Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावितरण कर्मचाऱ्यास शिवराईत धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील शिवराई येथे घरात बेकायदा आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या दौलत पुंडलिक साबळे याने महावितरणच्या पथकातील दोन कर्मचाऱ्यांना आकडे का काढतो म्हणून धक्काबुक्की केली. त्यांच्याकडील वायर हिसकावून घेण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता योगेश चेंडके, कर्मचारी नवनाथ चव्हाण, विजय वाकळे, सूरज शिंदे, दत्तात्रय जाधव, नागनाथ रसाळ हे गणवेशात शिवराई येथे वीजचोरी रोखण्यासाठी गेले होते. गावाच्या अलिकडे वस्तीवर लघुदाब वीज वाहिनीवरून घरावर आकडे टाकलेले दिसले. सूरज शिंदे यांनी वीजपुरवठा बंद करून वायर काढताना दौलत पुंडलिक साबळे याने धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरुवात केली, दुसरे कर्मचारी विजय वाकळे हे शिंदे यांना सोडवण्यासाठी गेले असता त्यानांही धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषा वापरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलेजमधील ‘बाँड’बाबत चर्चा

$
0
0

नर्सिंग कॉलेजमधील 'बाँड'बाबत चर्चा

विद्यार्थ्यांचा यावर आक्षेप, कोणत्या स्तरावर हा प्रकार गुलदस्त्यात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयटी कॉलेजकडून घेण्यात येणाऱ्या बंधपत्रावर (बाँड) विद्यार्थ्यांचा आक्षेप होता. नर्सिंग कॉलेजचा सचिन वाघ याच्या निधनानंतर हे प्रकरण प्रकर्षाने समोर आले आहे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांकडून बाँड भरून घेण्याची विद्यापीठाकडून कोणतीही सूचना नसताना कॉलेजस्तरावरच हे प्रकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे लेखी कोणत्या अधिकारात घेतले जाते याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

सचिन वाघ याने मंगळवारी कॉलेजच्या छतावरून उडी मारली. गंभीर जखमी सचिनचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यानंतर कॉलेजचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांकडून बाँडवर जे लिहून घेते यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. बाँडवर एकूण १४ नियम आहेत. शंभर रुपयांच्या बाँडवर आम्ही हे नियम पाळू असे लिहून घेतले जाते. यामध्ये शंभर टक्के उपस्थिती, मध्येच कॉलेज सोडले तर, एकूण चार वर्षाचे शुल्क भरणे अशा प्रकारचे नियम आहेत. विद्यार्थ्यांनी या प्रकारावर ही घोषणाबाजी केली होती. अशा प्रकारे कॉलेजला अधिकार आहे का, हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. आरोग्य विद्यापीठाने मात्र, अशा प्रकारचा कोणता नियम नाही असे सांगितले आहे.

विद्यापीठाकडून विचारणा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत विचारपूस केल्याचे कळते. विद्यार्थ्याच्या आत्महत्येबाबत नेमके काय घडले, विद्यार्थ्यांच्या तक्रारी, प्रशासनाची बाजू याबाबत विद्यापीठाकडून आढावा घेतला जाईल, असेही प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

अशा प्रकारचा 'बाँड' लिहून घेण्याचा विद्यापीठाचा कोणताही नियम नाही. आम्ही तसे काही कॉलेजांना सांगत नाही. येथे काय झाले, याची माहिती घ्यावी लागेल.

डॉ. दिलीप म्हैसेकर,

कुलगुरू, आरोग्य विज्ञान विद्यापीठ

शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये अशा प्रकारचा बाँड लिहून घेतला जात नाही. कॉलेजस्तरावर त्यांनी असा काही प्रकार केला असेल. शिस्तीसाठी असा प्रकार केलेला असू शकतो, परंतु आमच्याकडे असे आम्ही लिहून घेत नाहीत.

अजूर्न सोनटक्के,

प्राचार्य,

शासकीय नर्सिंग कॉलेज, औरंगाबाद.

आम्ही कॉलेज स्तरावर अशा प्रकारचा बाँड लिहून घेतो. त्यामध्ये शिस्तीबाबतच्या सूचना आहेत.

