Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नगरसेविका सुलताना यांना राज्यमंत्र्यांचा दिलासा

$
0
0

खुलताबाद: तीन अपत्य असल्याची माहिती लपवल्याच्या कारणावरून अपात्र ठरवलेल्या काँगेस नगसेविका सुलतान परवीन मिर्झा अब्बास बेग यांना राज्यमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. जिल्हाधिकारी यांनी हा आदेश २ एप्रिल रोजी दिला होता. या आदेशाविरुद्ध ११ एप्रिल रोजी अॅड. निहाल पटेल यांच्यामार्फत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे अपील दाखल केले होते. अॅड. निहाल पटेल यांचा युक्तीवाद ऐकून अपिलाचा निकाल लागेपर्यंत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशास स्थगिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसाच्या मुलाचा अपघाती मृत्यू

$
0
0

पडेगाव: मिटमिट्याजवळ शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दुचाकीवरील एक ठार व दोन जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव राजू राठोड (वय अंदाजे ३०, रा. मुकुंदवाडी), असे आहे. जखमींची नावे समजली नाहीत. त्यांना नागरिकांनी घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मृत व जखमी दुचाकीवरून दौलताबाद टी पॉइंटकडून औरंगाबादकडे येत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अॅपेरिक्शाने मागून धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा अपघात मिटमिटा येथील आर्च आंगणजवळ घडला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरुषोत्तम म्हाळस यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: संग्रामनगर येथील रहिवासी, माजी सैनिक पुरुषोत्तम दत्तात्रय म्हाळस (वय ७७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनुप आणि अजय म्हाळस यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये 'जय भीम'चा गजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शनिवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भडकलेट गेट येथे अभिवादनासाठी भीमसैनिकांनी सकाळपासून रिघ लावली होती. विविध पक्ष, संघटनांतर्फे व्याख्यान, वाहनफेरी, अन्नदान, बुद्धवंदना या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांकडून अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि प्रभारी पोलिस आयुक्त तथा विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन त्यांना मानवंदना दिली. अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक बच्छाव, सहायक आयुक्त शिवाजी शेळके आदी उपस्थित होते.

देवगिरी बँक कर्मचारी संघ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवगिरी बँक कर्मचारी संघातर्फे पीरबाजार येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजीव जहागिरदार, विनोद शिवणीकर, दीपक कुलकर्णी, सुनील देशमुख, शुद्धोदन जगताप, नंदकिशोर निधोनकर, दीपक देशपांडे, अनिल राठोड, रामदास राऊत, राहुल रंजलकर, संतोष गोसावी आदी कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तालय

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्‍प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपायुक्त टाकसाळे, पारस बोथरा, वर्षा ठाकूर, नगर प्रशासनाच्या उपसंचालिका रिता मेत्रेवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करून अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार उपस्थित होते.

आम आदमी पार्टी

भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हा समन्वयक सुग्रीव मुंडे, फुलंब्रीचे निरीक्षक सिद्धार्थ बन्सोड, जिल्हा समन्वयक सदस्य अशीर जयहिंद, सुरेश पवार, सतीश संचेती, अजबराव मानकर, वैजनाथ राठोड, भागवत चव्हाण, खिजर सिद्दीकी, सत्यप्रकाश राठोड, इशरत खान आदी उपस्थित होते.

मनसे

भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिक्षक सेनेचे चिटणीस सुभाष मेहेर, अॅड. नूतन जैस्वाल, लीला राजपूत, अनिता लोमटे, सपना ढगे, संगिता जाधव, खातुनबी शेब, हेमलता दिनोरिया, शोभा कीर्तीशाही, भरत पाटील, किशोर साळवे, फिरोज मिर्झा, अशोक पवार उपस्थित होते.

गुजराती पाठशाळा

गुजराती पाठशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वैशाली सोरटी होत्या. याप्रसंगी प्रमुख वक्त्या अंजली वझरकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. हेमलता मुळे यांनी सूत्रसंचालन केले.

