Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘समांतर’चे स्वागत कशासाठी ?

$
0
0

समांतर जलवाहिनी प्रकल्प राबविण्याच्या पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. समांतर जलवाहिनीच्या कंपनीचे 'लाल गालिचा' अंथरूण स्वागत केले जात आहे. कंपनीसोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकही घेतली जाणार आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यापासून महापालिकेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांना भेटून लॉबिंग सुरू केली आहे. मात्र, यामुळे दुसरीकडे विरोधी पक्ष व सत्तेतील भागीदार पक्षांमध्ये चलबिचल आहे. समांतर जलवाहिनीबद्दल काही पक्षांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर काही पक्षांची भूमिका पाणीपट्टीत वाढ होऊ नये, अशी आहे. काही पक्षांच्या नेत्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षाने सावध प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच समांतर जलवाहिनीबद्दल प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या या प्रतिक्रिया.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलावंताबाई पडोळ यांचे निधन

$
0
0

कलावंताबाई पडोळ यांचे निधन

औरंगाबाद: शाहनूरवाडी दर्गा परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवासी कलावंताबाई पुंजाजी पडोळ (वय ८४) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर येथील पाठ्यपुस्तक मंडळाचे भांडार अधीक्षक नारायण पडोळ यांच्या त्या आई होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी (१२ एप्रिल २०१८)

$
0
0

-महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्ञान उत्सव.

स्थळ : एमआयटी महाविद्यालय, सातारा परिसर

वेळ : दिवसभर

-सामाजिक सप्ताह व वासंतिक उत्सव.

स्थळ : महिला मंडळ सभागृह, शिशू विकास मंदिर, श्रेयनगर

वेळ : दुपारी ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्यापेक्षा जास्त जलकुंभांचे पाणी दूषित, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील तेरा जलकुंभांचे पाणी महापालिकेने शासकीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त जलकुंभांचे पाणी दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने महापालिकेला पाठवल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेने मात्र हा अहवाल उघड केला नाही. यावर लपवाछपवी कशासाठी केली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

शहराच्या पदमपुरा भागात दहा दिवसांपूर्वी गॅस्ट्रो आणि डायरियाचे रुग्ण आढळले. या भागातील सुमारे ४०० घरे गॅस्ट्रोच्या आजारासाठी धोकादायक म्हणून मानली गेली. पदमपुराच्या पाठोपाठ मुकुंदवाडी- अंबिकानगरात देखील गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेसमोरची चिंता वाढली. चिकलठाणा भागातूनही दूषित पाण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. नळांना पिवळे पाणी येते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख जलकुंभातील पाण्याची तपासणी करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले होते. यासाठी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल व दक्षता कक्षाचे प्रमुख एम.बी. काजी यांना सहाय्यक म्हणून नेमण्यात आले. चहेल व काजी यांच्या टीमने १३ जलकुंभातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यात सिडको एन ५, सिडको एन ७, मरीमाता जलकुंभ, शहागंज, चिकलठाणा, विशालनगर, सुधाकरनगर, वाल्मी, नक्षत्रवाडी आणि फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील जलकुंभांचा समावेश होता.

ताब्यात घेतलेले पाण्याचे नमुने तपासणीसाठी शासनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये शुक्रवारी (६ एप्रिल) पाठविण्यात आले. तपासणीचा अहवाल महापालिकेला बुधवारी (११ एप्रिल) प्राप्त झाला, परंतु हा अहवाल दडवून ठेवण्यात आला आहे. तो उघड होऊ नये असा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निम्म्यापेक्षा जास्त नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा दूषित असण्याची दाट शक्यता आहे. नेमक्या कोणत्या जलकुंभांचा अहवाल निगेटिव्ह आला हे जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी सध्या मिटिंगमध्ये आहे. मिटिंग झाल्यावर तुमच्याशी बोलतो. पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार फारोळा जलशुद्धीकरण केंद्र आणि वाल्मी परिसरातील जलकुंभांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दूषित पाण्याचा प्रादुर्भाव या ठिकाणी नाही. त्यामुळे सिडको-हडको व जुन्या शहरातील जलकुंभांचा प्रश्न शिल्लक राहतो. याच भागातील जलकुंभांकडे संशयाची सुई वळत आहे, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर प्रतिक्रिया

