Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कचराकोंडी दोन महिन्यांनंतर ‘जैसे थे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचरा टाकायचा कुठे? या प्रश्नावर ६० दिवसांनंतरही महापालिकेला उत्तर सापडलेले नाही. दिवसेंदिवस शहरातील मोकळ्या जागांवर कचरा साठविला जात आहे. औरंगपुरासारख्या मध्यवस्तीत कचऱ्याचे मजले उभे राहिले असून, भविष्यात शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे.

नारेगाव येथे शहरातील कचरा टाकला जात होता. वर्षानुवर्षे मागणी करूनही पालिका प्रशासनाने येथील कचरा डेपो हलविण्याबाबत काहीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी नारेगाववासीयांनी कचऱ्याच्या ट्रक अडवून आंदोलन पुकारले. कायमस्वरुपी सोय होईपर्यंत नारेगावात कचरा टाकू द्यावा, अशी विनंती करण्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर यांच्यासह अनेक जण नारेगावात गेले पण नागरिक ठाम होते.

दरम्यान, शहरात कचराप्रश्न गंभीर बनला. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. राज्य सरकारने कचरा निर्मूलनासाठी ८० कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी दहा कोटींचा हप्ताही दिला, पण प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन महिने उलटून गेले तरी कचराकोंडीवर सोल्यूशन निघालेले नाही.

प्रशासनाने शहराच्या विविध भागांत कंपोस्ट पीट करून कचरा निर्मूलनाच्या दृष्टीने पाऊल टाकले. त्यातही यश आलेले नाही. औरंगपुरा, जकात नाका, रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागांवर सर्रास कचरा टाकला जात आहे. पालिका प्रशासनाने कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. पण त्यात काही थातूरमातूर कारवाया केल्या गेल्या. पुढे काहीच तोडगा निघालेला नाही.

पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर कचरा साठविण्यासाठी चाचपणी झाली पण पालिकेला यश आले नाही.

कचराकोंडी प्रकरणात आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची बदली झाली. औरंगपुरा भागातील भाजीमंडई परिसरात मध्यवस्थीत कचऱ्याचे ढीग लावण्यात आले आहेत. या परिसरातून जाताना नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुदैवाने अजून शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. जर शहरात पाऊस झाला तर साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर उद्भवू शकतात.

कचरा साठविण्यासाठी शहरातील सात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, मात्र या जागा अद्याप पालिकेने ताब्यात घेतलेल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेरिटेज वॉकमधून जाणून घेतले पैठणी-बिदरी कलेचा इतिहास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पैठणी'सह हिमरू विणकाम आणि बिदरी कलेचा इतिहास -निर्मितीतंत्र इतिहासप्रेमींनी रविवारी (दि.१५)) हेरिटेज वॉकच्या निमित्ताने समजून घेतले. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे या महिन्यातील हेरिटेज वॉक शहरातील सर्वात जुन्या हिमायतबाग चौकातील हिमरू फॅक्टरीमध्ये घेण्यात आला.

याठिकाणी इतिहास संशोधक रफत कुरेशी, डॉ. दुलारी कुरेशी यांनी पैठणी, हिमरू आणि बिदरी कलांचा इतिहास उलगडून सांगितला. यावेळी उपस्थित हिमरू कारागीर आमेर अहमद कुरेशी, इमरान अहमद कुरेशी, पैठणीचे विणकर लायक बिलग्रामी आणि बिदरी कारागीर विजय गवई यांनी आपापल्या कलांचे प्रात्यक्षिक दाखवून या कामाची माहिती उपस्थित इतिहासप्रेमी नागरिकांना दिली. जस्त आणि तांब्याच्या मिश्रणातून बनवलेल्या भांड्यांवर कोरीवकाम करून सोन्याचांदीच्या डिझाईन्स बनवून बिदरी भांडी बनवली जात, असेही श्री. कुरेशी यांनी सप्रयोग दाखवले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे उपअधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी, हिस्ट्री सोसायटीच्या सचिव डॉ. बिना सेंगर, द्वारकादास पाथ्रीकर, ज्ञानप्रकाश मोदाणी, समाजशास्त्रज्ञ डॉ. स्मिता अवचार यांच्यासह अनेक शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवान परशुराम जन्मोत्सानिमित्त बुधवारी मिरवणूक

$
0
0

भगवान परशुराम जन्मोत्सानिमित्त बुधवारी मिरवणूक

विविध समाजोपयोगी उपक्रम, व्याख्यान, रक्तदान शिबिरांचेही आयोजन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्ताने शहरात 'ब्राह्मण समाज समन्वय समिती'च्या वतीने यंदाही विविध कार्यक्रम, व्याख्यान, रक्तदान शिबिर आणि बुधवारी (१८ एप्रिल) भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

