Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पश्चिम मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुकांकडून गाठीभेटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षातील इच्छुकांमध्ये चांगलीच चढाओढ लागली आहे. नागरिक व कार्यकर्त्यांची मलाच पसंती आहे, असा संदेश श्रेष्ठीपर्यंत पोहचविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी इच्छुकांनी विविध कार्यक्रम, उपक्रम, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे.

हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात आहे. लोकसभा मतदारसंघात कमळ फुलविण्याचा संकल्प भाजपने केला आहे. त्याचवेळी विधानसभा मतदार संघ बांधण्यासाठीही इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपाने केलेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात पक्षाला संधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर इच्छुक अधिकच जोमाने कामाला लागले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचा सात हजार मतांनी पराभव झाला आहे.

यांचे प्रयत्न सुरू

नगरसेवक राजू शिंदे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जालिंदर शेंडगे, चंद्रकांत हिवराळे, उत्तम अंभोरे यांनी मतदारसंघात संपर्क सुरू केला आहे. कीर्तन महोत्सव, 'सन्मान स्त्री शक्तीचा' कार्यक्रम, सातारा-देवळाईला अधिक निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा यातून इच्छुकांची धडपड दिसून येत आहे.

गेल्या निवडणुकीत ऐन‌वेळी उमेदवारी दाखल करावी लागली तरी पक्षाने उत्तम कामगिरी केली. यंदा चांगली संधी आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत. निवडणुकीला खूप अवकाश असून उमेदवारीबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी, कोअर कमिटी घेते.

- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बचतगट प्रदर्शनात लाखोंची उलाढाल

0
0

हजारो नागरिकांची भेट; आज होणार समारोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याच्या महिला व बालकल्याण विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने विभागीय पातळीवर महिला बचतगट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मैदानावर गेल्या रविवारपासून भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा शनिवारी समारोप होत आहे. प्रदर्शनाला गेल्या पाच दिवसांत हजारो नागरिकांनी भेट दिली. बचतगटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंच्या खरेदीतून लाखोंची उलाढाल झाली.

मराठवाड्यातून १८२ महिला बचतगट या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. विविध खाद्यपदार्थ, वापराच्या वस्तू, औषधी, साबणासह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. सलग लागून आलेल्या सरकारी सुट्यांमुळे गुरुवार व शुक्रवारी दिवसभर प्रदर्शनात गर्दी होती. खाद्यसंस्कृतीची ओळख सांगणारे स्टॉल गर्दी खेचत आहेत. जळगावचे मांडे, कुंथलगिरीचा पेढा, भडजी (ता. खुलताबाद) चा चिवडा, नांदेडचे तिखट, कुरडई, पापड, खारोड्या, सोलापुरी चटण्या, खट्ट्या भाकरी असे एकाहून एक सरस खाद्यदार्थ एकाच छताखाली उपलब्ध असल्याने खाद्यप्रेमी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. संयोजकांच्या वतीने प्रदर्शनाच्या काळात दररोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. प्रदर्शनाचा समारोप रविवारी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्त उपासना यज्ञाचे आयोजन

0
0

दत्त उपासना यज्ञाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुंज (खुर्द) येथील श्री योगानंद सरस्वती संस्थानतर्फे तीन दिवसांच्या दत्त उपासना यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मार्च ते एक एप्रिल यादरम्यान यशोमंगल कार्यालयात उपासना यज्ञ होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संस्थानच्या सर्व सांप्रदायिक उपासना होणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमात छनुभाई देसाई महाराज व समर्थ सदगुरू चिंतामणी महाराज यांच्या पादुकांचे पूजन सकाळी सहा ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता आरती होणार असून, दुपारी एक ते चारदरम्यान भोजन प्रसाद असणार आहे. दुपारी चार ते सायंकाली सातदरम्यान दिगंबरा जप, दत्तबावनी यांचे सामूहिक पठण. सायंकाळी सात वाजता शांती पाठ व रात्री आठ ते ११दरम्यान दत्तपंचपदी होणार आहे. या उपासनेस राजेशभाई देसाई महाराज यांची उपस्थिती असणार आहे. यज्ञ उपासनेत दत्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन योगानंद सरस्वती भक्त परिवारतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सचिन कुलकर्णी, तुषार कडतू, लक्ष्मीकांत पांडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मावती पाठक यांचे निधन

0
0

पद्मावती पाठक

औरंगाबाद : स्नेहवर्धिनी कॉलनी, जवाहर कॉलनी परिसर येथील रहिवासी पद्मावती सूर्यकांत पाठक (८२ वर्षे) यांचे शुक्रवारी (३० मार्च) निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (३१ मार्च) सकाळी ११ वाजता प्रतापनगर येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे अभय, अजित, अनंत व अॅड. अनिरुद्ध पाठक ही मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रा मारोती फोटो

0
0

जय भद्रा

..

