Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

२४१ जिल्हा, दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यामध्ये सुमारे २४१ जिल्हा तसेच दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये सुमारे १४ न्यायाधीशांच्या बदलल्या औरंगाबाद जिल्ह्यात झाल्या आहेत.

\Bजिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या अशा:\B कोपरगावहून शेख एम. वाय. ए. के यांची बदली वक्फ बोर्डला, मुंबईहून एस. एम. भोसले यांची बदली औरंगाबादला, अमरावतीहून भीष्म एस. एस. यांची बदली औरंगाबादला, अंबाजोगाईहून चौधरी के. आर यांची बदली औरंगाबादला, औरंगाबादहून जे. एन. राजे यांची बदली पुण्याला राष्ट्रीय हरीत लवाद येथे, औरंगाबादहून शहापुरे. ए. ए यांची बदली पुण्याच्या कौटुंबिक कोर्टात, औरंगाबादहून एस. एस. गोसावी यांची बदली सोलापूरला, मुंबईहून सावसकर. एस. पी यांची बदली औरंगाबादच्या कौटुंबिक कोर्टात झाली आहे.\B

दिवाणी न्यायाधीशांच्या (वरिष्ठ व कनिष्ठ स्तर) बदल्या अशा:\B औरंगाबादहून व्ही. एस. हिंगणे यांची बदली निफाडला, जळगावहून बी. डी. पवार यांची बदली औरंगाबादच्या जिल्हा ग्राहक मंचात, कोल्हापूरहून व्ही. एस. देशमुख यांची बदली औरंगाबादच्या लेबर कोर्टात, औरंगाबादहून एस. डब्ल्यू. उगले यांची बदली निफाडला, औरंगाबादहून व्ही. जी. उपाध्ये यांची बदली साताऱ्यात, औरंगाबादहून पी. व्ही. हिंगणे यांची बदली नाशिकला, वडगाव कोल्हापूरहून अंबोडकर. जे. एम यांची बदली पैठणला, पनवेलहून आर. एम. चव्हाण यांची बदली औरंगाबादला, सेलू (वर्धा) येथून एन. व्ही. बन्सल यांची बदली खुलताबाद (औरंगाबाद) येथे, वर्धाहून आर. एन. बन्सल यांची बदली औरंगाबादला, वैजापूरहून ए. टी. शेटे यांची बदली जव्हार (ठाणे) येथे, पुण्याहून शेजवळ काळे पी. टी यांची बदली वैजापूरला, चिखलीहून कुलकर्णी. पी. एस. यांची बदली कन्नडला, कन्नडहून ए. एस. पंडागळे यांची बदली शिरपूरला, औरंगाबादहून ए. यू. सुपेकर यांची बदली पुण्याला, पैठणहून एच. एस. पुरद्उपाध्ये यांची बदली औरंगाबादला झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरीच्या विविध घटनात लाखोचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरीच्या विविध घटनांत चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लंपास केला. सिडको, चिकलठाणा, क्रांतीचौक परिसरात हे प्रकार घडले. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चोरीच्या पहिल्या घटनेत सिडको बसस्टँडवरून प्रवासी महिलेचे पन्नास हजार रुपये लांबवले. रविवारी दुपारी पावणेदोन वाजता हा प्रकार घडला. जालना येथील ही महिला शहरात आली होती. पुन्हा जालना येथे जाण्यासाठी ती बसमध्ये चढत होती. यावेळी तिच्या पर्समधून चोरट्यानी पन्नास हजार रुपये लांबवले. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चोरीची दुसरी घटना शनिवारी रात्री चिकलठाणा, सुंदरवाडी येथे घडली. येथील परमेश्वर भिवाजी घोरपडे यांच्या व त्यांच्या शेजाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एलईडी, मनी मंगळसूत्र, कानातील बाळी व रोख बाराशे रुपये असा तेवीस हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या महिलेचे आठ हजाराचे मंगळसूत्र पळवले. शनिवारी रात्री साडेआठ वाजता पैठणगेट भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत सातारा परिसरातून विद्यार्थ्यांचे पंधरा हजारांचे तीन मोबाइल लंपास करण्यात आले. सोमवारी सकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी गोरखनाथ ज्योतीलाल राठोड (रा. सातारा परिसर) यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ लाखांचा माल लंपास

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किराणा दुकानाचे गोदाम फोडून चोरट्यांनी तब्बल पंचवीस लाखांचा माल लंपास केला. मंगळवारी पहाटे जालना रोडवरील शेकटा गावात ही घटना घडली. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेकट्यातील प्रवीण संजयकुमार झंवर यांचे वेशीजवळ शिव ट्रेडर्स नावाने दुकान तर गावातच बसस्थानकाजवळ ओंकार किराणा स्टोअर्स आहे. झंवर यांचे वडील गेल्या तीस वर्षांपासून गावात दुकान चालवतात. घराच्या पाठीमागेच झंवर यांचे पत्र्याचे गोदाम आहे. या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर किराणा व तंबाखूचा माल ठेवण्यात येतो. मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजता एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो जालना रोडवर आला. झंवर याच्या घराजवळील गल्लीतून चार संशयित गोदामाकडे गेले, तर चालक व एक संशयित ट्रॅव्हल्सजवळ थांबला. चोरट्यांनी झंवर यांच्या घराकडून गोदामाकडे येणाऱ्या दरवाज्याची कडी लावून घेतली. त्यानंतर गोदामाचे कुलूप तोडले. गोदामातला माल ट्रॅव्हल्समध्ये हलवून पसार झाले. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, करमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक बालक कोळी यांनी भेट देत पाहणी केली.

