Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लिंगायत महामोर्चाची जोरदार तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या रविवारी (८ एप्रिल) लिंगायत समाजाचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याबाबत शहरातील विविध ठिकठिकाणी नियोजन बैठका घेऊन महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सिडको, हडको, पुंडलिकनगर, मयूर पार्क, रामनगरमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

शहरासह जिल्ह्यात गावनिहाय बैठका सुरू आहेत. बैठकीत महामोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी बसवराज मंगरुळे, प्रदीप बुरांडे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, जया गुदगे, विश्वनाथ स्वामी, अविनाश भोसीकर, वीरभद्र गादगे, भरत लकडे, राजेश कोठाळे, आत्माराम पाटील, गणेश वैद्य, शिल्पाराणी वाडकर, अभिजित घेवारे, गणेश कोठाळे, सुंदर सुपारे, आशिष लकडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पतीच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

विवाहानंतर एक वर्ष चांगले वागविल्यानंतर पतीच्या विवाहबाह्य संबंधाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये खटके उडून पत्नीला मारहाण करून शारिरीक मानसिक छळ करून जीवन जगणे असह्य केल्यामुळे पतीच्या छळाला कंटाळून विमल अनिल वाकळे या विवाहितेने भडजी शिवारातील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजता भडजी येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खामखेडा ता. औरंगाबाद येथील विमल प्रभात तुपे यांचा विवाह भडजी येथील अनिल विठ्ठल वाकळे यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. विमल यांचा नर्सिंगचा कोर्स झाल्याने त्या पतीच्या सांगण्यावरून औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात नोकरी करीत होत्या. नोकरीनिमित्त त्या मैत्रिणीसोबत रूम करून औरंगाबादला राहत होत्या. सहा महिने नोकरी केल्यानंतर अनिल वाकळे याने तिला भडजी येथे परत आणले. तीन महिने चांगले वागविले. विवाहिता भडजी येथे राहायला आल्यानंतर पतीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्याने अनिल त्यांना मारहाण करत होता. मारहाणीचा प्रकार सहा महिने सुरू होता.

खामखेडा येथे माहेरी राहायला आल्यावर विमल यांनी पोलिस अधीक्षक ग्रामीण कार्यालयात पतीविरुद्ध तक्रार दिली होती.

या तक्रारीवरून पतीला अनिलला नोटीस आल्याने अनिल वाकळे व इतर चार पाच जण खामखेडा येथे येऊन प्रकरण मिटवायला आलो; परंतु मुलीला नेणार नाही म्हणून निघून गेले. एक एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता विवाहितेचा भाऊ राधाकिशन प्रभात तुपे याने बहीण विमलला मोबाइल फोन केला तेव्हा पती अनिल हा मारहाण करीत असल्याने सांगितले. कानडगाव येथील नामदेव धुमाळ या नातेवाईकांना भडजी येथे जाऊन काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी सांगितले असता सकाळी साडे नऊ वाजता विमल अनिल वाकळे यांनी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समजले. विवाहितेचा भाऊ राधाकिशन प्रभात तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अनिल विठ्ठल वाकळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार बेंद्रे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणोरीच्या शेतकऱ्यांना वन विभागाची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील गणोरी येथील शेतकऱ्यांची जनावरे वन्य प्राण्यांनी फस्त केली होती. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. त्यासाठी वनसमितीनेही पाठपुरावा केला होता. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी सहा हजार रुपयांचा धनादेश नुकताच मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

गणोरी येथे वन विभागाचे मोठे वनक्षेत्र आहे. त्यात काही वन्य प्राणी राहतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी वन्य प्राण्यांनी येथील शेतकरी नामदेव तांदळे आणि त्र्यंबक तांदळे यांच्या शेतातील गाय व घोडी फस्त केली होती. त्या अनुषंगाने या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. या बाबतचा पाठपुरावा येथील वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक धोंडीराम जाधव यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी वन समितीचे अध्यक्ष राजू उबाळे, वनपाल यू. एच. चिकटे, वनरक्षक पी. पी. चोरमारे, वनरक्षक पी. जी. लकडे, वनरक्षक देवबोने, वनमजूर आयुब शेख, विठ्ठल वाघ, भोसले, बी. बी. वाघ, एन. एस. कोठाळे, अण्णा रोठे, बापुराव तांदळे, दादासाहेब गायकवाड, नारायण तांदळे यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्प संचालकांच्या मनमानीविरोधात उपोषण