हनुमान जयंतीनिमित्त खुलताबाद येथील श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी हजारो औरंगाबादकर दौलाताबादचा घाट ओलांडून खुलताबादकडे रवाना झाले. हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी पायी जाण्याची शहरात परंपरा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामराव देवकर यांचे निधन

0
0

औरंगाबाद: येथील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक रामराव सोनाजीपंत देवकर (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे निधन जाले. त्यांच्यावर गादिया विहार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहिता छळ; तिघांना अटक, सशर्त जामीन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या काणारावरून तीन परदेशातील आरोपींना अजामिन वॉरंटवर शुक्रवारी (३० मार्च) अटक करण्यात आली. तिघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, कोर्टाच्या परवानगीशिवाय देश न सोडण्याच्या शर्तीवर तिघांना जामीन मंजूर केला.

दीपक सुरेश टिबडीवाला (३२), ललिताबाई सुरेश टिबडीवाला (५८) व खुशबू सुरेश टिबडीवाला (३४, सर्व रा. सिडको) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आरोपी दीपक याच्या पत्नीने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. यावरून तिघांविरुद्ध शारीरिक, मानसिक त्रास देणे, मारहाण करून धमकावणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे. प्रकरणात तिन्ही आरोपी परदेशात राहात असल्याने जुलै २०१७पासून प्रकरण कोर्टात सुरू आहे. २०१७मध्ये कोर्टाने आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता, मात्र त्यानंतर कोणत्याच सुनावणीला आरोपी कोर्टात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट पाठवले होते. त्याला काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर कोर्टाने आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट पाठवले. आरोपी एका कार्यक्रमासाठी शहरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्यांना अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले. प्रकरणात कोर्टाने विविध अटी व शर्तीवर तिघांना जामीन मंजूर केला, मात्र कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जायचे नाही, असेही यात म्हटले आहे. सहाय्यक सहाय्यक सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुग्धनगरी कचरा प्रकल्प लालफितीत

0
0

अधिकाऱ्यांची उडवाउडवी; मोजमाप, फाइल, इस्टीमेटची सय

---

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुग्धनगरी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प महापालिका अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीमुळे लालफितीत अडकण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी सुट्टीच्या दिवशी तातडीने बैठक घेवून कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी दुग्धनगरीची निश्चिती केली, परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा निर्णय गांभीर्याने न घेता मोजमाप घ्यावे लागेल, फाइल करावी लागेल, इस्टीमेट तयार करू, अशी उत्तरे देत उडवाउडवी सुरू केली आहे.

शहरातील कचरा कुठे टाकायचा याचा निर्णय शासनाने नियुक्त केलेल्या समितीने घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर गुरुवारी सुट्टीच्या दिवशी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महापालिकेचे अन्य अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. कचरा टाकण्यावर किंवा कचरा डंप करण्यावर बंदी असल्यामुळे दुग्धनगरीच्या जागेवर आणल्या जाणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियाच केली जाईल, असे बैठकीच्या नंतर स्पष्ट करण्यात आले. प्रक्रियेच्या दृष्टीने आवश्यकत्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम लगेचच सुरू होईल, असे सांगण्यात आले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी बैठक घेवून कचरा प्रक्रियेसाठीच्या जागेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे महापालिकेचे अधिकारी त्यादृष्टीने कामाला लागतील असे गृहीत धरण्यात आले होते. त्यामुळे दुग्धनगरीच्या जागेवर काही काम सुरू करण्यात आले आहे का, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली.