\Bचहा, तंबाखू, तांदूळ, सुपारी पळवली

\B१२ एप्रिल रोजी झंवर यांच्या गोदामामध्ये आसाम चहाच्या ३५ बॅग, तर सोमवारी गाय छाप तंबाखूचा माल आला होता. चोरट्यांनी तांदळाचे १६ कट्टे, सुपारीचे आठ पोते, गाय छाप तंबाखूचे १७० पोते, शिवाजी बिडीचे पाच कार्टून, खोबऱ्याचे १९ पोते आणि सिगारेटचे दोन कार्टून लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’साठी १६ जागा गहाण ठेवण्याचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत गटार योजनेच्या कर्जासाठी हडकोकडे सोळा मालमत्ता तारण ठेवण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. त्यात संपूर्ण शहरातील बालगोपाळांचे आकर्षण असलेल्या सिध्दार्थ उद्यान, नेहरू बालोद्यान, बोटॅनिकल गार्डनचा (वनस्पत्युद्यान) देखील समावेश करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरात महापालिकेतर्फे भूमिगत गटार योजनेचे काम केले जात आहे. हा प्रकल्प ४६५ कोटी रुपयांमुळे रखडला आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती द्यायची असेल तर कर्ज काढावे लागेल, असा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. भूमिगत गटार योजनेसाठी महापालिकेला हुडकोकडून ८७ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज काढायचे आहे. कर्ज रक्कमेच्या १२५ टक्के मूल्यांकनाच्या मालमत्ता महापालिकेस हुडकोकडे तारण ठेवाव्या लागणार आहेत. महापालिकेच्या मालमत्ता विभागाने आतापर्यंत कोणत्याही वित्तीय संस्थेकडे तारण न ठेवलेल्या मालमत्तांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये सिद्धार्थ उद्यान, नेहरू बालोद्यान, सिडको एन ८ येथील बोटॅनिकल उद्यान, जालना रोडवरील नगरभूमापन क्रमांक १२८७७ अ - दोनमधील औरंगाबाद लँडमार्क, मुळे-तापडिया इमारत, श्रेयनगर येथील तापडिया इमारत, दिशा कोटगिरे इमारत, रेमंड शोरुमच्या वरच्या मजल्यावरील ह़ॉल, नुपूर अपार्टमेंट लगत असलेले महापालिकेचे व्यापारी संकुल व हॉल, कांचनवाडी येथील गटक्रमांक ३९, चिकलठाणा येथील गटक्रमांक २३२ येथील दुग्धनगरीची जागा, हर्सूल गटक्रमांक २१६ व २१७, नगरभूमापन क्रमांक १८०८८ व १८०८९मधील खुली जागा, चिकलठाणा येथील एसटीपी प्लांट, सलीम अली सरोवरालगतचा एसटीपी प्लांट,हडको एन ११ येथील महापालिकेचा दवाखाना या मालमत्तांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व मालमत्तांचे मूल्यांकन काढण्यासाठी नोंदणीकृत मूल्यवर्धकाची मदत घ्यावी लागेल, असे मालमत्ता विभागाने म्हटले आहे.

महापालिकेने आयडीबीआय बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्ता

१. खडकेश्वर येथील वाचनालय

२. क्रांतीचौक येथील व्यापारी संकुल व आरोग्य केंद्र

३. ज्युबलीपार्क येथील उद्यान

४. चिकलठाणा येथील आठवडी बाजार

५. रिलायन्स मॉल लगतची इमारत, गारखेडा

६. पिया मार्केट, औरंगपुरा

७. सिटीमार्बल इमारत, निरालाबाजार

८. नगरभूमापन क्रमांक १९३८१ / ८/१ अ रेल्वेस्टेशन रोड बन्सीलालनगर

९. गट क्रमांक ७/१ कांचनवाडी एसटीपी प्लांट

१०. गट क्रमांक ६ कांचनवाडी

११. गट क्रमांक ४ कांचनवाडी

१२. गट क्रमांक ५ कांचनवाडी

१३. गट क्रमांक ६६ कांचनवाडी

१४. नगर भूमापन क्रमांक १२८७७/अ/१ सिटी प्राइट इमारत, जालनारोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदली धोरणाविरोधात उद्या शिक्षकांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी धोरण जाहीर केले होते. त्यानुसार ७० ते ८० टक्के शिक्षकांवर अन्याय होणार आहे. सार्वत्रिक बदली प्रक्रियेला आमचा विरोध नाही, पण त्यातील अटी अन्यायकारक आहेत. बदली धोरण राबविताना या अडचणी दूर कराव्यात, या विरोधात मराठवाड्यातील शिक्षकांचा १९ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात हजारोंच्या संख्येने शिक्षक सहभागी होणार आहे, अशी माहिती कृती समितीचे संतोष ताठे, दिलीप ढाकणे, सदानंद माडेवार यांनी मंगळवारी पत्रकारांनी दिली.