बुधवारी सकाळी नऊ वाजता परशुराम चौक, औरंगपुरा येथे भगवान परशुराम स्तंभ पूजन प. पु. श्री जगदगुरु शंकराचार्य करवीर पीठाधीश विद्या नृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी प. पू. माई महाराज, आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज, हभप योगीराज महाराज पैठणकर (नाथवंशज) यांची उपस्थिती राहणार आहे. यानंतर ब्रह्मशौर्य ढोल पथकाची मिरवणूक काढण्यात येईल. भगवान परशुराम चौक ते विघ्नहर्ता गणेश मंदिर, नागेश्वरवाडी या मार्गाने ही मिरवणूक जाईल. तेथे महाआरती आणि महाप्रसाद होईल. भगवान परशुराम जन्मोत्सवनिमित्त प्रमुख मिरवणूक सायंकाळी चार वाजता संस्थान गणपती मंदिरापासून निघणार आहे. मिरवणुकीत सात ढोलपथक विशेष गणवेशासह पाचशेपेक्षा जास्त युवक-युवतींचा सहभाग असणार आहे. मिरवणुकीत विविध सामाजिक आणि धार्मिक देखावे सादर करणारे १० चित्ररथ राहणार आहेत. मिरवणुकीच्या अग्रभागी २० घोडेस्वारांचे पथक, त्यांच्या पाठोपाठ डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या महिला असतील. संत-महंतांचे रथही असतील. मिरवणुकीत पावली पथकही असेल आणि भगवान परशुरामांच्या तीन मूर्तीही असतील. संस्थान गणपती येथे आरती झाल्यावर मिरवणुकीला प्रारंभ होऊन शहागंज, गांधी पुतळा, सराफा, सिटी चौक, मछली खडक, गुलमंडी मार्गे औरंगपुरा, परशुराम चौक येथे विसर्जित होईल.

या संपूर्ण आयोजनाकरिता भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर, कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, प्रकल्प प्रमुख आशिष सुरडकर, सचिव मिलिंद दामोदरे यांच्यासह स्वागताध्यक्ष शिरीष बोराळकर, विशाल पांडे, लक्ष्मीकांत थेटे, सुधीर नाईक, आनंद तांदुळवाडीकर, वि. म. गिरधर, धनंजय पांडे. निमंत्रक, प्रमोद झाल्टे, रजनीताई जोशी, सुरेंद्र कुलकर्णी, मंगलमूर्ती शास्त्री, सुनील खोचे, राजीव जहागीरदार यांच्यासह महिला प्रतिनिधी. वनिता पत्की, विजया कुलकर्णी, मीनाक्षी देशपांडे,शुभांगी कुलकर्णी, अनुराधा पुराणिक,अंजली गोरे.गीता आचार्य, स्मिता दंडवते, नीता पानसरे, श्रुती काटे आदी प्रयत्नशील आहेत.

या कार्यक्रमांना मिळाला प्रतिसाद

परशुराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांना आधीच प्रारंभ झालेला असून, या अंतर्गत बुधवारी (११ एप्रिल) रोजी पूर्णवाद भूषण गुणेशदादा पारनेरकर यांचे 'आपला समाज - भूमिका आणि आव्हाने' या विषयावर अतिशय समर्पक आणि सुंदर व्याख्यान झाले. वरद गणेश मंदिराच्या सभागृहात आयोजित या व्याख्यानाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. ब्राह्मण समाज समन्वय समितीअंतर्गत ब्रम्हवृंद मित्रमंडळाने हे आयोजन केले होते. याशिवाय राऊ प्रतिष्ठानतर्फे भव्य रांगोळी प्रदर्शन आणि मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. श्रेयनगर येथील मीनाताई ठाकरे सभागृहात प्रशिक्षक संतोष पाठक यांनी सहभागींना मार्गदर्शन केले.

वाहन रॅली

मंगळवारी (१७ एप्रिल) सकाळी नऊ वाजता वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश असेल. रॅलीचे उद्घाटन पांडुरंग कुलकर्णी यांच्या हस्ते आणि सचिन अवस्थी, अल्केश दुबे, राजेंद्र शर्मा (गौड) आणि राजेश बुटोले यांच्या उपस्थितीत होईल, औरंगपुरा, परशुराम चौक येथून रॅलीला प्रारंभ होईल तर रेणुकामाता मंदिर, सिडको, एन ९ येथे समारोप होईल.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेखा लिपणे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेड्यातील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी सुरेखा लिपणे पाटील (वय ५८) यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे संस्थापक सरचिटणीस डी. ए. लिपणे-पाटील यांच्या त्या पत्नी व तलवारबाजीचे राष्ट्रीय खेळाडू सूरज लिपणे यांच्या मातु:श्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवतीभवती - आता पुढचं बोला

$
0
0

आता पुढचं बोला

वैजापूर नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली. शिवसेना व भाजप या सत्तेत सहभागी असलेल्या मित्रपक्षांमध्ये लढत झाली. काँग्रेसला याठिकाणी उमेदवारही मिळू शकला नाही. मतदानानंतर मतमोजणीसाठी चार दिवसांचा कालावधी होता. जिल्हा परिषदेत मतमोजणीच्या पहिल्या दिवशी चर्चा रंगली होती. कोण निवडून येणार? कोणी कोणाचे काम केले? काँग्रेसने कुणाला मदत केली? वगैरे वगैरे जमलेले नेते एकमेकांची माहिती मांडत होते. या चर्चेत नेमके कोण निवडून येईल याची हमखास शाश्वती कुणी देत नव्हते. हे पाहून चर्चेत सहभागी नसलेला एक जण हळूच म्हणाला,' ते जाऊ द्या हो. कुणीतरी निवडून येईलच आता. त्याचे काही नाही. आता पुढचं बोला. विधानसभेला कोण उभं राहील आणि कोण निवडून येईल, त्याचे अंदाज बांधा.' या वक्तव्यानंतर चर्चा लांबण्याऐवजी गुंडाळली गेली.

