Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उच्चशिक्षणासाठी शिक्षकांना संमती

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सेवेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ११७५ जणांना प्रशासनाने उच्चशिक्षणासाठी परवानगी दिली.

गेल्याच महिन्यात ३० लाख वाटले

$
0
0
पैसे नसल्यामुळे कामे रखडल्याची तक्रार केली जात असताना स्पर्धा व कार्यक्रमांसाठी पैशांचे वाटप करणे कितपत योग्य आहे या बद्दल पालिकेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

‘प्रवासी डे’ ला दांडी मारणाऱ्यांवर होणार कारवाई

$
0
0
प्रवाशांच्या अडचणी लक्षात याव्यात, यासाठी विभागीय नियंत्रकांनी १० डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी 'प्रवाशी डे' साजरा केला. शहर आणि ग्रामीण भागातील बस थांब्यावर थांबणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी माहिती व्हाव्यात यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

वेतनवाढीसाठी बँकर्स रस्त्यावर

$
0
0
वेतनवाढीसह अन्य मागण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने ( युएफबीयू) बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी बँक बंदला औरंगाबादेत मोठा प्रतिसाद ळामिला.

गौताळा अभयारण्यात प्राणिगणना होणार

$
0
0
गौताळा औट्रम घाट अभयारण्यात मागील दोन वर्षांत वाढलेल्या बिबट्यांची संख्या आणि या ठिकाणी अन्य मांसाहारी प्राण्यांसह, वन संपत्तीची मोजणी करण्यात येणार आहे.

न्या. गांगुलींवर कारवाईची मागणी

$
0
0
समाजवादी जनपरिषदेने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती ए. के. गांगुली यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. न्या. गांगुली यांच्यावर वकील महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

‘आमच्या समक्ष स्थळपाहणी करा’

$
0
0
औरंगाबाद झालर किसान संघर्ष समितीने सिडको कार्यालयावर बुधवारी जोरदार निदर्शने केली. स्थळपाहणीसाठी जाताना आक्षेप दाखल केलेल्या व्यक्तीला माहिती द्यावी व त्यांच्या समक्ष स्थळपाहणी करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

रेल्वे क्रॉसिंगवरील कोंडी सोडवा

$
0
0
शिवाजीनगर गारखेडा परिसराचा चांगला विस्तार झालेला आहे. या परिसरापलीकडे बीड बायपास रोडनंतर देवळार्इ, गुरू गणेश नगरसारखा भागही विकसित झालेला आहे. वेगाने विकसित होणाऱ्या महानगराच्या गरजाही वाढत चालल्या आहेत.

अखेर ‘घाटी’ला मिळाला न्यूरोसर्जन

$
0
0
‘घाटी’च्या अतिविशेषोपचार विभागांमध्ये मानद डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. पण त्यांना हव्या त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असते. राजीव गांधी जीवनदायी योजनेतून मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मिलिंद दुनाखे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.

नाताळच्या तीन सुट्यांचा आज होणार निर्णय

$
0
0
दिवाळीच्या वेळी तीन सुट्या कमी दिल्याचा आक्षेप जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी घेतला आहे. या तीन सुट्या नाताळला लागून देण्यासंदर्भात गुरुवारी निर्णय अपेक्षित आहे.

भूमिगत गटार योजनेसाठी आज दिल्लीमध्ये चर्चा

$
0
0
औरंगाबाद शहराच्या भूमिगत गटार योजनेला मंजूरी देण्याच्या मागणीसाठी पालिकेचे शिष्टमंडळ उद्या गुरुवारी दिल्लीला रवाना होणार आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांची भेट घेणार आहे.

अत्याधुनिक कत्तलखान्याला मंजुरी

$
0
0
पडेगाव भागात पालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कत्तलखान्याच्या प्रस्तावाला केंद्र शासनाच्या खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आज बुधवारी मंजूरी दिली. या प्रकल्पासाठी पालिकेला केंद्र सरकारकडून १४ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकांमध्ये ठणठणाट

$
0
0
वेतन, भत्ते आणि सेवा शर्तीमध्ये सुधारणा करण्यात यावी, या मागणीसह सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांविरोधात ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने (यूएफबीयू) पुकारलेल्या संपामुळे बुधवारी बँकेत शुकशुकाट दिसत होता.

‘नैसर्गिक प्रतिभेचा शोध घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती करावी’

$
0
0
‘निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा शक्ती दिली आहे. त्या प्रतिभेचा विद्यार्थ्यांनी शोध घेऊन प्रगती साध्य करावी,’ असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.

पुरेशा कापसाअभावी जिनिंग उद्योग अडचणीत

$
0
0
शेतकऱ्यांना लागलेली भाववाढीची आशा आणि जागतिक बाजारपेठेत कापूस गाठींच्या भावात आलेली मंदी यामुळे जिनिंग प्रेसिंग उद्योग अडचणीत सापडला आहे. तीन शिफ्टमध्ये जिनिंग चालवण्याठी पुरेसा माल मिळत नसल्याने जिनिंग चालक अडचणीत सापडले आहेत.

नांदेड जिल्ह्यात केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी

$
0
0
केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी नांदेड जिल्हयात प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे मत राष्ट्रीय स्तरावरील संनियंत्रक बी. सुब्रमण्यम रेड्डी यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची पाहणी करण्यासाठी ते नांदेड जिल्हयाच्या दौऱ्यावर आले आहेत.

घटांब्रीच्या विद्यार्थ्यांची पंचायत समितीत शाळा

$
0
0
भारतीय जनता पक्षाने घटांब्री येथील राजे संभाजी विद्यालयातील विद्यार्थी व पालकांची मंगळवारी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात शाळा भरविली. शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नगर पालिकेसाठी ४९ जणांचे ५१ अर्ज

$
0
0
नगर पालिका निवडणुकीसाठी बुधवारी ४९ जणांनी ५१ उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चुन्नीलाल कोकणी यांनी दिली.

‘कृष्णा-भीमा’तून मराठवाडा वगळा

$
0
0
कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाशी मराठवाड्यातील कृष्णा खोऱ्याची सांगड घालण्यात येऊ नये. सरकारने २०००मध्ये मंजूर केलेल्या मूळ प्रकल्पानुसार मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यांचे पाणी मिळावे, असा ठराव मराठवाडा विकास मंडळाच्या बैठकीत बुधवारी (१८ डिसेंबर) मंजूर करण्यात आला.

ऑइल डेपोसाठी प्रस्ताव पाठवा

$
0
0
औरंगाबाद शहरात पेट्रोल डेपो व्हावा, या मागणीला पेट्रोलियम विभागाने हिरवा कंदील दाखविला असून लवकरात लवकर पेट्रोलियम डेपो सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images