अनंत भालेराव विद्या मंदिर

अनंत भालेराव विद्या मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात करण्यात आली. प्रमुख पाहुणे मनीषा चौधरी व नंदा राठोड यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारती गायकवाड, वर्षा जाधव आदी यावेळी उपस्थित होते. तर अनंत भालेराव माध्यमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापिका ‌श्रुती कुलकर्णी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उषा अनमोड, वृषाली वाणी, सोनल नलावडे उपस्थित होते.

चर्मकार एकता विकास संघ

पद्मपुरा येथे चर्मकार एकता विकास संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कॉँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष महेंद्र रमंडवाल यांनी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दिलीप सोनवणे, उत्तम बरंडवाल, सचिन जीवनवाल, सुनील सोनवणे, भारत रमंडवाल, नंदकुमार गायकवाड, चंदू कटारे, राजू रमंडवाल, आकाश चिरवाल, अंबादास रमंडवाल आदी उपस्थित होते.

जनजागृती प्रतिष्ठान

जनजागृती प्रतिष्ठान तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी कापूस तज्ज्ञ डॉ. एस. एस. माने, डोनवाडा सरपंच आत्माराम पवार, विकास कापसे, अतुल उंबरे, गणेश पोटे, रवीराज खिल्लारी, अशोक नरोडे, अक्षय माटे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुक्मिणीबाई जांबकर यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: कंधार येथील रहिवासी रुक्मिणीबाई विष्णुपंत जांबकर (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी औरंगाबादेत निधन झाले. त्यांच्यावर पुष्पनगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, जावई, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राघवेंद्र जांबकर यांच्या त्या आई होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिरवार चर्मकार संघातर्फे अभिवादन

$
0
0

औरंगाबाद: जय भीमचा जयघोष करत अहिरवार चर्मकार महासंघातर्फे सकाळी नऊ वाजता सिडको बसस्थानक येथील वसंतराव नाईक पुतळा येथून वाहनफेरी काढण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक भहवान निंभोरे यांच्या हस्ते या फेरीचे उद्घाटन करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष बन्सीलाल कुचे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जवाहरलाल भगोरे, सुभाष बरोदे, मोतीलाल श्रावणे, हिरालाल गतखणे, कमलताई धामोने, गणेश पुसे, राजू बऱ्हाणपुरे, भागीरथ धामुने, धनंजय पसरटे, शिवलाल खरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सेव्हन हिल्स्, आकाशवाणी, क्रांती चौक, पैठणगेट, औरंगपुरा मार्गे काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता भडकलगेट येथे करण्यात आली. तेथे कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

\Bतथागत युवा मित्र मंडळ

\Bऔरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमनगर भावसिंगपुरा येथील तथागत युवा मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. दुचाकीसह चारचाकी वाहनांचा समावेश या फेरीत होता. एका सजवलेल्या वाहनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूर्ती ठेवण्यात आली होती. डॉ. आंबेडकरांचा जय घोष करत भावसिंगपुरा परिसर, महावीर चौक मार्गे काढण्यात आलेली वाहनफेरी भडकलगेट येथे पोहचली. तेथे अभिवादन सभा घेत फेरीची सांगता करण्यात आली. हर्षल खरात, आनंद खरात, प्रशांत घुले, मयुर गायकवाड यांच्यासह असंख्य भीमसैनिक उपस्थित होते.

\Bजल्लोषात वाहन फेरी

\Bऔरंगाबाद: माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमनगर भावसिंगपुरा ते भडकलगेट अशी वाहनफेरी काढण्यात आली. यात प्रामुख्याने महिला व युवतीची संख्या लक्षणीय होती. छावणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या हस्ते फेरीचे उद्घाटन करण्यात आले. लक्ष्मी कॉलनी, मिलकॉर्नर मार्गे काढण्यात आलेल्या फेरीची सांगता भडकलगेट येथे झाली.

