Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उद्योजकता मेळावा; आज समारोप

$
0
0

औरंगाबाद: बजाज ऑटो-भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या वतीने प्रोझोन मॉलमध्ये भरवण्यात आलेल्या उद्योजकता मेळाव्याचे उद्घाटन मानव विकास आयुक्त भास्कर मुंडे याच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्याचा समारोप रविवारी होणार असून जास्तीत जास्त शहरवासीयांनी घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून बजाज ऑटोच्या सहकार्याने युवा उद्योजकता विकास कार्यक्रम राबवत आहे. उत्पादन व सेवा क्षेत्रात उद्योग करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना ट्रस्ट राष्ट्रीयकृत बँकेमार्फत विनातारण-विना जामीन कर्ज मिळवून देण्यासाठी देखील सहकार्य करते. याशिवाय त्यांना प्रशिक्षण, बँकिंग, सीए, उद्योगाची कल्पना, विक्री व्यवस्थापन आदी मार्गदर्शन केले जाते. आजवर ट्रस्टच्या वतीने पुढे आलेल्या उद्योजकांचा मेळावा प्रोझोनमध्ये भरवण्यात आला आहे. या दोन दिवसीय मेळाव्याचे उदघाटनावेळी प्रोझोनचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद, बीवायएसटी स्ट्रेटेजिक कमिटीचे अध्यक्ष मुनीश शर्मा, एमएपीबीवायएसटीचे अध्यक्ष मिलिंद पाटील, प्रकल्प प्रमुख विजय पगारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदनामीच्या खटल्यातून खासदार खैरे निर्दोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज कामगार संघटनेच्या सभेत आणि पत्रपरिषदेमध्ये शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी बदनामी केल्याचा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. हुसेन यांच्यासमोर दाखल केला होता. या खटल्याची अंतिम सुनावणी झाली असता सबळ पुराव्याअभावी शिवसेना नेते खासदार खैरे यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज कामगार संघटनेच्या सभेमध्ये अ‍ॅड. टी. के. प्रभाकरन यांच्या वागणुकीमुळे अनेक कारखाने बंद पडत आहेत. त्यामुळे कामगारांचे नुकसान होऊन त्याच्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्यामुळे कामगारांच्या हितासाठी मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यामध्ये कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शिवसेना स्टाइलने धडा शिकवू. वकिली करणाऱ्यांनी कामगार संघटनेत घुसखोरी करू नये, कारखाने बंद पाडणाऱ्या वकील नेत्याची बार कौन्सिलकडे दाद मागण्यात आली आहे. बजाज कंपनीच्या अंतर्गत संघटनेचे सल्लागार प्रभाकरन यांनी कंपनी प्रशासनाकडून १२ लाख रुपये घेतले असून, या प्रकरणातील इम्रान हसन यांची बदली झाली आहे, असे आरोप असलेला मजकूर शहरातील दैनिकांमध्ये १, ९ आणि १६ जानेवारी २००६ रोजी छापून आल्यामुळे माझी बदनामी झाली, अशी तक्रार ६ मार्च २००६ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दिली. या खटल्याची अंतिम सुनावणी ए. एम. हुसेन यांच्यासमोर झाली असता दोन ज्येष्ठ पत्रकारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ग्राह्य धरून सबळ पुराव्याअभावी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांना निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. शिवसेना नेते खैरे यांच्या वतीने के. जी. भोसले यांनी बाजू मांडली त्यांना अभय भोसले, किरण पवार, संतोष कोरडे, शरद वाकडे, दीपक पाटील, गोविंद जाधव आणि संदीप निकम यांनी सहकार्य केले.

