Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शहीद शुभम यांना सैनिकांची मानवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाकिस्तानने अचानक केलेल्या भेकड हल्ल्यात वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी झुंज देत जम्मू-काश्मीरमधील पूँच जिल्ह्यात शहीद झालेले जवान शुभम मस्तापुरे (रा. कोनेरवाडी, जि. परभणी) यांचे पार्थिव बुधवारी औरंगबाद विमानतळावर आणण्यात आले. यावेळी भारतीय सैन्यदलातर्फे त्यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.

पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावात एका शेतकरी कुटुंबात शुभम यांचा जन्म झाला होता. वर्षभरापूर्वीच ते लष्करात दाखल झाले होते. जम्मू-काश्मीरमधील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर मंगळवारी पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी शुभम शहीद झाले. शुभम यांचे पार्थिव मोटारीने पहाटेपर्यंत कोनेरवाडी येथे पोहचणार असून, गुरुवारी (५ एप्रिल) सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी बुधवारी शुभम यांचे पार्थिव उधमपूरहून विशेष सैन्याच्या विमानाने सुभेदार उत्तम चौगुले यांच्या उपस्थितीत औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले. येथे शुभम मुस्तापुरे यांचे नातेवाईक तसेच मित्र परिवारातील बाबूराव पांढरे, शांता पांढरे, शशीकला चपटे, मनोरमा चपटे, जयश्री कामजळगे यांच्यासह रमेश घाडगे यांची उपस्थिती होती. विमानतळावर आलेल्या पार्थिवाला विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, पोलिस उपायुक्त दीपाली घाटे, सैनिक कल्याण विभागाचे रावसाहेब गोरे यांनी श्रद्धांजली वाहिली. भारतीय सैन्य दलातर्फे शुभम यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी स्टेशन डेप्युटी कमाडंट पी. किरण कुमार, कर्नल एस. जी. मेनन, कर्नल डी. के. राना, मेजर मनीष कुमार यांनीही श्रद्धांजली वाहिली.

…………

\Bनिकराचा प्रतिहल्ला; अन् धारातीर्थी

\B'पाकिस्तानने उधमपूर येथे मंगळवारी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान गोळीबार सुरू केला. कर्तव्यावर हजर असलेले शुभम मुस्तापुरे यांनीही निकराने प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात शुभम शहीद झाले. तर त्यांच्या सोबत असलेले तीन जण जखमी झाले,' अशी माहिती उधमपूर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटचे सुभेदार उत्तम चौगुले यांनी पत्रकारांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद ते पणजी मार्गावर दोन शिवशाही स्लीपर बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातून गोव्याला जाण्यासाठी शिवशाही स्लीपर बस देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. पणजीसाठी दोन स्लीपर बस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद बस स्थानकात गुरुवारी दोन स्लीपर येणार आहे. सध्या या दोन्ही बस औरंगाबाद ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते औरंगाबाद या मार्गावर चालविण्यात येणार आहे. गोवा राज्यातून औरंगाबादच्या स्लीपरला परमिट मिळाल्यानंतर ही बस औरंगाबाद ते पणजीसाठी चालविण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकू बाळगणारा अटकेत

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज महानगरातील ओअ‍ॅसिस चौकात गुन्हा करण्याच्या उद्देशाने सोबत धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या साईनाथ संभाजी इंगळे (२३, रा. मारुती मंदिराजवळ वडगाव कोल्हाटी) याला बुधवारी पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध पोलिस काँस्टेबल बाबासाहेब काकडे यांच्या फिर्यादीवरून शस्रबंदी कायद्यानुसार, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशा वातावरणात काम कसं करतात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटीच्या आस्थापना विभागात, एसटीच्या विविध कार्यालयांत कागदांचा ढिग, तुटलेल्या खिडक्या, कर्मचाऱ्यांची दयनीय बैठक व्यवस्था पाहून, 'अशा वातावरणात कर्मचारी काम कसं करतात?' असा प्रश्न नवे विभाग नियत्रंक प्रशांत भुसारी एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारला. नवीन खिडक्या; तसेच बसण्यासाठी चांगली व्यवस्था करून कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज करण्यासाठी चांगले वातावरण तयार करून देण्याचे आदेश भुसारी यांनी दिले.

