Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खंडपीठ वकील संघाचे स्नेहसंमेलन आजपासून

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारपासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनाचे उदघाटन शुक्रवारी सायंकाळी सात वाजता खंडपीठातील वरिष्ठ न्या. रवींद्र घुगे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर प्रसिद्ध नाट्य लेखक प्रा. अजित दळवी यांचे 'समाज स्वास्थ आणि कायदा' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या स्नेहसंमेलनात क्रिकेट, रांगोळी, मेंदी, अंताक्षरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस,कॅरम, बुद्धिबळ, लॉन टेनिस, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, व्हॉलिबॉल आदींच्या स्पर्धा तीन दिवस रंगणार आहेत. या स्पर्धेत वकिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन वकील संघ व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष विष्णू ढोबळे, सचिव प्रशांत नांगरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्तव्यात केली कसूर; एक निलंबित, तिघांना नोटीस

$
0
0

औरंगाबाद: कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले, तर इतर तिघांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी 'मटा'ला कळविली. पीरबावडा प्राथमिक उपकेंद्रात (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) २२ मार्च रोजी एक प्रसुती झाली होती. त्यावेळी कर्मचारी उपस्थित नव्हते. त्याची चौकशी करून जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचारी मानकापे याला निलंबित केले आहे. तसेच फुलंब्री तालुका वैद्यकीय अधिकारी, वडोदबाजार वैद्यकीय अधिकारी व आणखी एकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अर्दड यांनी कळविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडत व्यापाऱ्यांचा संप कारवाईच्या भीतीने मागे

$
0
0

औरंगाबाद: मागील तीन-चार दिवसांपासून बाजार समितीतील अडत व्यापाऱ्यांनी 'ई-नाम'च्या विरोधात सुरू केलेले कामबंद आंदोलन गुरुवारी मागे घेतले. सभापतींनी बुधवारी लायसन्स रद्द करण्याचे स्पष्ट केल्यानंतर अडत व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला. शुक्रवारपासून नेहमीप्रमाणे ई-नामद्वारे खरेदी विक्री होणार असल्याचे सभापतींनी यांनी सांगितले. 'ई-नाम' प्रणाली मराठवाड्यात एकाच वेळी लागू करावी या मागणीसाठी तीन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कामबंद केले होते. डीडीआर, बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी तोडगा निघाला नसल्याने लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता. बाजार समितीमध्ये गुरुवारी कोणतेच व्यवहार झाले नाहीत. दुपारी सचिव व अडत व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 'ई-नाम'वर तोडगा निघाल्यानंतर व्यापाऱ्यांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले. 'ई-नाम'द्वारे हरभरा, तूर, सोयाबीन, मक्का, बाजारी याचे लिलाव होणार आहेत. ही प्रणाली बाजार समितीमध्ये लागू करून २५ दिवस झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणमध्ये प्रणाली

$
0
0

औरंगाबाद: ग्राहकसेवा केंद्रित कार्यप्रणालीचा अवलंब करताना कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी महावितरणतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. कंत्राटदारांची देयके अदायगीसाठीही पारदर्शक प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. महावितरणमध्ये कंपनीचे विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार ईआरपी प्रणाली या संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारेच आगामी काळात कंत्राटदारांची बिले अदा करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चा अंतिम निर्णय ‘जीबी’तच

$
0
0

औरंगाबाद: समांतर जलवाहिनीच्या संदर्भात कंपनीबरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तडजोड झाली तरी या जलवाहिनीच्या सुधारित कराराबद्दल अंतिम निर्णय सर्वसाधारण सभाच घेईल, अशी भूमिका महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केली. समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या एसएल ग्रुप कंपनीचे प्रतिनिधी जीवन सोनवणे यांनी बुधवारी महापालिकेत नव्याने करावयाचा कराराबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी गुरूवारी आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. सोनवणे यांच्या भेटीबद्दल पत्रकारांनी महापौरांना विचारले असता ते म्हणाले, सोनवणेंनी सदिच्छा भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. कराराबद्दल प्राथमिक चर्चा झाली आहे. कराराचा मसुदा तयार करण्यासाठीच्या समितीमध्ये पालिका पदाधिकाऱ्यांचा समावेश असावा, करार जनतेच्या हिताचा असावा, असा आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. रद्द केलेल्या करारासंदर्भात आपण ठाम आहात का या प्रश्नावर महापौरांनी गोलमाल उत्तरे दिली. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या सर्वसाधारण सभेत भूमिका मांडू द्यावी, याबद्दलची फाइल अद्याप आयुक्तांकडेच आहे. ती माझ्याकडे आल्यानंतर माझे पत्ते उघडे करीन, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक दरबार शनिवारी

$
0
0

औरंगाबाद: शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जिल्हा स्तरावर प्रलंबीत प्रश्नाबाबत शनिवारी शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला आहे. वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव, वैद्यकीय देयके यासारख्या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे हे मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयातील सभागृहात हा दरबार सायंकाळी चार वाजता होणार आहे. शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. सोनाल बच्छाव यांना पीएच.डी