प्रा. मुनीष शर्मा,

महासंचालक,

एमआयटी, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता गुलाबचंद मुलचंद व्यास

$
0
0

औरंगाबाद: पानदरिबा येथील गुलाबचंद मुलचंदजी व्यास (वय ७९) यांचे गुरुवारी निधन झाले. ते कृषी अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते. शहरातील प्रतिष्ठित उद्योगपती सतीश मुलचंद व्यास यांचे बंधू आणि माजी नगरसेवक राजेश (पप्पू) व्यास यांचे ते वडील होत. त्यांच्यावर कैलासनगर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद किरण थोरात यांना सैन्य दलाने मानवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

पुंछ भागातील कृष्णा टेकडी येथे पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वैजापूर तालुक्यातील फकीराबाद जवान किरण थोरात यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी विमानतळावर आणण्यात आले. येथे सैन्य दलातर्फे किरण थोरात यांना मानवंदना देण्यात आली.

काश्मीर येथील पुंछ येथून विशेष विमानाने किरण थोरात यांचे पार्थिव आणण्यात आले तेव्हा विमानतळावर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, पोलिस आयुक्त तथा पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह सैनिक कल्याण विभागाचे सूर्यकांत सोनटक्के, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे प्रकाश कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवरांनी शहीद किरण यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर ब्रिगेडीअर डी. के. पात्रा यांनी शहीद थोरात यांना मानवंदना दिली. यावेळी सीआयएसएफचे कमांडट अलोक कुमार यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर किरण थोरात यांचे पार्थिव छावणी येथे पाठविण्यात आले. शहीद किरण थोरात यांचे पार्थिव घेऊन आलेल्या नाईक सुभेदार संजय पाटील यांनी पाकिस्तान सैन्याने केलेल्या हल्ल्यात देशाचे रक्षण करताना कृष्णा टेकडी येथे किरण थोरात शहीद झाल्याची माहिती पत्रकारांना दिली.

कुटुंबियांना नोकरीत सामावून घेणार

देशासाठी वीर मरण पत्करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनदरबारी मांडणार असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक सावंत यांनी माजी सैनिकांना दिले.

शासकिय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे प्रकाश कुलकर्णी, प्रकाश देशपांडे आणि विष्णु बोराडे यांनी विमानतळावर दीपक सावंत यांची भेट घेतली. या भेटीत कुलकर्णी यांनी विचारणा केली की, शासकीय सेवेमध्ये असलेल्या कर्मचारी अधिकारी यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी दिली जाते. हा नियम देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांबाबत का नाही? देशाचे रक्षण करताना शहीद झालेले बहुतांश तरुण हे ग्रामीण भागातील असतात. दरवर्षी दहा ते पंधरा तरुण शहीद होत आहेत. त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याबाबत शासनाने पुढाकार घ्यावा. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात झालेली नाही.

या प्रस्तावाबाबत पालकमंत्री सावंत यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात नोकरी देता येऊ शकेल, पण कायमस्वरूपी नोकरीबाबत शासनस्तरावर निर्णय घ्यायला हवा, असे पालकमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितले की, शहिदांची यादी घेऊन मंगळवारी मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेऊ व शहीदांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याबाबत निर्णय शासनस्तरावर घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषेसाठी मनसेचे निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उर्दू माध्यमामध्ये मराठी विषय पहिल्या वर्गापासून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात मनसेच्या वतीने एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. उपायुक्त सामान्य प्रशासन वर्षा ठाकूर यांना शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संतोष पवार, संकेत शेटे, अब्दुल रशीद, अशोक पवार, सीताराम सपकाळ, लीला राजपूत, सपना ढगे, सुनीता दाभाडे, शेख जावेद यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने आणि सभागृहात मोठा स्क्रिन लावून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत बदल्या केल्या जाणार आहेत. ऑनलाइन बदल्यांमुळे 'घराच्या जवळची शाळा' याचा हट्ट शिक्षकांना सोडून द्यावा लागणार आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये ४४१ शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी काही शिक्षक घराच्या जवळचीच शाळा हवी असा हट्ट धरून त्याच शाळेत वर्षानुवर्षे काम करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांची ही सवय मोडून काढण्यासाठी ऑनलाइन बदल्यांचा मार्ग स्वीकारला जाणार आहे. या संदर्भात महापौरांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी शिक्षण विभागात जाऊन तेथील कामकाजाची पाहणी केली तेव्हा काही शिक्षक वर्षानुवर्षे एकाच शाळेत आहेत, असे लक्षात आले. त्यामुळे अशा शिक्षकांची बदली करा, असे आदेश त्यांनी दिले