औरंगाबाद विभागाचे नवीन विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. सत्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी विभाग नियंत्रक कार्यालयाच्या विविध विभागांना भेटी दिल्या. जुने पंखे, जुने दिवे, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी असलेली जागा यांबाबत त्यांनी यावेळी आक्षेप नोंदविले. आस्थापना, वाहतूक, बांधकाम विभागांसह लेखा विभागालाही त्यांनी भेट दिली. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी प्रसन्न वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक ते बदल करण्याचे आदेश उपस्थितीत अधिकाऱ्यांना दिले. आस्थापना विभागाची महत्त्वाची कागदपत्रे किंवा सेवा पुस्तिका ठेवण्यासाठी चांगली जागा करणे अथवा महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून ठेवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

\Bखटला विभाग की जेल?\B

विभाग नियंत्रक कार्यालयात असलेल्या खटला विभागात कोणी प्रवेश करू नये. यासाठी जाळ्या लावल्या आहेत. या विभागात येताच हा खटला विभाग आहे का जेल, अशी प्रतिक्रिया विभाग नियंत्रक भुसारी यांनी व्यक्त केली.

……

\Bकॉर्पोरेट लूक देणार\B

विभाग नियंत्रक भुसारी यांनी या भेटीनंतर 'मटा'शी बोलताना सांगितले की, प्रवासीसंख्या वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रवाशांच्या सुविधाही वाढविण्यात येतील. याशिवाय कर्मचाऱ्यांना पदोन्नती, बढती, बदली किंवा कामांसाठी विभाग नियंत्रक कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत, अशी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना चांगले काम करता यावे. यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयाला कॉर्पोरेट लूक आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरी अधिग्रहणाचा विभागात सपाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेहमीच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या मराठवाड्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही यंदा पाच जिल्ह्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तहान भागवण्यासाठी विभागात ‌खाजगी विहीर अधिग्रहणाचा सपाटा सुरू असून, आठवड्याभरात तब्बल २१२ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

सध्या मराठवाड्यातील २५५ गावे आणि ३५ वाड्यांना ३१६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत ५९५ खाजगी विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, यातील १७४ विहिरी टँकरसाठी, तर ४२१ विहीरी टँकरव्यतिरिक्त अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत ३७९ विहिरींचे अधिग्रहण केले होते. आठवड्याभरात यात २१६ विहिरींची भर पडली. सर्वाधिक २२८ विहिरींचे अधिग्रहण नांदेड जिल्ह्यात, तर त्या पाठोपाठ २१३ अधिग्रहण औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आले आहे.

\Bजिल्हानिहाय विहिरींचे अधिग्रहण\B

जिल्हा............विहीर अधिग्रहण

औरंगाबाद.......२१३

जालना...........९७

परभणी...........३७

हिंगोली...........२०

नांदेड.............२२८

एकूण.............५९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ च्या नवीन करारावर प्राथमिक चर्चा

$
0
0

जीएसटीचा भार पालिकेवर टाकण्याची रणनिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिका आणि एसएल ग्रुप यांच्यात नवीन करार केला जाणार आहे. महापालिकेत बुधवारी झालेल्या बैठकीत करारच्या मसुद्यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. जीएसटीमुळे वाढलेल्या किंमतीचा भार पालिकेवर टाकण्याची खेळी कंपनी प्रतिनिधीच्या मांडणीतून स्पष्ट झाली.