$
0
0

काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांना कामे द्यायची आणि आपले हित साधून घ्यायचे, असा प्रकार सुरू आहे. नागरिकांचा विरोध वाढल्यामुळेच त्यावेळी करार रद्द करण्यात आला. आता पुन्हा नव्याने त्याच कंपनीला काम देण्याचे प्रयत्न सुरू असणे म्हणजे हा भ्रष्टाचार आहे. यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सरळसरळ उघड होते. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेली पालिकेने जुनी व्यवस्थाच मोडित काढली. त्या व्यवस्थेला दुरुस्त करण्यापेक्षा एखाद्या कंपनीसाठी पालिका काम करते आहे.

वसुधा कल्याणकर, भारतीय महिला फेडरेशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचा पगार रखडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शालर्थ प्रणाली ठप्प असल्याने २० टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. २० टक्के अनुदानित शाळांच्या शिक्षकांना तब्बल ११ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. आधीच तुटपुंजा पगार आणि त्यात पगारच रखडल्याने शिक्षकांसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

शिक्षकांचे वेतन 'शालार्थ'थी जोडले गेले आहे. यामध्ये फरफट झाली ती, २० टक्के अनुदान असलेल्या शाळांमधील शिक्षकांचे. त्यांनाही याच प्रणालीशी जोडले, परंतु त्यांना त्यांचे आय.डी.च मिळाले नाही. त्यासाठी वेतन देयके धुळखात पडून आहेत, परंतु ही प्रक्रिया ठप्प आहे. प्रणाली ठप्प असल्याने शिक्षकांना वेतन मिळणे अवघड झाले आहे. वारंवार शिक्षक खेटे मारूनही प्रणाली केव्हा कार्यरत होईल, पगार कधी होईल अशा प्रश्नांची उत्तरे शिक्षकांना मिळत नाहीत. २० टक्के अनुदानित असलेल्या शाळांमधील शिक्षकांचे हे पगार अकरा महिन्यांपासून रखडले आहेत. पगार ऑफलाइन करण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

उपसंचालकांना साकडे

तब्बल ११ महिन्यांपासून प्रक्रियाच न झाल्याने शिक्षकांमध्ये संताप आहे. पगार रखडल्याने शिक्षकांनी आता उपसंचालकांना साकडे घातले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाइन करण्यात यावे अशी मागणी केली आहे. प्रणाली सुरू होईपर्यंत अशा प्रकारची तरतूद करण्यात यावी यासाठी उपसंचालकांची भेट घेण्यात आली. यावेळी सुरेशा शिंदे, वैजनाथ चाटे, रविंद्र तम्मेवार, संभाजी काळे, हरी मोहिते, आदिनाथ अडसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्या २० टक्के अनुदानित शाळांतील शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये आली नाहीत अथवा किमान एक वेतन या प्रणालीमार्फत होऊ शकले नाही. अशा शिक्षकांना बंद असलेल्या वेबसाइटचा त्रास सोसावा लागत आहे. ही प्रणाली त्वरित सुरू करावी अन्यथा नियमांत बदल करून ऑफलाइन वेतन देयके अदा करावीत.