मकरंद कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्टेट कॅन्सर’मध्ये दोन कोटींचे उपकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणजेच शासकीय कर्करुग्णालयामध्ये दोन कोटी पाच लाख रुपयांचे एक्स-रे सिम्युलेटर हे खास उपकरण नुकतेच उपलब्ध झाले आहे. या उपकरणामुळे कर्करुग्णांवरील रेडिएशन उपचारांसाठी मोठा उपयोग होणार असल्याचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

एक्स-रे सिम्युलेटर उपकरणामुळे रेडिएशनच्या उपचारांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. या उपकरणामुळेच संबंधित कर्करुग्णाचा रेडिएशनचा डोस निश्चित करणे, शरीराच्या नेमक्या कुठल्या भागात हा डोस देणे जास्त हितकारक आहे आदींचे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रुग्णांचे उपचाराबाबत नियोजन करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे 'भाभा ट्रॉन' या उपकरणाबरोबर एक्स-रे सिम्युलेटर या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे, असे 'रेडिओथेरपी'चे विभागप्रमुख डॉ. बालाजी शेवाळकर यांनी सांगितले.

रेडिएशनच्या 'सोर्स'ची प्रतीक्षा

एक्स-रे सिम्युलेटर हे खास उपकरण कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाले असले तरी 'भाभा ट्रॉन' या उपकरणासाठी अत्यावश्यक असणारा 'सोर्स' आणखी उपलब्ध झालेला नाही. 'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट'च्या भूमिपूजन व भाभा ट्रॉन मशीनच्या उद्घाटनाला तीन महिने लोटले आहेत; परंतु अजूनही 'सोर्स' उपलब्ध झाला नसल्याने 'भाभा ट्रॉन' वापराविना पडून असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला काँग्रेसतर्फे कँडल मार्च

$
0
0

औरंगाबाद : उन्नाव व कठुआ येथील घटनांचा निषेध करण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने गारखेड्यातील सूतगिरणी चौक परिसर येथेकँडल मार्च काढण्यात आला. दोन्ही ठिकाणी झालेल्या पाशवी अत्याचाराविरोधात निषेध करण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या बलात्कारी मनोवृत्तीचा आणि सरकारचा निषेध करण्यात आला.

शहराध्यक्ष सरोज मसलगे, सुनीता तायडे,सुरेखा पनकडे, मीनाक्षी बोर्ड, रेखा जैस्वाल, योगेश मसलगे, रंगनाथ खेडेकर, मुकेश सोनवणे, सुनीता निकम,नंदा कुलकर्णी, प्रभावती खंडागळे, सलमा शेख, जिजाबाई नवटुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामानवाला अभिवादन

$
0
0

टीम मटा

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त अपूर्व उत्साहात मिरवणुका काढण्यात आल्या. त्याचबरोबर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कन्नडमध्ये मिरवणूक

कन्नड : शहरासह, तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती उत्साहात व चैत्यनमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहरात व ग्रामीण भागात सांयकाळी मिरवणुका काढण्यात आल्या. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने, मुख्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात घेण्यात आला. याठिकाणा आमदार हर्षवर्धन जाधव, उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल शिरसाठ, सचिव कडुबा पवार, सिद्धार्थ निकाळजे, नगरसेवक संतोष पवार, श्याम पिरथानी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याबरोबर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, गटनेते संतोष कोल्हे, मुख्यधिकारी नंदा गायकवाड व नगरसेवक, कर्मचारी यांनी अभिवादन केले. कनकावती नगर येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय खंबायते, जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, किशोर वाळुंजे, काकासाहेब तायडे यांनी तर देवगाव (रंगारी) येथे उदयसिंह राजपूत यांनी अभिवादन केले. कन्नड शहरातून सांयकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. तालुक्यातील मक्रणपूर येथे ग्राम पंचायतच्या वतीने सरपंच जयश्री जाधव उपसरपंच अन्वर बागवाग यांच्या उपस्थितीत केक कापून अभिवादन करण्यात आले, तर हतनूर येथे सुदाम जाधव, विश्वास जाधव, भास्कर बनकर, कारभारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांयकाळी मिरवणूक काढण्यात आली.

संघातर्फे मानवंदना

सिल्लोड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ औरंगाबाद ग्रामीण जिल्हाच्या वतीने १४ एप्रिल रोजी मानवंदना देण्यात आली. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दोन दिवसांचा घोष वर्ग घेण्यात आला. वर्गाची सुरवात १३ एप्रिल दुपारी १२ वाजता झाली. वर्गासाठी जिल्हाभरातून घोषवादक स्वयंसेवक उपस्थित होते. वर्गात एक दिवस आधी संचलन सराव करण्यात आला व दुसऱ्या दिवशी १४ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वातजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून घोष संचलन मुख्य मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर उभे राहून सर्व घोष वादकांनी स्वागत प्रणाम करून दहा मिनिटे स्थिर वादन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी संघाचे विभाग संघचालक डॉ अनिल भालेराव, जिल्हा संघचालक बाबासाहेब चव्हाण यांनी पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. नंतर संचलन सरकारी रुग्णालया समोरून शास्त्रीनगर, टिळकनगर मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संचलनाचा समारोप करण्यात आला. या संचलनास जिल्हा कार्यवाह संजय वाणी, जिल्हा घोष प्रमुख गणेश खैरे, गणेश पहाड़ी, विनोद चव्हाण, आनंद गव्हाणे, अमोल गायकवाड़, शंकर डापके, विष्णु गव्हाणे, सत्यकुमार मुळे, राहुल बनकर, आकाश कुमावत, सौरभ कुंटे आदीं स्वयंसेवकांनी भाग घेतला.