\Bरिक्षाचालकांची फेरी

\Bऔरंगाबाद: हर्सूल टी पॉइंट रिक्षाचालक मित्र मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या जल्लोषात वाहनफेरी काढण्यात आली. जयंतीनिमित्त आकर्षक पद्धतीने सजवलेल्या रिक्षांनी साऱ्यांचे लक्ष वेधले होते. अमोल पठारे, सुरेश जाधव, राहुल खिल्लारे, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते. हर्सूल, आंबेडकरनगर, सिडको बसस्थानक, जयभवानीनगर, गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ती चौक, आकाशवाणी, महावीर चौक, मिल कॉर्नरमार्गे काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता भडकलगेट येथे झाली. भडकलगेट येथे पोहचताच भीमसैनिकांनी जय भीमचा नारा देत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

\B'रिपाइं'तर्फे मानवंदना

औरंगाबाद: \Bडॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जयंतीनिमित्त शनिवरी रिपाइं (डे) तर्फे जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मिल कॉर्नर येथून वाहनफेरी काढण्यात आली. यावेळी नगरसेवक कैलास गायकवाड, रमशे जायभाय, सचिन गंगावणे, शिवा नरवडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील अन्य भागातून विविध पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी, भीमसैनिकांनी वाहनफेरी काढत भडकलगेट येथे अभिवादनासाठी दिवसभर अलोट गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलित ऐक्य म्हणजे रोमॅँटिक कल्पना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दलित ऐक्याबाबत आजही अनेक जण बोलतात, पण दलित ऐक्य म्हणजे रोमॅँटिक कल्पना आहे,' असे प्रतिपादन शरणकुमार लिंबाळे यांनी शनिवारी केले. ते नंदनवन कॉलनी येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वामन दादा कर्डक खुल्या मंच येथे आयोजित व्याख्यानात बोलत होते.

कार्यक्रमाला नगरसेवक प्रेमलता दाभाडे, समितीचे अध्यक्ष प्रा. दिलीप बढे, प्रा. बी. जी, रोकडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. लिंबाळे म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वेगाने तळागळात पोहचले. निळा झेंडा लावल्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण होऊच शकत नाही. ही कल्पना आता समाजात सर्व पक्षात स्थिरावली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ऐक्य घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सध्या रिपब्लिकन पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. एक विरोधक तर दुसरा सत्ताधारी. बाबासाहेबांच्या समाजाने सत्ताधाऱ्यांना सोबत घेऊन विकास केलाच, पण जो गट विरोधात राहिला आहे त्याने सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम केले आहे. पॅँथर चळवळीच्या पंधरा वर्षांच्या लढ्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार झाला, पण देशभरात सर्वाधिक विद्यापीठ, शिक्षण संस्था या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आहेत. आज देशात बाबासाहेबांचे पुतळे काढले जात आहेत. दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चनांवर अन्याय होत आहे. जेव्हा जेव्हा अन्याय वाढतात तेव्हा ईश्वर भुतलावर येतो असे हिंदू धर्मात सांगितलेले आहे. मात्र, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वानुसार जेव्हा समाजात अन्याय, अत्याचार वाढतो. तेव्हा समाज एकवटतो, एकरूप होतो. अन मोठे बदल घडतात. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक बदल आंबेडकरी चळवळीत झाले. रिपब्लिकन पक्षाची स्थापना ही त्यामधील एक भाग आहे,' असे मत लिंबाळे यांनी मांडले.

\Bदहा वर्षांत सभागृह बांधा

\B'नंदनवन कॉलनी येथे दीक्षा भूमीप्रमाणे भव्य सभागृह तयार करावे. जेणेकरून लोकांना उन्हात व्याख्यान ऐकण्याची तसदी घ्यावी लागू नये,' अशी मागणी लिंबाळे यांनी केली. ते म्हणाले, 'विरोधक आणि सत्ताधारी अशी बाजू संभाळून सत्तेवर अंकुश ठेवणे तसेच सत्ताधाऱ्यांसोबत समाजाचा विकास साध्य करण्याचे काम समाजात होत आले आहे. अनेक पक्ष आहेत. अनेक संघटना आहेत. यामुळे दलित ऐक्य ही रोमॅँटिक कल्पना वाटते. मरगळ आलेल्या रिपब्लिकन पक्षाला राजकीय शक्ती प्राप्त करून देण्यासाठी पँथर संघटना बरखास्त करण्यात आली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