न्यायालयाबाहेर तडजोड करून एसएल ग्रुपच्या माध्यमातून समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्याच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. नवीन कराराच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी व निवृत्त सनदी अधिकारी जीवन सोनवणे काही अधिकाऱ्यांबरोबर पालिकेत आले होते. नवीन करारानुसार तीस महिन्यांत तीस माइलस्टोनच्या माध्यमातून जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याची कंपनीची भूमिका असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र हा प्रकल्प कंपनीने दोन वर्षांत पूर्ण करावा, अशी महापालिकेची भूमिका आहे. पाणीपट्टी दरवाढ हा पालिकेचा अंतर्गत विषय असला तरी दरवाढ केल्यास पालिकेचे उत्पन्न वाढेल हे कंपनीच्या प्रतिनिधीने अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

प्रकल्पाच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही, असे पालिकेतर्फे स्पष्टपणे सांगण्यात आले. किंमतीत वाढ न करण्याची भूमिका स्वीकारण्याची तयारी कंपनीच्या प्रतिनिधींनी दाखवली, परंतु त्यांनी जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. जीएसटीमुळे किंमतीत ७९ कोटी रुपयांची वाढ होणार असून हा भार पालिकेने उचलला पाहिजे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. कंपनी आणि पालिकेत नवीन करार परस्पर सामंजस्याने करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर त्या प्रतिनिधींनी महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.

\Bपुढील बैठक दहा दिवसांत \B

समांतर जलवाहिनीचा नवीन करार करण्यासंदर्भात कंपनीचे प्रतिनिधी, पालिकेचे प्रतिनिधी यांची मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांसोबत येत्या आठ ते दहा दिवसांत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी कराराचा मसुदा कंपनी व पालिकेला तयार करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पालिकेचे पदाधिकारी देखील असावेत, असा मुद्दा बुधवारी मांडण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींच्या वॉर्डात गॅस्ट्रोची लागण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांच्या पद्मपुरा वॉर्डातच गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गॅस्ट्रोमुळे सुमारे ४०० घरांना धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या भागात आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले असून, शंभरावर नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे, त्यापैकी ३० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पद्मपुरा वॉर्ड शहरातील जुन्या वॉर्डांपैकी एक वॉर्ड आहे. या वॉर्डात दोन दशकांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यानंतर जलवाहिन्या बदलण्याचे काम झालेले नाही. ड्रेनेज लाइन आणि पाण्याची लाइन एकमेकांच्या जवळून गेल्यामुळे काही महिन्यांपासून संपूर्ण परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच दोन दिवसांत गॅस्ट्रोचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यासंदर्भात बारवाल यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'पद्मपुरा वॉर्डातील काकाचौक, मामाचौक, होली का अंगन, भिकवाडा वस्ती या भागात दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या चारही भागात मिळून सुमारे ४०० घरे आहेत. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्यामुळे तातडीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात शंभरावर नागरिकांनी तपासणी करण्यात आली. २५ ते ३० जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.'

जलवाहिनी बदलण्याबद्दल पाणीपुरवठा विभागाला आदेश दिले आहेत, पण अद्याप काम सुरू झाले नाही. जुनी झालेली जलवाहिनी काढून पूर्णपणे नवीन जलवाहिनी टाकावी लागणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गतीने काम करीत नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत, असा आरोप बारवाल यांनी केला. दरम्यान, पद्मपुरा वॉर्डाला मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले, महापालिचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी भेट देवून पाहणी केली. दूषित पाणीपुरवठ्याबद्दल लगकरच मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे बारवाल म्हणाले.

अंबिकानगरातही लागण

अंबिकानगर भागात (वॉर्ड क्रमांक ८२) गॅस्ट्रो आणि डायरियाची लागण झाल्याची तक्रार नगरसेवक, पालिकेतील काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी आयुक्तांकडे केली आहे. १२ जणांना गॅस्ट्रोची, तर ४१ जणांना डायरियाची लागण झाल्याचे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दूषित पाण्यामुळे हे आजार होत असून, पालिका प्रशासनाने यावर गांभीर्याने उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजबिल ऑनलाइन भरा

$
0
0

औरंगाबाद: वीजबिल धनादेशाने भरण्याऐवजी ऑनलाइन बँकिंगद्वारे भरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरमहा सुमारे दहा हजार धनादेश बाउन्स होत असल्याने महावितरणचे कामकाज वाढते व ग्राहकांना दंड बसतो. या शिवाय बिल भरण्यासाठी मोबाइल अॅपही उपलब्ध करून दिल्याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे. धनादेश बाउन्स झाल्यास ३५० रुपये दंड ठोठवला जातो. शिवाय सहा महिने धनादेशाद्वारे बिल भरण्याची सुविधा स्थगित केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाई वैद्य यांना श्रद्धांजली