---

...अशी ही टाळाटाळी

---

दुग्धनगरीच्या जागेवर शेडसह काही बांधकाम करावे लागणार आहे, त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाने काय केले हे पाहावे लागेल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महापालिकेच्या बांधकाम विभागाशी संबंधित असलेल्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्या जागेवर जावून मोजमाप घ्यावे लागेल. पाच एकर जागा निश्चित करावी लागेल, त्याची फाइल तयार करावी लागेल, इस्टीमेट तयार करून त्याला मंजुरी घ्यावी लागेल, त्यानंतर काम सुरू होईल असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रियेमुळे दुग्धनगरीच्या जागेवर कचरा प्रक्रियेसाठी आवश्यक ते बांधकाम केव्हा सुरू होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस गुजरात प्रभारीपदी खासदार राजीव सातव

0
0

औरंगाबाद: काँग्रेसच्या गुजरात प्रभारीपदी खासदार राजीव सातव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातव यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. सातव यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सक्षमपणे सांभाळली होती. खासदार सातव हे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'कोअर टीम'मधील विश्वासू सदस्य म्हणून ओळखले जातात. आगामी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये काँग्रेसने टक्कर देण्याची तयारी करण्यासाठीचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेची तिकीट तपासणी; ५१६ फुकट्यांवर कारवाई

0
0

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने फुकट्या गुरुवारी ५१६ विनातिकीट फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून दोन लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़.

नांदेड विभागाच्या वाणिज्यिक विभागाने नांदेड ते मुदखेड, नांदेड ते पूर्णा, नांदेड ते लिबगाव अशा विविध मार्गावर धावणा रेल्वेमध्ये तिकीट तपासणी केली. या कारवाईमध्ये आठ पॅसेंजर आणि १५ एक्स्प्रेस रेल्वेंची तपासणी करण्यात आली़. या कारवाईत ५१६ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय अनियमित प्रवास करणे, परवानगी शिवाय जास्त सामान घेऊन जाणारे, अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईत ३२ तिकीट तपासणीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे दोन जवान सहभागी झाले होते़.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षांच्या चिमुकलीसह आई बेपत्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन वर्षांच्या चिमुकलीसह बावीस वर्षाची विवाहिता घरातून निघून गेली आहे. २० मार्च रोजी सकाळी दहा वाजता उस्मानपुरा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विद्या संदीप डोळसे (वय २२) आणि तनिष्का संदीप डोळसे (वय २) असे मायलेकींचे नाव आहे. आईकडे जाते असे सांगून विद्या मुलीसोबत घराबाहेर पडल्या. विद्या डोळसे यांचा रंग काळा सावळा, उंची पाच फूट एक इंच, अंगात काळ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची पँट, चेहरा गोल, पायात खाकी रंगाचा बूट असून मराठी व हिंदी भाषा बोलता येते. मुलगी तनिष्काच्या अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट व भुरकट रंगाची पँट असून, पायात पिवळ्या रंगाची सँडल आहे. या वर्णनाच्या व्यक्ती कोणाला आढळल्यास पीएसआय राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

सिल्लोड तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या २८ वर्षीय तरुणास अजिंठा पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या समोर हजर करण्यात आले असता त्यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सिल्लोड तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन २९ मार्च रोजी सांयकाळी शौचास जाऊन येते म्हणून घराबाहेर पडली. बराच वेळा झाला ती घरी परत न आल्यामुळे आई - वडील, बहिण आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला. मात्र अंधार असल्यामुळे ती सापडली नाही. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन अजिंठा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलगी आणि मुलगा औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस उपनिरीक्षक ए. डब्ल्यू. चौधरी यांच्या पथकाने औरंगाबादला धाव घेतली. सातारा पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीची महिला शिपाई यांनी जबाब नोंदविला असता त्यात अनिलने बळजबरीने अत्याचार केले असल्याचे अल्पवयीन मुलीने म्हटले आहे. या जबाबवरून अनिलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अजिंठा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या समोर हजर करण्यात आले असता सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी त्या दोघांची वैद्यकीय तपासणी करावयाची आहे, अपहरण करण्यास कोणी मदत केली का याचा शोध घ्यावयाचा असल्यामुळे कोठडी देण्यात यावी अशी विनंती केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी मिसळून पेट्रोलची विक्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात पुन्हा एकदा शनिवारी पाणी मिश्रीत पेट्रोलची विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी बाबा पेट्रोल पंपावर पाणी पाणी मिसळून पेट्रोल विकल्याचा आरोप करत तक्रारदात्याने वजनमापे विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार नोंदविली आहे.

शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास नीलेश अंबरवाडीकर या युवकाने दोनशे रुपयांचे पेट्रोल बाबा पेट्रोल पंपावरून भरले. या युवकाची गाडी लिटिल फ्लॉवर शाळेजवळ दोन वेळेस बंद पडली. दुचाकी वाहनामधील पेट्रोल चेक केले असता. त्यात पाणी मिश्रीत पेट्रोल असल्याचे लक्षात आले. नीलेशने हे पट्रोल बाबा पेट्रोल पंपाच्या प्रतिनिधींना दाखविले. त्यानंतर थेट जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, वजन मापे विभाग यांच्याकडे सदर प्रकरणाची लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तुझ्या नावाचा रे अजूनही दरारा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रामभक्त हनुमान की जय...बजरंग बली की जय...असे ठिकठिकाणच्या मंदिरातले जयघोष. महाभिषेक, महापूजा, हनुमान स्त्रोत, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी शनिवारी भक्तिमय वातावरणात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पहायला मिळाल्या, तर सायंकाळी अनेक मंदिरांमध्ये भजनसंध्याचे आयोजन करण्यात आले होते.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त सूर्योदयापासून शहरातील विविध मंदिरात भाविकांची गर्दी दिसत होती. तसेच भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी हजारो नागरिक खुलताबादकडे पायी रवाना झाले होते. गुलमंडीवरील सुपारी हनुमान येथे सकाळी महापूजा, आरतीसह जन्म सोहळा साजरा करण्यात आला. शारदाश्रम कॉलनी येथील कानफट्टे हनुमान मंदिर, पानदरीबा येथील जागृत हनुमान मंदिर, औरंगपुऱ्यातील दक्षिणमुखी मारुती, जाधवमंडीतील जबरे हनुमान मंदिर, रोकडा कॉलनीतील हनुमान मंदिर, कैलासनगर येथील स्मशान मारुती, धावणी मोहल्यातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरसह हडको-सिडको, सातारा, गारखेडा परिसरातील विविध ठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये सकाळीपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पवनसुत हनुमान की जय, रामभक्त हनुमान की जय, बजरंग बली की जय...अशा जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले. ठिकठिकाणी महापूजा, दुग्धाभिषेक, पारंपरिक पद्धतीने जन्म सोहळा साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाईने अनेक मंदिर सजविण्यात आले होते. तर उन्हाची तीव्रता लक्षात घेत अनेक मंदिर व्यवस्थापकांनी मंदिरासमोर मंडप, तसेच मुख्य मंदिराची सजावट केली. सकाळपासून अनेक ठिकाणी महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दर्शनासह नागरिक, भक्त, भाविकांनी महाप्रदसाचा लाभ घेतला.

\B'सुंदरकांड' भजन संध्या

\Bहनुमान स्त्रोत, पालखी, भक्तीसंगीत अशा भक्तिपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. पानदरिबा येथील जागृत हनुमान मंदिरात सकाळी व्यास परिवार यांच्यातर्फे विधिवत पूजा करण्यात आली. तर, सायंकाळी विदर्भमिरा अलकाश्री यांच्या संगीतमय सुंदरकांड भजन संध्याचे आयोजन करण्यात आले. विविध ठिकाणी भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. रोकडा कॉलनीतील हनुमान मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - रमण अजगावकर, उद्योजक


नव्या योजनांसाठी पालिकेचे १५ कोटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नावीण्यपूर्ण (स्मार्ट इनोव्हेशन) योजनांसाठी महापालिका पंधरा कोटींचा खर्च करणार आहे. त्यात नागरिकांनी सूचविलेली कामे लोकसहभागातून करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डासाठी एक लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.

औरंगाबादचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात झाल्यामुळे स्मार्ट सिटीच्या अनुशंगाने शहरासाठी आवश्यक ती कामे करण्याचे नियोजन महापालिकेतर्फे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नव्या योजना आखण्यात आल्या आहेत. महापालिकेत ११५ नगरसेवक निवडून आले आहेत. प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डासाठी एक लाख रुपये या प्रमाणे ११५ नगरसेवकांच्या वॉर्डांसाठी ११५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीतून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने स्मार्ट पार्किंग सिस्टीम, स्ट्रीट स्विपिंग आणि डस्टबीन मशीन, आदर्श फूटपाथ, शीतगृह, सोलार पॉवर लाइट, सायकल ट्रॅक, हॉकर्स झोन, आपतकालीन व्यवस्थापन, बाल्यावस्थेतील मुलांसाठी विशेष योजना, नेत्रदान जनजागृती, आंतरराष्ट्रीय भाषा प्रशिक्षण योजना, स्मार्ट अंगणवाडी याचा समावेश आहे. या योजना प्रत्येक वॉर्डात नागरिकांच्या सहभागातून राबवण्याचे महापालिकेने ठरविले आहे.