$
0
0

प्रा. सोनल बच्छाव यांना पीएच.डी

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संगणकशास्त्र विषयात प्रा. सोनल बच्छाव यांना पीएच. डी. प्रदान केली. 'रोल ऑफ इन्फॉरर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन एम्पॉवरिंग इंडियन फार्मस: लोकल प्रॅक्टिसेस अँड चॅलेंजेस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र' विषयावर शोधप्रबंध सादर केला. डॉ. एस. जे. भावसार यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. एमआयटी कॉलेजातील संगणकशास्त्र विभागात त्या कार्यरत आहेत. यशाबद्दल प्राचार्य डॉ. मुक्ती जाधव, प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर ऑडिटचे खासगीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेकडे शहरातील इमारतींचे फायर ऑडिट करणारी यंत्रणा नाही, अग्निशमन विभाग देखील सक्षम नाही. त्यामुळे नाशिकच्या धर्तीवर खासगीकरणातून इमारतींचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. नाशिक महापालिकेकडून याबद्दलची माहिती मागवली जाणार आहे.

माणिक हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर शहरातील व्यावसायिक व निवासी इमारतींच्या फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. फायर ऑडिट करण्याची यंत्रणाच पालिकेकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तशी कबूली स्वत: महापौरांनी दिली आहे. पालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शहरातील एक हजारापेक्षा जास्त इमारतींना नोटीस देवून फायर ऑडिट करून घेण्याबद्दल कळविण्यात आले आहे. परंतु, त्यानंतर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे फायर ऑडिट गेल्या काही वर्षात होऊ शकलेले नाही. अग्निशमन विभागातर्फे केवळ परवाना नूतनीकरणाचे काम केले जाते.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापौर दालनात अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन उपस्थित होते. नाशिक महापालिकेत फायर ऑडिट करण्याची पद्धत खासगीकरणाची आहे. शासनमान्य खासगी संस्थेकडून नाशिकमध्ये इमारतींचे फायर ऑडिट करून घेण्याची पद्धत आहे. तशीच पद्धत औरंगाबाद महापालिकेत सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नाशिक महापालिकेत या बद्दलची नेमकी कार्यपद्धती काय आहे, याची माहिती मागवा, असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. नाशिक महापालिकेकडून माहिती प्राप्त होताच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वातंत्र्यसैनिक शिवणगीकर यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिवमाणिक दत्तायत्र शिवणगीकर यांचे (वय १०२) बुधवारी शास्त्रीनगर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर कैलासनगर येथील स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दिलीप शिवणगीकर, हनुमंत शिवणगीकर, शिरीष शिवनगीकर ही मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट महिलांच्या नावे कर्ज घेऊन १५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बचतगटात बनावट महिलांच्या नोंदी करून बनावट महिलांच्या नावे कर्ज घेतले आणि वडिलांच्या उपचारासाठी उसने घेतलेले साडेतीन लाख रुपयेदेखील फस्त करणाऱ्या आणि एकूण १४ लाख ८५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पती-पत्नीला गुरुवारी (पाच एप्रिल) अटक करण्यात आली. दोघांना कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (नऊ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांनी दिले.

याप्रकरणी लता सुरेश राठोड (३६, रा. हरिरामनगर, बीड बायपास, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादी ही स्वप्नपूर्ती महिला बचतगट व तुळजाई महिला बचतगट चालवते आणि तुळजाई बचतगटामध्ये आरोपी सुमती संजय वैद्य (४१, रा. हरिरामनगर) ही कोषाध्यक्ष होती. आरोपी सुमती हिने बचतगटामध्ये बनावट महिलांच्या नोंदी केल्या; तसेच व्याज व बचतगटाचे दर महिना एक हजार रुपये असे एक लाख रुपये आरोपीने भरले. दरम्यान, फिर्यादीने स्वतःचे घर १७ लाखांना विकले आणि सुमतीने वडिलांवरील उपचारांसाठी साडेतीन लाख रुपये हातउसने मागितले. फिर्यादीने ती रक्कम आरोपीला दिली आणि त्या रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने आपल्या पती व आरोपी संजय प्रभाकर वैद्य (५३, रा. वरीलप्रमाणे) याच्या नावे धनादेश दिला. तो खात्यामध्ये पैसे नसल्याने वटलाच नाही. त्यानंतर फिर्यादीने पैसे मागितल्यानंतर पैसे देणार नसल्याची धमकी दिली; तसेच परत पैसे मागितले, तर आम्ही पती-पत्नी आत्महत्या करू, अशी धमकीही आरोपींनी दिली. त्यानंतर सुमतीने बनावट महिलांच्या नावाने तीन लाख, अडीच लाख, एक लाख रुपये असे कर्ज घेतले; तसेच वेगवेगळ्या मार्गे दहा लाख ३५ हजार रुपये उसने घेऊन परत केले नाही. आरोपींनी एकूण १४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिली व पती-पत्नीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