$
0
0

औरंगाबाद: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ नेते मनोहर टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. उपस्थितांनी आपल्या भाषणातून भाई वैद्य यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी डॉ. राम बाहेती, अशफाक सलामी, भास्कर लहाने, अभय टाकसाळ, अशोक जाधव, प्रकाश बनसोडे, मानसी बाहेती, अॅड. अयास शेख यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरांच्या गाडीसाठी १६ लाखांची उधळपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे शहराची कचरानगरी झालेली, गंगाजळी आटल्याने महापालिकेचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. याही परिस्थिती महापौर, सभापतींच्या पाठोपाठ आता उपमहापौरांनी तब्बल १६ लाखांची कार खरेदी करून कडी केली आहे. ही नवी कार शहरातील रस्त्यावरला कचरा तुडवत मोठ्या डौलाने बुधवारी महापालिकेत आणण्यात आली.

महापालिकेच्या गंगाळजळीत खडकू नसल्याने अकाउंट मायनसमध्ये असल्याचे मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांनी दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले होते. पालिकेच्या बँक खात्याची स्थिती उणे सोळा लाख आहे, असे ते म्हणाले होते. त्यामुळे विकास कामे कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराची वसुली देखील घटली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत सुमारे दहा ते बारा कोटींची तूट आली आहे. नगररचना विभागातर्फे केल्या जाणाऱ्या वसुलीमध्येही सात कोटींची तूट आली आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात विकास कामे कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतके सारे घडूनही महापालिकेचे पदाधिकारी मात्र मजेत असल्याचे चित्र आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासाठी दोन महिन्यांपूर्वी सुमारे सोळा लाख रुपये खर्च करून नवीन गाडी पालिका प्रशासनाने खरेदी केली. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांच्या गाडीसाठी पंधरा लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. आता उपमहापौर विजय औताडे यांच्यासाठीही जवळपास सोळा लाख मोजून टाटा हेक्सा या कंपनीची गाडी घेण्यात आली आहे. बुधवारी ही गाडी मोठ्या दिमाखात महापालिकेत आणण्यात आली. आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसताना व कचराकोंडी सारखा महत्वाचा प्रश्न समोर उभा असताना हा प्रश्न सोडवण्यात पालिका यंत्रणेला व पदाधिकाऱ्यांना यश आलेले नाही. नागरिक देखील या समस्येमुळे त्रस्त आहेत, असे असताना पदाधिकाऱ्यांना नवीन गाड्यांचा सोस कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे.

...जखमेवर मीठ

- १६ लाख महापौरांची गाडी

- १५ लाख सभापतींची गाडी

- १६ लाख उपमहापौरांची गाडी

राजकारणी बेजबाबदार

औरंगाबाद गेल्या ४५ दिवसांपासून कचऱ्याने वेढलेले आहे. त्यात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची चंगळ सुरू आहे. खासदार आमदारांसह शहराचे पहिले नागरिकही पर्यटनाला जातात. पालिकेची आर्थिक दिवाळखोरी निघालेली आहे. असे असताना उपमहापौरांसाठी नवी गाडी खरेदी केली जाते, ही अत्यंत शरमेची बाब आहे. कचरा उचलण्यात त्यांना अपयश आले, तसेच नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यातही ते कमी पडले आहेत. पालिकेचे पदाधिकारी मौजमजा करतात. हेच निषेधार्ह आहे, अशा उधळपट्टीला आवर घालणे गरजेचे आहे. आपल्या शहरातील राजकारणी पुन्हा एकदा बेजबाबदार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलमंडीभोवती तीन किलोमीटर ‘नो हॉकर्स झोन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांवरील हातगाड्यांना चाप बसवण्यासाठी गुलमंडी हे केंद्र मानून तीन किलोमीटरचा परिसर 'नो हॉकर्स झोन' करण्यात येणार आहे, असा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला आहे. त्याबद्दलचे परिपत्रक लवकरच काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