\B११५ प्रकल्प उभारणार

\Bनावीण्यपूर्ण योजनांमधून प्रत्येक वॉर्डात वर्षभरात एखादा प्रकल्प उभारण्यात आला, तर शहरात ११५ प्रकल्प उभारले जातील. त्यातून शहराची प्रतिमा उजळून निघेल असे मानले जात आहे. या योजना राबवण्यासाठी नगरसेवकांची भूमिका महत्वाची असणार आहे. नगरसेवकांनी नागरिकांना विश्वासात घेवून नागरिकांच्या गरजेनुसार योजना राबविल्यास निधीचा विनियोग योग्य प्रकारे होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रहार अपंग संघटनेचे उद्या आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपंगांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी जिल्हा परिषदेच्या तीन टक्के निधीतून घरकुल योजना आहे. मात्र या योजनेला घरघर लागल्याने अपंग हक्काच्या घरकुलापासून वंचित राहत आहे. तीन टक्के निधीतून घरकुल द्यावे या व अन्य मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने सोमवारी दोन एप्रिल रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

तीन टक्के निधीतून अपंगांना घरकुल ही प्रमुख मागणी आहे. घरकुल लाभार्थ्यास सोडत पद्धतीने निवडावे, तीन टक्के अपंग निधी नियोजन समिती स्थापन करावी, तीन टक्के अपंग निधी आदेश ग्रामपंचायत व पंचायत समितीला देण्यात यावेत, जिल्हा परिषदेच्या तीन टक्के निधीतून २०१२ पासून खर्च करावा, ऑनलाइन अपंगत्व प्रमाणपत्र धारकांच्या नोंदी ग्रामपंचायतीने कराव्यात, अपंगांच्या तीन टक्के निधी थेट अपंगांच्या खात्यावर जमा करावा आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. आंदोलनासाठी जिल्हाभरातून एक हजाराहून अधिक अपंग सहभागी होतील, अशी माहिती प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, शहर अध्यक्ष दत्ता साळकर, संपर्क प्रमुख पारस साकला, सिल्लोड अध्यक्ष हरी गिरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी गीतांची मैफल आज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगबाद

'स्पंदता मायबोली' ही मराठी गीतांची मैफल रविवारी आयोजित करण्यात आली आहे. तापडिया नाट्यमंदिर येथे सायंकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम होईल. अमित ओक यांचे संगीत संयोजन असेल. डॉ. रामदास नागरगोजे, डॉ. मंजुषा शेरकर, डॉ. वर्षा वैद्य, डॉ. अजय काळे गीते सादर करतील. अजय तायडे, जगदीश व्यवहारे, डॉ. गिरीश काळे, अंकुश बोर्डे, विनोद वाव्हळ साथसंगत करतील. आश्विनी दाशरथे यांचे निवेदन असणार आहे. रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागवत यांचे आज व्याख्यान

0
0

औरंगाबाद : औरंगाबाद ब्लॅक बक्स आणि आयएमएच्या वतीने रविवारी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता आयएमए हॉलमध्ये डॉ. भागवत 'मॅरॅथॉन रनिंग अँड कार्डियाक रिस्क' या विषयावर मार्गदर्शन करतील. डॉ. संजय अंबेकर आणि डॉ. आनंद निकाळजे चर्चेत सहभागी होतील. कार्यक्रमास मॅरेथॉन धावपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिरंगाई करणारे चार कर्मचारी निलंबित

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी प्रशासकीय कामात दिरंगाई करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करून मार्चअखेरचा दणका दिला आहे.

२०१३ -१४ मध्ये शाळा खोली बांधकाम प्रकरणात प्रशासकीय मान्यता रद्द केलेली होती. तरीही या कामाची देयके काढून कंत्राटदाराची संचिका मंजूर करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यात आली. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. समाधानकारक उत्तर न आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. त्यात सहायक लेखाधिकारी (सध्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना) ए. ए.खान, वरिष्ठ सहायक (सध्या कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोयगाव) अरुण गावंडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक साबळे यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी हरिनाम कोलमवाड यांना शनिवारी अर्दड यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले. न्यायालयीन प्रकरणांच्या कागदपत्रांची पूर्तता करणे, वकिलांना कागदपत्रे देण्यास विलंब केल्याबद्दल सीईओंकडे तक्रार आली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर कोलमवाड यांनी दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images