बाबासाहेबांमुळे तळागाळातील नागरिकांना संरक्षण

जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना महामानवाने दिल्यानेच तळागळातील नागरिकांना आज संरक्षण कवच मिळाले असून, सामान्य कुटुंबातील व्यक्तीही लोकशाही व बाबासाहेबानी दिलेल्या मताच्या शक्तीच्या बळावर शासनकर्ता झाला आहे. घटनेला काही विध्वंसक प्रवृत्तीची मंडळी बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा हुकुमशाही व जातीयवादी प्रतिगामी प्रवृत्तीचा मुकाबला करण्यासाठी पुरोगामी विचाराच्या ताकदीने एकत्र येण्याची ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सिल्लोड शहरात अभिवादन कार्यक्रम प्रसंगी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपले जीवन स्वत:साठी नव्हे, तर रंजलेल्या गांजलेल्या समाजाला शासनकर्ती जमात म्हणून पुढे आणण्यासाठी, आर्थिक शैक्षणिक व सामाजिक कमकुवत असलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी रात्र रात्र जागून जीवाचे रान करून जीवन वेचले. सामाजिक समतेतून समाजात मार्गदर्शक शिकवण दिली. यावेळी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे, तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्ष शंकुतला बनसोड, मुख्याधिकारी अशोक कायंदे आदींची उपस्थिती होती.

फुलंब्रीत अभिवादन

फुलंब्री : तालुका काँग्रेस समितीतर्फे शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बोरसे, देवगिरी कारखान्याचे चेअरमन जगन्नाथ काळे, नगरसेवक रऊफ कुरेशी, मुद्दसर पटेल, राजू नागरे संजय प्रधान, देवीदास ढंगारे, संजय मोरे, विजय जाधव, ज्ञानेश्वर जाधव, इफ्तेखार, जयपाल राजपूत, संदीप काथार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, मुख्याधिकारी योगेश पाटील, अजय गंगावणे, शिक्षण सभापती गजानन नागरे, आरोग्य सभापती जफर चिस्ती, योगेश मिसाळ, वाल्मिक जाधव, संजय इंगळे, बबन प्रधान, सुमित प्रधान, अकबर पटेल, जुबेर चिस्ती, देवलाल लकवाल, संतोष मिसाळ यांच्यासह अदिंची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूल दुरुस्तीचा प्रस्ताव हुडकोकडून नामंजूर

$
0
0

Makarand.kulkarni@timesgroup.com

Tweet@makarandkMT

औरंगाबाद - राज्यातील पूल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. ६० मीटरपेक्षा अधिक लांबीच्या २२०० पुलांच्या दुरुस्तीसाठी १७०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हुडकोकडे कर्जाची मागणी केली होती. ती नामंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारकडून टप्प्याटप्प्याने पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जाणार आहे.

सावित्री नदीच्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरातील पुलांचे सर्वेक्षण केले. त्या ऑडिटमध्ये ६० मीटरपेक्षा अधिक लांबी असलेल्या पुलांच्या दुरुस्तीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. पूल दुरुस्तीसाठी किरकोळ आणि मोठी दुरुस्ती, असे वर्गीकरण करण्यात आले.

पुलाच्या दुरुस्तीसाठी पूर बचाव हा प्राधान्यक्रम ठेवण्यात आला. त्यानुसार राज्यातील सर्व पुलांवर सेन्सर बसविले आहेत. राज्यात एकूण २२०० पूल असून त्याच्या दुरुस्तीसाठी १७०० कोटी रुपये लागणार आहेत. पीडब्ल्यूडीकडे एवढा निधी उपलब्ध नसल्याने हुडकोकडे कर्जाची मागणी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हुडकोने हा प्रस्ताव नाकारला आहे. पीडब्लूडीच्या नियोजनानुसार मे महिन्यापूर्वी २२५ पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य अर्थसंकल्पातून १६४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून यंदा अपेक्षित असलेली पूलदुरुस्ती होईल.

हुडकोने प्रस्ताव नामंजूर केल्यामुळे राज्य सरकार पुलांच्या दुरुस्तीसाठी टप्प्याटप्प्याने निधी देणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. मुंबईमधील पुलांच्या दुरुस्तीसाठी ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने निधी मिळाल्यानंतर राज्यातील पूल पुढच्या दोन ते तीन वर्षांत दुरुस्त होतील, असा अंदाज या सूत्रांनी वर्तविला.