रस्ता रुंदीकरणानंतरही हातगाड्या थाटल्या जात असल्याने बहुतांश रस्ते पुन्हा अरुंद झाले आहेत. 'हॉकर्स झोन' आणि 'नो हॉकर्स झोन' निश्चित केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नसल्याने 'नो हॉकर्स झोन' करण्याची कार्यवाही तत्काळ केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. प्रामुख्याने गुलमंडी, टिळकपथ, पैठणगेट, औरंगपुरा, शहागंज, सराफा, मछलीखडक या भागात हातगाड्यांचा त्रास जाणवतो, वाहतूक ठप्प होते. त्यामुळे गुलमंडी हा भाग केंद्रबिंदू मानून तीन किलोमीटरच्या परिघात 'नो हकर्स झोन'चे नियोजन आहे. हे करताना 'हॉकर्स झोन' ही निश्चित करावे लागणार आहेत. हातगाडीचालकांचाही सहानुभूतीने विचार करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारणी जाहीर

$
0
0

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने एन १२ सिद्धार्थनगर येथे यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीचे जयंती अध्यक्ष प्रशांत मगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये यंदाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यानुसार अध्यक्षपदी आनंद मगरे, तर उपाध्यक्षपदी राजेश गायकवाड व युवराज वाहुळे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी निखिल सूर्यवंशी, किरण बनसोडे, विशाल दाभाडे, कोषाध्यक्षपदी अमोल मगरे, सरचिटणीसपदी आनंद सूर्यवंशी, विक्की मगरे, आकाश पातारे, कार्याध्यक्षपदी सोनू गढवे, नीतेश मगरे, स्वागताध्यक्षपदी अक्षय हिवाळे, उमेश मगरे यांची निवड करण्यात आली. निमंत्रक म्हणून रोहित दाभाडे, आकाश घोरपडे, राहुल सोनवणे, सनी दाभाडे यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीत कामबंद, महासंघाची माघार

$
0
0

औरंगाबाद: जिल्हा परिषदेत सहा एप्रिल रोजी होणाऱ्या काम बंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सहभागी होणार नाही, असे महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

महासंघाचे जिल्हाध्यक्ष बी. टी. साळवे, कोषाध्यक्ष डॉ. सय्यद नाजीम, कार्याध्यक्ष एच. डी. गिरी, निमंत्रक गणेश धनवई, सरचिटणीस संजय महाळंकर यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत. 'वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे की, सहा एप्रिल पासून जिल्हा परिषदेत काम बंद आंदोलन आहे. या आंदोलनात महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व प्रवर्ग संघटनाही सहभागी होणार नाहीत,' असे पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर जमादार, ग्रामसेवकाला बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लाचखोर जमादार संतोष त्रिभुवन आणि ग्रामसेवक विश्वनाथ पुरी याला दोन वेगवेगवेगळ्या प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी बेड्या ठोकल्या.

पहिल्या प्रकरणामध्ये एका बांधकाम साहित्याचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी जमादार संतोष त्रिभुवन याने ४५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये देण्याचे ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून बुधवारी दुपारी क्रांतीचौकात सापळा लावण्यात आला. त्यावेळी पंचवीस हजारांची लाच घेताना त्रिभुवनला (रा. देवगिरी कॉलनी, मुंदडा हॉस्पिटल समोर, क्रांतीचौक) अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक बाळा कुंभार, नितीन देशमुख, अश्वलिंग होनराव यांनी केली.