याप्रसंगी महेंद्र बारवाल, संतोष जाधव, रमेश जाधव, सुषमा राऊतमारे, रोहिणी विद्यासागर, इलहाजउद्दीन फारुकी, शेख मोईनोद्दीन आदींची यावेळी उपस्थिती होती.

राज्य सरकारने केलेल्या २७ फेब्रुवारीच्या बदली धोरमात अनेक अन्यायाकारक बाबी आहेत. सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्यावर्षी लाखोंच्या संख्येने शिक्षकांनी मोर्चे, आंदोलने केली. त्यावेळी सरकारने अंशत: बदल करून राबविले जाईल, असे आश्वासन दिले होते. पण अन्यायकारक बाबींची दुरुस्ती न करता सरकारने बदली प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे राज्यातील ७० ते ८० टक्के शिक्षकांवर अन्याय होणार आहे. बदली प्रक्रिया राबविताना शिक्षकांच्या बदल्या पदनिहाय टक्केवारी नुसार करण्यात याव्यात, बदली पात्रतेसाठी एकूण सेवा न धरता शाळेतील उपस्थिती दिनांकानुसार बदल्या करण्यात याव्यात, सुगम, दुर्गम राज्यातील सर्व जिल्ह्यांसाटी एकच निकष निश्चित करून पुन्हा सर्वेक्षण करावे, सुगम - दुर्गम गावे घोषित करण्यात येऊन निकष राज्यात असावे, बदल्यांची खो - खो पद्धत बंद करण्यात यावी, संवर्ग दोन मध्ये असणाऱ्या पती पत्नीला स्वइच्छेने नकाराधिकार देण्यात यावा, बदल्यापूर्वी समायोजन व पदोन्नती करूनच बदली प्रक्रिया राबविण्यात यावी आदी मागण्या मांडणार येणार आहेत.

या सरकारने बदल्यांचा खेळ मांडला आहे. जिल्हा परिषद शाळा बंद करून बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप शिक्षकांनी केला.

१९ एप्रिलच्या मोर्चानंतरही जर काहीच बदल झाला नाही तर राज्यातील शिक्षकांचा मुंबईत मोर्चा काढण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साऊथ कॅरोलिनाला या अन् उद्योग सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अमेरिकेतील साऊथ कॅरोलिनाला या… आणि करा उद्योग सुरुवात किंवा उद्योगाचा विस्तार करा', असे आवाहन साऊथ कॅरोलिना या राज्याच्या वाणिज्य विभागाचे राजदूत तरुण गुप्ता यांनी औरंगाबादमध्ये केले. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर(सीएमआयए)मध्ये मंगळवारी त्यांनी संवाद साधताना उद्योजकांना हे आवाहन केले.

यावेळी सीएमआयएचे माजी अध्यक्ष आशिष गर्दे, यशश्री इंडस्ट्रिजचे सदानंद पाटील, सीएमआयएचे अनंत पोळ, सीएमआयए मॅजिकचे महेश आदींची उपस्थिती होती. गुप्ता म्हणाले, 'अमेरिकेतील सर्वात लहान आणि जागतिक पातळीवर असलेले ऑटोमोबाईल, केमिकल, कॉटन उद्योगातील सर्वाधिक ब्रँड असलेल्या कंपन्या साऊथ कॅरोलिना भागात आहेत. दक्षिण कॅरोलिनामध्ये उद्योग विस्ताराची मोठी संधी आहे. या छोट्या राज्यात ४० देशातील १२०० हून अधिक उद्योग सुरू आहेत. औरंगाबादच्या उद्योजकांनीही विस्तारासाठी किंवा नविन उद्योग सुरू करण्यासाठी दक्षिण कॅरोलिनाची निवड करावी.'

भारताच्या तुलनेत स्वस्त जागा, कुशल मनुष्यबळ आणि सरकारचे रेड कार्पेट यामुळे दक्षिण कॅरोलिना उद्योगांसाठी अनुकूल असल्याचे भारतीय कार्यालयाचे संचालक तरुण गुप्ता यांनी सांगितले. दक्षिण कॅरोलिनामध्ये उद्योग सुरू करण्याची माहिती देण्यासाठी तेथील अमेरिका सरकारच्या वाणिज्य विभागाअंतर्गत येणाऱ्या भारतीय कार्यालयाचे संचालक तरूण गुप्ता आणि सीमरन यांनी उद्योजकांशी चर्चा केली. सकाळी त्यांनी वाळूज औद्योगिक वसाहतीला भेट देऊन उद्योगांची पाहणीही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवा संघटनेतर्फे आज ध्वजवंदन, दुचाकी फेरी

