Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कचरा जाळणारा कर्मचारी निलंबित

$
0
0

औरंगाबाद: मोंढ्यामध्ये कचऱ्याला आग लावणाऱ्या सीताराम रिडलॉन या सफाई कर्मचाऱ्याला महापालिका प्रशासनाने गुरुवारी निलंबित केले. रिडलॉन याने सोमवारी कचऱ्याला आग लावली होती, त्यामुळे एक दुकान भस्मसात झाले. या प्रकरणी उपायुक्त रवींद्र निकम चौकशी करत आहेत. दरम्यान दुकानदारास महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, राजेंद्र दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेवून निवेदन सादर केले. रिडलॉन यांचे निलंबन झाल्याने कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी महापौरांची भेट घेवून नाराजी व्यक्त केली. केवळ सफाई कर्मचाऱ्यांना जबाबदार न धरता अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंधरा वर्षांनंतर अग्निशन केंद्रांची आठवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नव्याने बांधायच्या चार अग्निशमन केंद्रांच्या फायलींवरची धूळ तब्बल पंधरा वर्षांनतर गुरुवारी झटकण्यात आली. शासनाने परवानीग व निधी दिला असतानाही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. नवीन चार अग्निशमन केंद्रांसाठी जागा निश्चित करून बांधकामाची अल्पमुदतीची निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहराचा विस्ता झपाट्याने होत असल्याने विविध भागात अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान पाच ठिकाणी केंद्र स्थापन करण्याची मागणी पालिकेने शासनाकडे केली होती. त्यास शासनाने २००३ मध्ये मान्यता देऊन निधी मंजूर केला आहे. केंद्रांच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपये, तर उपकरणांसाठी सव्वातीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बांधकामाच्या निधीतील ३५ टक्क्यांचा पहिला हप्ता पालिकेला देण्यात आला. जागा निश्चित करून बांधकाम सुरू करणे एवढेच पालिकला करायचे होते. प्रत्यक्षात पालिकेने बांधकामाची फक्त फाइल तयार केली.

माणिक हॉस्पिटलला आग लागल्यानतंर अग्निशमन केंद्रांच्या बांधकामाचा विषय चर्चेत आला. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक घेण्यात आली.

\Bया भागात बांधकाम \B

हडको टी पॉइंट, शहागंज, पडेगाव व कांचनवाडी येथे अग्निशमन केंद्र बांधण्याचा प्रस्ताव असून जागा उपलब्ध होत नसल्यामुळे बांधकाम केले सुरू केले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. महापौरांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून दोन दिवसांत जागा निश्चित करा, असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर-5एप्रिल

$
0
0

सिटिझन रिपोर्टर

कन्नड

सुरक्षेसह प्रगती हवी

औरंगाबाद विभागाच्या परिवहन मंडळाने सर्व एसटीगाड्यांमध्ये मोफत वायफाय सुविधा पुरवली आहे. सर्व मोबाइलधारक प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. ही चांगली बाब आहे. रेल्वे विभागासारखा एसटी विभाग 'प्रगती की ओर' चालला आहे, परंतु डेपोची दुरुस्ती देखभाल यंत्रणा किती सावध आहे? त्या कन्नड घाटामधून अनेक अवजड वाहने जा-ये करत आहेत शिवाय एसटी गाड्याही जा-ये करत आहेत. मोबाइलसारख्या संपर्क साधनाने झालेला अपघात लगेच समजणार आहे. स्थानिक लोक यंत्रणेची वाट न पाहता मदत कार्य सुरू करत असतात, मात्र दोन्ही डेपो कन्नड, चाळीसगाव ताबडतोब उपचार आणि दुरुस्ती देखभाल वाहने पाठवून संभाव्य जखमींना मदत करू शकतात. तशी तयारी ठेवणे आवश्यक आहे.

- दिनेश कुलकर्णी, औरंगाबाद

.