दुसऱ्या प्रकरणात भेंडाळा येथील दत्तकृपा हॉटेलच्या हॉटेल चालकाला व्यावसायिक वीज जोडणी घ्यायची होती. यासाठी त्यांनी भेंडाळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विश्वनाथ पुरी याच्याकडे २६ मार्च रोजी ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा पुरी याने हॉटेल मालकाकडे दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने हॉटेल मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. बुधवारी पोलिसांनी या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यामध्ये तडजोडीअंती दीड हजाराची लाच पुरीने मागितली. यावेळी सापळा रचून दीड हजारांची लाच घेताना ग्रामसेवक विश्वनाथ पुरी (रा. बीड बायपास, देवळाई रोड) याला अटक करण्यात आली. वर्षाराणी पाटील, अनिता वराडे, हरिभाऊ कुऱ्हे, रवींद्र देशमुख, मिलिंद इप्पर, बाळासाहेब राठोड व संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिभेरची शेंद्रयात २० एकरात ५०० कोटींची गुंतवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लिभेर कंपनी औरंगाबादेतून भारतीय बाजारपेठेसाठी वर्षाकाठी पाच लाख फ्रीजचे उत्पादन करणार आहे. शेंद्रा येथे पहिल्या टप्प्यात ५०० कोटींची गुंतवणूक करून २० एकरांत उभ्या राहिलेल्या या प्रकल्पातून एक मेपासून वर्षाकाठी असलेले उत्पादन वाढवणार असल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात जर्मन तंत्रज्ञानासह फ्रीज बनविणाऱ्या या कंपनीमध्ये यंत्रसामग्री बसविण्याचे काम सुरू आहे. ५० एकरांचा भूखंड ताब्यात घेतलेल्या या कंपनीने पहिल्या टप्प्यात २० एकरांत प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी कंपनीने ५०० कोटींची गुंतवणूक केली असून, त्यातून थेट एक हजार, त अन्य ४०० रोजगार उपलब्ध होतील. पहिल्या टप्प्यात भारतीय बाजारपेठांसाठी दरवर्षी पाच लाख फ्रीज तयार करण्याचे ध्येय कंपनीचे आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत कंपनी २५० ते ६५० लीटर क्षमतेचे फ्रीज तयार करेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील विस्तारातून निर्यातीसाठी माल तयार केला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडगावमध्ये मुरूमचोरी

$
0
0

वाळूज महानगर: सिडकोच्या मालकीच्या सतरा हेक्टर जमिनीतून अनेक दिवसांपासून मुरूम चोरी होत असल्याची तक्रार बुधवारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल दाखल करण्यात आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर ४/१४ मधून २० जुलै २०१७ रोजी जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने मुरूम चोरी होत असल्याचे सिडकोच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले होते. त्यावेळी मुरूम चोर ट्रॅक्टरसह (एम एच २० ए एस ९५७२) पळून गेले होते. या जागेवरून तीन ते चार हजार ब्रास अंदाजे किंमत पंधरा ते वीस लाख रुपयांच्या मुरुमाची चोरी झाल्याची फिर्याद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुर्काबाद गणात निवडणूक

$
0
0

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद पंचायत समितीची गणाची एका जागेसाठी पोटनिवडणुकीत सहा एप्रिल रोजी मतदान होणार असून सात तारखेला मतमोजणी होणार आहे. पवार जमुनाबाई बद्रिनाथ (भाजप), पवार सोनाली संजय (शिवसेना), माळी लिलाबाई बबन (राष्ट्रवादी) यांच्यात लढत होत आहे. शिवसेनेच्या शिलाबाई शिवाजी देवबोणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने ही पोट निवडणूक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसंख्या नियंत्रण कायदा हवाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारताला सुरक्षित, समृद्ध करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलावित, असा सूर भारत बचाव महायात्रेतील वक्त्यांच्या भाषणात होता. शहरात महायात्रेचे फेरी काढून स्वागत करण्यात आले.