$
0
0

औरंगाबाद : शिवा संघटनेतर्फे १८ एप्रिलला महात्मा बसवेश्वर चौक येथे सकाळी नऊ वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी ध्वजावंदन करण्यात आले. यावेळी शिवा संघटनेचे मनोहर धोंडे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह स्वागताध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमानंतर मोटारसायकल फेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी बसवेश्वर चौकातून मोंढा नाका, क्रांतीचौक, नूतन कॉलनी, पैठण गेट, गुलमंडी, सिटीचौक, महात्मा गांधी यांचा पुतळ्याहून शहागंज, चेलीपूरा, जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे टीव्ही सेंटरहून स्वामी विवेकानंद उद्यानात पोचेल. तेथे फेरीचा समारोप करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवा संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप कुठलाच तोडगा काढलेला नाही. दरम्यान मंगळवारी सायंकाळी मुंबईत यासंदर्भात बैठक होती, पण त्यातून काही तोडगा निघाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिक्षणाच्या व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेमध्ये बिनशर्त समायोजन, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 'समान काम समान वेतन' या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद अंतर्गत विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर ११ एप्रिल पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. सहा दिवसांत आमदार, लोकप्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्या सरकारकडे मांडण्याचे आश्वासन दिले, पण त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्राह्मण रोजगार अभियानातून तरुणांना संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्राह्मण समाजातील तरुणांना नोकरी, व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळवून देण्यासाठी पुढे आलेल्या ब्राह्मण रोजगार अभियानाच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आजवर असंख्य समाजातील तरुणांना या उपक्रमाचा लाभ मिळाला असून, येणाऱ्या काळात विविध अभिनव सेवा देण्यावर भर राहणार आहे.

समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासह त्यांना विविध पर्यायांची माहिती देण्याचे काम ब्राह्मण रोजगार अभियानांतर्गत केले जात आहे. तरुणांना नोकरीच्या संधीची माहिती दिली जातेच, शिवाय व्यवसाय करण्याची तयारी असणाऱ्या तरुणांना त्याचा हक्काचा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. व्यवसायासाठी लागणारे भांडवल कोणत्या बँकेतून मिळवावे, व्यवसायाला वाढवण्यासाठी काय केले जाऊ शकते, याची इत्यंभूत माहिती दिले जाते.

ब्राह्मण रोजगार अभियानाची सुरुवात २०१६मध्ये झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजगार अभियान अस्तित्वात आले. व्हॉट्स अॅप ग्रुप, फेसबुक, एसएमएस, लिंक्डइन यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील तरुणांना जोडण्याची किमया या अभियानाने साधली आहे. तरुणांचा डेटा संकलित करून तो विविध खासगी कंपन्यांमधील एचआर विभागात पाठवून योग्य उमेदवाराला साजेशी संधी मिळवून देण्याचे काम केले जाते. विशेष म्हणजे अभियानातील सदस्य स्वतः वेगवेगळ्या एमआयडीसीत जाऊन कंपन्यांना कोणते उमेदवार हवे आहेत याची माहिती संकलित करतात. या कामासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेतले जात नाही.

ब्राह्मण रोजगार अभियानाचे मुख्य संयोजक रवींद्र पाडळकर, मुख्य समन्वयक सचिन पांडव, रेखा कुलकर्णी, अंजली गोरे, गीता आचार्य, नेहाली खोचे, मनोहर देशपांडे,चैतन्य देशपांडे, मिलिंद कुलकर्णी, विवेक जोशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या उपक्रमांना चालना देण्यासाठी कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसवेश्‍वर जयंती; आज मिरवणूक

$
0
0

औरंगाबाद: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा उत्सव समितीतर्फे बुधवारी सायंकाळी फकीरवाडी येथील संगमेश्वर मठापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता महात्मा बसवेश्वर चौक (आकाशवाणी) येथे महात्मा बसवेश्‍वर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजवंदन होईल. यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीतर्फे जनावरांसाठी चारा वाटप करण्यात येईल. त्यानंतर दुचाकी फेरी काढण्यात येईल. क्रांती चौकातून संत एकनाथ रंगमंदिर, ज्योतीनगर, चेतक घोडा, त्रिमूर्ती चौक, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, सिडको बसस्थानक, कॅनॉट प्लेस, बजरंग चौकमार्गे टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यानातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर फेरीचा समारोप होईल. सायंकाळी सहाला संगमेश्वर मठ येथून मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणुकीनंतर संगमेश्वर मठ येथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उत्सव समितीतर्फे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे अर्धे शहर अंधारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

मंगळवारी संध्याकाळी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणची वीज गुल झाली अन् अर्धे शहर अंधारात बुडाले. सुमारे अडीच तास वीज वितरण व्यवस्था सुरळीत होऊ शकली नाही.

औरंगाबाद शहरातील छावणी, सातारा, देवळाई, शिवाजीनगर, गारखेडा, चिकलठाणा, उस्मानपुरा, नारेगाव, ब्रीजवाडी आदी भागांत वीज पुरवठा खंडित झाला होता. याशिवाय शहरातील जुन्या भागात सिटीचौक, नवाबपुरा तसेच रोशन गेट, किराडपुरा, आझाद चौकसह सिडको, हडको भागातही अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.

शहरात सायंकाळी सहा वाजेपासून ते रात्री साडे आठ वाजेपर्यंत शहरातील अनेक भाग अंधारात होते. याबाबत महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी शहराला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे तारा तुटल्या व वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती दिली.