एसएससी बोर्ड

पेपर तपासण्याची लगबग

नुकतीच दहावी-बारावीची परीक्षा संपली आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका प्रथम संबंधित परीक्षकांकडे त्यानंतर नियामक व मुख्य नियमकाकडे विषयनिहाय उत्तरपत्रिकांचे योग्यप्रकारे मूल्यांकन केले जाते. विद्यार्थ्यांना लेखी व तोंडी परीक्षेच्या संपादित एकूण गुणावरून गुणदान केले जाते. निकाल वेळेवर लागावा यादृष्टीने औरंगाबाद एसएससी बोर्डामध्ये शिक्षक, परीक्षा नियामक व मुख्य नियमक; तसेच बोर्डातील कर्मचारी डोळ्यात तेल घालून उत्तरपत्रिका तपासण्यात मग्न आहेत.

- रवींद्र तायडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग करणाऱ्यास जमावाची मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिसारवाडी भागात ३० वर्षांच्या महिलेची छेडछाड करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जमावाने चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार मंगळवारी रात्री आठ वाजता घडला. आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या नगरसेविकेच्या पती व नातेवाईकावर आरोपीच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिसारवाडी भागातील ३० वर्षांची महिला मंगळवारी रात्री आठ वाजता पायी घरी जात होती. यावेळी त्याच परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी इस्माईल शहा याने महिलेची छेड काढली. तिचा हात ओढत त्याने रस्ता अडवला. या महिलेला अश्लील शिवीगाळ करीत त्याने अश्लील कृत्य केले. हा प्रकार पाहून नागरिक जमा झाले. आरोपी शहा याचा गोंधळ सुरूच होता. त्याने महिलेला पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. नागरिकांनी या महिलेला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी एकत नसल्याने त्याला जमावातील काही जणांनी मारहाण करीत महिलेची सुटका केली. यावेळी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी इस्माईल शहाविरुद्ध रस्ता अडवणे, विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय पाचोळे याप्रकरणी तपास करीत आहेत.

नगरसेविका पतीविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी आरोपी इस्माईल शहा याने देखील त्याला झालेल्या मारहाणीविषयी तक्रार दिली आहे. यामध्ये या भागातील 'एमआयएम'च्या नगरसेविका संगीता वाघुले यांचे पती सुभाष वाघुले, निलेश वाघुले व विक्की वाघुले यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी सुभाष वाघुले यांनी सांगितले की, या प्रकरणाशी माझा काहीही सबंध नाही. वॉर्डातील प्रकरण असल्याने महिलेच्या मदतीसाठी पोलिस ठाण्यात गेलो होतो. तेथे आरोपी शहा यानेच आम्हाला शिवीगाळ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीएमआयसीला पाणी न देण्याची घोषणा दुर्दैवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धरणाचे पाणी औरंगाबाद येथे होवू घातलेल्या डीएमआयसी प्रकल्पाला सुद्धा न देण्याचे शासनाचे धोरण आहे. ही वैजापूर येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा मराठवाडयाच्या औद्योगिक विकासाला खीळ घालणारी आहे. हे धोरण मराठवाड्यापुरते बदलावे, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी केली आहे.

'प्रस्थापित उद्योगांनी पाण्याचे रिसायकलिंग करावे हे धोरण योग्य राहील. मात्र, नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगांना हे धोरण लागू करणे अयोग्य आहे. मराठवाड्यात मोठे उद्योग येण्यास तयार नाहीत. त्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत नाहीत. त्यात या धोरणाची अंमलबजावणी झाली, तर मराठवाड्याचा औद्योगिक विकास खुंटेल. निवडणुकीच्या निमित्त्ताने अशी घोषणा मतदारांना खुष करण्यासाठी करताना मुख्यमंत्र्यांसारख्या राज्याच्या जबाबदार व्यक्तीने असे विधान करणे ही अत्यंत दुर्देवी आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याचा मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दहा टक्के पाणी उद्योग, १५ टक्के घरगुती वापर व ७५ टक्के पाणी सिंचनाकरिता, असे धोरण यापूर्वीच ठरलेले आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा या धोरणाशी विसंगत असल्याकडे अ‍ॅड. देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.