\Bरक्कम जप्त करणे बाकी\B

याप्रकरणी आरोपी पती-पत्नीला अटक करून दोघांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींनी फसवणूक केलेली रक्कम जप्त करणे बाकी आहे. तसेच आरोपींनी कुणा-कुणांच्या नावे धनादेश दिले व आरोपींचे कोणी साथीदार आहेत का आदींची तपास करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील आशिष दळे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविनाश गोंडे पाटील

$
0
0

औरंगाबादः शहरातील रहिवासी अविनाश मुरलीधर गोंडे पाटील (वय ४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. शहरातील आर. एस. गोंडे पाटील यांचे ते नातू, तर गोविंद गोंडे पाटील व पंढरीनाथ गोंडे पाटील यांचे ते पुतणे होत. त्यांच्यावर गुरुवारी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य विकास विद्यापीठ औरंगाबादला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ औरंगाबादला स्थापन करण्याचा निर्णय अल्पसंख्याक विकास विभागाच्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे,' अशी माहिती माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी दिली.

अल्पसंख्यांकाबाबत विविध विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मुंबई येथे सह्याद्री विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिक्षण मंत्री विनोद तावडे, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह भायखळाचे आमदार वारिस पठाण आणि आमदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती. बैठकीत आमदार जलील यांनी, 'औरंगाबादला डीएमआयसी प्रकल्प होत आहे. उद्योजकांना कुशल मनुष्यबळ मिळावे यासाठी औरंगाबादलाच कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करावे,' अशी मागणी केली. या मागणीला बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विद्यापीठासाठी जागा निश्चित करून, प्रस्ताव तयार करण्याचे देण्याचे आदेश देण्यात आले. हा प्रस्ताव मिळाल्यानंतर शंभर कोटी रुपये केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून आणण्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिली. या विद्यापीठासाठी जागा देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम तसेच अल्पसंख्यांक विभागाचे सचिव श्याम तांगडे यांना दिले आहेत, अशी माहिती आमदार जलील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, बैठकीत उपस्थित आमदारांनी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी प्रक्रियेबाबत पुनर्विचार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही प्रक्रिया अधिक सोपी करून जास्तीत जास्त अल्पसंख्यांक मुलांना शिष्युवृत्ती देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. याशिवाय वक्फ बोर्डाच्या संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी आमदार वारिस पठाण यांनी भायखळा येथे उर्दू घर बांधण्याची मागणी केली. या मागणीला या उच्चस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली. शिवाय नांदेड येथे तयार करण्यात आलेल्या उर्दू घरचे उद्घाटन आतापर्यंत झालेले नसल्याची माहितीही उपस्थितीत आमदारांनी दिली.

शैक्षणिक कर्ज दुप्पट

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून २५ हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज मिळत होते. या बैठकीत आता ५० हजार रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. अल्पसंख्याक मुलीच्या वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत जेवण देण्याची मागणीही शासनाने मान्य केली.

'हज हाउस'ची चौकशी

औरंगाबादमध्ये बांधले जाणारे हज हाउस अजूनही अपूर्ण आहे. उर्वरित बांधकामासाठी निविदा काढली. मात्र, यात विशिष्ट व्यक्तीला कंत्राट देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष अट टाकली. त्यामुळे या कंत्राटाला प्रतिसाद येत नाही. याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आदेश अर्थमंत्र्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवलिया कर्मयोगी .

$
0
0

ग. बा. निमगावकर, औरंगाबाद

बापाने आईला झिडकारल्यावर तिच आई हाफ चड्डीवर असणाऱ्या  या लेकराला पोट भरण्यासाठी मुंबईला घेऊन गेली. एक रुपया रोजाने काम करणाऱ्या आईचे हाल हे लेकरू पहिलीपासून बघत होतं. ते हाल सोसत असणाऱ्या आईकडे बघून हे लेकरू शिकत राहिलं, आणि आईसुद्धा त्याला जिद्धिने शिकवित राहिली.

परिस्थिती तीच होती, जिथे गरीबी ठासून भरलेली होती, पण त्या गरीबीला कधीच भिक न घालता, हेच लेकरू एक दिवस राज्यशास्त्राचे प्रध्यापक आणि नंतर विभाग प्रमुख डॉ. श्रीराम निकम झाले. काबाड कष्ट करणाऱ्या आईसोबत मिळेल तेव्हा अर्धी भाकर खाऊन, शिक्षण घेत आयुष्याची शिदोरी या माणसाने कमावली. फक्त राज्यशास्त्रच नाही तर सामाजिक विषयातील एक चिरा म्हणून विद्यार्थ्यांसमोर हा माणूस गेली ४० वर्ष अध्यापनाच काम करत होता. त्यातले शेवटचे २२ वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात अध्यापनाचं काम करून ३१ जानेवारीला हा विचारवंत सेवानिवृत्त झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांसहित सर्व सहकारी मित्रांनी पाणावलेल्या डोळ्यांना हात लावला.

 शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवायला नाही तर त्या सोडवायला असतो, असे म्हणत कितीतरी विद्यार्थ्यांचं आयुष्य अपयशाच्या मार्गावरून यशाच्या मार्गावर आणणारा हा माणूस, कधीच शिक्षक वाटला नाही. तो सर्वांचा एक दिलदार मित्र होता. कितीही अवघड गोष्ट असली तरी तिचा मार्मिक अर्थ सोप्या भाषेत सांगणारा हा तत्वज्ञानी कधीच अवघड वाटला नाही. जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन या निधर्मी भारताने मला माणूस बनवले, हे सांगत राज्यशास्त्राचा एक शिक्षक म्हणून, मानवी जिवनाच्या कितीतरी गोष्टी विद्यार्थ्याना शिकविल्या. निसर्गनिर्मित मिळालेली आत्मप्रतिष्ठा हा माणूस पदोपदी जपत आला. ३१ जानेवारीला नियमानुसार निवृत झालेला हाच विद्यार्थीप्रिय शिक्षक यावर्षीचा अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रमाचा भाग गेली दोन महिने शिकवित होता. 'निवृत्त जरी होत असलो तरी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुमचा अपूर्ण भाग पूर्ण करूनच जाईल', असा शब्द विद्यार्थ्यांना त्याने दिला आणि तो पाळलाही. २७ मार्चला तो पूर्ण केला आणि विद्यार्थ्यांचा निरोप घेतला.

एक अभ्यासू शिक्षक, विचारवंत, तत्वज्ञानी... हा अवलिया कितीतरी मुलांचं आयुष्य यशस्वी जिवनाच्या उतुंग शिखरावर घेऊन गेला. त्यांच्या यशातच आपलं यश मानत त्यांचा मित्रही कधी झाला ते त्यांनाही कळालं नाही. त्यांच्यापैकीच मी देखिल एक. अशा या शिक्षकाचे मोठेपण सांगावे तरी किती आणि कसे. त्यासोबतच त्यांचे आभार मानावे तरी कसे. थँक यू शब्दही थिटा पडेल असं तुमचं मोठेपण. तरीही आभार मानायला याशिवाय दुसरे शब्दही सापडत नाहीत, म्हणूनच त्याच शब्दात थँक यू सर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाण्यासाठी जन्म आपुला

$
0
0

स्नेहाली प्रकाश कुलकर्णी, औरंगाबाद

'अरे पाणीपुरी मुळे पित्तं वाढतं तुझं मग कशाला खातो. अगं वडापाव खाऊ नको, वजन वाढेल ना. अरे बाहेरचे खाऊ नका, कोण जाणे कसल्या तेलामध्ये बनवलंय', असे संवाद आपण रोजच ऐकत असतो आणि यावरचे उत्तर देखील भन्नाट देतो. 'मी रोज दवाखान्याचे बिल भरेल, पण पाणी पुरी, भेळ वडापाव, समोसे यांच्यासोबत नो कॉम्प्रमाईज. काहींचा अॅटिट्यूड तर असा असतो की 'खाण्यासाठी जन्म आपुला' (इथे खाणे म्हणजे ताटात घेऊन खाणं टेबलखालून नव्हे.)

आपण भारतीय ना खाण्याच्या बाबतील एकदम बिंधास्त असतो. जिभेचे चोचले पुरवण्यात आपण अगदी माहीर आहोत. त्यात चाट हा आपल्या अगदी जवळचा विषय. खाद्यसंस्कृतीने संपन्न अशा भारतीय पदार्थांची चव जशी भन्नाट तशीच त्याच्या उगमाची गोष्ट देखील भन्नाटच आहे. आपला इंडिया असो कि भारत या दोघांत जर कोणती गोष्ट कॉमन असेल तर ती म्हणजे आपल भारतीय खाद्य. मग ते आंध्रातील इडली, चटणी, वडा, डोसा, सांबार, असो कि महाराष्ट्राचा वडापाव, पुरण पोळी असो, राजस्थानची दाल बाटी असो कि, बिहारचा पालक पनीर, पंजाबचे छोले असो कि गुजरातचा ढोकला, हे पदार्थ केव्हाच आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि घरात जाऊन पोहोचले आहेत. भारतात श्रीमंलातला श्रीमंत आणि गरीबातला गरीब माणूस आपलं स्टेट्स बाजूला ठेऊन चाटच्या ठेल्यावर जमा होतात. भैय्या यही तो खासियत है हमारे इंडिया की.

