्ही प्रकारच्या कचऱ्यावर लगेच प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

समितीसमोर नारेगाव-मांडकी येथील डेपोचाही पर्याय होता. पण कचऱ्यावरील प्रक्रियेच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) तेथे साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून एका वर्षात ग्राउंड लेव्हलला आणायचा आहे. आता जमा होणारा कचरा तेथे टाकला, तर वर्षभरात ग्राउंड लेव्हल गाठणे अशक्य आहे. त्यामुळे नारेगाव-मांडकीचा पर्याय कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. आता तेथे कचरा टाकला जाणार नाही, असे नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

इंदूरचा दौरा करणार

औरंगाबाद शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा डीपीआर इंदूरच्या धर्तीवर केलाआहे. त्यामुळे तेथील प्रक्रिया, वापरली जाणारी यंत्रे याची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात इंदूरचा दौरा करणार आहे, त्यानंतर यंत्र खरेदीचा निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. वासुदेव मुलाटे यांना प्रा. रा. श्री. जोग पुरस्कार जाहीर

$
0
0

औरंगाबाद : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट समीक्षा ग्रंथाच्या लेखकास दरवर्षी प्रा. रा. श्री. जोग यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी 'बिंब प्रतिबिंब' या डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या सक्षीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. येत्या सहा एप्रिल रोजी पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. मुलाटे यांना यापुर्वीही त्यांच्या समीक्षा लेखनाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या श्री. के. क्षीरसागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी महाप्रसाद

$
0
0

औरंगाबाद : हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी (३१ मार्च) ज्योतीनगरातील श्री विठ्ठल रखुमाई व महारुद्र हनुमान मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसात ते रात्री दहा या कालावधीत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल. हनुमान जयंतीनिमित्त २३ मार्च ते ३१ मार्च यादरम्यान वेदशास्त्र संपन्न गणेशबुवा रामदासी यांच्या श्री रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रामकथेचा समारोप आणि हनुमान जयंती निमित्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मंदिर व्यवस्थापन समिती, हरिपाठ मंडळ, महिला भजनी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी खात्यात अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या पावणे पाचशे जागा रिक्तच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कामाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतानाच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागाचा चढता आलेख भरल जात नसल्याचे चित्र कृषी खात्यात सध्या पाहावयास मिळ‌त आहे. औरंगाबाद कृषी सहसंचालक विभागात तब्बल पावणे पाचशे जागा रिक्त असून परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबासह, जालना, बीड या तीन जिल्याचा समावेश आहे. जिल्हा अधिक कृषी अधिकाऱ्यासह एकूण १ हजार ८१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पदे या जिल्ह्यासाठी मंजूर आहेत, पण त्यापैकी केवळ १ हजार ३४० पदे भरण्यात आली असून ४७४ पदे रिक्त आहेत.

यात प्रामुख्याने कृषी सहायकाचे २०६, कार्यालयीन लिपिकाचे १७४, तालुका कृषी अधिकाऱ्यांचे २२ तर कृषी पर्यवेक्षकांची ४१ पदे रिक्त आहेत. खरीब, रब्बी पेरण्यांचे नियोजनासह उत्पादन वाढीसाठी विविध योजनांचे अंमलबजावणी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, रोग प्रतिबंधकात्मक कार्यवाही यासह प्रादूर्भाव झाल्यास पंचनामा करणे यासह कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध कामांची जबाबदारी या विभागावर आहे. कामाचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे मात्र रिक्त जागेचे प्रमाणही वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी - हज यात्रेसाठी कर्मचाऱ्यांना डावलले

$
0
0

सिंगल

हज यात्रेवरून झेडपी

प्रशासनाला धारेवर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या हज यात्रेसाठी यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने दोन कर्मचाऱ्यांना रोखले. आजवर कधीच असे झाले नव्हते. दुजाभाव का केला गेला? असा संतप्त सवाल उपस्थित करून जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे सदस्य किशोर बलांडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हज यात्रेसाठी दरवर्षी जिल्हा परिषदेतून दोन जणांना संधी दिली जाते. यंदा मात्र कोणाचीच निवड केली नाही. २०१८ -१९ च्या यात्रेसाठी सेवेकरी (खादीमुल हुज्जाज) म्हणून साजीद कुरेशी आणि साजीद सिद्दीकी यांनी अर्ज केले होते. प्रस्ताव मंजूर करण्याची अंतिम तारीख २४ मार्च होती. प्रस्ताव परिपूर्ण व नियमानुसार असल्याने लाभार्थी पात्र होते, पण प्रशासनाने हा प्रस्ताव परत केला. असे आजवर कधी झाले नव्हते. अन्य यात्रांच्या बाबत जो नियम लावला जातो तो यावेळीही लावायला हवा होता, असे बलांडे म्हणाले. जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनीही प्रशासनाच्या या कृतीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

.......

(बातमी सेकंड डेकला वापरावी.)

दोन दुचाकींची धडक,

तीन ठार, दोन जखमी

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड -

भोकरदन-सिल्लोड रोडवर मालखेडा पाटीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारासाठी औरंगाबादला नेत असताना रस्त्यातच आळंदजवळ मृत्यू झाला. अन्य दोघे जण या अपघातात जखमी झाले. घटना घडल्यानंतर तब्बल दोन तास त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. घटनास्थळी आसपासच्या लोकांनी मदतकार्य न करता बघ्याची भूमिका घेऊन घटनेचे मोबाइलवरून फोटो काढण्यासच प्राधान्य दिले. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शहरप्रमुख महेश पुरोहित यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

शिवना ता. सिल्लोड येथील जितेंद्र रतन जगताप (वय २१), राहुल सदाशिव जगताप (वय २२) व राहुल एकनाथ जगताप (वय २२) हे तिघे जण भोकरदनहून सिल्लोडकडे दुचाकीवर (एम. एच. २० ई एन ०४६६) जात होते. यापैकी राहुल एकनाथ जगताप याचे १ एप्रिल रोजी लग्न ठरले असल्याचे समजते. तर भोकरदन येथील शुभम बाबुराव तळेकर व प्रज्वल फुसेसोबत सिल्लोडहून बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परतत होते. संध्याकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान दोन्ही दुचाकींचा समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये जितेंद्र रतन जगताप व राहुल सदाशिव जगताप (रा. शिवना) हे दोघे जागीच ठार झाले तर राहुल एकनाथ जगताप याचा औरंगाबादला नेत असताना आळंदजवळ मृत्यू झाला. भोकरदन येथील दोघे किरकोळ जखमी झाले असल्याचे समजते.शिवसेनेचे महेश पुरोहित , भगवान बैंनाडे, सरदार राजपूत, अजय थारेवाल, सिद्धार्थ जाधव यांनी मदतकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images