\Bबेरोजगारांचा विचार करावा \B

डीएमआयसीचे काम प्रगतीपथावर असून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा मराठवाड्यातील तरुणांना आहे. यावेळी सुविधा देऊन नवीन उद्योगांना मराठवाड्याकडे आकर्षित करण्याऐवजी पाण्यासारखी मुलभूत गरज देखील पूर्ण करण्यात येणार नाही, अशी घोषणा करण्यात आली. याचा परिणाम येवू घातलेल्या उद्योगांना परावृत्त्त होण्यात होईल. मराठवाड्यावर दीर्घकालीन विपरित परिणाम होतील, असेही मत अ‍ॅड. देशमुख यांनी मत व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल, रक्कम लंपास; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतबाजार येथील महायात्रेत गेलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोबाईल व रक्कम असा नऊ हजार १२० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, शनिवारपर्यंत (सात एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी दिले.

या प्रकरणी विजय बाबुराव सपकाळ (५२, रा. अविष्कार कॉलनी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, चार एप्रिल २०१८ रोजी फिर्यादी हा भारतबाजार येथील महायात्रेत गेला होता असता, गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या खिशातील मोबाइल व रक्कम असा नऊ हजार १२० रुयांचा ऐवज लंपास करण्यात आला. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपी सिद्दीक चाऊस खालेद चाऊस (२२, रा. सयंदा कॉलनी, जटवाडा रोड, औरंगाबाद) याला अटक करण्यात येऊन गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून मुद्देमाल जप्त करणे बाकी असून, आरोपीचे साथीदार कोण आहेत, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा व्यवस्थापनावर आज कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरी तयार झालेल्या कचऱ्याचे निर्मूलन कसे करावे ? याबाबत शास्त्रशुद्ध माहिती सांगण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने शनिवारी कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड बायपास परिसरातील अथर्व रॉयल लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. या कार्यशाळेत प्रा. त्रिशूल कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. अथर्व रॉयल येथील कार्यक्रमाचे समन्वयक चंद्रकांत कुलकर्णी हे आहेत. शहरात गेल्या दीड महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. ओला व सुका कचरा विलगीकरण कसे करावे ? घरच्या कचऱ्याचे निर्मूलन कसे करावे ? याबाबत सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून महाराष्ट्र टाइम्सने विविध शाळा, कॉलेजांमध्ये कचरा व्यवस्थापन कार्यशाळांचे आयोजन केले. हा उपक्रम सातत्याने सुरू राहणार आहे. टाउनशीप, सोसायट्यांमध्येही अशा प्रकारचे उपक्रम 'मटा'तर्फे राबविण्यात येणार आहेत. त्याचा पुढचा भाग म्हणून शनिवारी कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपण मोडित काढली ‘इको सिस्टीम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'२०२० पर्यंत शेतीचे आयुष्यमान कमी होणार आहे. २०३५ पर्यंत ग्लोबल वार्मिंगचे आव्हान कंबरडे मोडणार आहे. संपूर्ण 'इको सिस्टीम'ला हानी पोचवत, जर आपण अशाच पद्धतीने पुढे जात राहिलो, तर परिस्थिती चिंताजनक व गंभीर होईल,' असा इशारा कृषीमूल्य आयोगाचे सल्लागार उदय देवळाणकर यांनी दिला.

आम्ही उद्योगिनी ग्रुपतर्फे आयोजित सेंद्रीय धान्य महोत्सवात ते बोलत होते. टिळकनगरच्या ऑरगॅनिक अँब्रेला अँड न्युट्री फुड्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कृषी विज्ञानचे सुरेश कुलकर्णी, आम्ही उद्योगिनी ग्रुपच्या संचालिका ज्योती दाशरथी, 'फिट मी'च्या संचालिका संजना नानीवाडेकर, आरती डुघरेकर उपस्थित होत्या. या महोत्सवात दहा उद्योजिका सामील झाल्या आहेत. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले चंदोसी गहू, खपली गहू, सर्व प्रकारच्या डाळी, ज्वारी, बाजरी, तांदूळ, हातसाडीचे तांदूळ, शेंगदाणे, पोहे, दलिया, रवा चिंच, ब्राउन राईस, सेंद्रिय गुळ, गुळ पावडर बघण्यास मिळणार आहे. याप्रसंगी बोलताना देवळाणकर पुढे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात प्रत्येक भारतीयाचे डाळी खाण्याचे प्रमाण ६८ टक्के होते, ते आता ३८ टक्के झाले आहे. पिझ्झा खाण्याच्या वेडापायी आपण प्रथिने सोडली आहेत. शेतकरी आत्महत्या ही चिंतेची नव्हे, तर चिंतनाची बाब असून त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावरही झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