\Bबजाज कंपनीसमोर जल्लोष साजरा

\Bखैरे यांना बदनामीची खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिल्याची वार्ता वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाज कंपनी भारतीय कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समजाताच त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी भारतीय कामगार सेनेचे विभागीय चिटणीस प्रभाकर मते, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेंदी, महापौर नंदकुमार घोडले, सहचिटणीस कोमलसिंग इंगळे, शिवाजी तुरटवाड, बजाज युनिट अध्यक्ष विलास जाधव, कार्यध्यक्ष अधिकराव पाटील, सचिव अशोक खरे यांची यावेळी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...पानतावणे सरांचा लढा सुरू ठेवणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साहित्यिक, पुरोगामी विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी 'अस्मितादर्श'ची चळवळ ५० वर्षे विनाखंड राबविली. अस्मितादर्शच्या माध्यमातून शेकडो साहित्यिक निर्माण केले. पानतावणे सरांनी सुरू ठेवलेला हा लढा आपल्याला पुढे सुरू ठेवायचा आहे, असा निर्धार शनिवारी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आला.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात डॉ. गंगाधर पानतावणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्त आयोजित शोकसभेसाठी शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य प्रताप बोराडे अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सहचिटणीस ज्ञानप्रकाश मोदाणी, डॉ. ऋषिकेश कांबळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीराम जाधव, बालाजी नागटिळक, अॅड. डी. आर. शेळके, ओमप्रकाश वर्मा, अण्णासाहेब खंदारे, सुभाष लोमटे, प्राचार्य प्रदीप जब्दे, नीलेश राऊत, अॅड. एस. आर. बोदडे, डॉ. क्षमा खोब्रागडे, प्राचार्य जीवन देसाई आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नंदिता पानतावणे अवसरमोल म्हणाल्या, की बाबांनी तीन महिने आजाराला तोंड देताना त्यांच्या स्वभावाला साजेशी झुंज दिली. त्यांनी लेखन, विचार, आचारातून आपल्याला दिशा दिली. त्यांचा लढा पुढे सुरू ‌ठेवायचा आहे. कुटुंबवत्सल पिता, कडक शिस्तीच्या बाबांनी आम्हाला वेळ पाळणे, दिलेला शब्द न मोडणे याची शिकवण दिली. बाबांनी औरंगाबादवर खूप प्रेम केले, असे त्यांनी नमूद केले. ज्ञानप्रकाश मोदाणी म्हणाले, पानतावणे सरांचा आणि माझा स्नेह ४५ हून अधिक वर्ष जुना होता. अस्मिता दर्शच्या माध्यमातून गेली ५० वर्षे नव्या पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे काम सरांनी करून दिले आहे. ते लोप पावू नये. अस्मितादर्श सुरू राहिले पाहिजे. श्रावस्ती हे आपले श्रद्धास्थान राहील. प्राचार्य बोराडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रकला छोटा हत्ती पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री निपाणी फाट्याजवळ घडली. बाळू गणेश वाघूंडे (वय १८, रा. ताड हदगाव, ता. अंबड) हा तरुण ठार झाला आहे. तर लक्ष्मण अशोक पाचोडे (वय २८) व नरेंद्र प्रल्हाद आरगडे (वय २०, रा. घारेगाव, ता. पैठण) अशी जखमींची नावे आहेत.

बाळु वाघूंडे, लक्ष्मण पाचोडे व नरेंद्र आरगडे हे शुक्रवारी घारेगाव येथून छोटा हत्ती वाहनाने भाजीपाला घेऊन जाधवमंडी येथे आले होते. हा भाजीपाला विकून तिघे छोटा हत्तीमध्ये बसून रात्री साडे दहाच्या सुमारास गावाकडे जात होते. निपाणी फाट्याजवळ चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने छोटा हत्ती समोरून जात असलेल्या अज्ञात ट्रकवर आदळला. या अपघातात बाळू, लक्ष्मण व नरेंद्र हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना घाटी रुग्णालयाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी आणून दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बाळू वाघूंडेचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक मात्र न थांबता निघून गेला. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार पायगव्हाण तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकेत कुलकर्णी हत्या; आज निषेध सभा

$
0
0

औरंगाबाद : संकेत कुलकर्णी या युवकाच्या निघृण हत्येचा निषेधार्थ तसेच दोषी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी कामगार चौकात रविवारी (१ एप्रिल) दुपारी चार वाजता निदर्शने केली जाणार आहेत. या प्रकरणी मारेकरी संकेत जायभाये अटकेत करण्यात आली आहे. त्याचे इतर साथीदार फरार आहेत. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हे निर्दशन कार्यक्रम करण्यात येणार आहे. संकेत कुलकर्णीच्या हत्येचा निषेध सभेसाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन निषेध सभेच्या संयोजकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवर दानवेंसह भाजपची बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी करणारे फेसबुक खाते शनिवारी तक्रारीनंतर बंद करण्यात आले.