$
0
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर भडकलगेट, विद्यापीठ परिसर व नागसेनवनात शनिवारी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. कॉँग्रेसतर्फेही भडकलगेट परिसरात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाने १२ ते १६ एप्रिलपर्यंत हेलिकॉप्टर राइडचे आयोजन केले आहे. सर्वसामान्यांना हवाई सफरीचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी अल्पदरात ही सफर पुरविण्यात येत आहे, अशी माहिती संयोजक डॉ. राजमहेंद्रा सावंत यांनी दिली. एलोरा ट्रॅव्हल्स अँड एव्हिएशनचे बाबासाहेब नरवडे यांच्याकडून कराराने ही सेवा घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. कॉँग्रेसने पुष्पवृष्टीसाठी रॉयल कंपनीशी करार करून मुंबईहून हेलिकॉप्टर आणले होते, अशी माहिती आमदार सुभाष झांबड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुनंदा तुळशी यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: गारखेडा परिसरातील सारा राजनगर येथील रहिवासी सुनंदाबाई सुधाकरराव तुळशी (वय, ७२) यांचे वृद्धपकाळाने शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दै. सामनाचे सहायक संपादक गणेश तुळशी यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे पती, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अच्युतराव सुरडकर यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: जयभीमनगर टाऊनहॉल परिसरातील रहिवासी सेवानिवृत्त कर्मचारी अच्युतराव कोंडीराम सुरडकर (६२) शनिवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रविवारी सकाळी १०.३० वाजता बेगमपुरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देविदासराव कुलकर्णी यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद: पाटबंधारे खात्यातील निवृत्त उपअभियंता देविदासराव दत्तात्रयराव कुलकर्णी (नायगव्हाणकर) यांचे शनिवारी निधन झाले. रविवारी सकाळी त्यांच्यावर एन-६ येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे एक मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अनिरुद्ध कुलकर्णी यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामानवास अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यान, मिरवणूक आणि विविध उपक्रमांनी बाबासाहेबांना अनेक कार्यालये, पक्ष, संघटनांनी अभिवादन केले.

\Bमहावितरण कार्यालय

\Bऔरंगाबाद प्रादेशिक कार्यालय व महावितरण औरंगाबाद परिमंडळ कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या प्रतिमेला महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महावितरण औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, महापारेषण औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता अविनाश कोंडावार, अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, अशोक फुलकर, रतन सोनुले, चंद्रकांत वसेकर, कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, महिला, विविध संघटनांचे पदाधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

………

\Bयुवाक्रांती संघटना

\Bडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवाक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश बाबुराव शिंदे यांच्या हस्ते पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संघटनेचे फेरोज खान, भाऊसाहेब गारुळे, बापू सोनवणे, शिवाजी भगुरे, अजय शिंदे, राहुल बोबडे, शरद म्हस्के , प्रदीप पगारे, अजय पारखे, गजानन सोनवणे, योगेश सोरमारे, महेश गायकवाड ज्ञानेश्वर सुरासे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

……………

\Bशिव-शक्ती प्रतिष्ठान

\Bभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भावसिंगपुरा येथील शिव-शक्ती प्रतिष्ठान व क्रीडा मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी संस्थेचे नंदकिशोर लोखंडे, शिव-शक्ती प्रतिष्ठान व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शेलार, उपाध्यक्ष सुरेश लोखंडे, सुनील लोखंडे, प्रवीण मोटे, लक्ष्मण राऊत, अंकुश लोखंडे, संदीप लोखंडे, दिनेश लोखंडे, रमेश मोटे यांच्यासह क्रीडा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिवादनासाठी भीमसैनिकांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शनिवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भडकलेट गेट येथे अभिवादनासाठी भीमसैनिकांनी सकाळपासून रिघ लावली होती. जयंतीनिमित्त विविध पक्ष, संघटनांतर्फे व्याख्यान, वाहनफेरी, अन्नदान, बुद्धवंदना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