सुरेश कुलकर्णी यांनी पुण्याजवळील पाबळ केंद्राची माहिती देत छोट्या उपक्रमातूनच मोठेपण टिकून राहते असे सांगितले. संजना नानीवाडेकर यांनी सेंद्रीय धान्य, डाळींचा तरुणांनी स्वीकार करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी यांनी केले. हा धान्य महोत्सव १२ एप्रिलपर्यंत सकाळी साडेसात पासून रात्री साडेआठ पर्यंत सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदगीरमध्ये गारपीट; लातूरला झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाचे चटके सहन करणाऱ्या लातूर जिल्ह्याला शुक्रवारी जोरदार पावसाने झोडपले. उदगीर तालुक्यात गारपीट झाली असून लातूर, रेणापूर, चाकूर आणि औसा तालुक्यात जोरदार पाऊस झाला.

फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद वगळता मराठवाड्याच्या उर्वरित सातही जिल्ह्यात गारपीटीने कहर केला होता. त्यानंतर आता पुन्हा लातूर जिल्ह्याला गारपीटीने झोडपले आहे. शुक्रवारी दुपारनंतर लातूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. उदगीरमध्ये झालेल्या गारपीटीच्या तडाख्यात कृषीउत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल सापडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर तालुक्यातील काही भागांमध्ये दुपारी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. आठवड्याच्या शेवटी सहा आणि सात एप्रिल रोजी मराठवाड्यातील काही भागांमध्ये गारपीट तसेच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार सकाळपासून बीड, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने वातावरणातील उकाडाही वाढला होता. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही विभागातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत गेली. औरंगाबाद जिल्ह्याचे गेल्या काही दिवसाचे सरासरी कमाल तापमान ३७ अंश सेल्सियस होते.

\Bआज,उद्या गारांसह पाऊस

\Bहवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात सात आणि आठ एप्रिल रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या जिल्ह्यांना दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्यामल सिद्धेश्वर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील निवृत्त आस्थापना अधीक्षक व सिडको, एन-३ येथील रहिवासी श्यामला अरविंद सिद्धेश्वर (७१) यांचे शुक्रवारी (सहा एप्रिल) सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी एन-सहा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील सेवानिवृत्त विभागीय लेखापाल अरविंद सिद्धेश्वर यांच्या त्या पत्नी होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फडणवीसांनी वैचारिक पातळी दाखवली: चव्हाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मुंबईत भाजप कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना साप, मुंगूस, कुत्रा संबोधले. राजकीय विरोध असावा, पण मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्ये करून त्यांची वैचारिक पातळी किती खालावली आहे हे दाखवून दिले. आम्ही सुद्धा सत्तेत होतो, पण विरोधकांबाबत अशी वक्तव्ये केली नाहीत. अमर्याद सत्ता असल्याचा हा परिणाम आहे,' अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे केली.