माजी महापौर भगवान घडमोड यांच्याविरोधात व्हॉट्स अॅपवर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना फेसबुकवर भाजप नेत्यांची बदनामी करणारा मजकूर टाकण्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात सुनील जगताप (रा. मुकुंदवाडी) यांनी गुन्हा दाखल केला आहे. २० मार्च रोजी मोबाइलवर फेसबुक हाताळताना त्यांना रावसाहेब दानवे यांच्या नावाने एक खाते दिसले. त्यावर अनेक घाणेरड्या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. सोबतच रावसाहेब दानवे यांचे फोटो लावून दानवे यांच्यासह भाजप नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याबाबत सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली होती.

महिलेला त्रास

शहरातील एका महिलेचे फोटो गेल्या आठ महिन्यांपासून फेसबुक, व्हॉट्सअॅप वर व्हायरल करणे सुरू होते. तसेच महिलेला अश्लील चॅटींग व कॉल करून त्रास देण्याचा प्रकार सुरू होता. या प्रकरणात महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरुळ लोणीचे अभ्यासक मधू जोशी निवर्तले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेरुळ लेणीचे अभ्यासक मधू कृष्ण जोशी यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान केले.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणमधून उपाधीक्षक पदावरून निवृत्त झालेले जोशी पुरातत्त्व आणि संग्रहालयशास्त्राचे तज्ज्ञ होते. वेरुळच्या लेण्यांमधील शिल्पांचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता. त्यांनी इंग्लंडच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, एअर मार्शल अर्जुनसिंग अशा अनेकांना समृद्ध भारतीय संस्कृतीचा परिचय करून दिला. उत्तम व्याख्याते असलेल्या जोशी यांचा शिल्पशास्त्रासह रामायण, महाभारतादी धर्मग्रंथांचाही अभ्यास होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त २०११ मध्ये त्यांच्या कार्याचा सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशीही त्यांच्या भेटी झाल्या. रायगडावरील गंगासागर तलावातील उत्खनन, होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना, अशा अनेक गोष्टी जोशी यांच्याच मार्गदर्शनात झाल्या आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अॅड. मिलिंद जोशी यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायसाठी संघर्षाला तयार रहा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुण, भूमीहिन, बेघरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि न्यायहक्कासाठी निर्णायक संघर्ष करायला तयार राहा, असे आवाहन विचारवंत अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी शनिवारी केले. ते फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेतर्फे मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित बेरोजगार, भूमीहिन, शेतकरी, कामगार परिषदेत बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव सोनवणे होते. तर कबीरानंद राजहंस, संभाजी साबळे, लक्ष्मण जाधव, मधुकर घोरपडे, अशोक जगधन, सुमन थोरात, कांचन सदाशिवे, बबिता घाटे, स्वागताध्यक्ष हिरालाल मगर, प्रल्हाद मगर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अॅड. खंडागळे म्हणाले, 'जगातील अतिश्रींमत व्यक्तीच्या यादीत भारतातील २५च्यावर व्यक्तींची नावे आहेत. एकीकडे हे कोट्याधीश तर दुसरीकडे अन्न, वस्त्र, निवारा, रोजगारापासून वंचित असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे विदारक चित्र पुसून टाकण्यासाठी वंचिताना न्याय मिळावा, यासाठी आता निर्णायक लढा करावाच लागेल. वेळप्रसंगी लाठ्याकाठ्या खाव्या लागतील, जेलमध्ये जावे लागले, त्यांची तयारी ठेवा, संघर्षासाठी तयार व्हा. बेघरांना घर द्यावे, यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात असून जून महिन्यापर्यंत न्याय न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात डेरा टाकू,' असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोषागार कार्यालयात ४११ कोटींची देयके दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक वर्षाच्या अखेरचा मुहूर्त साधत शनिवारी जिल्हा कोषागार कार्यालयात रात्री उशिरापर्यंत लगबग सुरू होती. विविध विभागांकडून सुमारे ४११ कोटी २१ लाखा २८ हजारांची देयके आणि ९६० बिले कोषागार भवनात सादर झाले.

मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून विविध शासकीय कार्यालयासह कोषागार कार्यालयात कामाचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. वरिष्ठ कोषागार अधिकारी रेहाना काझी, अप्पर कोषागार अधिकारी उमेश बबरुले आदी वरिष्ठांच्या देखरेखखाली रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. गेल्या आठ दिवसापासून शासनाच्या विविध विभागांकडून येणाऱ्या देयकांची संख्या वाढली आहे. दरम्यान, मार्च अखेरची धावपळ असल्याने कोषागार कार्यालयात प्रवेशाबाबत निर्बंध लावण्यात आले होते. देयके, बिले सादर करण्याची वेगळी व्यवस्था ठेवण्यात आली होती. दरम्यान, कृषीसह वन विभागातही आर्थिक कामकाज पूर्ण करण्याची धावपळ गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. महावीर जयंती, गुड फ्रायडेनिमित्त सुट्टी असतानाही गुरुवारी व शुक्रवारी या कार्यालयातील कामकाज सुरू होते. शनिवारीही देयके सादर करण्यासाठी सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांची लगबग सुरू होती.

\B

ऑनलाइनचा आधार \B

शासकीय कार्यालय ऑनलाइन झाले आहेत. त्यात निधी वितरण आणि खर्चाचा तपशील ठेवण्याचे कामकाज ऑनलाइन झाल्याने कोषागार कार्यालयाचा भार काहीसा हलका झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणची छप्पर फाड वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणची छप्पर फाड थकबाकी वसुली सुरू असून, या मोहिमेत ३१ मार्चपर्यंत तब्बल २९० कोटींचा आकडा पार करून औरंगाबाद परिमंडळाने राज्यात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

औरंगाबाद परिमंडळात वसुलीसाठी शून्य थकबाकी योजना राबविण्यात आली. या मोहिमेसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करणे व थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट महावितरणने हाती घेतले आहे. याकरिता औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद परिमंडळ कार्यालय व सर्व स्तरावरील अभियंते, अधिकारी व कर्मचारीसुद्धा वसुलीच्या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहेत.

औरंगाबाद शहर विभाग क्र. १ व २ अंतर्गत वाढती थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणने थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या धडक मोहिमेअंतर्गत १ हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेले घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांकडून थकबाकी वसुली करणे, थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. १ मार्च २०१८ ते ३० मार्च २०१८ दरम्यान शहरातील ५० हजार २३ वीजग्राहकांकडून २४ कोटी ५९ लाख ४८ हजारांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ३६ हजार ६०१ वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मोहिमेत औरंगाबाद परिमंडळातून चालू वीज बिल आधीच वसुल करण्यात आले आहे. वसुलीत राज्यात ठाणे, पुणे, चंद्रपूरनंतर औरंगाबादचा क्रमांक लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगर रेल्वेक्रॉसिंग रस्त्याचे काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॉँग्रेसच्या भीक मांगो आंदोलनानंतर शिवाजीनगर रेल्वेक्रॉसिंग येथील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही होत नव्हती.

शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवरील खड्ड्यांबाबत काँग्रेसने प्रदेश प्रतिनिधी डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या नेतृत्वात खड्डे भरण्यासंदर्भात निवेदन दिले होते. दखल घेतली न गेल्याने काँग्रेसने 'भीक मांगो' आंदोलन केले होते व पालिका प्रशासनास इशारा दिला होता की जर खड्डे भरले नाहीतर तर आंदोलनाची धार तीव्र करण्यात येईल. आंदोलनाची दखल घेऊन पालिका प्रशासनाने शुक्रवारपासून खड्डे भरणे सुरू केले. त्याबद्दल डॉ. देहाडे यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. त्यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन पालिका अभियंता भोये यांना चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या व भीक मांगो आंदोलनातून जमा झालेली रक्कम काम करणाऱ्या मजुरांच्या चहापानासाठी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक समतेशिवाय राष्ट्रवाद अशक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सामाजिक समतेशिवाय राष्ट्रवाद अशक्य आहे, हे ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाला विकसित होण्यासाठी आरक्षण व तत्सम सवलतींची तरतूद केली. वंचित उपेक्षित समाज हा अराष्ट्रीय होऊ नये म्हणून अभारतीय एकेश्वरवादी धर्म न स्वीकारता त्यांनी याच भूमीत जन्मलेला बौद्ध धम्म स्वीकारला. दलित चळवळ कम्युनिझमची बळी होऊ नये म्हणून त्यांनी जनप्रबोधन केले. नदी जोड प्रकल्पसारखे विषय सुचविणारे डॉ. आंबेडकर हे सखोल चिंतन करणारे अर्थशास्त्री होते,' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व अभिलेखागार प्रमुख मिलिंद ओक यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार दर्शन व्याख्यान नुकतेच सिडको नाट्यगृहात झाले. या वेळी ते बोलत होते. यानिमित्त त्यांनी भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, 'देशात वंचित समाज उद्धाराच्या विविध चळवळींच्या इतिहासाचा सप्रमाण आढावा घेत डॉ. आंबेडकरांनी भारतीय वंचित समाजाच्या समस्येचे अचूक निदान केले. त्यावर स्थायी उपयायोजना व्हाव्यात म्हणून आपल्या आयुष्यात अनेक आंदोलने केली, संस्था काढल्या, पक्ष काढले, आपल्या देशाची घटना निर्माण केली. वंचित समाजाला घटना दत्त मूलभूत अधिकार प्रदान केले. सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित व्हावी म्हणून विस्तृत पाया घातला,' असेही मत ओक यांनी विविध संदर्भ व ऐतिहासिक प्रमाण देऊन मांडले. प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रांत संघचालक मधुकर जाधव यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. रोहित सर्वज्ञ यांनी केले. व्यासपीठावर शहर संघचालक पुरुषोत्तम हेडा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम विभागाची मार्च सरताना डागडुजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्च संपण्यापूर्वी मंजूर झालेला निधी घाईगडबडीत खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने डागडुजी सुरू केली आहे. उपकरातून चालू आर्थिक वर्षात मंजूर केलेली २० लाखांची तरतूद करून घेण्यासाठी मंजुरीची फाइल चुटकीसरशी मंजूर करून घेण्यात आली. योजनांच्या नियोजनाचे मात्र अनेक कामे अडण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागात डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. आठवडाभरापूर्वी अचानकपणे हे काम सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालय दुरुस्तीच्या हेडमधून साडेतीन लाख रुपये मंजूर आहेत. त्यातून विभागाचे पत्रे बदलणे, अंतर्गत डागडुजी ही कामे करण्यात येत आहेत. याशिवाय उपकरातून फर्निचरसाठी २० लाखांची तरतूद ठेवण्यात आली होती. ३१ मार्चपर्यंत हा निधी खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात अगदी दोन दिवसांत ही २० लाखांची फाइल मंजूर करण्यात आली. हे काम सध्या सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्याकडे काहींनी तक्रार केली की, अनेक निविदा मंजूर असून त्या मार्गी लावण्यासाठी तांत्रिक बाबीत अडकल्या आहेत. कारण बांधकाम विभागात काम सुरू आहे. मार्च संपत असताना प्रशासकीय कामे मार्गी लावण्याऐवजी डागडुजीचे काम सुरू केल्याबद्दल अध्यक्षांनी बांधकाम विभागास अचानक भेट देऊन नाराजी व्यक्त केली होती. सदस्य, पदाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कामांना प्रशासकीय अडचणी दाखविल्या जातात, पण प्रशासनाच्या कामाच्या बाबतीत मात्र तत्काळ अंमलबजावणी कशी काय केली जाते ? असा सवाल सदस्यांनी बोलून दाखविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५० कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्चअखेरीस महापालिकेतील पाचशेंपेक्षा जास्त फायली आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निकाली काढल्यामुळे तब्बल १५० कोटींच्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुखद वार्तेमुळे उन्हात आणि कचराप्रश्नामुळे बेजार झालेल्या आणि कोमेजलेल्या नगरसेवकांच्या चेहऱ्याची कळी खुलली आहे.