राज्यात ६० मीटरपेक्षा अधिक लांबीचे पूल - २२००

पूल दुरुस्तीसाठी लागणारा अपेक्षित खर्च - १७०० कोटी

मे पूर्वी दुरुस्ती करावयाचे पूल - २२५

निधीची तरतूद - १६४ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएमआय’ची कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा चेंबर ऑफ मराठावाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरतर्फे सोमवारी 'इलेक्ट्रिकल सेफ्टी फॉर हॉस्पिटल' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 'सीएमआयए'च्या रेल्वे स्टेशन एमआयडीसी येथील कार्यालयात दुपारी चार वाजता ही कार्यशाळा होईल. यावेळी विद्युत क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करतील. याशिवाय वेदांत एनर्जी सोल्यूशन्सकडून हॉस्पिटलमध्ये कोणती यंत्रणा वापरावी याबाबत सादरीकरण करण्यात येईल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. शहरातील नामांकित हॉस्पिटलचे सीईओ आणि संबंधित अधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयोगी असेल यासाठी 'सीएमआयए' कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन 'सीएमआयए'चे एनर्जी सेलचे समन्वयक राहुल देशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकार पचवण्याच्या अक्षमतेतून टोकाचे पाऊल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मीच बरोबर, मी म्हणतो तेच खरे आणि मला जे पाहिजे ते कुठल्याही परिस्थितीत आणि वाट्टेल ते झाले तरी ते मलाच मिळाले पाहिजे...' अशा आक्रमक मानसिकतेसह नकार पचवण्याची क्षमता विकसीत न होणे किंवा नकार ऐकण्याची क्षमता निर्माण न होण्यातूनच युवा अवस्थेमध्ये खून किंवा आत्महत्या होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळेच धीर, संयम अशा भावनांबरोबरच नकार पचवण्याची क्षमता विकसित होण्यासाठी घरोघरी संस्कार होणे खूप गरजेचे आहे आणि असे संस्कार पालक सर्वाधिक प्रमाणात करू शकतात, असा सूर मनोविकार-मानसतज्ज्ञांमधून सध्याच्या घटनांवर उमटला.

मागच्या महिन्याभरात गाजलेल्या संकेत कुलकर्णी खून प्रकरणाबरोबर रुम पार्टनेच युवा मित्राचा खून केल्याची घटनाही ताजी आहे. टोकाची आक्रमकता एकीकडे दिसून आली असतानाच दुसऱ्या बाजुला नर्सिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने चक्क चौथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली व स्वतःचे जीवन संपवले. ही घटनाही काही दिवसांपूर्वीच शहरात घडली. त्याशिवाय दहावी-बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्यादेखील केल्याचे समोर आले आहे. या घटनांमधील युवकांचे खून किंवा आत्महत्या या अतिशय टोकाच्या आक्रमकतेतून घडल्या आहेत आणि या घटना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मनोविश्लेषण तज्ज्ञांनी केले आहे. या संदर्भात ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. संजीव सावजी हे 'मटा'शी बोलताना म्हणाले, जेव्हा नकार ऐकण्याची क्षमता निर्माणच होत नाही, नकार कुठल्याही स्थितीत पचवता येत नाही, नाही ऐकायची कधीच सवय नसते किंवा मानसिकता नसते आणि मी म्हणतो तेच खरे असेच म्हणतो-वागतो, तेव्हा मात्र असे दुर्दैवी प्रकार-घटना घडतात. 'फस्ट्रेशन टॉलरन्स'चा अजिबात विकास झाला नसेल तर व्यक्ती अशा पद्धतीने वागू शकतात. हल्ली मुलांना जे पाहिजे ते तात्काळ मिळते, मुलांच्या सुख-सोयींची पालकांकडूनच नको तेवढी काळजी घेतली जाते, जे पाहिजे ते आधी आणून दिले जाते आणि या दुष्टचक्रात नकाराची सवय तसेच संस्कार मुलांवर होत नाहीत. वेळ नाही या सबबीची भरपाई म्हणून पालकांकडून मुलांना वाट्टेल ते मिळते. मुळात आयुष्यात अनेक वेळा नकार मिळू शकतो आणि नकाराला तोंड देता आले पाहिजे व तोंड द्यावेच लागते, याचे संस्कार पालकांकडून मुलांवर होणे खूप गरजेचे आहे. मुलांमध्ये व प्रत्येकामध्ये 'फस्ट्रेशन टॉलरन्स' खूप चांगल्या प्रकारे विकसित झाला पाहिजे आणि ही पालकांची मुख्य जबाबदारी आहे, याचे भान पालकांना येणे गरजेचे आहे. खरे म्हणजे पालकांनाच प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे', असेही डॉ. सावजी म्हणाले.

भावना फिल्टर न झाल्याचा परिणाम

भावनांवर विचारांची प्रक्रिया होणे खूप गरजेचे आहे आणि अशा प्रकारे भावना फिल्टर होऊनच समाजमान्य पद्धतीने बाहेर पडल्या पाहिजेत. या पद्धतीने भावनांचे फिल्ट्रेशन झाले नसेल तर अशा घटना घडू शकतात किंवा अशा घटनांना खतपाणी मिळू शकते. युवा अवस्थेत फार मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या मुलांच्या-युवकांच्या भावनांना धीर-संयमाची जोड ही संस्कारांतूनच मिळू शकते, असे मानसतज्ज्ञ मधुरा अन्वीकर म्हणाल्या.

भावनांचा उद्रेक वेळीच ओळखा

या दुर्दैवी घटना म्हणजे विचारसरणीचा दोष म्हणता येईल. त्यासाठी युवकांचे 'रोल मॉडेल' कोण आहेत, कुटुंबाची एकूण स्थिती-पार्श्वभूमी कशी आहे, कुटुंबीय युवकांशी संवाद साधतात का व कसा, मुलांचे-युवकांचे ऐकून घेतले जाते का, याचाही विचार करावा लागणार आहे. मात्र युवकांची ही मानसिकता वेळीच ओळखता आली तर अशा दुर्दैवी घटना नक्कीच टाळता येऊ शकतील. तीव्र निराशा-हतबलता किंवा राग-सूड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि शास्त्रामध्ये 'हाय डोपामाईन' म्हणजेच 'इंन्टेन्स अॅग्रेशन' असे मानले जाते, असे नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मनोविकृती विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद देशपांडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदली समर्थक शिक्षकांचा आज मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लवकर राबवावी; तसेच सरकारच्या धोरणास समर्थन देणाऱ्या शिक्षकांचा मोर्चा सोमवारी काढण्यात येणार आहे. बदली प्रक्रियेस विरोध करणाऱ्या शिक्षकांनीही १६ एप्रिल रोजी मोर्चा काढण्याचे ठरविले होते, मात्र पोलिसांनी बदली समर्थक शिक्षकांना मोर्चाची परवानगी दिली. त्यामुळे बदली विरोधक शिक्षकांचा मोर्चा १९ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे.