गारखेड्यात चार तास अंधार

शहराला लागूनच असलेल्या गारखेडा परिसरामध्ये नागरिकांना जोरदार पाऊस आणि अंधाराचा मोठा त्रास सहन करावा लागला. सायंकाळी गेलेली वीज तब्बल चार तास गायब होती, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा

$
0
0

सरकारी विभागांमध्ये कार्यरत

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा

सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकाला स्थगिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक करताना पहिल्यांदा ११ महिन्यांसाठी करार पद्धतीने नियुक्ती करावी. मुदतीनंतर करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढवता येईल, मात्र अशी मुदत वाढवताना जास्तीत जास्त तीन वेळा नियुक्ती करता येईल. यानंतर मात्र त्या उमेदवाराला कंत्राटी पद्धतीने पुन्हा नियुक्ती देणे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यावर अवलंबून असेल अशा आशयाचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने गेल्या महिन्यात काढले होते. त्यामुळे हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिपत्रकाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील १२०० तर मराठवाड्यातील ५० ते ६० हजार कंत्राटी कामगार यामुळे चिंतामुक्त झाले आहेत, असे मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळातील सदस्य सत्यजित देशमुख यांनी सांगितले.

राज्याच्या विविध विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार अत्यंत तातडीची गरज म्हणून तात्पुरत्या स्वरुपात कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी सेवेत नियमित सामावून घेण्याची मागणी केली, तर ती मान्य करता येणार नाही. यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी किंवा त्यांच्याअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये यापुढे कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आलेल्या पदांवर नियुक्ती देताना ९ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या परिपत्रकात केलेल्या अटी, शर्तींचे पालन करावे असे म्हटले होते. या अटी शर्तीनुसार या नेमणुका पूर्णत: कंत्राटीपद्धतीने राहतील. ११ महिन्यांच्या करार पद्धतीनुसार केलेली कंत्राटी नियुक्ती ही जास्तीत जास्त तीनवेळा करता येईल. त्यानंतर अशा उमेदवारांची पुन्ही नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे सक्षम प्राधिकाऱ्याचे मत असेल तरच त्या उमेदवाराला पुन्हा निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. याचा अर्थ एखादा उमेदवार कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत आला तर फार तर ३३ महिनेच त्यांच्या सेवेची शक्यता त्यानंतर त्या कर्मचाऱ्याचे भविष्य सक्षम प्राधिकाऱ्याच्या मनावरच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने हवालदिल झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये सामान्य प्रशासन विभागाने काढलेले ते परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी या महिन्यात बुधवारी सात मार्च रोजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास कंत्राटी कर्मचारी महासंघ (पाणीपुरवठा व स्वच्छता ) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक बोलावून चर्चा केली आणि त्या परिपत्रकाला स्थगिती दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार मोटारसायकलची चोरी , तर मालासह ट्रक चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहरात एका ट्रकसह पाच मोटारसायकलची चोरी झाली आहे. विविध पोलिस ठाण्यांमध्ये या चोरीची नोंद करण्यात आली आहे.

शेख अश्फाक (३३) रा. राहुलनगर यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच २० सीई ००५६) ही १३ एप्रिल रोजी ईडन गार्डन मंगल कार्यालयासमोर लावली होती. सकाळी ९ वाजेच्या दरम्यान गाडी लावल्यानंतर दुपारी ३ वाजता दुचाकी घेण्यासाठी परत आले असता अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याचे लक्षात आले. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत तान्हाजी साहेबराव चव्हाण (२९, रा. महाजन कॉलनी) यांनी आपली दुचाकी (एमएच २० डीक्यू ३७८८) १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घरासमोर उभी केली होती. १७ एप्रिलला सकाळी ६ वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत १६ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता मधुकर बबनराव थोटे (रा. निपाणी) यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच २० एपी २५१७) केळीबाजार येथे उभी केली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथ्या घटनेत, सिग्मा हॉस्पिटलच्या भिंतीजवळ निर्मल कुमार जेना (रा. पंचशिलनगर बीड बायपास) यांनी आपली १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उभी केली होती. एक तासातच अज्ञात चोरट्याने जेना यांची दुचाकी (क्रमांक एमएच २० डीयू ८९९६) चोरली. या प्रकरणात जवाहननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजय साईनाथ ठेंग (२५ रा. ठाकरे नगर, सिडको) यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच २० डीएन ६९५५) २५ मार्च रोजी ११ वाजता घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिमेंटच्या मालासह ट्रक चोरीला