$
0
0

औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा. शिक्षकांचे सहा महिन्यांचे थकित मानधन त्वरित अदा करावे, या मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

शरणापूर येथील स्थलांतरित विशेष प्रशिक्षण केंद्र सर्व्हे केलेल्या जागेवर सुरू करण्याची परवानगी द्यावी व विलंब करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी. प्रकल्पातील काही बोगस संस्थांवर फौजदारी गुन्हे नोंदवावे, उपजिल्हाधिकाऱ्यांनी १६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या बैठकीत थकित मानधन देण्याबाबत आदेश देऊनही प्रकल्प संचालक हेतुपुरस्सर ते देण्यास विलंब करत आहेत. सुधारित मार्गदर्शक सूचीमध्ये व्यावसायिक प्रशिक्षक हे पद संस्थामार्फत असतानाही, प्रकल्प संचालक हे त्यांची पाठराखण करतात. शिवाय त्यांचे मानधनही वेळेवर अदा केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. उपोषणात राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांचे छापासत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध दारू विक्रेत्यावर शहर पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये हॉटेल चालकासह ग्राहकांवर व दारू बाळणाऱ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. शहरातील लहान हॉटेल पोलिसांनी लक्ष्य केल्या असून पार्सल घेऊन बसता येणाऱ्या मोठ्या हॉटेलवर मात्र पोलिस डोळेझाक करताना दिसत आहे.

सिटीचौक पोलिसांनी शनिवारी सायंकाळी खडकेश्वर भागातील हॉटेल लखन आणि हॉटेल संतोषवर छापा टाकला. या ठिकाणी दारू उपलब्ध करून दिल्याप्रकरणी हॉटेल मालक लक्ष्मीनारायण शिवनारायण जैस्वाल व संतोष शिवनारायण जैस्वाल (दोघे रा. छावणी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ६०० रुपयाची दारू जप्त करण्यात आली. सिडको पोलिसांनी हर्सूल रोडवर कारवाई करीत रंगनाथ पांडुरंग म्हस्के (वय ३५ रा. यशपालनगर, हर्सूल) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ५२० रुपयाची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा पोलिसांनी बीड बायपास रोडवरील शिवानी हॉटेल येथे कारवाई केली. यामध्ये कीर्तीकुमार सुरेशराव वैद्य (वय ४२, रा. समर्थ प्लाझा अपार्टमेंट, गारखेडा) यांना ११०० रुपयांच्या दारूसह ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मुकुंदवाडी भागात अवैध दारू विक्रेता प्रदीप रामचंद्र क्षीरसागर (वय ४२ रा. शिवाजी कॉलनी) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ८८४ रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली. पुंडलिकनगर पोलिसांनी प्रीतम माणिक पिंपळे (वय ५५, रा. विश्रांतीनगर) याला विश्रांतीनगर भागात अटक केली. त्याच्या ताब्यातून एक हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरमधून विवाहीता बेपत्ता