रविंद्र तम्मेवार,

राज्य प्रसिद्धी प्रमुख

महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरी सौर उर्जा यंत्र तरीही बिल दोन लाखांचे

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

वीज बील कमी करण्यासाठी घरात सौर उर्जेचे यंत्र बसविणाऱ्या ग्राहकांना महावितरण कार्यालयाने चक्क दोन लाख ३६ हजार रुपये वीज बील भरण्याचे फर्मान काढले. याबाबत संबंधित ग्राहकाने नेट मिटरिंगची रिडिंग व्यवस्थित करण्यात येत नसल्याची तक्रार दिल्यानंतरही महावितरण कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

बीड बायपास रोडवरील शांतीबन हरीराम नगर येथे राहणारे प्रवीण जगदीश गिरी यांनी आपल्या घरी सौर उर्जा यंत्र बसविले होते. त्यामुळे वीज बील कमी येईल, असे त्यांना वाटले. डिसेंबर २०१७ मध्ये सौर उर्जा यंत्र लावल्यानंतर नेट मिटरिंगची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सौर उर्जेतून निर्माण होणारी वीज वापरल्यानंतर उर्वरित अतिरिक्त वीज महावितरणकडे जात होती. घरात होत असलेला वीज वापर सौर उर्जा यंत्राच्या वीज निर्मितीपेक्षा कमी आहे. सुरुवातीला सरासरी वीज बील मिळत होते. हे वीज बील मिळाल्यानंतर त्यांनी वीज बिलाची रिडिंग योग्य करण्याबाबत वारंवार महावितरण कार्यालयाकडे तक्रार केली.

विजेची होणारी निर्मिती आणि वापर करण्यात येणारी वीज याचा वापर करून महावितरण कार्यालयाला मिळणारी उर्जा याबाबत कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. स्थानिक अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याने प्रवीण गिरी यांनी सदर प्रकरणाची तक्रार महावितरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्याकडे ट्विटरद्वारे केली. मात्र, त्यानंतर मिळालेल्या बिलाने त्यांना धक्काच बसला. कारण स्थनिक अधिकाऱ्यांनी सौर उर्जेची पाहणी करून दोन लाख ३६ हजार रुपयांचे वीज बिल त्यांच्या हाती थोपविले.

सौर उर्जा यंत्र वापरणाऱ्या नेट मीटर ग्राहकांचे वीज बील ३१ मार्चपूर्वी क्लिअर करणे आवश्यक आहे. यासाठी अशा वीज ग्राहकांच्या तक्रारी घेतल्या होत्या. या तक्रारीमध्ये अनेकांच्या तक्रारी सोडविण्यात आलेल्या आहेत. बहुतांश तक्रारी वीज मीटर रिडिंग व्यवस्थित न घेतल्याच्याच तक्रारी जास्त आहेत.

हेमंत कापडीया, सदस्य, उर्जा मंच

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटक सुविधांबाबत आराखडा करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील एकमेव वेरूळ आणि अजिंठा स्थळांचा आयकॉनिक साइटमध्ये समावेश केला आहे. या ठिकाणांच्या विकास कामासाठी तसेच पर्यटकांना उत्तम प्रकारच्या सोयीसुविधा पुरविल्या जाव्या व पर्यटक संख्येत वाढ व्हावी यावर चर्चा करण्यासाठी शहरात बुधवारी पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांनी बैठक घेतली.

बैठकीत पर्यटन वाढीच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. अजिंठा व वेरुळ लेणीचा जागतिकस्तरावर प्रचार व प्रसार करणे, उत्तम दर्जांचे रस्ते, स्वच्छतागृह उभारणे, पादचारी पूल तयार करणे, बैठक व्यवस्था, सायकलिंग सोय, सांस्कृतिक तसेच लोककला आदी कार्यक्रमांचे आयोजन करणे, अपंग व्यक्तींसाठी सुविधा, विमानसेवा, दळणवळण, हेलिपॅड उभारणे या कामाचा यात समावेश करण्यात आला आहे. बैठकीत मांडलेल्या सूचनांचा विचार करून आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले. बैठकीसाठी पर्यटन सहसचिव सुमन बिल्ला, भारतीय पुरातन विभागाचे महासंचालक उशा शर्मा, पर्यटन सांस्कृतिक प्रधान सचिव विजय गौतम, व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांच्यासह ग्रामीण पोलिस उपअधीक्षक उज्वला बनकर, विमान प्राधिकरणचे डी. जी. साळवे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पॅथॉलॉजी’ची मालिका अखेर सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या 'आरोग्यम धनसंपदा' कार्यक्रमाअंतर्गत पॅथॉलॉजीविषयी २२ मार्चपासून सुरू करण्यात आलेली मालिका अचानक खंडित करण्यात आली होती. एका गटाने आक्षेप घेऊन आकाशवाणीवर दबाव टाकल्यानंतर ही मालिका कुठल्याही सूचनेशिवाय बंद केली होती. याकडे 'मटा'ने लक्ष वेधले असता मालिकेत किरकोळ बदल करून ती बुधवारपासून (११ एप्रिल) पुन्हा एकदा प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.