\Bमॉरल किड्स हायस्कूल

\Bसातारा परिसरातील मॉरल किड्स शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संतोष जैस्वाल, संदीप जैस्वाल, मुख्याध्यापक अर्चना देशपांडे, मेघा हत्तेकर, कोकिळा अधाने उपस्थित होते.

\B

महात्मा फुले विद्यालय

\Bमाळीवाडा येथील महात्मा फुले विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शिक्षक राजाराम सोनवणे यांनी यावेळी डॉ. आंबेडकर यांचे जीवनकार्य या विषयावर उपस्थितांना माहिती दिली. अध्यक्षस्थानी जगन्नाथ लहाने होते. अनंत गोरे, कदीर शेख, दीपक गाणार, संजय गायकवाड, रवींद्र खोडाळ, चरणसिंग जारवाल, कीर्ती घोगरे आदी उपस्थित होते. दीक्षा खाजेकर, साक्षी साठे यांनी सूत्रसंचालन केले.

\Bझेडपी शाळा सातारा\B

सातारा येथील जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंजुश्री राजगुरू होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. उत्तमराव पांचाळ, अण्णा तुपे होते. या मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंतीचे औचित्य साधत शाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी साक्षरता संघाच्या वतीने विधी बाल वाचनालय सुरू करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भीम गौरव गीत सादर केले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचे परीक्षण केले.

\B

भारिप बहुजन महासंघ\B

भडकलगेट येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारिप बहुजन महासंघातर्फे अभिवादन करण्यात आले. महासंघाचे नेते अमित भुईगळ, मुकुंद सोनवणे, माणिक करवंजे, नीलेश निकम, दिनेश साळवे, पंडीत तुपे, श्रीरंग ससाणे, गौतम गवळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

\Bअष्टांग योग मार्ग \B

महेशनगर येथे आयोजित कार्यक्रमात अष्टांग योग मार्गाचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू रवी रत्नपारखे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. सपंत सारडा, साहेबराव कीर्तीकर, मनीष सोनवणे, किसन नरोडे, डॉ. सुधाकर नरवडे, फैसल खान पठाण, संदीप कुलकर्णी, सागर रत्नपारखे, गणेश खरात आदी उपस्थित होते.

\Bप्रहार जनशक्ती पक्ष \B

भडकलगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले. मध्यचे शहर प्रमुख शफीक धांडे, जिल्हा प्रमुख संजय चव्हाण, अफजल पटेल, सोमेश पगार, प्रदीप तुपे, परवेज शेख, जाहेद शेख, अक्षय देवकाते आदी उपस्थित होते.