सिडको एन-५ मधील राजीव गांधी मैदानावर महायात्रेच्या निमित्ताने झालेल्या सभेच्या व्यासपीठावर स्वामी शांतिगिरी महाराज, रामगिरी महाराज, बालयोगी काशीगिरी महाराज, योगीराज दयानंद महाराज, मेजर जनरल एस. पी. सिन्हा, कर्नल टी. पी. त्यागी, सुरेश चव्हाणके, नवनाथ महाराज आंधळे, अंबादास दानवे, दयाराम बसैये, संजयआप्पा बारगजे, राजेंद्र पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. बुधवारी सायंकाळी महायात्रेचे क्रांती चौक उड्डाणपुलावर आगमन झाले. ही रथयात्रा जालना रोडमार्गे, सेव्हन हिल्स्, सिडको बसस्थानकमार्गे सिडको ऑफिस, चिश्तिया चौकमार्गे राजीव गांधी मैदानात विसर्जित करण्यात आली. महासभेत उपस्थितांनी मार्गदर्शन केले. भारतात भ्रष्टाचार, स्वैराचार, विकास कामांत अडथळे अशा समस्यांवर लोकसंख्या नियंत्रण कायदा महत्त्वाचा असल्याचा अनेकांच्या भाषणाचा सूर होता. कायदा का महत्वाचा, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. महायात्रा २० हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. २५ राज्यातून प्रवास करून २२ एप्रिल रोजी दिल्लीत पोहचेल असे सांगण्यात आले. कायद्याबाबत दहा कोटी नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन सरकारला देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील नागरिकांच्याही स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. सतीश वहाडणे, गणपत म्हस्के, बबन दाभाडे, अरुण भडगावकर, जयसिंग होलिये, अनिल पैठणकर, सचिन वाडे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळ टोचणी सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा कमंगर येथील मांगीरबाबा यात्रेला सुमारे चार लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारीही गळ टोचणी, बकऱ्यांचा बळी देणे सुरूच होते. याची संख्या चार चार हजारांच्या घरात होता. पंचमीनिमित्त गुरुवारी सकाळी भाविकांची गर्दी वाढणार अससल्याने देवस्थान समिती व ग्रामपंचायततर्फे सुविधा पुरवण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या.

मांगीरबाबा यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली. सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक आदी राज्यांतील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. दर्शनासाठी सकाळपासून मंदिरात रांगा लागल्या. नवस फेडण्यासाठी टोचून घेण्यात येणाऱ्या गळावरून बुधवारी वाद झडला होता. गळ टोचणीला प्रशासनाने बंदी असल्याचे सांगितले होते. परंतु, ही बंदी पाळली गेली नाही. बुधवारसह, गुरुवारी गावाच्या परिसरात भाविकांकडून मोठ्या प्रमाणात कंदुरी करण्यात आली. गावातील शेतकऱ्यांनी भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत ३ हजार ६६० जणांनी गळ टोचणी व कंदुरीसाठी बकरा बळी दिल्यीच माहिती समितीकडून मिळाली. दोन दिवसांत चार लाख भाविकांनी हजेरी लावल्याचे समितीने सांगितले. भाविकांनी दर्शनानंतर रेल्वेने जाण्यासाठी गर्दी केली होती. उत्सवासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, वैद्यनाथ मुळे, किशोर शेजुळ, साळुबा कचकुरे, कडुबा कुटे आदी परिश्रम घेत आहेत.

\B'सीसीटीव्ही'ची नजर

\B

यात्रेत आलेल्या भाविकांची सुरक्षा, सोयी-सुविधांबाबत ग्रामपंचायत, देवस्थान समितीने विविध उपाययोजना केल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यात्रेच्या परिसर 'सीसीटीव्ही'च्या नजरेत आहे. समितीच्या कार्यालयात स्वयंसेवक सीसीटीव्हीच्या नजरेतून सुरक्षेचा आढावा घेतात. समितीचे पदाधिकारी, स्वयंसेवक हे परिसरात लक्ष ठेवून असतात. एकूण बारा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. तसेच भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसाठी दहा टँकर ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

\B

गळ टोचणी

३,६६०

गुरुवारी दुपारीपर्यंत \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन शनिवारी

$
0
0

औरंगाबाद: शहरातील कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. या प्रश्नावर उपाय म्हणजे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन. नागरिकांनी कचरा व्यवस्थापन करावे याबाबत महाराष्ट्र टाइम्स व अर्थव रॉयल लॉन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कचरा व्यवस्थापन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड बायपास वरील या लॉनच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा परिसंवाद होणार आहे. परिसंवादाला उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. 'ओला-सुका' कचरा, कचऱ्यावरील प्रक्रिया, खत, वीज निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images