जिल्हा परिषदेप्रमाणे बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन राबवली जाणार आहे. संत तुकाराम नाट्यगृहात ही प्रक्रिया सर्वांच्या समक्ष राबवली जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

पालिकेची एनओसी आवश्यक

शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेची परवानगी लागते, परंतु जिल्हा परिषदेच्या परवानगीच्या आधारे महापालिका क्षेत्रात ज्या शाळा चालवल्या जातात त्यांना नवीन शैक्षणिक वर्षापासून महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शाळांना ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेकडून घ्यावेच लागेल, असे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वंतत्र टॉवर कंपनीला ‘बीएसएनएल’ कर्मचाऱ्यांचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बीएसएनएल' कंपनीचे मोबाइल टॉवर खासगी व्यक्तीच्या घशात घालण्याचा डाव सरकारने आखला आहे, असा आरोप करत कर्मचाऱ्यांनी या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिडको येथील संचार भवनासमोर गुरुवारी कृती समितीने धरणे आंदोलन केले.

सरकारी कंपनी असलेल्या 'बीएसएनएल'ने स्वत:च्या पैशाने आणि कष्टाने उभारलेले ६५ हजार मोबाइल टॉवर खासगी व्यक्तीच्या ताब्यात घालण्याचा डाव आहे. त्यासाठी स्वतंत्र टॉवर उपकंपनी स्थापन्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे 'बीएसएनएल' कमकुवत होईल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. 'बीएसएनएल' ही जास्तीत जास्त रोजगार पुरविणारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारी कंपनी आहे. तोटा सहन करून ग्रामीण भागात सेवा देणारी एकमेव कंपनी आहे. ग्रामीण भागात आर्थिक फायदा नाही म्हणून अन्य खासगी कंपन्या या भागात जातच नाही. कंपनीला वाचविण्यासाठी शेवटापर्यंत लढा देऊ, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी रंजन दाणी, विलास सवडे, शिवाजी चव्हाण, भास्कर सानप, डी. एम. गायके, एस. आर. वाणी, जॉन वर्गिस, डी. एम. पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर जोड

$
0
0

नातवाला सैन्यात पाठवणार

मुलगा शहीद झाल्यानंतर शोक अनावर झाल्यानंतरही पोपट थोरात यांचा देशाभिमान जागृत होता. मुलाच्या वीरमरणाचे दु:ख उराशी बाळगत देशासाठी मुलासोबतच नातवाला सुद्धा सैन्यदलात पाठवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 'नातु श्लोक याला उत्तम शिक्षण देऊन मोठे करू व सैन्मदलात पाठवू' असे पोपट थोरात यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोलवाडी उड्डाणपुलावर ‘द बर्निंग कार’

$
0
0

औरंगाबाद : वाळूजहून औरंगाबादकडे येणाऱ्या एमएच २० बी एन ४९८४ या क्रमांकाच्या कारला गोलवाडी उड्डाणपुलावर गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वाहनचालक कार पुलावर थांबवून दूर झाला. आग वाढत असल्याचे पाहून, या पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली. आग विझविण्यासाठी इतर वाहनधारकांनी मदत केली, सैन्य दलातील कर्मचारीही धावून आले. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. अखेर अग्निशामक दलाला पाचारण करून आग विझण्यात आली. या घटनेमुळे गोलवाडी उड्डाणपुलावर काहीकाळ वाहतूक थांबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापक घेणार पोलिस आयुक्तांची भेट आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सचिन वाघ प्रकरणी पोलिस ठाण्यात प्राचार्य, प्राध्यापकांवर झालेला गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी प्राध्यापक शुक्रवारी (१२ एप्रिल) पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. परीक्षा सुरू असताना नियमांचे पालन होणे, शिस्तीत व योग्य त्या गांभिर्याने परीक्षा पूर्ण करणे ही संपूर्ण जबाबदारी संबंधित कॉलेजचे प्राचार्य आणि प्राध्यापकांची असते. असे कर्तव्य पार पाडताना दुर्दैवाने त्याची परिणिती सचिन सुरेश वाघ यांच्या आत्महत्येत झाली. त्याच्या आत्महत्येस प्राचार्य अथवा पर्यवेक्षक जबाबदार नाहीत. एफाआयआर दाखल करण्यासाठी या प्रकरणाशी संबंध नसलेल्या समाजातील काही घटकांचा दबाव होता. हा गुन्हा मागे घ्यावी, या मागणीसाठी सकाळी विविध कॉलेजांचे प्राध्यापक सकाळी १० वाजता पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन तपासणीसाठी विविध पथक