बीड बायपास रोडवर १० एप्रिल रोजी दुपारी ५ वाजेच्या दरम्यान शिरीष रंगनाथराव कंदी रा. बन्सीलालनगर यांच्या मालकीचा सिमेंटचा ट्रक (क्रमांक एमएच २० एटी ३५९३) हा सागर हॉटेल जवळ उभा केला होता. या ट्रकमध्ये ३४० गोण्या असलेला एक लाख रूपये किंमतीचा माल भरलेला होता. अज्ञात व्यक्तीने सिमेंटने भरलेला ट्रक चोरून नेला. शिरीष कंदी यांनी नोंदविलेल्या तक्रारीत ट्रक सह मालासह तीन लाख रुपयांचा माल चोरीला गेल्याची तक्रार सातारा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परशुराम सेवा संघाची गुन्ह्याच्या तपासाची मागणी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्राह्मण समाजावर सोशल मीडियातून होत असलेली टीका व ब्राह्मण समाजातील महिलांवर होणाऱ्या गुन्ह्याचा तपास लावण्यात यावा, अशी मागणी परशुराम सेवा संघाने पोलिस आयुक्त कार्यालयात एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात श्रुती भागवतच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणारे गुन्हेगार गजाआड करावेत, संकेत कुलकर्णी खून प्रकरणात विशेष न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी, शहरातील कॉलेज, क्लासेस येथे पोलिस बंदोबस्त वाढवून टवाळकी करणाऱ्या गुंडाना अटक करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देणाऱ्या या शिष्टमंडळामध्ये परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष अनिल शिवाजीराव मुळे, मोरेश्वर सदावर्ते, वेदांत जहागीरदार, प्रयागदास देशमुख, केदार पाटील, गोपाळ कुलकर्णी, जयवंत ओक, प्रथमेश दुधगावकर, महेश कुलकर्णी, शिवम पांडे, रंजना कुलकर्णी, किरण शर्मा, स्मीता शाम जोशी, सुचिता कुलकर्णी यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३२ जोडपी विवाह बंधनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर (बुधवारी) दर्गा रोड परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात आत्महत्याग्रस्त तसेच अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील ३२ जोडपे विवाहबंधनात अडकले. श्री. बालब्रह्मचारी महाराज यांच्यासह हजारो वऱ्हाडीमंडळीच्या साक्षीने हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू, मंगळसूत्र आदी साहित्यांसह लग्नस्थळी येण्या-जाण्याचा सर्व खर्च संयोजकांनी केला. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा देतानाच हुंडा प्रथा नष्ट करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, सामुदायिक विवाहसोहळ्यासारख्या सामाजिक उपक्रमात सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन केले. नाम फाउंडेशनच्या सहकाऱ्याने जायंटस ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राईड, भाईश्री फाउंडेशन आणि अॅड. रामेश्वर तोतला आदींनी मिळून विवाहसोहळा आयोजित केला होता.

औरंगाबाद, जालनासह मराठवाड्यातील वधू, वर वऱ्हाडीमंडळी सकाळीच विवाहस्थळ श्रीहरी पॅव्हेलियन येताच संयोजकांनी त्यांचे स्वागत केले. ३२ जोडप्यांची तयारी होताच दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोठ्या धडाक्यात परिसरातून वरात काढण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास मंत्रोच्चारात ही ३२ जोडपी विवाहबंधनात अडकली. श्री. बालब्रह्मचारी महाराज, अभिनेते मकरंद अनासपुरे, आमदार अतुल सावे, जायंटसचे अध्यक्ष प्रवीण सोमाणी, सचिव अभय शहा, भाईश्री रमेशभाई पटेल, भावेश पटेल, अॅड. रामेश्वर तोतला, राहुल तोतला, दिनेश मालानी, विजय चौधरी, राजेश वैष्णव, महेश डागा, नितीन अग्रवाल, शाम खटोड, गोपाल सारडा यांच्यासह हजारो वराडी उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. बालब्रह्मचारी महाराज यांच्यासह अन्य पाहुण्यांनी नवविवाहित जोडप्यास आशिर्वाद देत भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या, तर नामचे मकरंद अनासपुरे यांनी हुंडा देण्यासाठी लग्नाचा खर्च करण्यासाठी वडिलांकडे पैसा नाही म्हणून मुलीने आत्महत्या केल्याच्या घटना किती वेदनादायी आहे, असे सांगत याबाबत समाजानेच विचार केला पाहिजे. सामुदायिक विवाहसोहळ्यासह अन्य सामाजिक उपक्रमात समाजातील प्रत्येकाने आपला वाटा उचलला तर नैराश्याचे वातावरण दूर होण्यास मोठी मदत मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

तीन महिन्यांपासून तयारी

सामाजिक दायित्व म्हणून जायंट्सच्या तरुण कार्यकर्त्यांनी शेतकरी कुटुंबासाठी मदतीचा हात द्यावा, हा मानस व्यक्त करत सोहळ्याचे नियोजन केले. नाम फाउंडेशनसह अन्य देणगीदारांनी त्यास साथ देत मार्गदर्शन केले. नामचे कार्यकर्ते तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माहिती संकलित करत स्वंयसेवकांनी गरजू कुटुंबातील विवाह इच्छूक मुला मुलीची माहिती मिळविली. सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्व पटवून देत त्यांनी ३२ जोडप्यांची यादी तयार केली. यात एक जोडपे अंध असून यासह चार दिव्यांगाचे लग्न या सोहळ्यात धडाक्यात लागले. या सर्व नवविवाह जोडप्यांच्या पालकांना कोणताही आर्थिक भार पडू नये म्हणून विवाहस्थळी येण्या -जाण्याचा प्रवासखर्चासह संसारोपयोगी वस्तू, मंगळसूत्र, नवीन कपडे आदी सर्व साहित्याचे वाटप संयोजकांतर्फे करण्यात आले.