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील फुलेनगर पंढरपूर येथून विवाहिता पतीशी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग धरून घरातून निघून गेल्याची घटना रविवार (एक एप्रिल) रोजी घडली. वंदना संजय गायकवाड (३७, रा. फुलेनगर, पंढरपूर, ता. औरंगाबाद) असे बेपत्ता महिलेचे नाव असून, ती पतीसोबत मजुरीचे काम करत होती. रविवारी पतीसोबत किरकोळ भांडण झाले होते. त्याची तक्रार तिची आई मंगल मुरलीधर दळवी यांनी पोलिसात दिली आहे. याची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास भागडे हे करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्ञानशक्ती स्वीकारदिन’ सोहळा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवान श्रीचक्रधर स्वामींनी गोविंदप्रभूंकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार करून उद्धारकार्याला सुरुवात करून ७९६ वर्षे पूर्ण झाले. यानिमित्ताने पैठण रोडवरील महानुभाव मंदिर आश्रमात ग्लोबल महानुभाव संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात 'ज्ञानशक्ती स्वीकारदिन' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महंत कळमकर बाबाजी यांनी ज्ञानशक्ती स्वीकारदिनाचे महत्त्व विशद केले. श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम ट्रस्टच्या अध्यक्ष मठाधिष्ठात्री महंत सुभद्राबाईजी शास्त्री कपाटे यांच्या एक्सष्ठीनिमित्त ट्रस्टचे सचिव व महंत संतोषमुनी शास्त्री कपाटे यांनी पूजन केले. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महंत दिवाकर बाबाजी महानुभाव (मोठे वाघोदे), महंत कान्हेराज बाबाजी (तेलंगणा), महंत खडकुलीकर बाबाजी (सिल्लोड), भांडारकर बाबा, महंत सायराज बाबाजी, बाळकृष्ण अंजनगावकर (नाशिक), पांडुरंग बोधले (नाशिक), नीलेशराज कवीश्वर यांनी दिवसभर कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला. सायंकाळी भाविकांना शेंगुळ बुडूडेच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महंत नायंबास बाबाजी(मकरधोकडा) यांच्या प्रेरणेतून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा महानुभाव समिती, श्रीचक्रधर सेवा मंडळ, राऊळ महिला मंडळ, श्रीचक्रपाणी भजनी मंडळ, श्रीदत्त धाम मंदिर (बजाजनगर), श्रीदत्त मंदिर (जाधववाडी), श्रीकृष्ण मंदिर (म्हाडा कॉलनी) यांचा या सोहळ्यात प्रामुख्याने सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती उत्सवाची सांगता

$
0
0

औरंगाबाद: रोकडिया हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. रामनवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त मंदिरात भावार्थ रामायण कथेचे आयोजन करण्यात आले. आमदार अतुल सावे, डॉ. जी. एस. कुलकर्णी, हभप गणेश महाराज बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी फोडून शनिवारी सांगता करण्यात आली. त्यानंतर गणेश महाराजांचे कीर्तन, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती विनोद शेवतेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जबलपूर रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द

$
0
0

औरंगाबाद : जबलपूर रेल्वेच्या दोन फेऱ्या प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे रेल्वे विभागाने रद्द केल्या आहेत. जबलपूर-सिकंदराबाद-जबलपूर या विशेष रेल्वेच्या २६ फेऱ्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. ही विशेष रेल्वे दोन एप्रिलला जबलपूर येथून सिकंदराबादकडे जाणार होती. तर सिकंदराबादहून जबलपूरला जाण्यासाठी तीन एप्रिलला सुटणार होती. मात्र, या रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने या रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. या निर्णयामुळे दोन एप्रिल आणि नऊ एप्रिलला जबलपूर येथून सुटणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर सिकंदराबाद येथून तीन एप्रिल आणि दहा एप्रिलला सुटणाऱ्या जबलपूरकडे जाणारी रेल्वेही रद्द करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूविक्रेत्यांवर छापासत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध दारू विक्रेत्यावर शहर पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये हॉटेल चालकासह ग्राहकांवर व दारू बाळणाऱ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. शहरातील लहान हॉटेल पोलिसांनी लक्ष्य केल्या असून पार्सल घेऊन बसता येणाऱ्या मोठ्या हॉटेलवर मात्र पोलिस डोळेझाक करताना दिसत आहे.