जिल्हांतर्गत बदलीबाबत सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. बदली हवी असणाऱ्यांनी सरकारच्या समर्थनार्थ तर बदली नको असणाऱ्यांनी सरकारविरोधात एकाच दिवशी सोमवारी मोर्चे आयोजित केले होते. मुख्यमंत्री सोमवारी शहरात येणार असल्याने दबावगट निर्माण करण्यासाठी एकाच दिवशी मोर्चांचे आवाहन केले होते, परंतु पोलिस प्रशासनाकडून बदली हवी असणाऱ्यांच्या सरकारच्या समर्थनार्थ मोर्चालाच १६ एप्रिल रोजी परवानगी देऊन बदली विरोधातील गटाच्या मोर्चाला सोमवारची परवानगी नाकारून १९ एप्रिल रोजी परवानगी दिली. बदली हवी कृती समितीकडून सोमवारी हा मोर्चा जिल्हा परिषद मैदानावरून विभागीय आयुक्त कार्यालयावर दुपारी एक ते चार या वेळेत आयोजित केला आहे.

पाच एप्रिलनंतर बदली पोर्टल सुरू झाल्यापासून शिक्षकांतील वातावरण गरम झाले आहे. गेल्या वर्षी चार नोव्हेंबर रोजी बदली विरोधी गटाने मोर्चा आयोजित केल्याने दबाव निर्माण होउन बदली प्रक्रिया रद्द झाली होती. यंदा तसे होणार नाही, यासाठी बदली हवी कृती समिती जागृत असल्याने सरकारच्या समर्थनार्थ हा मोर्चा आयोजित केला आहे. हक्क मिळवण्यासाठी हजारो शिक्षकांनी मोर्चात सामील होऊन शासनाला पाठबळ देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. दुसरीकडे बदली प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी मराठवाडास्तरीय मोर्चाचे आयोजन १९ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशात सुधारणा आवश्यक आहे. या पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली, तर शिक्षकांवर अन्याय होईल, असे मत समिनीने निवेदनाद्वारे मांडले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रक्रियांच्या प्रक्षेपणासह मंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट'मध्ये रविवारी (१५ एप्रिल) झालेल्या कार्यशाळेत कर्करोग शस्त्रक्रियांच्या थेट प्रक्षेपणासह चर्चासत्र तसेच व्याख्यानांमधून एकूणच कर्करोग आणि त्यावरील निरनिराळ्या उपचार व शस्त्रक्रियांवर मंथन घडून आले. विशेष म्हणजे 'स्टेट कॅन्सर'मध्ये पहिल्यांदाच शस्त्रक्रियांचे प्रक्षेपण झाले आणि सुमारे शंभर तज्ज्ञ डॉक्टरांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

राज्य कर्करोग संस्था म्हणजेच शासकीय कर्करुग्णालयामध्ये ही कार्यशाळा झाली. यानिमित्ताने 'स्टेट कॅन्सर'च्या शस्त्रक्रियागृहामध्ये झालेल्या जिभेच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया तसेच थायरॉईड कर्करोगाच्या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण रुग्णालयातील सभागृहात दाखवण्यात आले. या प्रसंगी तीन बाय तीन सेंटिमीटरच्या कर्करोगाच्या गाठीची शस्त्रक्रिया डॉ. महेंद्र कटरे यांनी केली, तर थायरॉईड ग्रंथीच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया डॉ. अजय बोराळकर यांनी केली आणि संपूर्ण शस्त्रक्रियेचे प्रक्षेपण कार्यशाळेत सहभागी झालेल्या डॉक्टरांना पाहता आले. या दरम्यान शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांबरोबर कार्यशाळेत सहभागी डॉक्टरांमध्ये थेट संवादही सुरू होता आणि शस्त्रक्रियांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील महत्वपूर्ण माहिती तसेच अनुभवांचेही सहजच आदान-प्रदान झाले. अनेकांच्या अनेक शंका-कुशंकांचे निरसनही झाले. अतिशय सुस्पष्ट प्रक्षेपणामुळे सहभागी डॉक्टरांना शस्त्रक्रिया समजून घेणे जास्त सुकर झाले. त्याचबरोबर 'स्टेट कॅन्सर'मधील विभागप्रमुख डॉ. सुनिल देशमुख यांनी, शल्यचिकित्सकांच्या दृष्टिकोनातून 'हेड अँड नेक'ची शरीररचनाशास्त्र, 'हेड अँड नेक' कर्करोगांमध्ये 'इंटरव्हेश्नल रेडिओलॉजी'च्या भूमिकेबाबत 'एमजीम'मधील डॉ. शिवाजी पोले, 'हेड अँड नेक' प्रकारातील कर्करोगांच्या क्ष-किरण तपासण्या आणि शल्यचिकित्सकांकडून असलेल्या अपेक्षांवर घाटीच्या डॉ. अंजली वासडीकर, न्युक्लिअर मेडिसिनच्या उपचारांवर 'युनायटेड सिग्मा'चे डॉ. प्रफुल्ल जटाळे, पॅथॉलॉजिस्टकडून शल्यचिकित्सकांच्या कोणत्या अपेक्षा असाव्यात, यावर घाटीतील डॉ. हेमंत कोकंडकर, शस्त्रक्रियेनंतरच्या रेडिओथेरपी उपचारांवर कॅन्सर हॉस्पिटलमधील विभागप्रमुख डॉ. बालाजी शेवाळकर यांचे व्याख्यान झाले. तसेच चर्चासत्रामध्ये डॉ. प्रवीण सोनवतकर, डॉ. राजेश सावजी, डॉ. बोराळकर, डॉ. कोकंडकर, डॉ. अतचुल पोरे, डॉ. कटरे हे सभागी झाले होते.