'पॅथॉलॉजी'विषयी जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून परभणीचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. विवेक कुलकर्णी यांची मालिका २२ मार्चपासून आठवडाभरासाठी प्रसारित केली जाणार होती. मालिकेचा पहिला भाग २२ मार्चला प्रसारित झाल्यानंतर काहींनी केंद्रावर जाऊन मालिकेविषयी आक्षेप नोंदवला. तसेच संबंधित मालिका प्रसारित करू नये, यासाठी आकाशवाणी केंद्रावर दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आकाशवाणीने मालिका अचानक खंडित केली. या मालिकेच्या पहिल्या भागात पॅथॉलॉजी हा विषय नेमका काय आहे, कोणकोणत्या तपासण्यांचा यात समावेश होतो, कोणाला तपासण्या करण्याचा अधिकार आहे आणि कोणाकडून तपासण्या करून घेणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य व हिताचे आहे आदींचा उहापोह डॉ. कुलकर्णी यांनी केला होता. यानिमित्त पॅथॉलॉजीतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांनाच रिपोर्टवर सह्या करण्याचा अधिकार आहे, याबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल व त्यानंतर मानव आयोगाने सरकारला दिलेले निर्देशाबाबतही माहिती देण्यात आली होती. त्याला आक्षेप घेत मालिका बंद पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. हा प्रकार 'मटा'ने चव्हाट्यावर आणला होता आणि २४ मार्च रोजी वृत्तातून लक्ष वेधले घेतले होते. त्यानंतर उशिरा का होईना आकाशवाणीने ही मालिका बुधवारपासून सुरू केली आहे.

काही घटकांनी आकाशवाणीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्याला बळी न पडता आकाशवाणीने पुन्हा एकदा मालिका सुरू केली आहे. या निर्णयाचे संघटनेच्या वतीने मनपूर्वक स्वागत.

- डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, एमएपीपीएम

मालिका पुन्हा एकदा सुरू केल्याबद्दल नक्कीच आनंदी व समाधानी आहे. जनतेच्या सर्वांगीण आरोग्यासाठी पॅथॉलॉजी संदर्भातील लढा यापुढेही सनदशीर मार्गाने सुरूच राहील.

- डॉ. विवेक कुलकर्णी, पॅथॉलॉजिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या बॅनरची जिल्हा परिषदेत चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेत काँग्रेस सदस्यांनी शुभेच्छाचे बॅनर लावले आहे. त्यावर 'भावी आमदार' असा उल्लेख केला आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून कृष्णा डोणगावकर निवडणूक इच्छूक आहेत. काँग्रेसच्या बॅनरवर झळकलेल्या शुभेच्छांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. गंगापूरमध्ये काँग्रेस लढणार की नाही ? इथपासून पुढच्या गणितांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कृष्णा पाटील डोणगावकर यांचा बुधवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्यांचे फोटो असलेले शुभेच्छा बॅनर अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या दालनाशेजारी लावण्यात आले. त्यावर 'भावी आमदार' असा उल्लेख केला असून शुभेच्छुक म्हणून जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्यांचे फोटो लावले आहेत. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचाही उल्लेख केला आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर काँग्रेसने दिलेली शुभेच्छा राजकीयदृष्टया महत्वाची मानली जात आहे. कृष्णा डोणगावकर यांनी यापूर्वी दोनवेळा गंगापूर विधानसभेची निवडणूक लढविली आहे. आता ते शिवसेनेत आहेत. गंगापूरमधून काँग्रेसकडून लढण्यास अनेक इच्छुक आहेत. मात्र झेडपीतील काँग्रेस सदस्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्याने काँग्रेस गंगापुरातून लढणार की याविषयीची चर्चा जिल्हा परिषदेत दिवसभर रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळ लेणीची पाहणी