चव्हाण एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, 'राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस शिबिरे घेत आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रभावी आखणी केली जात आहे. यासोबत विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाची माहितीही देत आहोत. बेरोजगारी, एमपीएसई विद्यार्थ्यांचे आंदोलन, नोकरभरती नाही, शेतकरी आत्महत्या, बोंडअळी नुकसान देण्यास विलंब, आधारभूत किंमतीबाबत फसवाफसवी, बँकांवर अंकुश नसल्याने नीरव मोदी, मेहूल चोक्शी देशाबाहेर पळून जाणे, मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणाबाबत ठोस भूमिका न घेणे आदी मुद्दे आहेत. राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच मुंबईत तीनदिवसीय बैठक झाली. त्यात प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांनी काँग्रेसची परिस्थिती आम्हाला सांगितली. सोबत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याबाबतची मते नोंदविली आहेत. सर्व जिल्ह्यांचा अहवाल एकत्र करून तो पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपविला जाईल. या महिन्यात राज्याचा अहवाल जाईल. कर्नाटक निवडणुकीनंतर राहुल गांधी या अहवालावरून पुढील निर्णय घेतील. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात चर्चेची एक फेरी झाली आहे. अहवालानंतर पुढचा निर्णय होईल. राजकीय परिस्थिती कायम बदलत असते. राज्यात काँग्रेसची परिस्थिती मजबूत आहे. काँग्रेसचे ४२ आमदार आहेत. यातील बहुतांश उमेदवार आजही तेवढेच स्ट्राँग आहेत. काही ठिकाणी नवीन चेहरे देण्याचा विचार आहे. हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. आहे त्यापेक्षा चांगला उमेदवार काही ठिकाणी येऊ शकतो. राज्यसभेसाठी आम्ही जसा उमेदवार दिला तसे काही मतदारसंघात होऊ शकेल,' असे चव्हाण यांनी नमूद केले.

वैजापूर नगरपालिकेसाठी काँग्रेसला उमेदवार मिळाला नाही काय ? असे विचारल्यावर चव्हाण म्हणाले, 'वैजापूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी पैसे देऊ केले. दुसऱ्या पक्षातील लोक फोडले. भाजपने असा उद्योग आता सुरू केला आहे. काँग्रेसने असे उद्योग केलेले नाहीत. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराला काँग्रेसचे नेते जाणार आहेत. औरंगाबाद, पुणे, नगर, कल्याण - डोंबिवली येथे कचराकोंडी झाली आहे. हा विषय कठीण झाला आहे. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून राज्य म्हणून विचार केला पाहिजे. प्लास्टिकबंदी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ५० मायक्रॉनपेक्षा कमीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणे योग्य आहे. त्यावरच्या प्लास्टिकचे रिसायकलिंग करता येते. शिवाय या उद्योगात असलेल्यांचा विचार केला पाहिजे. पर्यवारणमंत्र्यांना काही समजते की नाही माहित नाही,' असा टोला त्यांनी लगाविला.

>>शिवसेनेसोबत आघाडी अशक्य

'काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी होणे कदापि शक्य नाही. आम्ही विकास आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतो. मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना प्रकल्पातील पाणी देणार नाही, असे म्हटले. पण त्यांनी आधी मराठवाड्याचे हक्काचे पाणी दिले पाहिजे. राज्यात पाण्याचा वाद सुरू आहे. लवाद नेमले आहे, वेळेवर निर्णय होत नाही. वरच्या भागात अजूनही जास्त पाणी खेचले जाते. शेती, पिण्यासाठी आणि उद्योग अशा टप्प्याने पाणी द्यावे. सेनेच्या मंत्र्यांना काम करू द्यायचे नाही, असे भाजपचे राज्यात धोरण दिसते. शिवसेना कचाट्यात सापडली आहे. पण त्यांना सत्ता सोडवत नाही. एवढी नामुष्की ओढावूनही सेना सत्तेत राहील आणि पुढे त्यांची युती होईल,' असा टोला चव्हाणांनी लगाविला.

>>भारिपसोबत आघाडी व्हावी

सोमवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी दिल्लीत सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्यास पाठिंबा म्हणून राज्यातील काँग्रेसतर्फे प्रत्येक जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. भारिप बहुजन महासंघासोबत काँग्रेसची आघाडी व्हावी, अशी आमची इच्चा आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असावेत, असे आम्हाला वाटते, पण त्यांना काय वाटते ते माहित नाही,' असे अशोक चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमोत्सव समिती अध्यक्षपदी खरात

$
0
0

औरंगाबाद: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे भीमोत्सव उत्सव समितीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी सोमिनाथ खरात, स्वागताध्यक्षपदी जयकिशन कांबळे यांची निवड करण्यात आली. प्रदेश महासचिव राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. बैठकीला भैय्यासाहेब कांबळे, राम पाटील बोबडे, राहुल पाईकडे, अमोल नावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत महिला जिल्हाअध्यक्षापदी नीता शिंदे, उपाध्यक्षपदी आकाश ढिलपे, अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी समी पठाण यांची निवड करण्यात आली. भीमोत्सवात ११ ते १४ एप्रिल दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत आजीचा मृत्यू; नात, आजोबा जखमी