$
0
0

औरंगाबाद :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत भाग घेणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी आरटीओ विभागाकडून विविध पथक नेमण्यात आले आहे. शहरात सहा ठिकाणी वाहन तपासणी केली जाणार आहे. यात पोलिस ठाणे सिडको, औरंगाबाद आरटीओ कार्यालय, पोलिस ठाणे वाळूज, पोलिस ठाणे छावणी, पोलिस ठाणे सातारा आणि पोलिस ठाणे सिटीचौक या ठिकाणी वाहन तपासणी करण्यासाठी मोटार वाहन निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंती मिरवणुकीत वाहन वापरणाऱ्या संबंधितांनी १४ एप्रिल रोजी सकाळी १० ते ४ वाजेच्या दरम्यान वाहनांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरटीओ विभागाकडून देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहसंचालकपदी डॉ. देशपांडे

$
0
0

औरंगाबाद: विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर यांची गुरुवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी सोलापूर विभागाचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.

प्रशासकीय पातळीवर अचानक झालेल्या या बदल्यांमुळे उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात दिवसभर चर्चा रंगली. डॉ. धामणस्कर यांनी सव्वादोन वर्षांपूर्वी औरंगाबाद विभागाचे सहसंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. गुरुवारी दुपारी त्यांच्या बदलीचे आदेश आले. डॉ. धामणस्कर यांची सोलापुरला, तर तेथील सहसंचालक डॉ. देशपांडे यांची औरंगाबादला बदली करण्यात आली. प्रशासकीय बदली असल्याचे शासनाकडून सांगण्यात. सव्वादोन वर्षांत बदलीची प्रक्रिया झाल्याने हा विषय प्राध्यापकांमध्ये चर्चेचा ठरला. डॉ. देशपांडे औरंगाबादचे. येथील शासकीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. देशपांडे यांनी सव्वादोन वर्षांपूर्वी सोलापूरचे सहसंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. डॉ. देशंपाडे सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'एलएमएस'मध्ये विविध ऑफर्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागील ७४ वर्षांपासून सौंदर्याची परिभाषा परिधान करावयास लावणारे आणि शुद्धता, पावित्र्यता आणि विश्वासास पात्र ठरलेल्या लालचंद मंगलदास सोनीमध्ये वर्धापन दिनानिमित्त विविध ऑफर्स देण्यात येत आहेत.

मराठवाड्यामध्ये सर्व प्रथम सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा विमा मोफत देणारे दागिन्यांचे पहिले दालन ठरले आहे. दागिन्यांच्या शुद्धतेसाठीचे गव्हर्नमेंट अप्रुव्हड व्हॅल्यूअर म्हणून त्यांची ख्याती आहे. ग्राहकांची मने जिंकणे आणि त्यांना सोने खरेदीच्या संधी उपलब्ध करून देणे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा विमा आणि लकी ड्रॉ असे उपक्रम राबविले जातात. नवीन ऑफर्स अंतर्गत आता सोन्याच्या दागिन्यावर सगळ्यात स्वस्त मजुरी ८ ते १२% घेतली जाईल. वर्धापन दिनानिमित्त १८ मार्च ते २० एप्रिल या कालावधीमध्ये ५० हजार रुपयांच्या दागिन्यांच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे. आणि या अंतर्गत प्रथम बक्षिस सोन्याचा हार, द्वितीय बक्षिस सोन्याची चैन, तृतीय बक्षिस सोन्याचे नाणे आणि चौथे बक्षिस चांदीचे नाणे देण्यात येणार आहे. या लकी ड्रॉ कुपन योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. लालचंद मंगलदास सोनी यांची मुख्य शाखा सराफा बाजार येथे असून दुसरी शाखा श्रीनिकेतन कॉलनी, जालना रोड येथे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनकचरा व्यवस्थापनाच्या सात जागा निश्चित