$
0
0

वेरूळ लेणीची पाहणी

खुलताबाद: केंद्रीय पर्यटन सचिव वर्मा यांनी बुधवारी वेरूळ येथील लेणी क्रमांक १६ तसेच व्हिजिटर सेंटरला भेट देऊन हेलिपॅडची पाहणी केली. त्यांनी यावेळी पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी केंद्रीय पर्यटन विभागाच्या सहसचिव सुमन बिल्ला, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगाराचे गोदाम साजापूरमध्ये खाक

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसी जवळील भंगारच्या गोदामाला बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

साजापूर शिवारातील गट नंबर ५१ मध्ये सय्यद सलमान यांच्या भंगारच्या गोदामाला आग लागली. यात ऑइल, रसायनांच्या रिकाम्या प्लास्टिक कॅन, ड्रम, थर्माकोल व भंगार जळून खाक झाले. आग लागली तेव्हा गोदामात कामगार काम करत होते. त्यांनी ही माहिती मालकाला दिली. सय्यद यांनी माहिती दिल्यानंतर वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तीन तासच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. गोदामात प्लास्टिकचे प्रमाण जास्त असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझवण्यासाठी परिसरातील दहा ते बारा खासगी पाण्याच्या टँकरची मदत घेण्यात आली. यावेळी वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी के. ए. डोंगरे, ए. ए. चौधरी, पी. आर. पाटील, बी. एन. राठोडे यानी आग विझवण्याचे काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी (१३ एप्रिल २०१८)

$
0
0

-महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्ञान उत्सव.

स्थळ : एमआयटी महाविद्यालय, सातारा परिसर

वेळ : दिवसभर

-अठरा तास अभ्यास अभियान.

स्थळ : स्टडी सेंटर अभ्यासिका, नूतन कॉलनी

वेळ : दुपारी १२

-महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व्याख्यान, शाहिरी जलसा.

स्थळ : शासकीय वसतिगृह, किलेअर्क

वेळ : सायंकाळी ६ पासून

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे गीत भीमायन कार्यक्रम.

स्थळ : विद्यापीठाचे नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६

-पीईएस महाविद्यालयातर्फे अतुलकुमारसिंह अंजान यांचे व्याख्यान.

स्थळ : पीईएस महाविद्यालय, नागसेनवन परिसर

वेळ : सायंकाळी ६.३०

….....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फकिराबादवाडीवर शोककळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील फकिराबादवाडी येथील जवान किरण पोपट थोरात हा जम्मू काश्मीरमधील पुच्छ जिल्ह्यातील कृष्णाघाटीमध्ये हल्ल्यात शहीद झाल्याचे वृत्त कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. बुधवारपासून गावात एकही चुल पेटलेली नाही. आपल्या लाडक्या भूमिपुत्राच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गावातील थोरात यांच्या शेतवस्तीवर गर्दी केली.