$
0
0

औरंगाबाद: नातीला दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या आजोबा-आजीला पाठीमागून भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत आजीचा ट्रकखाली येऊन जागीच मृत्यू झाला, तर नात व आजोबा किरकोळ जखमी झाले. शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास बीड बायपासवरील गोदावरी टी पॉइंटजवळ हा अपघात घडला.

प्रयागाबाई बाजीराव राठोड (वय ४५) रा. गाडीवाट असे अपघातातील मृत महिलेचे नाव असून, बाजीराव सीताराम राठोड (वय ५५) आणि नात सुप्रिया सुनील राठोड (वय ३) अशी जखमींची नावे आहेत. राठोड दाम्पत्य दुपारी बीड बायपास परिसरातील भारतमातानगरातील नातेवाईकाला भेटून गिरनेर तांडा येथे विहिरीचे खोदकाम करीत असलेला मुलगा नीतेशला भेटण्यासाठी नातीला घेऊन दुचाकीने जात होते. या वेळी बायपासवरील गोदावरी टी पॉइंटजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या प्रयागाबाई रोडवर पडल्याने त्या ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्या. तर बाजीराव आणि सुप्रिया रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकले गेले. यात त्यांना किरकोळ मार लागला; मात्र प्रयागाबाईंचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटीत दाखल केले. अपघातामुळे ठप्प झालेली वाहतूक पोलिसांनी वेळीच सुरळीत केली. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध सातारा पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकेचा ठिय्या

$
0
0

डॉ. आंबेडकरनगर ते पिसादेवी या रस्त्याच्या पॅचवर्कचे काम केले जात नसल्यामुळे एमआयएम नगरसेविका संगीता वाघुले यांनी शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत ठिय्या आंदोलन केले. येत्या दोन दिवसांत काम सुरू होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाखांचा गंडा

$
0
0

औरंगाबाद : मिटमिटा येथे कोणताही प्लॉट नसताना तीन जणांनी बनावट कागदपत्राच्या आधारे एकाला तीन लाखांचा गंडा घातला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख इब्राहिम महेबूब (रा. औरंगाबाद), अजमल खान मुनीर खान (रा. किराडपुरा), शेख खलील शेख अकबर (रा. बारी कॉलनी) यांनी त्यांचा गट नंबर ८४ मध्ये एकही प्लॉट नसताना संगनमत करून मोहमंद बशीर मोहमद सुलतानी यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. जिल्हाधिकारी कार्यालयात सहा प्लॉटची नोटरी खरेदी खतमध्ये नोंदवली. बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन लाखांचा गंडा घातला. या प्रकरणात मोहम्मद बशीर यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंजूर अग्निशमन गाड्यांची खरेदी नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंजूर झालेल्या अग्निशमन गाड्यांची खरेदीच महापालिका प्रशासनाने केली नसल्याने शनिवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांनी आवाज उठवला. तेव्हा अधिकाऱ्यांनी शहरात कचराकोंडीचा निर्माण झाल्यामुळे गाड्यांची खरेदी करता आली नाही, असा अजब खुलासा केला. विशेष म्हणजे गाड्या खरेदीच्या टेंडरला डिसेंबर २०१७मध्ये मंजुरी मिळाली आणि कचराकोंडीचा प्रश्न फेब्रुवारी २०१८मध्ये सुरू झाला.