\Bआंबेडकर स्मारक समिती\B

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीतर्फे बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सिद्धांत गाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर होते. प्राचार्य आर. ए. खिल्लारे, मुख्याध्यापक आर. जे. पाटील, देवानंद वानखेडे, संजय वानखेडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषमतेवर आधारित समाजव्यवस्था बदलावी लागेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पुरातन, कालबाह्य विषमतेवर आधारलेली समाजव्यवस्था आजही आहे. घटनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही समाजव्यवस्था बदलावी लागेल,' असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ भगवानराव देशपांडे यांनी शनिवारी केले. ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा, महाविद्यालयांतर्फे नागसेनवनातील लुंबिनी उद्यानात आयोजित व्याख्यानात बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर होते. यावेळी प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, डॉ. किशोर साळवे, डॉ. एस. डी. राठोड, मुख्याध्यापिका ए. पी. गोलकोंडा, जयश्री घोबले, प्राचार्य प्रा. टी. ए. कदम यांची व्यासपीठावर उपस्थित होते. अॅड. देशपांडे म्हणाले, 'बाबासाहेबांनी घटनेमध्ये भारताच्या नवउभारणीचे स्ट्रक्चर तयार करून दिले. बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून घेऊन राजकीय सामर्थ्य वाढवण्यापेक्षा बाबासाहेब काय म्हणत होते हे लक्षात घ्या. याचा विचार करा. बाबासाहेब म्हणायचे गोर गरीब, दलितांच्या हक्कासाठी मला काहीतरी करता यावे म्हणून मी घटना समितीमध्ये आलो. जगात कोठेही नाही एवढा अर्थपूर्ण सारनामा भारतीय राज्यघटनेत आहे. सर्वांना समान हक्क देऊन जात, धर्म, पंथ कशाचेही बंधन न ठेवता सर्वांना मुलभूत हक्क प्रदान केला.' डॉ. तेजनकर यांचेही यावेळी भाषण झाले. प्रास्ताविक डॉ. वाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगीता पगार यांनी तर आभार प्रा. एस. एस. खेडगीकर यांनी आभार मानले.

आज देशामध्ये बहुसंख्याक वादाचा प्रश्न सुरू आहे. धर्म आणि संस्कृतीच्या नावावार राष्ट्रवाद असा प्रचार सुरू आहे. असहिष्णुता लोकशाहीला घातक आहे. हा लोकशाहीचा शत्रू आहे. बाबासाहेबांचे विचार आज आचरणात आणण्याची गरज आहे.

- अॅड. भगवानराव देशपांडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा तास ज्ञानयज्ञातून प्रज्ञासूर्याला अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन' व बीपीएमटी विभागाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच बीपीएमटी अभ्यासक्रमाच्या ८० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (१३ एप्रिल) सकाळी सात ते सायंकाळी सात असा अखंड १२ तास अभ्यास करून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 'मायक्रोबायोलॉजी लेक्चर हॉल'मध्ये हा अनोख्या अभिवादनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित दामले, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गजाजन सुरवाडे, बधिरीकरणशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. राजश्री सोनवणे, डॉ. प्रभा खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त हॉलमध्ये सर्व वृत्तपत्रेही उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रांसह क्रमिक पुस्तकांचा अखंड अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अनोख्या अभिवादनाची संकल्पना डॉ. राजश्री सोनवणे यांनी मांडली आणि विद्यार्थ्यांनी ती संकल्पना तडीस नेली.

विद्यार्थ्यांना राज्य घटनेची प्रत

या अभिवादन कार्यक्रमाच्या समारोपाला उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना भारतीय राज्य घटनेच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाची महाविद्यालयात चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू वाहतूकप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालक व मालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक सोमय मुंढे यांच्या गुरुवारी मध्यरात्री मार्गदर्शनाखाली लाडगाव चौफुलीवर पोलिसांनी ही कारवाई केली. रात्री पोलिस कर्मचारी सागर विघे, दिलीप वेलगुडे, विजय भोतकर व विजय खोकड हे गस्त घालत असताना एकच्या सुमारास वाळूची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो (क्रमांक एमएच १७ एजी २६००) त्यांनी पकडला. टेम्पो चालकाने गोदावरी नदी पात्रातून ही वाळू आणली होती. टेम्पो व त्यात भरलेली तीन ब्रास वाळू असा एकूण चार लाख नऊ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सागर विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक दिलीप एकनाथ वैद्य व मालक चंद्रकांत दशरथ कसबे (रा. संवदगाव) या दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशी दारू जप्त

वैजापूर : देशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या तालुक्यातील लासूरगाव येथील दोन जणाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. अशोक अंबादास जाधव व इंदूबाई दामोधर जाधव अशी आरोपींची नावे आहेत. अशोक जाधव याच्या ताब्यातील एक हजार २६० रुपये किंमतीच्या २१ देशी दारुच्या बाटल्या व इंदूबाई जाधव हिच्या ताब्यातून एक हजार ३८० रुपये किंमतीच्या २३ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी हवालदार हुकुमसिंह डांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंपले यांनी सूत्रे स्वीकारली