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

शहरातील घनकचरा व्यवस्थापनाकरिता महापालिकेने सात जागा निश्चित केल्या असून, लँड फीलसाठी तीन खासगी जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीला कळविण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे वकील राजेंद्र देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दिली.

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांनी दाखल केलेला दिवाणी अर्ज आणि तीसगाव, मिटमिटा, कांचनवाडी येथील नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकावर गुरुवारी न्या. संभाजी शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर सुनावणी झाली. शहरातील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात गुरुवारी महापालिकेच्या वतीने म्हणणे सादर केले. यात समितीला चिकलठाणा गट नं. २३१(५ एकर), रमानगर (२ एकर ), पडेगाव, कांचनवाडी, नारेगाव (प्रत्येकी ५ एकर ), हर्सूल (२ एकर), मिटमिटा (५ एकर) या सात जागा सूचविण्यात आल्या होत्या. इतर तीन खासगी जागा लँड फीलसाठी सूचविल्याची माहिती देण्यात आली. सनियंत्रण समितीने या साठी जागांना मान्यता दिली आहे. या प्रकरणात मूळ याचिकाकर्त्यातर्फे देवदत्त पालोदकर, राज्य शासनातर्फे अमरजितसिंह गिरासे, केंद्र शासनातर्फे संजीव देशपांडे, महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उत्तम बोदर, याचिकाकर्त्यांतर्फे विजयकुमार सपकाळ, प्रज्ञा तळेकर, चंद्रकांत थोरात यांनी काम पहिले.

\B१७ एप्रिलला सुनावणी

\Bशहरात दैनंदिन निघणारा कचरा विकेंद्रित पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित करून कंपोस्टिंगच्या कामासाठी ४३६ कंपोस्टिंग पीटचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु सर्वच ठिकाणी जागा उपलब्ध होऊ शकत नसल्याने केंद्रीय पद्धतीने सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया आवश्यक असल्याने त्यासाठी या जागा सुचविण्यात आल्याचे सांगण्यात आले. समितीच्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्यात आला असे समितीच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’साठी शासनाचे आणखी शंभर कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासाठीच्या पीपीपीतत्वावरील (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) समांतर जलवाहिनी योजनेसाठी आणखी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी शासनातर्फे गुरुवारी दाखविण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत समांतर जलवाहिनीसाठीच्या सुधारित कराराची तयारीच करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात कोर्टाच्या मान्यतेने सुधारित करार करून जलवाहिनीचे काम सुरू होईल, असे मानले जात आहे. यापूर्वी शासनाने समांतर जलवाहिनीसाठी २६३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

समांतर जलवाहिनीच्या कामाच्या संदर्भात गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी प्रविण परदेशी, आमदार संजय शिरसाट, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल, एसएल ग्रुपचे रोहित मोदी, जीवन सोनवणे आदी मुंबईतून सहभागी झाले होते, तर आमदार अतुल सावे आणि जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम औरंगाबादेतून सहभागी झाले होते. सुमारे एक तास व्हिडीओ कॉन्फरन्स चालली. त्यात काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. ही चर्चा आता नव्याने केल्या जाणाऱ्या कराराच्या रुपाने कोर्टासमोर मांडली जाण्याची शक्यता आहे. झालेल्या चर्चेबद्दल आमदार संजय शिरसाट व अतुल सावे यांनी माहिती दिली.