माणिक हॉस्पिटलला लागलेल्या आगीवरून शनिवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनाला धारेवर धरले. शिवसेना नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य म्हणाले, 'माणिक हॉस्पिटलला लागलेल्या आगीवरून महापालिकेचा अग्निशमन विभाग किती कुचकामी आहे हे लक्षात येते. अग्निशमन विभागातर्फे आवश्यक त्या सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे रुग्णांना शालीची झोळी करून बाहेर काढावे लागले. अग्निशमन विभाग अद्ययावत करण्यासाठी विविध प्रकारच्या मान्यता दिल्या, पण त्या दृष्टीने काहीच काम केले जात नाही. लालफितीचा कारभार थांबवला पाहिजे.' यावर सभापती गजानन बारवाल यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांना खुलासा करण्यास सांगितले. सुरे म्हणाले, 'पाच गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. अद्याप त्या खरेदी झाली नाही.' गाड्यांची खरेदी का रखडलीया बद्दल बारवाल यांनी तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांना खुलासा करण्यास सांगितले. या विभागाचे अधिकारी पंडित म्हणाले, 'गाड्या खरेदीच्या टेंडरला डिसेंबर २०१७मध्ये अंतिम मंजुरी मिळाली. गाड्या पुरविणाऱ्या एजन्सीला तडजोडीसाठी बोलावले होते, पण कचरा प्रश्नामुळे तडजोड होऊ शकली नाही.' यावर सभापतींनी गाड्या खरेदीची फाइल आयुक्तांकडे घेवून जा आणि खरेदीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा, असे आदेश दिले. भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी इमारतींचे फायर ऑडिट केले जात नाही, अस प्रश्न उपस्थित केला. शिवसेनेचे सीताराम सुरे यांनी अग्निशमन उपकेंद्राचे काम मंजुरी मिळूनही सुरू होत नाही, असा मुद्दा मांडला.

\Bअधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

\Bसभापतींनी याबद्दल कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना खुलासा करण्यास सांगितले. कोल्हे म्हणाले, 'पडेगाव, कांचनवाडी, टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर आणि शहागंज येथे उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. यापैकी टीव्ही सेंटर आणि हडको कॉर्नरच्या उपकेंद्रांसाठी सिडको प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते, पण पालिकेच्या नगररचना विभागाकडून हे प्रमाणपत्र घ्या, असे सिडकोने कळविले आहे. पडेगाव येथील जागेबद्दल शेळी - मेंढी पालन विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. शहागंज येथील उपकेंद्राच्या बांधकामाची फेरनिविदा काढली आहे.' यावर वानखेडे म्हणाले, 'आपल्या चुकांमुळे, दिरंगाईमुळे नागरिकांना वेठीस कशासाठी धरता. यापुढे शहरात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी सर्जरी वॉर्डाचे छत कोसळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) सर्जिकल इमारतीत शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास सर्जरी वॉर्ड क्रमांक १४मधील छताचा भाग कोसळला. या घटनेत कोणलाही इजा झाली नाही.

शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील ट्रॉमा केअर युनिट (टीआयसीयू)च्या बाथरूम लिकेजमुळे ते पाणी त्याच वॉर्डाच्या खाली असलेल्या वॉर्ड १४च्या भिंतीवर पाझरत असल्याने भिंतीसह पूर्ण कोपरा कोपरा ढासळला आहे. या वार्डाच्या दुरुस्तीसाठी शंभरहून अधिकवेळा पाठपुरावा केला होता. मात्र, दुरुस्तीबाबत कसलिही हालचाल सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही. त्यामुळेच ही घटना घडली, अशी माहिती घाटीच्या सूत्रांनी दिली. स्टोअर रूमच्या शेजारच्या भागात हा मलबा पडल्याने दुर्घटना टळली. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'या घटनेची माहिती बांधकाम विभागाला देण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून हे काम प्राधान्यक्रमाने दुरुस्ती करण्याचे आश्वासन मिळाले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदत संपत आली; कामे मात्र नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्थायी समितीमधील दोन वर्षांची मुदत संपत आली, तरी कामे नाहीत. सभापती आदेश देतात, पण प्रशासन त्या आदेशांचे पालन करीत नाही, असे म्हणत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभापतींसह प्रशासनावर शनिवारी तोफ डागली.