$
0
0

औरंगाबाद : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालकपदाचा पदभार बी. आर. शिंपले यांनी एस. आर. सूर्यवंशी यांच्याकडून स्वीकारला. महाराष्ट्र व्होकेशनल टिचर्स असोसिएशनतर्फे शिंपले यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारासह सहसंचालकांशी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मान्यतेचे प्रस्ताव, जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना वितरित कराव्यात आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे. यावेळी मराठवाडा अध्यक्ष डॉ. मनोहर वानखडे, जिल्हाध्यक्ष प्रा. रामदास गायकवाड, प्रा. मो. एजाज, प्रा. भीमसिंग राजपूत, प्रा. प्रकाश हमने, प्रा. एन. के. गायकवाड, प्रा. प्रमोद व्याहाळकर, प्रा. विजय पाटील, प्रा. प्रदीप सोळुंके, पी. के. पाडळकर आदींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रक्रियांच्या प्रक्षेपणासह मंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट'मध्ये रविवारी (१५ एप्रिल) झालेल्या कार्यशाळेत कर्करोग शस्त्रक्रियांच्या थेट प्रक्षेपणासह चर्चासत्र तसेच व्याख्यानांमधून एकूणच कर्करोग आणि त्यावरील निरनिराळ्या उपचार व शस्त्रक्रियांवर मंथन घडून आले. विशेष म्हणजे 'स्टेट कॅन्सर'मध्ये पहिल्यांदाच शस्त्रक्रियांचे प्रक्षेपण झाले आणि सुमारे शंभर तज्ज्ञ डॉक्टरांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

राज्य कर्करोग संस्था म्हणजेच शासकीय कर्करुग्णालयामध्ये ही कार्यशाळा झाली. यानिमित्ताने 'स्टेट कॅन्सर'च्या शस्त्रक्रियागृहामध्ये झालेल्या जिभेच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया तसेच थायरॉईड कर्करोगाच्या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण रुग्णालयातील सभागृहात दाखवण्यात आले. या प्रसंगी तीन बाय तीन सेंटिमीटरच्या कर्करोगाच्या गाठीची शस्त्रक्रिया डॉ. महेंद्र कटरे यांनी केली, तर थायरॉईड ग्रंथीच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया डॉ. अजय बोराळकर यांनी केली आणि संपूर्ण शस्त्रक्रियेचे प्रक्षेपण कार्यशाळेत सहभागी झालेल्या डॉक्टरांना पाहता आले. या दरम्यान शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांबरोबर कार्यशाळेत सहभागी डॉक्टरांमध्ये थेट संवादही सुरू होता आणि शस्त्रक्रियांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील महत्वपूर्ण माहिती तसेच अनुभवांचेही सहजच आदान-प्रदान झाले. अनेकांच्या अनेक शंका-कुशंकांचे निरसनही झाले. अतिशय सुस्पष्ट प्रक्षेपणामुळे सहभागी डॉक्टरांना शस्त्रक्रिया समजून घेणे जास्त सुकर झाले. त्याचबरोबर 'स्टेट कॅन्सर'मधील विभागप्रमुख डॉ. सुनिल देशमुख यांनी, शल्यचिकित्सकांच्या दृष्टिकोनातून 'हेड अँड नेक'ची शरीररचनाशास्त्र, 'हेड अँड नेक' कर्करोगांमध्ये 'इंटरव्हेश्नल रेडिओलॉजी'च्या भूमिकेबाबत 'एमजीम'मधील डॉ. शिवाजी पोले, 'हेड अँड नेक' प्रकारातील कर्करोगांच्या क्ष-किरण तपासण्या आणि शल्यचिकित्सकांकडून असलेल्या अपेक्षांवर घाटीच्या डॉ. अंजली वासडीकर, न्युक्लिअर मेडिसिनच्या उपचारांवर 'युनायटेड सिग्मा'चे डॉ. प्रफुल्ल जटाळे, पॅथॉलॉजिस्टकडून शल्यचिकित्सकांच्या कोणत्या अपेक्षा असाव्यात, यावर घाटीतील डॉ. हेमंत कोकंडकर, शस्त्रक्रियेनंतरच्या रेडिओथेरपी उपचारांवर कॅन्सर हॉस्पिटलमधील विभागप्रमुख डॉ. बालाजी शेवाळकर यांचे व्याख्यान झाले. तसेच चर्चासत्रामध्ये डॉ. प्रवीण सोनवतकर, डॉ. राजेश सावजी, डॉ. बोराळकर, डॉ. कोकंडकर, डॉ. अतचुल पोरे, डॉ. कटरे हे सभागी झाले होते.