समांतर जलवाहिनी योजनेची वाढलेली किंमत व जीएसटी यामुळे १७४ कोटी रुपयांचा जास्तीचा बोजा पडणार आहे. यापैकी शंभर कोटी रुपयांचा हिस्सा शासन देईल, उर्वरीत हिस्सा कंपनीने द्यावा, असे बैठकीत ठरविण्यात आले. कंपनीने जलवाहिनीचे काम अडिच वर्षात पूर्ण करावे, त्यानंतर दोन वर्ष नागरिकांना करारात उल्लेख केल्या प्रमाणे मुबलक पाणी द्यावे. मुबलक पाणी मिळाल्यावर साडेचार-पाच वर्षांनी पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतला जाईल, किमान पाच वर्षापर्यंत पाणीपट्टीत वाढ केली जाणार नाही. मीटरिंगची सक्ती देखील त्यानंतरच केली जाणार आहे, पहिल्या टप्प्यात व्यावसायिक नळकनेक्शनला मीटर लावले जातील, दुसऱ्या टप्प्यात निवासी नळकनेक्शनला मीटर लावण्याचे काम हाती घ्या असे कंपनीच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत सांगण्यात आले.

कंपनीच्या कर्जासाठी पालिकेची जागा तारण नको

समांतरच्या कंपनी अधिकाऱ्याच्या मागणीला जोरदार विरोध

म. टा. प्रतिनिधी, कंपनीला बँकेकडून कर्ज घ्यावे लागणार आहे, कर्जासाठी महापालिकेने काही जागा बँकेकडे तारण ठेवाव्यात अशी मागणी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली, त्याला आमदारांनी व अधिकाऱ्यांनी विरोध केला. ज्या जागेवरून पाइप लाइन टाकण्यात येणार आहे ती जागा बँकेकडे तारण ठेवण्याची परवानगी कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी मागीतली, त्याला देखील विरोध करण्यात आला. कंपनीने स्वत:च्या हिंमतीवर कर्ज काढावे असे सूचविण्यात आले. जलवाहिनीसाठी डीआय पाइप (डक्टाइल आयर्न पाईप) ऐवजी एमएस पाईप ( माईल स्टील पाईप) वापरण्याची परवानगी कंपनीतर्फे मागण्यात आली, त्याला शासन व महापालिकेतर्फे नकार देण्यात आला, परंतु डीआय पाईप पेक्षा एमएस पाईप टिकाऊ आहेत असा युक्तीवाद कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात शपथपत्राच्या आधारे तुमचे म्हणणे सादर करा, एमएस पाइप टाकण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली तर त्याला आमची हरकत असणार नाही, असे शासन व पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारे महापालिका व कंपनीचे वकील एकत्र बसून नवीन कराराचा मसुदा तयार करणार आहेत. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतर तो महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे.

एमआयएम आमदारांना निरोप नाही

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या बैठकीचा आपल्याला निरोप नव्हता त्यामुळे आपण त्या बैठकीला गेलो नाही अशी माहिती एमआयएमचेआमदार इम्तियाज जलील यांनी दिली. आपल्याला मुद्दाम डावलण्यात येत आहे , शिवसेना - भाजपचे हे षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला. पीपीपीतत्वावरील या योजनेला आपला विरोध आहे. नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणारी ही योजना आहे असे माझे ठाम मत आहे,त्यामुळे या योजनेला यापुढेही विरोध सुरूच राहील असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मूल्यांकनाकरिता तयार केलेल्या 'एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स' विरोधात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बुधवारपासून धरणे धरत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. न्यायी मागण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे संघटनेने सांगितले. दरम्यान, गुलमंडी येथे भाजपचे आत्मक्लेष आंदोलन सुरू असल्याची माहिती या आंदोलकांना समजल्यानंतर शिष्टमंडळाने दुपारी गुलमंडी गाठली. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे तसेच आमदार प्रशांत बंब यांची त्यांनी भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावर दानवे यांच्यासह बंब यांनी मागण्यासंदर्भात पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिनी घाटी’ला पालकमंत्र्यांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फकिराबाद (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील शहीद जवान कृष्णा पोपटराव थोरात यांना गुरुवारी (१२ एप्रिल) मानवंदना दिल्यानंतर पालकमंत्री व आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी चिकलठाणा परिसरातील 'मिनी घाटी'ला भेट दिली. या वेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी करुन कामांचा आढावा घेतला आणि महिनाअखेरपर्यंत रुग्णालयाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळेच महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजीचा मुहूर्त उद्घाटनासाठी साधला जाणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