स्थायी समितीच्या बैठकीत भाजप राजगौरव वानखेडे यांनी अतिक्रमणांचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, 'दिल्ली गेट परिसरात रस्त्याच्या बाजूला जुने फर्निचर विकणारे व्यावसायिक दुकान थाटून बसले आहेत. त्यांच्यामुळे वाहतुकीस अडचण होते. ही दुकाने हटवा अशी मागणी स्थायी समिती बैठकीत वारंवार केली, पण त्यावर काहीच कारवाई होत नाही. डॉ. सलीम अली सरोवराच्या परिसरात भर टाकून एका व्यक्तीने मोठे अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण पाडण्याबद्दलही अनेकवेळा चर्चा झाली. सभापतींनी प्रशासनाला अतिक्रमण पाडण्याबद्दल आदेशही दिले, पण त्याचेही पालन अद्याप झाले नाही. स्थायी समितीमधील आमचे फक्त वीस दिवस शिल्लक आहेत. आदेशानुसार प्रशासन अतिक्रमणांवर कारवाई करणार आहे की नाही याचा खुलासा झाला पाहिजे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीपर्यंत कारवाई झाली नाही, तर पुढील बैठकीत फक्त अतिक्रमणांचाच विषय लावून धरला जाईल. जे अधिकारी सभापतींचे ऐकत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडले जाईल,' असा इशारा त्यांनी दिला.

\Bकायद्याच्या चौकटीत कारवाई

\Bएमआयएमचे सय्यद मतीन आणि अजीम यांनी शहागंज येथील हातगाड्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा मुद्दा मांडला. महापालिकेच्या पथकाने तेथील विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे, असा आरोप त्यांनी केला. यावर खुलासा करताना प्रशासकीय अधिकारी सी. एम. अभंग म्हणाले, 'वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या मुख्य रस्त्यांवरील हातगाड्यांवर कारवाई केली जात आहे. विक्रेत्यांचे नुकसान करण्याचा प्रशासनाचा हेतू नाही.' सभापती गजानन बारवाल म्हणाले, 'हातगाड्यांवर कारवाई करा, पण कायद्याच्या चौकटीचे पालन करा,' असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत समाजाचा आज महामोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता, अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी लिंगायत धर्म महामोर्चाचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शनिवारी शहरातून वाहन रॅली काढण्यात आली. सकाळी महात्माबसवेश्वर चौक (आकाशवाणी) येथून ही रॅली निघाली. क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, शहागंज, चेलिपुरा मार्गे टीव्ही सेंटर, साखरे मंगल कार्यालय, सेव्हन हिल्स् मार्गे पुन्हा महात्मा बसवेश्वर चौकात विसर्जित करण्यात आली. रॅलीमध्ये लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजाच्या विविध आठ प्रमुख मागण्यांबाबत रविवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. रविवारी सकाळी दहा वाजता क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य दिनानिमित्त आयएमएचे वर्षभर उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक आरोग्य दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए)औरंगाबाद शाखेतर्फे वर्षभर आरोग्यविषयक उपक्रम राबविले जाणार आहेत. तरुणांमधील वाढत्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी विविध महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिरे तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयएमए अध्यक्ष डॉ. कुलदिपसिंग राऊळ यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

उपाध्यक्ष डॉ. उज्ज्वला दहिफळे, सहसचिव डॉ. हरमितसिंग बिंद्रा, डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. ऋषिकेश खाडिलकर यांची यावेळी उपस्थिती होती. डॉ. राऊळ म्हणाले, की जागतिक आरोग्य संघटनेचे यंदाचे घोषवाक्य 'सार्वजनिक आरोग्य सेवेची उपलब्धता, प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी' हे आहे. त्यांच्या भूमिकेला आयएमएने पाठिंबा दर्शविला असून जागतिक आरोग्य संघटेनेचे काम तळागाळापर्यंत व समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोचविण्यासाठी काळजी घेण्यात येईल. औरंगाबाद शाखेचे १४०० हून अधिक सदस्य आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आम्ही काही उपक्रम राबवित आहोत. त्यात शहरातील शाळा, पोलिस ठाण्यांमद्ये प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात येईल. शहरातील सर्व अस्थिरोग रुग्णालयात एक मे रोजी रोजी अस्थिरुग्णांची मोफत तपासणी केली जाईल. शहरात आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images