अर्थसंकल्पात नोंदवलेल्या कामांना मार्चअखेरपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळाली, तर त्या कामांचा मार्ग मोकळा होतो. पुढील वर्ष - सहा महिन्यात निधीच्या उपलब्धतेनुसार ही कामे पूर्ण केली जातात. गेल्या एक ते दीड महिन्यापासून शहरात कचराकोंडीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे बहुतेक विकास कामे ठप्प झाली होती. त्यातच शासनाने डी. एम. मुगळीकर यांची आयुक्तपदावरून बदली केली. त्यामुळे वॉर्डातील विकास कामांच्या फायली कशा निकाली निघणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मुगळीकरांच्या बदलीनंतर शासनाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे पालिका आयुक्तपदाची सूत्रे दिली. कचराकोंडी फोडण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावर देण्यात आली. कचराकोंडीतून मार्ग काढतानाच मार्च अखेरच्या दृष्टीने आवश्यक ती कामे आपण करणार आहोत, कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही याकडे लक्ष दिले जाईल असे नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले होते.

\B...सुसाट काम

\Bसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार - शुक्रवार या दोन दिवसांच्या सुट्टीत त्यांनी पाचशेवर फायली निकाली काढल्या. त्यामुळे वॉर्डांमधील विकास कामांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. निकाली काढण्यात आलेल्या फायलींमध्ये तांत्रिक मंजुरीच्या, अंदाजपत्रकांच्या आणि टेंडर्सच्या फायली प्रामुख्याने होत्या. शनिवारी देखील त्यांनी पन्नास पेक्षा जास्त फायली हातावेगळ्या केल्याची माहिती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार मोबाइल टॉवर्स सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विमानतळ प्राधिकरणाच्या आक्षेपामुळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आठ पैकी चार मोबाइल टॉवर्स सील करण्याची कारवाई शनिवारी सिडको एन २ आणि एन ४ परिसरात केली.

परिसरातील मोबाइल टॉवर्समुळे विमानांना धोका निर्माण होऊ शकतो, असे प्राधिकरणाने महापालिकेला कळविले होते. या तक्रारीनंतर महापालिकेने विशेष पथकाच्या माध्यमातून हे टॉवर्स सील केले. त्यात आयडिया, एअरसेल, टाटा डोकोमो कंपनीचे टॉवर्स असल्याची माहिती पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांनी दिली. सिडको एन ११ यादवनगर येथील मुजाहेद फारूकी यांनी सुरू केलेले अनधिकृत बांधकाम देखील पालिकेच्या पथकाने बंद पाडले. फारूकी यांचे बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाया संनियंत्रण अधिकारी एम. बी. काझी यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग, अग्निशमन विभागाचे प्रमुख सुरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केल्या.

\Bपाच जणांना नोटीस

\Bसर्व्हे क्रमांक १८६ , मयूरपार्कच्या पाठीमागे जाधववाडी भागात काही नागरिकांनी शिव रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. स्थानिक नागरिकांनी याबद्दल तक्रार केली होती व रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अतिक्रमण हटाव पथकाने पाच नागरिकांना नोटीस बजावल्या.

\Bअनधिकृत टॉवर्सचे काय?