वाढदिवस उत्साहात

अनी शिंदे या वराचा बुधवारीच वाढदिवस होता. त्यामुळे या सोहळ्यातच त्याचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. त्यास खास भेटवस्तूही देण्यात आली.

मी माझी जीवनसाथी आम्ही दोघेही दिव्यांग आहोत. एकमेकांना साथ देत संकटाचा सामना करत आम्ही निश्चित यशस्वी जीवन जगू. या सोहळ्यामुळे मोठी मदत आणि उमेद आम्हाला आमच्या पालकांनाही मिळाली.

विजय उबाळे, नवरदेव रा. वरखेड

दोन एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यात काय पिकणार. मुलाचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले असून तो दिव्यांग आहे. नात्यातील मुलीशी त्याचे लग्न लागले. संयोजकांनी खूप मदत केली.

आसाराम शिंदे, वरपिता हतोडी, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा परमिट बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

परिवहन विभागाने ऑटोरिक्षा परवाने (परमीट) खुले केले आहेत. यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. परिवहन विभागाने तत्काळ खुले असलेले रिक्षा परवाने बंद करावेत, अशी मागणी मागणीसाठी मराठवाडा ऑटो रिक्षा युनियनतर्फे २६ एप्रिलला आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

परिवहन विभागाने रिक्षा परवाने खुले केल्यामुळे शहरात दररोज २५ ते ३० रिक्षा नविन येत आहेत. शहरात रिक्षांमध्ये वाढ होत असल्याने रिक्षाच्या व्यावसायावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे या विरोधात मराठवाडा रिक्षा ऑटो रिक्षा युनियनचे मजीद भाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रिक्षाचालकांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. रिक्षा परवाने खुले केल्याने रिक्षा चालकांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याने या विरोधात परिवहन विभागाला इशारा म्हणून २६ एप्रिल रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. युनियनचे संस्थापक नसीमभाई यांच्या नेतृत्वाखाली परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या बैठकीला शहराध्यक्ष महंमद मोहसीन, मिर्झा फेरोज, अब्दुल नवाब, शेख जमील, शेख आरेफ शेख युनूस कन्नडी, अश्रफभाई, हाजी कलमीभाई, बब्बुभाई, बाबाभाई, शेख युसूफ, सईद अमोदी, रामदास खिल्लारे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथसागरातून सर्वाधिक बाष्पीभवन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीव्र उन्हामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातून दररोज सुमारे दीड दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असून विभगातील इतर मोठ्या प्रकल्पातून एकूण ३.७०५६ दशलक्ष घनमीटर पाण्याची दररोज वाफ होत आहे.

एप्रिल महिन्यांतच मराठवाड्याचे सरासरी कमाल तापमानाने चाळीशी गाठली असून येत्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका वाढल्याने बाष्पीभवनामध्येही वाढ होणार आहे. सध्या मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये १४५३ दशलक्ष घनमीटर (२८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्‍ध असुन सर्वाधिक ४८ टक्के पाणी जायकवाडी धरणामध्ये आहे. मोठ्या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेती, पिण्यासाठी तसेच उद्योगासाठी वापरण्यात येते, सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणातून आवर्तनेही सोडण्यात आले असून धरणातून औरंगाबाद, जालना शहराला पिण्यासाठी तसेच उद्योगाला पाणी देण्यात येत असल्यामुळे दररोजच्या पाणीसाठ्यातही घट होत आहे.

गेल्यावर्षी जायकवाडी धरणक्षेत्र तसेच जायकवाडीच्या उर्ध्व खोऱ्यामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडीची पाणीपातळी ८५ टक्‍क्यांवर पोचली होती, दमदार पावसामुळे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये असलेल्या धरणांची स्थितीही काहिशी अशीच होती. केवळ औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे यंदा या भागांना सध्या पाणीटंचाईचा सामना करवा लागत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. तुलनेत कमी पडलेला पाऊस तसेच लघु प्रकल्पातील झपाट्याने घटलेले पाण्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये सध्या टँकर सुरू आहेत. शिवाय सध्या उन्हाच्या कडाक्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. एप्रिल महिन्यामध्येही तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसपर्यंत गेल्यामुळे बाष्पीभवनामध्ये वाढ होत आहे. पुढील महिन्यात उन्हाची तीव्रता वाढणार असल्यामुळे एकट्या जायकवाडी धरणातून दररोज २ ते अडीच दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होण्याची शक्यता आहे. यंदा उन्हाळा लांबला तरी औरंगाबाद जिल्ह्यातील काही भाग वगळता पाण्याची फारशी अडचण निर्माण होणार नसल्याचे अधिकारी सांगतात.