सिटीचौक पोलिसांनी शनिवारी सायंकाळी खडकेश्वर भागातील हॉटेल लखन आणि हॉटेल संतोषवर छापा टाकला. या ठिकाणी दारू उपलब्ध करून दिल्याप्रकरणी हॉटेल मालक लक्ष्मीनारायण शिवनारायण जैस्वाल व संतोष शिवनारायण जैस्वाल (दोघे रा. छावणी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ६०० रुपयाची दारू जप्त करण्यात आली. सिडको पोलिसांनी हर्सूल रोडवर कारवाई करीत रंगनाथ पांडुरंग म्हस्के (वय ३५ रा. यशपालनगर, हर्सूल) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ५२० रुपयाची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा पोलिसांनी बीड बायपास रोडवरील शिवानी हॉटेल येथे कारवाई केली. यामध्ये कीर्तीकुमार सुरेशराव वैद्य (वय ४२, रा. समर्थ प्लाझा अपार्टमेंट, गारखेडा) यांना ११०० रुपयांच्या दारूसह ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मुकुंदवाडी भागात अवैध दारू विक्रेता प्रदीप रामचंद्र क्षीरसागर (वय ४२ रा. शिवाजी कॉलनी) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ८८४ रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली. पुंडलिकनगर पोलिसांनी प्रीतम माणिक पिंपळे (वय ५५, रा. विश्रांतीनगर) याला विश्रांतीनगर भागात अटक केली. त्याच्या ताब्यातून एक हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटक भाजपला औरंगबादमधून रसद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला रसद पुरवण्यासाठी शहरातून तरुण कार्यकर्त्यांची कुमक सोमवारी कर्नाटकला रवाना झाली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १५ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीच्या प्रचारासाठी औरंगाबादमधून वीस जणांची यादी तयार करण्यात आली असून, सध्या नगरसेवक दिलीप थोरात, नितीन चित्ते, उपाध्यक्ष महेश माळवतकर आणि चिटणीस सागर नीळकंठ यांच्यावर खास जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ते बैठकीला कर्नाटकात गेले होते. सध्या ते बागलकोर जिल्ह्यात पक्षीय काम करत आहेत. मालवतकर यांच्याकडे बदामी विधानसभा, सागर नीळकंठ यांच्याकडे बागलकोट, चित्ते यांच्याकडे बिलगी तर थोरात यांच्याकडे हुनगुंड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. 'बूथ जिता तो देश जितेगा,' असा नारा देत त्याप्रमाणे बूथ रचना अधिक सक्षम करण्यावर या पथकाची मदार आहे. बूथ कार्यकर्ते, पत्रक वाटप, मतदारांची वर्गवारी त्यानुसार काम अधिक जोमाने कुठे करणे आवश्यक आहे यावर भर दिला जात आहे.

पक्ष आदेशानुसार कर्नाटकात काम सुरू आहे. दिवसभरात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत काम सुरू असून, एकमेकांच्या अनुभवाचा खूप फायदा होत आहे.

- दिलीप थोरात, शहर सरचिटणीस, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाटणी

$
0
0

"शेतकऱ्याची मुलगी" या विषयावर विद्यार्थिनीला या विद्यार्थिनीला भाषण लिहून दिले. मुळात लिखाणाची आवड असल्यामुळे मी नेहमी माझ्या विदयार्थ्यानां भाषण लिहून देत असे, परंतु हे भाषण मात्र माझ्या आयुष्याला कलाटणी देणार ठरलं. तिने आपल्या खणखणीत आवाजात अशा पद्धतीने भाषण केलं की उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं आणि अंगावर काटासुद्धा!

ही जादू माझ्या शब्दांची होती की तिच्या आवाजाची, पण मी ठरवल, जर माझे विद्यार्थी असं भाषण करू शकतात तर मला सुद्धा करता आलं पाहिजे. आणि सुरू झाला एक प्रवास न ठरलेला, परंतु वेगळ्या अनुभूतीचा.

आमच्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अचानक काही तांत्रिक कारणामुळे माझ्या सहकारी शिक्षकाने अर्धा कार्यक्रम झाल्यानंतर माझ्यावर सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली. अचानक आलेली आणि नकार देता येणार नाही अशी ही संधी मी घेतली. कवीसंमेलनात कविता सादर करण्याचा अनुभव पाठिशी होताच. त्यामुळे उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रम अधिक रंगतदार करण्यात मला यश आलं. त्यासाठी कवी संमेलनातील विविध कवितांचा आधार घेतला. माझ्या विद्यार्थ्याचा व गावकऱ्याचां उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेरणा देणारा ठरला.

औरंगाबादच्या गीता भवनमध्ये शिक्षंकासाठी वकृत्व स्पर्धा होती. अनेक शैक्षणिक विषयापैकी मी "कोचिंग क्लास व पालक" हा विषय घेतला. माझ्यासोबत मातब्बर स्पर्धक होते. प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला आणि मला द्वितीय क्रंमाकाचे पारितोषिक मिळाले. माझा आत्मविश्वास वाढला. मरळ सरांनी पाच मिनिटाच्या भाषणाचे रूपातंर एक तासात करण्याची कल्पना सुचवली अन् मी व्याख्यानाच्या तयारीला लागलो.