\Bशहरात सध्या तब्बल २६७ मोबाइल टॉवर्स अनधिकृत आहेत. त्यामुळे पक्षांना त्रास होतो, नागरिकांच्या आरोग्या दुष्परिणाम होतो अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे, नगरसेवकांकडे परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे या अनधिकृत मोबाइल टॉवर्समुळे पालिकेचा करही बुडतो. आता या टॉवर्सवर नवे आयुक्त आणि जिल्हाधिकारी असलेले नवल किशोर राम, काय करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या टॉवर्सवरही कारवाई करा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

\B

टॉवर्सचे मायाजाल

\B- ३७३ एकूण मोबाइल टॉवर्स

- १०९ अधिकृत मोबाइल टॉवर्स

- २६७ अनधिकृत मोबाइल टॉवर्स

- १९७ कर भरलेल्या टॉवर्सची संख्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लातूरच्या मुलीचं नाव ठेवलं 'स्वच्छता'

$
0
0

लातूर:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरित होऊन लातूर येथील दाम्पत्यानं त्यांच्या मुलीचं नाव 'स्वच्छता' ठेवलं आहे. मुलीचा नामकरण सोहळा शुक्रवारी लातूरच्या पालिका कार्यालयात पार पडला. मुलीचं नाव स्वच्छता ठेवल्यानं शहरवासियांनी पालकांवर कौतुकाचा वर्षाव केला.

लातूर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये मोहन आणि काजल कुरिल हे दाम्पत्य राहतं. काजल यांनी २१ फेब्रुवारीला मुलीला जन्म दिला. तिचा नामकरण सोहळा शुक्रवारी लातूर पालिकेच्या कार्यालयात पार पडला. स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरित होऊन मुलीचं नाव स्वच्छता ठेवण्यात आलं. पालिकेत तिचं नाव अधिकृतरित्या नोंदवण्यात आलं आहे, अशी माहिती काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजामगुंडे यांनी दिली.

ही बातमी इंग्रजीत वाचा

महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं होतं. या अभियानानुसार, २०१९ पर्यंत देशात ११ कोटी शौचालये उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. मोदींच्या या अभियानापासून प्रेरित होऊन मोहन आणि काजल या दाम्पत्यानं त्यांच्या मुलीचं नाव स्वच्छता ठेवलं आहे. त्याबद्दल त्यांचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी - अॅड सचिन एरंडे यांची पॅनेलवर नियुक्ती

$
0
0

कायदेविषयक सल्लागार म्हणून

सचिन एरंडे यांची नियुक्ती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे कायदेशीर सल्लागार म्हणून झेडपीच्या पॅनेलवर अॅड. सचिन एरंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी अॅड. एरंडे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीचे आमदार संदीपान भुमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर ,अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, महिला व बाल कल्याण सभापती कुसुमताई लोहकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी,उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले,जिल्हा बँकेचे संचालक अंकुश रंधे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम एरंडे,दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे,माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, जिल्हा परिषद सदस्य अक्षय जायभाये, ज्ञानेश्वर कापसे, दिलीप निरफळ, कमलाकर एडके, साईनाथ सोलाट, गोरख चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची आजपासून राज्य आढावा बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत बोलाविण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येणार आहे.