वैजापूरपासून दहा किलोमीटर अंतरावरील फकिराबादवाडीची लोकसंख्या जवळपास ७०० आहे. या गावात शेतवस्तीवर किरण थोरात हे आई, वडील, भाऊ, पत्नी, पाच महिन्यांचा मुलगा श्लोक व मोठी मुलगी श्रेया यांच्यासह राहतात. दहावीपर्यंत लाडगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये शिक्षण झाल्यानंतर विनायकराव पाटील महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. २ मार्च २०१३ रोजी येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती हिच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी जम्मू-काश्मीर येथील वैष्णवदेवी, अरुणाचल प्रदेश, राजस्थानमधील कोटा येथे सैन्यदलात नोकरी केली. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे युनिट जम्मू-काश्मीरमधील पुच्छ जिल्ह्यातील कृष्णा घाटीमध्ये दाखल झाले होते. मात्र, तेथे झालेल्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यांना वीरमरण आल्याची धक्कादायक बातमी कळताच संपूर्ण कुटुंब शोकमग्न झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा सैनिक अधिकारी आर. जाधव, तहसीलदार सुमन मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, वीरगावचे सहय्यक पोलिस निरीक्षक अतुल येरमे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरनारे, पंकज ठोंबरे, बाबासाहेब जगताप, रमेश सावंत आदींनी भेट देऊन थोरात कुटुंबीयांचे सांत्वन केले.

\Bजानेवारीत आले होते सुटीवर \B

ते जानेवारी महिन्यात ते पंधरा दिवसांच्या सुट्टीवर घरी आले होते. त्यांचे वडील पोपट थोरात हे माजी सरपंच असून त्यांना निर्मलग्राम योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. किरण यांचा मोठा भाऊ अमोल हा शेती करतो. किरण हा सुद्धा सुट्टीवर घरी आल्यानंतर शेतीकामात मदत करत असत, असे त्यांच्या कुटुंबियांनी साश्रुनयनांनी सांगितले.

\B

एक तास अंत्यदर्शन

\B

शहीर किरण थोरात यांचे पार्थिव शुक्रवारी फकिराबादवाडी येथे आणण्यात येणार आहे. येथे त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडेआठ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव एक तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर-12एप्रिल

$
0
0

न्यू शांतीनिकेतन

वाकलेला खांब धोकादायक

न्यू शांतीनिकेतन कॉलनी येथे नाथानी हॉस्पिटलजवळ एक खांब वाकलेल्या स्थितीत रस्त्यावर पडलेला आहे. हा खांब हेडगेवार चौकाच्या वळणावर असल्यामुळे वाहनधारकांना या खांबाचा अंदाज येत नाही. रस्त्याचा निम्मा भाग या खांबाने व्यापलेला आहे. या वाकलेल्या खांबामुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे. महापालिकेने हा खांब त्वरित हाटवावा, अशी मागमी नागरिकांकडून होत आहे.

- एक वाचक

सिडको

शाळेभोवती कचरा

सिडको, एन आठ, बळीराम पाटील हायस्कूलच्या कंपाउंडला लागून असा कचरा पसरलेला आहे. त्यावर मोकाट कुत्रे दिवसभर चरत असतात. स्वच्छतेचा वसा घेऊन शाळेने मनात आणले, तर या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून झाडांसाठी सेंद्रीय खताची निर्मिती होऊ शकते. संबंधितांनी नागरिकांचे उद्बोधन करून कचरा असा शाळेभोवती न टाकता घंटागाडीतच वर्गीकरण करून टाकावा, अशी मागणी होत आहे.

- रवींद्र तायडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अस्मितादर्शच्या पन्नासाव्या वर्षाचा अंक प्रकाशित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अंत:करणातला शब्द अस्मितादर्शमधून उमटतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. मुं. शिंदे यांनी केले. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या श्रावस्ती निवासस्थानी 'अस्मितादर्श'च्या पन्नासाव्या वर्षाचा अंक प्रकाशित करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी बोलत होते. अध्यक्षस्थानी यावेळी उद्योगपती व विचारवंत मधुकरअण्णा मुळे उपस्थित होते.

फ. मुं. शिंदे म्हणाले, डॉ. गंगाधर पानतावणे सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वव्यापी तत्वज्ञान हे 'अस्मितादर्श' या नियतकालिकाचा पाया मानला होता. त्यांनी समाजसमूहातील लेखकांना मायेने सांभाळले होते. सृजनाचा सांभाळ करताना त्यांनी खूप काळजी घेतली. त्यांनी मूल्य, जाणिवांशी कधीच तडजोड केली नाही. यामुळे त्यांचे मोठेपण सिद्ध होते.

यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, प्रा. सुशीला मूल-जाधव, नंदिता पानतावणे, निवेदिता पानतावणे (पानतावणे सरांच्या मुली), एम. डी. बनकर, करूण भगत, प्रभाकर पानतावणे, अजय आठवले, डॉ. लेखचंद मेश्राम, डॉ. ऋषिकेश कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहिद जवान - विमानतळ फोटो

$
0
0

शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले. यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे अशा घोषणा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यात करा किंवा मरा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरातील कचराप्रश्नी करा किंवा मराची स्थिती निर्माण झाली आहे. लवकर तोडगा निघाला नाही तर प्लेग, रोगराई पसरण्याची भीती आहे. आता गप्प बसून चालणार नाही. कामे करा अन्यथा अडचणीत याल,' असा इशारा देत विभागीय आयुक्त तथा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गुरुवारी महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.

डॉ. भापकर यांनी अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वर्ग घेतला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता सखाराम पानझडे तसेच शहरातील सर्व वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता जवान यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. भापकर म्हणाले, 'कचराप्रश्नी शासनाने आर्थिक भार उचलला, पंचसूत्री देत मदतीला ओएसडी दिले. आतापर्यंत सक्षमीकरण होण्याची गरज होती, मात्र असे झाले नाही. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. कोणत्याही भ्रमात राहू नका. असे असेल तर अडचणीत याल. शासनाने नेमलेल्या सनियंत्रण समितीचे काम केवळ देखरेख करण्याचे आहे. कामे मात्र तुम्हालाच करायची आहेत. सनियंत्रण समितीच सर्वकाही करणार हे डोक्यातून काढून टाका, अशीच स्थिती असेल तर संबंतधितांवर कारवाई करण्याची तसेच वेळ पडली तर अधिकारी बदलण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले आहेत. या कार्यशाळेत एकूण ११५ स्वच्छता जवानांपैकी किती जवान हजर आहेत? किती वार्ड अधिकारी तसेच किती स्वच्छता निरीक्षक हजर आहेत?,' असे विचारत त्यांची परेड आयुक्तांनी घेतली व प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा संकलित करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, 'शहरात ही परिस्थिती महापालिकेमुळेच निर्माण झाली असून, ही जबाबदारीही पालिकेनेच स्वीकारण्याची गरज आहे. मात्र आज पालिकेतील अनेक कर्णधार अचानक आजारी पडले आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे कचराप्रश्न गंभीर होणार आहे. पावसाळ्यापर्यंत हीच परिस्थिती राहिली तर शहरावर मोठे संकट येईल. मी दररोज कचराप्रश्नाचा आढावा घेतो, मात्र एकही अधिकारी मला स्व:तहून परिस्थितीबाबत सांगत नाही. वर्ग १ चे अधिकारी कुठेही या नियोजनात दिसत नाहीत. आठवडाभरापूर्वी प्रत्येक वार्डांमध्ये कचरा निर्मूलनाविषयी पोस्टर लावण्याचे सांगितले होते, मात्र हे काम कुणीही केले नाही. जेव्हा संकट येतात तेव्हाच चांगले काम होते. आपण शहरात विविध ठिकाणी ४३३ कंपोस्ट पीट तयार करणार असून यातील ७७ कंपोस्ट पीट तयार झाले आहेत. १३३ चे काम सुरू आहे. हे काम तात्पुरते आहे हे डोक्यातून काढून टाका. आपल्याला २५ एप्रिलपर्यंत कंपोस्ट पीट तयार करावेच लागतील. अन्यथा पावसाळ्यात मोठ्या अडचणी निर्माण होतील. यासाठी जबाबदारी निश्चित करा. सुक्या कचऱ्यामुळे शहराचे सौंदर्य नष्ट होत आहे. एकीकडे पाच हजार कचरावेचक असल्याचे सांगतात. सध्या केवळ १४८ कचरावेचक आहेत, बाकीचे कुठे गेले? सध्या साडेसहाशे मेट्रीक टन मिश्र कचरा रस्त्यावर आहे. शहरात एक, दोन, तीन, सात आणि नऊ क्रमांकांचे झोन गंभीर असून, याकडे विषेश लक्ष द्यावे लागेल,' असे जिल्हाधिकारी म्हणाले.