शैक्षणिक उपक्रम हा आत्मा

शस्त्रक्रिया जवळून न्याहाळणे हे शिकण्यासारखे आहे आणि त्यानंतर स्वतः शस्त्रक्रिया करणे हे तितकेच जास्त महत्वाचे आहे. त्याचवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कितीही मोठ्या प्रमाणावर रुग्णांवर उपचार-शस्त्रक्रिया होत असल्या तरी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सातत्याने शैक्षणिक उपक्रम, परिषदा, कार्यशाळा होत राहणे सर्वदृष्टीने उपयुक्त आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिकतात. खरे म्हणजे शिक्षण व शिक्षणविषयक उपक्रम हा कोणत्याही महाविद्यालयाचा आत्मा असतो, असे मत घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. या वेळी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, घाटीचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता पाटील, कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. समीर देशमुख, आयएमएचे माजी शहराध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, डॉ. सचिन नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिगठाण शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकुळ

$
0
0

वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील जिकठाण येथील शेतवस्तीवर शनीवार (१४ एप्रिल) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानी धुमाकुळ घालत दागिने व रोख रक्कम असा ४५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

जिकठाण येथील (गट क्रमांक १५१) शेत वस्तीवर राहणारे ज्ञानेश्वर तुकाराम रोकडे यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील साहित्य काढले. कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असे एकूण अंदाजे ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्तव्यस्त विखुरले त्यावेळी आवाज झाल्याने रोकडे कुटुंबाला जाग आली त्यानी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली त्यावेळी चोरानी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या घटनेची माहिती रोकडे यानी पोलिस पाटील योगेश वाखुरे यांना दिली. त्यावेळी ते ग्रामस्थांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याची माहिती वाळूज पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली व चोरट्यांचा शोध घेतला, मात्र तोपर्यंत चोरटे मुद्देमाल घेऊन पसार झाले होते.

वाळूज पोलिस ठाण्याच्या परीसरातील मागील सहा महिन्यांतील ही चौथी चोरीची घटना असून, यापूर्वीच्या चोरीचा अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेत वस्तीवर राहणारे कुटुंबात दहशतीखाली आहेत. अनेक कुटुंब गावात राहण्यासाठी येत आहेत पोलीसानी गस्त वाढवावी व चोरीचा तपास लवकर लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानेश्वर उद्यानातील कामांची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून संत ज्ञानेश्वर उद्यानात करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. काही कामे न करता बिले उचलण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय गोरे यांनी केला आहे. केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

डीपीसीअंतर्गत मिळालेल्या निधीतून संत ज्ञानेश्वर उद्यानात खेळणी पार्क व उद्यानअंतर्गत रस्त्यावर विद्युत रोषणाई करणे आदी कामे होणे अपेक्षित होते, मात्र संबंधित कंट्राटदाराने ही कामे अंदाजपत्रकानुसार केली नसल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. अंदाजपत्रकानुसार या निधीतून खेळणी पार्क, विद्युत रोषणाई, विद्युत साहित्य खरेदी आदी कामे करण्यात येणार होती, मात्र यापैकी कोणतेही कामे झाली नसल्याचा आरोप जलसंपदा विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर उद्यानात झालेल्या कामांची त्वरित चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images