मुंबईती काँग्रेस भवनात सोमवारी बैठकीची सुरवात होईल. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गेल्या महिन्यात राज्यातील राखीव विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी विभागनिहाय समित्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांनी सर्व मतदारसंघांमध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली.आगामी निवडणुकीत काँग्रेसची काय परिस्थिती असू शकते ? कोणत्या मतदारसंघात कोणाचा प्रभाव आहे ? या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता आहे ? याची चाचपणी करण्यात आली. या समित्यांनी अहवाल सादर केले असून त्यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष चव्हाण व काँग्रेसची कोअर टीम कार्यकारिणी सदस्यांकडून आढावा घेईल. बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री गुरू तेग बहादूर जयंती साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिख समाजाचे धर्मगुरू श्री गुरू तेग बहादूर यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. भजन, कीर्तनासह भव्य मिरवणूक व ठिकठिकाणी युवकांतर्फे अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सिंधी कॉलनीतील गुरूद्वारा येथून सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भजन, कीर्तन, जपनाम करत शिख बांधव सहभागी झाले होते. सिंधी कॉलनीतून निघालेली मिरवणूक डेअरी चौक, क्रांती चौकामार्गे उस्मानपुरा येथील गुरूद्वारात पोहचली. तलवारबाजी, आतषबाजीही करण्यात आली. तसेच शिख समाजातील युवकांनी उस्मानपुरा, क्रांती चौक अशा ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. यामध्ये पोहे, जिलेबी, आलुवडा यासह दूध, सरबतचा प्रसाद नागरिकांना देण्यात आला. उस्मानपुरा चौकात अन्नदान कार्यक्रमासाठी जसप्रीत बग्गा, गुरूदेवसिंग छाबडा, नवीन ओबेरॉय, हन्नी चंडो, राजू छाबडा, लवली जोहर यांची परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी ब्रिगेड पक्षाची नोंदणी रद्दसाठी अर्ज करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'धर्मादाय संस्थेच्या नोंदीनुसार आजही मी संभाजी ब्रिगेड संघटनेचा अध्यक्ष आहे. अध्यक्ष असलेल्या संघटनेचे नाव, बोधचिन्ह, घोषवाक्य आणि त्याच विचाराचा पक्ष स्थापन करून संघटनेचा ते गैरवापर करत असतील, तर तो पक्ष रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आणि तो माझा कायदेशीर अधिकार आहे,' असे संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केले.

संभाजी ब्रिगेडची मराठवाडा विभागीय बैठक रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेमध्ये घेण्यात आली. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी गायकवाड म्हणाले की, एखाद्या जातीची संघटना राजकारणात आल्यानंतर यश येण्याची शक्यता फार कमी असते. शिवराज्य पक्ष तसेच छावा संघटनेने स्थापन केलेल्या क्रांतीसेना पक्षाचे उदाहरण समोर आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळालेली मते आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज केली असता याचा संपूर्ण फायदा भाजपला झाला असल्याचे स्पष्ट झाले. कार्यकर्त्यांचे मत विचारात न घेता संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष करण्यात आला. जेव्हा राजकीय पक्ष होण्याची प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळी जवळपास ९० टक्के कार्यकर्त्यांनी आम्हाला समाजकारण करायचे आहे, राजकारणात जाण्याची आमची आर्थिक तसेच मानसिक परिस्थिती नाही, असे म्हटले होते. या कार्यकर्त्यांची अस्वस्‍थता लक्षात घेता सर्वांनी एकत्र येऊन तीन महिने चिंतन केले. दरम्यानच्या काळात मी शेतकरी कामगार पक्षामध्ये सहचिटणीस म्हणून गेलो. आता या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देऊन संभाजी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या राज्य कार्यकारणी बैठक २५ मार्च रोजी पुणे येथे झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत राज्य कार्यकारणीची निवड करण्यात आली. त्यानुसार, प्रवीण गायकवाड (प्रदेश अध्यक्ष), सुधीर भोसले (प्रदेश कार्याध्‍यक्ष), हिंदूराव हुजरे पाटील (प्रदेश कार्याध्यक्ष) सुभाष बोरकर (प्रदेश महासचिव), आत्माराम शिंदे (प्रदेश साचिव), छगन शेरे (प्रदेश उपाध्यक्ष) आदींसह इतर कार्यकारणी जाहीर केली.

\Bगायकवाड यांना इशारा \B

दरम्यान, गायकवाड यांच्या संघटनेत नसलेले प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड हे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला आहे. गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर अॅड. मनोज आखरे प्रदेशाध्यक्ष झाले व चेंज रिपोर्टसाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे, त्यामुळे गायकवाड यांचा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडशी काहीही संबंध नाही, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images