\Bकचऱ्याचे वर्गीकरण करा; अन्यथा कारवाई

\B'शहरातील प्रत्येक वार्डातील प्रत्येक घरातून ओला आणि सुका कचरा करून घ्या. वेगळा कचरा न करणाऱ्या लोकांवरही दंड लावा. हजारो लोकांवर दंड लावला तरी चालेल. शिवाय जे कर्मचारी हे करणार नाहीत त्यांच्यावर थेट कारवाई करा. ज्या झोनमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा आहे त्यांनी त्याच झोनमध्ये प्रक्रिया करावी,' असे आदेश डॉ. भापकर यांनी दिले.

\Bप्रश्न चिघळला; अधिकारी सुस्त

\B- कार्यशाळेची कर्मचाऱ्यांना माहिती नाही

- कचरा व्यवस्थापनासाठी ७ जागा निश्चित

- समन्वयासाठी प्रत्येक झोनसाठी विभागप्रमुख

- कचऱ्यासंबंधी नागरिकांकडून माहिती मागवणार

- कचऱ्याचे फोटो काढून माहिती मिळवणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेडिओथेरपी’साठी विद्यापीठाकडून पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट'चा दर्जा मिळालेल्या शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 'रेडिओथेरपी' या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पथकाने बुधवारी पाहणी केली. या निमित्ताने मुंबईतील कामा हॉस्पिटलमधील रेडिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप निकम यांनी रुग्णालयाची व रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधांची सविस्तर पाहणी केली. या संदर्भात डॉ. निकम यांनी समाधान व्यक्त केल्याचे रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधार योजनेचे प्रस्ताव सिल्लोड तालुक्यात मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तहसील कार्यालयात बुधवारी संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पन्नास लाभार्थींचे प्रस्ताव मंजूर, तर ४६ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.

या बैठकीला संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, तहसीलदार संतोष गोरड, समितीचे सदस्य डॉ. सतीश खुल्लोडकर, किशोर अग्रवाल, संतोष कार्ले, उषा सनांसे, मेघराज चौंडिये यांची उपस्थिती होती. श्रावणबाळ निराधार योजनेचे ३९ प्रस्ताव मंजूर, १३ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. तालुक्यातील आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांचे प्रस्ताव दाखल झाल्यामुळे आठ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे व १२ अपंगाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेचे १४ व श्रावणबाळ योजनेच्या १४ प्रस्तावातील किरकोळ त्रुटी दूर करण्यासंबंधी संबधितांना पत्रव्यवहार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

\Bअहवाल सादर \B

ग्रामसभेत ठरावाचे वाचन करून त्यांचा अहवाल संबंधित तलाठ्यांनी तहसील कार्यालयात मार्च महिन्याच्या शेवटी दाखल केला आहे. तलाठी व ग्रामसेवकांनी निराधार योजनेतील पात्र लाभार्थीची यादी ग्रामसभेत वाचून अहवाल सादर केला नव्हता. त्यामुळे पात्र लाभार्थीना मानधन मिळत नव्हते. या प्रश्नी महाराष्ट्र टाइम्सने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन तलाठ्यांनी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे उर्वरित पात्र लाभार्थींना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तलाठ्यांच्या बेफिकिरीमुळे सहा महिन्यापासून लाभार्थी मानधनापासून वंचित आहेत. सहा महिन्यांचे मानधन देण्यासाठी वाढीव निधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे

- राजेंद्र ठोंबरे, अध्यक्ष, निराधार योजना समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images