पहिली संधी कधीही महत्त्वपूर्ण ठरते आणि त्या संधीचे सोन करता आलं पाहिजे. राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीत सिंदखेड राजा येथील उमरद या गावात व्याख्यान देण्याची पहिली संधी प्रसिद्ध व्याख्याते अशोक बांगर यांच्यामुळे मिळाली. त्यांच्या विश्वासास पात्र होण्याचा माझ्यावर दबाव होता. माझ्याकडे नऊ दिवस होते. नऊ दिवसांत विविध पुस्तकांचे वाचन करून मी तयारी केली. हजार ते बाराशे प्रेक्षंकासमोर माझे पहिले व्याख्यान झाले. प्रेक्षकांनी खूपच अप्रतिम प्रतिसाद दिला. आज विविध विषयावर व्याख्यान, सूत्रसंचालन असे कार्यक्रम करीत असतो, परंतु या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीने दिलेली प्रेरणा, संधी व ज्येष्ठांनी केलेले मार्गदर्शन कायम स्मरणात राहिल. या सर्वांमुळेच माझ्या सांस्कृतिक करीअरला कलाटणी मिळाली. त्या सर्वाचे आज 'मटा'च्या थँक यू सदराच्या माध्यमातून आभार मानतो.

संदीप ढाकणे, लिंगदरी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजय बाळासाहेब आघाडे, प्रा.शा.सोबलगाव

तिसरा डोळा -वेणू राधाकिसन पाथ्रीकर, औरंगाबाद. एप्रिल फूल - बहावा

मोफत संगणक प्रशिक्षण

$
0
0

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच शाळेत कॉस्मो फाउंडेशनच्या वतीने उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थी व पालकांसाठी पाच एप्रिल ते नऊ जूनपर्यंत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संगणकाचे शिक्षण घेणे आता गरजेचे झाले आहे. याचा विचार करून विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही शिक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. येथे नाव नोंदणी करणाऱ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव, लिंबेजळगाव, तुर्काबाद, अंबेलोहळ व गणेश विद्यालय गाजगाव या शाळेत हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आम्ही स्वरयात्री

$
0
0

आम्ही औरंगाबादला मागील साठ-पासष्ट वर्षांपासून स्थाईक आहोत. येथे मराठवाड्याचे प्रसिद्ध संगीततज्ज्ञ पं. नाथ नेरळकर यांच्याकडे भीमशास्त्रीय संगीत थोडेफार शिकले. गांधर्व महाविद्यालयाच्या काही परीक्षेत मी उत्तम यश मिळविले. मला अगदी लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताची आवड आहे. औरंगाबादला होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमास मी आवर्जून जाते. गेल्या ६४ वर्षांपासून पुण्यात होणाऱ्या या सवाई गंधर्व संगीच महोत्सवाचं नाव अनेक वर्षांपासून ऐकत होते, पण आपलं घर-संसार मुले, नोकरी सोडून पुण्यात पाच-सहा दिवस या संगीत महोत्सवासाठी जाणे शक्य नव्हतं, पण कधीकधी पुसट कल्पनाही सत्यसृष्टीत येतात म्हणे, तसेच झाले.

आमचा मुलगा राजीव हा इ.स. २००० ला त्याच्या कामामुळे पुण्यातच स्थायिक झाला. गेल्या अनेक वर्षांपासून तो पुण्यात आहे तरी या संगीत महोत्सवात जाण्याचा विचार त्याच्या किंवा माझ्या मनात एकदाही डोकावला नाही, पण अचानक डिसेंबर २०१२ ला राजीवने मला फोन केला व सांगितलं की आई, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सवाई महोत्सव आहे. तू बाबांना घेऊन इथं यावंसं असं मला खूप वाटतंय. तुझी शास्त्रीय संगीत ऐकण्याची इच्छा व आवड पूर्ण करायचीय आम्हाला. चार-पाच दिवस दररोज सहा ते सात तास उत्तमोत्तम गायक, वादकांचे श्रवणीय कार्यक्रम असतात. पुण्यात मी १२ वर्षांपासून आहे पण कामाच्या घाईत तुला या कार्यक्रमासाठी येथे बोलवावं हे लक्षातच आले नाही. मला शास्त्रीय संगीताचं फारसं ज्ञान नाही, पण तुझ्याबरोबर हा संगीताचा कार्यक्रम पूर्ण ऐकायचं ठरवलं आहे. केवळ तुझ्यासाठी.