मिनी घाटी म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची भव्य-दिव्य इमारत चिकलठाणा परिसरात उभी आहे; परंतु अजूनही अपेक्षित उपकरणे रुग्णालयात उपलब्ध झाली नसल्यानेच रुग्णालय सुरू करण्यामध्ये मुख्य अडथळा मानण्यात येतो. अर्थात, खाटांबरोबर काही उपकरणे व वैद्यकीय साहित्य रुग्णालयात उपलब्ध झाले आहे व खरेदी प्रक्रिया सुरू असल्यामुळे येत्या महिनाअखेरपर्यंत अनेक महत्वाची उपकरणे व वैद्यकीय साहित्य उपलब्ध होईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत ठोस माहिती दिली जात नसल्याने नानाविध तर्कवितर्कांनाही उधाण आल्याचे सध्या चित्र आहे. दरम्यान, शहीद जवान कृष्णा थोरात यांना गुरुवारी औरंगाबाद विमानतळावर मानवंदना दिल्यानंतर पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्री सावंत यांनी 'मिनी घाटी'ला सायंकाळी सातच्या सुमारास अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी रुग्णालयाची सविस्तर पाहणी केली. रुग्णालयाच्या बांधकामाचा तसेच विविध उपकरणे-साहित्याचा त्यांनी आढावा घेतला आणि रुग्णालय कधी सुरू करता येऊ शकते, याचीही चाचपणी केल्याचे समजते. याबाबत त्यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींशी त्यांनी चर्चाही केली. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत रुग्णालय सज्ज करण्याच्या सूचना दिल्याचेही समजते. खरोखर ३० एप्रिलपर्यंत महत्वाची उपकरणे-साहित्य उपलब्ध झाले तर एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी रुग्णालयाचे उद्घाटन होऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

'पीएम'सह 'सीबीनॅट'ची असेल सोय

याच रुग्णालयात शवविच्छेदन होण्याच्या दृष्टीने 'पीएम रुम' उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्षयरोग व क्षयरोगाच्या 'एमडीआर-टीबी' तसेच 'एक्सडीआर-टीबी' या गंभीर अवस्थांच्या निदानासाठी उपयुक्त असणारी 'सीबी-नॅट' सुविधाही असणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. र्चना भोसले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाल कल्याण समिती; अध्यक्षपदी अॅड.पत्की

$
0
0

औरंगाबाद: बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी अॅड. ज्योती पत्की यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित सदस्यांमध्ये अश्विनी लखमले (पैठण), अॅड. अनिता शिऊरकर व डॉ. मनोहर बन्सवाल यांचा समावेश आहे. बाल कल्याण समिती पाच सदस्यांची असावी, असा नियम आहे. निवड प्रक्रियेत हे पद रिक्त आहे. नव्या बाल न्याय मंडळाचाही निवड करण्यात आली असून बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. रेणुका घुले व विवेक कुलकर्णी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. दोन्ही समित्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी असून काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या प्रत्येक बालकाची कोणत्याही वेळेत वा आपातकालीन परिस्थितीत दखल घेण्याची मुख्य जबाबदारी बाल कल्याण समितीवर आहे. या मुलांच्या नोंदी सुरक्षित व गोपनीय ठेवणे व या मुलांसाठी कायम उपलब्ध राहणे समितीला बंधनकारक आहे. विधीसंघर्ष मुलांसाठी योग्य सुविधा व त्यांच्या हितासाठी बाल न्याय मंडळ काम करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपना क्लबतर्फे निवासी शिबिर

$
0
0

औरंगाबाद: अपना क्लब संस्कार प्रतिष्ठानतर्फे २० एप्रिलपासून तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आहे. या शिबिरात व्यायाम, खेळ, रोपवाटिका निरीक्षण, पौष्टिक नाश्ता-जेवण यासह संवाद, व्याख्याने, स्लाईड शो, काव्य, चित्रकला, नाटुकले, असे उपक्रम असतील. निसर्गरम्य सुंदर परिसराचा आनंदआश्रम हे स्थळ आहे. अधिक माहितीसाठी डॉ. शैलजा देव, उज्ज्वला भट्टड, प्रा. श्रीकांत मुळे, संदीप टेपाळे यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय अपना कल्बच्या डॉ. साधना शाह, संकल्प, ५४ भाग्यनगर येथे संपर्क साधता येईल, असे कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिमटा’च्या १५० उद्योजकांची गगनभरारी