खाद्य संस्कृती ही एक अशी गोष्ट आहे जिथे आपल्या लोकांना एकत्र बांधून ठेवलंय. म्हणजे बघा राजकीय आणि धार्मिक वाद कितीही विकोपाला गेले असले तरी हिंदू आणि मुस्लिम या दोन संस्कृतींनी हातात हात घालून एक सुंदर अशी खाद्य संस्कृती घडवली व विकसित केली, असे म्हणायला काहीच हरकत नाही. जरी भारतामध्ये आपल्याला जातीयता आणि धार्मिक तेढ वाढताना दिसत असेल तरी त्याचा प्रभाव आपल्याला जेवणात कधीच दिसून आला नाही. दंगे झाल्यानंतर देखील मंदिरासमोर प्रसादाचे लाडू विकणाऱ्या मुस्लिम आजोबांना मी पाहिलयं आणि बाहेर जातीय दंगे सुरू असतानाही घरात कुलाचारचं जेवण अगदी गरम गरम पुरणपोळी खान चाचांना आग्रहाने खाऊ घालणाऱ्या आमच्या आजीला देखील मी पाहिलंय. तेव्हा लक्षात आलं की एकमेकांबद्दल आपल्या मनात तेढ नाहीच आहे आणि प्रत्येकाच्या घरातलं ताट ही तेढ मिटविण्यात अग्रेसर आहे. आता हेच पहा ना स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यासोबत बसून जेवण करत मग जात धर्म तेव्हा मध्ये येत नसत, भारताचा सम्राट अकबर अमृतसर गुरुद्वारात सर्व सामान्यांसोबत बसून लंगरमध्ये जेवला होता म्हणे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात दिसून येतात. इतिहास आपल्याला शिकवतो आपण योग्य ते शिकणे आवश्यक आहे.

भारतीय खाद्य संस्कृती ही अतिशय प्राचीन असली तरी वैविध्यपूर्ण, आणि संमिश्र स्वरूपाची आहे. तसं पाहायला गेलं तर भारतीय खाद्य संस्कृतीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मात्र, तिला जास्त प्रसिद्धी मिळाली ती मध्ययुगात झालेल्या विविध आक्रमणांमुळे. त्याचे झाले असे की मध्ययुगात भारतात मोठ्या प्रमाणात परकीय आक्रमणे झालीत युद्ध झाले अन् इस्लामिक सत्ता येथे रूढ झाली, मुघल भारतात आल्यानंतर मुघालाई करी, कबाब आणि भारतीय मसाले यांचा उत्तम मिलाप होऊन मुघलाई खाद्य संस्कृती उदयास येऊन झपाट्याने प्रसिद्धीस आली. भारतात विविध काळात विविध ठिकाणावरून येऊन अनेक राजघराण्यांनी राज्य केले प्रत्येक घराण्याने आपली नवीन पाककृती पुढील पिढीला भेट केली. मांसाहार प्रिय असणाऱ्यांसाठी तर खाद्य पदार्थांची पर्वणीच या राज घराण्यांनी देऊ केली. औरंगाबादमध्ये असलेला नान कलिया हा त्यातलाच एक भाग. मग शाकाहारी तरी का मागे राहणार. आमच्याकडे विविध डाळी व मसाले वापरून आमटीचा पदार्थ रूढच होताच की. मसाले हे भारतीय जेवणाचे सर्वात महत्त्वाचे अंग. एकीकडे आम्ही चायनीज, पंजाबी. गुजराथी. साउथ इंडियन सर्व प्रकारचे जेवण अगदी चवीने खातो मात्र मसालेदार वाग्यांची भाजी, झणझणीत लसणाचे वरण, भुरका, भाकरी या टिपीकल मराठी जेवणाची सर कशालाच नाही.

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाले तर आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सण समारंभ आहेत. सुख-दु:खाचे अनेक प्रसंग आहेत आणि त्या प्रत्येक प्रसंगासाठी काही खास पदार्थ देखील आहेत. जसे दिवाळीला फराळ, श्राद्धाची खीर, कुलाचाराचे जेवण, पुरणाची पोळी, उकडीचे मोदक, नारळी भात, कटाची आमटी, भजे, धपाटे, थालीपीठ असे एक ना अनेक खाद्य पदर्थांची रेलचेल आपल्याला दिसून येते. भारतीय जेवण याच्या अनेक गमती जमती आहेत यावर लिहाल तेवढं कमीच, कारण आपण भारतीय जिभेचे चोचले पुरवण्यात अव्वल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिण भारत यात्रा

$
0
0

वसंत सोनाजीपंत देव, शिवाजीनगर, औरंगाबाद

माझी कन्या सोनाली मोदानी हिचा कौटुंबिक ग्रुप दक्षिण भारतातील मदुराई, रामेश्वरम‍् आणि कन्या कुमारीला जात होता. त्यांच्यासोबत मीही यावं अशी तिची इच्छा होती. म्हणून मीही त्यांच्याबरोबर जानेवारी महिन्यात पुण्याहून मदुराईला गेलो. मदुराईत आम्ही तीन मंदिरे आणि गांधी मेमोरियल म्युझियम पाहिले.