त्याचा फोन पूर्ण झाल्यावर विचार करता माझ्या लक्षात आलं की, ही गोष्ट अशक्य आहे. कारण आम्ही दोघेही वयोवृद्ध झालो आहोत. माझे पती नुकतेच बाथरूममध्ये पडल्यामुळे अंथरुणाला खिळले आहेत. त्यांना अशा स्थितीत पुण्याला नेणं कसं शक्य आहे? मी राजीवला फोन करून सांगितले की, तुझी-माझी आवड पूर्ण करण्याची इच्छा चांगली असली तर आमचं येणं अशक्य आहे. त्यावर राजीव म्हणाला, 'मी या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करूनच सर्व ठरवलं आहे. काही काळजी न करता सर्व गोष्टी माझ्यावर सोड. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना?'

यावर मी माझ्या पतींना विचारले तर ते म्हणाले, 'अगं, राजीव, मनीषा (सूनबाई), निमीष (नातू) तिघांनाही आपण पुण्याला यावं असं वाटत असेल तर आपण जरूर जावू. संगीत महोत्सवास तू राजीवसोबत जा. मी सून व नातवाबरोबर घरी राहीन. आपल्या आईची आवड पूर्ण करावी असं वाटणं किती कौतुकाची गोष्ट आहे.

आमचं पुण्याला संगीत महोत्सवाला जायचं ठरलं. राजीव स्वतः पुण्याहून रुग्णवाहिका घेऊन औरंगाबादला आला. माझ्या पतींना हळूवारपणे उचलून रुग्णवाहिकेत झोपवले. पूर्ण प्रवासात त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिले. पुण्यात विमान नगरमध्ये घरी आल्यावर काळजीपूर्वक त्यांना त्यांच्या स्वतंत्र खोलीत झोपवले. त्यांचं जेवण-बाकीची सर्व प्रकारची सेवा व्यवस्थित केली. संगीत महोत्सवास पुण्याला जाण्याचा हा आमचा कार्यक्रम न चुकता पाच वर्षे राजीवने पूर्ण केला. दुर्दैवाने आठ महिन्यांपूर्वी माझ्या पतींचं निधन झालं. त्यामुळे संगीत महोत्सवास यावर्षी येण्याची माझी इच्छा नव्हती, पण राजीव-मनीषा म्हणाले, 'आई, तुझ्यासाठी बाबा एवढा त्रास घेऊन पुण्याला यायचे. तू जर आली नाहीस तर त्यांना वाईट वाटेल.'

नुकत्याच संपलेल्या या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पतीची आठवण येऊन मन भरून यायचे. डोळ्यांत सारखे अश्रू यायचे, पण या अमर, शुद्ध संगीतातच माणसाचं दुःख दूर करून मन हलकं करण्याची शक्ती आहे हेही लक्षात आलं. अशाप्रकारची अमर, तीर्थप्राय अशी स्वरयात्रा आपल्या आईला घडविणारा पुत्र मातृभक्तच म्हणावा लागेल.

- डॉ. वनमाला पानसे, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये आज तलाकप्रश्नी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नडच्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची महिला शाखा, उलेमा ए हिंद, कुल जमात संघटना यांच्यातर्फे मंगळवारी (तीन एप्रिल) तहसील कार्यालयावर मुस्लिम महिलांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुस्लिम खवातीनच्या नाजीमा सुरय्या यांनी, तीन तलाक विधेयकाला विरोध करत, केंद्र व राज्य शासनाने शरिया कायद्यात ढवळाढवळ करायची थांबवावी तीन तलाक विधेयक मागे घ्यावे, आम्ही सर्व मुस्लिम महिला तीन तलाक विधेयकाच्या विरोधात आहोत कारण, या या विधेयकांमुळे मुस्लिम महिलांचे संरक्षण होणार नाही, उलट मिळत असलेल्या हक्कांपासून त्यांना वंचित ठेवले जाणार आहे. म्हणून हे विधेयक मुस्लिम विरोधी असून त्याला आमचा विरोध आहे, असे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी तहरिके इस्लामीच्या रुकन गोहर फातीमाआदी महिलांसह मुफ्ती मुस्तकीम, मुफ्ती महेबूब, मौलाना सद्दाम, मौलाना अनीस, अता मोहंमद,अब्दुल जावेद, अहेमद अली, फेरोज खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुक मोर्चा उर्स मैदान येथून सिद्दिक चौक, शनिमंदिर, करीम नगर, पिशोर नाकामार्गे तहसील कार्यालयावर जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरोदर मातेने पोषक आहार घ्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुदृढ बाळासाठी गरोदर व स्तनदा मातेने योग्य पोषक आहार करावा, असे आवाहन युनिसेफचे सल्लागार पांडुरंग सुदामे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र येथे दर शुक्रवारी गरोदर मातांसाठी अल्पदरात प्रसुतीपूर्व तपासणी केली जाते. यात दहा रुपयात तपासणी व औषधी दिली जाते तसेच आवश्यक मातांसाठी मोफत सोनोग्राफी व रक्त लघवी तपासणी केले जाते. यानिमित्त उपस्थित महिलांना स्तनपान व शिशुपोषण या विषयी मार्गदर्शन व्हावे, यासाठी सुदामे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केले. गरोदरपणात योग्य आहार घेतल्याने बाळाच्या मेंदू वाढीबरोबर शरिराच्या इतर अवयवांच्या विकास होता, असे नमूद केले. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा अपसिंगेकर, डॉ. वर्षा मांडे, प्रकाश सोनवणे, राजेंद्र राक्षे, डॉ. दिवाकर कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एप्रिल फूल नव्हे; कूल म्हणून साजरा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रयास फाउंडेशनने रविवारी गोगाबाबा टेकडी येथे वृक्षारोपण करत एक एप्रिल हा एप्रिल फूल नव्हे, तर एप्रिल कूल म्हणून साजरा करण्यात आला.