प्रकल्पानुसार होणारे बाष्पीभवन

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी सर्वाधिक १.५९८० दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होत असून येलदरीतुन ०.०८५०, सिद्धेश्वर ०.१०००, माजलगाव ०.४२६०,मांजरा ०.१९००, उर्ध्व पैनगंगा ०.३४०६, निम्न तेरणा ०.१२८०, विष्‍णुपूरी ०.०६८०, निम्न दुधना ०.६००० तर सिना कोळेगाव प्रकल्पातून ०.१७०० दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई-वडिलांच्या सेवेसाठी पोलिसाला हवी बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

पोलिस आयुक्तालयामध्ये तब्बल ४५१ अर्ज बदलीसाठी आले आहेत. यामध्ये एका अर्जात आईवडिलांच्या सेवेसाठी बदली करण्यात यावी, अशी भावनिक साद घालण्यात आली आहे. तर मुलांच्या शिक्षणासाठी बदली करावी, असेही अर्जात पोलिस कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

शहर पोलिस आयुक्तालयातील ६०० पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत दिले होते. या बदल्या करताना कारभार पारदर्शक करण्यासाठी बदली प्रक्रिया राबविण्यापूर्वी पोलिसांकडून विनंती अर्ज मागविण्यात आले होते. या बदलीपूर्वी विविध पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली आहे. या आधारावर बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही बदली प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी पहिल्या टप्प्यात पोलिस कर्मचाऱ्यांकडून बदलीपूर्वी विनंती अर्ज मागविण्यात आले होते.

बुधवार (१८ एप्रिल)पर्यंत ४५१ कर्मचाऱ्यांनी विनंती अर्ज दाखल केले आहेत. विनंती अर्ज दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बदली हवी असलेल्या पोलिस ठाण्यासाठी विविध कारणेही सादर केली आहेत. यात ७० कर्मचाऱ्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी विनंती अर्ज सादर केला आहे. तर ८० पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाचे कारण पुढे करून बदली मागितली आहे. तर विनंती अर्ज आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यापासून घर लांब असल्याचे कारणही नमूद केले आहे. आगामी २१ एप्रिलपासून बदल्याची कारवाईला प्रारंभ होणार आहे. २१ एप्रिल रोजी भरणाऱ्या पोलिस दरबारात बदलीचे आदेश देण्यात येणार आहे.

………………

एमआयडीसी पोलिस ठाणेला पसंती जास्त

पोलिस आयुक्तालयात आलेल्या विनंती अर्जावरून पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये यंदा वाहतूक आणि गुन्हे शाखेमध्ये बदली मागण्याचे प्रमाण कमी दिसत आहे. त्याऐवजी अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याला अधिक पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुन्हे शाखा आली आहे. तर वाहतूक विभाग तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीवर गेले आहे. यानंतर बीडीएस, विशेष शाखेचा समावेश असून मुकुंदवाडी, पुंडलिकनगर तसेच वेदांतनगर पोलिस ठाण्याला यंदा पसंती कमी लाभल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक कुलकर्णीच्या विरोधात दोषारोपपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणारा आरोपी नगरसेवक मकरंद कुलकर्णी याच्याविरुद्ध कोर्टात ४३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. १२ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत आरोपीला कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

एन-आठ वॉर्डाचा नगरसेवक व शिवसेनेचा महापालिकेतील गटनेता व आरोपी मकरंद कुलकर्णी हा पीडितेचा अनेक महिन्यांपासून पाठलाग करीत होता. ही बाब विवाहितेने पतीला सांगितल्यानंतर पतीने आरोपीला अनेकदा समज दिली. त्यावर मकरंद कुलकर्णी याच्या घरच्यांनी माफी मागून पुन्हा असे घडणार नाही, असे आश्वासन पीडितेला व पतीला दिले होते. त्यानंतरही आरोपी मकरंदच्या वर्तनात फरक पडला नाही व माझ्याविरुद्ध तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, ११ जानेवारी रोजी सायंकाळी पीडिता झुंबा क्लासला गेली होती. तिचा पाठलाग करीत आरोपी तिथे गेला व पीडितेला अश्लिल बोलून तिची छेड काढली. पीडितेने आरडाओरड करून त्याला त्याच्या वर्तनाचा जाब विचारला असता, आरोपीने तिथून पळ काढला. ही सर्व घटना पीडितेच्या प्रत्यक्षदर्शी मैत्रिणीने तिच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली व त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. पीडितेने तिच्या पतीला व पोलिसांच्या दामिनी पथकाला फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिस येण्यापूर्वी आरोपी पसार झाला होता. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपी चार दिवस फरार होता. या प्रकरणी तपासणी होऊन कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दोन पाणपोया सुरू

$
0
0

औरंगाबाद: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अग्रवाल युवामंचचे सदस्य एकत्रित येऊन त्यांनी उस्मानपुरा व पुंडलिकनगर या ठिकाणी पाणपोयी सुरू केली. याप्रसंगी सभेचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका, प्रो. विशालजी लदनिया व आनंद भारुका यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अग्रवाल युवा मंचचे अध्यक्ष दीपक ओमप्रकाश अग्रवाल, शिरीष अग्रवाल, सचिव अनुप अग्रवाल, सहसचिव मुकेश अग्रवाल, कोषाध्यक्ष अमुल अग्रवाल, सदस्य अनिकेत अग्रवाल, शुभम अग्रवाल आदींची उपस्थिती होती. दोन पाणपोया सुरू केल्यामुळे या भागातील चाकरमानी तसेच नागरिकांची तहान उन्हाळ्यापुरती भागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>