दोन मंदिरे मुरुग्गण स्वामींची होती. एक मंदिर छोटेसेच होते. दर्शन होताच बाहेर पडलो. दुसरे मंदिर खूप मोठे होते. दक्षिणेत कार्तिक स्वामींना मुरुग्गण स्वामी म्हणतात. तेथे गेल्यानंतर आणखी एक सत्य कळले. आपण कार्तिक स्वामींना ब्रह्मचारी मानतो आणि श्रीगणेशाला विवाहित मानतो. त्यामुळे रिद्धीसिद्धीसह गणेश पूजन करतो. मात्र, द‌क्षिणेत उलट समज आहे. ते कार्तिक स्वामीला विवाहित मानतात. भेट दिलेल्या मोठ्या मंदिरांत कार्तिक स्वामी आपल्या दोन पत्नींसह बघायला मिळतात.

तेथील मीनाक्षी मंदिरात गवताच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या चारी बाजूंना असलेली उंच आणि अतिसुंदर मिनारे अत्यंत विलोभनीय दिसतात. येथे भक्तगण पूर्वेकडील अष्टशक्ती मंडपातून मंदिरात प्रवेश करतात. कारण सर्वप्रथम मीनाक्षीदेवीचे व त्यानंतर भगवान सुंदरेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. अष्टशक्ती मंडपात मीनाक्षी देवीच्या लग्न सोहळ्याची दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. भिंतीवर शिवाच्या विभिन्न लिलांची रेखाचित्रे कोरलेली आहेत. अष्टशक्ती मंडपातून मीनाक्षी नायक मंडपात प्रवेश होतो. मध्ये एक मोठा प्रासाद आहे. तेथे भगवान शिव-पावर्ततीचे दर्शन भिल्ल व भिल्लिनीच्या रुपात होते. या मंडपाजवळच्या मंडपास मुताली पिल्लै मंडप असे नाव आहे. या मंडपातून पुढे गेल्यावर आपण एका सुंदर तलावापाशी येतो. याचे नाव सुवर्ण कमळ तलाव आहे. अशी एक कथा सांगितली जाते की, इंद्राने पूजेसाठी येथून सुवर्णकमळे नेली होती. तलावानजिक पश्चिमेकडे हा मंडप आहे. संगमरवरी फरशीवर दर शुक्रवारी मीनाक्षी व सर्वेश्वराच्या सुवर्णमूर्ती भक्तांनी दर्शन घ्यावे म्हणून तेथून काढून ठेवतात. तलावानजिक पश्चिमेकडे 'उचल' हा मंडप (झुला मंडप) आहे. किलिक्कुडू (शुकपिंजरा) मंडप झुला मंडपाजवळ आहे. येथे पिंजऱ्यात पोपट पाळलेले असल्यामुळे असे नाव देण्यात आले आहे. येथे पाच पांडव, द्रोपदी, वाली, सुग्रिवाची चित्रे काढलेली आहेत. किल्लेक्कुडू मंडपातून आपण देवी मीनाक्षी प्रतिष्ठाण असलेल्या ठिकाणी येतो. तीन मजली गोपूर प्रवेशद्वारी आहे. बाहेरील भागात सुवर्ण ध्वजस्तंभ, तिरुमलाई मंडप, विनायक, कुडक सुब्रझमण्य आदींचे दर्शन होते. या महामंडपात एरावत विनायक मूर्ती मुत्तुकुमाराचे स्थान व दिव्य शय्यागार आहे. पश्चिमेचे बाजूस उर्ध्वमंडप आहे व अंतर्ग्रह आहे. दुसऱ्या दिवशी रामेश्वरम‍्ला पोचलो. हीच येथे शिव-पार्वतीची मंदिरे आहेत. येथे २४ कुंड आहेत. त्यांच्या पाण्याने स्नान केल्यावरच मंदिरात दर्शनाला जावे लागते. आपल्याकडे चारधाम यात्रा केली जाते. याचा उद्देश पुण्य जमा करणे हा आहे. तसेच संपूर्ण भारत नजरेखालून जावा व देश एकतेच्या सूत्राने बांधला जावा हा आहे. कोदंड राजाचे मंदिर रामेश्वरमपासून ५ मैल अंतरावर दक्षिणेस रामेश्वरम‍् व धनुष्कोडी यांच्यामध्ये समुद्रकिनारी रामचंद्राचे सुंदर मंदिर आहे. महापराक्रमी राजा भरत भारतात राज्य करीत होता. त्याच्या पराक्रमाच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या नावावरून देशाला भारत हे नाव मिळाले. त्याला आठ मुले व एक कन्या होती. तिचे नाव कुमारी होते. दक्षिणेचा भाग कुमारीचा म्हणून त्याला कुमारीनाडू म्हणजे कुमारीचे राज्य असे नाव पडले तेच आजचे तामीळनाडू.

प्राचीन काळी भगवान परशूरामाने या मंदिराची बांधणी केली, असे सांगितले. नंतर अनेक राजांनी त्यात सुधारणा केल्या. यजुर्वेदात कन्याकुमारीचे महत्त्व वर्णिले आहे.