गेल्या दहा वर्षांपासून 'प्रयास'कडून गोगाबाबा टेकडी येथे वृक्षारोपण, संगोपन सुरू आहे. एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढतो. त्याचा विपरित परिणाम झाडांवर होतो. लावलेले छोटे रोपही सुकून जाते. हे ओळखून प्रयासने 'एप्रिल कूल' दिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यानिमित्त टीमने परिसरात झाडांना पाणी दिले, काही रोपे लावली. याबाबत प्रयास संघटनेचे रवी चौधरी म्हणाले, 'ग्रुपने शहरात प्रथमच अशी संकल्पना मांडली आहे. आमची टीम वेगवेगळे प्रयत्न करत असून, शहरात वृक्षारोपणास चालना देणार आहे. टीममध्ये आमचे सहकारी कार्यरत असून त्यांच्या 'एप्रिल कूल' मेसेजने सोशल मीडियातही वाहवा मिळवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याशिवाय प्रवेश नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रवेश देवू नका, शैक्षणिक साहित्य विशिष्ट खरेदी करण्याबाबत सक्ती करू नका, असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शहरातील अनेक शाळा शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू करतात. तर शैक्षणिक साहित्यही खरेदीबाबत विशिष्ट दुकानात जा अशी सक्ती करतात. यात इंग्रजी शाळा आघाडीवर आहेत. २०१८-१९ शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यास अद्याप अवधी शिल्लक आहे, तरी अनेक शाळांनी कप्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच जास्तीचे शुल्क आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारीही पालकांनी केल्या आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाले नसताना आणि प्रवेशाबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना नसताना शाळांचा हा प्रताप सुरू आहे. दरवर्षी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याबाबत अनेक शाळांकडून सक्ती करण्यात येते. याबाबत तक्रारीनंतरही शिक्षण विभागाकडून कारवाई होत नाही. परंतु यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाने पत्र देत निर्देश दिले आहेत. जूनमध्ये शाळा सुरू झाल्या शिवाय प्रवेश देवू नयेत असे स्पष्ट केले आहे.

\B---

पत्रात असे म्हटले...\B

---

बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम २००९मधील तरतुदीनुसार मोफत शिक्षण घेण्याचा पाल्यांचा हक्क आहे. २०१८-१९ जूनमध्ये शाळा सुरू झाल्याशिवाय कोणत्याही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देवू नये. तसेच कोणत्याही पालकांना सक्तीने गणवेश, बुट, बॅग, पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करणे बाबत सक्ती करू नये. शाळेच्या दर्शभागात प्रवेशाबाबतची माहिती, सुविधेबाबत मोठा फलक लावावा. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत जनजागृती करावी. विद्यार्थ्यांनी याच शाळेत प्रवेश घ्यावा अशी सक्ती करू, नये असे पत्रात म्हटले आहे. सुरजप्रसाद जैस्वाल यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images