शैक्षणिक उपक्रम हा आत्मा

शस्त्रक्रिया जवळून न्याहाळणे हे शिकण्यासारखे आहे आणि त्यानंतर स्वतः शस्त्रक्रिया करणे हे तितकेच जास्त महत्वाचे आहे. त्याचवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कितीही मोठ्या प्रमाणावर रुग्णांवर उपचार-शस्त्रक्रिया होत असल्या तरी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सातत्याने शैक्षणिक उपक्रम, परिषदा, कार्यशाळा होत राहणे सर्वदृष्टीने उपयुक्त आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिकतात. खरे म्हणजे शिक्षण व शिक्षणविषयक उपक्रम हा कोणत्याही महाविद्यालयाचा आत्मा असतो, असे मत घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. या वेळी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, घाटीचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता पाटील, कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. समीर देशमुख, आयएमएचे माजी शहराध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, डॉ. सचिन नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपोस्टिंग पिट्सची डेडलाईन हुकली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सर्व कम्पोस्टिंग पिट्सचे काम १५ एप्रिलच्या आत पूर्ण करा अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड दम जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त (प्रभारी) नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र, सध्या शहरात मोठ्या प्रमावणवर पिट्सचे काम अपूर्ण असून आता आयुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून कंपोस्टिंग पिटची संख्या तसेच पूर्ण होणारा वेग पाहता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कंपोस्टिंग पीटच्या बांधकामाकडे विशेष लक्ष दिल आहे. आठवडाभरापूर्वीच त्यांनी सेंट्रल नाका, मजनू हिल, सिद्धार्थ उद्यान आणि पडेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या कम्पोस्टिंग पीट बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. शहरात कचराकोंडीच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठिकठिकाणी ४३३ कंपोस्ट पीट तयार करण्याचे नियोजन आहे. मात्र, सद्यस्थितीत यातील केवळ ७७ कंपोस्ट पीट तयार झाले आहेत तर १३३ चे काम सुरू आहेत, तर तब्बल २१८ पिट्सच्या कामाचा अद्यापही श्रीगणेशाच झाला नसल्याची स्थिती आहे.

दोन दिवसांपूर्वी मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांचा कचरा प्रश्नावर घेतलेल्या कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचारी ऐकत नसल्याचे सांगत वेळकाढूपना करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती.

पावसामुळे आपत्तीची भीती

शहरात दोन महिन्यानंतरही कचराप्रश्न कायम आहे. शहरात निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रियेचे नियोजन पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे आहे अन्यथा शहराची स्थिती जूननंतर आपत्तीजनक निर्माण होईल, अशी भीती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारिका गिरधारी यांना पीएच.डी

$
0
0

औरंगाबाद,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सुक्ष्मजीवशास्‍त्र या विषयात सारिका निलेश गिरधारी यांना पीएच.डी. प्रदान केली.

डॉ. स्वाती पेशवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'स्डडीज ऑन प्रोडक्‍शन अॅण्ड प्रोसेस ऑप्टीमायजेशन ऑफ मायक्रोबिअल टॅनेज बाय युजिंग टॅनिन रिच अॅग्रो रेसिडयूज' या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला.

त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिमटाचे ३९उद्योजक चीन दौ-यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारत सरकारच्या उद्योग विभागातर्फे एमएसएमई व एनएसआयसी या दोन विभागाच्या सहकार्याने बुद्धिस्ट इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चर्स अँड असोसिएशन (बिमटा)या संघटनेचे ३९ सदस्य व उद्योजक रविवारी चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले.

पाच दिवसांचा हा दौरा असून यात ते गॉन्झाव्ह या शहरातील कॅन्टॉनफेअर-२०१८ ला भेट देतील. जागतिक दर्जाच्या इंजिनीअरिंग मशीन टूल्सचे हे प्रदर्शन आहे. कुशल तंत्रज्ञान व आधुनिकतेचा वापर करून तयार होणाऱ्या उत्पादनांचे व उत्पादन बनविणाऱ्या कंपनीचे विविध प्रकारचे मशीन पाहून त्याचा औरंगाबादमधील स्थानिक उद्योगामध्ये कसा उपयोग करून घेता येईल व उत्पादकता वाढविता येऊन नवीन रोजगार निर्मिती कशी करता येईल याचा अभ्यास हे उद्योजक या दौऱ्यात करतील. हे प्रदर्शन १९ एप्रिलपर्यंत असेल. या उद्योग दौऱ्यात नंदकिशोर रत्नपारखे, मच्छिंद्र ओव्हाळ, सिद्धार्थ जाधव, दुष्यंत आठवले, विनोद अवसरमल, प्रमोद भोसले, विठ्ठल भुरे, रवी चाबुकस्वार, सुभाष चांदणे, सिद्धार्थ दिपके, मारूती गायकवाड, कडुबा गवई, बलराज जाधव, विलास जाधव, अमोल जावळे, कैलास कांबळे, मिलिंद काशिदे, संदीप केदारे, रवीकुमार खैरनार, भुजंग खिल्लारे, संतोष लाटे, सुभाष मोरे, जितेंद्र मुद्दीराज, सुमीत नरवडे, साहेबराव निकाळे, रामचंद्र पठारे, प्रमोद राऊत, ईश्वर सुतार, कमलेश तायडे, हर्षानंद तायडे, मिलिंद थोरात, रवी वसाटे, उत्तम वाकडे, शिवाजी गांगुर्डे, राजू निळे, प्रभाकर सुभे, एकनाथ पवार आदी सामील झाले ओहत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकूंदवाडी येथे फळे, पाणीपाऊच वाटप