कन्याकुमारी मंदिराशेजारीच श्रीपादशिला हे स्वामी विवेकानंदांचे तपस्थान आहे. सागरात एका मोठ्या शिलेवर बसून स्वामीजींनी तपश्चर्या केली. त्याच स्थळी मोठे स्मारक उभारण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे स्मारक उभारताना आयोजकांनी भारतभरातील नागरिकांना अशी विनंती केली होती, की प्रत्येकाने स्मारकासाठी फक्त एक रुपया देणगी द्यावी. लोकांनी भरभरून देणगी दिली होती व त्या रकमेतून हे स्मारक उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुषित पाण्याचा स्त्रोत शोधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या विविध भागात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत असल्याने दुषित पाण्याचा छडा लावा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी दिले आहेत. घोडेले यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. येथे शुद्धीकरण प्रक्रिया योग्य प्रकारे होते असल्याचे लक्षात आल्यानंतर समस्या शहरातच असल्यावर सर्वांचे एकमत झाले.

स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांच्या पदमपुरा वॉर्डात गॅस्ट्रोचे सुमारे तीस रुग्ण आढळले आहेत. मुकुंदवाडीमध्येही गॅस्ट्रोची लागण झाल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. जायकवाडी धरणातून येणारे पाणी व प्रक्रिया झाल्यानंतरचे पाणी याचे नमुने पदाधिकाऱ्यांना घेतले असून हे नमुने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात येतील, असे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. फारोळा येथील केंद्रात ब्लिचिंग पावडरच्या तीनच बॅग शिल्लक होत्या, तुरटीचा जेमतेम साठा, क्लोरिन सिलेंडरचा तुटवडा असल्याचे लक्षात आले. ही सामुग्री फक्त तीन दिवस पुरणार आहे. त्यामुळे पुरवठादाराशी संपर्क साधून रसायने मागवून घ्या, त्यांचे पेमेंट करा, असे आदेश लेखा विभागाला दिले जातील, असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

दुषित पाण्याचा छडा लावण्यासाठी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल, दक्षता पथकाचे प्रमुख एम. बी. काजी यांचा समावेश आहे.

\Bकॅरीबॅगचा पुंजका निघाला

\B

फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रत्येक हौदाची पाहणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी एका हौदात कॅरीबॅगचा पुंजकाच हाती लागला. प्लास्टिक कॅरीबॅगमुळे निर्माण होणारे धोके सर्वश्रूत असताना व कॅरीबॅग वापरावर बंदी असताना हौदात कॅरीबॅग कशा आल्या, असा प्रश्न निर्माण झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो कॅप्शन

$
0
0

\Bपालिकेचे दणका \B

महापालिकेच्या पथकाने गुरुवारी शहागंजसह शहराच्या काही भागात हातगाड्या व अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. दरम्यान,

हातगाड्या जप्त करताना शहागंजमध्ये गुरुवारी सायंकाळी हातगाडीचालकांनी पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हातगाडीचालकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (इन्सेट) आकाशवाणीजवळील कारवाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादला कौशल्य मनुष्यबळ विकास विद्यापीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशातील पहिले कौशल्य मनुष्यबळ विकास विद्यापीठ औरंगाबादला स्थापन करण्याचा निर्णय अल्पसंख्यांक विकास विभागाच्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे,' अशी माहिती माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी दिली.

अल्पसंख्यांकाबाबत विविध विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मुंबई येथे सह्याद्री विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिक्षण मंत्री विनोद तावडे, अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह भायखळाचे आमदार वारिस पठाण आणि आमदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती. बैठकीत आमदार जलील यांनी, 'औरंगाबादला डीएमआयसी प्रकल्प होत आहे. उद्योजकांना कुशल मनुष्यबळ मिळावे यासाठी औरंगाबादलाच कौशल्य मनुष्यबळ विकास विद्यापीठ स्थापन करावे,' अशी मागणी केली. या मागणीला बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विद्यापीठासाठी जागा निश्चित करून, प्रस्ताव तयार करण्याचे देण्याचे आदेश देण्यात आले. हा प्रस्ताव मिळाल्यानंतर शंभर कोटी रुपये केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून आणण्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी मंजुरी दिली. या विद्यापीठासाठी जागा देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम तसेच अल्पसंख्यांक विभागाचे सचिव श्याम तांगडे यांना दिले आहेत, अशी माहिती आमदार जलील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

………………

दरम्यान, बैठकीत उपस्थित आमदारांनी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी प्रक्रियेबाबत पुनर्विचार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही प्रक्रिया अधिक सोपी करून जास्तीत जास्त अल्पसंख्यांक मुलांना शिष्युवृत्ती देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. याशिवाय वक्फ बोर्डाच्या संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी आमदार वारिस पठाण यांनी भायखळा येथे उर्दू घर बांधण्याची मागणी केली. या मागणीला या उच्चस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली. शिवाय नांदेड येथे तयार करण्यात आलेल्या उर्दू घरचे उद्घाटन आतापर्यंत झालेले नसल्याची माहितीही उपस्थितीत आमदारांनी दिली.