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com

@dhananjaykMT

औरंगाबाद: शहरवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बातमी. 'बिमटा' अर्थताच बुद्धिस्ट इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चिरंग अँड ट्रेडर्स असोसिएशनअंतर्गत मराठवाड्यातील तब्बल ४०० हून अधिक दलित-बौद्ध उद्योजक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे यात औरंगबादमधील १५० उद्योजक असून, त्यांनी जवळपास पाच हजार जणांना रोजगार देऊन त्यांचे जीवन मार्गी लावले आहे.

मराठवाड्याकडे मागास म्हणून पाहणाऱ्यांना 'बिमटा'ने आपल्या कार्यातून उत्तर दिले आहे. यातील प्रत्येक उद्योजकाची तीन ते पाच कोटींची वार्षिक उलाढाल आहे. शहरातील सर्व उद्योजकांचे कारखाने वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा भागात आहेत. गेल्या दशकापासून त्यांचे काम सुरू असून, २०१४पासून ते 'बिमटा'अंतर्गत एकत्र आले. विशेष म्हणजे यात दहा महिला उद्योजकांचा समावेश आहे. या उद्योजकांनी मेकॅनिकल, ऑटोमोबाइल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, प्लास्टिक, पॉलिटेक्निक, टूल रूम, डाय अँड मोल्ड, मॅन्युफॅक्चर, एसपीएम, आयटी (सॉफ्टवेअर), डिझाइन, सर्व्हिस इंडस्ट्री आदी विविध प्रकारच्या कारखान्यांची उभारणी केली आहे. औरंगाबादमध्ये 'बिमटा' इंजिनिअरिंग क्लस्टर वाळूज, जालना येथे सम्यक मसाले क्लस्टर (मुख्य प्रवर्तक संतोष दाभाडे), मंठा येथे जोशाबा लेदर क्लस्टर (मुख्य प्रवर्तक कैलाश कांबळे), कुंभेफेळ येथे ब्रूम क्लस्टर (मुख्य प्रवर्तक सुनीता शेजवळ) तयार करण्यात आले आहे. यापैकी ब्रूम क्लस्टरमध्ये दलित महिला व्यावसायिक आणि उद्योगिनींना स्थान देण्यात आले आहे.

\Bअटकेपार झेंडा

\B'बिमटा'अंतर्गत असलेल्या उद्योजकांनी अटकेपार झेंडा रोवला आहे. २०१६मध्ये जपान, २०१७मध्ये जर्मनी दौरा केला. २०१८मध्ये या महिन्यातच ते चीनचा अभ्यास दौराही करणार आहेत. कुशल तंत्र, आधुनिकतेचा वापर करत आता दलित उद्योजक परेशातील विविध प्रदर्शनांमध्ये भाग घेणार आहेत. नुसते प्रदर्शन पाहण्यापुरता संबंध न ठेवता आपल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. देशांतर्गत सरकारी कंपन्यांमध्ये जसे बीपीसीएल, एचपीएल, रेल्वे, डिफेन्स, विमान बांधणी यात व्हेंडरशीप म्हणून दलित उद्योजकांना काही टक्के समावून घेतले जाणार आहे. त्यासाठी हे उद्योजक स्थानिक पातळीवर प्रयत्न करत आहेत. शहरातील तीन ते चार उद्योजकांचे उत्पादन निर्यातही होत आहे.

'बिमटा'अंतर्गत एमएसएमई, एनएसआयसीच्या उपक्रमांना आपण येथे आणले आहे. केंद्रशासनाच्या या विभागाचे उद्योग आधार कार्ड मेमोरेंडम अंतर्गत आम्ही उद्योजकांनी रजिस्ट्रेशनही केले आहे. शहरातील सुमारे १५० दलित-बौद्ध उद्योजक भरारी घेत असून पाच हजार जणांना रोजगार देत दरवर्षी ५०० कोटींची उलाढालही करत आहोत.

- नंदकिशोर रत्नपारखे, माजी अध्यक्ष बिमटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images