$
0
0

औरंगाबाद,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दुपारी संजयनगर, मुकुंदवाडी येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (कवाडे गट) वतिने व जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे मित्रमंडळातर्फे फळे व पाणीपाऊच वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पक्षाचे मराठवाडा सचिव रवी भाई नाथभजन हे होते. या कार्यक्रमासाठी लक्ष्मण कांबळ, अशोकभाऊ डोळस, पंडीत ढेपे, रामदास लोखंडे, भगवान बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सव्वाशे डझन केळी तसेच दीड हजार पाण्याचे पाऊच मान्यवरांच्या हस्‍ते वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

$
0
0

औरंगाबाद,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी साडेदहा वाजता भडकलगेट येथील पुर्णाकृती पुतळ्यास पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) च्या वतिने अभिवादन करण्यात आले. मराठवाडा प्रदेश संपर्कप्रमुख भाई प्रकाश जाधव तसेच राहुल पडघन, रामदास लोखंडे, भास्कर मुदगल, राजाभाऊ राऊत, भगवान बनसोडे, नितीन सातदिवे, कडुबा जाधव, शेषराव सातपुते, मोतिराम इंगोले, राजू जाधव, राहुल दाभाडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विलास गंगावणे, रविनाथ भजन, अशोकभाई जाधव, लक्ष्मण कांबळे, मिलिंद मोकळे, राजू जाधव यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो पीएच.डी.

फोन, वीज खाबांवर सीसीटीव्ही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून खुलताबाद शहरातील ३० ठिकाणी ६२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. सीसीटीव्हीचे लोकार्पण आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे १९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. हे सीसीटीव्ही कॅमेरे चक्क महावितरण, टेलिफोनच्या खांबावर; खासगी तसेच धार्मिक इमारतींवर बसविण्यात आलेले आहेत. सीसीटीव्ही बसविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात खाबांची तरतूद केली गेली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

काही सीसीटीव्ही कॅमरांपर्यंत चोरट्यांचा सहज हात पोचू शकतो. त्यामुळे सीसीटीव्हीच्या चोरीची भीती मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी व्यक्त केली आहे. सीसीटीव्ही चोरीस गेल्यास पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अशी अपेक्षा मुख्याधिकारी भगत पाटील यांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक हरीष खेडकर यांनी रितसर तक्रार आल्यानंतर पोलिस योग्य कारवाई करतील, असे सांगितले. खुलताबाद पोलिस ठाण्यातर्फे सुचविण्यात आलेल्या ३० ठिकाणांऐवजी अनावश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील महत्त्वाचा रस्ता, चौक, गजबजलेले ठिकाणे येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अपेक्षित आहेत. एकीकडे शहरातील प्रत्येक चौकात सीटीटीव्ही बसवण्यात आले जुने बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. चांगल्या क्षमतेच्या व दिवसरात्र चित्रणाची सोय असलेल्या या कॅमेऱ्यांचे नियंत्रण खुलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे. सीसीटीव्ही बसवलेल्या या कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे व कॅमेरे शोभेची वस्तू बनले आहे. अनेक ठिकाणी त्यांची वायरिंग तुटली, खांब व तारांनी गुंडाळून लावण्यात आलेले कॅमेरे गायब होण्याची शक्यता आहेत. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, अपघात झाल्यास किंवा मंगळसूत्र चोरीसारख्या व इतरही गुन्ह्यांत तपास कामी सीसीटीव्ही चित्रिकरण कामी येऊ शकते. खुलताबाद शहरामध्ये विद्यार्थीनी, महिला व नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी; तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला छेडछाड, चैन स्नॅपिंग, चोरी, हानामारी यासारख्या घटनांना आळा बसविण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे चौकात बसविताना काळजी न घेतल्यामुळे सीसीटीव्ही कानाकोपऱ्यात असल्यामुळे अपघात व इतर महत्त्वांच्या घटनांत त्यांचा उपयोग होण्याची शक्यता कमीच आहे

\Bकोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे\B

सीसीटीव्ही बसविण्यासाठी नगर पालिकेने तयार केलेल्या अंदाजपत्रकात खांबांची तरतूद न केल्यामुळे संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता महावितरण, टेलिफोनच्या खांबावर; तसेच खासगी इमारती, धार्मिक स्थळे, सार्वजनिक मालमत्तेवर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. एस. शिंपी यांच्याकडे विचारणा केली असता सीसीटीव्ही कॅमेरे महावितरणच्या खाबांवर बसविता येत नाही. त्याविषयीची कोणतीही परवानगी आम्ही देऊ शकत नाही. संबंधितांना नोटीस देऊन कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images