\Bशैक्षणिक कर्ज दुप्पट

\Bअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून २५ हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज मिळत होते. या बैठकीत आता ५० हजार रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. अल्पसंख्याक मुलीच्या वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत जेवण देण्याची मागणीही शासनाने मान्य केली.

…………

\B'हज हाउस'ची चौकशी

\Bऔरंगाबादमध्ये बांधले जाणारे हज हाउस अजूनही अपूर्ण आहे. उर्वरित बांधकामासाठी निविदा काढली. मात्र, यात विशिष्ट व्यक्तीला कंत्राट देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष अट टाकली. त्यामुळे या कंत्राटाला प्रतिसाद येत नाही. याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आदेश अर्थमंत्र्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकेत कुलकर्णी खुनप्रकरणी जायभायेची रवानगी हर्सूलला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संकेत कुलकर्णी खुनप्रकरणी मुख्य आरोपी संकेत जायभाये याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांनी गुरुवारी (चार एप्रिल) दिले.

याप्रकरणी विजय कडुबा वाघ (२०, जयभवानीनगर) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, संकेत कुलकर्णी या युवकाचा खून २३ मार्च २०१८ रोजी ठाकरेनगर परिसरात अंगावर गाडी घालून करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी संकेत जायभाये याला घटनेनंतर अटक करण्यात आली होती व त्याला कोर्टाने गुरुवारपर्यंत (पाच एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील आशिष दळे यांनी काम पाहिले.

या प्रकरणात आरोपी संकेत जायभाय याच्यासोबत उमर अफसर पटेल, विजय नारायण जोक व संकेत संजय मचे हे त्याचे तीन मित्र होते. घटनेनंतर संकेत जायभायला पोलिसांनी अटक केली, मात्र त्याचे तिन्ही साथीदार पसार झाले होते. देवळाई येथे पोलिसांनी मंगळवारी उमर पटेल याला पकडले. विजय जोक याला पैठणमध्ये अटक केली होती. तिसरा साथीदार संकेत मचे हा पसारच होता. तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्यासाठी त्याला नातेवाईक मदत करीत असल्याचा पोलिसांना संशय होता. नातेवाईकांवर दबाव वाढविल्यानंतर संकेत माचेला अटक करण्यात पोलिसांना बुधवारी यश आले. मुख्य आरोपी संकेत जायभाय आता न्यायालयीन कोठडीत आहे, तर त्याचे साथीदार पोलिस कोठडीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी परिषद उपाध्यक्षपदी तारगे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी प्रशांत तारगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांनी प्रशांत तारगे यांची निवड जाहीर केली. छावणीच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत, छावणीतील दूषित पाण्यासह इतर सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तारगे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या परिषदेच्या बैठकीत पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदाच्या निवडीसाठी गुरुवारी (पाच एप्रिल) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार अतुल सावे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड, संजय केणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर, कर्नल आर. शर्मा, कर्नल अजय लांबा, कर्नल दीपकुमार राणा; तसेच छावणी परिषदेचे सदस्य किशोर कच्छवाह, संजय गारोल, शेख हनिफ, मिर्झा रफत बेग, पद्मश्री जैस्वाल, प्रतिभा काकस यांची उपस्थिती होती. प्रशांत तारगे यांच्या निवडीनंतर अध्यक्ष डी. के. पात्रा व आमदार अतुल सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्त परिषदेच्या कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जागोजागी फेटे घातलेले कार्यकर्ते दिसून येत होते.

\B३२ महिन्यांत चार उपाध्यक्ष\B

छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाला पाच वर्षांची मुदत असली तरी छावणी परिषदेमध्ये सदस्यांनी अंतर्गत तडजोड करून घेतली आहे. परिणामी, छावणीकरांना प्रत्येक आठ महिन्यांत नवीन उपाध्यक्ष मिळत आहे. सर्वप्रथम किशोर कच्छवाह यांनी राजीनामा दिल्यानंतर रफत बेग, शेख हनिफ, संजय गारोल हे उपाध्यक्ष झाले होते. राजीनामा सत्रामुळे छावणी परिषदेत अवघ्या ३२ महिन्यांत चार उपाध्यक्ष छावणीकरांना मिळाले आहेत.

\Bगॅस्ट्रोच्या दोषींवर कारवाई नाहीच\B

छावणीतील गॅस्ट्रो प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती, मात्र गॅस्ट्रो प्रकरणाला चार महिने लोटले तरी अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. यासंदर्भात ब्रिगेडिएर पात्रा यांना विचारले असता, 'समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे व दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल व यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असेल', असे पात्रा म्हणाले. त्याचवेळी अजूनही अनेकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत विचारले असता त्यांनी, त्यावरही लवकर मार्ग काढला जाईल आणि छावणी परिषदेअंतर्गत आरोग्य व शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images